गीतरत्न
१ शलमोनने रचलेलं अप्रतिम* गीत:+
३ तुझ्या अत्तरांचा सुगंध मोहक आहे.+
तुझं नाव, डोक्यावर ओतलेल्या सुगंधी तेलासारखं आहे.+
म्हणूनच सगळ्या मुली तुझ्यावर भाळल्या आहेत.
४ राजाने मला त्याच्या आतल्या खोल्यांमध्ये आणलंय!
मला तुझ्यासोबत घेऊन चल;* आपण पळून जाऊ.
आपण आनंदी होऊन एकमेकांत रमून जाऊ.
आपण तुझ्या प्रेमाची प्रशंसा करू;* ते द्राक्षारसाहून गोड आहे.
त्या* काही उगीच तुझ्यावर भाळल्या नाहीत.
५ यरुशलेमच्या मुलींनो, मी काळीसावळी* असले तरी सुंदर आहे.
केदारच्या तंबूंसारखी,+ शलमोनच्या तंबूंसारखी+ मी आहे.
६ माझा रंग सावळा आहे म्हणून माझ्याकडे अशा एकटक पाहू नका,
कारण माझी त्वचा उन्हाने काळवंडली आहे.
माझे भाऊ माझ्यावर रागावले होते,
त्यांनी मला द्राक्षमळ्यांची राखण करायला सांगितलं.
पण माझ्या स्वतःच्या द्राक्षमळ्याची मी काळजी घेतली नाही.
७ माझ्या प्राणसख्या, मला सांग,
तुझ्या कळपांना तू कुठे चरायला नेतोस?+
दुपारी तू त्यांना कुठे बसवतोस?
तुझ्या मित्रांच्या कळपांमध्ये,
मी स्वतःला ओढणीने* झाकणाऱ्या स्त्रीसारखी का फिरू?”
८ “हे सर्वात सुंदर मुली, तुला माहीत नसेल,
तर कळपाच्या पाऊलखुणांमागे जा
आणि आपल्या बकऱ्यांना मेंढपाळांच्या तंबूंजवळ चरायला ने.”
९ “माझ्या प्रिये, फारोच्या रथांना जुंपलेल्या एका* डौलदार घोडीसारखी तू सुंदर दिसतेस.+
१० दागिन्यांनी* तुझे गाल,
आणि मण्यांच्या माळांनी तुझा गळा, किती सुरेख दिसतो.
११ आपण तुझ्यासाठी सोन्याचांदीचे दागिने बनवू.”
१३ माझा सखा, रात्री माझ्या उराजवळ असलेल्या
गंधरसाच्या+ बटव्यासारखा आहे.
१४ माझा सखा, एन-गेदीच्या+ द्राक्षमळ्यांतल्या
मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.”+
१५ “माझ्या प्रिये, तू सुंदर आहेस!
खरंच, तू सुंदर आहेस! तुझे डोळे कबुतरांच्या डोळ्यांसारखे आहेत.”+
१६ “माझ्या सख्या, तू देखणा आणि मोहक आहेस.+
ही हिरवळच आपला पलंग आहे.
१७ हे देवदाराचे वृक्ष म्हणजे आपल्या घराचे* खांब
आणि ही गंधसरूची झाडं आपलं छत आहे.
२ “सगळ्या मुलींमध्ये माझी सखी,
जणू काट्यांतलं भुईकमळ.”
३ “रानातल्या झाडांमध्ये जसं सफरचंदाचं झाड,
तसा तरुणांमध्ये माझा सखा आहे.
त्याच्या सावलीत बसायला माझं मन आतुर झालंय;
त्याचं फळ मला गोड लागतं.
४ त्याने मला मेजवानीच्या घरात* आणलं,
त्याचं माझ्यावरचं प्रेम सर्वांना दिसलं.
माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका.+
८ माझ्या सख्याची चाहूल ऐका!
पाहा, तो येतोय!
डोंगर चढून, टेकड्यांवरून धावत येतोय.
९ माझा सखा हरणासारखा; हरिणीच्या पाडसासारखा आहे.+
पाहा, तो भिंतीमागे उभा आहे,
खिडक्यांमधून डोकावतोय,
जाळीतून पाहतोय.
१० माझा सखा मला म्हणतो:
‘प्रिये ऊठ!
माझ्या सुंदर सखे, माझ्यासोबत चल.
प्रिये ऊठ! माझ्यासोबत चल.
माझ्या सुंदर सखे, माझ्यासोबत चल.
१४ माझ्या सखे, तू कबुतरासारखी आहेस.
कारण तुझा आवाज सुखावणारा; तुझं रूप मोहवणारं आहे.’ ”+
१५ “कोल्ह्यांना पकडा,
कारण द्राक्षवेलींना बहर आलाय,
आणि त्यांची पिल्लं द्राक्षमळ्यांची नासधूस करत आहेत.”
१६ “मी माझ्या सख्याची आणि तो माझा आहे.+
तो भुईकमळांमध्ये+ कळप चारतोय.+
१७ माझ्या सख्या, लवकर परत ये.
वारा वाहण्याची वेळ होण्याआधी;* सावल्या नाहीशा होण्याआधी;
आपल्याला वेगळं करणाऱ्या या पर्वतांवरच्या* हरणासारखा;+ हरिणीच्या पाडसासारखा+ परत ये.
३ रात्री अंथरुणावर पडलेले असताना,
मला माझ्या प्राणसख्याची आठवण आली.+
त्याला पाहायला मी व्याकूळ झाले, पण तो नव्हता.+
२ मी उठून शहरात जाईन,
गल्लीबोळांत आणि चौकांत त्याला शोधीन.
मला माझ्या प्राणसख्याला शोधायचंय.
मी त्याला खूप शोधलं, पण तो दिसला नाही.
३ शहरात गस्त घालणारे पहारेकरी मला भेटले.+
मी त्यांना विचारलं, ‘माझा सखा तुम्हाला दिसला का?’
४ त्यांना सोडून पुढे जाताच,
मला माझा प्राणसखा भेटला.
मी त्याला बिलगले. मी त्याला जाऊ दिलं नाही.
शेवटी, मी त्याला माझ्या आईच्या घरी आणलं;+
जिने मला जन्म दिला, तिच्या आतल्या खोलीत मी त्याला आणलं.
५ यरुशलेमच्या मुलींनो, तुम्हाला शपथ आहे;
रानातल्या हरणांची आणि हरिणींची तुम्हाला शपथ आहे:
माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका.”+
६ “रानातून धुराच्या खांबांसारखं दिसणारं हे काय येतंय?
आणि व्यापाऱ्यांजवळच्या सगळ्या अत्तरांचा सुगंध दरवळतोय.”+
७ “ही तर शलमोनची पालखी आहे.
तिच्यासोबत इस्राएलच्या शूरवीरांपैकी
साठ वीर पुरुष चालत आहेत.+
८ त्या सगळ्यांच्या म्यानात तलवार आहे,
ते युद्धकलेत निपुण आहेत.
रात्रीच्या धोक्यांपासून संरक्षणासाठी,
प्रत्येकाच्या कमरेला तलवार आहे.”
९ “शलमोन राजाने स्वतःसाठी
लबानोनच्या वृक्षांपासून तयार करून घेतलेली,+
ही शाही पालखी आहे.
१० तिचे दांडे चांदीचे,
पाठ सोन्याची,
आणि बैठक जांभळ्या लोकरीची आहे.
यरुशलेमच्या मुलींनी तिला आतून
मोठ्या हौसेने सजवलंय.”
११ “सीयोनच्या मुलींनो, जा,
शलमोन राजाला पाहा.
त्याच्या लग्नाच्या दिवशी;
त्याला मनापासून आनंद झाला त्या दिवशी,
जो लग्नाचा मुकुट त्याच्या आईने+ त्याच्यासाठी बनवला होता, तो त्याने घातलाय.”
४ “माझ्या प्रिये, तू सुंदर आहेस!
खरंच, तू सुंदर आहेस!
तुझ्या ओढणीमागे, तुझे डोळे कबुतरांच्या डोळ्यांसारखे आहेत.
तुझे केस गिलादच्या पर्वतांवरून खाली येणाऱ्या,
बकऱ्यांच्या कळपासारखे आहेत.+
२ तुझे दात, नुकतीच लोकर कातरून
धुतलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखे आहेत.
सगळ्यांना जुळी आहेत,
एकीनेही आपलं मेंढरू गमावलेलं नाही.
३ तुझे ओठ गडद लाल रंगाच्या धाग्यासारखे आहेत,
तुझं बोलणं किती गोड आहे!
तुझ्या ओढणीमागे तुझे गाल,
डाळिंबाच्या फोडीसारखे आहेत.
४ तुझी मान,+ रांगेने दगड रचून बांधलेल्या
दावीदच्या बुरुजासारखी आहे.+
त्यावर हजार ढाली;
शूरवीरांच्या गोलाकार ढाली+ लटकवलेल्या आहेत.
८ माझ्या वधू, लबानोनहून माझ्यासोबत चल,
आपण लबानोनहून निघून जाऊ.+
अमानाच्या शिखरावरून, सनीरच्या शिखरावरून,
हर्मोनच्या शिखरावरून आपण खाली उतरू.+
सिंहांच्या गुहा असलेल्या पर्वतांवरून; चित्ते राहतात त्या पर्वतांवरून आपण खाली उतरू.
९ माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझं मन जिंकलं आहेस.+
एकाच नजरेने; तुझ्या हारातल्या एकाच मण्याने,
तू माझं मन जिंकलं आहेस.
१० माझ्या बहिणी, माझ्या वधू, तुझं प्रेम किती मोहक आहे.+
तुझं प्रेम द्राक्षारसाहून गोड आहे.+
तुझ्या सुवासिक तेलांचा सुगंध सगळ्या अत्तरांपेक्षा उत्तम आहे.+
११ माझ्या वधू, तुझ्या ओठांतून मध पाझरतो.+
दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहे.+
तुझ्या वस्त्रांचा सुगंध लबानोनच्या सुगंधासारखा आहे.
१२ माझी बहीण, माझी वधू बंदिस्त बागेसारखी आहे.
बंदिस्त बाग, जणू झाकलेला झरा.
१३ तू* डाळिंबांनी डवरलेल्या झाडांच्या बागेसारखी आहेस.
रसरशीत फळांच्या झाडांसोबत, तिथे मेंदीची आणि जटामांसीची* झाडंही आहेत.
आणि सर्व प्रकारच्या सुगंधी वनस्पती+ तिथे आहेत.
१५ तू बागेतला झरा आणि गोड्या पाण्याची विहीर आहेस;
तू लबानोनहून वाहणाऱ्या ओढ्यांसारखी आहेस.+
१६ हे उत्तरेच्या वाऱ्या, जागा हो!
हे दक्षिणेच्या वाऱ्या, तूही ये!
माझ्या बागेवर फुंकर घाल. *
तिचा सुगंध दरवळू दे.”
“माझ्या सख्याने त्याच्या बागेत यावं
आणि तिची रसरशीत फळं चाखावीत.”
५ “माझ्या बहिणी, माझ्या वधू,
मी आपल्या बागेत आलोय.+
माझा गंधरस आणि माझ्या सुगंधी वनस्पती मी घेतल्या आहेत.+
माझ्या मधाच्या पोळ्यातून मी मध खाल्ला आहे.”+
“प्रेमिकांनो, खा-प्या!
प्रेमरस पिऊन धुंद व्हा!”+
२ “मी झोपलेले आहे, पण माझं मन जागं आहे.+
ऐका! माझा सखा दार ठोठावतोय!
‘माझ्या बहिणी, माझ्या प्राणसखे,
माझ्या कबुतरा, माझ्या परमसुंदर सखे, माझ्यासाठी दार उघड.
माझं डोकं दवाने ओलं झालंय,
माझे केस रात्रीच्या दवबिंदूंनी भिजले आहेत.’+
३ मी आपली वस्त्रं बदलली आहेत,
ती पुन्हा कशी घालू?
मी पाय धुतले आहेत,
ते पुन्हा कसे मळवू?
४ माझ्या सख्याने दारातल्या झरोक्यातून हात काढून घेतला;
तेव्हा माझं मन त्याच्यासाठी आतुर झालं.
५ माझ्या सख्यासाठी दार उघडायला मी उठले;
माझे हात गंधरसाने ओले झाले होते,
माझ्या बोटांवरून गंधरसाचं तेल,
दाराच्या अडसरावर ओघळलं.
६ मी माझ्या सख्यासाठी दार उघडलं,
पण तो तिथे नव्हता, तो निघून गेला होता.
तो गेला हे पाहून माझं मन दुःखाने सैरभैर झालं. *
मी त्याला खूप शोधलं, पण तो सापडला नाही.+
मी हाक मारत राहिले, पण त्याने उत्तर दिलं नाही.
७ शहरात गस्त घालणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
त्यांनी मला मारलं, मला जखमी केलं.
भिंतीवरच्या पहारेकऱ्यांनी माझी ओढणी* ओढून घेतली.
८ यरुशलेमच्या मुलींनो, तुम्हाला शपथ आहे:
जर तुम्हाला माझा सखा दिसला,
तर त्याला सांगा, मी त्याच्या प्रेमासाठी तळमळत आहे.”
९ “हे सर्वात सुंदर मुली, आम्हाला सांग,
तुझा सख्यात असं काय आहे, जे इतरांमध्ये नाही?
तुझ्या सख्यात असं काय आहे, की तू आम्हाला अशी शपथ घालतेस?”
१० “माझा सखा तेजस्वी आणि देखणा* आहे;
तो दहा हजारांमध्ये उठून दिसतो.
११ त्याचं डोकं सगळ्यात उत्तम सोन्यासारखं आहे,
त्याचे केस डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत;
त्याचे कुरळे केस हवेत तरंगणाऱ्या खजुराच्या फांद्यांसारखे* आहेत.
जणू दुधात डुबक्या मारणाऱ्या कबुतरांसारखे ते आहेत.
१३ त्याचे गाल सुगंधी फुलझाडांच्या ताटव्यांसारखे;+
सुवासिक वनस्पती लावलेल्या उंचवट्यांसारखे आहेत.
त्याचे ओठ भुईकमळांसारखे आहेत, त्यांतून गंधरस पाझरतो.+
१४ त्याच्या हातांची बोटं चंद्रकांत रत्नं जडवलेल्या, सोन्याच्या नळ्यांसारखी आहेत.
त्याचं शरीर नीलमण्यांनी सजवलेल्या, लखलखत्या हस्तिदंतासारखं आहे.
१५ त्याचे पाय, शुद्ध सोन्याच्या बैठकांवर बसवलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत.
त्याचं रूप लबानोनसारखं आहे; तो देवदार वृक्षांसारखा उंचापुरा आहे.+
१६ त्याच्या ओठांच्या* गोडव्याचं मी काय वर्णन करू!
त्याची प्रत्येक गोष्ट मोहक आहे.+
यरुशलेमच्या मुलींनो, असा आहे माझा सखा, माझा प्राणसखा!”
६ “हे सर्वात सुंदर मुली,
कुठे आहे तुझा सखा?
तो कोणत्या वाटेने गेला?
आम्हीही तुझ्यासोबत त्याला शोधतो.”
२ “माझा सखा त्याच्या बागेत;
त्याच्या सुगंधी वनस्पतींच्या ताटव्यांजवळ गेलाय.
तो बागांमध्ये मेंढरं चारायला
आणि भुईकमळं तोडायला गेलाय.+
३ मी माझ्या सख्याची
आणि तो माझा आहे.+
तो भुईकमळांमध्ये कळप चारतोय.”+
आपल्या झेंड्यांभोवती उभ्या असलेल्या सैन्यांसारखी तू विस्मयकारक आहेस.+
तुझे केस गिलादच्या उतारांवरून खाली येणाऱ्या
बकऱ्यांच्या कळपासारखे आहेत.+
६ तुझे दात धुतलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखे आहेत.
सगळ्यांना जुळी आहेत,
एकीनेही आपलं मेंढरू गमावलेलं नाही.
७ तुझ्या ओढणीमागे तुझे गाल,
डाळिंबाच्या फोडीसारखे आहेत.
८ मला ६० राण्या,
८० उपपत्नी आहेत.
इतरही अगणित स्त्रिया आहेत.+
९ पण, कबुतरासारखी असलेली माझी परमसुंदर सखी एकच आहे.+
तिच्या आईची एकुलती एक.
तिला जन्म देणाऱ्या तिच्या आईची ती लाडकी आहे.
मुली तिला पाहून, तिचं कौतुक करतात;
राण्या आणि उपपत्नी तिची प्रशंसा करतात.
१० ‘पहाटेसारखी उजळ,
चंद्रासारखी सुंदर
आणि सूर्यप्रकाशासारखी निर्मळ अशी ही कोण आहे?
आपल्या झेंड्यांभोवती उभ्या असलेल्या सैन्यांसारखी विस्मयकारक, अशी ही कोण आहे?’ ”+
११ “खोऱ्यातली हिरवीगार झाडंझुडपं पाहायला,
मी अक्रोडच्या बागेत गेले.+
द्राक्षवेलींना कळ्या आल्या* की नाही,
डाळिंबांच्या झाडांना मोहर आला की नाही, हे पाहायला मी गेले.
१२ पण माझ्या या उत्सुकतेमुळे
मी नकळत राजाच्या लोकांच्या
रथांजवळ आले.”
१३ “हे शुलेमच्या मुली, ये ना, परत ये ना,
ये ना!
आम्हाला पुन्हा तुझं रूप पाहू दे!”
“शुलेमच्या मुलीकडे तुम्ही का पाहता?”+
“ती महनाइमच्या नृत्यासारखी* आहे!”
७ “हे चारित्र्यवान मुली,
जोड्यांमध्ये तुझे पाय किती सुंदर दिसतात!
तुझ्या सुडौल मांड्या दागिन्यांसारख्या;
कारागिराने घडवलेल्या अलंकारांसारख्या सुरेख आहेत.
२ तुझी नाभी गोल प्याल्यासारखी आहे,
ती नेहमी द्राक्षारसाने भरलेली राहो.
तुझं पोट म्हणजे गव्हाची रास,
त्याच्या सभोवती भुईकमळं आहेत.
४ तुझी मान+ हस्तिदंताच्या बुरुजासारखी आहे.+
तुझे डोळे+ बाथ-रब्बीमच्या फाटकाजवळ असलेल्या
हेशबोनमधल्या+ तळ्यांसारखे आहेत.
तुझं नाक दिमिष्कसमोर असलेल्या
लबानोनच्या बुरुजासारखं आहे.
५ तुझं मस्तक कर्मेलच्या+ शिखरासारखं आहे.
तुझे केस*+ जांभळ्या लोकरीसारखे+ आहेत.
तुझ्या लांब केसांनी राजाला भुरळ पाडली* आहे.
६ प्रिये, तू किती सुंदर, किती रूपवान आहेस;
मनाला सुख देणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा तू श्रेष्ठ आहेस!
७ तुझा बांधा खजुराच्या झाडासारखा आहे
आणि तुझे स्तन खजुरांच्या गुच्छांसारखे आहेत.+
८ मी म्हणालो, ‘मी फळं तोडायला
खजुराच्या झाडावर चढीन.’
तुझे स्तन द्राक्षांच्या गुच्छांसारखे राहोत,
तुझ्या श्वासातून सफरचंदांचा सुगंध दरवळत राहो.
९ तुझ्या ओठांतून* उत्तम द्राक्षारस पाझरत राहो.”
“हा द्राक्षारस माझ्या सख्याच्या ओठांतून अलगद उतरो,
त्यामुळे गोड झोप लागते.
१० मी माझ्या सख्याची आहे,+
त्याला माझीच ओढ लागली आहे.
११ माझ्या सख्या, चल
आपण रानात जाऊ;
मेंदीच्या झाडांमध्ये विसावा घेऊ.+
१२ पहाटेच उठून आपण द्राक्षमळ्यांत जाऊन
तिथे मी तुझ्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करीन.+
माझ्या सख्या, मी ती तुझ्यासाठी ठेवली आहेत.
८ तू माझ्या आईचं दूध प्यायलेल्या
माझ्या भावासारखा असतास, तर किती बरं झालं असतं!
मग तू मला रस्त्यात भेटल्यावर मी तुझं चुंबन घेतलं असतं,+
आणि कोणीही मला नावं ठेवली नसती.
२ मी तुला माझ्या आईच्या घरात नेलं असतं,
जिने मला शिकवलं, तिच्या घरी मी तुला नेलं असतं.+
मी तुला चांगला द्राक्षारस,
डाळिंबांचा ताजा रस प्यायला दिला असता.
३ त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता,
आणि उजव्या हाताने त्याने मला मिठी मारली असती.+
४ यरुशलेमच्या मुलींनो, तुम्हाला शपथ आहे:
माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका.”+
५ “आपल्या सख्याला बिलगून
रानातून ही कोण येत आहे?”
“तुझ्या आईने तुला जिथे जन्म दिला,
जिथे तिला प्रसूतीच्या कळा आल्या,
त्या सफरचंदाच्या झाडाखाली मी तुला जागं केलं.
कारण प्रेम मृत्यूइतकं ताकदवान+
आणि विश्वासूपणा कबरेसारखा* कठोर असतो.
त्याच्या ज्वाला धगधगत्या आगीसारख्या आहेत.
७ पाण्याचे लोट प्रेमाला विझवू शकत नाहीत+
आणि नद्या त्याला बुडवू शकत नाहीत.+
माणसाने प्रेमाच्या मोबदल्यात आपली सगळी संपत्ती जरी दिली,
तरी तिला* कवडीमोल लेखलं जाईल.”
तिला मागणी घालायला येतील
त्या दिवशी आम्ही तिचं काय करू?”
९ “जर ती भिंत असेल,
तर आम्ही तिच्यावर चांदीचा बुरूज बांधू,
पण जर ती दारासारखी असेल,
तर आम्ही देवदाराच्या फळीने तिला बंद करू.”
१० “मी भिंत आहे
आणि माझे स्तन बुरुजांसारखे आहेत.
माझा सखा पाहू शकतो,
की माझं मन शांत आहे.
११ बाल-हमोन इथे शलमोनचा एक द्राक्षमळा होता.+
त्याने आपला द्राक्षमळा माळ्यांकडे सोपवला.
प्रत्येक जण त्याला द्राक्षमळ्यातल्या फळांसाठी हजार चांदीचे तुकडे आणून द्यायचा.
१२ हे शलमोन, ते चांदीचे हजार तुकडे* तुझेच आहेत.
आणि दोनशे तुकडे माळ्यांचे आहेत.
मला तर माझा स्वतःचा द्राक्षमळा आहे.”
१३ “बागांमध्ये राहणाऱ्या मुली,+
माझे सोबती तुझा आवाज ऐकण्यासाठी थांबलेले आहेत.
मला तुझा आवाज ऐकू दे.”+
१४ “माझ्या प्राणसख्या, लवकर ये,
सुगंधी वनस्पतींच्या पर्वतांवरून
हरणासारखा,+
हरिणीच्या पाडसासारखा धावत ये.”
किंवा “उत्कृष्ट.”
शब्दशः “मला आपल्यामागे ओढून घे.”
किंवा “वर्णन करू.”
म्हणजे, तरुण मुली.
शब्दशः “काळी.”
किंवा “शोकाच्या ओढणीने.”
किंवा “माझ्या.”
किंवा कदाचित, “गुंफलेल्या केसांमध्ये.”
शब्दशः “जटामांसी.”
किंवा “महालाचे.”
शब्दशः “केशराचं फूल.”
शब्दशः “द्राक्षारसाच्या घरात.”
किंवा “पावसाळा.”
शब्दशः “दिवस श्वास घेण्याआधी.”
किंवा कदाचित, “भेगांच्या पर्वतांवरच्या.” किंवा “बेथेरच्या पर्वतांवरच्या.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “दिवस श्वास घेण्याआधी.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा कदाचित, “तुझी त्वचा.”
शब्दार्थसूची पाहा.
एक सुगंधी वनस्पती.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
गण २४:६ इथली तळटीप पाहा.
किंवा “हळूवार वाहा.”
किंवा कदाचित, “तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता.”
किंवा “शाल.”
शब्दशः “लालबुंद.”
किंवा कदाचित, “खजुरांच्या गुच्छांसारखे.”
किंवा कदाचित, “कारंज्याच्या काठांवर.”
शब्दशः “टाळू.”
किंवा “रम्य.”
किंवा “अंकुर फुटले.”
किंवा “दोन समूहांच्या नृत्यासारखी.”
किंवा “हरिणीच्या पाडसांसारखे.”
शब्दशः “तुझं डोकं.”
किंवा “कैद केलं.”
शब्दशः “टाळू.”
किंवा “अंकुर फुटले.”
बटाट्याच्या जातीचं, फळ देणारं एक झाड.
किंवा “शिक्क्यासारखं.”
किंवा “शिक्क्यासारखं.”
हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
किंवा कदाचित, “त्याला.”
किंवा “ती अजून वयात आलेली नाही.”
शब्दशः “ते हजार.”