वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt २ योहान १-१३
  • २ योहान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ योहान
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ योहान

योहान याचं दुसरं पत्र

१ एका वडिलाकडून,* निवडलेल्या स्त्रीला आणि तिच्या मुलांना. तुमच्यावर मी मनापासून प्रेम करतो आणि फक्‍त मीच नाही, तर ज्या सर्वांना सत्याची ओळख झाली आहे तेसुद्धा तुमच्यावर प्रेम करतात. २ कारण, सत्य आपल्यामध्ये टिकून आहे आणि ते सर्वकाळ आपल्याजवळ राहील. ३ देव जो पिता आणि त्या पित्याचा मुलगा, येशू ख्रिस्त यांच्याकडून आपल्याला सत्य आणि प्रेम यांसोबतच अपार कृपा, दया आणि शांती मिळेल.

४ तुझी काही मुलं, पित्याकडून आपल्याला मिळालेल्या आज्ञेप्रमाणे सत्याच्या मार्गावर चालत आहेत, हे समजल्यामुळे मला खूप आनंद होतो.+ ५ आणि आता हे स्त्री, मी तुला विनंती करतो, की आपण एकमेकांवर प्रेम करावं. (मी काही तुला नवीन आज्ञा लिहीत नाही, तर आपल्याला सुरुवातीपासून मिळालेली आज्ञाच लिहीत आहे.)+ ६ आणि प्रेमाचा अर्थ हाच आहे, की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावं.+ तुम्ही सुरुवातीपासून ऐकलेली आज्ञा हीच आहे, की तुम्ही प्रेम करत राहावं. ७ कारण फसवणूक करणारे पुष्कळ जण जगात निघाले आहेत.+ येशू ख्रिस्त माणूस* म्हणून आला, असं ते मान्य करत नाहीत.+ जो हे मान्य करत नाही, तोच फसवणूक करणारा आणि ख्रिस्तविरोधी आहे.+

८ स्वतःला सांभाळा, म्हणजे तुमच्यामध्ये ज्या गोष्टी उत्पन्‍न करण्यासाठी आम्ही मेहनत घेतली त्या तुम्ही गमावून बसणार नाही, तर तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळेल.+ ९ जो ख्रिस्ताच्या शिकवणीत टिकून न राहता मर्यादा ओलांडतो त्याला देवाची पसंती मिळत नाही.+ पण, जो या शिक्षणात टिकून राहतो त्याला पिता आणि मुलगा या दोघांची पसंती मिळते.+ १० यापेक्षा वेगळं शिक्षण देणारा कोणी तुमच्याकडे आला, तर त्याला आपल्या घरात घेऊ नका+ किंवा त्याला नमस्कारही करू नका. ११ कारण जो कोणी त्याला नमस्कार करतो तो त्याच्या दुष्ट कामांत सहभागी आहे.

१२ मला आणखी बऱ्‍याच गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. पण, मला त्या कागद आणि शाई यांनी लिहायच्या नाहीत. तर, तुमच्या आनंदात भर पडावी म्हणून प्रत्यक्षात तुमच्याकडे येऊन तुमच्याशी बोलायची माझी इच्छा आहे.

१३ तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुलं तुला नमस्कार सांगतात.

शब्दशः “वडीलधाऱ्‍या माणसाकडून.”

शब्दशः “देहात.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा