कोळ्याचे जाळेः पोलादापेक्षा मजबूत?
“चांगल्या प्रतीच्या पोलादापेक्षाही दुपटी-तिप्पटीचे बळ.” “तुटण्याआधी ३० टक्के विस्तार होऊ शकेल इतके लवचिक.” “व्यास केवळ एका मिलिमीटरचा सहस्त्रांश” (“मानवी केसाचा शंभरावा भाग”). काय आहे ते? आधुनिक तंत्रज्ञानाचे एखादे आश्चर्य? नाही. ते छोट्या तपकिरी कोळ्याने विणलेले जाळे ज्याला अरानी डायडेमटी असे म्हणतात व जे सर्वसाधारण कोळ्याचे जाळे म्हणून ओळखण्यात येते. या नैसर्गिक निर्मितीच्या रचनेचा अभ्यास करणाऱ्या ब्रिटीश कोलंबिया विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांना आढळले की, “ते जितके अधिक मजबूत होते तितके ते अधिक कडक बनते.” तरीही, “[कोळ्याच्या] जाळ्यातील लक्षणीय गोष्ट ही आहे की त्याचा धागा विस्तारु शकणारा व त्याचवेळी मजबूत असतो.” यासाठीच या छोट्या कोळ्याच्या रसायनापासून मानवाला याप्रमाणेच संयोगीकरणाचे नमुने तयार करता येतील का याविषयीचे संशोधन ब्रिटीश कोलंबिया विश्वविद्यालयाचे शास्त्रज्ञ करीत आहेत. या धाग्यात “रबर आणि स्फटिक यांना जोडणाऱ्या तंतुचे” गूढ हे यातील मूलतत्वातील एक आहे. पॉल कल्वर्ट या ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञांना हे सर्व “मोठे गंमतीचे” वाटते. कोळ्याचे जाळे हे अर्थातच, ज्याच्याठायी अतिमानवी बुध्दी आहे त्या थोर रचनाकाराची साक्ष देते.
होय, हे यहोवा देव या “सर्वज्ञाच्या अद्भूत कृत्यां”पैकीचे एक आश्चर्यकर्म आहे.—इयोब ३७:१६. (g86 1/8)