वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt लूक १:१-२४:५३
  • लूक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लूक
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
लूक

लूक याने सांगितलेला आनंदाचा संदेश

१ हे आदरणीय थियफील,+ आपल्याला ज्यांची पक्की खातरी आहे, त्या गोष्टींचा वृत्तान्त लिहून काढायचं काम बऱ्‍याच जणांनी हाती घेतलं आहे.+ २ आणि जे सुरुवातीपासून या गोष्टींचे प्रत्यक्ष साक्षीदार होते+ आणि देवाच्या वचनाचे सेवक होते+ त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या गोष्टींप्रमाणेच तो वृत्तान्त आहे. ३ त्यामुळे, मीसुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्रमाने लिहायचं ठरवलं. कारण मी त्यांचा सुरुवातीपासून अचूकपणे शोध केला आहे. ४ ज्या गोष्टी तुम्हाला तोंडी शिकवण्यात आल्या त्या खऱ्‍या आहेत, याची तुम्हाला पूर्णपणे खातरी पटावी म्हणून मी असं केलं.+

५ यहूदीयाचा राजा, हेरोद* याच्या काळात+ अबीयाच्या याजक-गटात+ जखऱ्‍या नावाचा एक याजक होता. त्याच्या बायकोचं नाव अलीशिबा होतं आणि ती अहरोनच्या वंशातली होती. ६ ते दोघं यहोवाच्या* नजरेत नीतिमान होते आणि त्याच्या सगळ्या आज्ञांचं आणि कायद्यांचं काटेकोरपणे पालन करायचे. ७ पण त्यांना मूलबाळ नव्हतं, कारण अलीशिबा वांझ होती. शिवाय, त्या दोघांचंही वय झालं होतं.

८ एकदा असं झालं, की जखऱ्‍या देवासमोर याजक म्हणून सेवा करत होता. कारण मंदिरात काम करायची त्याच्या याजक-गटाची+ पाळी होती. ९ याजकांच्या ठरलेल्या रिवाजाप्रमाणे* त्याची निवड करण्यात आली, तेव्हा तो धूप जाळण्यासाठी+ यहोवाच्या* मंदिरातल्या पवित्र स्थानात+ गेला. १० धूप जाळण्याच्या वेळी सगळे लोक बाहेर प्रार्थना करत होते. ११ इतक्यात, यहोवाचा* दूत जखऱ्‍यासमोर प्रकट झाला. तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. १२ त्याला पाहून जखऱ्‍या चकित झाला आणि खूप घाबरला. १३ पण स्वर्गदूत त्याला म्हणाला: “जखऱ्‍या घाबरू नकोस. कारण तुझी याचना देवाने ऐकली आहे. तुझी बायको अलीशिबा हिच्यापासून तुला एक मुलगा होईल. तू त्याचं नाव योहान ठेव.+ १४ तुला खूप आनंद होईल आणि त्याच्या जन्मामुळे पुष्कळ लोक हर्ष करतील.+ १५ कारण यहोवाच्या* नजरेत तो महान होईल.+ पण त्याने कधीच द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये.+ तो जन्माच्या आधीपासूनच* पवित्र शक्‍तीने* भरलेला असेल.+ १६ तो इस्राएलच्या मुलांपैकी बऱ्‍याच जणांना त्यांचा देव यहोवा* याच्याकडे पुन्हा वळवेल.+ १७ तसंच, तो एलीयाप्रमाणे पवित्र शक्‍तीने* आणि सामर्थ्याने देवापुढे चालेल.+ तो वडिलांची मनं मुलांकडे आणि आज्ञा न मानणाऱ्‍या लोकांना नीतिमानांच्या व्यावहारिक बुद्धीकडे वळवेल.+ अशा प्रकारे, तो यहोवासाठी* योग्य अशी प्रजा तयार करेल.”+

१८ तेव्हा जखऱ्‍या स्वर्गदूताला म्हणाला: “पण, असं नक्की घडेल हे कशावरून? कारण मी तर म्हातारा झालोय आणि माझ्या बायकोचंही वय झालंय.” १९ स्वर्गदूत त्याला म्हणाला: “मी देवाजवळ उभा राहणारा+ गब्रीएल आहे.+ मला तुझ्याशी बोलण्यासाठी आणि तुला ही आनंदाची बातमी देण्यासाठी पाठवण्यात आलंय. २० पण, या गोष्टी घडेपर्यंत तू मुकाच राहशील आणि तुला बोलता येणार नाही. कारण ठरवलेल्या वेळी पूर्ण होणार असलेल्या माझ्या शब्दांवर तू विश्‍वास ठेवला नाहीस.” २१ इकडे, लोक अजूनही जखऱ्‍याची वाट पाहत होते आणि पवित्र स्थानात त्याला इतका वेळ का लागला, याचं त्यांना आश्‍चर्य वाटत होतं. २२ तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. त्यामुळे, पवित्र स्थानात त्याला नक्कीच काहीतरी अद्‌भुत दृष्टान्त दिसला असावा हे त्यांनी ओळखलं. पण, अजूनही तो मुका असल्यामुळे तो त्यांना खाणाखुणा करत राहिला. २३ शेवटी, मंदिरातल्या त्याच्या पवित्र सेवेचे* दिवस संपल्यावर तो आपल्या घरी परत गेला.

२४ मग काही दिवसांनी त्याची बायको अलीशिबा गरोदर राहिली आणि पाच महिन्यांपर्यंत ती घराबाहेर पडली नाही. ती म्हणाली: २५ “यहोवाने* माझ्यासाठी हे घडवून आणलंय. लोकांमध्ये झालेला माझा अपमान दूर करण्यासाठी त्याने माझ्याकडे लक्ष दिलंय.”+

२६ तिच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल स्वर्गदूताला+ गालीलमधल्या नासरेथ नावाच्या शहरात एका कुमारीकडे पाठवलं. २७ त्या कुमारीचं+ नाव मरीया होतं. दावीदच्या घराण्यातल्या योसेफ नावाच्या एका माणसाशी तिचं लग्न ठरलं होतं.+ २८ स्वर्गदूत तिच्याकडे येऊन म्हणाला: “हे आशीर्वादित कुमारी! तुला शांती असो. यहोवा* तुझ्यासोबत आहे.” २९ पण, ते ऐकून ती मोठ्या गोंधळात पडली आणि स्वर्गदूताच्या या शब्दांचा काय अर्थ असेल याचा विचार करू लागली. ३० तेव्हा, स्वर्गदूत तिला म्हणाला: “मरीया घाबरू नकोस, कारण देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. ३१ तू गर्भवती होशील आणि एका मुलाला जन्म देशील.+ तू त्याचं नाव येशू ठेव.+ ३२ तो महान होईल+ आणि त्याला सर्वोच्च देवाचा मुलगा म्हणतील.+ यहोवा* त्याला त्याच्या पित्याचं म्हणजे दावीदचं राजासन देईल.+ ३३ तो राजा म्हणून याकोबच्या घराण्यावर सदासर्वकाळ राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”+

३४ पण, मरीया स्वर्गदूताला म्हणाली: “हे कसं शक्य आहे? कारण मी अजून कुमारी आहे.”*+ ३५ तेव्हा स्वर्गदूत तिला म्हणाला: “पवित्र शक्‍ती* तुझ्यावर येईल+ आणि सर्वोच्च देवाचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. म्हणूनच, जो जन्माला येईल त्याला पवित्र+ आणि देवाचा मुलगा+ असं म्हटलं जाईल. ३६ पाहा! तुझ्या नात्यातल्या अलीशिबालाही म्हातारपणी मुलाचा गर्भ राहिलाय. तिला वांझ म्हटलं जायचं, पण हा तिचा सहावा महिना आहे. ३७ कारण देवाला कोणतीही गोष्ट* अशक्य नाही.”+ ३८ तेव्हा मरीया म्हणाली: “पाहा! मी यहोवाची* दासी आहे! तुम्ही सांगितल्याप्रमाणेच माझ्या बाबतीत घडो.” मग, स्वर्गदूत तिथून निघून गेला.

३९ त्या दिवसांत, मरीया घाईघाईने डोंगराळ प्रदेशातल्या यहूदाच्या एका शहरात जायला निघाली. ४० तिने जखऱ्‍याच्या घरी जाऊन अलीशिबाला नमस्कार केला. ४१ अलीशिबाने मरीयाचा नमस्कार ऐकताच तिच्या पोटातल्या बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र शक्‍तीने भरून गेली. ४२ ती मोठ्याने म्हणाली: “स्त्रियांमध्ये तू आशीर्वादित आहेस आणि तुझ्या पोटचं फळसुद्धा आशीर्वादित आहे! ४३ माझ्या प्रभूची आई मला भेटायला आली, हा माझ्यासाठी किती मोठा सन्मान आहे! ४४ कारण पाहा! तुझा नमस्कार माझ्या कानांवर पडताच माझ्या पोटातल्या बाळाने आनंदाने उडी मारली. ४५ तू विश्‍वास ठेवलास म्हणून तू आशीर्वादित आहेस! कारण यहोवाने* तुला जे काही सांगितलं ते सगळं पूर्ण होईल.”

४६ तेव्हा मरीया म्हणाली: “मी* यहोवाचा* जयजयकार करते.+ ४७ तारण करणाऱ्‍या माझ्या देवामुळे, माझ्या मनाला खूप आनंद झालाय.+ ४८ कारण त्याने आपल्या या गरीब दासीकडे लक्ष दिलं.+ पाहा! यापुढे सगळ्या पिढ्या मला आशीर्वादित म्हणतील,+ ४९ कारण सामर्थ्यशाली देवाने माझ्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. त्याचं नाव पवित्र आहे.+ ५० जे त्याची भीती बाळगतात त्यांच्यावर तो पिढ्या न्‌ पिढ्या दया करतो.+ ५१ त्याने आपल्या हाताने आपला पराक्रम दाखवलाय. गर्विष्ठ लोकांची त्याने पांगापांग केली आहे.+ ५२ त्याने शक्‍तिशाली अधिकाऱ्‍यांना राजासनांवरून उतरवलंय+ आणि दीनदुबळ्यांना उंचावलंय.+ ५३ त्याने उपाशी असलेल्यांना चांगल्या गोष्टी देऊन तृप्त केलंय+ आणि श्रीमंतांना रिकाम्या हाती पाठवून दिलंय. ५४ आपली दया सदासर्वकाळ आठवणीत ठेवून, तो आपला सेवक इस्राएल याच्या मदतीला आलाय.+ ५५ आमच्या वाडवडिलांना, म्हणजे अब्राहामला आणि त्याच्या संततीला* वचन दिल्याप्रमाणे त्याने केलंय.”+ ५६ मरीया जवळपास तीन महिने अलीशिबाकडे राहून आपल्या घरी परत गेली.

५७ अलीशिबाचे दिवस भरल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. ५८ यहोवाने* तिच्यावर किती दया केली आहे, याबद्दल तिच्या शेजाऱ्‍यांनी आणि नातेवाइकांनी ऐकलं, तेव्हा तेही तिच्या आनंदात सहभागी झाले.+ ५९ मग, आठव्या दिवशी ते मुलाची सुंता करण्यासाठी आले+ आणि त्याचा पिता, जखऱ्‍या याच्या नावावरून ते त्याचं नाव ठेवणार होते. ६० पण त्याची आई म्हणाली: “नाही! त्याचं नाव योहान असेल.” ६१ तेव्हा ते तिला म्हणाले: “तुमच्या नातेवाइकांमध्ये कोणाचंही हे नाव नाही.” ६२ मग, मुलाचं नाव काय ठेवावं हे त्यांनी खाणाखुणा करून त्याच्या वडिलांना विचारलं. ६३ तेव्हा त्याने एक पाटी मागितली आणि तिच्यावर लिहिलं: “याचं नाव योहान आहे.”+ तेव्हा त्या सगळ्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. ६४ त्याच क्षणी, त्याचं तोंड उघडलं आणि त्याची जीभ मोकळी झाली. तेव्हा तो बोलू लागला+ आणि देवाची स्तुती करू लागला. ६५ यामुळे जवळपास राहणाऱ्‍या सगळ्या लोकांमध्ये भीती पसरली आणि यहूदीयाच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात या गोष्टींबद्दल चर्चा होऊ लागली. ६६ आणि जितक्यांनी हे ऐकलं त्यांनी या गोष्टी मनात जपून ठेवल्या आणि ते विचार करू लागले: “हा मुलगा मोठा होऊन कोण बनेल?” कारण यहोवाचा* हात खरोखरच त्याच्यावर होता.

६७ मग त्याचा पिता जखऱ्‍या पवित्र शक्‍तीने भरून गेला आणि त्याने अशी भविष्यवाणी केली: ६८ “इस्राएलचा देव यहोवा,* याची स्तुती असो!+ कारण त्याने आपल्या लोकांकडे लक्ष वळवून त्यांची सुटका केली आहे.+ ६९ त्याचा सेवक दावीद+ याच्या घराण्यात त्याने आमच्यासाठी तारणाचं शिंग* उभारलंय.+ ७० त्याने प्राचीन काळातल्या आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या तोंडून सांगितल्याप्रमाणे केलंय.+ ७१ त्याने सांगितलं होतं, की तो आमच्या शत्रूंपासून आणि आमचा द्वेष करणाऱ्‍या सगळ्यांच्या हातून आम्हाला सोडवेल.+ ७२ आणि आमच्या वाडवडिलांवर दया करून तो आपला पवित्र करार,+ ७३ म्हणजे आमचा पूर्वज, अब्राहाम याला शपथ घेऊन दिलेलं वचन आठवेल.+ ७४ त्याप्रमाणे, आमच्या शत्रूंपासून सोडवल्यानंतर तो आम्हाला निर्भयपणे त्याची पवित्र सेवा, ७५ एकनिष्ठपणे आणि नीतीने सर्वकाळ करत राहण्याचा बहुमान देईल. ७६ पण माझ्या मुला, तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणतील. कारण तू यहोवाच्या* पुढे चालून त्याचे मार्ग तयार करशील+ ७७ आणि त्याच्या लोकांना तारणाचा संदेश सांगशील. त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे,+ ७८ आपल्या देवाच्या कोमल दयेमुळे त्यांना हे तारण मिळेल. याच दयेमुळे स्वर्गातून पहाटेचा प्रकाश उजाडताना आपण पाहू. ७९ आणि तो अंधारात आणि मृत्यूच्या छायेत बसलेल्यांना उजेड देईल+ आणि आपल्या पावलांना शांतीचा मार्ग दाखवेल.”

८० मग तो लहान मुलगा वाढत गेला आणि देवाच्या शक्‍तीने सामर्थ्यशाली झाला. आणि उघडपणे इस्राएली लोकांसमोर यायची वेळ येईपर्यंत तो ओसाड रानातच राहिला.

२ त्या दिवसांत, कैसर* औगुस्त याने असा हुकूम काढला, की त्याच्या संपूर्ण साम्राज्यातल्या* लोकांच्या नावांची नोंदणी केली जावी. २ (क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल होता, तेव्हा पहिली नावनोंदणी करण्यात आली.) ३ त्यामुळे सगळे लोक नावनोंदणी करायला आपापल्या मूळ गावी गेले. ४ मग योसेफसुद्धा+ गालीलमधल्या नासरेथ शहरातून यहूदीयातल्या दावीदच्या बेथलेहेम+ शहरात गेला. कारण तो दावीदच्या घराण्यातला आणि कुळातला होता. ५ तो आपली बायको,+ मरीया हिच्यासोबत नावनोंदणी करायला गेला. ती गरोदर होती आणि लवकरच बाळाला जन्म देणार होती.+ ६ ते तिथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली ७ आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.+ तिने त्याला कापडांत गुंडाळून गव्हाणीत* ठेवलं,+ कारण मुक्काम करण्यासाठी त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.

८ त्याच भागात, काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपल्या कळपांची राखण करत होते. ९ अचानक यहोवाचा* दूत त्यांच्यासमोर उभा राहिला आणि यहोवाचं* तेज त्यांच्याभोवती चमकू लागलं. तेव्हा ते खूप घाबरले. १० पण स्वर्गदूत त्यांना म्हणाला: “घाबरू नका, कारण पाहा! सगळ्या लोकांना जो मोठा आनंद होणार आहे, त्याबद्दलचा आनंदाचा संदेश मी तुम्हाला सांगतोय. ११ कारण आज दावीदच्या शहरात+ एका तारणकर्त्याचा+ जन्म झालाय. तो ख्रिस्त प्रभू आहे.+ १२ त्याला ओळखण्याची खूण म्हणजे, कापडांत गुंडाळलेलं आणि गव्हाणीत ठेवलेलं एक बाळ तुम्हाला दिसेल.” १३ मग अचानक, त्या स्वर्गदूतासोबत स्वर्गातलं मोठं सैन्य दिसलं+ आणि ते देवाची स्तुती करत होते आणि म्हणत होते: १४ “स्वर्गातल्या देवाचा गौरव असो आणि पृथ्वीवर तो ज्यांच्याविषयी संतुष्ट* आहे त्या लोकांना शांती मिळो!”

१५ मग स्वर्गदूत तिथून निघून स्वर्गात परत गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ या आणि ज्या घटनेबद्दल यहोवाने* आपल्याला कळवलंय, ती पाहू या.” १६ तेव्हा, ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया आणि योसेफ, तसंच गव्हाणीत झोपलेलं बाळ दिसलं. १७ हे पाहिल्यावर, त्या लहान बाळाबद्दल स्वर्गदूताने जे काही म्हटलं होतं ते त्यांनी सगळ्यांना सांगितलं. १८ तेव्हा मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणारे सगळे लोक चकित झाले. १९ पण मरीयाने या सगळ्या गोष्टी आपल्या मनात जपून ठेवल्या आणि त्यांचा काय अर्थ असेल याचा ती विचार करू लागली.+ २० मग ऐकलेल्या आणि पाहिलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल देवाचा गौरव आणि स्तुती करून मेंढपाळ परत गेले. त्यांना जसं सांगण्यात आलं होतं, अगदी तसंच सगळं घडलं होतं.

२१ आठ दिवसांनी बाळाची सुंता करायची वेळ आली,+ तेव्हा त्याचं नाव येशू असं ठेवण्यात आलं. हे नाव स्वर्गदूताने त्याची गर्भधारणा होण्याआधीच ठेवलं होतं.+

२२ मग, मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्यांच्या शुद्धीकरणाची वेळ आली+ तेव्हा ते त्याला यहोवापुढे* सादर करण्यासाठी यरुशलेमला घेऊन आले. २३ यहोवाच्या* नियमशास्त्रात सांगितलेल्या या आज्ञेप्रमाणे त्यांनी केलं: “प्रत्येक पहिला जन्मलेला नर यहोवासाठी* वेगळा* केला जावा.”+ २४ आणि “दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं द्यावीत,”+ असं जे यहोवाच्या* नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी बलिदान अर्पण केलं.

२५ यरुशलेममध्ये शिमोन नावाचा एक नीतिमान आणि देवाची भीती बाळगणारा माणूस होता. देव इस्राएलचं सांत्वन करेल, त्या वेळेची तो वाट पाहत होता+ आणि त्याच्यावर पवित्र शक्‍ती* होती. २६ शिवाय, यहोवाने* पाठवलेल्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय त्याला मरण येणार नाही, हे पवित्र शक्‍तीद्वारे देवाने त्याला दाखवून दिलं होतं. २७ मग, पवित्र शक्‍तीच्या सामर्थ्याने तो मंदिरात आला. नियमशास्त्रात सांगितलेल्या रिवाजाप्रमाणे करण्यासाठी बाळ येशूचे आईवडील त्याला घेऊन आले,+ २८ तेव्हा शिमोनने त्या मुलाला आपल्या हातांत घेतलं आणि देवाची स्तुती करून तो म्हणाला: २९ “हे सर्वोच्च प्रभू, आता तुझा दास शांतीने मरू शकतो.+ कारण तू सांगितल्याप्रमाणे, ३० ज्याच्याद्वारे तू तारण करणार आहेस त्याला मी पाहिलंय.+ ३१ सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांनी त्याला पाहावं म्हणून तू त्याला पाठवलं आहेस.+ ३२ तो राष्ट्रांच्या डोळ्यांवरचा पडदा दूर करणारा+ प्रकाश+ आणि तुझे लोक इस्राएल यांचा गौरव आहे.” ३३ बाळाबद्दल सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्‍चर्यचकित झाले. ३४ मग, शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि मुलाच्या आईला, म्हणजे मरीयाला तो म्हणाला: “पाहा! हा इस्राएलमध्ये बऱ्‍याच जणांच्या पडण्याचं आणि पुन्हा उठण्याचं कारण ठरेल+ आणि एक असं चिन्ह बनेल ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील.+ ३५ (आणि तुझ्याबद्दल म्हणावं, तर एक लांब तलवार तुझ्यातून* आरपार जाईल)+ आणि त्याद्वारे पुष्कळ लोकांच्या मनातले विचार प्रकट होतील.”

३६ तिथे हन्‍ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेर वंशातल्या फनूएलची मुलगी होती. ती खूप म्हातारी झाली होती. लग्नानंतर सात वर्षं आपल्या नवऱ्‍यासोबत राहिल्यावर ३७ ती विधवा झाली होती आणि आता ८४ वर्षांची होती. ती नेहमी मंदिरात असायची आणि उपास आणि याचना करून रात्रंदिवस पवित्र सेवा करायची. ३८ त्याच वेळी ती बाळाच्या आईवडिलांजवळ आली आणि देवाचे आभार मानू लागली. यरुशलेमच्या सुटकेची वाट पाहणाऱ्‍या सगळ्यांना ती त्या बाळाबद्दल सांगू लागली.+

३९ मग, यहोवाच्या* नियमशास्त्राप्रमाणे सगळं काही पार पाडल्यानंतर,+ ते आपल्या शहरात म्हणजे गालीलमधल्या नासरेथला परत गेले.+ ४० पुढे तो लहान मुलगा मोठा होत गेला. तो सुदृढ आणि बुद्धिमान बनत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.+

४१ दरवर्षी, वल्हांडण सणासाठी यरुशलेमला जायची त्याच्या आईवडिलांची रीतच होती.+ ४२ त्यामुळे, तो १२ वर्षांचा असताना सणाच्या रिवाजाप्रमाणे ते वर यरुशलेमला गेले.+ ४३ सणाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर ते परत जात असताना त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्येच मागे राहिला. पण हे त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं नाही. ४४ तो प्रवास करणाऱ्‍या लोकांच्या घोळक्यातच असेल असा विचार करून, ते एक दिवसाचं अंतर पार करून गेले. मग ते नातेवाइकांमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये त्याला शोधू लागले. ४५ पण तो सापडला नाही तेव्हा ते पुन्हा यरुशलेमला गेले आणि त्यांनी त्याला सगळीकडे शोधलं. ४६ तीन दिवसांनंतर त्यांना तो मंदिरात सापडला. तो गुरूजनांमध्ये बसून त्यांचं ऐकत आणि त्यांना प्रश्‍न विचारत होता. ४७ पण त्याचं बोलणं ऐकणारे सगळे जण त्याची समजशक्‍ती पाहून आणि त्याची उत्तरं ऐकून अगदी थक्क झाले होते.+ ४८ त्याच्या आईवडिलांनी त्याला तिथे पाहिलं तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटलं. त्याची आई त्याला म्हणाली: “बाळा, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे बाबा आणि मी किती काळजीत होतो. आम्ही तुला कुठे-कुठे शोधलं!” ४९ पण, तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मला का शोधत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असेन हे तुम्हाला माहीत नव्हतं का?”+ ५० पण तो काय म्हणत आहे हे त्यांना समजलं नाही.

५१ मग तो त्यांच्यासोबत खाली नासरेथला गेला आणि त्यांच्या आज्ञेत* राहिला.+ त्याच्या आईने या सगळ्या गोष्टी आपल्या मनात जपून ठेवल्या.+ ५२ आणि येशू बुद्धीने आणि शरीराने वाढत गेला. तसंच, देवाच्या आणि माणसांच्या कृपेतही तो वाढत गेला.

३ तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या १५ व्या वर्षी, पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता आणि हेरोद+ हा गालीलचा प्रांताधिकारी होता; तसंच, हेरोदचा* भाऊ फिलिप्प हा इतुरीया आणि त्राखोनीती या भागांचा प्रांताधिकारी होता आणि लूसनिय हा अबिलेनेचा प्रांताधिकारी होता, २ शिवाय, हन्‍ना आणि कयफा हे मुख्य याजकांपैकी होते;+ त्याच काळात, जखऱ्‍याचा मुलगा योहान याला देवाने ओसाड रानात+ संदेश दिला.+

३ त्यामुळे, तो यार्देन नदीच्या आसपासच्या सगळ्या प्रदेशांत गेला आणि पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचं चिन्ह म्हणून बाप्तिस्मा* घ्या, अशी घोषणा करू लागला.+ ४ हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणेच झालं: “ओसाड रानात घोषणा करणाऱ्‍या एकाचा आवाज ऐकू येतोय: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा.+ ५ प्रत्येक दरी भरून काढली जाईल आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट केली जाईल. वाकडेतिकडे रस्ते सरळ केले जातील आणि खडबडीत रस्ते सपाट केले जातील. ६ आणि सगळी माणसं देवाने केलेलं तारण* पाहतील.’”+

७ योहान आपल्याकडे बाप्तिस्मा घ्यायला येणाऱ्‍या लोकांच्या समुदायाला म्हणायचा: “अरे विषारी सापाच्या पिल्लांनो! देवाच्या येणाऱ्‍या क्रोधापासून तुम्ही वाचू शकता असं तुम्हाला कोणी सांगितलं?+ ८ आधी तुमचा पश्‍चात्ताप तुमच्या कामांतून दाखवून द्या.* ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ असं आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्‍न करू शकतो. ९ पाहा! कुऱ्‍हाड तर केव्हाच झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आली आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून आगीत टाकलं जाईल.”+

१० तेव्हा लोक त्याला विचारायचे: “तर मग, आम्ही काय करावं?” ११ तो त्यांना म्हणायचा: “ज्याच्याजवळ दोन झगे आहेत* त्याने त्यातला एक, अशा माणसाला द्यावा ज्याच्याजवळ एकही नाही. आणि ज्याच्याजवळ खायला काही आहे त्यानेही असंच करावं.”+ १२ त्याच प्रकारे, जकातदारसुद्धा त्याच्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आले+ आणि त्यांनी त्याला विचारलं: “गुरुजी, आम्ही काय करावं?” १३ तो त्यांना म्हणाला: “नेमून दिलेल्या करापेक्षा जास्त मागू नका.”*+ १४ सैन्यात असलेल्यांनी त्याला विचारलं: “आम्ही काय करावं?” तेव्हा तो त्यांना म्हणाला: “कोणाला छळू नका* किंवा कोणावर खोटा आरोप लावू नका.+ तर, तुम्हाला मिळणाऱ्‍या पगारात* समाधानी राहा.”

१५ त्या काळात लोक ख्रिस्त* यायची वाट पाहत होते आणि सगळे लोक योहानबद्दल मनातल्या मनात असा विचार करत होते, की “हाच तर ख्रिस्त नसेल?”+ १६ योहान त्या सगळ्यांना म्हणाला: “मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण जो येणार आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे. मी तर त्याच्या जोड्यांचे बंद सोडायलाही योग्य नाही.+ तो तुम्हाला पवित्र शक्‍तीने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल.+ १७ त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करायचं फावडं आहे आणि तो त्याचं खळं* पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल, जी विझवता येत नाही.”

१८ याशिवाय, योहानने आणखी बऱ्‍याच गोष्टी त्यांना शिकवल्या आणि तो आनंदाचा संदेश घोषित करत राहिला. १९ पण, त्याने प्रांताधिकारी हेरोद याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याबद्दल आणि हेरोदने केलेल्या इतर सगळ्या दुष्ट कामांबद्दल त्याची कानउघाडणी केली होती. २० त्यामुळे हेरोदने योहानला तुरुंगात डांबलं+ आणि अशा रितीने आपल्या दुष्ट कार्यांत आणखी भर घातली.

२१ सगळे लोक बाप्तिस्मा घेत होते, तेव्हा येशूचाही बाप्तिस्मा झाला.+ तो प्रार्थना करत होता, तेव्हा आकाश उघडलं गेलं+ २२ आणि पवित्र शक्‍ती* एका कबुतरासारखी त्याच्यावर आली आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा प्रिय मुलगा आहेस; तू माझं मन आनंदित केलं आहेस.”+

२३ येशूने+ आपल्या कार्याला सुरुवात केली तेव्हा तो साधारण ३० वर्षांचा होता.+ आणि असं समजलं जायचं, की तो

योसेफचा मुलगा होता,+

योसेफ एलीचा,

२४ एली मत्ताथचा,

मत्ताथ लेवीचा,

लेवी मल्खीचा,

मल्खी यन्‍नयचा,

यन्‍नय योसेफचा,

२५ योसेफ मत्तिथ्याचा,

मत्तिथ्या आमोसचा,

आमोस नहूमचा,

नहूम हेस्लीचा,

हेस्ली नग्गयचा,

२६ नग्गय महथचा,

महथ मत्तिथ्याचा,

मत्तिथ्या शिमयीचा,

शिमयी योसेखचा,

योसेख योदाचा,

२७ योदा योहानानचा,

योहानान रेशाचा,

रेशा जरूब्बाबेलचा,+

जरूब्बाबेल शल्तीएलचा,+

शल्तीएल नेरीचा,

२८ नेरी मल्खीचा,

मल्खी अद्दीचा,

अद्दी कोसामचा,

कोसाम एल्मदामचा,

एल्मदाम एरचा,

२९ एर येशूचा,

येशू अलियेजरचा,

अलियेजर योरीमचा,

योरीम मत्ताथचा,

मत्ताथ लेवीचा,

३० लेवी शिमोनचा,

शिमोन यहूदाचा,

यहूदा योसेफचा,

योसेफ योनामचा,

योनाम एल्याकीमचा,

३१ एल्याकीम मलआचा,

मलआ मिन्‍नाचा,

मिन्‍ना मत्ताथाचा,

मत्ताथा नाथानचा,+

नाथान दावीदचा,+

३२ दावीद इशायचा,+

इशाय ओबेदचा,+

ओबेद बवाजचा,+

बवाज सल्मोनचा,+

सल्मोन नहशोनचा,+

३३ नहशोन अम्मीनादाबचा,

अम्मीनादाब अर्णयचा,

अर्णय हेस्रोनचा,

हेस्रोन पेरेसचा,+

पेरेस यहूदाचा,+

३४ यहूदा याकोबचा,+

याकोब इसहाकचा,+

इसहाक अब्राहामचा,+

अब्राहाम तेरहचा,+

तेरह नाहोरचा,+

३५ नाहोर सरूगचा,+

सरूग रऊचा,+

रऊ पेलेगचा,+

पेलेग एबरचा,+

एबर शेलहचा,+

३६ शेलह केनानचा,

केनान अर्पक्षदचा,+

अर्पक्षद शेमचा,+

शेम नोहाचा,+

नोहा लामेखचा,+

३७ लामेख मथुशलहचा,+

मथुशलह हनोखचा,

हनोख यारेदचा,+

यारेद महललेलचा,+

महललेल केनानचा,+

३८ केनान अनोशचा,+

अनोश शेथचा,+

शेथ आदामचा,+

आदाम देवाचा मुलगा होता.

४ मग पवित्र शक्‍तीने* परिपूर्ण होऊन येशू यार्देन नदीजवळून निघाला आणि पवित्र शक्‍तीने त्याला ओसाड रानात नेलं.+ २ तो ४० दिवस तिथे होता. त्यादरम्यान, सैतानाने* त्याची परीक्षा घेतली.+ येशूने काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली. ३ तेव्हा सैतान त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर या दगडाला भाकर व्हायला सांग.” ४ पण येशूने उत्तर दिलं: “‘माणसाने फक्‍त भाकरीनेच जगू नये,’ असं लिहिलंय.”+

५ मग, सैतानाने येशूला एका उंच ठिकाणी नेलं आणि एका क्षणात त्याला जगातली सगळी राज्यं दाखवली.+ ६ तो त्याला म्हणाला: “या सर्वांवरचा अधिकार आणि यांचं वैभव मी तुला देईन. कारण हे सगळं मला सोपवण्यात आलंय+ आणि मला वाटेल त्याला मी ते देतो. ७ त्यामुळे, तू जर एकदा माझी उपासना केलीस, तर हे सगळं तुझं होईल.” ८ येशूने त्याला उत्तर दिलं: “असं लिहिलंय, की ‘तू फक्‍त तुझा देव यहोवा* याचीच उपासना कर आणि फक्‍त त्याचीच पवित्र सेवा कर.’”+

९ नंतर, सैतानाने येशूला यरुशलेममध्ये नेलं आणि मंदिराच्या भिंतीवर एका उंच ठिकाणी उभं केलं. मग तो त्याला म्हणाला: “तू जर देवाचा मुलगा असशील, तर इथून खाली उडी टाक.+ १० कारण असं लिहिलंय, की ‘तो आपल्या स्वर्गदूतांना तुला वाचवायची आज्ञा देईल.’ ११ आणि, ‘तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.’”+ १२ तेव्हा, येशूने त्याला उत्तर दिलं: “असं म्हटलंय, की ‘तुझा देव यहोवा* याची परीक्षा पाहू नकोस.’”+ १३ मग या सगळ्या परीक्षा घेऊन झाल्यावर सैतान योग्य संधी मिळेपर्यंत त्याला सोडून निघून गेला.+

१४ नंतर, येशू पवित्र शक्‍तीच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला.+ तेव्हा आसपासच्या सगळ्या प्रदेशांत त्याच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टींची चर्चा होऊ लागली. १५ मग तो त्यांच्या सभास्थानांत शिकवू लागला आणि सगळे लोक त्याची प्रशंसा करू लागले.

१६ त्यानंतर तो नासरेथला गेला.+ तो तिथेच लहानाचा मोठा झाला होता. शब्बाथाच्या दिवशी, तो आपल्या रिवाजाप्रमाणे सभास्थानात गेला+ आणि वाचायला उभा राहिला. १७ तेव्हा यशया संदेष्ट्याची गुंडाळी त्याच्या हातात देण्यात आली आणि त्याने गुंडाळी उघडून तो भाग काढला, जिथे असं लिहिलं होतं: १८ “यहोवाची* पवित्र शक्‍ती माझ्यावर आहे, कारण गरिबांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी त्याने माझा अभिषेक केलाय. बंदिवानांना सुटका मिळण्याबद्दल आणि आंधळ्यांना दृष्टी परत मिळण्याबद्दल जाहीर करायला, तसंच जुलूम सहन करणाऱ्‍यांची सुटका करायला+ १९ आणि यहोवाची* कृपा मिळवायचं वर्ष घोषित करायला त्याने मला पाठवलंय.”+ २० मग त्याने ती गुंडाळी गुंडाळून सेवकाला दिली आणि तो खाली बसला. त्या वेळी सभास्थानांतल्या सगळ्या लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. २१ मग तो त्यांना म्हणाला: “तुम्ही नुकतंच ऐकलेलं हे वचन आज पूर्ण झालंय.”+

२२ तेव्हा ते सगळे त्याची प्रशंसा करू लागले आणि त्याच्या तोंडून निघणारे सुंदर शब्द ऐकून थक्क झाले+ आणि म्हणाले: “हा योसेफचाच मुलगा ना?”+ २३ यावर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही निश्‍चितच ही म्हण मला लागू कराल, की ‘अरे वैद्या, स्वतःचा इलाज कर. आणि कफर्णहूममध्ये ज्या गोष्टी घडल्याचं आम्ही ऐकलंय, त्या गोष्टी इथे तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.’”+ २४ मग तो पुढे म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, की कोणत्याही संदेष्ट्याला त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारलं जात नाही.+ २५ उदाहरणार्थ, मी तुम्हाला खातरीने सांगतो: एलीयाच्या काळात, जेव्हा साडेतीन वर्षं पाऊस पडला नाही आणि पूर्ण देशात मोठा दुष्काळ पडला,+ तेव्हा इस्राएलमध्ये कित्येक विधवा होत्या. २६ तरीसुद्धा, एलीयाला त्या स्त्रियांपैकी कोणाकडेही पाठवण्यात आलं नाही. तर, फक्‍त सीदोन देशातल्या सारफथच्या एका विधवेकडे त्याला पाठवण्यात आलं.+ २७ तसंच, अलीशा संदेष्ट्याच्या काळातसुद्धा इस्राएलमध्ये बरेच कुष्ठरोगी होते. पण, त्यांच्यापैकी कोणालाही शुद्ध* करण्यात आलं नाही. तर, फक्‍त सीरिया देशातल्या नामानला शुद्ध करण्यात आलं.”+ २८ हे ऐकून सभास्थानातले सगळे लोक संतापले.+ २९ ते उठले आणि त्यांनी लगेच त्याला शहराबाहेर नेऊन, ज्या डोंगरावर त्यांचं शहर बांधलेलं होतं त्याच्या कड्याजवळ आणलं. तिथून त्याला खाली ढकलून द्यायची त्यांची इच्छा होती. ३० पण, तो त्यांच्या तावडीतून निसटला आणि आपल्या मार्गाने निघून गेला.+

३१ नंतर तो खाली, गालीलमधल्या कफर्णहूम या शहरात गेला. आणि शब्बाथाच्या दिवशी तो लोकांना शिकवू लागला.+ ३२ त्याची शिकवण्याची पद्धत पाहून ते थक्क झाले,+ कारण तो अधिकार असलेल्या व्यक्‍तीप्रमाणे त्यांना शिकवत होता. ३३ तेव्हा, दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलेला एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला:+ ३४ “हे नासरेथच्या येशू,+ आमचं तुझ्याशी काय घेणंदेणं? तू काय आमचा नाश करायला आला आहेस? तू कोण आहेस हे मला चांगलं माहीत आहे. तू देवाचा पवित्र सेवक आहेस!”+ ३५ पण, येशूने त्याला धमकावून म्हटलं: “शांत राहा आणि त्याच्यातून बाहेर निघ!” तेव्हा, त्या दुष्ट स्वर्गदूताने सगळ्या लोकांसमोर त्या माणसाला खाली पाडलं आणि त्याला कोणतीही इजा न करता तो त्याच्यातून निघाला. ३६ हे पाहून ते सगळे चकित झाले आणि एकमेकांना म्हणू लागले: “हा किती अधिकाराने बोलतो आणि याच्याजवळ किती सामर्थ्य आहे! हा दुष्ट स्वर्गदूतांनासुद्धा आज्ञा देतो आणि तेही लगेच त्याचं ऐकतात!” ३७ त्यामुळे आसपासच्या प्रदेशाच्या कानाकोपऱ्‍यांत त्याच्याबद्दल चर्चा होऊ लागली.

३८ मग सभास्थानातून निघाल्यावर तो शिमोनच्या घरी गेला. तिथे शिमोनची सासू तीव्र तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरं करायची त्याला विनंती केली.+ ३९ म्हणून, त्याने तिच्याजवळ उभं राहून तापाला दटावलं आणि तिचा ताप उतरला. तेव्हा, ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली.

४० मग सूर्य मावळू लागला तेव्हा लोकांनी वेगवेगळ्या आजारांनी पीडित असलेल्या आपल्या घरच्यांना त्याच्याजवळ आणलं आणि त्याने प्रत्येकावर हात ठेवून त्या सगळ्यांना बरं केलं.+ ४१ तेव्हा पुष्कळ लोकांमधून दुष्ट स्वर्गदूत असं म्हणत बाहेर निघाले, की “तू देवाचा मुलगा आहेस.”+ पण, त्याने त्यांना दटावून एकही शब्द बोलू दिला नाही.+ कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहीत होतं.+

४२ मग पहाटे तो एका एकांत ठिकाणी निघून गेला.+ पण लोकांचा समुदाय त्याला शोधत तिथे आला आणि त्याने त्यांना सोडून जाऊ नये, म्हणून लोक त्याला अडवायचा प्रयत्न करू लागले. ४३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “मला इतर शहरांतही देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवण्यात आलंय.”+ ४४ मग तो जाऊन यहूदीयाच्या सभास्थानांत प्रचार करू लागला.

५ एकदा येशू गनेसरेतच्या सरोवराजवळ*+ देवाचं वचन शिकवत असताना लोकांचा समुदाय त्याच्याभोवती गर्दी करू लागला. २ तेव्हा, किनाऱ्‍याला लावलेल्या दोन नावा त्याला दिसल्या. कोळी त्या नावांतून उतरून आपली जाळी धूत होते.+ ३ त्यांतल्या एका नावेत म्हणजे शिमोनच्या नावेत तो चढला आणि त्याने शिमोनला नाव किनाऱ्‍यापासून थोडी आत न्यायला सांगितली. मग, तो नावेत बसून लोकांच्या समुदायाला शिकवू लागला. ४ त्याचं बोलणं संपल्यावर तो शिमोनला म्हणाला: “पाणी जिथे खोल आहे तिथे नाव ने आणि मासे धरण्यासाठी आपली जाळी पाण्यात सोड.” ५ पण शिमोन त्याला म्हणाला: “गुरू, आम्ही रात्रभर कष्ट केले, पण काहीच हाती लागलं नाही.+ तरी, तू म्हणतोस म्हणून मी जाळी पाण्यात सोडतो.” ६ त्यांनी तसं केलं तेव्हा भरपूर मासे जाळ्यांत आले. इतके, की त्यांची जाळी फाटू लागली.+ ७ त्यामुळे, त्यांनी दुसऱ्‍या नावेतल्या आपल्या साथीदारांना इशारा करून मदतीसाठी बोलावलं. तेव्हा, ते आले आणि दोन्ही नावा माशांनी इतक्या भरल्या की त्या बुडू लागल्या. ८ हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला: “हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी माणूस आहे.” ९ इतके मासे पाहून त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. १० तसंच, शिमोनच्या व्यापारात भागीदार असलेली जब्दीची मुलं, याकोब आणि योहान+ यांचीही तीच अवस्था होती. पण येशू शिमोनला म्हणाला: “घाबरू नकोस. कारण आतापासून तू जिवंत माणसं धरणारा होशील.”+ ११ मग त्यांनी आपल्या नावा पुन्हा किनाऱ्‍यावर आणल्या आणि सगळं काही सोडून ते त्याच्यामागे चालू लागले.+

१२ नंतर, येशू एका शहरात असताना, कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस तिथे होता. येशूला पाहताच, तो पालथा पडला आणि गयावया करू लागला: “प्रभू, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”+ १३ तेव्हा त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.” आणि त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला.+ १४ मग याबद्दल कोणालाही सांगू नकोस असं बजावून येशू त्याला म्हणाला: “तर जा, आणि याजकाकडे जाऊन स्वतःला दाखव. आणि त्यांना साक्ष मिळावी म्हणून शुद्ध होण्यासाठी मोशेने सांगितलेलं अर्पण दे.”+ १५ तरीही येशूबद्दलची बातमी दूरपर्यंत पसरत गेली. लोक त्याचं ऐकण्यासाठी आणि आपले रोग बरे करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने त्याच्याकडे यायचे.+ १६ पण येशू बऱ्‍याचदा वेळ काढून एकांत ठिकाणी प्रार्थना करायला जायचा.

१७ एकदा, येशू लोकांना शिकवत होता आणि रोग्यांना बरं करायची यहोवाने* दिलेली शक्‍ती त्याच्याजवळ होती. त्या वेळी, गालील आणि यहूदीयाच्या प्रत्येक गावातून आणि यरुशलेमहून आलेले परूशी* आणि नियमशास्त्राचे शिक्षकही तिथे बसले होते.+ १८ इतक्यात, काही जण लकवा मारलेल्या एका माणसाला खाटेवर घेऊन आले. ते त्याला आत आणून येशूच्या समोर ठेवायचा प्रयत्न करू लागले.+ १९ पण लोकांच्या गर्दीमुळे त्याला आत नेणं शक्य नव्हतं. म्हणून ते घराच्या छतावर चढले आणि कौलं काढून त्यांनी त्याची खाट लोकांच्या गर्दीत येशूच्या समोर खाली सोडली. २० त्यांचा विश्‍वास पाहून येशू म्हणाला: “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”+ २१ तेव्हा शास्त्री आणि परूशी असा विचार करू लागले: “देवाची निंदा करणारा हा कोण आहे? कारण पापांची क्षमा देवाशिवाय कोणीच करू शकत नाही.”+ २२ पण त्यांच्या मनातले विचार ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही काय विचार करताय? २३ ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे? २४ पण मनुष्याच्या मुलाला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला कळावं म्हणून . . . . ” मग लकवा मारलेल्या माणसाला तो म्हणाला: “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.”+ २५ तेव्हा तो त्यांच्यासमोर उठून उभा राहिला आणि ज्या खाटेवर तो झोपला होता ती उचलून तो देवाचा गौरव करत आपल्या घरी गेला. २६ हे पाहून सगळे थक्क झाले. ते देवाचा गौरव करू लागले आणि भयभीत होऊन म्हणू लागले: “आज आम्ही अद्‌भुत गोष्टी पाहिल्या आहेत!”

२७ त्यानंतर येशू बाहेर गेला, तेव्हा कर गोळा करणारा लेवी, जकात नाक्यावर बसलेला त्याला दिसला. येशू त्याला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.”+ २८ तेव्हा तो उठला आणि सगळं काही सोडून त्याच्यामागे चालू लागला. २९ मग लेवीने आपल्या घरी त्याच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली. जकातदार आणि इतर बरेच लोकही त्यांच्यासोबत जेवायला बसले होते.+ ३० तेव्हा परूशी आणि त्यांचे शास्त्री येशूच्या शिष्यांजवळ अशी कुरकुर करू लागले: “तुम्ही जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत का खातापिता?”+ ३१ त्यावर येशूने त्यांना उत्तर दिलं: “जे निरोगी असतात त्यांना वैद्याची गरज नसते, तर आजाऱ्‍यांना असते.+ ३२ मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलोय.”+

३३ ते त्याला म्हणाले: “योहानचे शिष्य वारंवार उपास आणि याचना करतात आणि परूश्‍यांचे शिष्यही तसंच करतात, पण तुमचे शिष्य मात्र खातपीत असतात.”+ ३४ येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा सोबत असेपर्यंत तुम्ही त्याच्या मित्रांना उपास करायला लावू शकत नाही, लावू शकता का? ३५ पण असे दिवस येतील जेव्हा नवऱ्‍या मुलाला+ त्यांच्यापासून दूर केलं जाईल. मग त्या दिवसांत ते उपास करतील.”+

३६ येशूने त्यांना एक उदाहरणही दिलं: “कोणीही नवीन झग्याचा तुकडा कापून जुन्या झग्याला लावत नाही. कारण असं केलं, तर तो तुकडा फाटून जाईल. शिवाय, नवीन झग्याचं कापड जुन्या झग्याशी जुळणार नाही.+ ३७ तसंच, कोणीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाही. कारण तसं केलं, तर नव्या द्राक्षारसामुळे बुधल्या फाटून द्राक्षारस सांडेल आणि बुधल्या खराब होतील. ३८ त्यामुळे नवीन द्राक्षारस नव्या बुधल्यांमध्येच भरावा. ३९ जुना द्राक्षारस प्यायल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस नको असतो, कारण ‘जुनाच चांगला,’ असं तो म्हणतो.”

६ मग, एका शब्बाथाच्या दिवशी तो शेतांतून चालला होता, तेव्हा त्याचे शिष्य धान्याची कणसं तोडून+ ती हातांवर चोळून खात होते.+ २ हे पाहून काही परूशी म्हणाले: “शब्बाथाच्या दिवशी नियमाप्रमाणे योग्य नसलेली गोष्ट तुम्ही का करताय?”+ ३ पण येशूने त्यांना उत्तर दिलं: “जेव्हा दावीद आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती, तेव्हा त्याने काय केलं हे तुम्ही कधी वाचलं नाही का?+ ४ दावीद देवाच्या घरात गेला आणि त्याला देण्यात आलेल्या पवित्र भाकरी* त्याने खाल्ल्या आणि आपल्या माणसांनाही दिल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या खाणं योग्य नव्हतं. तुम्ही याबद्दल कधी वाचलं नाही का?”+ ५ मग तो त्यांना म्हणाला: “मनुष्याचा मुलगा शब्बाथाचा प्रभू आहे.”+

६ दुसऱ्‍या एका शब्बाथाच्या दिवशी+ तो सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. तेव्हा तिथे एक असा माणूस होता, ज्याचा उजवा हात वाळलेला* होता.+ ७ येशू शब्बाथाच्या दिवशी रोग बरे करतो का, हे पाहण्यासाठी शास्त्री आणि परूशी त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. कारण त्यांना त्याच्यावर काही ना काही आरोप लावायचा होता. ८ पण त्यांच्या मनातले विचार ओळखून+ तो त्या वाळलेल्या* हाताच्या माणसाला म्हणाला: “ऊठ, इथे मधे येऊन उभा राहा.” तेव्हा तो उठला आणि तिथे उभा राहिला. ९ मग येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला विचारतो, शब्बाथाच्या दिवशी काय करणं योग्य आहे? एखाद्याचं भलं करणं की वाईट करणं? एखाद्याचा जीव वाचवणं की जीव घेणं?”+ १० मग सगळ्यांकडे पाहिल्यानंतर तो त्या माणसाला म्हणाला: “हात लांब कर.” त्याने तो लांब केला तेव्हा त्याचा हात बरा झाला. ११ हे पाहून शास्त्री आणि परूशी रागाने वेडेपिसे होऊन, येशूचं काय करावं याबद्दल आपसात चर्चा करू लागले.

१२ मग एकदा तो डोंगरावर प्रार्थना करायला गेला+ आणि रात्रभर देवाला प्रार्थना करत राहिला.+ १३ दिवस उजाडल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावलं आणि त्यांच्यातल्या या १२ जणांना निवडून त्यांना प्रेषित असं नाव दिलं:+ १४ शिमोन, ज्याला त्याने पेत्र असंही नाव दिलं, त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प,+ बर्थलमय, १५ मत्तय, थोमा,+ अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन, ज्याला “आवेशी” म्हटलं आहे, १६ याकोबचा मुलगा यहूदा आणि यहूदा इस्कर्योत, जो दगाबाज निघाला.

१७ मग तो त्यांच्यासोबत डोंगरावरून खाली उतरला आणि एका सपाट जागेवर उभा राहिला. तेव्हा, त्याच्या शिष्यांचा एक मोठा समुदाय तिथे होता. तसंच, यहूदीया व यरुशलेम आणि समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या सोर व सीदोनच्या प्रदेशांतून आलेले लोकही मोठ्या संख्येने तिथे जमले होते. ते त्याचं ऐकायला आणि आपले रोग बरे करून घ्यायला आले होते. १८ तेव्हा दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेल्या लोकांनासुद्धा येशूने बरं केलं. १९ त्याला हात लावण्यासाठी गर्दीतल्या सगळ्या लोकांची धडपड चालली होती. कारण त्याच्यातून सामर्थ्य निघत होतं+ आणि त्या सगळ्यांना बरं करत होतं.

२० मग येशू आपल्या शिष्यांकडे पाहून बोलू लागला:

“अहो गरिबांनो, तुम्ही सुखी आहात! कारण देवाचं राज्य तुमचं आहे.+

२१ उपाशी असलेल्यांनो, तुम्ही सुखी आहात! कारण तुम्हाला तृप्त केलं जाईल.+

रडणाऱ्‍यांनो, तुम्ही सुखी आहात! कारण तुम्ही हसाल.+

२२ मनुष्याच्या मुलामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात,+ तुम्हाला एकटं पाडतात,+ तुमचा अपमान करतात आणि दुष्ट म्हणून तुमची बदनामी करतात,* तेव्हा तुम्ही सुखी आहात. २३ कारण तुमच्याआधी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांसोबतही त्यांनी हेच केलं होतं. उलट, त्या दिवशी हर्ष आणि आनंद करा.* कारण पाहा! स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे.+

२४ पण तुम्ही जे श्रीमंत आहात, तुमचा धिक्कार असो!+ कारण तुमच्या वाट्याचं सुख तुम्हाला आधीच मिळालंय.+

२५ तुम्ही जे आता तृप्त आहात, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही उपाशी राहाल.

तुम्ही जे आता हसत आहात, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.+

२६ सगळे लोक जरी तुमची प्रशंसा करत असले, तरी तुमचा धिक्कार असो!+ कारण हेच त्यांच्या पूर्वजांनी खोट्या संदेष्ट्यांच्या बाबतीतही केलं होतं.

२७ पण तुम्ही जे ऐकत आहात, तुम्हाला मी असं सांगतो: आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा आणि तुमचा द्वेष करणाऱ्‍यांचं भलं करत राहा.+ २८ तुम्हाला शाप देणाऱ्‍यांना आशीर्वाद देत राहा आणि तुमचा अपमान करणाऱ्‍यांसाठी प्रार्थना करत राहा.+ २९ जो तुमच्या एका गालावर चापट मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल करा आणि जो तुमचं बाहेरचं वस्त्र घेतो, त्याला तुमचा झगा घ्यायलाही नाही म्हणू नका.+ ३० जे तुम्हाला काही मागतात त्या प्रत्येकाला ते द्या,+ आणि जो तुमच्या वस्तू घेऊन जातो, त्याला त्या परत मागू नका.

३१ त्याच प्रकारे, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा.+

३२ जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करत असाल, तर त्यात काय विशेष? कारण पापी लोकही आपल्यावर प्रेम करणाऱ्‍यांवर प्रेम करतात.+ ३३ आणि तुमचं भलं करणाऱ्‍यांचं जर तुम्ही भलं केलं, तर त्यात काय विशेष? कारण पापी लोकही तेच करतात. ३४ तसंच, ज्यांच्याकडून तुम्हाला परत मिळण्याची आशा आहे, त्यांना जर तुम्ही उसनं दिलं,* तर त्यात काय विशेष?+ कारण पापी लोकसुद्धा पूर्ण रक्कम परत मिळण्याच्या अपेक्षेने इतर पापी लोकांना उसनं देतात. ३५ उलट, तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रेम करत राहा, इतरांचं भलं करत राहा आणि परत मिळण्याची अपेक्षा न करता उसनं देत राहा,+ म्हणजे तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही सर्वोच्च देवाची मुलं व्हाल. कारण तो उपकार न मानणाऱ्‍यांवर आणि दुष्ट लोकांवरही दया करतो.+ ३६ जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसेच तुम्हीसुद्धा इतरांवर दया करत राहा.+

३७ त्याच प्रकारे, इतरांचे दोष काढायचं सोडून द्या, म्हणजे तुमचे दोष काढले जाणार नाहीत.+ इतरांना दोषी ठरवायचं सोडून द्या, म्हणजे तुम्हाला दोषी ठरवलं जाणार नाही. क्षमा* करत राहा, म्हणजे तुम्हालाही क्षमा* केली जाईल.+ ३८ इतरांना देत राहा, म्हणजे तेही तुम्हाला देतील.+ ते तुमच्या पदरात भरपूर घालतील. ते माप हलवून, दाबून आणि ओसंडून वाहेपर्यंत ओततील. कारण ज्या मापाने तुम्ही इतरांना मापून देत आहात, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील.”

३९ मग त्याने त्यांना एक उदाहरणही दिलं: “एक आंधळा दुसऱ्‍या आंधळ्याला मार्ग दाखवू शकत नाही, दाखवू शकतो का? जर दाखवला, तर दोघंही खड्ड्यात पडणार नाहीत का?+ ४० शिष्य* आपल्या गुरूपेक्षा श्रेष्ठ नसतो. पण ज्याला चांगल्या प्रकारे शिकवण्यात येतं, असा प्रत्येक जण आपल्या गुरूसारखा होईल. ४१ तर मग, तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड न बघता, तू तुझ्या भावाच्या डोळ्यातली बारीकशी काडी का बघतोस?+ ४२ तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड न पाहता, ‘भावा, मला तुझ्या डोळ्यातली काडी काढू दे,’ असं तू आपल्या भावाला कसं काय म्हणू शकतोस? अरे ढोंगी माणसा! आधी स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड काढ, म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातली काडी कशी काढायची हे तुला स्पष्ट दिसेल.

४३ कोणतंही चांगलं झाड कुजकं फळ देत नाही. आणि कीड लागलेलं कोणतंही झाड चांगलं फळ देत नाही.+ ४४ कारण प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या फळावरून होते.+ उदाहरणार्थ, लोक काटेरी झुडपांतून अंजिरं किंवा द्राक्षं काढत नाहीत. ४५ चांगला माणूस आपल्या अंतःकरणात साठवलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो. तर, वाईट माणूस आपल्या अंतःकरणात साठवलेल्या वाईट गोष्टी बाहेर काढतो. कारण जे अंतःकरणात भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.+

४६ तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू!’ म्हणता, पण मग मी सांगितलेल्या गोष्टी का करत नाही?+ ४७ जो माझ्याकडे येतो आणि माझी वचनं ऐकून त्यांप्रमाणे वागतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला सांगतो:+ ४८ तो अशा एका माणसासारखा आहे, ज्याने घर बांधताना खोलपर्यंत खोदून खडकावर पाया घातला. मग पूर आला तेव्हा नदीचं पाणी घरावर आदळलं, पण ते त्या घराला हलवू शकलं नाही. कारण ते घर मजबूत बांधलेलं होतं.+ ४९ याउलट जो ऐकतो, पण त्याप्रमाणे करत नाही+ तो अशा एका माणसासारखा आहे ज्याने पाया न घालताच घर बांधलं. मग नदीचं पाणी त्यावर आदळलं आणि ते घर लगेच कोसळलं आणि पूर्णपणे उद्ध्‌वस्त झालं.”

७ अशा रितीने, लोकांना जे सांगायचं होतं ते सगळं सांगून झाल्यावर येशू कफर्णहूमला आला. २ तिथे सैन्यातल्या एका अधिकाऱ्‍याचा आवडता दास खूप आजारी होता आणि मरायला टेकला होता.+ ३ त्या अधिकाऱ्‍याने येशूबद्दल ऐकलं तेव्हा आपल्याकडे येऊन आपल्या दासाला बरं करावं, अशी विनंती करण्यासाठी त्याने यहुद्यांच्या काही वडीलजनांना येशूकडे पाठवलं. ४ म्हणून ते येशूकडे आले आणि त्याला अशी कळकळीची विनंती करू लागले: “कृपा करून त्याला मदत करा, कारण तो एक चांगला माणूस आहे. ५ आपल्या राष्ट्रातल्या लोकांवर त्याचं प्रेम आहे आणि त्याने आपल्यासाठी सभास्थानसुद्धा बांधून दिलंय.” ६ त्यामुळे येशू त्यांच्याबरोबर गेला. पण तो सैन्यातल्या अधिकाऱ्‍याच्या घरापासून काही अंतरावर होता, तेव्हा अधिकाऱ्‍याने आपल्या मित्रांना असा निरोप देऊन येशूकडे पाठवलं: “प्रभू, उगाच त्रास घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावं इतकी माझी लायकी नाही.+ ७ खरंतर, याच कारणामुळे मी स्वतःला तुमच्याकडे यायच्या लायकीचा समजलो नाही. तुम्ही फक्‍त तोंडातून शब्द काढा म्हणजे माझा नोकर बरा होईल. ८ कारण मी स्वतः दुसऱ्‍याच्या अधिकाराखाली असलेला माणूस आहे. माझ्या हाताखालीही सैनिक आहेत. आणि मी त्यांच्यापैकी एकाला ‘जा!’ म्हटलं तर तो जातो आणि दुसऱ्‍याला ‘ये!’ म्हटलं तर तो येतो. आणि माझ्या दासाला मी, ‘अमुक कर!’ असं म्हटलं तर तो ते करतो.” ९ येशूने हे ऐकलं तेव्हा त्याला खूप आश्‍चर्य वाटलं आणि त्याच्यामागे येणाऱ्‍या लोकांकडे वळून तो म्हणाला: “मी तुम्हाला सांगतो, मला इस्राएलमध्येही इतका मोठा विश्‍वास पाहायला मिळाला नाही!”+ १० आणि ज्यांना त्याच्याकडे पाठवण्यात आलं होतं ते घरी परत आले, तेव्हा तो दास बरा झाल्याचं त्यांना दिसलं.+

११ याच्या थोड्याच काळानंतर, तो नाईन नावाच्या गावी गेला. त्याच्यासोबत त्याचे शिष्य आणि लोकांचा मोठा समुदायही होता. १२ तो शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आला, तेव्हा लोक एका मेलेल्या माणसाला नेत होते. तो माणूस आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता.+ शिवाय, ती विधवा होती. आणि शहरातले पुष्कळ लोक तिच्यासोबत होते. १३ तिला पाहताच प्रभूला तिचा कळवळा आला+ आणि तो तिला म्हणाला: “रडू नकोस.”+ १४ त्यानंतर त्याने जवळ जाऊन तिरडीला हात लावला, तेव्हा तिरडी वाहून नेणारे थांबले. मग तो म्हणाला: “मुला, मी तुला सांगतो, ऊठ!”+ १५ तेव्हा तो उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे सोपवलं.+ १६ हे पाहून सगळ्या लोकांना भीती वाटली आणि ते असं म्हणून देवाचा गौरव करू लागले: “आपल्यामध्ये एक महान संदेष्टा प्रकट झालाय,”+ आणि “देवाने आपल्या लोकांकडे लक्ष वळवलंय.”+ १७ त्याच्याबद्दलची ही बातमी संपूर्ण यहूदीयात आणि आसपासच्या सगळ्या प्रदेशांत पसरली.

१८ आता योहानच्या शिष्यांनी या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या.+ १९ तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना बोलावून त्यांना प्रभूकडे असं विचारायला पाठवलं: “जो येणार होता तो तूच आहेस का,+ की आम्ही दुसऱ्‍या कोणाची वाट पाहावी?” २० ती माणसं येशूजवळ येऊन म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने आम्हाला असं विचारायला तुझ्याकडे पाठवलंय, की ‘जो येणार होता तो तूच आहेस, की आम्ही दुसऱ्‍याची वाट पाहावी?’” २१ त्याच वेळी, येशूने बऱ्‍याच लोकांचे आजार आणि गंभीर रोग बरे केले.+ तसंच, त्याने त्यांच्यातून दुष्ट स्वर्गदूत* काढले आणि बऱ्‍याच आंधळ्यांना दृष्टीचं दान दिलं. २२ तेव्हा येशूने त्यांना असं उत्तर दिलं: “तुम्ही जे काही पाहिलं आणि ऐकलं ते जाऊन योहानला सांगा: आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत,+ लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्‍यांना ऐकू येतंय,+ मेलेल्यांना जिवंत केलं जातंय आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जातोय.+ २३ ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही* तो माणूस सुखी!”+

२४ योहानचा निरोप घेऊन आलेली माणसं परत गेली, तेव्हा येशू जमलेल्या लोकांशी योहानबद्दल बोलू लागला: “ओसाड रानात तुम्ही काय पाहायला गेला होता? वाऱ्‍याने हलणारी गवताची काडी?+ २५ मग काय पाहायला गेला होता? मऊ मखमली कपडे* घातलेला माणूस?+ असे सुंदर कपडे घालणारे आणि ऐशआरामात राहणारे तर राजमहालात असतात. २६ तर, काय पाहायला गेला होता तुम्ही? संदेष्ट्याला? हो, मी तुम्हाला सांगतो, जो संदेष्ट्यांहूनही श्रेष्ठ त्याला.+ २७ हा तोच आहे ज्याच्याबद्दल असं लिहिलंय: ‘पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवतोय. तो तुझ्यापुढे जाऊन तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.’+ २८ मी तर तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. पण, देवाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”+ २९ (जेव्हा सगळ्या लोकांनी आणि जकातदारांनी हे ऐकलं, तेव्हा देव नीतिमान असल्याचं त्यांनी कबूल केलं. कारण त्यांना योहानचा बाप्तिस्मा देण्यात आला होता.+ ३० पण, परूशी आणि नियमशास्त्राचे जाणकार यांनी त्यांच्यासाठी असलेला देवाचा संकल्प नाकारला.+ कारण त्यांनी योहानकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता.)

३१ येशू पुढे म्हणाला: “त्यामुळे, या पिढीतल्या लोकांची तुलना मी कोणाशी करू? ते कोणासारखे आहेत?+ ३२ ते बाजारात बसलेल्या लहान मुलांसारखे आहेत. ते एकमेकांना हाक मारून म्हणतात: ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत. आम्ही मोठ्याने रडलो, पण तुम्ही रडला नाहीत.’ ३३ त्याचप्रमाणे, बाप्तिस्मा देणारा योहान भाकरी खात किंवा द्राक्षारस पीत आला नाही,+ तरी ‘त्याच्यात दुष्ट स्वर्गदूत आहे,’ असं तुम्ही म्हणता. ३४ मनुष्याचा मुलगा खातपीत आला आणि तरी तुम्ही म्हणता, ‘पाहा! हा खादाड आणि दारुडा! जकातदारांचा आणि पापी लोकांचा मित्र!’+ ३५ पण बुद्धी तिच्या सगळ्या परिणामांवरून* सिद्ध होते.”*+

३६ मग परूश्‍यांपैकी एक जण त्याला आपल्या घरी जेवायला यायचा आग्रह करू लागला. तेव्हा तो त्या परूश्‍याच्या घरी गेला आणि जेवायला बसला. ३७ त्या शहरात एक पापी आणि बदनाम स्त्री होती. येशू त्या परूश्‍याच्या घरी जेवायला आला आहे असं तिने ऐकलं, तेव्हा ती सुगंधी तेलाची बाटली* घेऊन तिथे आली.+ ३८ ती येशूच्या मागे त्याच्या पायांजवळ गुडघे टेकून रडू लागली. ती आपल्या अश्रूंनी त्याचे पाय भिजवू लागली आणि आपल्या केसांनी ते पुसू लागली. तसंच, त्याच्या पायांचे मुके घेऊन तिने त्यांवर सुगंधी तेल लावलं. ३९ हे पाहून, ज्या परूश्‍याने येशूला आमंत्रण दिलं होतं, तो मनातल्या मनात म्हणू लागला: “हा माणूस जर खरंच संदेष्टा असता, तर त्याला स्पर्श करणारी ही स्त्री कोण आहे आणि कशी आहे, हे त्याला समजलं असतं. ती पापी आहे हे त्याला कळलं असतं.”+ ४० पण येशू त्याला म्हणाला: “शिमोन, मला तुझ्याशी काही बोलायचंय.” तो म्हणाला: “बोला गुरुजी!”

४१ “एक सावकार होता आणि त्याचे दोन कर्जदार होते. एका कर्जदारावर ५०० दिनारांचं,* तर दुसऱ्‍यावर ५० दिनारांचं* कर्ज होतं. ४२ पण हे कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. तेव्हा, सावकाराने त्या दोघांचंही कर्ज माफ केलं. तर मग, यांच्यापैकी कोण त्याच्यावर जास्त प्रेम करेल?” ४३ शिमोनने उत्तर दिलं: “मला वाटतं, ज्याच्यावर जास्त कर्ज होतं तो.” त्यावर येशू त्याला म्हणाला: “बरोबर ओळखलंस.” ४४ मग त्या स्त्रीकडे वळून तो शिमोनला म्हणाला: “या स्त्रीला पाहतोस ना? मी तुझ्या घरी आलो तेव्हा तू मला पाय धुवायला पाणी दिलं नाहीस. पण या स्त्रीने आपल्या अश्रूंनी माझे पाय ओले केले आणि आपल्या केसांनी ते पुसले. ४५ तू माझा मुका घेतला नाहीस, पण मी आत आल्यापासून ही स्त्री माझ्या पायांचे मुके घेत आहे. ४६ तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाहीस, पण या स्त्रीने माझ्या पायांवर सुगंधी तेल ओतलं. ४७ म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, तिने बरीच पापं केली असली, तरी त्यांची क्षमा करण्यात आली आहे,+ कारण तिने जास्त प्रेम केलं. पण, ज्याला कमी क्षमा करण्यात येते तो कमी प्रेम करतो.” ४८ मग तो तिला म्हणाला: “तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.”+ ४९ तेव्हा, त्याच्यासोबत जेवायला बसलेले आपसात म्हणू लागले: “कोण आहे हा माणूस, जो पापांचीसुद्धा क्षमा करतो?”+ ५० पण तो त्या स्त्रीला म्हणाला: “तुझ्या विश्‍वासाने तुला वाचवलंय.+ जा, काळजी करू नकोस.”*

८ याच्या काही काळानंतर, येशू गावोगावी आणि शहरोशहरी जाऊन देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करू लागला.+ त्याचे १२ प्रेषितही त्याच्यासोबत होते. २ तसंच, ज्यांच्यामधून दुष्ट स्वर्गदूत* काढण्यात आले होते आणि ज्यांचे आजार बरे करण्यात आले होते अशा काही स्त्रियासुद्धा त्याच्यासोबत होत्या. जसं की, मरीया (तिला मग्दालीया म्हटलं जायचं आणि तिच्यामधून सात दुष्ट स्वर्गदूत निघाले होते), ३ हेरोदच्या घराचा कारभार पाहणारा खुजा याची बायको योहान्‍ना,+ सुसान्‍ना आणि इतर बऱ्‍याच स्त्रियाही त्याच्यासोबत होत्या. त्या स्वतःच्या संपत्तीतून येशूची आणि त्याच्या शिष्यांची सेवा करायच्या.+

४ मग त्याच्याबरोबर शहरोशहरी जाणाऱ्‍यांसोबतच, लोकांचा एक मोठा समुदायही जमला. तेव्हा, तो एक उदाहरण देऊन त्यांच्याशी बोलू लागला:+ ५ “एक शेतकरी बी पेरायला निघाला. तो पेरणी करत असताना, काही बी रस्त्याच्या कडेला पडलं आणि तुडवलं गेलं आणि आकाशातल्या पक्ष्यांनी ते खाऊन टाकलं.+ ६ तर काही बी खडकाळ जमिनीवर पडून त्यांना अंकुर फुटले. पण ओलावा नसल्यामुळे ते बी वाळून गेलं.+ ७ आणखी काही बी काटेरी झुडपांत पडलं आणि त्यांच्यासोबत वाढणाऱ्‍या या काटेरी झुडपांनी रोपांची वाढ खुंटवली.+ ८ पण, काही बी चांगल्या जमिनीवर पडलं आणि अंकुर फुटल्यावर त्यांनी शंभरपट फळ दिलं.”+ या गोष्टी सांगितल्यावर तो मोठ्याने म्हणाला: “ज्याला कान आहेत, त्याने ऐकावं.”+

९ मग, या उदाहरणाचा काय अर्थ होतो असं त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलं.+ १० तेव्हा तो म्हणाला: “देवाच्या राज्याच्या पवित्र रहस्यांची समज तुम्हाला देण्यात आली आहे. पण इतरांशी मी उदाहरणं देऊन बोलतो.+ त्यामुळे ते पाहतील, पण त्यांना दिसणार नाही आणि ते ऐकतील, पण त्यांना अर्थ समजणार नाही.+ ११ या उदाहरणाचा अर्थ असा आहे: बी म्हणजे देवाचं वचन.+ १२ रस्त्याच्या कडेला पडलेलं बी म्हणजे असे लोक जे वचन ऐकतात, पण सैतान* येतो आणि त्यांच्या हृदयातून ते वचन काढून घेतो, यासाठी की त्यांनी विश्‍वास ठेवू नये आणि त्यांचं तारण होऊ नये.+ १३ तर खडकाळ जमिनीवर पडलेलं बी म्हणजे असे लोक, जे वचन ऐकून आनंदाने स्वीकारतात, पण मूळ धरत नाहीत. ते काही काळ विश्‍वास ठेवतात, पण परीक्षेच्या काळात विश्‍वास सोडून देतात.+ १४ आणि काटेरी झुडपांत पडलेलं बी म्हणजे असे लोक, जे वचन तर ऐकतात, पण जीवनातल्या चिंता, धनदौलत+ आणि चैनबाजी+ यांत ते गुरफटले जातात. यामुळे त्यांची वाढ पूर्णपणे खुंटते आणि ते फळ देत नाहीत.+ १५ तर चांगल्या जमिनीवर पडलेलं बी म्हणजे चांगल्या आणि प्रामाणिक मनाचे लोक.+ ते वचन ऐकून हृदयात ठेवतात आणि धीराने फळ देतात.+

१६ कोणीही दिवा लावून तो भांड्याने झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही. तर घरात येणाऱ्‍यांना उजेड मिळावा म्हणून एखाद्या उंच ठिकाणी ठेवतो.+ १७ कारण अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही जी उघड होणार नाही. आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी कायमची गुप्त राहील आणि उजेडात येणार नाही.+ १८ म्हणून, तुम्ही कशा प्रकारे ऐकता याकडे लक्ष द्या. कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी दिलं जाईल.+ पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असं त्याला वाटतं तेसुद्धा काढून घेतलं जाईल.”+

१९ मग, त्याची आई आणि भाऊ+ त्याला भेटायला आले, पण लोकांच्या गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येत नव्हतं.+ २० म्हणून त्याला असा निरोप देण्यात आला, की “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय.” २१ तेव्हा त्याने असं उत्तर दिलं: “जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”+

२२ एकदा तो आणि त्याचे शिष्य एका नावेत चढले आणि तो त्यांना म्हणाला: “चला, आपण पलीकडे, सरोवराच्या त्या किनाऱ्‍याला जाऊ.” तेव्हा ते निघाले.+ २३ पण नावेतून जात असताना त्याला झोप लागली. मग एक जोरदार वादळ आलं आणि नावेत पाणी शिरू लागलं आणि ती बुडू लागली.+ २४ म्हणून त्यांनी जाऊन त्याला उठवलं आणि ते त्याला म्हणाले: “गुरू, गुरू, आपण बुडतोय!” तेव्हा तो उठला आणि त्याने वाऱ्‍याला आणि उसळणाऱ्‍या लाटांना दटावलं. मग वादळ थांबलं आणि सगळं काही शांत झालं.+ २५ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुमचा विश्‍वास कुठे आहे?” पण ते घाबरले होते आणि थक्क होऊन एकमेकांना म्हणू लागले: “हा आहे तरी कोण? हा तर वाऱ्‍याला आणि पाण्यालाही हुकूम देतो आणि तेही त्याचं ऐकतात.”+

२६ मग ते गालीलच्या पलीकडच्या किनाऱ्‍यावर, गरसेकरांच्या प्रदेशात पोहोचले.+ २७ येशू नावेतून उतरून किनाऱ्‍यावर आला, तेव्हा जवळच्या शहरातला एक माणूस त्याला दिसला. त्याला दुष्ट स्वर्गदूताने पछाडलं होतं. बऱ्‍याच काळापासून त्याने कपडे घातले नव्हते. शिवाय तो घरात नाही, तर कबरस्तानात राहायचा.+ २८ येशूला पाहताच तो जोरात ओरडून त्याच्यासमोर पडला आणि मोठ्या आवाजात म्हणाला: “हे येशू, सर्वोच्च देवाच्या मुला! तुझ्याशी माझं काय घेणंदेणं? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.”+ २९ (कारण येशू त्या दुष्ट स्वर्गदूताला त्या माणसातून निघून जायची आज्ञा करत होता. दुष्ट स्वर्गदूताने कित्येकदा त्या माणसाला धरलं होतं.*+ बऱ्‍याच वेळा, साखळ्यांनी आणि बेड्यांनी बांधून पहाऱ्‍यात ठेवलेलं असतानाही तो माणूस ती बंधनं तोडायचा आणि दुष्ट स्वर्गदूत त्याला एकांत ठिकाणी घेऊन जायचा.) ३० येशूने त्याला विचारलं: “तुझं नाव काय?” तो म्हणाला: “सैन्य.” कारण त्याच्यामध्ये बरेच दुष्ट स्वर्गदूत शिरले होते. ३१ आणि ते येशूला वारंवार विनंती करू लागले की आम्हाला अथांग डोहात* पाठवू नकोस.+ ३२ त्याच वेळी, डुकरांचा+ एक मोठा कळप तिथे डोंगरावर चरत होता. आपल्याला त्या डुकरांमध्ये शिरण्याची परवानगी द्यावी अशी त्या दुष्ट स्वर्गदूतांनी त्याला विनवणी केली आणि त्याने ती मान्य केली.+ ३३ तेव्हा, ते दुष्ट स्वर्गदूत त्या माणसातून निघून डुकरांमध्ये शिरले आणि तो कळप धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि बुडून मेला. ३४ पण कळप चारणाऱ्‍यांनी घडलेला प्रकार पाहिला, तेव्हा ते तिथून पळाले आणि त्यांनी शहरात आणि शेतांत जाऊन लोकांना ही बातमी सांगितली.

३५ तेव्हा नेमकं काय घडलं हे पाहायला लोक निघाले. ते येशूकडे आले तेव्हा ज्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत निघाले होते, तो त्यांना येशूच्या पायाजवळ बसलेला दिसला. त्याने कपडे घातले होते आणि तो शुद्धीवर होता. हे पाहून लोक घाबरले. ३६ ज्यांनी ही घटना पाहिली होती त्यांनी दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेला माणूस कसा बरा झाला हे त्यांना सांगितलं. ३७ तेव्हा, गरसेकरांच्या आसपासच्या प्रदेशातून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी येशूला तिथून निघून जायला सांगितलं, कारण ते फार घाबरले होते. मग, येशू नावेत बसून परत जायला निघाला. ३८ पण ज्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत काढण्यात आले होते, तो येशूला विनंती करू लागला की आपल्यालाही सोबत येऊ द्यावं. पण येशूने त्याला असं म्हणून पाठवून दिलं,+ ३९ “आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी जे काही केलं ते सगळ्यांना सांगत राहा.” तेव्हा तो माणूस तिथून निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केलं होतं, त्याबद्दल तो संपूर्ण शहरात सांगू लागला.

४० येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने आनंदाने त्याचं स्वागत केलं. कारण ते सगळे त्याची वाट पाहत होते.+ ४१ इतक्यात याईर नावाचा एक माणूस तिथे आला. तो सभास्थानाचा एक अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी यायची विनंती केली.+ ४२ कारण सुमारे १२ वर्षांची त्याची एकुलती एक मुलगी मरायला टेकली होती.

येशू तिथे जायला निघाला तेव्हा लोकसमुदायाने त्याच्याभोवती गर्दी केली. ४३ तिथे अशी एक स्त्री होती, जिला १२ वर्षांपासून रक्‍तस्रावाचा+ आजार होता. कोणीही तिला बरं करू शकलं नव्हतं.+ ४४ तिने मागून येऊन येशूच्या कपड्यांच्या काठाला हात लावला+ आणि त्याच क्षणी तिचा रक्‍तस्राव थांबला. ४५ तेव्हा येशू म्हणाला: “मला कोणी हात लावला?” सगळे नाही म्हणू लागले, तेव्हा पेत्र म्हणाला: “गुरू, बघतोस ना, तुझ्याभोवती लोकांची किती गर्दी आहे!”+ ४६ पण, येशू म्हणाला: “कोणीतरी नक्कीच मला स्पर्श केला. कारण माझ्यातून शक्‍ती+ निघाल्याचं मला जाणवलं.” ४७ येशूला आपल्याबद्दल कळलं आहे हे त्या स्त्रीला समजलं, तेव्हा ती थरथर कापत आली आणि तिने त्याच्यापुढे गुडघे टेकले. आणि तिने येशूला का स्पर्श केला आणि कशा प्रकारे ती लगेच बरी झाली, हे तिने सगळ्यांसमोर सांगितलं. ४८ पण, येशू तिला म्हणाला: “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलंय. जा, काळजी करू नकोस.”*+

४९ तो बोलत होता, इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्‍याचा एक माणूस तिथे आला आणि म्हणाला: “तुमची मुलगी वारली. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”+ ५० हे ऐकून येशू याईरला म्हणाला: “घाबरू नकोस, फक्‍त विश्‍वास ठेव म्हणजे ती वाचेल.”+ ५१ येशू त्या अधिकाऱ्‍याच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने पेत्र, योहान, याकोब आणि त्या मुलीच्या आईवडिलांशिवाय कोणालाही आपल्यासोबत आत येऊ दिलं नाही. ५२ बाहेर सगळे लोक तिच्यासाठी रडत होते आणि छाती बडवून शोक करत होते. म्हणून, येशू त्यांना म्हणाला: “रडू नका,+ मुलगी मेली नाही, झोपली आहे.”+ ५३ तेव्हा, लोक त्याची थट्टा करत हसू लागले. कारण ती मेली आहे हे त्यांना माहीत होतं. ५४ पण त्याने तिचा हात धरून, “बाळा, ऊठ!” असं मोठ्याने म्हटलं.+ ५५ तेव्हा, ती पुन्हा जिवंत झाली*+ आणि लगेच उठली.+ मग तिला काहीतरी खायला द्या, असं त्याने त्यांना सांगितलं. ५६ मुलीला जिवंत झाल्याचं पाहून तिच्या आईवडिलांना इतका आनंद झाला, की त्यांचा यावर विश्‍वासच बसत नव्हता. पण येशूने त्यांना बजावून सांगितलं की जे काही घडलं होतं, ते त्यांनी कोणालाही सांगू नये.+

९ मग, त्याने आपल्या १२ प्रेषितांना जवळ बोलावलं. त्याने त्यांना दुष्ट स्वर्गदूत* काढायचा आणि रोग बरे करायचा अधिकार आणि सामर्थ्य दिलं.+ २ मग त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करायला आणि रोग्यांना बरं करायला पाठवलं. ३ तो त्यांना म्हणाला: “प्रवासात आपल्यासोबत काठी, जेवणाची पिशवी, भाकरी आणि पैसे* असं काहीच घेऊ नका. तसंच, दोन जोड कपडेही घेऊ नका.+ ४ ज्या घरात जाल तिथेच मुक्काम करा आणि तिथूनच निघा.+ ५ एखाद्या ठिकाणी लोकांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर त्यांना साक्ष मिळावी म्हणून त्या शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”+ ६ मग ते निघाले आणि सगळीकडे आनंदाचा संदेश घोषित करत आणि रोग्यांना बरं करत गावोगावी फिरले.+

७ या सगळ्या गोष्टी प्रांताधिकारी हेरोद* याच्या कानावर आल्या, तेव्हा तो मोठ्या पेचात पडला. कारण योहान मेलेल्यांतून उठला आहे असं काही जण म्हणत होते.+ ८ तर इतर जण म्हणत होते, की एलीया प्रकट झाला आहे. आणि असेही काही होते, जे प्राचीन काळातला एक संदेष्टा उठला आहे असं म्हणत होते.+ ९ तेव्हा हेरोद म्हणाला: “मी तर योहानचं डोकं कापलं होतं.+ मग ज्याच्याबद्दल मी या गोष्टी ऐकतोय तो कोण?” म्हणून त्याला पाहायची हेरोदला इच्छा होती.+

१० मग प्रेषित येशूकडे परत आले आणि आपण केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी त्याला सांगितलं.+ तेव्हा एकांत मिळावा म्हणून तो त्यांना आपल्यासोबत घेऊन बेथसैदा या शहरात निघून गेला.+ ११ पण हे कळताच लोकांचा समुदाय येशूच्या मागे गेला. तेव्हा त्याने आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि तो त्यांना देवाच्या राज्याबद्दल सांगू लागला. तसंच, ज्यांना उपचाराची गरज होती त्यांना त्याने बरं केलं.+ १२ मग संध्याकाळ होऊ लागली, तेव्हा १२ प्रेषित त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “लोकांना पाठवून दे, म्हणजे ते जवळपासच्या खेड्यापाड्यांत जाऊन त्यांच्या राहायची आणि खायची-प्यायची सोय करू शकतील. कारण हे तर एकांत ठिकाण आहे.”+ १३ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.”+ तेव्हा ते म्हणाले: “पाच भाकरी आणि दोन मासे यांशिवाय आमच्याजवळ काहीही नाही. आम्ही स्वतःच जाऊन या सगळ्या लोकांसाठी अन्‍न विकत आणू का?” १४ तिथे जवळजवळ ५,००० पुरुष होते. पण तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “सगळ्यांना पन्‍नास-पन्‍नासचे गट करून बसायला सांगा.” १५ त्यांनी तसंच केलं आणि सगळ्यांना खाली बसायला लावलं. १६ त्यानंतर, येशूने त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेतले आणि वर आकाशाकडे पाहून धन्यवाद दिला. मग त्याने भाकरी मोडून लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिल्या. १७ तेव्हा सगळे पोटभर जेवले आणि त्यांनी उरलेलं अन्‍न गोळा केलं तेव्हा १२ टोपल्या भरल्या.+

१८ नंतर, तो एकांतात प्रार्थना करत होता, तेव्हा शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने त्यांना विचारलं: “मी कोण आहे असं लोक म्हणतात?”+ १९ ते त्याला म्हणाले: “काही जण म्हणतात बाप्तिस्मा देणारा योहान. तर काही जण एलीया म्हणतात आणि इतर जण म्हणतात की जुन्या संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठलाय.”+ २० मग तो त्यांना म्हणाला: “पण तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू देवाने पाठवलेला ख्रिस्त आहेस.”+ २१ मग त्याने शिष्यांना कडक शब्दांत सांगितलं, की याबद्दल कोणालाही सांगू नका.+ २२ तो त्यांना असंही म्हणाला: “मनुष्याच्या मुलाला बरंच दुःख सोसावं लागेल. वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री त्याला नाकारतील आणि ठार मारतील.+ पण तिसऱ्‍या दिवशी त्याला उठवलं जाईल.”+

२३ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं+ आणि दररोज आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+ २४ कारण जो आपला जीव वाचवायचा प्रयत्न करतो, तो आपला जीव गमावून बसेल. पण जो माझ्यासाठी आपला जीव गमावतो तो त्याला वाचवेल.+ २५ खरंच, एखाद्या माणसाने सगळं जग मिळवलं, पण आपला जीव गमावला किंवा स्वतःवर नाश ओढवून घेतला तर त्याचा काय उपयोग?+ २६ कारण जर कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटत असेल, तर मनुष्याचा मुलगा जेव्हा आपल्या गौरवात आणि पित्याच्या आणि पवित्र स्वर्गदूतांच्या गौरवात येईल, तेव्हा त्यालाही त्या व्यक्‍तीची लाज वाटेल.+ २७ मी तुम्हाला खरं सांगतो, इथे उभे असलेल्यांपैकी काही जण असे आहेत, की जोपर्यंत ते देवाचं राज्य पाहणार नाहीत तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”+

२८ या गोष्टी सांगितल्यावर, जवळपास आठ दिवसांनी येशू डोंगरावर प्रार्थना करायला गेला. त्याने पेत्र, योहान आणि याकोब यांनाही आपल्यासोबत घेतलं.+ २९ तो प्रार्थना करू लागला तेव्हा त्याच्या चेहऱ्‍याचं रूप बदललं आणि त्याचे कपडे पांढरेशुभ्र होऊन चमकू लागले. ३० आणि पाहा! दोन पुरुष त्याच्याशी बोलत होते. ते मोशे आणि एलीया होते. ३१ त्यांचं रूप फार तेजस्वी होतं. येशू कशा प्रकारे जगातून जाईल आणि हे लवकरच कसं यरुशलेममध्ये घडेल, याबद्दल ते बोलत होते.+ ३२ पेत्रचे आणि त्याच्या सोबत्यांचे डोळे झोपेने जड झाले होते. पण ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांनी त्याचा गौरव पाहिला,+ तसंच त्याच्यासोबत उभ्या असलेल्या दोन पुरुषांनाही पाहिलं. ३३ ते दोन पुरुष येशूला सोडून जाऊ लागले, तेव्हा पेत्र येशूला म्हणाला: “गुरू, बरं झालं आम्ही आलो. आम्हाला तीन तंबू टाकू दे, एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.” आपण काय बोलत आहोत याची त्याला जाणीव नव्हती. ३४ पण तो या गोष्टी बोलत असतानाच एक ढग खाली उतरला आणि त्याने त्यांना झाकून टाकलं. ढगाने त्यांना वेढलं तेव्हा ते घाबरले. ३५ तेवढ्यात ढगातून असा आवाज+ ऐकू आला: “हा माझा मुलगा आहे, याला मी निवडलंय.+ याचं ऐका.”+ ३६ हा आवाज ऐकू आला तेव्हा येशू एकटाच असल्याचं त्यांना दिसलं. पण ते शांतच राहिले आणि त्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या होत्या त्यांबद्दल काही काळापर्यंत कोणालाही सांगितलं नाही.+

३७ दुसऱ्‍या दिवशी ते डोंगरावरून खाली उतरले, तेव्हा लोकांचा एक मोठा समुदाय येशूकडे आला.+ ३८ इतक्यात, लोकसमुदायातला एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला: “गुरुजी, कृपा करून माझ्या मुलाला बघा. कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.+ ३९ एक दुष्ट स्वर्गदूत त्याला धरतो, तेव्हा तो अचानक ओरडू लागतो. मग तो त्याच्या शरीराला पिळवटून टाकतो आणि मुलाच्या तोंडाला फेस येतो. दुष्ट स्वर्गदूत त्याला जखमी करून फार मुश्‍कीलीने सोडतो. ४० मी त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची तुमच्या शिष्यांना विनंती केली होती, पण त्यांना ते जमलं नाही.” ४१ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? तुझ्या मुलाला माझ्याजवळ आण.”+ ४२ पण मुलगा येशूजवळ येतच होता इतक्यात दुष्ट स्वर्गदूताने त्याला खाली आपटलं आणि वाईट रितीने त्याच्या शरीराला पिळवटून टाकलं. पण येशूने त्या दुष्ट स्वर्गदूताला दटावलं आणि मुलाला बरं करून त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केलं. ४३ देवाचं हे महान सामर्थ्य पाहून सगळे लोक थक्क झाले.

तो करत असलेली सगळी कार्यं पाहून लोक आश्‍चर्य करत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: ४४ “लक्ष देऊन ऐका आणि माझे हे शब्द आठवणीत ठेवा. कारण मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला लोकांच्या हवाली केलं जाईल.”+ ४५ पण तो काय म्हणत होता हे त्यांना समजलं नाही. खरंतर, त्यांना त्याचा अर्थ समजू नये म्हणून या गोष्टी त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. आणि यांबद्दल त्याला विचारण्याचं त्यांना धैर्यही झालं नाही.

४६ मग आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून शिष्यांमध्ये वाद सुरू झाला.+ ४७ तेव्हा त्यांच्या मनातले विचार ओळखून, येशूने एका लहान मुलाला आपल्याशेजारी उभं केलं. ४८ मग तो त्यांना म्हणाला: “जो या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. आणि जो मला स्वीकारतो, तो ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.+ कारण तुम्हा सगळ्यांमध्ये जो स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून वागतो तोच श्रेष्ठ आहे.”+

४९ तेव्हा योहान त्याला म्हणाला: “प्रभू, आम्ही एकाला तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढताना पाहिलं. पण तो आपल्यातला नाही, म्हणून आम्ही त्याला अडवायचा प्रयत्न केला.”+ ५० पण येशू म्हणाला: “त्याला अडवायचा प्रयत्न करू नका. कारण जो तुमच्या विरोधात नाही तो तुमच्यासोबत आहे.”

५१ येशूला वर घेतलं जाण्याची वेळ जवळ येऊ लागली,*+ तेव्हा त्याने यरुशलेमला जायचा पक्का निश्‍चय केला. ५२ म्हणून त्याने आपल्या काही शिष्यांना पुढे पाठवलं. तेव्हा ते शोमरोन्यांच्या एका गावात त्याच्यासाठी तयारी करायला गेले. ५३ पण त्या गावातल्या लोकांनी त्याचं स्वागत केलं नाही.+ कारण त्याने यरुशलेमला जायचा निश्‍चय केला* होता. ५४ जेव्हा याकोब आणि योहान+ या त्याच्या शिष्यांनी हे पाहिलं तेव्हा ते म्हणाले: “प्रभू, आम्ही स्वर्गातून आग बोलावून त्यांचा नाश करू का?”+ ५५ पण त्याने वळून त्यांना दटावलं. ५६ आणि ते दुसऱ्‍या गावाकडे निघून गेले.

५७ रस्त्याने जात असताना एक जण त्याला म्हणाला: “तुम्ही जिथेही जाल, तिथे मी तुमच्यामागे येईन.” ५८ पण येशू त्याला म्हणाला: “कोल्ह्यांना राहायला गुहा आणि आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत. पण मनुष्याच्या मुलाला तर डोकं टेकायलाही जागा नाही.”+ ५९ मग तो दुसऱ्‍या एकाला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” तेव्हा तो माणूस म्हणाला: “प्रभू, आधी मला जाऊन माझ्या वडिलांना पुरू द्या.”+ ६० पण तो त्याला म्हणाला: “जे मेलेले आहेत+ त्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे. पण तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”+ ६१ आणखी एक जण म्हणाला: “प्रभू मी तुमच्यामागे येईन, पण आधी मला माझ्या घरच्यांचा निरोप घ्यायची परवानगी द्या.” ६२ येशू त्याला म्हणाला: “जो नांगराला हात लावल्यावर, मागे सोडलेल्या गोष्टींकडे पाहतो+ तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”+

१० यानंतर, प्रभूने आणखी ७० जणांना निवडलं. ज्या प्रत्येक नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता, त्या त्या ठिकाणी त्याने त्यांना जोडीजोडीने आपल्यापुढे पाठवलं.+ २ मग तो त्यांना म्हणाला: “पीक तर भरपूर आहे, पण कामकरी कमी आहेत. म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करायला कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.+ ३ जा, पण सावध राहा! लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवतोय.+ ४ पैशांचा बटवा किंवा जेवणाची पिशवी किंवा जास्तीचे जोडे सोबत घेऊ नका.+ आणि रस्त्याने जाताना कोणाला नमस्कार करू नका.* ५ कोणत्याही घरात गेल्यावर आधी असं म्हणा: ‘या घराला शांती मिळो.’+ ६ आणि जर तिथे कोणी शांतिप्रिय असेल, तर तुमची शांती त्याच्यावर राहील. पण नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. ७ म्हणून, त्याच घरात मुक्काम करा+ आणि ते जे काही तुम्हाला देतील ते खा आणि प्या.+ कारण, कामकऱ्‍याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.+ आणि वारंवार एका घरातून दुसऱ्‍या घरात मुक्काम हलवू नका.

८ तसंच, एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं, तर ते जे काही तुम्हाला वाढतील ते खा. ९ आणि तिथे असलेल्या आजारी लोकांना बरं करा आणि त्यांना सांगा: ‘देवाचं राज्य तुमच्या जवळ आलंय.’+ १० पण एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर शहराच्या मुख्य रस्त्यांवर जा आणि म्हणा: ११ ‘तुम्हाला इशारा मिळण्यासाठी, तुमच्या शहराची जी धूळ आमच्या पायांना लागली आहे तीसुद्धा आम्ही पुसून* टाकत आहोत.+ पण हे लक्षात ठेवा, देवाचं राज्य जवळ आलंय.’ १२ मी तुम्हाला सांगतो, न्यायाच्या दिवशी सदोमला त्या शहरापेक्षा जास्त सोपं जाईल.+

१३ हे खोराजिन! तुझा धिक्कार असो! हे बेथसैदा! तुझा धिक्कार असो! कारण तुमच्यामध्ये जी अद्‌भुत कार्यं घडली आहेत ती सोरमध्ये आणि सीदोनमध्ये घडली असती, तर त्यांनी केव्हाच गोणपाट घालून आणि राखेत बसून पश्‍चात्ताप केला असता.+ १४ म्हणूनच, न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन यांना तुमच्यापेक्षा जास्त सोपं जाईल. १५ आणि हे कफर्णहूम! तुला काय स्वर्गापर्यंत उंच केलं जाईल? नाही, तू खाली कबरेत* जाशील!

१६ जो तुमचं ऐकतो, तो माझं ऐकतो.+ आणि जो तुमचा अनादर करतो, तो माझा अनादर करतो. शिवाय, जो माझा अनादर करतो, तो ज्याने मला पाठवलं त्याचाही अनादर करतो.”+

१७ मग ते ७० शिष्य आनंदाने परत आले आणि म्हणाले: “प्रभू, तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूतसुद्धा* आमच्या अधीन होतात.”+ १८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मला तर सैतान आताच आकाशातून विजेसारखा खाली पडलेला दिसतोय.+ १९ पाहा! मी सापांना आणि विंचवांना पायाखाली तुडवायचा आणि शत्रूंच्या सामर्थ्यावर मात करायचा अधिकार तुम्हाला दिलाय.+ कोणतीच गोष्ट तुमचं नुकसान करू शकणार नाही. २० पण दुष्ट स्वर्गदूत तुमच्या अधीन करण्यात आले आहेत यामुळे आनंदी होऊ नका. तर, स्वर्गात तुमची नावं लिहिण्यात आली आहेत+ यामुळे आनंदी व्हा.” २१ त्याच वेळी, पवित्र शक्‍तीद्वारे* त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला: “हे पित्या, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी सर्वांसमोर तुझी स्तुती करतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून+ काळजीपूर्वक लपवून, लहान मुलांना प्रकट केल्या आहेत. हो पित्या, कारण तुला हेच योग्य वाटलं.+ २२ माझ्या पित्याने सगळ्या गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत आणि मुलगा कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाही माहीत नाही. तसंच, पिता कोण आहे हे मुलाशिवाय,+ आणि ज्या कोणाला तो पित्याबद्दलचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.”+

२३ मग शिष्यांकडे वळून तो म्हणाला: “तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, ते सुखी!+ २४ कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी पाहायची आणि तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टी ऐकायची बऱ्‍याच संदेष्ट्यांची आणि राजांची इच्छा होती. पण त्यांना त्या पाहता आणि ऐकता आल्या नाहीत.”+

२५ इतक्यात, नियमशास्त्राचा जाणकार असलेला एक माणूस उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हणाला: “गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?”+ २६ तो त्याला म्हणाला: “नियमशास्त्रात काय लिहिलंय? तू काय वाचलं आहेस?” २७ त्याने उत्तर दिलं: “‘तू आपला देव, यहोवा* याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने,* पूर्ण शक्‍तीने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर’+ आणि ‘आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’”+ २८ येशू त्याला म्हणाला: “तू बरोबर उत्तर दिलंस. हेच करत राहा म्हणजे तुला जीवन मिळेल.”+

२९ पण आपण नीतिमान आहोत हे सिद्ध करण्यासाठी+ तो माणूस येशूला म्हणाला: “मुळात माझा शेजारी कोण?” ३० येशूने त्याला उत्तर दिलं: “एक माणूस यरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला मारहाण केली आणि ते त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडून निघून गेले. ३१ मग एक याजक त्या रस्त्याने खाली जात होता. पण त्याने त्या माणसाला पाहिलं तेव्हा तो रस्त्याच्या दुसऱ्‍या बाजूने निघून गेला. ३२ त्याच प्रकारे, एक लेवी तिथे आला आणि त्याने त्या माणसाला पाहिलं, तेव्हा तोसुद्धा रस्त्याच्या दुसऱ्‍या बाजूने निघून गेला. ३३ पण, त्याच रस्त्याने जाणारा एक शोमरोनी+ तिथे आला, तेव्हा त्या माणसाला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. ३४ त्यामुळे, तो त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या जखमांवर तेल आणि द्राक्षारस ओतून त्यांवर पट्ट्या बांधल्या. मग त्याला आपल्या गाढवावर टाकून त्याने त्याला एका धर्मशाळेत आणलं आणि त्याची काळजी घेतली. ३५ मग दुसऱ्‍या दिवशी त्याने दोन दिनार* काढून धर्मशाळेच्या मालकाला दिले. आणि तो म्हणाला: ‘त्याची काळजी घ्या आणि याहून जास्त खर्च झाला, तर परत आल्यावर मी तुम्हाला देईन.’ ३६ मग तुझ्या मते या तिघांपैकी, त्या लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाशी खऱ्‍या शेजाऱ्‍यासारखा कोण वागला?”+ ३७ तो म्हणाला: “जो त्याच्याशी दयाळूपणे वागला तो.”+ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “तर मग जा आणि तूही तसंच कर.”+

३८ मग पुढे गेल्यावर ते एका गावात आले. इथे मार्था+ नावाच्या एका स्त्रीने येशूचं आपल्या घरात स्वागत केलं. ३९ तिला मरीया नावाची एक बहीणही होती. ती प्रभूच्या पायांजवळ बसून त्याचं* ऐकत होती. ४० पण, मार्था बरीच कामं करण्यात व्यस्त होती. म्हणून ती येशूजवळ येऊन म्हणाली: “प्रभू, माझ्या बहिणीने सगळी कामं माझ्या एकटीवरच टाकली आहेत, याचं तुला काहीच वाटत नाही का? तिला मला मदत करायला सांग.” ४१ तेव्हा येशू तिला म्हणाला: “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींबद्दल चिंता आणि दगदग करतेस. ४२ थोड्याच गोष्टींची गरज आहे, खरंतर एकच गोष्ट पुरेशी आहे. मरीयाने जे जास्त चांगलं ते निवडलंय+ आणि ते तिच्याकडून काढून घेतलं जाणार नाही.”

११ मग येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. प्रार्थना करून झाल्यावर त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याच्याकडे येऊन म्हणाला: “प्रभू, योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं, तसं तूही आम्हाला प्रार्थना करायला शिकव.”

२ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असं म्हणा: ‘हे पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.+ तुझं राज्य येवो.+ ३ आमच्या गरजेप्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला दे.+ ४ आमच्या पापांची क्षमा कर,+ कारण आम्हीसुद्धा आमचा कर्जदार असलेल्या प्रत्येकाला क्षमा करतो.+ आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस.’”*+

५ मग तो त्यांना म्हणाला: “समजा तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही मध्यरात्री त्याच्याकडे जाता आणि म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे. ६ कारण नुकताच माझा एक मित्र प्रवास करून माझ्याकडे आलाय आणि त्याला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही.’ ७ पण तो आतून त्याला म्हणतो: ‘मला त्रास देऊ नकोस. आता दार बंद आहे आणि माझी लहान मुलं माझ्याजवळ बिछान्यात आहेत. मी उठून तुला काहीही देऊ शकत नाही.’ ८ मी तुम्हाला सांगतो, मैत्रीमुळे जरी नाही, तरी तो न लाजता वारंवार मागतोय म्हणून+ त्याचा मित्र नक्कीच उठेल आणि त्याला जे काही हवंय ते देईल. ९ म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो: मागत राहा+ म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.+ १० कारण जो मागतो त्याला दिलं जातं.+ जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जातं. ११ खरंच, तुमच्यामध्ये असा कोणता बाप आहे, जो त्याच्या मुलाने मासा मागितल्यावर त्याला माशाऐवजी साप देईल?+ १२ किंवा त्याने अंडं मागितल्यावर त्याच्या हातात विंचू देईल? १३ तुम्ही पापी असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं तुम्हाला कळतं, तर मग जे स्वर्गातल्या पित्याकडे मागतात त्यांना तो पवित्र शक्‍ती* देणार नाही का?”+

१४ नंतर, येशूने एका माणसातून दुष्ट स्वर्गदूत* काढला. त्याने त्या माणसाला मुकं केलं होतं.+ दुष्ट स्वर्गदूत काढल्यानंतर तो माणूस बोलू लागला, तेव्हा जमलेले लोक थक्क झाले.+ १५ पण त्यांच्यापैकी काही जण म्हणाले: “दुष्ट स्वर्गदूतांचा अधिकारी बालजबूल* याच्या मदतीने हा दुष्ट स्वर्गदूत काढतो.”+ १६ तर इतर काही जण, त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याकडे स्वर्गातून एक चिन्ह मागू लागले.+ १७ त्यांचे विचार ओळखून+ तो त्यांना म्हणाला: “ज्या राज्यात फूट पडते ते राज्य नष्ट होतं आणि ज्या घरात फूट पडते ते घरसुद्धा टिकू शकत नाही. १८ तसंच, जर सैतान स्वतःच्याच विरोधात लढू लागला, तर त्याचं राज्य कसं काय टिकेल? कारण मी बालजबूलच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो असं तुम्ही म्हणता. १९ जर मी बालजबूलच्या मदतीने दुष्ट स्वर्गदूत काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या मदतीने काढतात? म्हणून, तुम्ही चुकीचं बोलताय हे तुमचे शिष्यच दाखवून देतील. २० पण जर मी देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने*+ दुष्ट स्वर्गदूत काढत असेन, तर देवाच्या राज्याने तुम्हाला गाठलंय.*+ २१ एखादा ताकदवान माणूस सगळी शस्त्रसामग्री घेऊन आपल्या घराचं रक्षण करतो, तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. २२ पण, त्याच्यापेक्षा ताकदवान माणूस त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो. त्या वेळी, ज्या शस्त्रसामग्रीवर त्या माणसाने भरवसा ठेवला होता ती तो काढून घेतो आणि त्याच्याकडून लुटलेली मालमत्ता वाटून टाकतो. २३ जो माझ्या बाजूने नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्यासोबत गोळा करत नाही तो विखरून टाकतो.+

२४ जेव्हा एखाद्या माणसातून दुष्ट स्वर्गदूत बाहेर निघतो, तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणांत राहायची जागा शोधत फिरतो. पण त्याला ती सापडत नाही, तेव्हा तो म्हणतो, ‘मी जिथून निघालो त्या माझ्या घरी परत जाईन.’+ २५ पण तिथे आल्यावर ते घर झाडूनपुसून स्वच्छ केलेलं आणि सजवलेलं आहे असं त्याला दिसतं. २६ तेव्हा तो जाऊन आपल्यापेक्षा वाईट अशा आणखी सात दुष्ट स्वर्गदूतांना घेऊन येतो आणि त्या माणसात शिरून ते तिथेच राहू लागतात. अशा रितीने त्या माणसाची अवस्था आधीपेक्षाही वाईट होते.”

२७ तो या गोष्टी बोलत असताना गर्दीतून एक स्त्री मोठ्याने त्याला म्हणाली: “ज्या स्त्रीने आपल्या उदरात तुला वाढवलं आणि तुला दूध पाजलं ती सुखी!”+ २८ पण तो म्हणाला: “नाही, उलट जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”+

२९ मग लोकांची गर्दी वाढू लागली तेव्हा तो म्हणाला: “ही एक दुष्ट पिढी आहे. ती चिन्हाची अपेक्षा करते, पण योनाच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंही चिन्ह या पिढीला दिलं जाणार नाही.+ ३० कारण ज्याप्रमाणे योना+ निनवेच्या लोकांसाठी एक चिन्ह ठरला, त्याचप्रमाणे मनुष्याचा मुलगासुद्धा या पिढीसाठी चिन्ह ठरेल. ३१ न्यायाच्या वेळी, दक्षिणेच्या राणीला+ या पिढीच्या लोकांबरोबर उठवलं जाईल आणि ती त्यांना दोषी ठरवेल. कारण शलमोनकडून बुद्धीच्या गोष्टी ऐकण्यासाठी ती खूप लांबून* आली होती. पण पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे.+ ३२ न्यायाच्या वेळी निनवेचे लोक या पिढीबरोबर उठतील आणि तिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या संदेशामुळे पश्‍चात्ताप केला होता.+ पण पाहा! योनापेक्षा जो महान तो इथे आहे. ३३ दिवा लावून कोणी गुप्त ठिकाणी किंवा टोपलीखाली ठेवत नाही. तर घरात येणाऱ्‍यांना उजेड मिळावा म्हणून एखाद्या उंच ठिकाणी ठेवतो.+ ३४ डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमची नजर एकाग्र* असेल, तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली* असेल, तर तुमचं शरीर अंधकारमय होईल.+ ३५ त्यामुळे, तुमच्यात असलेला प्रकाश अंधकारमय होऊ नये म्हणून जागे राहा. ३६ जर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा एकही भाग अंधकारमय नसेल, तर दिव्याच्या किरणांमुळे जसा उजेड मिळतो तसं तुमचं शरीरही पूर्णपणे प्रकाशमय होईल.”

३७ त्याने या गोष्टी सांगितल्यानंतर एका परूश्‍याने त्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं. तेव्हा तो गेला आणि जेवायला बसला. ३८ पण जेवण्याआधी त्याने हात धुतले नाहीत,* हे पाहून त्या परूश्‍याला आश्‍चर्य वाटलं.+ ३९ तेव्हा प्रभू त्याला म्हणाला: “तुम्ही परूशी, प्याला आणि ताट बाहेरून स्वच्छ करता, पण आतून तुम्ही लोभ आणि दुष्टपणा यांनी भरलेले आहात.+ ४० अरे मूर्खांनो! ज्याने बाहेरचा भाग बनवला त्यानेच आतला भागही बनवला नाही का? ४१ त्यामुळे, तुम्ही जो काही दानधर्म करता तो मनापासून करा, म्हणजे तुम्ही सगळ्या बाबतींत शुद्ध व्हाल. ४२ अरे परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही पुदिना, सताप* आणि अशा सगळ्या भाज्यांचा दहावा भाग* तर देता,+ पण देवाचा न्याय आणि प्रेम यांकडे दुर्लक्ष करता. या गोष्टी देणं तुमचं कर्तव्य होतं, पण देवाचा न्याय आणि प्रेम यांकडे दुर्लक्ष न करता.+ ४३ अरे परूश्‍यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण सभास्थानांतल्या पुढच्या* आसनांवर बसायला तुम्हाला आवडतं आणि बाजारांत इतरांनी आपल्याला आदराने नमस्कार करावा असं तुम्हाला वाटतं!+ ४४ तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही अशा कबरींसारखे* आहात ज्या लगेच दिसून येत नाहीत.+ त्यामुळे लोक त्यांवरून चालतात, तरी त्यांना कळत नाही.”

४५ हे ऐकून नियमशास्त्राचा एक जाणकार त्याला म्हणाला: “गुरू, असं म्हणून तुम्ही आमचाही अपमान करत आहात.” ४६ तेव्हा तो म्हणाला: “नियमशास्त्राच्या जाणकारांनो, तुमचाही धिक्कार असो! कारण तुम्ही लोकांवर जड ओझी लादता. पण स्वतः तर त्या ओझ्याला बोटही लावत नाही.+

४७ तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरी बांधता. पण खरंतर तुमच्या वाडवडिलांनीच त्यांना ठार मारलं!+ ४८ खरंच, तुम्ही स्वतः तुमच्या वाडवडिलांच्या कृत्यांचे साक्षीदार आहात आणि तरी तुम्ही त्यांना मान्यता देता. कारण त्यांनी संदेष्ट्यांना ठार मारलं,+ पण तुम्ही त्यांच्यासाठी कबरी बांधत आहात. ४९ म्हणूनच, देव त्याच्या बुद्धीद्वारे* असं म्हणाला: ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन. पण त्यांच्यापैकी काहींना ते छळतील आणि काहींना ठार मारतील. ५० आणि यामुळे, जगाच्या स्थापनेपासून ज्या सगळ्या संदेष्ट्यांचं रक्‍त सांडण्यात आलंय, त्याचा दोष या पिढीवर येईल.*+ ५१ म्हणजे हाबेलच्या रक्‍तापासून+ ते वेदी आणि मंदिर यांच्या मधोमध ठार मारलेल्या जखऱ्‍याच्या रक्‍तापर्यंत.’+ खरंच, मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या रक्‍ताचा दोष या पिढीवर येईल.*

५२ नियमशास्त्राच्या जाणकारांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतः आत गेला नाहीत आणि ज्यांना जायचंय त्यांनाही तुम्ही जाऊ देत नाही!”+

५३ मग तो तिथून बाहेर पडला तेव्हा शास्त्री आणि परूशी त्याला चारही बाजूंनी घेरून धमकावण्याचा प्रयत्न करू लागले. तसंच, त्यांनी त्याच्यावर पुष्कळ प्रश्‍नांचा भडिमारही केला. ५४ कारण त्यांना कसंही करून त्याला शब्दांत पकडायचं होतं.+

१२ इकडे, हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. गर्दी इतकी वाढली की लोक एकमेकांच्या पायांवर पाय देऊ लागले. तेव्हा येशूने लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी तो आपल्या शिष्यांकडे वळून म्हणाला: “परूश्‍यांच्या खमिरापासून, म्हणजे त्यांच्या ढोंगीपणापासून सांभाळा.+ २  पण काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी उघड होणार नाही आणि अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही.+ ३ म्हणून, तुम्ही जे काही अंधारात बोलता ते उजेडात ऐकलं जाईल. आणि आतल्या खोल्यांत जे काही कुजबुजता ते घरांच्या छतांवरून घोषित केलं जाईल. ४ माझ्या मित्रांनो,+ मी तुम्हाला हेही सांगतो, की जे शरीर नष्ट करतात, पण नंतर यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत त्यांना घाबरू नका.+ ५ पण कोणाला घाबरावं हे मी तुम्हाला सांगतो: जिवे मारल्यानंतर गेहेन्‍नात* टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याला घाबरा.+ हो, मी तुम्हाला सांगतो, त्यालाच घाबरा.+ ६ दोन पैशांना* पाच चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, त्यांपैकी एकीलाही देव विसरत नाही.*+ ७ खरंतर, तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत.+ म्हणून घाबरू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.+

८ मी तुम्हाला सांगतो, जो माझ्यावर विश्‍वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो,+ त्याला मनुष्याचा मुलगासुद्धा देवाच्या दूतांसमोर स्वीकारेल.+ ९ पण जो लोकांसमोर मला नाकारतो, त्याला देवाच्या दूतांसमोर नाकारलं जाईल.+ १० तसंच, जो मनुष्याच्या मुलाविरुद्ध काही बोलतो, त्याला क्षमा केली जाईल. पण जो पवित्र शक्‍तीची* निंदा करतो त्याला क्षमा केली जाणार नाही.+ ११ ते तुम्हाला जनसभांसमोर,* शासकांसमोर किंवा अधिकाऱ्‍यांसमोर आणतील तेव्हा आपल्या बचावासाठी काय बोलावं किंवा कसं बोलावं याची चिंता करू नका.+ १२ कारण तुम्ही काय बोलावं हे पवित्र शक्‍ती त्याच वेळी तुम्हाला शिकवेल.”+

१३ मग जमलेल्या लोकांपैकी एक जण त्याला म्हणाला: “गुरुजी, आम्हाला वारशाने मिळालेल्या संपत्तीची वाटणी करायला माझ्या भावाला सांगा.” १४ तो त्याला म्हणाला: “मला तुमचा न्यायाधीश किंवा वाटणी करणारा म्हणून कोणी नेमलं?” १५ मग तो त्यांना म्हणाला: “आपले डोळे उघडे ठेवा आणि सगळ्या प्रकारच्या लोभापासून सांभाळा.+ कारण एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी ती त्याला जीवन देऊ शकत नाही.”+ १६ तेव्हा, त्याने त्यांना एक उदाहरण दिलं: “एका श्रीमंत माणसाच्या जमिनीत भरपूर पीक आलं. १७ त्यामुळे, तो आपल्या मनात विचार करू लागला, ‘इतकं धान्य साठवण्यासाठी जागा नाही, मग आता मी काय करू?’ १८ तेव्हा तो म्हणाला, ‘मी असं करीन:+ माझी धान्याची कोठारं पाडून मी मोठी कोठारं बांधीन आणि तिथे माझं सगळं धान्य आणि मालमत्ता साठवीन. १९ मग मी स्वतःला* म्हणीन: “पुढची बरीच वर्षं पुरतील इतक्या उत्तम गोष्टी तू* साठवल्या आहेत. तेव्हा काळजी करू नकोस, खा, पी आणि मौजमजा कर.”’ २० पण देव त्याला म्हणाला, ‘अरे मूर्खा! आज रात्री तू मरशील.* मग तू साठवलेल्या या सगळ्या गोष्टी कोणाला मिळतील?’+ २१ जो माणूस स्वतःसाठी धनसंपत्ती साठवतो, पण देवाच्या दृष्टीने श्रीमंत नाही त्याची हीच अवस्था होईल.”+

२२ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “म्हणूनच मी तुम्हाला सांगतो: काय खावं अशी आपल्या जिवाबद्दल किंवा काय घालावं अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या.+ २३ कारण अन्‍नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं आहे. २४ कावळ्यांचं उदाहरण घ्या: ते पेरणी किंवा कापणी करत नाहीत. त्यांच्याजवळ धान्याचं कोठार किंवा गोदाम नसतं. तरीसुद्धा देव त्यांना खाऊ घालतो.+ तुम्ही पक्ष्यांपेक्षा जास्त मौल्यवान नाही का?+ २५ चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर* वाढवू शकतं का? २६ जर एवढीशी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, तर मग इतर गोष्टींची चिंता तुम्ही का करता?+ २७ रानातली फुलं कशी वाढतात याचा विचार करा: ती कष्ट करत नाहीत किंवा सूतही कातत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, की शलमोन इतका वैभवी राजा असूनही त्यानेसुद्धा कधी या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता.+ २८ रानातली झाडंझुडपं आज आहेत, पण उद्या ती भट्टीत* टाकली जातात, त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर अरे अल्पविश्‍वासी* लोकांनो, तो तुम्हाला घालायला कपडे देणार नाही का? २९ म्हणून, काय खावं आणि काय प्यावं याबद्दल काळजी करायचं आणि खूप जास्त चिंता करायचं सोडून द्या.+ ३० कारण या गोष्टी मिळवण्यासाठी जगातले लोक धडपड करत आहेत. पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे स्वर्गातल्या तुमच्या पित्याला माहीत आहे.+ ३१ त्याऐवजी, देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा, म्हणजे या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.+

३२ लहान कळपा, भिऊ नको.+ कारण तुम्हाला राज्य द्यायला तुमच्या पित्याला आनंद झालाय.+ ३३ म्हणून, आपली मालमत्ता विकून गरिबांना दान द्या+ आणि झिजणार नाहीत, असे पैशांचे बटवे तयार करा. म्हणजेच स्वर्गात अशी संपत्ती साठवा जी कधीच संपणार नाही.+ तिथे चोर पोहोचू शकणार नाही आणि तिथे तिला कसरही लागणार नाही. ३४ कारण जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.

३५ कंबर कसून तयार राहा+ आणि आपले दिवे पेटते ठेवा.+ ३६ आपला मालक लग्नाहून परत येण्याची वाट पाहणाऱ्‍या+ माणसांसारखे असा.+ कारण तो परत येऊन दार ठोठावताच ते त्याच्यासाठी दार उघडायला तयार असतात. ३७ मालक आल्यावर जे दास जागे असलेले त्याला दिसतील ते सुखी! मी तुम्हाला खरं सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल. आणि त्यांना जेवणाच्या मेजावर बसायला सांगून तो त्यांच्याजवळ उभा राहील आणि त्यांना जेवण वाढेल. ३८ तो दुसऱ्‍या प्रहरी,* इतकंच काय तर तिसऱ्‍या प्रहरी* आल्यावरही जे त्याला तयार असलेले दिसतील, ते सुखी! ३९ पण हे लक्षात ठेवा, की चोर केव्हा येणार आहे, हे जर घराच्या मालकाला माहीत असतं, तर त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.+ ४० तुम्हीसुद्धा तयार असा, कारण तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा वेळी मनुष्याचा मुलगा येत आहे.”+

४१ मग पेत्र म्हणाला: “प्रभू, तू हे उदाहरण फक्‍त आम्हालाच सांगत आहेस, की सगळ्यांना?” ४२ तेव्हा प्रभू म्हणाला: “आपल्या घरातल्या सेवकांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात अन्‍न पुरवत राहण्यासाठी मालक ज्याला नेमेल, असा विश्‍वासू आणि बुद्धिमान* कारभारी* खरोखर कोण आहे?+ ४३ मालक परत आल्यावर तो त्याला तसं करताना दिसला, तर तो दास आशीर्वादित ठरेल! ४४ मी तुम्हाला खरं सांगतो, तो त्याला आपल्या सगळ्या मालमत्तेवर अधिकार देईल. ४५ पण जर तो दास कधी आपल्या मनात म्हणाला, की ‘माझ्या मालकाला परत यायला उशीर लागतोय,’ आणि जर तो घरातल्या दासदासींना मारहाण करू लागला आणि खाऊ-पिऊ लागला आणि दारुडा झाला,+ ४६ तर त्याने अपेक्षाही केली नसेल अशा दिवशी आणि त्याला कल्पनाही नसेल अशा वेळी त्याचा मालक येईल. तो त्याला सगळ्यात कडक शिक्षा देईल आणि अविश्‍वासू लोकांमध्ये त्याला टाकून देईल.* ४७ मग आपल्या मालकाची इच्छा काय आहे, हे समजूनही जो दास तयार नव्हता किंवा ज्याने त्याला दिलेलं काम केलं नाही,* त्याला खूप फटके मारले जातील.+ ४८ पण ज्याला आपल्या मालकाची इच्छा काय आहे हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्याने फटके खाण्यालायक काम केलं, त्याला कमी फटके मारले जातील. खरंच, ज्याला जास्त देण्यात आलं होतं त्या प्रत्येकाकडून जास्त मागितलं जाईल आणि ज्याला बऱ्‍याच गोष्टींवर नेमण्यात आलं होतं, त्याच्याकडून आणखीनच जास्त मागितलं जाईल.+

४९ मी पृथ्वीवर आग पेटवायला आलोय आणि जर ती आधीच पेटली असेल, तर मला आणखी काय पाहिजे? ५० हो, मला एक बाप्तिस्मा घ्यावा लागणार आहे आणि माझा हा बाप्तिस्मा पूर्ण होईपर्यंत मी खूप अस्वस्थ असेन!+ ५१ मी पृथ्वीवर शांती आणायला आलोय, असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही. उलट मी फूट पाडायला आलोय.+ ५२ कारण आतापासून एकाच घरातल्या पाच जणांमध्ये फूट पडेल. तिघांविरुद्ध दोघं आणि दोघांविरुद्ध तिघं अशी फूट पडेल. ५३ मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी त्यांच्यात फूट पडेल.”+

५४ तो लोकसमुदायाला पुढे म्हणाला: “पश्‍चिमेकडून ढग वर येताना तुम्ही पाहता तेव्हा लगेच तुम्ही म्हणता, ‘वादळ येणार आहे,’ आणि तसंच घडतं. ५५ आणि दक्षिणेचा वारा वाहू लागतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आता उष्णतेची लाट येईल,’ आणि तसंच घडतं. ५६ अरे ढोंग्यांनो! पृथ्वी आणि आकाशाचं स्वरूप पाहून हवामान कसं असेल हे तर तुम्ही अचूक ओळखता, पण या विशिष्ट काळाचा अर्थ तुम्हाला का समजत नाही?+ ५७ आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला स्वतःला का ठरवता येत नाही? ५८ उदाहरणार्थ, तुमच्याविरुद्ध खटला भरणाऱ्‍यासोबत तुम्ही एखाद्या अधिकाऱ्‍याकडे जात असताना, वाटेतच त्याच्याशी वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तो तुम्हाला न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायाच्या हाती सोपवेल आणि शिपाई तुम्हाला तुरुंगात डांबेल.+ ५९ मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्ही त्याची एकेक दमडी* फेडेपर्यंत तुम्हाला तिथून मुळीच सुटका मिळणार नाही.”

१३ त्या वेळी तिथे असलेल्या काही जणांनी येशूला सांगितलं, की पिलातने गालीलच्या काही लोकांना बलिदानं अर्पण करताना ठार मारलं होतं. २ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “गालीलच्या त्या लोकांना या गोष्टी सोसाव्या लागल्या, म्हणून ते गालीलच्या इतर सगळ्या लोकांपेक्षा जास्त पापी होते, असं तुम्हाला वाटतं का? ३ मी तुम्हाला सांगतो, ते नव्हते. पण तुम्ही जर पश्‍चात्ताप केला नाही तर तुमच्या सगळ्यांचाही अशाच प्रकारे नाश होईल.+ ४ किंवा, ज्या १८ जणांवर शिलोहचा बुरूज पडून त्यांचा मृत्यू झाला, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या इतर सगळ्या माणसांपेक्षा जास्त दोषी होते, असं तुम्हाला वाटतं का? ५ मी तुम्हाला सांगतो, ते नव्हते. पण तुम्ही जर पश्‍चात्ताप केला नाही तर तुमच्या सगळ्यांचाही त्यांच्यासारखाच नाश होईल.”

६ मग त्याने हे उदाहरण सांगितलं: “एका माणसाने आपल्या द्राक्षमळ्यात अंजिराचं एक झाड लावलं. त्याला फळ लागलं का, हे पाहायला तो आला पण त्याला एकही फळ दिसलं नाही.+ ७ तेव्हा तो माळ्याला म्हणाला, ‘मी तीन वर्षांपासून या अंजिराच्या झाडाला फळ लागतं का, हे पाहायला येतो. पण आजपर्यंत मला काहीच मिळालं नाही. म्हणून ते तोडून टाक! त्याने उगीच जागा का अडवावी?’ ८ माळी त्याला म्हणाला, ‘मालक, आणखी एक वर्षभर हे झाड राहू द्या. मी त्याच्याभोवतीची जमीन खणून खत घालीन. ९ जर पुढे त्याला फळ आलं तर ठीक, नाहीतर ते कापून टाका.’”+

१० नंतर, तो शब्बाथाच्या दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. ११ तिथे एक स्त्री होती. तिला १८ वर्षांपासून दुष्ट स्वर्गदूताने* पछाडल्यामुळे ती आजारी होती. ती कमरेपासून वाकली होती आणि तिला सरळ उभं राहणं शक्यच नव्हतं. १२ येशूने तिला पाहिलं तेव्हा तो तिला म्हणाला: “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्‍त झालीस.”+ १३ मग त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ उभी राहिली आणि देवाची स्तुती करू लागली. १४ पण येशूने त्या स्त्रीला शब्बाथाच्या दिवशी बरं केलं हे पाहून, सभास्थानाचा अधिकारी संतापला आणि जमलेल्या लोकांना म्हणाला: “काम करण्यासाठी सहा दिवस असतात.+ तेव्हा त्या दिवसांत येऊन तुमचे आजार बरे करून घेत जा, शब्बाथाच्या दिवशी नाही.”+ १५ पण प्रभूने त्याला उत्तर दिलं: “अरे ढोंग्यांनो,+ तुमच्यापैकी प्रत्येक जण शब्बाथाच्या दिवशी आपल्या बैलाला किंवा गाढवाला सोडून त्याला पाणी पाजायला नेत नाही का?+ १६ तर मग, अब्राहामची मुलगी असलेली ही स्त्री, जिला सैतानाने १८ वर्षांपासून बांधून ठेवलं होतं, तिला शब्बाथाच्या दिवशी या बंधनातून मोकळं करणं योग्यच नाही का?” १७ तो असं बोलला तेव्हा त्याचा विरोध करणाऱ्‍या सगळ्यांना लाज वाटली. पण जमलेल्या लोकांना त्याने केलेली अद्‌भुत कार्यं पाहून आनंद झाला.+

१८ तेव्हा तो म्हणाला: “देवाचं राज्य कशासारखं आहे आणि मी त्याची तुलना कशाशी करू? १९ ते एका माणसाने आपल्या शेतात पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखं आहे. तो दाणा वाढून त्याचं झाड झालं आणि आकाशातल्या पक्ष्यांनी त्याच्या फांद्यांत घरटी बांधली.”+

२० मग तो पुन्हा म्हणाला: “देवाच्या राज्याची तुलना मी कशाशी करू? २१ ते अशा खमिरासारखं* आहे, जे एका स्त्रीने तीन मापं* पिठामध्ये घातलं आणि त्यामुळे सगळं पीठ फुगलं.”+

२२ मग तो शहरोशहरी आणि गावोगावी लोकांना शिकवत, यरुशलेमच्या दिशेने पुढे जाऊ लागला. २३ तेव्हा एक माणूस त्याला म्हणाला: “प्रभू, मोजक्याच लोकांचं तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला: २४ “अरुंद दारातून आत जायचा कसोशीने प्रयत्न करा.+ कारण मी तुम्हाला सांगतो, की बरेच जण आत जायचा प्रयत्न करतील पण त्यांना जाता येणार नाही. २५ घरमालकाने उठून दार बंद केल्यानंतर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोठावाल आणि म्हणाल: ‘प्रभू, आमच्यासाठी दार उघड.’+ पण तो तुम्हाला उत्तर देईल: ‘तुम्ही कोण आहात, मला माहीत नाही.’ २६ मग तुम्ही त्याला म्हणाल, ‘आम्ही तुझ्यासोबत खातपीत होतो आणि तू आमच्या मुख्य रस्त्यांवर शिकवायचास.’+ २७ पण तो म्हणेल, ‘मी तुम्हाला ओळखत नाही. अरे अनीतीने वागणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा!’ २८ अब्राहाम, इसहाक, याकोब आणि इतर सगळे संदेष्टे देवाच्या राज्यात आहेत, पण आपल्याला तर बाहेर टाकून देण्यात आलंय, हे तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही रडाल आणि आक्रोश कराल.*+ २९ शिवाय पूर्वेकडून आणि पश्‍चिमेकडून, तसंच उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येतील आणि देवाच्या राज्यात एकाच मेजावर बसून जेवतील. ३० आणि पाहा! जे शेवटचे त्यांच्यापैकी काही पहिले असतील आणि जे पहिले त्यांच्यापैकी काही शेवटचे असतील.”+

३१ तेवढ्यात काही परूशी त्याच्याकडे येऊन म्हणाले: “इथून निघून जा कारण हेरोद तुला मारून टाकणार आहे.” ३२ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, ‘पाहा! मी आज आणि उद्या दुष्ट स्वर्गदूत काढीन आणि लोकांना बरं करीन आणि तिसऱ्‍या दिवशी माझं काम पूर्ण होईल.’ ३३ पण आज, उद्या आणि परवा मला पुढे प्रवास करावा लागेल. कारण कोणत्याही संदेष्ट्याला यरुशलेमच्या बाहेर ठार मारलं जाणं शक्य नाही.*+ ३४ यरुशलेम, यरुशलेम, संदेष्ट्यांची हत्या करणारी आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारी नगरी!+ कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखांखाली एकत्र करते, तसंच तुमच्या मुलांना एकत्र करण्याची माझी कितीतरी वेळा इच्छा होती! पण तुम्हाला ते नको होतं.+ ३५ म्हणून पाहा! देवाने तुमच्या घराचा* त्याग केलाय.+ कारण मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही ‘यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो,’ असं म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही!”+

१४ एकदा, येशू शब्बाथाच्या दिवशी परूश्‍यांच्या एका अधिकाऱ्‍याच्या घरी जेवायला गेला. तिथे लोकांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. २ त्या ठिकाणी जलोदर* नावाचा रोग झालेला एक माणूस त्याच्यासमोर होता. ३ तेव्हा येशूने नियमशास्त्राचे जाणकार आणि परूशी यांना विचारलं: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याला बरं करणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही?”+ ४ पण ते शांतच राहिले. तेव्हा येशूने त्या माणसाला स्पर्श करून बरं केलं आणि त्याला पाठवून दिलं. ५ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यापैकी असा कोण आहे, ज्याचा मुलगा किंवा बैल शब्बाथाच्या दिवशी विहिरीत पडला,+ तर तो त्याला लगेच ओढून बाहेर काढणार नाही?”+ ६ तेव्हा ते त्याला काहीही उत्तर देऊ शकले नाहीत.

७ मग मेजवानीला आलेले लोक बसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या जागा निवडून घेत आहेत, हे पाहून त्याने त्यांना एक उदाहरण सांगितलं.+ तो त्यांना म्हणाला: ८ “कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण दिलं, तर सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन बसू नका.+ कारण, कदाचित तुमच्यापेक्षाही महत्त्वाच्या एखाद्या व्यक्‍तीला मेजवानीला बोलावण्यात आलं असेल. ९ मग ज्याने तुम्हा दोघांनाही आमंत्रण दिलं तो येऊन तुम्हाला म्हणेल, ‘या माणसाला तुझ्या जागेवर बसू दे.’ तेव्हा तुम्हाला लाजेने मान खाली घालून सगळ्यात खालच्या जागेवर जाऊन बसावं लागेल. १० म्हणून, जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलं जातं तेव्हा सगळ्यात खालच्या जागी जाऊन बसा. म्हणजे तुम्हाला आमंत्रण देणारा येऊन म्हणेल, ‘मित्रा, जा तिथे वरती जाऊन बस.’ मग सगळ्या पाहुण्यांच्या देखत तुमचा सन्मान होईल.+ ११ कारण जो स्वतःचा गौरव करतो त्याला नमवलं जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो त्याचा गौरव केला जाईल.”+

१२ त्यानंतर ज्या माणसाने आमंत्रण दिलं होतं त्याला येशू म्हणाला: “जेव्हाही तू दुपारी किंवा संध्याकाळी मेजवानी देशील, तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, नातेवाइकांना किंवा तुझ्या श्रीमंत शेजाऱ्‍यांना बोलावू नकोस. नाहीतर, तेसुद्धा तुला आमंत्रण देतील आणि त्यांनी तुझी परतफेड केल्यासारखं हे होईल. १३ त्याऐवजी, तू मेजवानी देशील तेव्हा जे गरीब, लंगडेलुळे आणि आंधळे आहेत त्यांना आमंत्रण दे.+ १४ म्हणजे तू आनंदी होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नाही. जेव्हा नीतिमान लोकांना मेलेल्यांतून पुन्हा जिवंत केलं जाईल* तेव्हा तुला याचं प्रतिफळ मिळेल.”+

१५ या गोष्टी ऐकून पाहुण्यांपैकी एक जण त्याला म्हणाला: “जो देवाच्या राज्यात मेजवानीला बसेल* तो किती धन्य!”

१६ येशू त्याला म्हणाला: “एका माणसाने संध्याकाळी मोठी मेजवानी ठेवली+ आणि त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिलं. १७ जेवणाच्या वेळी त्याने आमंत्रण दिलेल्या लोकांकडे आपल्या दासाला असा निरोप घेऊन पाठवलं, की ‘चला, सगळी तयारी झाली आहे.’ १८ पण ते सगळे निमित्तं सांगू लागले.+ पहिला म्हणाला, ‘मी एक शेत विकत घेतलंय आणि मला ते पाहायला जायचंय. कृपा करून, मला माफ कर.’ १९ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत आणि त्या व्यवस्थित आहेत की नाही याची खातरी करायला मला जायचंय. कृपा करून मला माफ कर.’+ २० आणखी एक जण म्हणाला, ‘माझं नुकतंच लग्न झालंय आणि त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’ २१ मग दासाने परत येऊन मालकाला हे सगळं सांगितलं. तेव्हा मालकाला राग आला आणि तो आपल्या दासाला म्हणाला, ‘लगेच जा आणि शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत जाऊन जे गरीब, लंगडेलुळे आणि आंधळे दिसतील त्यांना इथे घेऊन ये.’ २२ परत आल्यावर तो दास म्हणाला, ‘मालक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालंय, पण अजूनही जागा शिल्लक आहे.’ २३ तेव्हा मालक दासाला म्हणाला, ‘रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये जा आणि लोकांना आग्रह करून घेऊन ये म्हणजे माझं घर भरून जाईल.+ २४ कारण मी तुम्हाला सांगतो, आमंत्रण दिलेल्यांपैकी एकालाही माझ्या मेजवानीतलं काही चाखायला मिळणार नाही.’”+

२५ एकदा त्याच्याबरोबर मोठ्या संख्येने लोक जात होते. तेव्हा तो वळून त्यांना म्हणाला: २६ “जर कोणी माझ्याकडे येतो, पण आपले वडील, आई, बायको, मुलं, भाऊ आणि बहिणी यांचा, इतकंच काय तर स्वतःचाही* द्वेष* करत नाही,+ तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.+ २७ जो आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही.+ २८ उदाहरणार्थ, तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याला एक बुरूज बांधायचा असेल, तर तो आधी बसून खर्चाचा हिशोब लावणार नाही? आणि तो पूर्ण करायची आपली ऐपत आहे की नाही याची खातरी करणार नाही? २९ नाहीतर पाया घातल्यावर त्याला बांधकाम पूर्ण करता येणार नाही आणि लोक त्याची थट्टा करू लागतील. ३० ते म्हणतील: ‘या माणसाने बांधकाम तर सुरू केलं, पण याला ते पूर्ण करता आलं नाही.’ ३१ किंवा असा कोणता राजा असेल, जो लढाईत दुसऱ्‍या राजाचा सामना करायला जाताना आधी बसून विचार करणार नाही? मी आपल्या १०,००० सैनिकांच्या मदतीने त्याच्या २०,००० सैनिकांचा सामना करू शकेन का, असा तो नक्कीच विचार करेल. ३२ आणि जर त्याला सामना करणं शक्य नसेल, तर दुसरा राजा दूर असतानाच तो त्याच्याकडे आपले राजदूत पाठवून समेट करायचा प्रयत्न करेल. ३३ त्याच प्रकारे, तुमच्यापैकी जो आपल्या सगळ्या संपत्तीकडे पाठ फिरवत नाही* तो माझा शिष्य होऊ शकत नाही.+

३४ मीठ नक्कीच चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याची चव कशाने आणता येईल?+ ३५ ते जमिनीसाठी किंवा खतासाठी उपयोगी राहणार नाही आणि लोक ते फेकून देतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+

१५ आता सगळे जकातदार आणि पापी लोक येशूचं ऐकायला त्याच्याभोवती गर्दी करू लागले.+ २ तेव्हा परूशी आणि शास्त्री अशी कुरकुर करू लागले: “हा माणूस पापी लोकांना जवळ करतो आणि त्यांच्यासोबत बसून जेवतो.” ३ मग त्याने त्यांना एक उदाहरण सांगितलं. तो म्हणाला: ४ “तुमच्यापैकी असा कोण आहे, ज्याच्या १०० मेंढरांपैकी एक हरवलं, तर तो ९९ मेंढरांना रानात सोडून ते हरवलेलं मेंढरू शोधायला जाणार नाही आणि ते सापडेपर्यंत त्याचा शोध घेणार नाही?+ ५ ते सापडल्यावर त्याला खूप आनंद होतो आणि तो त्याला खांद्यावर घेतो. ६ मग घरी गेल्यावर तो आपल्या मित्रांना आणि शेजाऱ्‍यांना बोलावून म्हणतो, ‘माझ्यासोबत आनंद साजरा करा कारण माझं हरवलेलं मेंढरू मला सापडलंय.’+ ७ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, की ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा ९९ नीतिमान माणसांपेक्षा, पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात जास्त आनंद व्यक्‍त केला जाईल.+

८ किंवा मग अशी कोणती स्त्री असेल जिच्या दहा चांदीच्या नाण्यांपैकी* एक हरवलं, तर ती दिवा लावून आपलं घर झाडणार नाही आणि ते सापडेपर्यंत मन लावून त्याचा शोध घेणार नाही? ९ नाणं सापडल्यावर ती आपल्या मैत्रिणींना आणि शेजाऱ्‍यांना बोलावून म्हणते, ‘माझ्यासोबत आनंद साजरा करा कारण माझं हरवलेलं नाणं* मला सापडलंय.’ १० त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, की पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांमध्ये असाच आनंद व्यक्‍त केला जातो.”+

११ मग तो म्हणाला: “एका माणसाला दोन मुलं होती. १२ त्यांपैकी धाकटा मुलगा एकदा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, माझ्या वाट्याची मालमत्ता मला द्या.’ त्यामुळे त्या माणसाने आपल्या मालमत्तेची त्यांच्यात वाटणी केली. १३ काही दिवसांनी त्या धाकट्या मुलाने आपल्या हक्काचं सगळं काही गोळा केलं आणि तो एका दूर देशी निघून गेला. तिथे त्याने आपली सगळी संपत्ती ऐशआरामात उधळून टाकली. १४ त्याने सगळी संपत्ती उधळून टाकल्यावर त्या संपूर्ण देशात भयंकर दुष्काळ पडला आणि त्याच्याजवळ काहीच उरलं नाही. १५ शेवटी तो त्या देशातल्या एका माणसाकडे काम करायला गेला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरं+ चारण्यासाठी पाठवलं. १६ तेव्हा डुकरं खात असलेल्या शेंगा खाऊन पोट भरायची त्याला फार इच्छा व्हायची. पण, कोणीही त्याला काही खायला देत नव्हतं.

१७ तो भानावर आला तेव्हा मनात विचार करू लागला, ‘माझ्या वडिलांकडे काम करणारे मजूरसुद्धा पोटभर भाकर खातात आणि मी इथे उपाशी मरतोय! १८ मी आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणीन: “बाबा, मी देवाविरुद्ध* आणि तुमच्याविरुद्ध पाप केलंय. १९ तुमचा मुलगा म्हणवून घ्यायची आता माझी लायकी राहिली नाही. मला मजूर म्हणून ठेवून घ्या.”’ २० मग तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं आणि त्यांना त्याचा कळवळा आला. त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली* आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले. २१ तेव्हा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मी देवाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केलंय.+ तुमचा मुलगा म्हणवून घ्यायची आता माझी लायकी राहिली नाही.’ २२ पण वडील नोकरांना म्हणाले, ‘लवकर जा! आणि सगळ्यात चांगला झगा आणून याला घाला. आणि याच्या हातात अंगठी आणि पायांत जोडे घाला. २३ एक धष्टपुष्ट वासरू आणून ते कापा, म्हणजे आपण सगळे मिळून खाऊ-पिऊ आणि आनंद साजरा करू. २४ कारण माझा हा मुलगा मेला होता पण तो पुन्हा जिवंत झालाय.+ तो हरवला होता आणि आता सापडलाय.’ तेव्हा ते सगळे आनंद साजरा करू लागले.

२५ आतापर्यंत त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो शेतातून परत आला तेव्हा घराजवळ येताच त्याला नाच-गाण्याचा आवाज ऐकू आला. २६ म्हणून त्याने नोकरांपैकी एकाला बोलावून काय चाललं आहे याबद्दल विचारलं. २७ तो त्याला म्हणाला, ‘तुझा भाऊ आलाय आणि तुझ्या वडिलांनी आपला मुलगा सुखरूप* परत आला, म्हणून धष्टपुष्ट वासरू कापलंय.’ २८ पण मोठ्या भावाला याचा राग आला आणि तो घरात जायला तयार होईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याची समजूत घालू लागले. २९ तो आपल्या वडिलांना म्हणाला, ‘मी इतक्या वर्षांपासून तुमच्यासाठी राबलो आणि एकदाही तुमचा शब्द टाळला नाही. पण आजपर्यंत तुम्ही मला माझ्या मित्रांसोबत मौजमजा करायला साधं कोकरूसुद्धा दिलं नाही. ३० पण वेश्‍यांसोबत तुमची संपत्ती उधळणारा* हा तुमचा मुलगा परत येताच तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापलं.’ ३१ तेव्हा वडील मुलाला म्हणाले, ‘बेटा, तू तर नेहमीच माझ्यासोबत राहिला आहेस आणि माझं जे काही आहे ते तुझंच आहे. ३२ पण तुझा भाऊ मेला होता आणि पुन्हा जिवंत झालाय. तो हरवला होता आणि आता सापडलाय. मग आपण त्याच्यासाठी आनंद साजरा करायला नको का?’”

१६ मग येशू आपल्या शिष्यांना असंही म्हणाला: “एका श्रीमंत माणसाचा एक कारभारी* होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो, असं श्रीमंत माणसाला सांगण्यात आलं. २ त्यामुळे तो त्याला बोलावून म्हणाला, ‘हे मी तुझ्याबद्दल काय ऐकतोय? आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण आता तू माझ्या घराची व्यवस्था पाहायला योग्य नाहीस.’ ३ तेव्हा कारभारी मनात विचार करू लागला, ‘मालक तर मला कारभाऱ्‍याच्या पदावरून काढून टाकणार आहे, आता मी काय करू? शेतात कष्ट करण्याइतकी ताकद माझ्यात नाही आणि भीक मागायची मला लाज वाटते. ४ हो, आता मला सुचलं मी काय करायला हवं! कारभाऱ्‍याच्या पदावरून काढून टाकल्यावर, लोकांनी मला आपल्या घरांत घ्यावं म्हणून मी असं करतो . . . . ’ ५ मग त्याने आपल्या मालकाच्या सगळ्या कर्जदारांना बोलावलं. तो पहिल्या कर्जदाराला म्हणाला, ‘माझ्या मालकाचं तुझ्यावर किती कर्ज आहे?’ ६ तो म्हणाला, ‘१०० मापं* जैतुनाचं तेल.’ तो त्याला म्हणाला, ‘हे घे तुझं करारपत्र आणि लवकर बसून त्यावर ५० मापं असं लिही.’ ७ मग तो आणखी एकाला म्हणाला, ‘तुझ्यावर किती कर्ज आहे?’ तो म्हणाला, ‘१०० मोठी मापं* गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हे घे तुझं करारपत्र आणि त्यावर ८० मापं असं लिही.’ ८ तेव्हा तो कारभारी अनीतिमान असूनही, त्याने व्यावहारिक बुद्धीचा वापर केल्यामुळे* त्याच्या मालकाने त्याची प्रशंसा केली. कारण इतर लोकांशी व्यवहार करण्यात, या जगाच्या व्यवस्थेची* मुलं प्रकाशाच्या मुलांपेक्षा+ जास्त बुद्धिमान आहेत.

९ मी तुम्हाला हेही सांगतो: अनीतिमान धनाने आपल्यासाठी मित्र बनवा,+ म्हणजे हे धन नष्ट झाल्यावर ते मित्र तुम्हाला सर्वकाळाच्या निवासस्थानांत घेतील.+ १० जो सगळ्यात लहान गोष्टीत विश्‍वासू असतो, तो मोठ्या गोष्टींतही विश्‍वासू असतो. आणि जो सगळ्यात लहान गोष्टीत अनीतिमान असतो तो मोठ्या गोष्टींतही अनीतिमान असतो. ११ म्हणून, जर तुम्ही अनीतिमान धनाच्या बाबतीत विश्‍वासू असल्याचं दाखवून दिलं नसेल, तर मग जे खरं धन आहे ते तुमच्याकडे कोण सोपवेल? १२ आणि दुसऱ्‍याच्या मालकीचं जे आहे त्या बाबतीत जर तुम्ही विश्‍वासू असल्याचं दाखवून दिलं नसेल, तर मग जे तुमच्यासाठी राखून ठेवलंय ते तुम्हाला कोण देईल?+ १३ कोणताही सेवक दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांच्यापैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल किंवा एकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.”+

१४ पैशाचा लोभ असलेले परूशी या सगळ्या गोष्टी ऐकत होते आणि ते त्याची थट्टा करू लागले.+ १५ म्हणून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माणसांपुढे स्वतःला नीतिमान ठरवता,+ पण देव तुमची अंतःकरणं ओळखतो.+ कारण माणसांना ज्या गोष्टी मोठेपणाच्या वाटतात त्या देवाच्या दृष्टीने तुच्छ आहेत.+

१६ नियमशास्त्रातल्या आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांतल्या गोष्टी योहानच्या काळापर्यंत होत्या. तेव्हापासून देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला जातोय आणि प्रत्येक जण त्या राज्यात जायचा प्रयत्न करतोय.+ १७ एकवेळ आकाश आणि पृथ्वीही नाहीशी होईल, पण नियमशास्त्रातलं एकही अक्षर किंवा अक्षरातली एक रेषसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.+

१८ जो आपल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसऱ्‍या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणि जो अशा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.+

१९ एक श्रीमंत माणूस होता. तो जांभळे आणि महागाचे कपडे* घालायचा आणि दररोज अगदी ऐशआरामात राहायचा. २० पण त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाच्या एका भिकाऱ्‍याला आणून ठेवलं जायचं. त्या भिकाऱ्‍याच्या संपूर्ण शरीरावर फोड होते. २१ आणि श्रीमंत माणसाच्या मेजावरून पडणाऱ्‍या तुकड्यांतून आपल्याला काही मिळेल, अशी तो भिकारी आस लावून बसायचा. आणि कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे. २२ काही काळाने असं झालं की तो भिकारी मेला आणि स्वर्गदूतांनी त्याला अब्राहामच्या जवळ* नेलं.

मग श्रीमंत माणूसही मेला आणि त्याला पुरण्यात आलं. २३ तो कबरेत* तळमळत असताना त्याने डोळे वर करून पाहिलं, तेव्हा खूप दूर अंतरावर त्याला अब्राहाम दिसला आणि त्याच्याजवळ* लाजरही दिसला. २४ म्हणून तो हाक मारून म्हणाला, ‘हे पित्या, अब्राहाम! माझ्यावर दया कर आणि लाजरने आपल्या बोटाचं टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी म्हणून त्याला माझ्याकडे पाठव! कारण मी या धगधगत्या आगीत तडफडतोय.’ २५ पण अब्राहाम म्हणाला: ‘मुला, तू आपल्या आयुष्यात बऱ्‍याच चांगल्या गोष्टी उपभोगल्या, पण लाजरच्या वाट्याला दुःखंच आली. आता त्याला इथे विश्रांती मिळाली आहे पण तू तडफडत आहेस. २६ शिवाय, आमच्यात आणि तुमच्यात एक मोठी दरी तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ज्यांना इथून तिथे जायचंय ते जाऊ शकत नाहीत आणि तिथूनही लोक इथे येऊ शकत नाहीत.’ २७ तेव्हा श्रीमंत माणूस म्हणाला, ‘असं असेल, तर हे पित्या, त्याला माझ्या वडिलांच्या घरी पाठव अशी मी विनंती करतो. २८ कारण मला पाच भाऊ आहेत आणि त्याने त्यांना चांगल्या प्रकारे सगळं समजावून सांगितलं, तर त्यांना या ठिकाणी येऊन तडफडावं लागणार नाही.’ २९ पण अब्राहाम म्हणाला, ‘त्यांच्याजवळ मोशेची आणि संदेष्ट्यांची वचनं आहेत. त्यांनी त्यांचं ऐकावं.’+ ३० पण तो म्हणाला, ‘नाही पित्या अब्राहाम, जर मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेलं तर ते पश्‍चात्ताप करतील.’ ३१ तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, ‘जर ते मोशेचं आणि संदेष्ट्यांचं ऐकत नाहीत,+ तर कोणी मेलेल्यांमधून उठून त्यांच्याकडे गेलं तरी ते विश्‍वास ठेवणार नाहीत.’”

१७ मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “अडखळणं तर नक्कीच येतील. पण ज्या माणसाद्वारे अडखळणं येतात त्याचा धिक्कार असो! २ या लहानांपैकी एकालाही त्याने अडखळायला लावावं, यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याचा दगड बांधून त्याला समुद्रात टाकून दिलं जावं, हेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.+ ३ स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने पाप केलं, तर त्याची कानउघाडणी कर+ आणि त्याने पश्‍चात्ताप केला, तर त्याला क्षमा कर.+ ४ त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केलं आणि सात वेळा तुझ्याकडे येऊन, ‘मला क्षमा कर’ असं म्हटलं, तर तू त्याला क्षमा केली पाहिजे.”+

५ मग प्रेषित प्रभूला म्हणाले: “आमचा विश्‍वास वाढव.”+ ६ तेव्हा प्रभू म्हणाला: “जर तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याइतका विश्‍वास असला, तर तुम्ही या झाडाला* ‘इथून उपटून समुद्रात लावलं जा’ असं म्हणाल आणि ते तुमचं ऐकेल.+

७ तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याचा दास नांगरणी करून किंवा मेंढरांना चारून परत आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लगेच इकडे ये आणि जेवायला बस?’ ८ उलट, तो असं म्हणणार नाही का, की ‘माझ्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर आणि माझं खाणंपिणं होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खाऊपिऊ शकतोस’? ९ आणि सांगितलेली कामं केल्याबद्दल तो दासाचे उपकारही मानणार नाही, मानेल का? १० त्याच प्रकारे, तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्यावर असं म्हणा: ‘आम्ही फक्‍त दास आहोत आणि आमची काहीच लायकी नाही. आम्ही जे काही केलं ते आमचं कर्तव्यच होतं.’”+

११ यरुशलेमला प्रवास करताना येशू शोमरोन आणि गालीलच्या सीमेवरून जात होता. १२ एका गावात जात असताना त्याला दहा कुष्ठरोगी भेटले, पण ते त्याच्यापासून दूरच उभे राहिले.+ १३ आणि ते मोठमोठ्याने म्हणू लागले: “हे गुरू, येशू, आमच्यावर दया कर!” १४ त्यांना पाहून येशू म्हणाला: “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.”+ मग ते तिथून जात असताना शुद्ध झाले.+ १५ आपण बरे झालो आहोत हे पाहून त्यांच्यापैकी एक जण परत आला आणि मोठ्याने देवाची स्तुती करू लागला. १६ आणि येशूसमोर पालथा पडून त्याने त्याचे उपकार मानले; खरंतर हा माणूस शोमरोनी होता.+ १७ तेव्हा येशू म्हणाला: “दहाचे दहा शुद्ध झाले नव्हते का? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? १८ देवाचा गौरव करण्यासाठी या विदेशी माणसाशिवाय आणखी कोणीही परत आलं नाही का?” १९ मग तो त्याला म्हणाला: “ऊठ आणि आपल्या मार्गाने जा. तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलंय.”+

२० देवाचं राज्य केव्हा येईल असं परूश्‍यांनी त्याला विचारलं,+ तेव्हा त्याने उत्तर दिलं: “देवाचं राज्य सगळ्यांच्या लक्षात येईल इतक्या उघडपणे येणार नाही. २१ किंवा, ‘पाहा, ते इथे आहे!’ किंवा ‘तिथे आहे!’ असं लोक म्हणणार नाहीत. कारण देवाचं राज्य खरंतर तुमच्यामध्ये आहे.”+

२२ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “असे दिवस येत आहेत, जेव्हा मनुष्याच्या मुलाच्या काळातला एक दिवस पाहायची तुमची इच्छा होईल, पण तो तुम्हाला पाहता येणार नाही. २३ आणि लोक तुम्हाला म्हणतील, ‘पाहा, तो इथे आहे!’ किंवा ‘तिथे आहे!’ पण, त्यांच्यामागे जाऊ नका आणि त्यांच्या नादी लागू नका.+ २४ कारण वीज जशी आकाशाच्या एका टोकापासून चमकून दुसऱ्‍या टोकापर्यंत चकाकत जाते, तसंच मनुष्याचा मुलगा+ प्रकट होण्याच्या दिवशी घडेल.+ २५ पण आधी त्याला बरीच दुःखं सहन करावी लागतील आणि ही पिढी त्याला नाकारेल.+ २६ शिवाय, नोहाच्या दिवसांत जसं घडलं+ तसंच मनुष्याच्या मुलाच्या दिवसांतही घडेल.+ २७ कारण नोहा जहाजात* गेला+ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते आणि लग्नं करत होते. मग जलप्रलय आला आणि सगळे त्यात वाहून गेले.+ २८ त्याच प्रकारे, लोटच्या दिवसांत घडलं+ तसंच त्या वेळी घडेल. त्या वेळीही लोक खातपीत होते, खरेदी-विक्री करत होते, शेतांत पेरणी करत होते आणि घरं बांधत होते. २९ पण लोट सदोममधून बाहेर गेला त्या दिवशी आकाशातून आगीचा आणि गंधकाचा वर्षाव झाला आणि त्या सगळ्यांचा नाश झाला.+ ३० मनुष्याचा मुलगा प्रकट होण्याच्या दिवशीही असंच घडेल.+

३१ त्या दिवशी एखादा माणूस घराच्या छतावर असेल आणि त्याच्या वस्तू घरात असतील, तर त्याने त्या घ्यायला खाली येऊ नये. त्याच प्रकारे, शेतात असलेल्या माणसानेही मागे राहिलेल्या वस्तूंसाठी परत येऊ नये. ३२ लोटच्या बायकोला लक्षात ठेवा.+ ३३ जो आपला जीव सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतो तो त्याला गमावेल, पण जो आपला जीव गमावतो तो त्याला सुरक्षित ठेवेल.+ ३४ मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री जर दोन जण एकाच बिछान्यावर झोपलेले असतील, तर एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्‍याला सोडून दिलं जाईल.+ ३५ दोन बायका जर एकाच जात्यावर दळत असतील, तर एकीला घेतलं जाईल आणि दुसरीला सोडून दिलं जाईल.” ३६ *​—— ३७ हे ऐकून ते त्याला म्हणाले: “कुठे प्रभू?” तो त्यांना म्हणाला: “जिथे प्रेत आहे तिथेच गिधाडं जमतील.”+

१८ मग, सतत प्रार्थना करत राहण्याच्या आणि धीर न सोडण्याच्या+ गरजेबद्दल सांगण्यासाठी येशूने त्यांना एक उदाहरण दिलं. २ तो म्हणाला: “एका शहरात एक न्यायाधीश होता. त्याला ना देवाची भीती होती, ना लोकांची पर्वा. ३ त्याच शहरात एक विधवाही होती. ती सारखीसारखी त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणायची, ‘माझ्याविरुद्ध खटला भरणाऱ्‍यापासून मला वाचवा. कसंही करून मला न्याय मिळवून द्या.’ ४ काही काळापर्यंत तो न्यायाधीश तयार झाला नाही. पण नंतर तो मनात म्हणाला, ‘मला देवाची भीती नाही आणि लोकांचीही पर्वा नाही. ५ तरीपण, ही विधवा सारखीसारखी मला त्रास देत असल्यामुळे मी तिला न्याय मिळवून देईन. म्हणजे ती पुन्हा पुन्हा येऊन मला बेजार करणार नाही.’”+ ६ मग प्रभू म्हणाला: “तो न्यायाधीश अनीतिमान असूनही काय म्हणाला, याकडे लक्ष द्या! ७ तर मग, देवसुद्धा रात्रंदिवस त्याच्याकडे मदतीची याचना करणाऱ्‍या त्याच्या निवडलेल्या लोकांना न्याय मिळवून देणार नाही का?+ तो त्यांच्याशी धीराने वागत असला, तरी तो नक्कीच त्यांचं ऐकेल.+ ८ मी तुम्हाला सांगतो, तो लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून देईल. पण, मनुष्याचा मुलगा येईल, तेव्हा त्याला खरंच पृथ्वीवर अशा प्रकारचा विश्‍वास* दिसून येईल का?”

९ ज्यांना स्वतःच्या नीतिमत्त्वावर फार भरवसा होता आणि जे इतरांना अगदीच तुच्छ लेखायचे, त्यांना त्याने हे उदाहरणही सांगितलं: १० “दोन माणसं वर मंदिरात प्रार्थना करायला गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार. ११ परूशी उभा राहून मनातल्या मनात अशी प्रार्थना करू लागला, ‘हे देवा, इतर लोक लुबाडणारे, अनीतिमान आणि व्यभिचारी आहेत. पण मी तुझे आभार मानतो, की मी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही नाही. १२ मी आठवड्यातून दोन वेळा उपास करतो आणि माझ्या सगळ्या मिळकतीचा दहावा भागही देतो.’+ १३ पण काही अंतरावर उभा असलेला जकातदार मान वर करून आकाशाकडे पाहायलाही घाबरत होता. तो पुन्हा पुन्हा छाती बडवून म्हणत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’*+ १४ मी तुम्हाला सांगतो, हा माणूस त्या परूश्‍यापेक्षाही जास्त नीतिमान ठरला.+ कारण जो स्वतःचा गौरव करतो त्याला नमवलं जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो त्याचा गौरव केला जाईल.”+

१५ मग येशूने आपल्या लहान* मुलांवर हात ठेवावा, म्हणून लोक त्यांना त्याच्याजवळ आणू लागले. हे पाहून शिष्य त्यांना रागावले.+ १६ पण येशू मुलांना आपल्याजवळ बोलावून म्हणाला: “मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. कारण देवाचं राज्य अशांचंच आहे.+ १७ मी तुम्हाला खरं सांगतो, जो एखाद्या लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही, तो त्यात कधीच जाऊ शकणार नाही.”+

१८ तेव्हा एका अधिकाऱ्‍याने त्याला असं विचारलं: “हे उत्तम गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?”+ १९ येशू त्याला म्हणाला: “मला उत्तम का म्हणतोस? कारण देवाशिवाय कोणीही उत्तम नाही.+ २० तुला तर आज्ञा माहीतच आहेत: ‘व्यभिचार करू नका,+ खून करू नका,+ चोरी करू नका,+ खोटी साक्ष देऊ नका,+ फसवणूक करू नका आणि आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा.’”+ २१ तेव्हा तो म्हणाला: “गुरू, या सगळ्या आज्ञा तर मी लहानपणापासूनच पाळतो.” २२ हे ऐकून येशू त्याला म्हणाला, “तुझ्यात अजूनही एका गोष्टीची कमी आहे. म्हणून जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून गरिबांमध्ये वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि ये, माझा शिष्य हो.”+ २३ हे ऐकून त्याला फार दुःख झालं, कारण तो खूप श्रीमंत होता.+

२४ येशू त्याच्याकडे पाहून म्हणाला: “ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना देवाच्या राज्यात जाणं किती कठीण जाईल!+ २५ श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात जाण्यापेक्षा, एका उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.”+ २६ हे ऐकून लोक म्हणाले: “तर मग, कोणाचं तारण होणं शक्य आहे?”+ २७ तो म्हणाला: “माणसांना जे अशक्य आहे, ते देवाला शक्य आहे.”+ २८ पण पेत्र म्हणाला: “बघ! आम्ही सगळं काही सोडून तुझ्यामागे आलो आहोत.”+ २९ तेव्हा तो शिष्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, देवाच्या राज्यासाठी ज्यांनी घरदार, बायको, भाऊ, आईवडील किंवा मुलंबाळं सोडून दिली आहेत,+ ३० त्यांच्यापैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात कित्येक पटींनी हे सगळं आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत* सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.”+

३१ मग येशू आपल्या १२ शिष्यांना बाजूला घेऊन म्हणाला: “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या मुलाबद्दल संदेष्ट्यांनी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत.+ ३२ त्याला विदेश्‍यांच्या हाती सोपवलं जाईल+ आणि ते त्याची थट्टा करतील.+ ते त्याचा अपमान करतील आणि त्याच्यावर थुंकतील.+ ३३ मग त्याला फटके मारल्यावर ते त्याला ठार मारतील.+ पण तिसऱ्‍या दिवशी तो पुन्हा उठेल.”+ ३४ शिष्यांना यांपैकी कोणत्याही गोष्टीचा अर्थ समजला नाही, कारण ही वचनं त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्याने सांगितलेल्या या गोष्टी त्यांना कळल्या नाहीत.

३५ मग येशू यरीहो शहराजवळ आला तेव्हा एक आंधळा माणूस रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होता.+ ३६ गर्दीतल्या लोकांचा आवाज ऐकून, काय चाललं आहे असं तो विचारू लागला. ३७ त्यांनी त्याला सांगितलं: “नासरेथकर येशू येतोय!” ३८ तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे येशू, दावीदच्या मुला, माझ्यावर दया कर!” ३९ तेव्हा पुढे जाणारे लोक त्याला दटावून गप्प राहायला सांगू लागले. पण तो आणखीनच मोठ्याने ओरडू लागला: “हे दावीदच्या मुला, माझ्यावर दया कर!” ४० तेव्हा येशू थांबला आणि त्याने त्या माणसाला आपल्याजवळ आणायची आज्ञा दिली. तो आला तेव्हा येशूने त्याला विचारलं: ४१ “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला: “प्रभू, माझी दृष्टी परत येऊ दे.” ४२ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “तुझी दृष्टी परत येवो. तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलंय.”+ ४३ आणि त्याच क्षणी त्याची दृष्टी परत आली आणि तो देवाचा गौरव करत येशूच्या मागे चालू लागला.+ हे पाहून सगळे लोकही देवाची स्तुती करू लागले.+

१९ मग एकदा येशू यरीहो शहरातून जात होता. २ तिथे जक्कय नावाचा श्रीमंत माणूस होता. तो एक प्रमुख जकातदार होता. ३ हा येशू आहे तरी कोण, हे पाहायचा तो प्रयत्न करत होता. पण गर्दीमुळे त्याला दिसत नव्हतं कारण तो बुटका होता. ४ येशू त्या रस्त्याने जाणार असल्यामुळे त्याला पाहायला तो पुढे धावत जाऊन एका उंबराच्या झाडावर चढला. ५ येशू तिथे आला तेव्हा त्याने वर पाहिलं आणि तो त्याला म्हणाला: “जक्कय, लवकर खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी येणार आहे.” ६ तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने खूप आनंदाने येशूचं आपल्या घरी स्वागत केलं. ७ लोकांनी हे पाहिलं तेव्हा ते सगळे अशी कुरकुर करू लागले: “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणचाराला गेला!”+ ८ पण जक्कय उभा राहिला आणि प्रभूला म्हणाला: “प्रभू, पाहा! मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतोय. आणि ज्या कोणाकडून मी काही लुबाडलं* असेल, त्याला मी चौपट परत करतोय.”+ ९ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “आज देवाने या माणसाचं आणि त्याच्या घराण्याचं तारण केलंय. कारण हासुद्धा अब्राहामचा मुलगा आहे. १० हरवलेल्यांना शोधायला आणि त्यांचं तारण करायलाच मनुष्याचा मुलगा आलाय.”+

११ ते या गोष्टी ऐकत होते, तेव्हा त्याने आणखी एक उदाहरण सांगितलं. तो यरुशलेमजवळ असल्यामुळे आणि देवाचं राज्य लगेचच प्रकट होणार आहे असा त्यांचा समज असल्यामुळे+ त्याने हे उदाहरण सांगितलं. १२ तो म्हणाला: “एक राजघराण्यातला माणूस होता. तो राज्याचा अधिकार मिळवून परत येण्याच्या उद्देशाने एका दूर देशी गेला.+ १३ जाण्याआधी त्याने आपल्या दासांपैकी दहा जणांना जवळ बोलावून, त्यांना दहा चांदीची नाणी* दिली आणि असं सांगितलं, ‘मी परत येईपर्यंत यांवर व्यापार करा.’+ १४ पण त्याच्या देशाचे लोक त्याचा द्वेष करायचे. म्हणून त्यांनी त्याच्यामागे राजदूतांना असं सांगून पाठवलं, की ‘हा माणूस आमचा राजा व्हावा अशी आमची इच्छा नाही.’

१५ नंतर जेव्हा तो राज्याधिकार* मिळवून परत आला तेव्हा ज्यांना पैसे* दिले होते, त्या दासांना त्याने बोलावलं. त्यांनी व्यापारातून कमवलेल्या पैशांचा त्याला हिशोब मागायचा होता.+ १६ तेव्हा, पहिला दास पुढे येऊन म्हणाला, ‘प्रभू, तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली.’+ १७ तो त्याला म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या दासा! अगदी लहानशा गोष्टीत तू आपला विश्‍वासूपणा सिद्ध करून दाखवलास. म्हणून मी तुला दहा शहरांवर अधिकार देतो.’+ १८ मग दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘प्रभू, तुमच्या नाण्यावर मी आणखी पाच नाणी कमवली.’+ १९ तेव्हा त्यालाही तो म्हणाला, ‘तुलाही मी पाच शहरांवर अधिकार देतो.’ २० पण आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘प्रभू, हे घ्या तुमचं नाणं. मी ते कापडात गुंडाळून लपवून ठेवलं होतं. २१ खरं सांगायचं तर, मला तुमची भीती वाटत होती. कारण तुम्ही कठोर आहात. तुम्ही जमा केले नव्हते असे पैसे काढता, आणि जे तुम्ही पेरलं नव्हतं त्याची कापणी करता.’+ २२ तेव्हा तो माणूस त्या दासाला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांनी तुझा न्याय करतो. तुला माहीत होतं ना, की मी कठोर आहे, आणि मी जमा केले नव्हते असे पैसे काढतो आणि जे पेरलं नव्हतं त्याची कापणी करतो?+ २३ मग तू माझे पैसे* सावकाराकडे का ठेवले नाहीस? म्हणजे परत आल्यावर मला ते व्याजासकट मिळाले असते.’

२४ तेव्हा तिथे उभे असलेल्यांना तो म्हणाला, ‘याच्याकडून ते नाणं घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत त्याला द्या.’+ २५ पण ते त्याला म्हणाले, ‘प्रभू, त्याच्याजवळ तर आधीच दहा नाणी आहेत . . . . ’ २६ ‘मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल. पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.+ २७ आणि मी राजा होऊ नये असं ज्या माझ्या शत्रूंना वाटत होतं, त्यांना माझ्यापुढे हजर करा आणि माझ्यासमोर त्यांना मृत्युदंड द्या.’”

२८ या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेमकडे निघून गेला. २९ मग जेव्हा तो जैतुनांच्या डोंगराजवळच्या+ बेथफगे आणि बेथानी या गावांजवळ आला, तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना पुढे पाठवलं+ ३० आणि म्हटलं: “समोरच्या गावात जा आणि तिथे जाताच तुम्हाला गाढवाचं एक पिल्लू बांधलेलं दिसेल. त्याच्यावर आतापर्यंत कोणी बसलेलं नाही. त्याला सोडवून इकडे आणा. ३१ आणि जर कोणी तुम्हाला विचारलं, की ‘त्याला का सोडता?’ तर म्हणा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’” ३२ तेव्हा ज्यांना पाठवण्यात आलं होतं, ते गेले आणि येशूने जसं सांगितलं होतं अगदी तसंच त्यांना दिसलं.+ ३३ ते गाढवाच्या पिल्लाला सोडत असताना त्याचे मालक त्यांना म्हणाले: “तुम्ही गाढवाच्या पिल्लाला का सोडताय?” ३४ ते म्हणाले: “प्रभूला याची गरज आहे.” ३५ मग त्यांनी गाढवाच्या पिल्लाला येशूजवळ आणलं आणि आपली बाहेरची वस्त्रं त्याच्यावर टाकून येशूला त्याच्यावर बसवलं.+

३६ तो पुढे जात असताना लोक आपली बाहेरची वस्त्रं रस्त्यावर पसरवू लागले.+ ३७ मग तो जैतुनांच्या डोंगरावरून खाली जाणाऱ्‍या रस्त्याजवळ पोहोचताच शिष्यांचा पूर्ण समुदाय आनंदाने जयजयकार करू लागला. तसंच, जी महान कार्यं त्यांनी पाहिली होती, त्यांबद्दल ते मोठ्याने देवाची अशी स्तुती करू लागले: ३८ “यहोवाच्या* नावाने येणारा राजा आशीर्वादित असो! स्वर्गात शांती असो आणि स्वर्गात राहणाऱ्‍या देवाला गौरव मिळो!”+ ३९ पण गर्दीतून परूश्‍यांपैकी काही जण त्याला म्हणू लागले: “गुरुजी, तुमच्या शिष्यांना शांत राहायला सांगा.”+ ४० पण तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगतो, जर हे शांत राहिले तर दगड ओरडतील.”

४१ मग शहराजवळ आल्यावर त्याने त्यावर नजर टाकली आणि तो रडू लागला.+ ४२ तो म्हणाला: “तू, हो तू जर आज शांतीच्या गोष्टी समजून घेतल्या असत्या, तर किती बरं झालं असतं! पण आता त्या तुझ्यापासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.+ ४३ कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा तुझे शत्रू तुझ्याभोवती टोकदार खांबांची भिंत उभारतील. ते तुला वेढतील आणि सगळ्या बाजूंनी तुला अडवतील.*+ ४४ ते तुला जमीनदोस्त करतील आणि तुझ्या मुलाबाळांना चिरडून टाकतील+ आणि तुझ्यात एकाही दगडावर दगड राहणार नाही.+ कारण तुझा न्याय* करायची वेळ तू ओळखली नाही.”

४५ मग तो मंदिरात आला आणि त्याने तिथल्या विक्रेत्यांना हाकलून लावलं.+ ४६ तो त्यांना म्हणाला: “‘माझ्या मंदिराला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलंय.+ पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”+

४७ तो दररोज मंदिरात जाऊन शिकवत राहिला. पण मुख्य याजक, शास्त्री आणि लोकांचे नेते त्याला ठार मारायचा मार्ग शोधत होते.+ ४८ पण ते कसं करावं हे त्यांना सुचत नव्हतं. कारण सगळे लोक त्याचं ऐकायला सतत त्याच्या आजूबाजूला असायचे.+

२० एक दिवशी तो मंदिरात शिकवत असताना आणि आनंदाचा संदेश सांगत असताना, मुख्य याजक आणि शास्त्री, वडीलजनांसोबत त्याच्याजवळ आले. २ ते त्याला म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? कोणी दिला तुला हा अधिकार?”+ ३ तो त्यांना म्हणाला: “मीही तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. मला त्याचं उत्तर द्या: ४ योहानने दिलेला बाप्तिस्मा देवापासून* होता की माणसांपासून?” ५ तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले: “‘देवापासून’ असं म्हटलं तर तो म्हणेल, की ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’ ६ पण ‘माणसांपासून’ असं म्हटलं तर सगळे लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची पक्की खातरी आहे.”+ ७ म्हणून, त्याचा बाप्तिस्मा कोणापासून होता हे आपल्याला माहीत नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. ८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हाला सांगणार नाही.”

९ त्यानंतर त्याने लोकांना हे उदाहरण सांगितलं: “एका माणसाने द्राक्षमळा लावला+ आणि माळ्यांना त्याचा ठेका देऊन तो बऱ्‍याच काळासाठी परदेशी निघून गेला.+ १० फळांचा हंगाम आला, तेव्हा त्याने द्राक्षमळ्याच्या फळांपैकी काही फळं मागण्यासाठी एका दासाला माळ्यांकडे पाठवलं. पण त्यांनी त्याला धरून बेदम मारलं आणि रिकाम्या हाती पाठवलं.+ ११ मग त्याने आणखी एका दासाला पाठवलं. पण त्यांनी त्यालाही मारलं आणि त्याचा अपमान करून रिकाम्या हाती पाठवून दिलं. १२ पुन्हा त्याने तिसऱ्‍या दासाला पाठवलं. तेव्हा त्यांनी त्याला जखमी करून बाहेर टाकून दिलं. १३ मग द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘आता मी काय करू? मी माझ्या लाडक्या मुलाला पाठवतो.+ कदाचित ते त्याचा मान राखतील.’ १४ पण मुलाला पाहून माळी आपसात म्हणू लागले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण याला मारून टाकू म्हणजे याच्या वारशाची जमीन आपली होईल.’ १५ म्हणून त्यांनी त्याला द्राक्षमळ्याबाहेर नेऊन मारून टाकलं.+ मग द्राक्षमळ्याचा मालक त्यांचं काय करेल? १६ तो येऊन त्या माळ्यांना ठार मारेल आणि द्राक्षमळ्याचा ताबा दुसऱ्‍यांना देईल.”

हे ऐकून ते म्हणाले: “असं कधीही न घडो!” १७ पण त्यांच्यावर नजर रोखून तो म्हणाला: “तर मग, ‘बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला, तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनलाय’ असं जे लिहिण्यात आलं होतं, त्याचा काय अर्थ होतो?+ १८ या दगडावर जो पडेल त्याचा चुराडा होईल.+ आणि ज्या कोणावर तो पडेल त्याला तो चिरडून टाकेल.”

१९ खरंतर, शास्त्री आणि मुख्य याजक यांना त्याच वेळी त्याला पकडायची इच्छा होती. कारण त्याने हे उदाहरण आपल्यालाच मनात ठेवून दिलं हे त्यांना माहीत होतं. पण ते लोकांना घाबरत होते.+ २० मग त्यांनी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं आणि गुप्तपणे पैसे देऊन विकत घेतलेल्या काही माणसांना त्याच्याकडे पाठवलं. त्या माणसांनी प्रामाणिक असल्याचं ढोंग करून त्याला बोलण्यात पकडावं, म्हणून त्यांनी तसं केलं.+ खरंतर त्याला सरकारच्या आणि राज्यपालाच्या हवाली करायचा त्यांचा उद्देश होता. २१ तेव्हा त्या माणसांनी त्याला असा प्रश्‍न विचारला: “गुरू, तुम्ही नेहमी योग्य तेच बोलता आणि शिकवता. तुम्ही पक्षपात करत नाही, तर देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता. २२ म्हणून आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही?” २३ पण त्यांचा धूर्तपणा ओळखून तो त्यांना म्हणाला: २४ “मला दिनाराचं* नाणं दाखवा. हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?” ते म्हणाले: “कैसराचं.” २५ तो त्यांना म्हणाला: “मग, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या,+ पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.”+ २६ अशा रितीने, त्यांना लोकांसमोर त्याला शब्दांत पकडता आलं नाही. उलट, त्याचं उत्तर ऐकून त्यांना आश्‍चर्य वाटलं आणि ते काहीही बोलू शकले नाहीत.

२७ पण, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणाऱ्‍या सदूकी* लोकांपैकी+ काही जण त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ २८ “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असं लिहून ठेवलंय, की ‘एखाद्या माणसाच्या भावाचा मृत्यू झाला, आणि त्याची बायको मागे राहिली, पण त्याला मूलबाळ नसलं, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.’+ २९ एका कुटुंबात सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं, पण मूलबाळ नसतानाच त्याचा मृत्यू झाला. ३० मग दुसऱ्‍याने ३१ आणि तिसऱ्‍याने आणि अशा प्रकारे सातही भावांनी तिच्याशी लग्न केलं. पण ते सगळे मूलबाळ न होताच मेले. ३२ शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. ३३ तर मग, पुनरुत्थान झाल्यावर ती कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”

३४ येशू त्यांना म्हणाला: “या जगाच्या व्यवस्थेची* मुलं लग्न करतात आणि त्यांची लग्नं करून दिली जातात. ३५ पण ज्यांना येणाऱ्‍या व्यवस्थेत जाण्यासाठी आणि मेलेल्यांतून उठवलं जाण्यासाठी योग्य समजलं गेलंय, ते लग्न करणार नाहीत आणि त्यांचं लग्न करून दिलं जाणार नाही.+ ३६ खरंतर, ते कधीही मरणार नाहीत, कारण ते स्वर्गदूतांसारखे असतील आणि मेलेल्यांतून उठवण्यात आल्यामुळे त्यांना देवाची मुलं म्हटलं जाईल. ३७ पण मेलेल्यांना पुन्हा उठवलं जाईल याबद्दल मोशेनेही झुडपाच्या अहवालात सांगितलं होतं. तिथे त्याने यहोवाला,* ‘अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव’ म्हटलं.+ ३८ तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. कारण त्याच्या दृष्टीने ते सगळे जिवंतच आहेत.”+ ३९ हे ऐकून शास्त्र्यांपैकी काही जण म्हणाले: “गुरुजी, तुम्ही योग्यच बोललात.” ४० यानंतर त्याला एकही प्रश्‍न विचारायचं त्यांचं धाडस झालं नाही.

४१ तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे असं लोक कसं काय म्हणतात?+ ४२ कारण स्तोत्रांच्या पुस्तकात दावीदने स्वतःच असं म्हटलं होतं, ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत ४३ माझ्या उजव्या हाताला बस.”’+ ४४ इथे दावीद त्याला प्रभू म्हणतो. मग, तो त्याचा मुलगा कसा काय असू शकतो?”

४५ सगळे लोक त्याचं ऐकत असताना तो आपल्या शिष्यांना म्हणाला: ४६ “शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवायला आणि बाजारांत लोकांकडून नमस्कार घ्यायला आवडतं. त्यांना सभास्थानांत पुढच्या* आसनांवर आणि मेजवान्यांत सगळ्यात महत्त्वाच्या जागांवर बसायला आवडतं.+ ४७ ते विधवांची मालमत्ता* हडपतात आणि लोकांना दाखवायला लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना जास्त कठोर शिक्षा मिळेल.”

२१ मग येशू मंदिरातल्या दानपात्रांकडे पाहत होता, तेव्हा त्याला श्रीमंत लोक त्यांत आपापलं दान टाकताना दिसले.+ २ त्याला तिथे एक गरीब विधवाही दिसली. ती फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी* दानपात्रात टाकत होती.+ ३ तेव्हा तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, की इतर सगळ्यांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले.+ ४ कारण त्या सगळ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून दान टाकलं. पण ती खूप गरीब असूनही तिने पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं टाकलं.”+

५ नंतर, काही जण मंदिराबद्दल आणि ते कसं सुंदर दगडांनी आणि समर्पित वस्तूंनी सजवलेलं आहे याबद्दल बोलू लागले.+ ६ तेव्हा तो म्हणाला: “असे दिवस येत आहेत, जेव्हा तुम्ही पाहत असलेल्या या सगळ्या गोष्टी खाली पाडल्या जातील आणि एकाही दगडावर दगड राहणार नाही.”+ ७ तेव्हा त्यांनी त्याला विचारलं: “गुरू, या गोष्टी नेमक्या केव्हा होतील आणि त्या घडणार असल्याचं चिन्ह काय असेल?”+ ८ तो म्हणाला: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.+ कारण माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मीच तो आहे,’ आणि ‘ठरवलेली वेळ आली आहे’ असं म्हणतील. पण त्यांच्यामागे जाऊ नका.+ ९ तसंच, तुम्ही लढायांबद्दल आणि दंगलींबद्दल* ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. कारण आधी या गोष्टी घडणं आवश्‍यक आहे, पण लगेचच अंत येणार नाही.”+

१० मग तो त्यांना म्हणाला: “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र+ आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.+ ११ मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील.+ तसंच, भयानक दृश्‍यं आणि आकाशात मोठी चिन्हं दिसतील.

१२ पण या सगळ्या गोष्टी घडण्याआधी लोक तुम्हाला धरून तुमचा छळ करतील.+ ते तुम्हाला सभास्थानांच्या हवाली करतील आणि तुरुंगांमध्ये डांबतील. माझ्या नावामुळे तुम्हाला राजांच्या आणि राज्यपालांच्या समोर नेलं जाईल.+ १३ आणि यामुळे तुम्हाला साक्ष द्यायची संधी मिळेल. १४ पण ही गोष्ट लक्षात ठेवा, की स्वतःच्या बचावात काय बोलायचं याची तुम्हाला आधीपासूनच तयारी करायची गरज नाही.+ १५ कारण मी तुम्हाला असे शब्द आणि बुद्धी देईन, की तुमचे सगळे विरोधक एक झाले, तरी त्यांना तुमचा प्रतिकार करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला जमणार नाही.+ १६ शिवाय तुमचे आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्रसुद्धा तुम्हाला धरून देतील* आणि तुमच्यापैकी काहींना ते ठार मारतील.+ १७ माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील.+ १८ पण तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.+ १९ जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.+

२० पण जेव्हा तुम्ही यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहाल,+ तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे हे ओळखा.+ २१ त्या वेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जायला सुरुवात करावी+ आणि जे यरुशलेममध्ये आहेत त्यांनी बाहेर जावं. तसंच, जे शेतांत आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. २२ कारण लिहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात, म्हणून ते न्यायदंड बजावण्याचे* दिवस असतील. २३ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्‍या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!+ कारण देशावर मोठं संकट येईल आणि या लोकांवर देवाचा क्रोध भडकेल. २४ आणि ते तलवारीच्या धारेने पडतील आणि सगळी राष्ट्रं त्यांना बंदी बनवून नेतील.+ विदेश्‍यांसाठी* ठरवलेले काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेमला विदेश्‍यांच्या* पायांखाली तुडवलं जाईल.+

२५ तसंच सूर्य, चंद्र आणि तारे यांच्यात चिन्हं दिसून येतील.+ समुद्राच्या गर्जनेमुळे आणि उसळणाऱ्‍या लाटांमुळे पृथ्वीवरची राष्ट्रं संकटात सापडतील आणि त्यांना काही मार्ग सुचणार नाही. २६ भीतीमुळे आणि संपूर्ण पृथ्वीवर येणार असलेल्या गोष्टींच्या धास्तीमुळे लोकांचे हातपाय गळून जातील. कारण आकाशातल्या शक्‍तींना हादरे बसतील. २७ आणि मग, ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगावर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+ २८ पण या गोष्टी घडू लागल्यावर तुम्ही डोकं वर करून ताठ उभे राहा. कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”

२९ मग त्याने त्यांना एक उदाहरण सांगितलं: “अंजिराचं झाड आणि इतर सगळी झाडं पाहा.+ ३० त्यांना पालवी फुटते, तेव्हा तुम्ही ओळखता की आता उन्हाळा जवळ आलाय. ३१ त्याच प्रकारे, जेव्हा तुम्ही या गोष्टी घडताना पाहाल, तेव्हा देवाचं राज्य जवळ आलंय हे ओळखा. ३२ मी तुम्हाला खरं सांगतो, सगळ्या गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही.+ ३३ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.+

३४ म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, नाहीतर अतिप्रमाणात खाणंपिणं+ आणि जीवनाच्या चिंता+ यांमुळे तुमचं मन भारावून जाईल आणि तो दिवस पाशाप्रमाणे अचानक तुमच्यावर येईल. ३५ कारण तो दिवस संपूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांवर येणार आहे. ३६ म्हणून, जागे राहा+ आणि घडणार असलेल्या या सगळ्या गोष्टींतून बचावून तुम्हाला मनुष्याच्या मुलासमोर उभं राहता यावं,+ अशी सतत याचना करत राहा.”+

३७ अशा प्रकारे येशू दिवसा मंदिरात शिकवायचा आणि रात्री जैतुनांच्या डोंगरावर जाऊन राहायचा. ३८ आणि सगळे लोक मंदिरात त्याचं ऐकायला सकाळीच यायचे.

२२ आता बेखमीर भाकरींचा सण, ज्याला वल्हांडण+ म्हणतात तो जवळ आला होता.+ २ आणि मुख्य याजक आणि शास्त्री येशूला पकडून ठार मारायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता असू शकेल, यावर विचार करत होते.+ कारण त्यांना लोकांची भीती होती.+ ३ मग सैतानाने १२ शिष्यांपैकी एक असलेला यहूदा इस्कर्योत याच्या मनाचा ताबा घेतला.+ ४ तेव्हा, आपण येशूला कसं पकडून देऊ याबद्दल बोलण्यासाठी यहूदा मुख्य याजक आणि मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला.+ ५ त्यांना याचा फार आनंद झाला आणि त्यांनी त्याला चांदीची नाणी द्यायचं कबूल केलं.+ ६ तेव्हा तो तयार झाला आणि लोकांची गर्दी नसेल अशा वेळी येशूला पकडून द्यायची एखादी चांगली संधी शोधू लागला.

७ मग बेखमीर भाकरींच्या सणाचा दिवस आला. या दिवशी वल्हांडणाचा पशू अर्पण केला जायचा.+ ८ त्यामुळे येशूने पेत्र आणि योहान यांना असं म्हणून पाठवलं, की “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.”+ ९ ते त्याला म्हणाले: “आम्ही कुठे जाऊन तयारी करू?” १० तो त्यांना म्हणाला: “शहरात गेल्यावर तुम्हाला पाण्याचं मडकं घेतलेला एक माणूस भेटेल. त्याच्यामागे जा आणि तो ज्या घरात जाईल तिथे जाऊन+ ११ त्या घराच्या मालकाला असं म्हणा, ‘गुरुजींनी तुम्हाला विचारलंय: “मी आपल्या शिष्यांसोबत वल्हांडणाचं भोजन करू शकेन, अशी खोली कुठे आहे?”’ १२ तेव्हा तो माणूस सामानसुमान लावून तयार केलेली माडीवरची एक मोठी खोली तुम्हाला दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” १३ तेव्हा शिष्य गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणेच सगळं घडलं. मग त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.

१४ नंतर वेळ झाली, तेव्हा तो आपल्या १२ प्रेषितांसोबत मेजाभोवती जेवायला बसला.+ १५ मग तो त्यांना म्हणाला: “मी दुःख भोगण्याआधी, तुमच्यासोबत हे वल्हांडणाचं भोजन करावं अशी माझी फार इच्छा होती. १६ कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात याची पूर्णता होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.” १७ मग त्याने प्याला घेतला आणि देवाला धन्यवाद देऊन तो म्हणाला, “हा घ्या आणि तुम्ही सगळे एकेक करून यातून प्या. १८ कारण मी तुम्हाला सांगतो, की आजपासून देवाचं राज्य येईपर्यंत मी पुन्हा कधीही हा द्राक्षारस पिणार नाही.”

१९ तसंच, त्याने भाकर घेतली+ आणि देवाला धन्यवाद देऊन ती मोडली आणि असं म्हणून त्यांना दिली: “ही भाकर माझ्या शरीराला सूचित करते.+ ते तुमच्यासाठी अर्पण केलं जाणार आहे.+ माझी आठवण म्हणून हे करत राहा.”+ २० त्याच प्रकारे, संध्याकाळचं त्यांचं भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केलं. तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो.+ तुमच्यासाठी ओतल्या जाणाऱ्‍या माझ्या रक्‍ताने हा करार स्थापित केला जाईल.+

२१ पण पाहा! माझा विश्‍वासघात करणारा माझ्यासोबत एकाच मेजावर जेवतोय.+ २२ कारण मनुष्याचा मुलगा तर ठरल्याप्रमाणे जाणारच आहे.+ पण, जो माणूस मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला पकडून देईल त्याचा धिक्कार असो!”+ २३ हे ऐकून ते एकमेकांना विचारू लागले, की आपल्यापैकी खरंच कोण असं करेल.+

२४ त्याच वेळी, आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणाला मानलं जातं, यावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू झाला.+ २५ पण येशू त्यांना म्हणाला: “विदेश्‍यांचे राजे त्यांच्यावर सत्ता चालवतात आणि त्यांच्यावर अधिकार गाजवणाऱ्‍यांना जनसेवक* म्हटलं जातं.+ २६ पण तुमच्यामध्ये असं असू नये.+ उलट तुमच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे त्याने सगळ्यात लहान झालं पाहिजे.+ आणि पुढाकार घेणाऱ्‍याने इतरांची सेवा केली पाहिजे. २७ कारण, श्रेष्ठ कोण असतो, जेवणारा की त्याची सेवा करणारा? जेवणाराच असतो ना? पण तुमच्यामध्ये मी सेवा करणाऱ्‍यासारखा आहे.+

२८ तरीसुद्धा, माझ्या परीक्षांमध्येही+ माझ्यासोबत राहिलेले तुम्हीच आहात.+ २९ आणि जसा माझ्या पित्याने माझ्यासोबत एका राज्यासाठी करार केलाय, तसाच मीही तुमच्यासोबत एक करार करतो.+ ३० तो असा, की माझ्या राज्यात तुम्ही माझ्यासोबत माझ्या मेजावर खाल-प्याल+ आणि राजासनांवर बसून+ इस्राएलच्या १२ वंशांचा न्याय कराल.+

३१ शिमोन, शिमोन, पाहा! सैतानाने तुम्हा सगळ्यांना गव्हासारखं पाखडण्याची मागणी केली आहे.+ ३२ पण तुझा विश्‍वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी याचना केली आहे.+ आणि तू पश्‍चात्ताप करून परत आल्यावर आपल्या बांधवांचा विश्‍वास दृढ कर.”+ ३३ मग तो त्याला म्हणाला: “प्रभू, मी तुझ्यासोबत तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार आहे.”+ ३४ पण तो म्हणाला: “पेत्र, मी तुला सांगतो की जोपर्यंत तू मला तीन वेळा नाकारणार नाहीस, तोपर्यंत आज कोंबडा आरवणारच नाही.”+

३५ तसंच तो त्यांना म्हणाला: “जेव्हा मी तुम्हाला पैशांचा बटवा, जेवणाची पिशवी किंवा जास्तीचे जोडे सोबत न घेताच पाठवलं होतं,+ तेव्हा तुम्हाला कशाचीही अडचण भासली नाही, भासली का?” ते म्हणाले: “नाही!” ३६ मग तो त्यांना म्हणाला: “पण आता ज्याच्याजवळ पैशांचा बटवा आहे त्याने तो सोबत घ्यावा, तसंच, जेवणाची पिशवीही घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकून ती विकत घ्यावी. ३७ कारण जे लिहून ठेवण्यात आलंय ते माझ्या बाबतीत पूर्ण होणं आवश्‍यक आहे. ते असं, की ‘त्याला अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं.’+ हे माझ्या बाबतीत आता पूर्ण होत आहे.”+ ३८ मग ते म्हणाले: “प्रभू, पाहा! दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला: “पुरे.”

३९ तिथून निघाल्यावर तो नेहमीप्रमाणे जैतुनांच्या डोंगरावर गेला आणि शिष्यही त्याच्यामागे गेले.+ ४० तिथे पोहोचल्यावर तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा.”+ ४१ मग त्यांच्यापासून काही अंतरावर* जाऊन तो गुडघे टेकून प्रार्थना करू लागला ४२ आणि म्हणाला: “बापा, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+ ४३ तेव्हा, एक स्वर्गदूत त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याने त्याला धीर दिला.+ ४४ पण त्याच्या मनाला इतक्या यातना होत होत्या, की तो आणखीनच कळकळीने प्रार्थना करू लागला.+ तेव्हा त्याचा घाम रक्‍ताच्या थेंबांसारखा जमिनीवर पडू लागला. ४५ तो प्रार्थना करून उठला आणि शिष्यांजवळ गेला. पण खूप दुःखाने थकून गेल्यामुळे त्यांना झोप लागली होती.+ ४६ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही का झोपताय? उठा आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करत राहा.”+

४७ तो बोलत होता, इतक्यात एक मोठा जमाव तिथे आला. आणि १२ शिष्यांपैकी एक असलेला यहूदा त्यांच्यापुढे चालत होता. तो येशूचं चुंबन घेण्यासाठी त्याच्याजवळ आला.+ ४८ पण येशू त्याला म्हणाला: “यहूदा, तू चुंबन घेऊन मनुष्याच्या मुलाला पकडून देतोस का?” ४९ त्याच्या सभोवती असलेल्यांनी जेव्हा काय घडणार आहे हे पाहिलं, तेव्हा ते म्हणाले: “प्रभू, आम्ही त्यांच्यावर तलवारीने वार करू का?” ५० त्यांच्यापैकी एकाने तर तलवार काढून महायाजकाच्या दासावर हल्लाही केला आणि त्याचा उजवा कान कापून टाकला.+ ५१ पण येशू त्यांना म्हणाला: “आता पुरे झालं.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरं केलं. ५२ मग आपल्याला पकडण्यासाठी आलेल्या मुख्य याजकांना, मंदिराच्या अधिकाऱ्‍यांना आणि वडीलजनांना येशू म्हणाला: “एखाद्या चोराला पकडावं तसं तुम्ही तलवारी आणि काठ्या घेऊन मला पकडायला आला आहात का?+ ५३ दररोज मी तुमच्यासोबत मंदिरात होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही.+ पण, ही तुमची आणि अंधाराची राज्य करायची वेळ आहे.”+

५४ मग ते त्याला अटक करून महायाजकाच्या घरी घेऊन गेले.+ पण पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे गेला.+ ५५ ते अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवून बसले, तेव्हा पेत्रही त्यांच्यामध्ये बसला.+ ५६ पण एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बघितलं, तेव्हा त्याला निरखून पाहत ती म्हणाली: “हा माणूसही त्याच्यासोबत होता.” ५७ पण तो ते नाकारून म्हणाला: “बाई, मी त्याला ओळखत नाही.” ५८ काही वेळाने आणखी एक जण त्याला पाहून म्हणाला: “तूसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहेस.” पण पेत्र म्हणाला: “नाही, अजिबात नाही.”+ ५९ मग जवळजवळ एका तासाने आणखी एक माणूस पूर्ण खातरीने असं म्हणू लागला: “नक्कीच हा माणूसही त्याच्यासोबत होता, कारण हासुद्धा गालीलचा आहे!” ६० पण पेत्र म्हणाला: “अरे, तू काय बोलतोस मला कळत नाही.” आणि तेवढ्यात, त्याचं बोलणं संपण्याआधीच एक कोंबडा आरवला. ६१ तेव्हा प्रभूने वळून सरळ पेत्रकडे पाहिलं. आणि पेत्रला प्रभूचे हे शब्द आठवले: “आज कोंबडा आरवण्याआधी तू तीन वेळा मला नाकारशील.”+ ६२ मग तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.

६३ नंतर, ज्यांनी येशूला धरून नेलं होतं, ते त्याची थट्टा करू लागले+ आणि त्याला मारू लागले.+ ६४ मग त्याचा चेहरा झाकून ते त्याला म्हणाले, “भविष्यवाणी कर! आणि तुला कोणी मारलं ते सांग.” ६५ तसंच, त्यांनी त्याचा खूप अपमान आणि निंदा केली.

६६ मग दिवस उजाडल्यावर लोकांच्या वडीलजनांची, म्हणजे मुख्य याजक आणि शास्त्री यांची सभा भरली.+ त्यांनी त्याला न्यायसभेत* नेलं आणि ते म्हणाले: ६७ “तू ख्रिस्त असशील तर आम्हाला सांग.”+ पण तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही मुळीच विश्‍वास ठेवणार नाही. ६८ आणि मी तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही मला उत्तर देणार नाही. ६९ पण यापुढे मनुष्याचा मुलगा+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला असेल.”+ ७० यावर ते सगळे म्हणाले: “तर मग, तू देवाचा मुलगा आहेस का?” तो त्यांना म्हणाला: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.” ७१ तेव्हा ते म्हणाले: “आता आणखी साक्षीदारांची काय गरज? कारण, आपण त्याच्या तोंडून स्वतः ऐकलंय.”+

२३ मग ते सगळे उठले आणि त्यांनी येशूला पिलातकडे नेलं.+ २ ते त्याच्यावर आरोप लावू लागले+ आणि म्हणाले, “हा माणूस आमच्या राष्ट्राच्या लोकांना भडकवतो, कैसराला कर देऊ नका असं सांगतो,+ आणि मी ख्रिस्त आणि राजा आहे असं म्हणतो.”+ ३ तेव्हा पिलातने त्याला विचारलं: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” त्याने उत्तर दिलं: “तुम्ही स्वतःच तसं म्हणताय.”+ ४ मग पिलात मुख्य याजकांना आणि जमलेल्या लोकांना म्हणाला: “मला नाही वाटत या माणसाने कोणताही अपराध केलाय.”+ ५ पण ते आणखीनच जोर देऊन म्हणू लागले: “तो थेट गालीलपासून इथपर्यंत, संपूर्ण यहूदीयातल्या लोकांना शिकवून त्यांना भडकवतो.” ६ हे ऐकून पिलातने हा माणूस गालीलचा आहे का, असं विचारलं. ७ तो हेरोदच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात राहणारा आहे याची खातरी केल्यावर,+ पिलातने त्याला हेरोदकडे पाठवलं. त्या दिवसांत हेरोदही यरुशलेममध्येच होता.

८ हेरोदने येशूला पाहिलं तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याने त्याच्याबद्दल पुष्कळ गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणून त्याला बऱ्‍याच काळापासून येशूला भेटायची इच्छा होती.+ येशूचा एखादा चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल असं त्याला वाटत होतं. ९ म्हणून तो त्याला बराच वेळ प्रश्‍न विचारत राहिला. पण येशूने त्याला काहीही उत्तर दिलं नाही.+ १० तरीही मुख्य याजक आणि शास्त्री पुन्हा पुन्हा उभे राहून त्याच्यावर तावातावाने आरोप लावत होते. ११ मग हेरोद आणि त्याच्या सैनिकांनी येशूचा खूप अपमान केला.+ त्यांनी त्याला एक महागाचं रेशमी वस्त्र घालून त्याची थट्टा केली.+ नंतर त्यांनी त्याला पिलातकडे परत पाठवलं. १२ त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले. त्याआधी ते दोघं एकमेकांचे शत्रू होते.

१३ मग पिलातने मुख्य याजकांना, अधिकाऱ्‍यांना आणि लोकांना एकत्र जमवलं. १४ तो त्यांना म्हणाला: “हा माणूस लोकांना बंड करायला चिथवतो, असं म्हणून तुम्ही याला माझ्याकडे आणलं होतं. पाहा! मी तुमच्यासमोर याची चौकशी केली. पण तुमचे आरोप सिद्ध करणारा एकही पुरावा मला सापडला नाही.+ १५ खरंतर, हेरोदलाही सापडला नाही. म्हणूनच त्याने याला माझ्याकडे परत पाठवून दिलं. मृत्युदंड देण्यासारखा कोणताही गुन्हा याने केलेला नाही. १६ त्यामुळे मी याला फटके मारून*+ सोडून देतो.” १७ *​—— १८ पण जमलेले सगळे लोक ओरडू लागले: “याला मारून टाका,* आणि आमच्यासाठी बरब्बाची सुटका करा!”+ १९ (या माणसाला शहरात झालेल्या बंडात सहभागी असल्यामुळे आणि खून केल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आलं होतं.) २० पिलातने पुन्हा एकदा त्यांना विचारलं, कारण त्याला येशूची सुटका करायची इच्छा होती.+ २१ तेव्हा ते मोठमोठ्याने ओरडू लागले: “याला वधस्तंभावर* खिळा! याला वधस्तंभावर खिळा!”*+ २२ मग तिसऱ्‍यांदा पिलात त्यांना म्हणाला: “पण का? त्याने कोणतं वाईट काम केलंय? मृत्युदंड देण्यासारखं काहीही मला त्याच्यात सापडलं नाही. म्हणून मी त्याला फटके मारून* सोडून देतो.” २३ तेव्हा ते आणखीनच मोठ्याने ओरडून त्याला मृत्युदंड* द्यायची मागणी करू लागले. आणि ते सतत ओरडत असल्यामुळे शेवटी पिलातने हार मानली.+ २४ त्यांची मागणी पूर्ण केली जावी असा निर्णय त्याने सुनावला. २५ ते ज्याची मागणी करत होते आणि जो बंड आणि खून केल्यामुळे तुरुंगात होता, त्या माणसाची त्याने सुटका केली. मग त्यांनी येशूसोबत त्यांच्या इच्छेप्रमाणे करावं, म्हणून पिलातने त्याला त्यांच्या हवाली केलं.

२६ ते त्याला तिथून घेऊन जात होते, तेव्हा त्यांना मूळचा कुरेनेचा असलेला शिमोन शेतांतून शहराकडे येताना दिसला. त्यांनी त्याला धरलं आणि त्याने येशूचा वधस्तंभ उचलून त्याच्यामागे चालावं, म्हणून तो त्याच्या खांद्यावर ठेवला.+ २७ लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागून येत होता. त्यात बऱ्‍याच स्त्रियाही होत्या. त्या दुःखाने छाती बडवून त्याच्यासाठी रडत होत्या. २८ येशू त्या स्त्रियांकडे वळून म्हणाला: “यरुशलेमच्या मुलींनो, माझ्यासाठी रडू नका. उलट स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा.+ २९ कारण पाहा! असे दिवस येत आहेत जेव्हा लोक म्हणतील, ‘ज्यांनी मुलांना जन्म दिला नाही आणि दूध पाजलं नाही अशा वांझ स्त्रिया सुखी आहेत!’+ ३० मग ते पर्वतांना म्हणू लागतील, ‘आमच्यावर पडा!’ आणि टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हाला झाकून टाका!’+ ३१ झाड हिरवंगार असताना जर ते अशा गोष्टी करत आहेत, तर मग सुकल्यावर ते काय करतील?”

३२ त्याच्यासोबत आणखी दोन गुन्हेगारांनाही मृत्युदंड देण्यासाठी नेलं जात होतं.+ ३३ मग, ‘कवटी’ नावाच्या ठिकाणी पोहोचल्यावर+ त्यांनी त्याला तिथे वधस्तंभावर खिळलं. त्या गुन्हेगारांनाही वधस्तंभांवर लटकवण्यात आलं होतं; एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुसऱ्‍याला डावीकडे.+ ३४ येशू म्हणाला: “बापा, यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.” मग त्यांनी त्याचे कपडे आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या.+ ३५ लोक हे पाहत उभे होते. पण अधिकारी त्याची थट्टा करून म्हणत होते: “याने दुसऱ्‍यांना वाचवलं. हा जर देवाचा निवडलेला, ख्रिस्त असेल तर आता त्याने स्वतःला वाचवून दाखवावं.”+ ३६ सैनिकसुद्धा त्याच्याजवळ जाऊन आणि त्याला आंबलेला द्राक्षारस+ देऊन त्याची थट्टा करू लागले. ३७ ते म्हणाले: “जर तू यहुद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.” ३८ तसंच, त्याच्या डोक्याच्या वर असं लिहिण्यात आलं: “हा यहुद्यांचा राजा आहे.”+

३९ मग त्याच्याशेजारी लटकवण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी एक त्याची निंदा करू लागला+ आणि म्हणाला: “ख्रिस्त आहेस ना तू? मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव!” ४० तेव्हा दुसरा त्याला दटावून म्हणाला: “तुलाही तीच शिक्षा झाली आहे, तरी तुला देवाची जराही भीती वाटत नाही का? ४१ आपल्याला मिळालेली शिक्षा तर योग्यच आहे. कारण आपण जे केलं, त्याचंच फळ भोगतोय. पण या माणसाने तर काहीच गुन्हा केलेला नाही.” ४२ मग तो म्हणाला: “येशू, तू राजा होशील तेव्हा+ माझी आठवण ठेव.” ४३ तेव्हा तो त्याला म्हणाला: “आज मी तुला खरं सांगतो, तू माझ्यासोबत नंदनवनात* असशील.”+

४४ आता दुपारचे सुमारे बारा* वाजले होते आणि तरीसुद्धा, संपूर्ण पृथ्वीवर सुमारे तीन वाजेपर्यंत* अंधार पसरला.+ ४५ कारण सूर्याने प्रकाश दिला नाही. मग मंदिराच्या पवित्र स्थानाचा पडदा+ मधोमध, खालपर्यंत फाटला.+ ४६ आणि येशूने मोठ्याने ओरडून हाक मारली आणि तो म्हणाला: “बापा, मी आपलं जीवन तुझ्या हाती सोपवतो.”+ असं म्हणून त्याने प्राण सोडला.*+ ४७ घडलेल्या या सगळ्या गोष्टी बघून सैन्याच्या अधिकाऱ्‍याने देवाचा गौरव केला आणि तो म्हणाला: “हा माणूस खरंच नीतिमान होता.”+ ४८ जमलेल्या लोकांच्या समुदायाने या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवत आपापल्या घरी गेले. ४९ आणि त्याच्या ओळखीचे सगळे लोक काही अंतरावर उभे होते. तसंच, ज्या स्त्रिया गालीलहून त्याच्यासोबत आल्या होत्या, त्यासुद्धा तिथे होत्या आणि त्यांनीही या गोष्टी पाहिल्या.+

५० न्यायसभेचा सदस्य असलेला योसेफ नावाचा एक माणूस होता. तो चांगला आणि नीतिमान होता.+ ५१ (या माणसाने त्यांच्या कटाला आणि कृत्याला पाठिंबा दिला नव्हता.) तो अरिमथाई, या यहूदीयातल्या शहराचा राहणारा होता आणि देवाच्या राज्याची वाट पाहत होता. ५२ त्याने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली. ५३ मग, येशूचं शरीर खाली उतरवून+ त्याने ते उत्तम प्रतीच्या मलमलीच्या कापडात गुंडाळलं आणि खडकात खोदलेल्या एका कबरेत* ठेवलं.+ तिथे पूर्वी कोणाचाही मृतदेह ठेवण्यात आला नव्हता. ५४ तो तयारीचा दिवस होता+ आणि काही वेळातच शब्बाथाचा दिवस+ सुरू होणार होता. ५५ पण गालीलहून त्याच्यासोबत आलेल्या स्त्रियांनीही जाऊन त्याची कबर* पाहिली आणि त्याचं शरीर कसं ठेवण्यात आलं तेही पाहिलं.+ ५६ मग त्या सुगंधी मसाले आणि सुवासिक तेल तयार करायला परत गेल्या. पण, शब्बाथाच्या दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विश्रांती घेतली.+

२४ पण आठवड्याच्या पहिल्या दिवशी, त्या स्त्रिया आपल्यासोबत तयार केलेले सुगंधी मसाले घेऊन अगदी पहाटेच कबरेजवळ* आल्या.+ २ पण कबरेच्या* दारावर लावलेला मोठा दगड बाजूला केलेला त्यांना दिसला.+ ३ त्या आत गेल्या तेव्हा त्यांना प्रभू येशूचं शरीर तिथे सापडलं नाही.+ ४ यामुळे त्या अगदी गोंधळून गेल्या. पण तेवढ्यात, तेजस्वी वस्त्रं घातलेली दोन माणसं त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. ५ तेव्हा त्या स्त्रिया इतक्या घाबरल्या, की मान वर करून पाहण्याचंही त्यांचं धैर्य होत नव्हतं. म्हणून ती माणसं त्यांना म्हणाली: “जो जिवंत आहे त्याला तुम्ही मेलेल्यांमध्ये का शोधताय?+ ६ तो इथे नाही, त्याला उठवण्यात आलंय. गालीलमध्ये असताना त्याने तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा. ७ त्याने असं सांगितलं होतं, की मनुष्याच्या मुलाला पापी माणसांच्या हाती धरून दिलं जाईल आणि त्याला वधस्तंभावर* मृत्युदंड दिला जाईल. पण तिसऱ्‍या दिवशी तो उठेल.”+ ८ तेव्हा त्यांना येशूचे शब्द आठवले.+ ९ मग त्या कबरेकडून* परत आल्या आणि त्यांनी ११ प्रेषितांना आणि इतर सर्वांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.+ १० मग्दालीया मरीया, योहान्‍ना आणि याकोबची आई मरीया या त्या स्त्रिया होत्या. तसंच, त्यांच्यासोबत असलेल्या इतर स्त्रियासुद्धा प्रेषितांना या गोष्टी सांगू लागल्या. ११ पण त्यांना या वेडेपणाच्या गोष्टी वाटल्या आणि त्यांनी त्या स्त्रियांवर विश्‍वास ठेवला नाही.

१२ पण पेत्र उठला आणि धावत कबरेकडे* गेला आणि त्याने आत वाकून पाहिलं, तेव्हा त्याला फक्‍त मलमलीची कापडं तिथे दिसली. म्हणून तो तिथून निघून गेला आणि काय घडलं असावं याबद्दल मनात विचार करू लागला.

१३ पण त्याच दिवशी दोन शिष्य यरुशलेमपासून जवळपास ११ किलोमीटर* अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाकडे जात होते. १४ तिथे जाताना ते घडलेल्या या सगळ्या गोष्टींबद्दल एकमेकांशी बोलत होते.

१५ ते बोलत असताना आणि चर्चा करत असताना येशू स्वतः तिथे आला आणि त्यांच्यासोबत चालू लागला. १६ पण ते त्याला ओळखू शकले नाहीत.+ १७ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही चालता चालता कोणत्या गोष्टींबद्दल वादविवाद करताय?” तेव्हा ते थांबले. त्यांचे चेहरे उदास दिसत होते. १८ मग ज्याचं नाव क्लयपा होतं, तो त्याला म्हणाला: “तू यरुशलेममध्ये एकटाच राहणारा कोणी परका आहेस की काय? मागच्या काही दिवसांत काय घडलं हे तुला माहीत नाही का?”* १९ त्याने त्यांना विचारलं: “काय घडलं?” ते त्याला म्हणाले: “नासरेथकर येशूबद्दल+ जे घडलं ते तुला माहीत नाही? तो त्याच्या शिकवणींमुळे आणि कार्यांमुळे देवासमोर आणि सगळ्या लोकांसमोर एक प्रभावशाली संदेष्टा ठरला.+ २० आणि आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्‍यांनी त्याला मृत्युदंड देण्यासाठी पकडून दिलं+ आणि वधस्तंभावर खिळलं. २१ पण हाच माणूस इस्राएलची सुटका करेल अशी आमची आशा होती.+ शिवाय, या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे. २२ तसंच, आमच्यापैकी असलेल्या काही स्त्रियांनीसुद्धा आम्हाला गोंधळात टाकलंय. कारण पहाटेच जेव्हा त्या कबरेजवळ* गेल्या+ २३ तेव्हा त्यांना त्याचं शरीर सापडलं नाही. त्या असं सांगत आल्या, की त्यांना स्वर्गदूतांचं अद्‌भुत दर्शन झालं आणि येशू जिवंत आहे असं स्वर्गदूतांनी त्यांना सांगितलं. २४ तेव्हा आमच्यासोबत असलेल्यांपैकी काही जण लगेच कबरेजवळ* गेले+ आणि स्त्रियांनी जसं सांगितलं होतं, तसंच त्यांना दिसलं, पण तो त्यांना दिसला नाही.”

२५ मग तो त्यांना म्हणाला: “अरे समज नसलेल्या माणसांनो! संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला* अजूनही कशा समजत नाहीत? २६ ख्रिस्ताने हे सर्व सहन करून+ आपल्या गौरवात जावं, हे आवश्‍यकच नव्हतं का?”+ २७ मग मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं,+ असं करत त्याने सगळ्या शास्त्रवचनांत स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजावून सांगितला.

२८ शेवटी, ते ज्या गावाला जात होते त्याजवळ आले. तेव्हा, आपल्याला आणखी पुढे जायचं आहे असं त्याने दाखवलं. २९ पण त्यांनी त्याला थांबण्याचा आग्रह केला आणि ते म्हणाले: “आमच्यासोबत राहा, कारण संध्याकाळ झाली आहे आणि लवकरच रात्र होईल.” तेव्हा तो त्यांच्यासोबत राहिला. ३० मग जेवत असताना त्याने भाकर घेतली आणि देवाला धन्यवाद दिला. त्यानंतर, ती मोडून तो त्यांना देऊ लागला.+ ३१ त्या क्षणी त्यांचे डोळे पूर्णपणे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखलं. पण तो त्यांच्यासमोरून नाहीसा झाला.+ ३२ तेव्हा ते एकमेकांना म्हणाले: “रस्त्याने चालताना जेव्हा तो आपल्याशी बोलत होता आणि शास्त्रवचनं अगदी स्पष्ट करून सांगत होता, तेव्हा आपल्याला आतल्या आत एक वेगळाच उत्साह जाणवत नव्हता का?” ३३ मग ते लगेच तिथून निघाले आणि यरुशलेमला परतले आणि त्यांना ११ प्रेषित आणि त्यांच्यासोबत जमलेले लोक भेटले. ३४ ते लोक त्यांना म्हणाले: “प्रभू खरोखरच उठलाय आणि तो शिमोनला दिसला!”+ ३५ मग त्यांनी रस्त्याने जाताना घडलेल्या घटनांबद्दल आणि भाकर मोडल्यामुळे त्यांनी कशा प्रकारे त्याला ओळखलं, याबद्दल त्या सगळ्यांना सांगितलं.+

३६ ते या गोष्टींबद्दल बोलत होते, तेवढ्यात तो स्वतः त्यांच्यात येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला: “तुम्हाला शांती असो.”+ ३७ पण ते खूप घाबरले आणि त्यांना फार भीती वाटली. आपल्याला काहीतरी भास होत आहे असं त्यांना वाटलं. ३८ म्हणून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही का घाबरलात आणि तुमच्या मनात शंका का येत आहेत? ३९ माझे हातपाय पाहा आणि मीच आहे याची खातरी करून घ्या. मला हात लावून पाहा, कारण जर हा भास असता तर तुम्ही माझ्या हाडामांसाच्या शरीराला हात लावू शकला नसता.” ४० असं म्हणून त्याने त्यांना आपले हात आणि पाय दाखवले. ४१ पण त्यांना इतका आनंद आणि आश्‍चर्य वाटत होतं, की त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्हता. तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ खायला काही आहे का?” ४२ त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा एक तुकडा दिला. ४३ तेव्हा त्याने तो घेतला आणि त्यांच्यासमोर खाल्ला.

४४ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यासोबत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा.+ मी तुम्हाला सांगितलं होतं, की माझ्याबद्दल मोशेच्या नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांत आणि स्तोत्रांत जे काही लिहिलंय, ते सगळं पूर्ण होणं आवश्‍यक आहे.”+ ४५ मग शास्त्रवचनांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याने त्यांची मनं पूर्णपणे उघडली.+ ४६ आणि तो त्यांना म्हणाला, “शास्त्रात हेच लिहिलंय, की ख्रिस्ताला दुःख सहन करावं लागेल आणि तिसऱ्‍या दिवशी तो मेलेल्यांतून उठेल.+ ४७ आणि यरुशलेमपासून सुरुवात करून+ सगळ्या राष्ट्रांत अशी घोषणा केली जाईल,+ की त्याच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा.+ ४८ तुम्ही या गोष्टींची साक्ष द्याल.+ ४९ आणि पाहा! माझ्या पित्याने तुम्हाला जे द्यायचं वचन दिलं होतं, ते मी तुमच्यासाठी पाठवीन. पण, तुम्हाला स्वर्गातून ते सामर्थ्य मिळेपर्यंत याच शहरात राहा.”+

५० तिथून निघून त्याने त्यांना बेथानीपर्यंत नेलं. मग आपले हात वर करून त्याने त्यांना आशीर्वाद दिला. ५१ त्यानंतर, तो त्यांच्यापासून वेगळा झाला आणि देवाने त्याला स्वर्गात घेतलं.+ ५२ ते त्याला नमन करून खूप आनंदाने यरुशलेमला परत गेले+ ५३ आणि दररोज मंदिरात जाऊन देवाची स्तुती करू लागले.+

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “प्रथेप्रमाणे.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “आईच्या पोटात असल्यापासूनच.”

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “आवेशाने.”

अति. क५ पाहा.

किंवा “जनसेवेचे.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “माझे पुरुषासोबत लैंगिक संबंध नाहीत.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “कोणतंही वचन.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “माझा जीव.”

अति. क५ पाहा.

शब्दशः “बीजाला.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “सामर्थ्यशाली तारणकर्ता.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “रोमी सम्राट.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जगातल्या.”

गुराढोरांना चारापाणी घालायचं भांडं, किंवा मोठी टोपली.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “ज्यांच्यावर त्याची कृपा.”

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “पवित्र.”

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “तुझ्या जिवातून.”

अति. क५ पाहा.

किंवा “अधीन.”

म्हणजे, हेरोद अंतिपा. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “तारण करण्याचा देवाचा मार्ग.”

शब्दशः “पश्‍चात्तापाला शोभणारी फळं उत्पन्‍न करा.”

किंवा “जास्तीचा झगा आहे.”

किंवा “गोळा करू नका.”

किंवा “कोणाकडून पैसे उकळू नका.”

किंवा “पुरवल्या जाणाऱ्‍या गोष्टींत.”

किंवा “मसीहा.”

म्हणजे, धान्याची झोडपणी करायचं ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “बरं.”

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, गालील समुद्र.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या पिशव्या. शब्दार्थसूची पाहा.

किंवा “अर्पणाच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “लकवा मारल्यामुळे लुळा झालेला.”

किंवा “लकवा मारल्यामुळे लुळा झालेल्या.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “तुम्हाला वाळीत टाकतात.”

शब्दशः “आनंदाने उड्या मारा.”

म्हणजे, बिनव्याजाने.

किंवा “सुटका.”

किंवा “तुमचीही सुटका.”

किंवा “विद्यार्थी.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “जो माझ्याविषयी कोणतीही शंका घेत नाही.”

किंवा “महागडी वस्त्रं.”

शब्दशः “तुझ्या चेहऱ्‍यापुढे.”

शब्दशः “मुलांद्वारे.”

किंवा “नीतिमान ठरते.”

म्हणजे, अलाबास्त्र नावाच्या दगडापासून बनवलेली बाटली. शब्दार्थसूचीत “अलाबास्त्र” पाहा.

अति. ख१४ पाहा.

अति. ख१४ पाहा.

शब्दशः “शांतीने जा.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

किंवा कदाचित, “बऱ्‍याच काळापासून त्याला आपल्या ताब्यात ठेवलं होतं.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “शांतीने जा.”

किंवा “तिचा श्‍वास (जीवनशक्‍ती) परत आला.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “चांदी.”

म्हणजे, हेरोद अंतिपा. शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दिवस भरू लागले.”

शब्दशः “आपला चेहरा यरुशलेमकडे रोखला.”

किंवा “मिठी मारून नमस्कार करू नका.”

किंवा “झटकून.”

ग्रीक भाषेत “हेडीस.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

अति. ख१४ पाहा.

शब्दशः “त्याचं वचन.”

शब्दशः “मोहात पाडू नकोस.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

दुष्ट स्वर्गदूतांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेलं एक नाव.

शब्दशः “देवाच्या बोटाने.”

किंवा “देवाचं राज्य आलंय आणि तुम्हाला कळलंही नाही.”

शब्दशः “पृथ्वीच्या टोकापासून.”

किंवा “निर्दोष.” शब्दशः “साधी.”

शब्दशः “वाईट; दुष्ट.”

म्हणजे, हात धुण्याचा विधी पाळला नाही.

ग्रीक ‘पेगानॉन.’  ही एक औषधी वनस्पती असून तिचा स्वयंपाकातही उपयोग होतो.

किंवा “दशांश.”

किंवा “सगळ्यात चांगल्या.”

किंवा “स्मारक कबरींसारखे.”

शब्दशः “देवाच्या बुद्धीने असं म्हटलं.”

किंवा “त्याचा हिशोब या पिढीकडून मागितला जाईल.”

किंवा “त्यांच्या रक्‍ताचा हिशोब या पिढीकडून मागितला जाईल.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “दोन असारियन,”  एक असारियन  म्हणजे एका दिवसाच्या मजुरीचा सोळावा भाग. अति. ख१४ पाहा.

किंवा “दुर्लक्ष करत नाही.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा कदाचित, “सभास्थानांसमोर.”

किंवा “माझ्या जिवाला.”

किंवा “माझ्या जिवा, तू.”

किंवा “तुझा जीव मागितला जाईल.” शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.

अति. ख१४ पाहा.

किंवा “आगीत.”

किंवा “कमी विश्‍वास असलेल्या.”

रात्री सुमारे नऊ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत.

मध्यरात्रीपासून पहाटे सुमारे तीन वाजेपर्यंत.

किंवा “समजदार.”

म्हणजे, घराची व्यवस्था पाहणारा.

किंवा “अविश्‍वासू लोकांसारखीच त्याची अवस्था करेल.”

किंवा “मालकाच्या इच्छेप्रमाणे केलं नाही.”

शब्दशः “शेवटचं लेप्टन  नाणं.” अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.

म्हणजे, तीन सेया मापं, म्हणजे जवळजवळ १० किलो.

किंवा “दात खाल.”

किंवा “अशी कल्पनाही करता येत नाही.”

म्हणजे, मंदिराचा.

अति. क५ पाहा.

शरीरात पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हातापायांना सूज येणं.

किंवा “पुनरुत्थान होईल.”

शब्दशः “भाकर खाईल.”

किंवा “आपल्या जिवाचाही.”

किंवा “तुलनेने कमी प्रेम.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “संपत्तीचा त्याग करत नाही.”

शब्दशः “ड्राख्मा.”  अति. ख१४ पाहा.

शब्दशः “ड्राख्मा.”  अति. ख१४ पाहा.

शब्दशः “स्वर्गाविरुद्ध.”

शब्दशः “त्याच्या गळ्यात पडून.”

किंवा “धडधाकट स्थितीत.”

शब्दशः “खाऊन टाकणारा.”

म्हणजे, घराची व्यवस्था पाहणारा.

किंवा “बथ मापं.” एक बथ म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.

किंवा “कोर मापं.” एक कोर म्हणजे २२० ली. अति. ख१४ पाहा.

किंवा “तो धूर्तपणे वागल्यामुळे; सुज्ञपणे वागल्यामुळे.”

किंवा “सध्याच्या काळाची.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “मलमलीचे कपडे.”

शब्दशः “अब्राहामच्या उराशी.”

ग्रीक भाषेत “हेडीस.”  शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “त्याच्या उराशी.”

किंवा “तुतीच्या झाडाला.”

मत्त २४:३८ तळटीप पाहा.

अति. क३ पाहा.

किंवा “हा विश्‍वास.”

किंवा “माझ्यावर कृपा कर.”

शब्दशः “तान्ह्या.”

किंवा “येणाऱ्‍या काळात.” शब्दार्थसूची पाहा.

किंवा “खोटा आरोप लावून लुबाडलं.”

शब्दशः “मिना.” ग्रीक चलनानुसार एका मिनाची किंमत मजुराच्या सुमारे तीन महिन्यांच्या मजुरीइतकी होती. अति. ख१४ पाहा.

किंवा “राज्य.”

शब्दशः “चांदी.”

शब्दशः “माझी चांदी.”

अति. क५ पाहा.

किंवा “तुझ्यावर अत्याचार करतील.”

शब्दशः “तुझी तपासणी.”

शब्दशः “स्वर्गापासून.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “रोमी सम्राटाला.” शब्दार्थसूची पाहा.

अति. ख१४ पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “सध्याच्या काळाची.” शब्दार्थसूची पाहा.

अति. क५ पाहा.

अति. क५ पाहा.

किंवा “सगळ्यात चांगल्या.”

किंवा “घरं.”

शब्दशः “दोन लेप्टा.” अति. ख१४ पाहा.

किंवा “अराजकतेबद्दल; बंडांबद्दल.”

किंवा “विश्‍वासघाताने धरून देतील.”

किंवा “सूड उगवण्याचे.”

किंवा “राष्ट्रांसाठी.”

किंवा “राष्ट्रांच्या.”

शब्दशः “परोपकारी.” ही एक सन्मानाची पदवी होती.

किंवा “दगड फेकला तर तो जितक्या दूर जाईल तितक्या अंतरावर.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “शिक्षा देऊन.”

अति. क३ पाहा.

शब्दशः “याला घेऊन जा.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “त्याला वधस्तंभावर मृत्युदंड द्या! त्याला वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”

शब्दशः “शिक्षा देऊन.”

किंवा “वधस्तंभावर खिळून मृत्युदंड.”

शब्दार्थसूची पाहा.

शब्दशः “आता सहावा तास होता.”

शब्दशः “नवव्या तासापर्यंत.”

किंवा “अखेरचा श्‍वास घेतला.”

किंवा “स्मारक कबरेत.”

किंवा “स्मारक कबर.”

किंवा “स्मारक कबरेजवळ.”

किंवा “स्मारक कबरेच्या.”

शब्दार्थसूची पाहा.

किंवा “स्मारक कबरेकडून.”

किंवा “स्मारक कबरेकडे.”

शब्दशः “६० स्टेडिया.” स्टेडियम  हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून एक स्टेडियम  १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.

किंवा कदाचित, “या गोष्टी माहीत नसलेला तू यरुशलेममध्ये आलेला एकटाच प्रवासी आहेस का?”

किंवा “स्मारक कबरेजवळ.”

किंवा “स्मारक कबरेजवळ.”

किंवा “तुमच्या मनाला.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा