तरुण लोक विचारतात . . .
विवाहाआधी लैंगिक समागम—का नको?
वृत्तपत्राच्या माध्यमाकरवी जे सल्ले विचारले जातात त्यामध्ये कोणत्या विषयाचा पहिला क्रमांक असतो बरे? एका मोठ्या शहरातील वर्तमानपत्राकरता तर विवाहाआधीचा लैंगिक समागम हाच आहे. होय, याविषयीचे बरेच प्रश्न येतातः ‘तुमचे जर आपसात प्रेम आहे तर लैंगिक समागम करणे ठीक असेल का?’ ‘तुम्ही विवाह होईपर्यंत थांबून राहिलेच पाहिजे का?’ ‘ती “मजा” म्हणून वाटत नाही का?’ पण, याविषयीची मतेही अनेक आहेत! तर मग यापैकीचा कोणता सल्ला बरोबरचा असून तुम्हास उपयुक्त ठरणारा आहे?
पवित्र शास्त्राच्या नीतीसूत्रे पुस्तकातील सुरुवातीचा एक चतुर्थांश भाग (अध्याय १-९) विवाहाशिवाय होत असलेल्या लैंगिक आचरणाचा विषय राखून आहे. यात आढळणारा सल्ला आमचा निर्माणकर्ता देव याखेरीज दुसऱ्या कोणाचाही नाही. त्याने पुरविलेला सल्ला “तरुणाला [किंवा तरुणीला] ज्ञान व चातुर्य” देऊ शकतो. त्याचा सल्ला ग्रहण करणाऱ्यांना “चाणाक्षपण” किंवा मूळ इब्री शब्दानुसार “वळविणे वा मार्गदर्शित करण्याची कला” मिळू शकते. (नीतीसूत्रे १:४, ५) खरेच, तुमच्या सौख्यानंदाला “गालबोट” लावणाऱ्या कोणत्याहि फसव्या धोक्यांपासून आपले जीवन स्वतंत्रपणे वळविण्याची क्षमता आपल्यात असावी हे तुम्हाला मनापासून नक्की वाटत असणार!
काही तरुण लोकांना विवाहाआधीचा लैंगिक समागम आपल्या सौख्यानंदावर गदा आणील असे वाटत नाही. लैंगिक विचारांनी भारावलेल्या तरुणांना नेमके तेच वाटत असते जे कित्येक शतकाआधी असे म्हटले गेलेः “ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ. आपण प्रेमानंदाने आराम पावू.” (नीतीसूत्रे ७:१८) आमचे आपसात प्रेम जडले आहे तर लैंगिक आचार हा स्वाभाविकतः येणारच असे त्यांचे म्हणणे आहे. किंवा, लिओपोल्ड नावाच्या एका तरुण माणसाने जसे म्हटले तशीच यांचीही विचारधारा असते की, “तू खराच पुरुष आहेस हे सिध्द करुन दाखविण्यासाठी कोणा मुलीसोबत लैंगिक समागम आचरलाच पाहिजे.” याकारणास्तव आपल्या वयाच्या तरुण लोकात आपल्याला मानले जावे म्हणून काही ही कृति आचरण्याचे ठरवतात व त्याकरवी आपण पुरुषगामी नाहीत असेही व्यक्त करण्याची त्यांची इच्छा राहते.
पण प्रत्यक्षात, संशोधक अभ्यासाने आणि अगणित उदाहरणांनी हे दर्शविले आहे की बहुतेक तरुण लोक आरंभाला लैंगिक समागम करण्याची योजना करीत नसतात.a बहुतेक प्रकरणात लैंगिक समागम, मुलगा आणि मुलगी यांनी आपल्या शारीरिक अंगांना कुरवाळण्यास वाव देऊन वासना उद्दीप्त केल्यामुळे घडला गेला. विवाह न झालेल्या एका मातेने हे कबूल केलेः “मला व माझ्या परिचयाच्या इतर मुलींच्या बाबतीत, आम्ही दर वेळेला अधिकाधिक सरसावलो गेलो असल्याचे दिसले व यामुळे आम्ही आमचे कौमार्य गमावून बसलो. थोडासा लडिवाळपणा, कुरवाळणे याने सुरुवात होताना बरे वाटते पण काय घडत आहे हे कळण्याआधी तुमचा यावरील संयम ढळलेला असतो.”
‘पण, विवाहाआधी आम्ही लैंगिक समागमाचा आनंद का लुटू नये’ असे काहींचे म्हणणे आहे. ‘दोघांची तशी इच्छाच आहे तर यात कोणता धोका आहे?’
यातनामय समस्या
आजची मजा ही उद्याला यातनाकारक सजा देऊ शकते. “कारण परस्त्रीच्या ओठातून मध स्त्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते”, असे नीतीसूत्रे ५:३, ४ चे परिक्षण आहे. “तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तरवारीसारखी तीक्ष्ण होते.”
कडु दवण्यासारखा घडून येणाऱ्या नंतरच्या परिणामापैकीचा एक आहे लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार. विवाहाआधीच्या लैंगिक आचारात सहभागी होण्यामुळे तो किंवा ती खरेपणाने ‘आपल्या शरीराबाबत पाप करतो’ वा करते. (१ करिंथकरांस ६:१८) कित्येक वर्षांनी जेव्हा हे कळायला लागते की अनैतिकता आचरल्यामुळे आता वांझपणा किंवा गंभीर अशी आरोग्य समस्या निर्माण झाली आहे तेव्हा अंतःकरण कसे चरचरुन जाते. नीतीसूत्रे ५:११ही हाच इशारा देतेः “तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील.”
विवाहाआधीच्या लैंगिक समागमामुळे बेकायदेशीर गर्भधारणा, गर्भपात किंवा अकालीच विवाह करावा लागणे यासारख्या गोष्टी घडतात आणि या प्रत्येकात यातनामय परिणामही जोडीला येतात. पण आणखी एक कठीण समस्या येते ती आहे . . .
भावनात्मक परिणाम
दोषाची भावना व स्वतःचा आदर गमाविल्याची भावना खेळू लागणे या गोष्टी विवाहाआधीच लैंगिक समागम आचरलेल्या कित्येकांनी व्यक्त केल्या आहेत, कारण यांना आतल्या आत त्रास होत राहिलेला असतो. उदाहरणार्थ, २३ वर्षे वयाच्या डेनिस ने अति दुःखाने म्हटलेः “तो मोठाच अधःपात झाला—वाटले होते तसे आता चांगले किंवा प्रेमाचा उबदारपणा वाटत नाही. पण मी केवढी चूक केली आहे याचीच मला सतत टोचणी होत राहते. माझ्या स्वतःचा आदर हरपला आहे या भावनेमुळेच मला अगदीच शरम येत आहे.”
आणखी कित्येकांनी दुःखाने याची साक्ष दिली आहे. “मोठा किळसवाणा धक्का बसून मला खरेपणाची जाणीव घडली,” असे एका तरुणीने म्हटले. “आता काहीच मजेचे राहिले नाही. पार्टीतील मजा सरली आणि आता मला वैतागल्यासारखे, हीन व गचाळ झाल्यासारखे वाटू लागले आहे. ‘अरे देवा, तू आम्हाला इतक्या खोलवर जाण्यापासून का आवरलं नाहीस?’ असा हा विलाप त्याच्या तोंडातून ऐकण्याशिवाय दुसरे काही चांगले ऐकायला मिळत नाही.”
अशा या प्रतिक्रिया मोजक्या नाहीत. डॉ. जे सिगल यांनी २,४३६ कॉलेज विद्यार्थ्यांचा “सेक्शुअल ऑटोबायोग्राफीस्” हा राष्ट्रीय पातळीवरील अभ्यास केला. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या अहवालात म्हटलेः “[लैंगिक समागमाच्या] पहिल्या आचारामुळे अतृप्तता व निराशा मिळाल्याचे जे अनुभव हाती आले त्यावर ज्यांनी यात सहभाग घेऊन मजा मिळविली त्यांचा आकडा मात करतो, तो दोनास एक आहे. पुरुषांनी व स्त्रियांनीही म्हटले की त्यांना मोठी निराशा वाटली.”
सर्वच तरुणांना दोषाची वा असमाधानी भावना खेळत नाही तरी पवित्र शास्त्र हा इशारा देऊन आहेः ‘जारकर्म . . . विवेक नष्ट करतो.’ (होशेय ४:११) विवाहाआधी लैंगिक समागम करणाऱ्याला वा जारकर्म आचरणाऱ्याला त्याच्या भावना हळूवारपणे बदलत आहेत हे जाणवू लागते. लैंगिक वासना उचल खातात आणि त्या समागमास चेतवतात. पण अशी वासना चंचल आणि लाटेसारखी उसळत राहते.
काही तरुणांनी जारकर्मामुळे आपला “विवेक” इतका डागविला की दर महिन्याला त्यांनी वेगवेगळ्या साथीदारांसोबत लैंगिक समागम साधण्याचा प्रयत्न केला. अशा या तरुणांना रॉबर्ट सोरेनसेन यांनी “लैंगिक उलाढाली करणारे” असे म्हटले आहे. आपल्या ‘उलाढाली’ची किंमत त्यांना मोजावी लागते असेही ते म्हणतात. सोरेनसेन लिहितातः “आम्ही जी व्यक्तीगत रुपाची मुलाखत घेतली त्यात या उलाढाली करणाऱ्यांनी बोलून दाखविले की . . . आपणात आता उद्देशपूर्वकता आणि स्व-संतुष्टता कमी प्रमाणात कार्यवाहित होत असल्याचे जाणवते.” शेहेचाळीस टक्क्यांनी या विधानाशी आपले सहमत व्यक्त केले की, “आता मी ज्या प्रकाराने जीवन व्यतित करीत आहे त्यात माझ्यातील बहुतेक कौशल्य वाया जात आहे असे वाटते.” सोरेनसेन यांना आणखी आढळले की, या घोटाळलेल्या तरुणांनी कमी स्वरुपाचा “आत्मविश्वास व स्व-सन्मान” वाटत असल्याचे कळविले. ही गोष्ट नीतीसूत्रे ५:९ म्हणते अगदी त्यासारखीच आहे की, अनैतिक आचारात गढणाऱ्यांची ‘अब्रु दुसऱ्याच्या हाती जाते.’
तरीही काही तरुणांचे म्हणणे आहे की, ‘आम्ही असे नाहीत. लैंगिक आचार आम्हाला उलट जवळ आणील.’ पण हे खरेच घडते का?
उजाडते तेव्हा
मुलामुलीने आपसात नातेसंबंध जुळविले तर त्यांना दर खेपेला ते वेगळेच वाटू लागतात. त्याला प्रत्ययास येते की आपल्या सखीसंबंधाने आपण जे प्रेम आधी बाळगले होते त्यात इतकी उत्कटता आता राहिली नाही. आता त्याने तिचा लैंगिक उपभोग घेतला असल्यामुळे ती त्याला कमी आकर्षक वाटते. तेच तिच्या बाबतीत पाहता, तिला आपला अवास्तव फायदा घेतला गेला आहे अशी भावना जडते. काहीही असले तरी लैंगिक संभोगामुळे जोडपे सीमा पार करतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करु शकत नाही.
पवित्र शास्त्र काळी, अम्नोनला तामार या कुमारिकेविषयी प्रेमरोग जडला. पण जेव्हा त्याने तिच्याशी संभोग केला तेव्हा “अम्नोनास तिचा अत्यंत तिरस्कार वाटला.” (२ शमुवेल १३:१५) याचप्रमाणे, व्यभिचारानंतर मारीया या मुलीने कबूल केलेः “मला माझ्या स्वतःबद्दल (माझ्या अशक्तपणासाठी) आणि माझ्या मित्राविषयी राग वाटू लागला. मला तर वाटले होते की लैंगिक समागम आम्हाला अधिक जवळ आणील पण प्रत्यक्षात त्याने आमचे नातेच बिघडविले. मला तर तो माझ्या नजरेसमोर नकोच असे वाटायला लागले.”
अर्थातच, साऱ्या प्रतिक्रिया या मारीया किंवा अम्नोनसारख्या नसतात. “क्षणिक परिणाम नातेसंबंध बळावण्यात दिसत असला तरीही प्रदीर्घ परिणाम मात्र वेगळेच ठरतात,” असे या क्षेत्रातील जाणकार पॉल एच. लॅण्डीस यांनी शेकडो विविध तरुणांचा अभ्यास केल्यावर हाती मिळालेल्या परिणामांचे मूल्यमापन करताना म्हटले. लैंगिक आचार आचारणारे जोडपे तो न आचरणाऱ्यापेक्षा अधिकांशाने विभक्त होण्याचे एक कारण हे आहे की अशा प्रकारची जवळीक त्यांच्यात द्वेष व बेभरवसा उत्पादित करतो. एका तरुणाने मान्य केलेः “समागम केल्यावर काही तरुणांना वाटू लागते की, ‘जर हिने माझ्याशी समागम केला आहे तर तिने दुसऱ्या कोणाशी जरुर केला असावा.’ खरे म्हणजे मलाच असे वाटायला लागले आहे. . . . मला तर भारी द्वेष, संशय आणि साशंकता वाटू लागली.”
पण हे अस्सल प्रेमापेक्षा किती वेगळे आहे बरे! कारण ते “हेवा करीत नाही, . . . गैरशिस्त वागत नाही (व) स्वार्थ पाहात नाही.” (१ करिंथकरास १३:४, ५) केवळ अशा प्रकारातील प्रेमच असे विश्वासपात्र नाते उभारते की ज्याचा परिणाम चिरकाल टिकणाऱ्या विवाहात होतो. तद्वत, पवित्र शास्त्र जो इशारा देते तो काही नवलाईचा नाही की, “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे . . . व्यभिचारी यांचा न्याय देव करील.”—इब्रीयांस १३:४.
हे विवाहाआधीच्या लैंगिक समागमाविरुध्द सर्वात महत्वपूर्ण वाद उभा करतेः ते देवाविरुध्द गंभीर पातक आहे. “देवाची इच्छा ही आहे,” असे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:३ म्हणते, “की . . . तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे.” हा प्रेरित सल्ला लक्षपूर्वक ग्रहण केल्यास अगणित अशा हृदयपीडेपासून तुम्हाला स्वतःचे रक्षण करता येईल. (w85 12/8)
[तळटीपा]
a लैंगिक समागम हा योजण्यात आला नव्हता तर तो स्वयंस्फूर्त रितीने घडला असे ६० टक्के स्त्रियांनी म्हटल्याचे एका अभ्यासाने दर्शविले.
[पानांवरील संक्षिप्त आशय]
आजची केलेली काही मजा उद्याला दुःखदायक सजा देऊ शकते
[पानांवरील संक्षिप्त आशय]
विवाहाआधीच्या लैंगिक समागमामुळे वाड्.निश्चय तुटण्याचा अंतःकरणाला भेदणारा परिणाम घडतो
[पानांवरील संक्षिप्त आशय]
लैंगिक संभोगामुळे जोडपे सीमा पार करतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करु शकत नाही
[पानांवरील चित्र]
विवाहाआधी लैंगिक समागम साधणाऱ्या अधिकाधिक जोडप्यांचे वाड्.निश्चय मोडतात