समलैंगिकता व धर्मपुढारी
यामध्ये खरोखरच सार्थ संबंध आहे का? “लैंगिक संबंधाने पसरणाऱ्या रोगांवर उपाय करणाऱ्या स्वास्थ अधिकाऱ्यांना, कॅथोलिक धर्मपुढाऱ्यांमध्ये सातत्याने आढळून येणाऱ्या समलैंगिकतेबद्दल, खूप पूर्वीपासून माहिती आहे. अशा एका अधिकाऱ्याच्या शब्दात, ‘माझ्या व मी ज्यांच्याशी या विषयी बोललो आहे अशा बहुतेक जन-स्वास्थ्य निदेशकांच्या अंदाजाने आपल्या समाजामध्ये पंचेचाळीस वर्षाखालील कॅथोलिक धर्मपुढाऱ्यांतील कमीत कमी एक तृतीयांश समलिंगी असून बहुतेक लैंगिकदृष्ट्या सक्रीय आहेत. ते बहुधा अनोळखी व्यक्तींशी गाठी घेतात. अशा प्रकारचा संभोग सर्वात जास्त धोकादायक असतो.” असे मत द अटलांटिक मंथली या सर्वमान्य नियतकालिकाने व्यक्त केले आहे.—फेब्रुवारी १९८७, पृष्ठ ४८.
समलैंगिकता व इतर धर्मांच्या पुढाऱ्यांविषयी काय म्हणता येईल? कॅथोलिक धर्मपुढाऱ्यांमधील एडस् रोगाच्या रुग्णांच्या संख्येची चर्चा केल्यावर, मुख्यत्वे समलिंगी क्रियांमुळे पसरणाऱ्या या रोगाविषयी द न्यूयॉर्क टाईम्सने नमूद केलेः “यहुदी धर्मगुरु, एपिस्कोपल, बॅप्टिस्ट व इतर धर्मांच्या पुढाऱ्यांसह अनेक अमेरिकन लोकांना एडस्चा प्रादुर्भाव झाला आहे.” (g87 6/22)