धर्म आणि विज्ञान—एक वाईट मिश्रण
हजारो वर्षांच्या वैज्ञानिक सत्याच्या संशोधनाला लागोपाठ संशोधनाचा बळकट पाया प्राप्त होत आहे असे दिसले. पुढील प्रगतीकरीता खात्रीने काहीही अडथळा करु शकत नव्हते. आणि तरीही, द बुक ऑफ पॉप्युलर सायन्स म्हणते, “सामान्य शतकाच्या तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या शतकामध्ये विज्ञान हे अतिशय दयनिय बनले होते.”
या परिस्थितीला दोन घटना खऱ्या अर्थाने जबाबदार होत्या. पहिल्या शतकात, येशू ख्रिस्ताची ओळख करुन देणारा नवीन धार्मिक कालखंड सुरू झाला होता. आणि काही शतके अगोदर, इ.स.पू. ३१ मध्ये, रोमी साम्राज्याच्या स्थापनेसोबत नवीन राजकीय कालखंडाचा जन्म झाला होता.
आधी नमूद केलेला संदर्भ सांगतो की, रोमी हे त्यांच्या आधी होऊन गेलेल्या ग्रीक तत्वज्ञानांप्रमाणे, “कल्पित सत्याचे संशोधन करणे यात नव्हे तर दररोजच्या जीवनातील समस्या सोडविण्यात जास्त आस्थेवाईक होते.” तर्कशुद्धतेत पाहता, “त्यांचे शुद्ध विज्ञानाला सहकार्य हे अतिशय कमी प्रमाणात होते.”
तथापि, असे गोळा केलेले विज्ञानाचे ज्ञान पसरविण्यास रोमी कारणीभूत होते. उदाहरणार्थ, प्लिनी द एल्डर यांनी वैज्ञानिक संग्रहांची रचना केली ज्याला पहिल्या शतकात नॅचरल हिस्ट्री नावाने ओळखले जात होते. यामुळे काही उणीवेव्यतिरिक्त, वेगवेगळी विज्ञानाची माहिती सांभाळून राहिली नसती कदाचित पुढील पिढीपर्यंत ती गमावली असती.
धर्माचा विचार करता, वेगाने वाढणारी ख्रिस्ती मंडळी त्या वेळच्या विज्ञानाच्या संशोधनात सहभागी झाली नाही. ख्रिस्तीजनांनी अशाचा विरोध केला असे नाही, पण ख्रिस्ताने स्वतः घालून दिलेल्या गोष्टींना म्हणजेच धार्मिक सत्य समजून घेणे व त्याचा प्रसार करणे याला तेव्हा प्राधान्य देण्यात आले.—मत्तय ६:३३; २८:१९, २०.
पहिल्या शतकाच्या समाप्तीच्या आधी, धर्मत्यागी ख्रिश्चनांनी धार्मिक सत्याची भेसळ करून फैलावण्याच्या कामगिरीला सुरूवात केली होती. याने आधीच भाकित केल्याप्रमाणे नंतर ख्रिस्तीत्वास धर्मत्यागाचे स्वरुप देण्यास त्यांना निरविले. (प्रे. कृत्ये २०:३०; २ थेस्सलनीकाकर २:३; १ तीमथ्य ४:१) त्यानंतरच्या घटना हे दाखवून देतात की त्यांच्या धार्मिक सत्यासंबंधीच्या नापसंतीने त्यांच्यात उदासीन मनोवृत्ती निर्माण केली—शास्त्रीय सत्याच्या बाबतीत—विरोधात्मक दृष्टिकोन घेतला गेला.
“ख्रिश्चन” युरोप आपले नेतृत्व गमावत आहे
द वर्ल्ड बुक एन्साक्लोपिडीया स्पष्ट करते की मध्य युगात (५व्या ते १५व्या शतकात), “युरोपमधील, विद्वान हे निसर्गाच्या अभ्यासापेक्षा वेदांन्त शास्त्रात जास्त आस्था राखून होते.” आणि हे “निसर्गावरील संशोधनाऐवजी तारणावर जोर दिल्यामुळे,” कॉलिअर्स् एन्साक्लोपिडीया असे निर्देशिते की, “विज्ञानाला उत्तेजन देण्याऐवजी त्याला हरकत जास्त घेतली गेली.”
पण ख्रिस्ताची शिकवण अशा प्रकारे अडखळण व्हावे या हेतूची नव्हती. तरीसुद्धा, ख्रिस्तीधर्मराज्याच्या खोट्या धर्माच्या गुंतागुंतीच्या कल्पना, ज्यात अमर जीवाच्या तारणाच्या कल्पनेला अतिमहत्त्व देण्याचा समावेश होता त्यामुळे त्या वाढीला अधिक चालना मिळाली. बहुतेक शिक्षण चर्च प्रभावाखाली आणि मुखतः, मठात पुनरावसन होत असे. या धार्मिक मनोवृत्तीमुळे वैज्ञानिक सत्याच्या शोधात मंदपणा आणला गेला.
सामान्य युगाच्या सुरुवातीपासून वेदांन्त शास्त्रापेक्षा वैज्ञानिक गोष्टींना दुय्यम स्थान मिळाले. प्रत्यक्षात पाहता उल्लेख करण्याच्या पात्रतेची प्रगती विज्ञानाने वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात घडवली. उदाहरणार्थ, इ. सनाच्या पहिल्या शतकातील रोमी वैद्यकीय लेखक एलुस केल्सुस्, ज्याला “रोम्यांमधील हिपोक्रॅटीझ्” म्हणत त्याने आताच्या वैद्यक क्षेत्रात उच्च मानल्या जाणाऱ्या श्रेष्ठदर्जाच्या वाङ्मयाचे लिखाण केले. ग्रीक औषधाचा उत्पादक पेडानियस् डीओसकोरीडेस, निरो रोमी सैन्याचा शस्त्रवैद्य, याने औषधे तयार करण्याच्या शास्त्रावर उल्लेखनिय क्रमिक पुस्तक लिहून पूर्ण केले जे शतकांपासून विस्तृतरितीने वापरले गेले. दुसऱ्या शतकातील ग्रीक, गॅलन, याने शरीरविज्ञान शास्त्रावर वैद्यकिय सिद्धांत व प्रयोग यावर केलेले संशोधन त्याच्या काळापासून संपूर्ण मध्य युगात चालू राहिले.
पंधराव्या शतकानंतर देखील विज्ञानाच्या साठवणूकीचा कालावधी निरंतर राहिला. हे खरे की युरोपीय शास्त्रज्ञ या कालावधीत संशोधन करीत होते, पण जास्त प्रमाणात, ते मूळचे नव्हते. टाइम मासिकाने असे निरीक्षले: “[चीनी] जगातील पहिले विज्ञानाचे प्रावीण्य असलेले होत. कंपासाचा कसा उपयोग करायचा, कागद व बंदूकीची दारु कशी बनवायची, [आणि] हलविता येणाऱ्या टाइपने छपाई कशी करायची ह्या गोष्टी युरोपियांच्या खूप आधीच त्यांना कळाल्या होत्या.”
याप्रमाणे, “ख्रिश्चन” युरोपमधील सर्वसाधारण वैज्ञानिक विचारांच्या पोकळीच्या कारणाने, ख्रिस्तेत्तर संस्कृतीने नेतृत्व घेतले.
वैज्ञानिक प्रगती
नवव्या शतकापासून, अरबी शास्त्रज्ञ हे विज्ञानाच्या बाबतीत नेतृत्व करण्यात चपळ बनले. खासकरून १०व्या व ११व्या शतकात—ख्रिस्तीधर्मजगत नाममात्रपणे कार्यवाहित होत असताना—पूर्णत्वाच्या सुवर्णयुगाचा त्यांनी आनंद उपभोगला. त्यांनी वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, आणि यापेक्षा अधिक म्हणजे गणित शास्त्रात देखील बहुमूल्य कामगिरी बजावली. (पान १८ वरील पेटी पाहा.) माएन झेड्. मडेना, कोलंबिया युनिव्हर्सिटी येथील, अरबीचे सहकारी प्राध्यापक म्हणतात की, “आधुनिक त्रिकोणमिती तसेच बीजगणित व भूमिती ही जास्तप्रमाणात अरबी निर्मिती आहे.”
यातील पुष्कळ वैज्ञानिक ज्ञान हे मूळचे होते. पण यातील काही ग्रीक तत्त्वज्ञानाच्या भक्कम पायावर आधारित होते, आणि आश्चर्याचे म्हणजे हे धर्माच्या सहभागाने उभारण्यात आले होते.
तुलनात्मकरित्या सामान्य युगाच्या सुरुवातीस, ख्रिस्ती धर्मजगत पर्शिया मध्ये विस्तारले आणि त्यानंतर अरब व भारतातदेखील आले. पाचव्या शतकाच्या दरम्यान, नेस्टोरियस्, कॉन्स्टटोटीनोपलचा पूर्वज, याला वादविवादात ओढण्यात आले जे नंतर पूर्वेकडील चर्चच्या धार्मिक गोष्टीतील मतभिन्नत्वापर्यंत पोहचले. यामुळे हे नेस्टोरियस्च्या गटामध्ये विभागणी होण्याकडे निरविले गेले.
सातव्या शतकात, अचानकपणे जगाच्या दृश्यात इस्लाम हा नवीन धर्म आला व त्याने आपली मोहीम विस्तारण्यास सुरुवात केली, तेव्हा नेस्टोरियस् याने त्यांचे ज्ञान लगेच अरबी विजेत्यापर्यंत पोहचविले. द एन्साक्लोपिडीया ऑफ रिलीजन प्रमाणे, “नेस्टोरियनस् हे ग्रीक विज्ञान व तत्त्वज्ञानाचे मूळ ग्रीक भागाचे सायरिक व नंतर अरबीत भाषातंर सुरु करण्यात पहिले होते.” तसेच ते “बगदाद येथे ग्रीक औषधांचा परिचय करून देण्यास देखील पहिले होते.” नेस्टोरियस्पासून शिकलेल्या गोष्टींवर अरबी शास्त्रज्ञ प्रगती करु लागले. अरबी साम्राज्यात सायरिक भाषा ही विज्ञानाची भाषा अशी पुनर्स्थापना अरबी लोकांनी केली व वैज्ञानिक लिखाणात ही भाषा अति योग्य आहे हे शाबीत झाले.
पण अरबांनी जितके ज्ञान घेतले तितकेच त्यांनी दिले देखील. जेव्हा मरिक्कोचे रहिवासी स्पेन द्वारे युरोपला आले—७०० वर्षे राहण्याकरता—तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत मुस्लीम संस्कृतीचे ज्ञान आणले. व आठ ख्रिस्ती धर्मयुद्धे १०९६ व १२७२च्या दरम्यान घडवली गेली तेव्हा पाश्चिमात्य धर्मयुद्धकर्त्यावर प्रगत इस्लामी संस्कृतीच्या संपर्कात आल्यामुळे मोठी छाप पडली गेली. ते परतले तेव्हा एक लेखक म्हणतो त्याप्रमाणे, “ते नवीन मतप्रणाली” घेऊन आले.
अरबी गणिताची सुबोधता
रोमी अक्षरांचा वापर करण्याऐवजी अरबी संख्यावाचक आकड्यांची ओळख युरोपला अरबींनी दिली. ही एक महत्त्वाची देणगी होती. खरे पाहता, “अरबी संख्या” हे चुकीचे नाव आहे. जास्त रास्त शब्द म्हणजे बहुतकरुन “हिंदू-अरबी संख्या” असे हवे होते. हे खरे की, नवव्या शतकात अरबी गणिततज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ अल-ख्वारीझमी यांनी या व्यवस्थेबद्दल लिहिले, पण त्यांनी भारताच्या हिंदू गणिततज्ज्ञाकडून, ज्याने इ.स.पू. तिसऱ्या शतकात, हजार वर्षे अगोदर हे कल्पीले होते, त्याच्याकडून ते मिळविले.
लिओनार्ड फिबोनासी या गणिततज्ज्ञाने (तसेच जो पिसाचा लिओनार्ड म्हणून देखील ओळखला जात होता) त्यातील फरक १२०२ मध्ये लेबर अबाकी (बुक ऑफ द अबाकस) यात ओळख स्पष्ट करण्यापूर्वी ही व्यवस्था युरोपमध्ये कमी प्रमाणात ज्ञात होती. या व्यवस्थेच्या फायद्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविताना, त्याने स्पष्टीकरण दिले: “भारतीय नऊ संख्या म्हणजे: ९ ८ ७ ६ ५ ४ ३ २ १. या नऊ संख्येद्वारे व ० या चिन्हाद्वारे . . . कोणतीही संख्या लिहिता येऊ शकते.” प्रथम युरोपियन याला प्रतिसाद देण्यास अनुत्साही होते. पण मध्य युगाच्या शेवटास, त्यांनी नवीन संख्यावाचक पद्धत स्वीकारली, व याचे सोपेपण वैज्ञानिक प्रगतीला उत्तेजक ठरले.
हिंदु-अरबी संख्या ह्या पूर्वी वापरात असलेल्या रोमन संख्येपेक्षा सोप्या नाहीत असे जर तुम्हाला वाटत असेल तर MCMXCIII यातून LXXIX हे वजा करण्याचा प्रयत्न करा. गोंधळलात ना? त्याऐवजी १,९९३ यातून ७९ वजा करणे किती सोपे वाटते.
युरोपात शिकण्याची आकांक्षा पुन्हा प्रज्वलित करणे
मुसलमान जगतात १२व्या शतकाच्या सुरवातीला, शिकण्याची जी ज्वलंत आकांक्षा होती ती मंद बनत गेली. तथापि, आधुनिक विश्वविद्यालयात पूर्वीच्या माहितीवरून जेव्हा विद्वानांच्या गटाची स्थापना केली तेव्हा युरोपात पुन्हा एकदा शिकण्याची आशा प्रज्वलित झाली. पॅरीस व ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाची सुरुवात १२ व्या शतकाच्या मध्याला झाली. केंब्रीज विश्वविद्यालयाची सुरुवात १३ व्या शतकाच्या आरंभीलाच झाली, व त्यासोबतच प्रेग व हायडेल्बर्ग दोन्ही १४ व्या शतकात अस्तित्वात आले. एकोणीसाव्या शतकापासून विश्वविद्यालये हे विज्ञानाच्या संशोधनाचे महत्त्वाचे स्थळ बनले.
मुळतः ह्या शाळांवर धर्माचा जास्त पगडा होता, पुष्कळ अभ्यास हा वेदांन्ताकडे कल असलेला किंवा त्याच्यावर केंद्रित असे. पण याच वेळेस, शाळेने ग्रीक तत्त्वज्ञानांला खासकरून, ॲरिस्टॉटलच्या लिखाणाला स्वीकारले. द एन्साक्लोपिडीया ऑफ रिलीजन प्रमाणे, “सबंध मध्य युगात . . . शैक्षणिक पद्धत ही . . . ॲरिस्टॉटलच्या तर्काप्रमाणे म्हणजे व्याख्या, विभागणी, तसेच एखाद्या भागाच्या स्पष्टीकरणावरील तर्क आणि समस्येसंबंधीचा करारीपणा या बाबतीत ॲरीस्टॉटलच्या विचारसरणीचा पाठपुरावा केला जाई.”
थॉमस ॲक्युनास नावाच्या विद्वानाने १३व्या शतकात ॲरिस्टॉटलच्या शिकवणीचा व ख्रिश्चन वेदातांचा मेळ घालण्याचा निश्चय केला, ज्याला नंतर “ख्रिश्चन ॲरिस्टॉटल” म्हणत. पण काही बाबतीत तो ॲरीस्टॉटलपेक्षा भिन्न होता. उदाहरणार्थ, जग हे कायम अस्तित्वात होते अशा सिद्धांतास ॲक्युनासने धिक्कारले. पण ते निर्माण करण्यात आले आहे अशा शास्त्रवचनाला स्वीकारले. “आपले विश्व हे सुव्यवस्थीत आहे ज्याचे पूर्णपणे आकलन होण्याकरीता समजबुद्धीचा प्रकाश असणे आवश्यक आहे या विश्वासाला” धरून असले पाहिजे, असे द बुक ऑफ पॉप्युलर सायन्स म्हणते. त्याने “आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य देणगी दिली.”
तथापि, जास्त प्रमाणात, ॲरीस्टॉटल, ल्पोटोमी, व गॅलन यांच्या शिकवणींना खात्रीचे सत्य म्हणून चर्चने देखील स्वीकारले. अगोदर उल्लेख करण्यात आलेला ग्रंथ हे स्पष्टीकरण देतो: “मध्य युगामध्ये, शास्त्रीय प्रयोगातील व थेट निरीक्षणातील आस्था ही संपुष्टात येण्याच्या मार्गाला लागली, तेव्हा ॲरीस्टॉटलचे शब्द म्हणजे सिद्धांत होते. एप्सी डिक्सीत (‘त्यांनी स्वतः असे म्हटले’) हा विवाद मध्ययुगीन शाळेतील माणसे ‘वैज्ञानिक’ निरीक्षणाचे पुष्कळ सत्य शाबीत करण्यासाठी उपयोग करीत. अशाप्रकारच्या परिस्थितीत ॲरीस्टॉटलच्या चुका, खासकरून भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र यातील अनेक शतकानंतर वैज्ञानिक प्रगतीकरता अडखळण होत्या.
या अंधश्रद्धेपासून पुढील दृष्टिकोनाला १३व्या शतकात आव्हान देणारा होता ऑक्सफर्डचा ख्रिश्चन महंत् रॉझर बॅकन. “मध्ययुगीन विज्ञानातील सर्वात मोठी व्यक्ती” असे त्याला म्हणण्यात येते. बॅकन वैज्ञानिक सत्य शिकून घेण्यासाठी या प्रयोगाला समर्थन करणारा एकटाच होता. असे सांगण्यात येते की १२६९ च्या दरम्यान, म्हणजेच इतर ही वस्तुस्थिती जाणण्याच्या शतकांअगोदर, त्याने मोटार गाडी, विमान, व इंजिनावरचे जहाज याचे भाकित वर्तवले.
तथापि, दूरदृष्टी व अतिशय हुषार बुद्धी असूनही, बॅकनला वस्तुस्थितीसंबंधी मर्यादित ज्ञान होते. फलज्योतिष, जादूटोणा, व अल्कमी (तीन चारशे वर्षांपूर्वीचे रसायनशास्त्र जे दोन कारणासाठी उपयोगात येत असे, एक म्हणजे कोणत्याही धातूला स्पर्श केल्यास त्याचे सोने होई, आणि असे पेय जे चिरतारुण्य देई) यावर त्याचा बळकट विश्वास होता. यावरून हे दिसून येते की विज्ञान हे खरोखर सत्याच्या बाबतीत सतत चालू असलेला शोध आहे, ज्यात नेहमी सुधारणा होत असते.
जरी वैज्ञानिक संशोधन १४व्या शतकात निद्रीस्त अवस्थेत सुप्त असलेले दिसले तरी, १५वे शतक त्याच्या शेवटाच्या जवळ येत असता, मानवजातीचा वैज्ञानिक सत्याचा शोध संपण्यापासून खूप दूर होता. वस्तुतः पुढील ५०० वर्षांत त्यांच्या साठी अधिक योग्यतेचे काय आहे हे अधिक स्पष्टरित्या कळेल. जग हे विज्ञानातील आमुलाग्र बदलाच्या उंबरठ्यावर उभे होते. आणि जसे प्रत्येक बदलाच्या वेळी घडते त्याप्रमाणे, यातील नट, खलनायक याचे बळी देखील आहेत. (g93 5/8)
[१८ पानांवरील चौकट]
अरबी विज्ञानातील सुवर्ण युग
अल्-खारीझमी (आठव्या-नवव्या शतकातील), इराकी गणितीतज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ; “अल्जीब्रा” या शब्दास अल्-जेबर या शब्दापासून अस्तित्वात आणले, ज्याचा अर्थ अरबी भाषेत “तुटलेल्या भागांना एकत्र आणणे” असा होतो.
अबु मुसा जबीर बीन हैयान (आठव्या-नवव्या शतकातील), ॲल्किमिस्ट्; ज्याला अरबी रसायनशास्त्राचा पिता म्हणण्यात येते.
अल्-बतेने (नवव्या-दहाव्या शतकातील), खगोल शास्त्रज्ञ, व गणिती शास्त्रज्ञ; टॉलमीच्या खगोलशास्त्रीय निष्कर्षात सुधारणा केली. तसेच वर्षांतील अंतर ऋतुमधील अंतर यात लक्षवेधक अचुकता याची गणती शोधून काढली.
अर-रॉझे (नवव्या-दहाव्या शतकातील), पर्शियात जन्मलेला एक सुविख्यात वैद्य; पहिल्यांदा त्याने देवी व गोवर यातील फरक स्पष्ट केला. व प्राणी, वनस्पती किंवा खनिजपदार्थ अशा सर्व वस्तूंचे वर्गीकरण केले.
बेसरातील, अबु अलि अल्-हसन इबनलहेथेम (अल्-हझन) (१०व्या-११व्या शतकातील), गणितीतज्ज्ञ व भौतिकशास्त्राचा अभ्यासक; दृष्टिविषयक प्रकाशशास्त्राच्या सिद्धांतात लक्षवेधक सहाय्य केले, ज्यात परावर्तन, वक्रीभवन, दुर्बिण दृष्टी, व वातावरणातील परावर्तन याचाही समावेश आहे; तसेच दृष्टी म्हणजे एखाद्या वस्तुपासून डोळ्यापर्यंत येणारा प्रकाश असे योग्य स्पष्टीकरण प्रथमच दिले.
ओमर खैय्याम (११व्या-१२व्या शतकातील), प्रख्यात पर्शियन गणितीतज्ज्ञ, भौतिकशास्त्राचा अभ्यासक, खगोलशास्त्रज्ञ, वैद्य व तत्त्वज्ञानी; त्यांच्या कवितांमुळे पश्चिमेकडे प्रख्यात असलेले.
[१६ पानांवरील चित्रं]
ॲरिस्टॉटल (वरचा) आणि प्लेटो (खालचा) शतकांपर्यत वैज्ञानिक विचारांचा बळकट परिणाम घडविला
[चित्राचे श्रेय]
National Archaeological Museum of Athens
Musei Capitolini, Roma