तरुण लोक विचारतात. . . .
देवाबद्दल का बोलावे?
“सर्वांना त्यांचा स्वत:चा धर्म आहे. देवाबद्दलच्या तुमच्या कल्पनांवर विश्वास ठेवण्यास तुम्ही इतरांना भाग पाडू नये.”—१४-वर्षीय रॅशीश, गुएना.
“देवाबद्दल बोलण्यास मी अडखळतो कारण त्यामुळे माझी थट्टा होईल याची मला लाज वाटते.”—१७-वर्षीय रोहन, गुएना.
“आम्ही देवाबद्दल बोलावे कारण तो आमचा निर्माणकर्ता आहे व त्याने आम्हाला जीवन दिले आहे.”—१३-वर्षीय मारको, जर्मनी.
तरुण लोकांच्या गटातील संभाषण काळजीपूर्वक ऐका व शेवटी तुम्ही या दुःखदायक निष्कर्षास पोहंचा₹ल की: अनेक क्षेत्रात, तरुणांमधील सर्वसामान्य संभाषणात देवाबद्दल चर्चा निश्चितच नाही. जर तुम्ही खेळ, कपडे, अलिकडील चित्रपट किंवा विरूद्ध लिंगी व्यक्ती या गोष्टींचा उल्लेख केला तर पुष्कळ वेळेस चैतन्यपूर्ण संभाषणास तुम्ही कारणीभूत होऊ शकाल. देवाचा उल्लेख केला जातो तेव्हा ते लगेच शांत होतात व धुक्याप्रमाणे लगेच विरुन जातात.
काही तरुण सहज म्हणून देवावर विश्वास ठेवत नाहीत. असे करण्याचे कारण ते म्हणतात, आम्ही देवाला पाहू शकत नाही, त्यामुळे तो अस्तित्वातच नाही तर त्याच्याबद्दल बोलणे हे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. तथापि नास्तिकवादी हे तरुण लोकातील अल्पसंख्यांक निश्चितच आहे. गल्लप संस्थेने पाहणी केल्यानुसार जवळजवळ ९५ टक्के अमेरिकन तरुण देवावर विश्वास ठेवतात. वस्तुस्थिती अशी की, गल्लपने असा समारोप केला: “पुष्कळ तरुणांना देवावर असणारा त्यांचा विश्वास हा अस्पष्ट असा नाही, तर व्यक्तिगत देव त्यांची कृती व फळ यांचे परिक्षण करतो किंवा त्यानुसार त्यास शिक्षा करणारा असा आहे.” तर मग, पुष्कळ तरुण जो विश्वास बाळगतात त्याबद्दल बोलण्यास का अडखळतात?
काही मागे का राहतात
पुष्कळजण सहजच असा विचार करतात, की विश्वासाबद्दल बोलणे एक वाईट सवय आहे व धार्मिक विचार गुप्त ठेवणे सर्वोत्कृष्ट आहे. काही तरुण देवाबद्दलच्या चर्चेच्या कल्पनेने गोंधळून गेल्यासारखे दिसतात. “असे करणे युवकांसाठी स्वीकृत नाही,” असे ते म्हणतात.
तुमच्या सोबत्यांचा कोणताही दृष्टिकोन असो पण याबाबतीत तुमची भूमिका काय आहे? तुमची वाढ एक यहोवाचे साक्षीदार अशी झाली असेल तर हा प्रश्न समर्पक आहे. का बरे? कारण यहोवाच्या साक्षीदारांचा मुख्य विश्वास साक्ष देणे व इतरांना देवाबद्दल सांगणे हा आहे!—यशया ४३:९, १०; मत्तय २४:१४.
असे असले तरी, अधूनमधून होणाऱ्या छळाने निराश झाल्यामुळे काही तरुण साक्षीदार जाहीर प्रचारकार्यात भाग घेण्यास मागे पडतात किंवा पालकांच्या आग्रहामुळेच भाग घेतात. इतर क्षेत्रसेवेमध्ये भाग घेतात परंतु गुप्तपणे, ज्याद्वारे ते हे करत आहेत हे शाळेतील मित्रांना दिसणार नाही. शाळेमध्ये, काहीजण त्यांचा धार्मिक विश्वास गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते वर्गमित्रांद्वारे नेहमी होणाऱ्या थट्टेच्या भीतीमुळे तसे करतात. तरुण रेयन याने कबूल केले: “देवाबद्दल बोलण्यास मला भीती वाटत होती, कारण सोबती मला तुच्छतेने बोलतील त्यामुळे मला माझे संभाषण पुढे चालू ठेवण्याचे धैर्य होत नव्हते.”
शिवाय, असेही काही लोक आहेत ज्यांना भीती वाटते की ते बायबलच्या दर्जानुसार जीवन जगू शकत नाहीत त्यामुळे ते अडखळतात. “तरुणपणाच्या प्रासंगिक वासनेचे” आकर्षण वाटत असल्याने जर त्यांनी काही चूक केली, तर स्वत:ची ख्रिस्ती म्हणून ओळख होऊ नये हे सर्वात चांगले आहे असे ते म्हणतात.—२ तीमथ्य २:२२, NW.
काहींना कमीपणा वाटत असल्याने ते देवाबद्दल बोलत नाहीत. एकोणीस वर्षीय वील्टन याने याप्रकारे म्हटले: “माझ्या सहकामगारांबरोबर देवाबद्दल बोलण्यास मला अवघड वाटले कारण ज्या गोष्टी मी त्याच्याबद्दल बोललो त्याचे योग्य कारण मी स्पष्ट करु शकत नाही. मला वाटले, की जर माझ्या विश्वासाला आव्हान केले तर माझ्याकडे समाधानकारक उत्तर नाही.”
ख्रिश्चनाची जबाबदारी
याच कारणास्तव देवाबद्दल बोलण्यास तुम्ही मागे पडला आहात का? तसे असल्यास, तुम्ही एकटेच असे नाही. इतर तरुणांनी देखील अशाच प्रकारच्या भावनांशी लढा दिला आहे. तथापि, असे करण्यापासून जरी पुष्कळ गोष्टी त्यांना निराश करत असतील तरीदेखील देवाबद्दल इतरांना सांगण्यास भाग पाडणारी पुष्कळ कारणे आहेत. त्यांच्यापैकी काही कोणती आहेत?
सुरवातीला तरुण मारको याने योग्य रितीने देवाबद्दल बोलताना म्हटले, “तो आमचा निर्माणकर्ता आहे व त्याने आम्हाला जीवन दिले आहे.” (प्रकटीकरण ४:११) होय, जीवन ही बहुमोल देणगी आहे. स्तोत्रकर्त्याने देवाविषयी म्हटले: “जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे.” (स्तोत्र ३६:९) आम्हाला ही देणगी मिळाल्याने आम्ही त्याची गुणग्राहकता बाळगू नये का?
गुणग्राहकता दाखविण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांसमोर यहोवा देवाचे गौरव करणे. सूर्य, चंद्र, पाऊस, आम्ही श्वास घेतो ती हवा व जे अन्न खातो त्यासर्वांचा तो निर्माणकर्ता आहे. (प्रेषितांची कृत्ये १४:१५-१७) शिष्य याकोबाने म्हटले: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरुन आहे.” (याकोब १:१७) या देणग्यांबद्दल तुम्ही देवाचे आभार मानता का? (कलस्सैकर ३:१५) देवाचे आभार मानण्यास त्याच्याबद्दल बोलण्याव्यतिरिक्त कोणता मार्ग चांगला असू शकेल?—लूक ६:४५.
खरे म्हणजे, देव आम्हाला त्याच्याबद्दल बोलण्यास आज्ञा देतो. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याने ख्रिश्चनांना आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा.” (मत्तय २८:१९, २०) या कामाच्या जबाबदारीत भाग घेण्यास तरुणांना वगळलेले नाही. स्तोत्रकर्त्याने आज्ञा दिली: “परमेश्वराचे [यहोवा, NW] स्तवन करा, . . . कुमार व कुमारी वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्वराच्या [यहोवाच्या] नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे.” (स्तोत्र १४८:७, १२ १३) परंतु या नेमणूकीस तुम्ही ओझे असे वाटू देऊ नये. खरोखरच, तो एक सुहक्क आहे—तुम्ही खरोखर एक “देवाचे सहकारी” होऊ शकता.—१ करिंथकर ३:९.
जर तुम्हा स्वतःला आपण लायक नाही असे वाटत असेल तर काय? बायबलच्या काळात भविष्यवादी यिर्मयाला अशाप्रकारे वाटत होते. त्याने म्हटले, “अहो, प्रभु परमेश्वर [यहोवा, NW] पाहा मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” त्यावेळेस यहोवाचा प्रतिसाद काय होता? “मी बाळ आहे असे म्हणू नको; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याजकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल.” (यिर्मया १:६, ७) यहोवाच्या मदतीने यिर्मयाने ४० वर्षे त्याप्रमाणेच केले!
आजच्या ख्रिश्चनांचेही असेच आहे, “आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.” (२ करिंथकर ३:५) तुमचा स्वभाव जरी लाजाळू एकलकोंडा असेल तरी देव तुम्हाला बोलण्यास धैर्य देईल. देववचनाचे शिक्षक या नात्याने आपल्या “अंगची पात्रता” वाढविण्यास मदत करण्यासाठी ख्रिस्ती मंडळीमध्ये तरतूदी आहेत. तुम्हाला व्यक्तिगत मदतीची गरज असल्यास, मंडळीतील पर्यवेक्षकांशी का बोलू नये? ती केवळ व्यक्तिगत बायबल अभ्यासाचा कार्यक्रम वाढविण्याची किंवा अनुभवी व्यक्तिबरोबर काम करण्याची गोष्ट असेल.
तुम्ही काय साय करु शकाल
देवाबद्दल बोलणे तुम्हाला चांगल्याप्रकारे लाभ प्राप्त करून देईल. एक गोष्ट म्हणजे, तुमचे पुष्कळ सोबती जीवनातील समस्यांसाठी उत्तरे शोधित आहेत व मदतीची ओरड करत आहेत. त्यांना मार्गदर्शनाची उणीव आहे व भवितव्यासाठी कोणतेही चांगले दृष्य त्यांच्या समोर नाही. ते विचार करतात, “आम्ही येथे का आहोत? आम्ही कोठे जाणार आहोत? जग एवढ्या समस्यांनी का भरलेले आहे? एक ख्रिस्ती या नात्याने तुम्हाकडे उत्तरे आहेत व तुमच्या सोबत्यांना अशाप्रकारचे ज्ञान व्यक्त करण्यास तुम्ही योग्य स्थितीत आहात. तुम्ही दोघेही तरुण असल्याने पुष्कळ गोष्टी सारख्या असू शकतील व ते प्रौढांपेक्षा त्याच्याच वयाच्या लोकांसोबत बोलतील.
हे खरे की, पुष्कळ वेळा विरोधाला तोंड द्यावे लागेल. परंतु काही व्यक्तिगत, बायबलच्या संदेशाला प्रतिसाद देणारेही भेटतील. एक तरुणी बसमध्ये तिचे व्यक्तीगत क्वेशन्स यंग पिपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक वाचत होती.a तिच्या शेजारी बसलेला मुलगा तिच्या बरोबर त्या पुस्तकातून वाचू लागला. तो मुलगा मोठ्याने म्हणाला: “हे एक चांगले पुस्तक आहे! ते देवाबद्दल पुष्कळ काही बोलते. पुष्कळ लोक धर्मामध्ये आस्थेवाईक नाहीत.” देवाच्या नावाबद्दल सखोल चर्चा करण्यास या तरुण साक्षीदाराने संधीचा चांगला वापर केला.
हे खरे आहे की, तुम्ही स्वतःची ख्रिस्ती अशी ओळख देता तेव्हा तुम्हावर तसे वागण्याची जबाबदारी आहे. (१ पेत्र २:१२) परंतु चांगली ख्रिस्ती वागणूक तुमच्या संदेशाची विश्वसनीयता वाढवू शकेल. एरिक नावाच्या तरुणाचा अनुभव विचारात घ्या. त्याच्या शाळेमध्ये असणाऱ्या तरुण साक्षीदाराच्या वागणूकीने तो प्रभावित झाला. यामुळे देवाबद्दल अधिक शिकण्यास त्याच्यामध्ये आस्था निर्माण झाली. त्याच्या बरोबर बायबल अभ्यास सुरू करण्यात आला व आज तो समर्पित असा यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात काम करत आहे.
देवाविषयी बोलणे तुम्हाला मदत करु शकते! ते संरक्षक असे असू शकेल. तुमच्या सोबत्यांना तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात हे माहीत असेल तर पुष्कळजण तुमचा आदर करतील. आमच्या ठायी उच्च दर्जे आहेत हे ओळखल्यामुळे चुकीच्या गोष्टींमध्ये गुरफटण्यासाठी दबाव आणण्याची प्रवृत्ती कमी असेल व दबाव येत असताना त्याच्या प्रतिसादात तुम्ही साक्ष देणार हे त्यांना माहीत आहे.
निश्चितच, याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस बोलत असताना तुमच्या मुखातून बायबलचीच वचने निघावीत. तुम्हाला खेळ, कपडे, संगीत यामध्ये आस्था असेल व याच गोष्टींबद्दल आम्ही बोलण्याची इच्छा करु. परंतु लक्षात ठेवा: “अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्तय १२:३४) जर तुमच्या अंतःकरणात देवाबद्दल खरोखर प्रेम असेल तर तुम्ही साहाजिकच देवाबद्दल बोलण्याची इच्छा प्रगट कराल. पुढील अंकात, तुम्ही ते प्रभावीपणाने कसे करु शकता त्याबद्दल काही मार्गांची चर्चा आम्ही करणार आहोत. (g94 9/22)
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी, न्यूयॉर्क इंका, द्वारे प्रकाशित झालेले.
[२२ पानांवरील चित्रं]
जाहीर प्रचारकार्याच्या कामात असताना तुमच्या शाळकरी मित्रांनी तुम्हाला पाहिल्यास लाज वाटते का?