निर्गम
१ इस्राएलसोबत* आपापलं कुटुंब घेऊन इजिप्तला* आलेल्या त्याच्या* मुलांची नावं अशी आहेत:+ २ रऊबेन, शिमोन, लेवी, आणि यहूदा;+ ३ इस्साखार, जबुलून, आणि बन्यामीन; ४ दान, नफताली, गाद, आणि आशेर.+ ५ याकोबपासून झालेल्या* त्याच्या वंशजांची* संख्या ७० होती. योसेफ आधीच इजिप्तमध्ये होता.+ ६ शेवटी योसेफ मरण पावला,+ तसंच त्याच्या सर्व भावांचा आणि त्या पिढीतल्या सर्व लोकांचाही मृत्यू झाला. ७ पुढे, इस्राएली लोक* फलदायी झाले आणि त्यांची संख्या खूप वाढू लागली. ते इतके शक्तिशाली झाले आणि इतक्या झपाट्याने वाढले, की त्यांनी संपूर्ण देश भरून टाकला.+
८ पण, त्यानंतर इजिप्तमध्ये एक दुसरा राजा राज्य करू लागला. त्याला योसेफबद्दल माहीत नव्हतं. ९ म्हणून तो त्याच्या लोकांना म्हणाला: “पाहा, इस्राएलचे लोक आपल्यापेक्षा संख्येने जास्त आणि शक्तिशाली आहेत.+ १० तर चला, आपण काहीतरी युक्ती करू या. नाहीतर ते असेच वाढत राहतील आणि जर युद्ध झालं, तर ते आपल्या शत्रूंना जाऊन मिळतील आणि आपल्याशी लढून, देश सोडून जातील.”
११ म्हणून इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांना सक्तीने मजुरी करायला लावून, त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी, गुलामांचे प्रमुख* नेमले.+ त्यांनी त्यांच्याकडून फारोसाठी पिथोम आणि रामसेस+ ही कोठारांची शहरं बांधून घेतली. १२ पण ते इस्राएली लोकांवर जितका अत्याचार करायचे, तितकेच ते वाढत जायचे आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यांत पसरत गेले. यामुळे इजिप्तच्या लोकांना त्यांची दहशत बसली आणि ते त्यांचा द्वेष करू लागले.+ १३ म्हणून इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांना गुलाम बनवलं आणि ते त्यांच्याकडून अतिशय कठोर मेहनत करून घेऊ लागले.+ १४ त्यांनी त्यांच्याकडून बांधकामाचा चुना आणि विटा बनवून घेतल्या. तसंच शेतातही त्यांच्याकडून कष्टाची कामं करून घेतली. त्यांनी त्यांचा निर्दयीपणे छळ केला आणि त्यांच्याकडून बळजबरीने सर्व प्रकारची कामं करून घेतली.+ यामुळे इस्राएली लोकांना आपला जीव नकोसा झाला.
१५ नंतर इजिप्तचा राजा, शिप्रा आणि पुवा या दोन इब्री सुइणींशी बोलला. १६ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही जेव्हा इब्री स्त्रियांना बाळंतपणात मदत करायला+ जाल, तेव्हा मुलगा झाला की मुलगी हे पाहा. जर मुलगा असेल तर त्याला मारून टाका, पण जर मुलगी असेल तर तिला जिवंत ठेवा.” १७ पण त्या सुइणी खऱ्या देवाला भिऊन वागणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाचं ऐकलं नाही. त्याऐवजी त्या सगळ्या मुलांना जिवंत ठेवायच्या.+ १८ काही काळाने इजिप्तच्या राजाने सुइणींना बोलावून त्यांना विचारलं: “तुम्ही मुलांना जिवंत का ठेवलं?” १९ तेव्हा त्या सुइणी फारोला म्हणाल्या: “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांसारख्या नाहीत. त्या इतक्या सुदृढ आहेत, की सुईण त्यांना मदत करायला जायच्या आधीच त्यांच्या मुलांचा जन्म झालेला असतो.”
२० म्हणून देवाने त्या सुइणींचं भलं केलं आणि इस्राएली लोक वाढत गेले आणि शक्तिशाली होत गेले. २१ त्या सुइणी खऱ्या देवाला भिऊन वागल्यामुळे, देवाने नंतर त्यांना मुलंबाळं दिली. २२ शेवटी फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली: “इब्री लोकांच्या प्रत्येक नवीन जन्मलेल्या मुलाला नाईल नदीत फेकून द्या. पण प्रत्येक मुलीला जिवंत ठेवा.”+
२ या काळात, लेवी वंशातल्या एका माणसाने आपल्याच वंशातल्या एका मुलीशी लग्न केलं.+ २ मग ती गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. आपलं बाळ खूप सुंदर आहे, हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवलं.+ ३ पण त्याला लपवणं आता शक्य नाही हे तिच्या लक्षात आलं,+ तेव्हा तिने एक लव्हाळ्याची* पेटी* घेऊन तिला डांबर* लावलं आणि तिने आपलं बाळ त्या पेटीत ठेवलं. मग तिने ती पेटी नाईल नदीच्या काठावर गवतात ठेवली. ४ आणि त्या बाळाची बहीण+ काही अंतरावर उभी राहून, त्याचं पुढे काय होतं हे पाहू लागली.
५ मग फारोची मुलगी नाईल नदीत अंघोळ करायला आली; तिच्या दासी नदीच्या कडेने चालत असताना, तिला गवतात ती पेटी दिसली आणि तिने लगेच आपल्या एका दासीला ती आणायला पाठवलं.+ ६ पेटी उघडल्यावर तिला ते बाळ दिसलं. तो मुलगा रडत होता. तिला त्याची दया आली, पण ती म्हणाली: “हे तर इब्री लोकांचं मूल आहे.” ७ तेव्हा त्याची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली: “मी जाऊन, या बाळाला दूध पाजण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी एका इब्री दाईला बोलावू का?” ८ फारोची मुलगी तिला म्हणाली: “जा!” तेव्हा ती मुलगी लगेच गेली आणि तिने बाळाच्या आईला+ बोलावून आणलं. ९ फारोची मुलगी तिला म्हणाली: “या मुलाला घेऊन जा आणि माझ्यासाठी याला दूध पाज आणि त्याची काळजी घे. मी तुला त्याची मजुरी देईन.” तेव्हा ती त्या मुलाला घेऊन गेली आणि त्याला दूध पाजून त्याची काळजी घेऊ लागली. १० मुलगा थोडा मोठा झाल्यावर, तिने त्याला फारोच्या मुलीकडे आणलं. फारोच्या मुलीने त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकारलं.+ तिने त्याचं नाव मोशे* ठेवलं आणि ती म्हणाली: “कारण मी याला पाण्यातून बाहेर काढलं.”+
११ नंतर, मोशे मोठा झाल्यावर,* त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना करावे लागणारे कष्ट पाहिले.+ त्याने इजिप्तच्या एका माणसाला, आपल्या इब्री भाऊबंदांपैकी एकाला मारताना पाहिलं. १२ त्याने इकडेतिकडे बघितलं आणि कोणी नाही हे पाहिल्यावर, त्याने इजिप्तच्या त्या माणसाला ठार मारून वाळूत लपवलं.+
१३ दुसऱ्या दिवशी मोशे पुन्हा बाहेर गेला, तेव्हा त्याला दोन इब्री माणसं मारामारी करताना दिसली. तेव्हा ज्याची चूक होती, त्याला तो म्हणाला: “आपल्या भावाला का मारतोस?”+ १४ यावर तो म्हणाला: “तुम्हाला आमचा अधिकारी आणि न्यायाधीश कोणी नेमलं? इजिप्तच्या त्या माणसाला ठार मारलं, तसं आता मलाही मारण्याचा विचार आहे का?”+ हे ऐकून मोशे घाबरला आणि मनात म्हणाला: “नक्कीच ही गोष्ट सगळ्यांना कळली असेल!”
१५ फारोला याविषयी समजलं, तेव्हा त्याने मोशेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून, मोशे फारोपासून दूर मिद्यान+ देशात पळून गेला. तिथे तो एका विहिरीजवळ जाऊन बसला. १६ मिद्यानच्या याजकाला+ सात मुली होत्या. त्या विहिरीवर येऊन हौदांमध्ये पाणी भरायच्या आणि आपल्या वडिलांच्या कळपांना पाणी पाजायच्या. १७ पण नेहमीप्रमाणे, मेंढपाळांनी येऊन त्यांना हाकलून लावलं. तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत केली* आणि त्यांच्या कळपांना पाणी पाजलं. १८ त्या घरी आपला पिता रगुवेल*+ याच्याकडे आल्या, तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज तुम्ही इतक्या लवकर कशा परत आलात?” १९ यावर त्या म्हणाल्या: “इजिप्तच्या एका माणसाने+ आम्हाला मेंढपाळांपासून वाचवलं. त्याने कळपांसाठी पाणीही काढून दिलं.” २० तो आपल्या मुलींना म्हणाला: “पण तो आहे कुठे? तुम्ही त्याला सोडून का आलात? त्याला आपल्याकडे जेवायला बोलवा.” २१ मग मोशे त्या माणसाकडे राहायला तयार झाला आणि त्या माणसाने आपली मुलगी सिप्पोरा+ हिच्याशी मोशेचं लग्न लावून दिलं. २२ पुढे तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला आणि त्याने त्याचं नाव गेर्षोम*+ ठेवलं. कारण तो म्हणाला, “मी एका परक्या देशात विदेशी झालोय.”+
२३ बऱ्याच वर्षांनी* इजिप्तचा राजा मरण पावला,+ पण इस्राएली लोक गुलामीमुळे कण्हत होते आणि दुःखाने रडत होते. गुलामगिरीत होत असलेल्या त्रासामुळे, ते सतत देवाकडे मदतीची याचना करायचे.+ २४ मग देवाने त्यांचं कण्हणं ऐकलं+ आणि त्याने अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी केलेल्या आपल्या कराराची आठवण केली.+ २५ तेव्हा देवाने इस्राएली लोकांकडे लक्ष दिलं आणि त्यांना होणारा त्रास पाहिला.
३ मोशे मेंढपाळ बनला आणि आपला सासरा, मिद्यानचा याजक इथ्रो+ याचे कळप चारू लागला. एकदा रानाच्या* पश्चिमेकडे कळपांना घेऊन जात असताना, तो खऱ्या देवाच्या पर्वताजवळ, म्हणजे होरेब पर्वताजवळ आला.+ २ तेव्हा, एका काटेरी झुडपात, आगीच्या ज्वालांमध्ये यहोवाचा* स्वर्गदूत त्याच्यासमोर प्रकट झाला.+ मोशे त्या झुडपाकडे पाहत असताना त्याला दिसलं, की त्या झुडपाला आग लागली आहे, पण ते जळत नाही. ३ म्हणून मोशे म्हणाला: “हा काय विचित्र प्रकार आहे आणि हे झुडूप जळत का नाही, हे जवळ जाऊन पाहायला हवं.” ४ मोशे ते पाहायला जवळ येत आहे हे यहोवाने पाहिलं, तेव्हा त्याने झुडपातून त्याला हाक मारून म्हटलं: “मोशे! मोशे!” तेव्हा मोशे म्हणाला: “मी इथे आहे.” ५ यावर तो म्हणाला: “आणखी पुढे येऊ नकोस. आपल्या पायांतले जोडे काढ, कारण जिथे तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे.”
६ तो पुढे म्हणाला: “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामचा देव,+ इसहाकचा देव+ आणि याकोबचा देव+ आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण खऱ्या देवाकडे पाहण्याची त्याला भीती वाटली. ७ मग यहोवा म्हणाला: “मी इजिप्तमध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांचं दुःख पाहिलंय. त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घेतलं जात असल्यामुळे, त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलाय. त्यांना किती यातना सोसाव्या लागत आहेत, हे मला चांगलं माहीत आहे.+ ८ म्हणून मी खाली जाऊन त्यांना इजिप्तच्या लोकांच्या हातून सोडवीन+ आणि त्यांना दूध आणि मध वाहत असलेल्या एका चांगल्या आणि मोठ्या देशात;+ म्हणजेच कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांच्या प्रदेशात नेईन.+ ९ पाहा! इस्राएलच्या लोकांचा आक्रोश माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि इजिप्तचे लोक त्यांचा किती क्रूरपणे छळ करत आहेत,+ हेही मी पाहिलंय. १० तर आता चल, मी तुला फारोकडे पाठवतो आणि तू माझ्या लोकांना, म्हणजे इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणशील.”+
११ पण मोशे खऱ्या देवाला म्हणाला: “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणणारा मी कोण?” १२ तेव्हा देव मोशेला म्हणाला: “मी तुझ्यासोबत असेन,+ आणि मीच तुला पाठवलं याचं चिन्ह हे असेल: तू इजिप्तमधून त्या लोकांना बाहेर आणल्यावर, तुम्ही याच पर्वतावर+ खऱ्या देवाची उपासना* कराल.”
१३ पण मोशे खऱ्या देवाला म्हणाला: “समजा मी इस्राएली लोकांकडे जाऊन त्यांना म्हणालो, की ‘तुमच्या पूर्वजांच्या देवाने मला तुमच्याकडे पाठवलं,’ आणि समजा त्यांनी मला विचारलं, की ‘त्याचं नाव काय?’+ तर मी त्यांना काय उत्तर देऊ?” १४ तेव्हा देव मोशेला म्हणाला: “मला जे व्हायचं आहे,* ते मी होईन.”*+ मग तो पुढे म्हणाला: “तू इस्राएली लोकांना सांग, ‘मी होईन, याने मला तुमच्याकडे पाठवलं आहे.’”+ १५ मग देव पुन्हा मोशेला म्हणाला:
“तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव,+ इसहाकचा देव+ आणि याकोबचा देव+ यहोवा, याने मला तुमच्याकडे पाठवलं आहे.’ हेच सर्वकाळासाठी माझं नाव आहे+ आणि याच नावाने मला पिढ्या न् पिढ्या ओळखलं जाईल. १६ म्हणून आता जा आणि इस्राएलच्या वडीलजनांना जमा कर आणि त्यांना म्हण, ‘तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव यहोवा माझ्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला: “माझं तुमच्याकडे लक्ष आहे+ आणि इजिप्तमध्ये तुमच्यासोबत काय केलं जातंय, हेही मी पाहिलंय. १७ म्हणून मी ठरवलंय, की तुमचा छळ करणाऱ्या इजिप्तच्या लोकांपासून मी तुम्हाला दूर नेईन+ आणि कनानी, हित्ती, अमोरी,+ परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ यांच्या प्रदेशात, दूध आणि मध वाहत असलेल्या देशात तुम्हाला नेईन.”’+
१८ ते तुझं म्हणणं नक्की ऐकतील+ आणि तुम्ही, म्हणजे तू आणि इस्राएलचे वडीलजन इजिप्तच्या राजासमोर जाऊन त्याला म्हणा: ‘इब्री लोकांचा देव यहोवा+ आमच्याशी बोललाय. म्हणून कृपा करून आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून ओसाड रानात जाऊ द्या, म्हणजे आम्हाला आमचा देव, यहोवा याला बलिदान अर्पण करता येईल.’+ १९ पण मला हे चांगलं माहीत आहे, की जोपर्यंत मी माझा शक्तिशाली हात इजिप्तच्या राजाविरुद्ध उचलणार नाही, तोपर्यंत तो तुम्हाला जायची परवानगी देणार नाही.+ २० म्हणून, मी इजिप्तच्या विरोधात माझा हात उगारून, तिथे बरीच अद्भुत कार्यं करीन आणि त्यानंतर तो तुम्हाला जाऊ देईल.+ २१ मी इजिप्तच्या लोकांना तुमच्यावर कृपा करायला लावीन आणि जेव्हा तुम्ही तिथून निघाल, तेव्हा तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही.+ २२ प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीकडून आणि आपल्या घरी राहणाऱ्या स्त्रीकडून सोन्याचांदीचे दागिने आणि कपडे मागावेत आणि ते आपल्या मुलामुलींच्या अंगावर घालावेत; अशा रितीने तुम्ही इजिप्तच्या लोकांना लुटाल.”+
४ तेव्हा मोशे म्हणाला: “पण कदाचित ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि ‘यहोवा तुझ्यासमोर प्रकट झालाच नाही,’ असं म्हणून ते कदाचित माझं ऐकणार नाहीत.”+ २ मग यहोवा त्याला म्हणाला: “तुझ्या हातात काय आहे?” तो म्हणाला: “काठी.” ३ यावर तो म्हणाला: “ती जमिनीवर फेक.” तेव्हा त्याने ती जमिनीवर फेकली आणि तिचा साप झाला.+ तेव्हा, मोशे तिथून पळाला. ४ यहोवा मोशेला म्हणाला: “हात पुढे करून त्याचं शेपूट धर.” तेव्हा त्याने हात पुढे करून ते धरलं आणि त्याची पुन्हा त्याच्या हातात काठी झाली. ५ मग देव म्हणाला: “यावरून ते विश्वास ठेवतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव यहोवा+ तुझ्यासमोर प्रकट झाला.”+
६ यहोवा पुन्हा त्याला म्हणाला: “तुझा हात अंगरख्याच्या आत छातीवर ठेव.” तेव्हा त्याने आपला हात अंगरख्याच्या आत छातीवर ठेवला. त्याने हात बाहेर काढला, तेव्हा तो कुष्ठरोगाने* बर्फासारखा पांढराफटक झाला होता!+ ७ मग तो त्याला म्हणाला: “तुझा हात पुन्हा अंगरख्याच्या आत छातीवर ठेव.” म्हणून त्याने आपला हात पुन्हा छातीवर ठेवला. त्याने हात बाहेर काढला, तेव्हा तो आधीसारखाच बरा झाला होता! ८ देव म्हणाला: “जर त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि पहिल्या चिन्हाकडे लक्ष दिलं नाही, तर ते दुसऱ्या चिन्हाकडे+ नक्कीच लक्ष देतील. ९ आणि जर त्यांनी या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही आणि तुझं ऐकलं नाही, तर तू नाईल नदीतलं थोडं पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत. तू ओतलेल्या पाण्याचं कोरड्या जमिनीवर रक्त होईल.”+
१० यानंतर मोशे यहोवाला म्हणाला: “मला माफ कर यहोवा, पण मला पूर्वीपासूनच नीट बोलता येत नाही. आधीही येत नव्हतं आणि तू तुझ्या या सेवकाशी बोललास, त्यानंतरही नाही. कारण माझी जीभ जड आहे.”+ ११ यहोवा त्याला म्हणाला: “माणसाला तोंड कोणी दिलं? आणि त्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी यहोवाच नाही का? १२ म्हणून आता जा आणि जेव्हा तू बोलशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन* आणि काय बोलायचं ते मी तुला शिकवीन.”+ १३ पण तो म्हणाला: “मला माफ कर यहोवा, तू कृपा करून दुसऱ्या कोणालातरी पाठव.” १४ तेव्हा यहोवा मोशेवर संतापला आणि त्याला म्हणाला: “बघ, तुझा भाऊ लेवी अहरोन+ तुला भेटायला येतोय. मला माहीत आहे की त्याला चांगलं बोलता येतं. तुला पाहिल्यावर त्याला खूप आनंद होईल.+ १५ तू त्याच्याशी बोल आणि मी तुला जे सांगितलं, ते त्याला सांग.+ तुम्ही बोलाल, तेव्हा मी तुमच्यासोबत असेन+ आणि तुम्ही काय करायला हवं, ते मी तुम्हाला शिकवीन. १६ तो तुझा प्रवक्ता* होऊन तुझ्या वतीने लोकांशी बोलेल आणि तू त्याच्यासाठी देवासारखा होशील.*+ १७ ही काठी हातात घेऊन तू बरीच चिन्हं करशील.”+
१८ त्यानंतर मोशे आपला सासरा इथ्रो+ याच्याकडे जाऊन म्हणाला: “माझ्या भाऊबंदांचं कसं चाललं आहे, हे पाहण्यासाठी कृपा करून मला इजिप्तला जाऊ द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला: “शांतीने जा.” १९ मग यहोवा मिद्यान देशात मोशेला म्हणाला: “इजिप्तला परत जा, कारण तुझ्या जिवावर उठलेले सगळे लोक मरण पावले आहेत.”+
२० तेव्हा मोशेने आपल्या बायकोला आणि मुलांना गाढवावर बसवलं आणि त्यांना घेऊन तो इजिप्तला जायला निघाला. त्याने खऱ्या देवाची काठीही सोबत घेतली. २१ मग यहोवा मोशेला म्हणाला: “मी तुला जे चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे, ते इजिप्तला परत गेल्यावर फारोसमोर करून दाखव.+ पण, मी त्याचं मन कठोर होऊ देईन+ आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही.+ २२ तू फारोला म्हण: ‘यहोवा असं म्हणतो: “इस्राएल माझा मुलगा, माझा प्रथमपुत्र आहे.+ २३ मी तुला सांगतो, माझ्या मुलाला माझी सेवा करण्यासाठी जाऊ दे. पण जर तू त्याला जाऊ दिलं नाहीस, तर मी तुझ्या मुलाला, तुझ्या प्रथमपुत्राला ठार मारीन.”’”+
२४ मग प्रवासात एका मुक्कामाच्या ठिकाणी यहोवा+ त्याला भेटला आणि तो त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करू लागला.+ २५ शेवटी, सिप्पोराने+ एक धारदार दगड* घेतला आणि आपल्या मुलाची सुंता केली आणि त्याची अग्रत्वचा त्याच्या पायावर ठेवली आणि म्हणाली: “कारण तू माझ्यासाठी रक्ताचा नवरा आहेस.” २६ तेव्हा त्याने त्याला जाऊ दिलं. त्या वेळी तिने सुंतेमुळे, “रक्ताचा नवरा” असं म्हटलं.
२७ मग यहोवा अहरोनला म्हणाला: “ओसाड रानात जाऊन मोशेला भेट.”+ तेव्हा तो गेला आणि खऱ्या देवाच्या पर्वतावर+ जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचं चुंबन घेतलं. २८ यहोवाने आपल्याला सांगितलेल्या सर्व गोष्टी,+ तसंच त्याने जी चिन्हं करण्याची आज्ञा दिली होती, त्या सगळ्या चिन्हांबद्दल,+ मोशेने अहरोनला सांगितलं. २९ त्यानंतर, मोशे आणि अहरोन यांनी जाऊन इस्राएलच्या सर्व वडीलजनांना एकत्र केलं.+ ३० यहोवाने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी अहरोनने त्यांना सांगितल्या आणि त्याने त्यांच्यासमोर ती सगळी चिन्हं करून दाखवली.+ ३१ तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला.+ यहोवाने इस्राएली लोकांकडे लक्ष दिलं आहे+ आणि त्यांचं दुःख पाहिलं आहे+ हे त्यांनी ऐकलं, तेव्हा त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं.
५ मग मोशे आणि अहरोन फारोकडे जाऊन त्याला म्हणाले: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘माझ्या लोकांनी ओसाड रानात माझ्यासाठी सण साजरा करावा, म्हणून त्यांना जाऊ दे.’” २ पण फारो म्हणाला: “हा यहोवा कोण आहे,+ की त्याचं ऐकून मी इस्राएलला जाऊ द्यावं?+ मी यहोवाला अजिबात ओळखत नाही, आणि मी इस्राएलला मुळीच जाऊ देणार नाही.”+ ३ पण ते म्हणाले: “इब्री लोकांचा देव आमच्याशी बोललाय. म्हणून, कृपा करा आणि आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून ओसाड रानात आमचा देव यहोवा याला बलिदान अर्पण करायला जाऊ द्या.+ नाहीतर, तो रोगराईने किंवा तलवारीने आम्हाला शिक्षा देईल.” ४ यावर इजिप्तचा राजा त्यांना म्हणाला: “मोशे आणि अहरोन, तुम्ही या लोकांना त्यांचं काम सोडून जायला का लावताय? जा, सर्व जण आपापल्या कामाला* लागा!”+ ५ तो पुढे म्हणाला: “देशातल्या इतक्या सगळ्या लोकांना तुमच्यामुळे काम थांबवावं लागेल!”
६ त्याच दिवशी फारोने अधिकाऱ्यांना* आणि त्यांच्या सहायकांना* अशी आज्ञा दिली: ७ “आजपासून या लोकांना विटा बनवण्यासाठी गवत देऊ नका.+ त्यांना स्वतः जाऊन ते गोळा करू द्या. ८ पण आधी ते बनवत होते, तितक्याच विटा त्यांना बनवायला लावा, त्यांत काही कमी करू नका. हे लोक आळशी झाले आहेत. म्हणूनच, ‘आम्हाला आमच्या देवाला बलिदान अर्पण करायला जायचंय,’ असा हट्ट ते करत आहेत. ९ त्यांच्याकडून आणखी मेहनत करून घ्या आणि त्यांना इतकं काम द्या, की असल्या खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”
१० तेव्हा, अधिकारी+ आणि सहायक लोकांकडे जाऊन त्यांना म्हणाले: “फारोने सांगितलंय, की ‘यापुढे मी तुम्हाला गवत देणार नाही. ११ तुम्ही स्वतः जाऊन, मिळेल तिथून गवत शोधून आणा. पण तुमचं काम अजिबात कमी होणार नाही.’” १२ तेव्हा ते लोक शेतांतून गवत* गोळा करायला इजिप्तच्या कानाकोपऱ्यांत गेले. १३ अधिकारी असं म्हणून त्यांच्या मागे लागायचे: “तुम्हाला गवत मिळायचं तेव्हा तुम्ही जितकं काम करायचा, तितकंच काम प्रत्येकाने रोज केलं पाहिजे.” १४ तसंच, इस्राएली लोकांमधून ज्या सहायकांना फारोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर नेमलं होतं, त्यांनाही त्यांनी चोपून काढलं.+ अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं: “तुम्ही आधी बनवत होता, तितक्या विटा का बनवल्या नाहीत? कालही कमी विटा तयार झाल्या आणि आजही.”
१५ तेव्हा इस्राएली सहायकांनी फारोकडे जाऊन अशी तक्रार केली: “तुम्ही आपल्या सेवकांशी असं का वागताय? १६ तुमच्या सेवकांना गवत दिलं जात नाही आणि तरी ते आम्हाला म्हणतात, ‘विटा बनवा!’ ते तुमच्या सेवकांना मारतात, पण खरंतर चूक तुमच्याच लोकांची आहे.” १७ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्ही आळशी आहात, आळशी!+ म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला यहोवाला बलिदान अर्पण करायला जायचंय.’+ १८ निघा इथून, आणि कामाला लागा! तुम्हाला गवत मिळणार नाही, पण विटा तितक्याच बनवाव्या लागतील!”
१९ “तुम्हाला रोज तितक्याच विटा बनवाव्या लागतील,” या आदेशामुळे आता आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत, हे इस्राएली सहायकांना कळलं. २० फारोला भेटून बाहेर आल्यावर, त्यांना मोशे आणि अहरोन भेटले. मोशे आणि अहरोन त्यांनाच भेटण्यासाठी तिथे वाट पाहत उभे होते. २१ तेव्हा ते मोशे आणि अहरोन यांना म्हणाले: “यहोवा तुम्हाला पाहून घेईल आणि तुम्हाला शिक्षा देईल, कारण तुमच्यामुळेच फारो आणि त्याचे सेवक आमचा द्वेष करू लागले आहेत. आम्हाला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात तलवार दिली आहे.”+ २२ तेव्हा मोशे यहोवाकडे वळून म्हणाला: “यहोवा, तू या लोकांवर संकट का आणलंस? तू मला यांच्याकडे का पाठवलंस? २३ जेव्हापासून मी तुझ्या नावाने फारोशी बोलायला त्याच्यासमोर गेलो,+ तेव्हापासून तो या लोकांचा आणखीनच छळ करू लागला आहे.+ तूही आपल्या लोकांना सोडवण्यासाठी काहीच केलं नाहीस.”+
६ मग यहोवा मोशेला म्हणाला: “मी आता फारोचं काय करतो, ते तू बघ.+ माझ्या लोकांना पाठवून द्यायला, मी माझ्या शक्तिशाली हाताने त्याला भाग पाडीन आणि माझ्या हाताचा पराक्रम पाहिल्यावर, त्याला माझ्या लोकांना आपल्या देशातून घालवून द्यावंच लागेल.”+
२ देव मोशेला पुढे म्हणाला: “मी यहोवा आहे. ३ मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्यासमोर सर्वशक्तिमान देव म्हणून प्रकट व्हायचो.+ पण यहोवा या माझ्या नावाने+ मी त्यांना माझी ओळख दिली नव्हती.+ ४ ज्या कनान देशात ते विदेशी म्हणून राहिले, तो देश त्यांना देण्यासाठी मी त्यांच्यासोबत माझा करारही केला.+ ५ आता इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांना गुलाम केल्यामुळे, त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलाय आणि माझ्या कराराची मला आठवण आहे.+
६ म्हणून इस्राएली लोकांना सांग: ‘मी यहोवा आहे आणि इजिप्तच्या लोकांनी तुमच्यावर लादलेल्या ओझ्याखालून मी तुम्हाला बाहेर काढीन; मी तुम्हाला त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करीन+ आणि त्यांना कठोर शिक्षा देऊन, माझ्या शक्तिशाली हाताने* तुम्हाला सोडवीन.+ ७ मी तुम्हाला माझे लोक म्हणून स्वीकारीन आणि तुमचा देव होईन.+ तुम्हाला इजिप्तच्या ओझ्याखालून बाहेर काढणारा, मीच तुमचा देव यहोवा आहे, याची तुम्हाला खातरी पटेल. ८ मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना जो देश देण्याची शपथ घेतली होती,* त्या देशात मी तुम्हाला घेऊन जाईन आणि तो देश तुमच्या मालकीचा होईल.+ मी यहोवा आहे.’”+
९ नंतर मोशेने हा निरोप इस्राएली लोकांना दिला. पण निराशेमुळे आणि गुलामगिरीत त्यांच्यावर होत असलेल्या क्रूर छळामुळे, त्यांनी मोशेचं ऐकलं नाही.+
१० मग यहोवा मोशेला म्हणाला: ११ “इजिप्तचा राजा फारो याच्याकडे जाऊन त्याला सांग, की इस्राएली लोकांना आपल्या देशातून जाऊ दे.” १२ पण मोशे यहोवाला म्हणाला: “इस्राएली लोकांनीच माझं ऐकलं नाही,+ तर फारो माझं कसं ऐकेल? त्यात, मला नीट बोलताही येत नाही.”+ १३ पण इस्राएली लोकांना इजिप्तच्या देशातून बाहेर आणण्यासाठी, त्यांना आणि इजिप्तचा राजा फारो याला कोणत्या आज्ञा द्यायच्या, हे यहोवाने पुन्हा मोशेला आणि अहरोनला सांगितलं.
१४ आपापल्या वडिलांच्या घराण्याचे प्रमुख असलेल्या पुरुषांची नावं ही आहेत: इस्राएलचा प्रथमपुत्र रऊबेन+ याला हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी ही मुलं झाली.+ ही रऊबेनपासून झालेली घराणी आहेत.
१५ शिमोनला यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, सोहर आणि एका कनानी स्त्रीपासून झालेला शौल ही मुलं झाली.+ ही शिमोनपासून झालेली घराणी आहेत.
१६ ही लेवीच्या+ वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावं आहेत: गेर्षोन, कहाथ आणि मरारी.+ लेवी एकूण १३७ वर्षं जगला.
१७ गेर्षोनला लिब्नी आणि शिमी ही मुलं झाली. त्यांच्यापासून त्यांच्या नावाची घराणी आली.+
१८ कहाथला अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल ही मुलं झाली.+ कहाथ एकूण १३३ वर्षं जगला.
१९ मरारीला महली आणि मूशी ही मुलं झाली.
ही लेव्यांच्या वंशावळीप्रमाणे त्यांची घराणी होती.+
२० अम्रामने आपल्या वडिलांची बहीण योखबेद हिच्याशी लग्न केलं.+ तिच्यापासून त्याला अहरोन आणि मोशे ही मुलं झाली.+ अम्राम एकूण १३७ वर्षं जगला.
२१ इसहारला कोरह,+ नेफेग आणि जिख्री ही मुलं झाली.
२२ उज्जियेलला मीशाएल, एलसाफान+ आणि सिथरी ही मुलं झाली.
२३ अहरोनने अम्मीनादाबची मुलगी आणि नहशोनची+ बहीण अलीशेबा हिच्याशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला नादाब, अबीहू, एलाजार आणि इथामार ही मुलं झाली.+
२४ कोरहला अस्सीर, एलकाना आणि अबीयासाफ ही मुलं झाली.+ ही कोरहपासून झालेली घराणी होती.+
२५ अहरोनचा मुलगा एलाजार+ याने पुटीयेल याच्या एका मुलीशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला फिनहास हा मुलगा झाला.+
ही लेव्यांच्या कुळांचे प्रमुख असलेल्या पुरुषांची, त्यांच्या घराण्यांनुसार नावं आहेत.+
२६ हेच ते अहरोन आणि मोशे आहेत, ज्यांना यहोवा म्हणाला: “इस्राएली लोकांना इजिप्त देशातून, गटागटाने* बाहेर आणा.”+ २७ इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्यासाठी, इजिप्तचा राजा फारो याच्याशी बोलणारे, हेच ते मोशे आणि अहरोन होते.+
२८ इजिप्त देशात यहोवा मोशेसोबत बोलला, त्या दिवशी २९ यहोवा मोशेला म्हणाला: “मी यहोवा आहे. मी तुला सांगत असलेल्या सर्व गोष्टी, इजिप्तचा राजा फारो याला सांग.” ३० तेव्हा मोशे यहोवाला म्हणाला: “पण, मला नीट बोलता येत नाही, तर फारो माझं कसं ऐकेल?”+
७ मग यहोवा मोशेला म्हणाला: “बघ, मी तुला फारोसाठी देवासारखं केलं आहे* आणि तुझा भाऊ अहरोन तुझा संदेष्टा होईल.+ २ मी तुला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी तुझा भाऊ अहरोन याला सांग आणि तो फारोशी बोलेल, म्हणजे फारो इस्राएली लोकांना आपल्या देशातून जाऊ देईल. ३ मी फारोचं मन कठोर होऊ देईन+ आणि इजिप्त देशात बरीच चिन्हं आणि चमत्कार करीन.+ ४ पण तरीही फारो तुमचं ऐकणार नाही. मग मी इजिप्तविरुद्ध माझी ताकद दाखवीन आणि इजिप्तला कठोर शिक्षा देऊन, माझ्या लोकांच्या मोठ्या समूहाला,* म्हणजेच इस्राएली लोकांना तिथून बाहेर काढीन.+ ५ मी इजिप्तविरुद्ध माझा हात उगारून इस्राएली लोकांना त्यांच्यामधून बाहेर आणीन. तेव्हा इजिप्तच्या लोकांना कळेल, की मी यहोवा आहे.”+ ६ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशे आणि अहरोन यांनी केलं. त्यांनी अगदी तसंच केलं. ७ मोशे आणि अहरोन फारोशी बोलले, तेव्हा मोशे ८० वर्षांचा आणि अहरोन ८३ वर्षांचा होता.+
८ यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: ९ “जर फारो तुम्हाला ‘चमत्कार करून दाखवा,’ असं म्हणाला, तर अहरोनला सांग, ‘तुझी काठी फारोसमोर जमिनीवर टाक.’ मग त्या काठीचा एक मोठा साप होईल.”+ १० तेव्हा मोशे आणि अहरोन फारोकडे गेले आणि यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी केलं. अहरोनने फारो आणि त्याचे सेवक यांच्यासमोर काठी जमिनीवर टाकली, तेव्हा तिचा एक मोठा साप झाला. ११ पण फारोने आपल्या विद्वानांना आणि जादूगारांना बोलावून घेतलं आणि इजिप्तमधल्या मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही+ आपल्या जादूने* तसाच चमत्कार केला.+ १२ त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपापली काठी जमिनीवर टाकली आणि त्या काठ्यांचे मोठे साप झाले. पण अहरोनच्या सापाने* त्यांच्या सापांना गिळून टाकलं. १३ तरीसुद्धा फारोचं मन कठोर झालं+ आणि यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.
१४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोचं मन हट्टी आहे.+ त्याने लोकांना जाऊ द्यायला नकार दिला आहे. १५ सकाळी फारोला जाऊन भेट. पाहा, तो नदीकडे जाईल, तेव्हा त्याला भेटायला तू नाईल नदीच्या काठावर उभा राहा. आणि जिचा साप झाला होता, ती तुझी काठीही सोबत घेऊन जा.+ १६ तू त्याला असं म्हण: ‘इब्री लोकांचा देव यहोवा, याने मला तुझ्याकडे पाठवलंय+ आणि तो म्हणतो: “माझ्या लोकांना ओसाड रानात माझी उपासना करायला जाऊ दे,” पण तू अजूनही त्याचं ऐकलेलं नाहीस. १७ म्हणून यहोवा असं म्हणतो: “आता मी जे करीन, त्यावरून तुला कळेल की मी यहोवा आहे.+ मी नाईल नदीच्या पाण्याला माझ्या हातातल्या काठीने मारीन आणि पाण्याचं रक्त होईल. १८ नाईल नदीतले मासे मरून जातील आणि पाण्याला वास सुटेल. इजिप्तचे लोक नाईलचं पाणी पिऊच शकणार नाहीत.”’”
१९ मग यहोवा मोशेला म्हणाला: “अहरोनला सांग: ‘तुझी काठी घेऊन इजिप्तच्या पाण्यावर; इथल्या नद्या, नाले,* तलाव+ आणि हौद यांवर तुझा हात उगार,+ म्हणजे त्यांतल्या पाण्याचं रक्त होईल.’ इजिप्तच्या संपूर्ण देशात, अगदी लाकडाच्या आणि दगडाच्या भांड्यांतही रक्त असेल.” २० मोशे आणि अहरोन यांनी लगेच यहोवाने सांगितल्याप्रमाणे केलं. अहरोनने आपली काठी उचलून ती फारो आणि त्याचे सेवक यांच्यादेखत नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतल्या सगळ्या पाण्याचं रक्त झालं.+ २१ नदीतले मासे मेले+ आणि पाण्याला वास येऊ लागला. इजिप्तच्या लोकांना नदीचं पाणी पिणं अशक्य झालं+ आणि संपूर्ण इजिप्त देशात रक्तच रक्त झालं.
२२ पण इजिप्तच्या मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही आपल्या गुप्त विद्येने तसंच केलं.+ त्यामुळे फारोचं मन कठोरच राहिलं आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे, त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.+ २३ मग फारो आपल्या घरी परत गेला आणि या गोष्टीचाही त्याच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. २४ इजिप्तचे सर्व लोक नाईलच्या आसपास सगळीकडे खोदू लागले, कारण ते नाईलचं पाणी पिऊ शकत नव्हते. २५ यहोवाने नाईलच्या पाण्याचं रक्त केलं, त्याला आता सात दिवस पूर्ण झाले होते.
८ मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोकडे जाऊन त्याला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील.+ २ तू त्यांना जाऊ द्यायला नकार देत राहिलास, तर मी तुझ्या सगळ्या प्रदेशावर बेडकांची पीडा आणीन.+ ३ नाईल नदी बेडकांनी भरून जाईल आणि ते तिथून तुझ्या घरात, झोपण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणात, तुझ्या सेवकांच्या घरांमध्ये, तुझ्या भट्ट्यांमध्ये आणि पीठ मळण्याच्या परातींमध्ये* शिरतील.+ ४ ते तुला, तुझ्या लोकांना आणि तुझ्या सगळ्या सेवकांना हैराण करून सोडतील.”’”
५ नंतर यहोवा मोशेला म्हणाला: “अहरोनला सांग, ‘तुझी काठी घेऊन नद्यांवर, नाईलच्या नाल्यांवर आणि तलावांवर तुझा हात उगार, म्हणजे त्यांमधून संपूर्ण इजिप्त देशात बेडूक येतील.’” ६ तेव्हा, अहरोनने इजिप्तच्या सगळ्या जलाशयांवर आपला हात उगारला आणि त्यांमधून बेडूक बाहेर येऊ लागले आणि संपूर्ण इजिप्त देश बेडकांनी भरून गेला. ७ पण, मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही आपल्या गुप्त विद्येने तसंच करून इजिप्त देशात बेडूक आणले.+ ८ मग फारोने मोशे आणि अहरोन यांना बोलावून म्हटलं: “मला आणि माझ्या लोकांना या बेडकांपासून सुटका मिळावी म्हणून यहोवाला विनंती कर.+ तुमच्या लोकांना यहोवाला बलिदान देता यावं, म्हणून मी त्यांना जाऊ द्यायला तयार आहे.” ९ यावर मोशे फारोला म्हणाला: “तुमच्यापासून, तुमच्या सेवकांपासून, तुमच्या लोकांपासून आणि तुमच्या घरांमधून बेडूक निघून जावेत अशी विनंती मी कधी करावी, हे सांगण्याचा मान मी तुम्हाला देतो. मग फक्त नाईल नदीतच बेडूक उरतील.” १० तेव्हा फारो म्हणाला: “उद्या.” मग मोशे म्हणाला: “तुम्ही म्हणता तसंच होईल आणि यावरून तुम्हाला कळेल, की आमचा देव यहोवा याच्यासारखा दुसरा कोणी नाही.+ ११ तुमच्यापासून, तुमच्या सेवकांपासून, तुमच्या लोकांपासून आणि तुमच्या घरांमधून बेडूक निघून जातील आणि ते फक्त नाईल नदीतच उरतील.”+
१२ तेव्हा मोशे आणि अहरोन फारोसमोरून निघून गेले. यहोवाने फारोवर आणलेली बेडकांची पीडा काढून टाकण्यासाठी मोशेने त्याला विनंती केली.+ १३ मग यहोवाने मोशेची विनंती ऐकली आणि घरांमधले, अंगणांमधले आणि शेतांमधले सगळे बेडूक मरू लागले. १४ लोकांनी ते गोळा करून त्यांचे पुष्कळ ढीग केले आणि सगळ्या देशात घाण वास सुटला. १५ आपली सुटका झाली आहे, हे पाहिल्यावर फारोने पुन्हा आपलं मन कठोर केलं.+ यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.
१६ मग यहोवा मोशेला म्हणाला: “अहरोनला सांग, ‘आपली काठी उगारून ती जमिनीच्या धुळीवर मार, म्हणजे त्या धुळीची संपूर्ण इजिप्त देशात चिलटं* होतील.’” १७ त्यांनी तसंच केलं. अहरोनने आपल्या हातातली काठी उगारून, ती जमिनीच्या धुळीवर मारली. तेव्हा इजिप्तच्या संपूर्ण देशातल्या धुळीची चिलटं होऊन, ती सगळ्या माणसांना आणि प्राण्यांना त्रास देऊ लागली.+ १८ मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही आपल्या गुप्त विद्येने चिलटं बनवण्याचा प्रयत्न केला,+ पण त्यांना ते जमलं नाही आणि सगळ्या माणसांना आणि प्राण्यांना चिलटं हैराण करू लागली. १९ तेव्हा मंत्रतंत्र करणारे पुजारी फारोला म्हणाले: “यामागे देवाचा हात* आहे!”+ पण फारोचं मन कठोरच राहिलं आणि यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.
२० मग यहोवा मोशेला म्हणाला: “पहाटे ऊठ आणि फारो जेव्हा नदीकडे जाईल, तेव्हा त्याच्यासमोर जाऊन उभा राहा. त्याला असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील. २१ पण, तू त्यांना जाऊ दिलं नाहीस, तर मी तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या लोकांवर आणि तुमच्या घरांमध्ये गोमाश्या* पाठवीन. इजिप्तची सगळी घरं गोमाश्यांनी भरून जातील. इतकंच काय, तर ते* राहतात ती सगळी जमीनही गोमाश्यांनी झाकून जाईल. २२ त्या दिवशी मी जे करीन, त्यामुळे माझे लोक राहतात तो गोशेन प्रांत वेगळा दिसेल. तिथे एकही गोमाशी नसेल+ आणि यावरून तुला कळेल की मी यहोवा, या देशात आहे.+ २३ अशा रितीने, मी माझ्या आणि तुझ्या लोकांमध्ये फरक करीन. हे चिन्ह उद्या घडेल.”’”
२४ यहोवाने तसंच केलं. गोमाश्यांचे थवेच्या थवे फारोच्या आणि त्याच्या सेवकांच्या घरांमध्ये, तसंच, संपूर्ण इजिप्त देशात शिरले;+ आणि त्यांनी सगळ्या देशाची नासधूस केली.+ २५ शेवटी फारोने मोशे आणि अहरोन यांना बोलावून म्हटलं: “जा, तुमच्या देवाला याच देशात बलिदान अर्पण करा.” २६ पण मोशे म्हणाला: “आम्ही असं करू शकत नाही, कारण आम्ही आमचा देव, यहोवा याला जी बलिदानं अर्पण करू, ती इजिप्तच्या लोकांना किळसवाणी वाटतील.+ जर आम्ही त्यांच्यादेखत त्यांना किळसवाणी वाटणारी बलिदानं अर्पण केली, तर ते आम्हाला दगडमार करतील. २७ आम्ही तीन दिवस प्रवास करून ओसाड रानात जाऊ आणि आमचा देव यहोवा याने सांगितल्याप्रमाणे, तिथे त्याला बलिदानं अर्पण करू.”+
२८ तेव्हा फारो म्हणाला: “तुमचा देव यहोवा याला बलिदानं अर्पण करण्यासाठी, मी तुम्हाला ओसाड रानात जाऊ देईन. पण फार लांब जाऊ नका. माझ्या वतीने तुमच्या देवाला विनंती करा.”+ २९ यावर मोशे म्हणाला: “आता मी जातो आणि यहोवाला विनंती करतो. मग उद्या फारोपासून, तुमच्या सेवकांपासून आणि तुमच्या लोकांपासून गोमाश्या निघून जातील. पण यहोवाला बलिदान अर्पण करायला जाण्यापासून अडवून, फारोने आम्हाला फसवू नये.”+ ३० मग मोशे फारोसमोरून निघून गेला आणि त्याने यहोवाला विनंती केली.+ ३१ तेव्हा यहोवाने मोशेची विनंती ऐकली आणि फारोपासून, त्याच्या सेवकांपासून आणि त्याच्या लोकांपासून गोमाश्या निघून गेल्या. एकही गोमाशी उरली नाही. ३२ पण फारोने पुन्हा आपलं मन कठोर केलं आणि त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.
९ मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोकडे जाऊन त्याला असं सांग, ‘इब्री लोकांचा देव यहोवा म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील.+ २ पण जर तू त्यांना अडवलंस आणि जाऊ दिलं नाहीस, ३ तर बघ! यहोवाचा हात+ तुझ्या जनावरांविरुद्ध उठेल. तुझ्या घोड्यांवर, गाढवांवर, उंटांवर, गुराढोरांवर आणि मेंढरांवर भयानक पीडा येईल.+ ४ यहोवा इस्राएलच्या आणि इजिप्तच्या जनावरांमध्ये नक्कीच फरक करेल. इस्राएली लोकांचं एकही जनावर मरणार नाही.”’”+ ५ मग यहोवाने एक वेळही ठरवली आणि तो म्हणाला: “उद्या यहोवा या देशात असं करेल.”
६ यहोवाने दुसऱ्याच दिवशी तसं केलं. इजिप्तची सगळी जनावरं मरू लागली,+ पण इस्राएलच्या जनावरांपैकी एकही मेलं नाही. ७ फारोने चौकशी केली तेव्हा इस्राएलच्या जनावरांपैकी एकही मेलं नव्हतं. तरीही फारोचं मन हट्टीच राहिलं आणि त्याने लोकांना जाऊ दिलं नाही.+
८ मग यहोवाने मोशे आणि अहरोन यांना म्हटलं: “तुमच्या दोन्ही हातांमध्ये भट्टीतली राख घ्या आणि मोशे ती राख फारोसमोर हवेत फेकेल. ९ त्या राखेची संपूर्ण इजिप्त देशात बारीक धूळ होईल आणि त्या धुळीचे देशातल्या प्रत्येक माणसावर आणि जनावरावर फोड* होतील.”
१० तेव्हा त्यांनी भट्टीतून राख घेतली आणि ते फारोसमोर उभे राहिले. मग मोशेने ती राख हवेत फेकली आणि त्या राखेचे माणसांवर आणि जनावरांवर फोड येऊ लागले. ११ फोड आल्यामुळे मंत्रतंत्र करणारे पुजारी मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत. त्यांना आणि इजिप्तच्या सर्व लोकांना फोड आले होते.+ १२ पण यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं. यहोवाने मोशेला सांगितलं होतं, त्याप्रमाणे फारोने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.+
१३ मग यहोवा मोशेला म्हणाला: “पहाटे ऊठ आणि फारोसमोर जाऊन त्याला असं सांग, ‘इब्री लोकांचा देव यहोवा म्हणतो: “माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील. १४ आता मी माझे सगळे वार तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर आणि तुझ्या लोकांवर करीन, म्हणजे तुला कळेल की सगळ्या पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही.+ १५ आतापर्यंत मी माझा हात उगारून तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर भयानक पीडा आणली असती आणि या पृथ्वीवरून तुझा पूर्णपणे नाश केला असता. १६ पण, तुला माझी ताकद दाखवण्यासाठी आणि माझं नाव संपूर्ण पृथ्वीवर जाहीर करण्यासाठी, मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.+ १७ माझ्या लोकांना अडवून, तू त्यांच्याशी अजूनही मगरूरपणे वागत आहेस का? १८ बघ, उद्या याच वेळी मी गारांचा पाऊस पाडीन. इजिप्त देश निर्माण झाल्यापासून आजपर्यंत कधीच असा पाऊस पडला नसेल! १९ म्हणून शेतात असलेली तुझी सगळी जनावरं आणि इतर सर्वकाही आत घेऊन ये. त्यांना जर आत आणलं नाहीस, तर जेव्हा गारा पडतील तेव्हा शेतात असलेला प्रत्येक माणूस आणि जनावर मरून जाईल.”’”
२० फारोच्या सेवकांपैकी ज्यांनी यहोवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला,* त्यांनी लगेच आपल्या सेवकांना आणि आपल्या जनावरांना घरांमध्ये आणलं. २१ पण ज्यांनी यहोवाच्या शब्दांवर विश्वास ठेवला नाही, त्यांनी आपल्या सेवकांना आणि जनावरांना शेतातच राहू दिलं.
२२ मग यहोवा मोशेला म्हणाला: “आपला हात आकाशाकडे उगार, म्हणजे संपूर्ण इजिप्त देशातल्या माणसांवर, जनावरांवर आणि सगळ्या झाडाझुडपांवर गारांचा पाऊस पडेल.”+ २३ तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाच्या दिशेने उगारली आणि यहोवाने ढगांचा गडगडाट करून गारांचा पाऊस पाडला आणि जमिनीवर आग* पडू लागली. यहोवाने इजिप्तच्या संपूर्ण देशात गारांचा पाऊस पाडला. २४ गारांचा पाऊस पडत असताना, आगीच्या ज्वाला दिसत होत्या. पाऊस इतका मोठा होता, की इजिप्त देश निर्माण झाल्यापासून कधीच असा पाऊस पडला नव्हता.+ २५ इजिप्त देशात गारांचा पाऊस पडल्यामुळे, शेतांत असलेल्या माणसांचा, जनावरांचा, पिकांचा आणि झाडाझुडपांचा नाश झाला.+ २६ फक्त इस्राएली लोक राहत असलेल्या गोशेन प्रांतात गारा पडल्या नाहीत.+
२७ तेव्हा फारोने मोशे आणि अहरोन यांना बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “या वेळी मी पाप केलं आहे. मी आणि माझे लोक चुकलो, पण यहोवा नीतिमान आहे. २८ हा गडगडाट आणि गारा थांबवण्यासाठी यहोवाला विनंती करा. मग मी तुम्हाला जाऊ देईन आणि तुम्हाला इथे थोडा वेळही थांबण्याची गरज नाही.” २९ तेव्हा मोशे त्याला म्हणाला: “शहराबाहेर जाताच मी यहोवाकडे हात पसरून विनंती करीन आणि हा गडगडाट आणि गारांचा पाऊस थांबेल. यावरून तुम्हाला कळेल, की ही पृथ्वी यहोवाची आहे.+ ३० पण मला माहीत आहे, की तुम्ही आणि तुमचे सेवक यानंतरही यहोवा देवाला घाबरणार नाही.”
३१ तेव्हा, अळशीच्या* आणि जवाच्या पिकांचा नाश झाला, कारण जवाला कणसं आली होती आणि अळशीला कळ्या आल्या होत्या. ३२ पण गव्हाचं* पीक उशिरा* येत असल्यामुळे त्याचा नाश झाला नव्हता. ३३ मग मोशे फारोसमोरून निघून शहराबाहेर गेला आणि त्याने यहोवासमोर हात पसरून त्याला विनंती केली. त्यानंतर गडगडाट बंद झाला आणि पृथ्वीवर गारांचा पाऊस पडायचा थांबला.+ ३४ गडगडाट बंद झाला आहे आणि गारांचा पाऊस थांबला आहे, हे पाहून फारोने आणि त्याच्या सेवकांनी पुन्हा आपलं मन कठोर करून पाप केलं.+ ३५ अशा रितीने फारोचं मन कठोरच राहिलं आणि यहोवाने मोशेद्वारे जसं सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.+
१० मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोकडे जा. बघ, मी त्याचं आणि त्याच्या सेवकांचं मन कठोर होऊ दिलं आहे.+ म्हणजे मला त्याच्यादेखत, माझी ही चिन्हं दाखवता येतील.+ २ मी इजिप्तला किती कडक शिक्षा दिली आणि तिथे कोणती चिन्हं दाखवली, हे तू तुझ्या मुलांना आणि नातवंडांना सांग.+ यावरून तुम्हाला कळेल, की मी यहोवा आहे.”
३ तेव्हा मोशे आणि अहरोन फारोसमोर गेले आणि त्याला म्हणाले: “इब्री लोकांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘तू माझ्यासमोर झुकायला कधीपर्यंत नकार देत राहशील?+ माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करू शकतील. ४ तू असाच माझ्या लोकांना जाऊ द्यायला नकार देत राहिलास, तर बघ मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन. ५ टोळांनी सगळी पृथ्वी झाकून जाईल आणि जमीनही दिसणार नाही. जे गारांपासून उरलं, ते टोळ खाऊन टाकतील. शेतात वाढत असलेली सगळी झाडं ते फस्त करतील.+ ६ तुझी, तुझ्या सेवकांची आणि इजिप्तमधली सगळी घरं टोळांनी भरून जातील. या देशात तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत कधी पाहिले नसतील, इतके टोळ येतील.’”+ असं बोलून तो फारोसमोरून निघून गेला.
७ तेव्हा फारोचे सेवक त्याला म्हणाले: “हा माणूस कधीपर्यंत आपल्याला असाच त्रास* देत राहील? त्या लोकांना त्यांच्या यहोवा देवाची उपासना करायला जाऊ द्या. इजिप्त देशाचा नाश झालाय, हे तुम्हाला अजूनही कसं कळत नाही?” ८ मग मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोसमोर आणण्यात आलं. फारो त्यांना म्हणाला: “जा, तुमचा देव यहोवा याची उपासना करा; फक्त कोणकोण जाणार ते सांगा.” ९ यावर मोशे म्हणाला: “आम्ही आमच्या लहानमोठ्यांना, मुलामुलींना, मेंढरांना आणि गुराढोरांना घेऊन जाऊ,+ कारण आम्हाला यहोवासाठी सण साजरा करायचा आहे.”+ १० तेव्हा फारो म्हणाला: “मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना पाठवीन, असं तुम्हाला खरंच वाटतं का? असं झालं तर मग यहोवा नक्की तुमच्यासोबत आहे!+ मला माहीत आहे, यामागे तुमचा काहीतरी वाईट हेतू आहे. ११ पण मी तो पूर्ण होऊ देणार नाही. फक्त तुमच्यातले पुरुष जाऊन यहोवाची उपासना करू शकतात, कारण तुम्ही हीच मागणी केली होती.” मग त्यांना फारोसमोरून घालवून देण्यात आलं.
१२ त्यानंतर यहोवा मोशेला म्हणाला: “इजिप्त देशावर आपला हात उगार, म्हणजे टोळ येऊन देशातलं सगळं पीक खाऊन टाकतील. जे गारांपासून उरलं, ते सगळं टोळ फस्त करतील.” १३ मोशेने लगेच आपली काठी इजिप्तवर उगारली आणि यहोवाने सबंध दिवस आणि सबंध रात्र पूर्वेकडचा वारा देशात वाहायला लावला. सकाळ झाली आणि पूर्वेकडच्या वाऱ्यासोबत टोळ आले. १४ इजिप्तच्या संपूर्ण देशात टोळ पसरले आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले.+ ही पीडा खूप मोठी होती.+ याआधी कधीच इतके टोळ आले नव्हते आणि यापुढे कधीही येणार नव्हते. १५ टोळांनी सगळी जमीन झाकून टाकली आणि देशात त्यांच्यामुळे अंधार पडला. गारांपासून उरलेलं सगळं पीक आणि झाडांवरची सगळी फळं त्यांनी फस्त केली. इजिप्तच्या शेतांमध्ये आणि झाडांवर काहीच हिरवळ उरली नाही.
१६ तेव्हा फारोने लगेच मोशे आणि अहरोन यांना बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “तुमचा देव यहोवा आणि तुमच्याविरुद्ध मी पाप केलं आहे. १७ आता कृपा करून एकदाच माझं हे पाप माफ करा आणि तुमचा देव यहोवा याला विनंती करा, की त्याने ही भयंकर पीडा माझ्यापासून दूर करावी.” १८ तेव्हा तो* फारोसमोरून निघून गेला आणि त्याने यहोवाला विनंती केली.+ १९ मग यहोवाने वाऱ्याची दिशा बदलली आणि पश्चिमेकडून जोराचा वारा वाहू लागला. त्या वाऱ्याने सगळ्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात बुडवलं. संपूर्ण इजिप्त देशात एकही टोळ उरला नाही. २० पण यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं+ आणि फारोने इस्राएली लोकांना जाऊ दिलं नाही.
२१ मग यहोवा मोशेला म्हणाला: “आपला हात वर आकाशाकडे उगार, म्हणजे संपूर्ण इजिप्त देशात काळाकुट्ट अंधार पडेल.” २२ मोशेने लगेच आपला हात आकाशाकडे उगारला आणि संपूर्ण इजिप्त देशात तीन दिवस काळाकुट्ट अंधार पडला.+ २३ तीन दिवस इजिप्तचे लोक एकमेकांना पाहू शकले नाहीत आणि कोणीच जागचं हललं नाही. पण इस्राएली लोक राहत होते तिथे उजेड होता.+ २४ मग फारो मोशेला बोलावून म्हणाला: “जा यहोवाची उपासना करा.+ तुमच्या मुलांनाही घेऊन जा. पण तुमची मेंढरं आणि गुरंढोरं इथेच राहतील.” २५ तेव्हा मोशे म्हणाला: “आमचा देव यहोवा याला अर्पण करण्यासाठी बलिदानं आणि होमार्पणं,+ तुम्ही स्वतः आम्हाला द्याल.* २६ आम्ही आमची जनावरंही आमच्यासोबत नेऊ. आम्ही एकालाही* इथे ठेवणार नाही, कारण आमचा देव यहोवा याची उपासना करण्यासाठी त्यांच्यापैकी काही आम्ही वापरू. आणि यहोवाच्या उपासनेसाठी काय अर्पण करायचं, हे आम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.” २७ तेव्हा यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं आणि तो त्यांना जाऊ द्यायला तयार झाला नाही.+ २८ फारो मोशेला म्हणाला: “चालता हो इथून! पुन्हा चुकूनही माझ्यासमोर येऊ नकोस. ज्या दिवशी तू माझ्यासमोर येशील त्या दिवशी तू मरशील.” २९ यावर मोशे म्हणाला: “ठीक आहे, मी पुन्हा तुमच्यासमोर येणार नाही.”
११ मग यहोवा मोशेला म्हणाला: “मी फारोवर आणि इजिप्तवर आणखी एक पीडा आणणार आहे. त्यानंतर तो तुम्हाला इथून पाठवून देईल+ आणि त्या वेळी तर तो तुम्हाला अक्षरशः घालवून देईल.+ २ म्हणून लोकांना सांग, की प्रत्येक पुरुषाने आणि प्रत्येक स्त्रीने आपापल्या शेजाऱ्याकडून सोन्याचांदीचे दागिने मागावेत.”+ ३ यहोवाने इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांवर कृपा करायला लावली. शिवाय, इजिप्त देशातले लोक आणि फारोचे सेवकही मोशेचा खूप आदर करायला लागले होते.
४ मग मोशे म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘आज मध्यरात्री मी इजिप्तमधून जाईन,+ ५ आणि राजासनावर बसणाऱ्या फारोपासून ते जात्यावर दळणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे प्रथमपुत्र, तसंच जनावरांचेही प्रथम जन्मलेले सगळे मरतील.+ ६ संपूर्ण इजिप्त देशात कधीही झाला नाही, आणि पुढे कधीही होणार नाही इतका मोठा हाहाकार होईल.+ ७ पण, इस्राएली लोकांवर आणि त्यांच्या जनावरांवर कुत्राही भुंकणार नाही. यावरून तुम्हाला कळेल, की यहोवा इस्राएलच्या आणि इजिप्तच्या लोकांमध्ये फरक करू शकतो.’+ ८ आणि तुमचे सगळे सेवक येऊन जमिनीवर डोकं टेकवून मला नमन करतील आणि म्हणतील, ‘तू आणि तुझे सर्व लोक इथून निघून जा.’+ मग त्यानंतर मी निघून जाईन.” इतकं बोलून तो फारोसमोरून रागाच्या भरात निघून गेला.
९ तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “इजिप्त देशात मला आणखी चिन्हं दाखवता यावीत, म्हणून फारो तुमचं ऐकणार नाही.”+ १० मोशे आणि अहरोन यांनी ही सगळी चिन्हं फारोसमोर दाखवली.+ पण यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं, म्हणून फारोने इस्राएली लोकांना आपल्या देशातून जाऊ दिलं नाही.+
१२ मग यहोवा इजिप्त देशात मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २ “हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना असेल. तुमचं वर्ष या महिन्याने सुरू होईल.+ ३ इस्राएलच्या सर्व लोकांना सांगा, ‘या महिन्याच्या दहाव्या दिवशी,* त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे, एका घरासाठी एक मेंढरू घ्यावं.+ ४ पण पूर्ण मेंढरू खाता येईल इतके लोक घराण्यात नसले, तर त्याने आणि त्याच्या शेजाऱ्याने त्यांच्या घरातल्या लोकांच्या हिशोबाने ते आपसात वाटावं. एक मेंढरू किती लोकांना* पुरेल याचा हिशोब त्यांनी करावा. ५ तुमचं मेंढरू एक वर्षाचा नर असावा आणि त्यात कोणताही दोष नसावा.+ तुम्ही मेंढरांपैकी किंवा बकऱ्यांपैकी एखादं पिल्लू निवडू शकता. ६ या महिन्याच्या १४ व्या दिवसापर्यंत+ त्याचा सांभाळ करा. मग संध्याकाळी* इस्राएलच्या मंडळीतल्या सर्व लोकांनी त्याला कापावं.+ ७ ज्या घरात ते जेवणार आहेत त्या घराच्या दाराच्या चौकटीवर डाव्या, उजव्या आणि वरच्या बाजूला त्यांनी त्याचं थोडं रक्त लावावं.+
८ त्यांनी त्याच रात्री त्याचं मांस आगीवर भाजून, बेखमीर* भाकरी+ आणि कडू हिरव्या भाज्यांसोबत खावं.+ ९ त्याचं मांस कच्चं किंवा उकळून खाऊ नका, तर त्याला डोकं, पाय आणि आतड्यांसोबत* आगीवर भाजावं. १० त्यातलं काहीही सकाळपर्यंत ठेवू नका, पण काही उरलंच तर ते आगीत जाळून टाका.+ ११ ते खाताना तुमचे कमरबंद बांधलेले असावेत,* पायात जोडे आणि हातात काठी असावी. तुम्ही ते घाईघाईने खावं. हे यहोवाचं वल्हांडण* आहे. १२ कारण त्या रात्री मी इजिप्तमधून जाईन आणि माणसांतल्या व जनावरांतल्या प्रथम जन्मलेल्यांना ठार मारीन.+ मी इजिप्तच्या सर्व देवांवर न्यायदंड आणीन.+ मी यहोवा आहे. १३ तुम्ही राहत असलेल्या घरांवर लावलेलं रक्त तुमच्यासाठी चिन्ह ठरेल. मी इजिप्तचा नाश करायला येईन, तेव्हा ते रक्त पाहून मी तुमचं घर ओलांडून जाईन आणि त्या पीडेने तुमचा नाश होणार नाही.+
१४ हा दिवस तुमच्यासाठी एक आठवण* असेल आणि तुम्ही पिढ्या न् पिढ्या यहोवासाठी हा सण साजरा करा. हा सण साजरा करण्याचा नियम तुम्ही कायम पाळला पाहिजे. १५ सात दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात.+ पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या घरांतून खमीर* काढून टाकावं. पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत जो कोणी* खमीर असलेलं काही खाईल, त्याचा इस्राएलमधून नाश केला जावा.* १६ पहिल्या आणि सातव्या दिवशी पवित्र मेळावा ठेवा. या दोन्ही दिवशी कोणतंही काम करू नका.+ फक्त प्रत्येकाला* जितकं खायला लागेल तितकंच बनवा.
१७ तुम्ही बेखमीर भाकरींचा सण साजरा केला पाहिजे,+ कारण याच दिवशी मी तुमच्या समूहांना* इजिप्त देशातून बाहेर आणीन. तुम्ही हा दिवस पिढ्या न् पिढ्या कायमचा नियम म्हणून पाळा. १८ पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते २१ व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात.+ १९ त्या सात दिवसांपर्यंत तुमच्या घरांमध्ये खमीर नसावं. कारण जो कोणी खमीर असलेलं काही खाईल, मग तो देशाचा रहिवासी असो किंवा विदेशी,+ त्याचा* इस्राएलच्या लोकांमधून नाश केला जावा.*+ २० खमीर असलेलं काहीही खाऊ नका. तुम्ही सर्वांनी आपल्या घरांमध्ये बेखमीर भाकरी खाव्यात.’”
२१ तेव्हा मोशेने लगेच इस्राएलच्या सर्व वडीलजनांना+ बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “जा आणि आपापल्या कुटुंबासाठी कळपातली पिल्लं* निवडा, आणि ती वल्हांडणाच्या बलिदानासाठी कापा. २२ त्यानंतर तुम्ही एजोबच्या* फांद्या रक्तात बुडवून, ते रक्त दाराच्या चौकटीवर डाव्या, उजव्या आणि वरच्या बाजूला लावा. तुमच्यापैकी कोणीही सकाळपर्यंत आपल्या घराबाहेर जाऊ नका. २३ मग जेव्हा इजिप्तच्या लोकांवर पीडा आणण्यासाठी यहोवा तिथून जाईल आणि तो दारांच्या चौकटीवर डाव्या, उजव्या आणि वरच्या बाजूला लावलेलं रक्त पाहील, तेव्हा यहोवा ते दार ओलांडून जाईल आणि तो मृत्यूची पीडा* तुमच्या घरांमध्ये येऊ देणार नाही.+
२४ हा विधी तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी कायमचा नियम म्हणून पाळा.+ २५ यहोवाने वचन दिलेल्या देशात तुम्ही जाल, तेव्हा तुम्ही हा विधी पाळला पाहिजे.+ २६ आणि, ‘हा विधी तुम्ही का करता?’ असं जेव्हा तुमची मुलं तुम्हाला विचारतील,+ २७ तेव्हा तुम्ही असं म्हणा, ‘हे यहोवासाठी वल्हांडणाचं बलिदान आहे. जेव्हा त्याने इजिप्तच्या लोकांवर पीडा आणली, तेव्हा तो इजिप्तमध्ये असलेल्या इस्राएली लोकांची घरं ओलांडून गेला आणि ती सुरक्षित राहिली.’”
तेव्हा लोक खाली वाकले आणि त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं. २८ मग इस्राएली लोकांनी जाऊन, यहोवाने मोशे आणि अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे केलं.+ त्यांनी अगदी तसंच केलं.
२९ नंतर, मध्यरात्री यहोवाने इजिप्त देशातल्या सगळ्या प्रथम जन्मलेल्यांना, म्हणजे राजासनावर बसलेल्या फारोपासून ते तुरुंगातल्या* कैद्याच्या; तसंच प्राण्यांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांना ठार मारलं.+ ३० त्या रात्री फारो, त्याचे सर्व सेवक आणि इजिप्तचे सगळे लोक उठले, तेव्हा त्यांच्यात भयंकर हाहाकार माजला. कारण असं एकही घर उरलं नव्हतं, ज्यात कोणाचा मृत्यू झाला नव्हता.+ ३१ त्याच रात्री फारोने ताबडतोब मोशे आणि अहरोन यांना बोलावलं+ आणि तो म्हणाला: “उठा, तुम्ही आणि बाकीचे सर्व इस्राएली लोक माझ्या लोकांमधून निघून जा. चालते व्हा! तुम्ही म्हणाला होता तशी यहोवाची उपासना करा+ ३२ आणि तुमची मेंढरं आणि गुरंढोरंही घेऊन जा.+ पण तुमच्या देवाला मला आशीर्वाद द्यायला सांगा.”
३३ तेव्हा इस्राएली लोकांनी लवकरात लवकर देश सोडून जावा, अशी इजिप्तचे लोक त्यांना विनवणी करू लागले.+ ते म्हणाले, “तुम्ही गेला नाहीत, तर आम्ही सगळे मरून जाऊ!”+ ३४ मग इस्राएली लोकांनी मळलेलं पीठ, खमीर घालण्याआधीच परातींसोबत* कपड्यांमध्ये बांधून खांद्यावर घेतलं. ३५ मोशेने सांगितल्याप्रमाणे, इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून सोन्याचांदीचे दागदागिने आणि कपडे मागून घेतले.+ ३६ यहोवाने इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांवर कृपा करायला लावली. म्हणून त्यांनी त्यांच्याकडून जे काही मागितलं, ते सर्व त्यांनी दिलं. अशा रितीने त्यांनी इजिप्तच्या लोकांना लुटलं.+
३७ मग इस्राएली लोक रामसेस+ इथून सुक्कोथला+ जायला निघाले. एकूण ६,००,००० पुरुष पायी निघाले. शिवाय त्यांच्यासोबत मुलंही होती.+ ३८ त्यांच्यासोबत विदेश्यांचा एक मोठा समूहसुद्धा*+ निघाला. तसंच मेंढरं, गुरंढोरं अशी बरीच जनावरंही त्यांच्यासोबत होती. ३९ मग ते इजिप्तमधून सोबत आणलेल्या पिठापासून बेखमीर भाकरी बनवू लागले. ते पीठ फुगलं नव्हतं कारण इजिप्तमधून त्यांना अचानक घालवून देण्यात आल्यामुळे, त्यांना काहीच तयारी करता आली नाही.+
४० इस्राएली लोक इजिप्तमध्ये ४३० वर्षं राहिले होते.+ ४१ ही ४३० वर्षं संपली त्याच दिवशी यहोवाच्या लोकांचे सगळे समूह* इजिप्त देशातून बाहेर निघाले. ४२ यहोवाने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं म्हणून त्यांनी या रात्री हा सण साजरा करावा. पिढ्या न् पिढ्या त्यांनी यहोवासाठी या रात्री हा विधी पाळावा.+
४३ मग यहोवाने मोशे आणि अहरोन यांना म्हटलं: “हा वल्हांडणाचा नियम आहे: कोणीही विदेशी वल्हांडणाचं जेवण जेवू शकत नाही.+ ४४ जर एखाद्याकडे पैशाने विकत घेतलेला दास असेल, तर त्याने आधी त्याची सुंता करावी.+ त्यानंतरच तो दास ते जेवण जेवू शकतो. ४५ तुमच्यामध्ये राहायला आलेला परका माणूस आणि मजूर ते जेवू शकत नाही. ४६ तुम्ही एकाच घरात ते जेवलं पाहिजे. मांस घरातून बाहेर घेऊन जाऊ नका आणि त्यातलं एकही हाड मोडू नका.+ ४७ इस्राएलच्या सर्व लोकांनी हा सण साजरा करावा. ४८ जर तुमच्यात राहणाऱ्या एखाद्या विदेश्याला यहोवासाठी वल्हांडणाचा सण साजरा करायचा असेल, तर त्याच्या घरातल्या प्रत्येक पुरुषाची सुंता झाली पाहिजे. त्यानंतरच तो देशातल्या रहिवाशासारखा होऊन हा सण साजरा करू शकतो. पण सुंता न झालेला कोणीही पुरुष ते जेवण जेवू शकत नाही.+ ४९ देशातला रहिवासी आणि तुमच्यामध्ये राहणारा विदेशी, या दोघांसाठी एकच नियम असेल.”+
५० मग सगळ्या इस्राएली लोकांनी, यहोवाने मोशे आणि अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे केलं. त्यांनी अगदी तसंच केलं. ५१ याच दिवशी यहोवाने इस्राएली लोकांना आणि त्यांच्या समूहांना* इजिप्त देशातून बाहेर आणलं.
१३ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांमधून पहिल्या जन्मलेल्या प्रत्येक मुलाला* माझ्यासाठी वेगळं ठेव.* माणसांमधला आणि प्राण्यांमधला पहिला जन्मलेला प्रत्येक नर माझा आहे.”+
३ मग मोशे लोकांना म्हणाला: “हा दिवस आठवणीत ठेवा. कारण इजिप्त देशातून, तुमच्या गुलामगिरीच्या घरातून याच दिवशी यहोवाने तुम्हाला त्याच्या शक्तिशाली हाताने बाहेर आणलं.+ म्हणून तुम्ही खमीर* असलेलं काहीही खाऊ नका. ४ अबीब* महिन्याच्या या दिवशी तुम्ही इथून निघाला आहात.+ ५ जेव्हा यहोवा तुमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे+ तुम्हाला कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी यांच्या प्रदेशात,+ दूध आणि मध वाहत असलेल्या देशात नेईल,+ तेव्हा तुम्ही या महिन्यात हा विधी पाळावा. ६ तुम्ही सात दिवस बेखमीर* भाकरी खाव्यात+ आणि सातव्या दिवशी यहोवासाठी सण पाळावा. ७ त्या सात दिवसांत तुम्ही बेखमीर भाकरीच खाल्ल्या पाहिजेत;+ आणि तुमच्याजवळ खमीर असलेलं काहीही नसावं.+ तुमच्या सबंध प्रदेशात* कोणाजवळही खमीर असू नये. ८ त्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना असं सांगा, ‘इजिप्तमधून बाहेर निघताना यहोवाने माझ्यासाठी जे केलं, त्यामुळे मी हे करतोय.’+ ९ हा सण तुमच्यासाठी हातावर एक चिन्ह आणि कपाळावर* एक आठवण* म्हणून असेल,+ आणि त्यामुळे यहोवाचा नियम नेहमी तुमच्या ओठांवर* राहील. कारण यहोवाने आपल्या शक्तिशाली हाताने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं. १० तुम्ही दरवर्षी हा नियम ठरलेल्या वेळी पाळला पाहिजे.+
११ तुम्हाला हा देश देण्याबद्दल तुमच्या वाडवडिलांना आणि तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, जेव्हा यहोवा तुम्हाला कनानी लोकांच्या देशात नेईल,+ १२ तेव्हा तुम्ही पहिला जन्मलेला प्रत्येक मुलगा, तसंच, तुमच्या जनावरांपैकी पहिला जन्मलेला प्रत्येक नर* यहोवाला समर्पित करा. सगळे नर यहोवाचे आहेत.+ १३ पहिल्या जन्मलेल्या प्रत्येक गाढवाला सोडवण्यासाठी तुम्ही एक मेंढरू द्यावं. जर तुम्ही त्याला सोडवलं नाही, तर त्या गाढवाच्या मानेवर वार करून त्याला ठार मारा. आणि तुमच्या मुलांमधून प्रत्येक प्रथमपुत्राला सोडवून घ्या.+
१४ जर तुमच्या मुलाने नंतर तुम्हाला विचारलं, ‘याचा काय अर्थ होतो?’ तर तुम्ही त्याला सांगा, ‘यहोवाने आम्हाला इजिप्त देशातून, गुलामगिरीच्या घरातून त्याच्या शक्तिशाली हाताने बाहेर आणलं.+ १५ फारोने हट्टीपणाने आम्हाला जाऊ द्यायला नकार दिला,+ तेव्हा यहोवाने इजिप्त देशात माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वांच्या पहिल्या जन्मलेल्यांना ठार मारलं.+ म्हणून मी सगळे पहिले जन्मलेले नर* यहोवाला बलिदान करतोय आणि माझ्या मुलांपैकी प्रत्येक प्रथमपुत्राला सोडवून घेतोय.’ १६ हे तुमच्या हातावर आणि कपाळावर* एक चिन्ह म्हणून असेल,+ कारण यहोवाने आपल्या शक्तिशाली हाताने तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढलं.”
१७ फारोने लोकांना जाऊ दिलं, तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशातून जाणारा मार्ग जवळचा असूनही देवाने त्या मार्गाने त्यांना नेलं नाही. कारण देव म्हणाला: “लढाई करावी लागली तर या लोकांचं मन बदलेल आणि ते इजिप्तला परत जातील.” १८ म्हणून, देवाने त्यांना वळसा घालून तांबड्या समुद्राच्या जवळ असलेल्या ओसाड रानातून जायला लावलं.+ इजिप्त देशातून निघताना इस्राएली लोक सैन्यांच्या तुकड्यांप्रमाणे निघाले होते. १९ मोशेने योसेफच्या अस्थीही* सोबत घेतल्या, कारण योसेफने इस्राएलच्या मुलांना अशी शपथ घ्यायला लावली होती: “देव नक्कीच तुमच्याकडे लक्ष देईल आणि तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी* आपल्यासोबत घेऊन जा.”+ २० ते सुक्कोथ इथून निघाले आणि त्यांनी ओसाड रानाच्या सीमेवर असलेल्या एथाममध्ये तळ ठोकला.
२१ आपल्या लोकांना दिवसा आणि रात्रीही प्रवास करता यावा, म्हणून यहोवा त्यांना दिवसा मार्ग दाखवण्यासाठी ढगाच्या खांबात आणि रात्री प्रकाश देण्यासाठी आगीच्या खांबात त्यांच्यापुढे जात होता.+ २२ दिवसा ढगाचा खांब, तसंच रात्री आगीचा खांब लोकांच्या समोरून कधीही दूर जायचा नाही.+
१४ मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना सांग की त्यांनी परत फिरून पीहहिरोथ याच्यापुढे, मिग्दोल आणि समुद्र यांच्या मध्ये तळ द्यावा.+ त्यांनी बालसफोनसमोर समुद्राच्या दिशेने तळ द्यावा. ३ मग फारो त्यांच्याबद्दल असं म्हणेल, ‘ते ओसाड रानात अडकले आहेत आणि गोंधळून इकडेतिकडे भटकत आहेत.’ ४ मी फारोचं मन कठोर होऊ देईन,+ आणि तो त्यांचा पाठलाग करेल. मग मी फारो आणि त्याच्या सगळ्या सैन्याकडून माझा गौरव करून घेईन.+ तेव्हा इजिप्तच्या लोकांना कळेल, की मी यहोवा आहे.”+ इस्राएली लोकांनी तसंच केलं.
५ नंतर, इस्राएली लोक निघून गेल्याची बातमी इजिप्तचा राजा फारो याला मिळाली. तेव्हा लगेच त्याचं आणि त्याच्या सेवकांचं मन बदललं+ आणि ते म्हणाले: “आपण हे काय केलं? आपली गुलामगिरी करणाऱ्या इस्राएली लोकांना आपण का जाऊ दिलं?” ६ म्हणून फारोने आपले युद्धाचे रथ तयार केले आणि आपल्या लोकांना सोबत घेतलं.+ ७ त्याने सर्वात चांगले असे ६०० रथ, तसंच इजिप्तमधले इतर सर्व रथ घेतले आणि प्रत्येक रथावर योद्धे होते. ८ अशा रितीने यहोवाने इजिप्तचा राजा फारो याचं मन कठोर होऊ दिलं आणि इस्राएली लोक निर्भयपणे* देशातून जात असताना,+ तो त्यांचा पाठलाग करायला निघाला. ९ इस्राएली लोकांनी समुद्राजवळ बालसफोनसमोर पीहहिरोथ इथे तळ दिला होता. तेव्हा इजिप्तचे लोक म्हणजेच फारोचे सर्व रथ, घोडेस्वार आणि सैनिक, इस्राएली लोकांचा पाठलाग करत त्यांच्या जवळ येऊन पोहोचले.+
१० मग फारो आणखी जवळ आला, तेव्हा इस्राएली लोकांनी समोर पाहिलं आणि इजिप्तचे लोक आपला पाठलाग करत आहेत असं त्यांना दिसलं. हे पाहून इस्राएली लोकांना खूप भीती वाटली आणि ते यहोवाकडे मदतीची याचना करू लागले.+ ११ ते मोशेला म्हणाले: “आम्हाला इथे ओसाड रानात मरायला का घेऊन आलास? इजिप्तमध्ये काय आम्हाला पुरायला जागा नव्हती?+ का आणलंस तू आम्हाला इजिप्तमधून बाहेर? १२ इजिप्तमध्ये असतानाच आम्ही तुला म्हणालो होतो, ‘उगाच मध्ये पडू नकोस. आम्हाला इजिप्तच्या लोकांची गुलामी करू दे.’ कारण ओसाड रानात मरण्यापेक्षा आम्ही इजिप्तच्या लोकांची गुलामी केलेली बरी!”+ १३ मग मोशे लोकांना म्हणाला: “घाबरू नका.+ स्थिर उभे राहा आणि आज यहोवा तुम्हाला कसं वाचवतो,* ते पाहा.+ ज्या इजिप्तच्या लोकांना तुम्ही आज पाहत आहात, ते तुम्हाला पुन्हा कधीच दिसणार नाहीत.+ १४ यहोवा स्वतः तुमच्यासाठी लढेल;+ तुम्ही मात्र शांत राहा.”
१५ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू का सारखा मला मदतीची याचना करत आहेस? इस्राएली लोकांना तळ हलवायला सांग. १६ तू आपली काठी घेऊन समुद्रावर हात उगार आणि त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएली लोक समुद्रामध्ये सुक्या जमिनीवरून चालत जाऊ शकतील. १७ मी इजिप्तच्या लोकांचं मन कठोर होऊ दिलंय, म्हणून ते त्यांच्या मागोमाग जातील. अशा रितीने, फारो आणि त्याचं सगळं सैन्य, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार यांच्याकडून मी माझा गौरव करून घेईन.+ १८ जेव्हा फारो आणि त्याचं सगळं सैन्य, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार यांच्याकडून मी माझा गौरव करून घेईन, तेव्हा त्यांना कळेल की मी यहोवा आहे.”+
१९ मग इस्राएली लोकांच्या पुढे जात असलेला खऱ्या देवाचा दूत+ त्यांच्या मागे गेला. तसंच त्यांच्यासमोर असलेला ढगाचा खांबही त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला.+ २० अशा रितीने तो इजिप्तच्या सैन्याच्या आणि इस्राएली लोकांच्या मध्ये आला.+ तेव्हा त्या ढगामुळे एका बाजूला काळोख, तर दुसऱ्या बाजूला रात्र असूनही उजेड पसरला होता.+ त्यामुळे इजिप्तचं सैन्य रात्रभर इस्राएली लोकांच्या जवळ जाऊ शकलं नाही.
२१ मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला+ आणि यहोवाने रात्रभर पूर्वेकडचा जोरदार वारा वाहायला लावून, समुद्राचं पाणी मागे लोटलं. अशा रितीने समुद्रातली जमीन कोरडी झाली+ आणि पाण्याचे दोन भाग झाले.+ २२ तेव्हा इस्राएली लोकांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाण्याच्या भिंती तयार झाल्या+ आणि ते समुद्रामध्ये सुक्या जमिनीवरून चालत गेले.+ २३ मग इजिप्तचे लोक त्यांच्या मागोमाग गेले. फारोचे सर्व घोडे, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार त्यांच्या मागोमाग समुद्रात जाऊ लागले.+ २४ सकाळच्या प्रहरी* यहोवाने आगीच्या आणि ढगाच्या खांबातून इजिप्तच्या सैन्याकडे पाहिलं+ आणि त्याने त्या सर्वांना गोंधळात टाकलं. २५ तो त्यांच्या रथांची चाकं काढू लागला आणि त्यांना रथ चालवणं कठीण होऊ लागलं. तेव्हा इजिप्तचे लोक म्हणू लागले: “चला, आपण इस्राएली लोकांपासून पळून जाऊ, कारण यहोवा त्यांच्या बाजूने आपल्याशी लढतोय!”+
२६ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे इजिप्तच्या लोकांवर, त्यांच्या युद्धाच्या रथांवर आणि त्यांच्या घोडेस्वारांवर पाणी परत येईल.” २७ तेव्हा मोशेने लगेच आपला हात समुद्रावर उगारला आणि सकाळ होत असताना, समुद्राचं पाणी पहिल्यासारखं झालं. इजिप्तचे लोक पाण्यापासून पळून जाऊ लागले तेव्हा यहोवाने त्यांना समुद्रामध्ये फेकून दिलं.+ २८ इस्राएली लोकांच्या मागे समुद्रात गेलेले फारोचे रथ, त्याचे घोडेस्वार आणि त्याचं सगळं सैन्य यांना परत येणाऱ्या पाण्याने बुडवून टाकलं.+ त्यांच्यापैकी एकही जण जिवंत वाचला नाही!+
२९ पण इस्राएली लोक समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले+ आणि त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाण्याच्या भिंती तयार झाल्या.+ ३० अशा रितीने, त्या दिवशी यहोवाने इस्राएली लोकांना इजिप्तच्या लोकांच्या हातून सोडवलं+ आणि त्यांनी इजिप्तच्या लोकांना समुद्रकिनाऱ्यावर मेलेलं पाहिलं. ३१ यहोवाने इजिप्तच्या लोकांविरुद्ध आपलं सामर्थ्य* कसं वापरलं हेही इस्राएली लोकांनी पाहिलं आणि ते यहोवाचं भय मानू लागले आणि त्यांनी यहोवावर आणि त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेवला.+
१५ त्या वेळी मोशेने आणि इस्राएली लोकांनी यहोवासाठी हे गीत गायलं:+
“मी यहोवासाठी गीत गाईन, कारण तो अतिशय गौरवशाली ठरला आहे.+
त्याने घोड्याला त्याच्या स्वारासोबत समुद्रात फेकलं आहे.+
२ याह* माझं सामर्थ्य आणि बळ आहे, कारण तो माझं तारण करतो.+
तो माझा देव आहे, त्याची मी स्तुती करीन;+ तो माझ्या पित्याचा देव आहे,+ त्याचा मी गौरव करीन.+
३ यहोवा बलवान योद्धा आहे.+ यहोवा त्याचं नाव आहे.+
४ फारोच्या रथांना आणि सैन्याला त्याने समुद्रात टाकलं आहे,+
त्याचे सर्वात शूर योद्धे तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.+
५ उसळत्या लाटांनी त्यांना गिळून टाकलं; एखाद्या खडकाप्रमाणे ते समुद्राच्या तळाशी गेले.+
६ हे यहोवा, तुझा उजवा हात अतिशय सामर्थ्यवान आहे;+
हे यहोवा, तुझा उजवा हात वैऱ्याचा सर्वनाश करतो.
७ तुझ्या थोर पराक्रमाने तू आपल्याविरुद्ध उठणाऱ्यांना उलथून टाकतोस;+
तू आपला जळजळता क्रोध पाठवतोस, तेव्हा तो त्यांना सुकलेल्या गवताप्रमाणे भस्म करून टाकतो.
८ तुझ्या नाकपुड्यांतल्या एका श्वासाने पाण्याची भिंत उभी राहिली;
त्या भिंतीने पुराच्या पाण्याला आवरून धरलं;
उसळत्या लाटा समुद्राच्या हृदयात गोठल्या.
९ शत्रू म्हणाला: ‘मी त्यांचा पाठलाग करीन! मी त्यांना गाठीन!
माझा जीव तृप्त होईपर्यंत, मी लुटीचे वाटे करीन!
मी माझी तलवार उपसून माझ्या हाताने त्यांचा पराभव करीन!’+
११ हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे?+
तुझं पावित्र्य थोर आहे;+ तुझ्यासारखा कोण आहे?
तुझी कार्यं अद्भुत आहेत;+ स्तुतिगीतं गाऊन महिमा करावा असा तू देव आहेस.
१२ तू तुझा उजवा हात उगारलास, तेव्हा पृथ्वीने त्यांना गिळून टाकलं.+
१३ तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे, तू आपल्या सोडवलेल्या लोकांना मार्ग दाखवलास;+
तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना आपल्या पवित्र निवासात नेशील.
कनानच्या सगळ्या रहिवाशांच्या काळजाचं पाणी पाणी होईल.+
१६ त्यांना भय ग्रासून टाकेल.+
हे यहोवा, तुझे लोक पार जाईपर्यंत,
तू सोडवलेले लोक+ पार जाईपर्यंत,+
तुझ्या शक्तिशाली हातामुळे ते दगडासारखे सुन्न होतील.
१७ हे यहोवा, तू तुझ्या लोकांना आणून, आपल्या डोंगरावर* स्थिर करशील.+
हे यहोवा, तू आपल्यासाठी बनवलेल्या निवासस्थानात,
आपल्या हातांनी स्थापन केलेल्या मंदिरात त्यांना स्थिर करशील.
१८ यहोवा सदासर्वकाळ राजा म्हणून राज्य करेल.+
१९ फारोचे घोडे, युद्धाचे रथ आणि घोडेस्वार समुद्रात गेले,+
तेव्हा यहोवाने सागराचं पाणी त्यांच्यावर परत आणलं,+
पण इस्राएलचे लोक समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले.”+
२० मग अहरोनची बहीण संदेष्टी मिर्याम हिने आपल्या हातात डफ घेतला आणि सगळ्या स्त्रिया हातात डफ घेऊन नाचत तिच्यामागे गेल्या. २१ मिर्याम पुरुषांच्या पाठोपाठ गाऊ लागली:
“यहोवासाठी गीत गा, कारण तो अतिशय गौरवशाली ठरला आहे.+
त्याने घोड्याला त्याच्या स्वारासोबत समुद्रात फेकलं आहे.”+
२२ नंतर मोशेने इस्राएली लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे शूरच्या ओसाड रानाकडे नेलं. ते रानात तीन दिवस चालले, पण त्यांना पाणी सापडलं नाही. २३ ते मारा* इथे आले,+ पण तिथलं पाणी कडू असल्यामुळे लोक पाणी पिऊ शकले नाहीत. म्हणून त्याने त्या जागेचं नाव मारा असं ठेवलं. २४ तेव्हा लोक मोशेविरुद्ध कुरकुर करू लागले.+ ते म्हणाले: “आता आम्ही काय प्यायचं?” २५ मग मोशेने यहोवाकडे मदतीची याचना केली+ आणि यहोवाने त्याला एक झाड दाखवलं. त्याने ते झाड पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झालं.
तिथे देवाने त्यांना एक कायदा दिला आणि तो कसा न्याय करतो याचा एक नमुना दिला. तिथे त्याने त्यांची परीक्षा घेतली.+ २६ तो म्हणाला: “जर तुम्ही तुमचा देव यहोवा याचं मनापासून ऐकलं आणि त्याच्या नजरेत योग्य ते केलं आणि त्याच्या आज्ञांकडे लक्ष देऊन, त्याच्या सर्व नियमांचं पालन केलं,+ तर मी इजिप्तच्या लोकांवर आणलेले कुठलेही रोग तुमच्यावर आणणार नाही;+ कारण मी यहोवा, तुम्हाला बरं करणारा आहे.”+
२७ त्यानंतर ते एलीम इथे आले. तिथे पाण्याचे १२ झरे आणि खजुराची ७० झाडं होती. त्यांनी तिथे पाण्याजवळ तळ ठोकला.
१६ एलीम इथून निघाल्यावर सर्व इस्राएली लोक, एलीम आणि सीनायच्या मध्ये असलेल्या सीनच्या ओसाड रानात येऊन पोहोचले.+ इजिप्त देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याचा हा १५ वा दिवस होता.
२ तेव्हा, इस्राएलचे सर्व लोक ओसाड रानात मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.+ ३ ते त्यांना म्हणू लागले: “आम्ही इजिप्तमध्येच यहोवाच्या हातून मेलो असतो तर बरं झालं असतं. तिथे आम्ही मांसाच्या भांड्यांजवळ बसून पोटभर भाकरी तरी खायचो.+ पण, तुम्ही इस्राएलच्या सर्व मंडळीला उपाशी मारण्यासाठी या ओसाड रानात आणलंय.”+
४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “बघ आता मी तुमच्यासाठी आकाशातून अन्नाचा वर्षाव करीन.+ प्रत्येकाने दररोज बाहेर जाऊन आपल्या वाट्याचं अन्न गोळा करावं.+ यावरून, लोक माझ्या नियमानुसार चालतात की नाही, याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन.+ ५ पण सहाव्या दिवशी,+ त्यांनी इतर प्रत्येक दिवसाच्या तुलनेत दुप्पट अन्न गोळा करून शिजवावं.”+
६ म्हणून मोशे आणि अहरोन सर्व इस्राएली लोकांना म्हणाले: “आज संध्याकाळी तुम्हाला कळेल, की तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणारा यहोवाच आहे.+ ७ सकाळी तुम्हाला यहोवाचं तेज पाहायला मिळेल, कारण यहोवाविरुद्ध तुम्ही केलेली कुरकुर त्याने ऐकली आहे. शेवटी आम्ही कोण, की आमच्याविरुद्ध तुम्ही कुरकुर करावी?” ८ मोशे पुढे म्हणाला: “यहोवा तुम्हाला संध्याकाळी मांस आणि सकाळी पोटभर भाकरी खायला देईल तेव्हा तुम्हाला कळेल, की तुम्ही यहोवाविरुद्ध केलेली कुरकुर त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुमची कुरकुर आमच्याविरुद्ध नाही, तर यहोवाविरुद्ध आहे.”+
९ मग मोशे अहरोनला म्हणाला: “इस्राएलच्या सर्व लोकांना सांग, ‘तुम्ही सर्व यहोवासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.’”+ १० अहरोन इस्राएलच्या सर्व लोकांशी बोलला, तेव्हा लगेच त्या सर्वांनी वळून ओसाड रानाकडे पाहिलं आणि एका ढगात त्यांना यहोवाचं तेज दिसलं.+
११ यहोवा पुढे मोशेला म्हणाला: १२ “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे.+ त्यांना सांग, ‘संध्याकाळी* तुम्ही मांस खाल आणि सकाळी तुम्ही पोटभर भाकरी खाल,+ आणि तुम्हाला कळेल की मीच यहोवा तुमचा देव आहे.’”+
१३ मग संध्याकाळी लावे* आले आणि सबंध छावणी त्यांनी भरून गेली+ आणि सकाळी सबंध छावणीच्या आजूबाजूला दव पडलं. १४ दवाचा थर सुकला तेव्हा ओसाड रानातल्या जमिनीवर हिमकणांइतका बारीक, पापुद्र्यासारखा पदार्थ असल्याचं दिसलं.+ १५ इस्राएली लोकांनी तो पाहिला तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले, “काय आहे हे?” कारण ते काय आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला: “हे यहोवाने तुम्हाला खायला दिलेलं अन्न* आहे.+ १६ यहोवाने अशी आज्ञा दिली आहे, ‘तुमच्यापैकी प्रत्येकाने त्याला खाता येईल इतकंच ते गोळा करावं. प्रत्येकाच्या तंबूत जितके लोक* असतील त्याप्रमाणे प्रत्येकासाठी एक ओमर माप*+ इतकं तुम्ही गोळा करावं.’” १७ इस्राएली लोक तसंच करू लागले; कोणी कमी, तर कोणी जास्त गोळा करायचा. १८ ते ओमरच्या* मापाने मोजून पाहायचे, तेव्हा ज्याने जास्त गोळा केलं त्याच्याजवळ जास्त उरत नव्हतं, आणि ज्याने कमी गोळा केलं त्याला कमी पडत नव्हतं.+ प्रत्येक जण त्याला खाता येईल त्याप्रमाणे गोळा करायचा.
१९ मग मोशे त्यांना म्हणाला: “सकाळपर्यंत काहीही उरू देऊ नका.”+ २० पण त्यांनी मोशेचं ऐकलं नाही. काहींनी ते सकाळपर्यंत ठेवलं, तेव्हा त्यात अळ्या पडून त्याला घाण वास येऊ लागला. त्यामुळे मोशे त्यांच्यावर रागावला. २१ ते दररोज सकाळी प्रत्येकाला खाता येईल इतकं गोळा करायचे. पण ऊन वाढल्यावर ते अन्न वितळून जायचं.
२२ सहाव्या दिवशी त्यांनी प्रत्येकासाठी दुप्पट म्हणजे दोन ओमर मापं अन्न गोळा केलं.+ मग, इस्राएली लोकांमधल्या सर्व प्रधानांनी येऊन मोशेला याबद्दल सांगितलं. २३ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “यहोवाने असं सांगितलंय: ‘उद्या पूर्ण विश्रांती, म्हणजेच यहोवासाठी पवित्र शब्बाथाचा* दिवस असेल.*+ तुम्हाला जितकं अन्न भाजायचं असेल तितकं भाजून घ्या, जितकं उकळायचं असेल तितकं उकळून घ्या+ आणि जे काही उरेल ते सकाळपर्यंत तसंच ठेवा.’” २४ म्हणून मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत तसंच ठेवलं, पण त्यात अळ्या पडल्या नाहीत किंवा त्याला वासही सुटला नाही. २५ मग मोशे म्हणाला: “ते आज खा, कारण आज यहोवासाठी शब्बाथाचा दिवस आहे. आज तुम्हाला ते जमिनीवर सापडणार नाही. २६ तुम्ही सहा दिवस ते गोळा कराल, पण सातव्या दिवशी म्हणजे शब्बाथाच्या दिवशी+ तुम्हाला काहीच सापडणार नाही.” २७ तरीही काही लोक सातव्या दिवशी ते गोळा करायला गेले, पण त्यांना काहीच सापडलं नाही.
२८ म्हणून यहोवा मोशेला म्हणाला: “तुम्ही लोक माझ्या आज्ञा आणि माझे नियम कुठवर पाळणार नाही?+ २९ यहोवाने तुम्हाला शब्बाथाचा हा दिवस ठरवून दिला आहे हे विसरू नका.+ म्हणूनच सहाव्या दिवशी तो तुम्हाला दोन दिवस पुरेल इतकं अन्न देतो. तेव्हा, सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणीच राहावं; कोणीही बाहेर जाऊ नये.” ३० म्हणून लोकांनी सातव्या दिवशी शब्बाथ पाळला.*+
३१ इस्राएली लोकांनी त्या अन्नाला “मान्ना”* असं नाव दिलं. तो पांढरा होता आणि दिसायला धण्यासारखा होता. त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती.+ ३२ मग मोशे म्हणाला: “यहोवाने अशी आज्ञा दिली आहे, ‘एक ओमर माप भरून तो पिढ्या न् पिढ्या जपून ठेवा,+ म्हणजे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर आणताना, मी ओसाड रानात तुम्हाला कोणतं अन्न दिलं हे तुमच्या वंशजांना कळेल.’” ३३ म्हणून मोशे अहरोनला म्हणाला: “एक भांडं घे आणि त्यात एक ओमर माप इतका मान्ना घेऊन तो यहोवासमोर ठेव. तो पिढ्या न् पिढ्या जपून ठेवला जावा.”+ ३४ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, अहरोनने तो सुरक्षित राहावा म्हणून एका खास पेटीसमोर*+ ठेवला. ३५ इस्राएली लोकांनी, वस्ती असलेल्या देशात येईपर्यंत ४० वर्षं मान्ना खाल्ला.+ ते कनान देशाच्या सीमेजवळ येईपर्यंत मान्ना खात होते.+ ३६ ओमर म्हणजे एफाचा* दहावा भाग.
१७ इस्राएलचे सर्व लोक यहोवाच्या आज्ञेप्रमाणे सीनच्या ओसाड रानातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडले+ आणि रफीदीम इथे येऊन त्यांनी तळ दिला.+ पण तिथे लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं.
२ त्यामुळे लोक मोशेबरोबर भांडू लागले+ आणि म्हणाले: “आम्हाला प्यायला पाणी दे!” पण मोशे त्यांना म्हणाला: “माझ्याशी का भांडताय? तुम्ही सारखी यहोवाची परीक्षा का पाहता?”+ ३ पण लोकांना खूप तहान लागली होती. म्हणून ते मोशेविरुद्ध कुरकुर करत म्हणाले:+ “तू आम्हाला, आमच्या मुलाबाळांना आणि आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकण्यासाठी इजिप्तमधून बाहेर का आणलंस?” ४ शेवटी, मोशेने यहोवाकडे याचना केली: “मी या लोकांचं काय करू? आणखी काही वेळाने तर ते मला दगडमार करतील!”
५ मग यहोवा मोशेला म्हणाला: “लोकांच्या पुढे जा आणि इस्राएलच्या काही वडीलजनांनाही आपल्यासोबत ने. जी काठी तू नाईल नदीवर मारली होतीस,+ तीही सोबत घेऊन जा. ती काठी हातात घे आणि पुढे चाल. ६ पाहा! मी होरेब इथे एका खडकावर तुझ्यासमोर उभा असेन. तू त्या खडकाला मार, म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पाणी पितील.+ मोशेने इस्राएलच्या वडीलजनांसमोर तसंच केलं.” ७ म्हणून त्याने त्या जागेचं नाव मस्सा*+ आणि मरीबा*+ असं ठेवलं, कारण तिथे इस्राएली लोकांनी भांडण केलं आणि “यहोवा खरोखरच आपल्यामध्ये आहे का?” असं म्हणून त्यांनी यहोवाची परीक्षा घेतली.+
८ नंतर, अमालेकी+ लोकांनी येऊन रफीदीम इथे इस्राएली लोकांशी लढाई केली.+ ९ तेव्हा मोशे यहोशवाला+ म्हणाला: “आपल्यातली काही माणसं निवड आणि अमालेकी लोकांशी जाऊन लढ. उद्या मी खऱ्या देवाची काठी हातात घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.” १० मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशवाने केलं+ आणि तो अमालेकी लोकांशी लढला. मोशे, अहरोन आणि हूर+ हे टेकडीच्या माथ्यावर गेले.
११ जोपर्यंत मोशे आपले हात वर ठेवायचा तोपर्यंत इस्राएली लोक लढाईत शक्तिशाली ठरायचे, पण त्याने हात खाली करताच अमालेकी लोक शक्तिशाली ठरायचे. १२ मोशेचे हात दुखायला लागले तेव्हा त्यांनी एक दगड घेऊन मोशेला त्यावर बसवलं. मग अहरोन आणि हूर यांनी त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहून त्याच्या हातांना आधार दिला. त्यामुळे, त्याचे हात सूर्य मावळेपर्यंत स्थिर राहिले. १३ अशा रितीने, यहोशवाने अमालेक आणि त्याच्या लोकांना तलवारीने हरवलं.+
१४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “‘मी या पृथ्वीवरून अमालेकी लोकांचं नामोनिशाण मिटवून टाकीन आणि कोणालाही त्यांचं स्मरण राहणार नाही.’+ ही गोष्ट आठवणीत राहावी* म्हणून ती एका पुस्तकात लिहून ठेव आणि ती यहोशवालाही सांग.” १५ तेव्हा मोशेने एक वेदी बांधून तिचं नाव यहोवा-निस्सी* असं ठेवलं. १६ कारण तो म्हणाला: “त्याने याहच्या+ राजासनाविरुद्ध हात उगारला, म्हणून यहोवा पिढ्या न् पिढ्या अमालेकशी युद्ध करेल.”+
१८ यहोवाने मोशेसाठी आणि आपल्या लोकांसाठी, म्हणजेच इस्राएली लोकांसाठी कायकाय केलं आणि देवाने त्यांना इजिप्तमधून कशा प्रकारे बाहेर आणलं, हे मोशेचा सासरा म्हणजेच मिद्यानचा याजक इथ्रो+ याने ऐकलं.+ २ मोशेने आपली बायको सिप्पोरा हिला आपला सासरा इथ्रो याच्याकडे राहायला पाठवलं होतं. ३ त्याने आपल्या दोन मुलांनाही+ तिच्यासोबत पाठवलं होतं. त्याच्या एका मुलाचं नाव गेर्षोम*+ होतं, कारण मोशे म्हणाला: “मी एका परक्या देशात विदेशी झालो.” ४ त्याच्या दुसऱ्या मुलाचं नाव अलियेजर* होतं, कारण मोशे म्हणाला: “माझ्या वडिलांचा देव माझा सहायक आहे, त्याने मला फारोच्या तलवारीपासून वाचवलं.”+
५ मग मोशेचा सासरा इथ्रो, मोशेच्या मुलांना आणि बायकोला घेऊन ओसाड रानात त्याच्याजवळ आला. तेव्हा मोशेने खऱ्या देवाच्या पर्वताजवळ तळ दिला होता.+ ६ मग त्याने मोशेला असा निरोप पाठवला: “मी इथ्रो तुझा सासरा,+ तुझ्या बायकोला आणि दोन मुलांना घेऊन तुझ्याकडे येत आहे.” ७ तेव्हा मोशे लगेच आपल्या सासऱ्याला भेटायला गेला. मग त्याने त्याला वाकून नमस्कार केला आणि त्याचं चुंबन घेतलं. दोघांनी एकमेकांची विचारपूस केल्यावर ते तंबूमध्ये गेले.
८ मग, यहोवाने इस्राएली लोकांना कसं सोडवलं होतं याविषयीचा सगळा वृत्तान्त मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितला.+ इस्राएली लोकांसाठी यहोवाने फारोवर आणि इजिप्तवर कोणकोणत्या पीडा आणल्या आणि वाटेत त्यांना कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागला,+ हेही त्याने त्याला सांगितलं. ९ इस्राएली लोकांना इजिप्तमधून* सोडवून यहोवाने त्यांच्याबद्दल जो चांगुलपणा दाखवला होता, त्याबद्दल ऐकल्यावर इथ्रोला खूप आनंद झाला. १० म्हणून इथ्रो म्हणाला: “ज्या यहोवाने तुमची इजिप्तमधून आणि फारोच्या हातून सुटका केली आणि ज्याने आपल्या लोकांना इजिप्तच्या मुठीतून सोडवलं, त्याची स्तुती असो. ११ आता मला कळलं आहे की यहोवा इतर सर्व देवांपेक्षा महान आहे,+ कारण त्याने आपल्या लोकांशी मगरूरपणे वागणाऱ्यांना शिक्षा दिली.” १२ मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमार्पण आणि बलिदानं दिली. तेव्हा अहरोन आणि इस्राएलचे सर्व वडीलजन खऱ्या देवासमोर मोशेच्या सासऱ्यासोबत जेवायला आले.
१३ दुसऱ्या दिवशी, मोशे नेहमीप्रमाणे लोकांचा न्याय करण्यासाठी बसला. लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोशेसमोर उभे होते. १४ मोशे लोकांसाठी जे करत होता, ते त्याच्या सासऱ्याने पाहिलं तेव्हा तो म्हणाला: “तू हे काय करत आहेस? आणि हे सगळं तू एकटाच का करतोस?” १५ तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला म्हणाला: “लोक देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी माझ्याकडे येतात. १६ एखादी समस्या निर्माण झाली, तर लोक ती माझ्याकडे आणतात. मग मी त्यांचा न्याय करतो आणि देवाचे निर्णय आणि त्याचे नियम त्यांना कळवतो.”+
१७ मोशेचा सासरा त्याला म्हणाला: “तू जे करत आहेस ते योग्य नाही. १८ असं केल्याने तू आणि तुझ्यासोबतचे हे लोकही थकून जातील. कारण हे काम फार मोठं आहे, तुला एकट्याला ते झेपणार नाही. १९ मी तुला जो सल्ला देतो तो ऐक आणि देव तुझ्यासोबत असेल.+ तू खऱ्या देवासमोर लोकांच्या वतीने बोल+ आणि त्यांच्या समस्या देवासमोर मांड.+ २० तू त्यांना देवाचे नियम आणि कायदे शिकव+ आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चाललं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, हे त्यांना समजावून सांग. २१ पण सोबतच तू लोकांमधून देवाला भिऊन वागणारे, भरवशालायक असलेले आणि बेइमानीच्या कमाईचा द्वेष करणारे+ योग्य असे पुरुष निवड.+ तू त्यांना हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्नास जणांवर आणि दहा जणांवर प्रमुख म्हणून नेम.+ २२ समस्या निर्माण होतात तेव्हा* त्यांनी लोकांचा न्याय करावा. लहानमोठ्या समस्या त्यांनी स्वतः सोडवाव्यात, पण एखादी कठीण समस्या आली तर त्यांनी ती तुझ्याकडे आणावी.+ तुझा काही भार त्यांना उचलू दे म्हणजे तुझं काम सोपं होईल.+ २३ जर तू असं केलंस आणि देवानेही तुला तशी आज्ञा दिली, तर तुझ्यावरचा भार कमी होईल आणि लोकही आनंदाने आपापल्या घरी जातील.”
२४ मोशेने लगेच आपल्या सासऱ्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याने जे काही सांगितलं होतं, त्याप्रमाणे केलं. २५ त्याने इस्राएली लोकांमधून योग्य माणसांना निवडून, त्यांना हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्नास जणांवर आणि दहा जणांवर प्रमुख नेमलं. २६ समस्या निर्माण व्हायच्या तेव्हा ते लोकांचा न्याय करायचे. लहानमोठ्या समस्या ते स्वतः सोडवायचे, पण एखादी कठीण समस्या आली तर ती समस्या ते मोशेकडे घेऊन यायचे.+ २७ मग मोशेने आपल्या सासऱ्याला निरोप दिला+ आणि इथ्रो आपल्या देशात परत गेला.
१९ इस्राएली लोक ज्या दिवशी इजिप्त देशातून बाहेर निघाले, त्याच्या बरोबर तीन महिन्यांनी ते सीनायच्या ओसाड रानात आले. २ रफीदीमवरून तळ हलवून+ इस्राएली लोक सीनायच्या ओसाड रानात पोहोचले आणि त्यांनी तिथे सीनाय पर्वतासमोर तळ दिला.+
३ मग मोशे पर्वतावर खऱ्या देवासमोर गेला आणि यहोवाने त्याला पर्वतावरून हाक मारली.+ तो त्याला म्हणाला: “तू याकोबच्या घराण्याला म्हणजे इस्राएली लोकांना असं सांग, ४ ‘तुम्हाला गरुडांच्या पंखांवर उचलून माझ्याजवळ आणण्यासाठी+ मी इजिप्तच्या लोकांसोबत काय केलं, हे तर तुम्ही पाहिलंच आहे.+ ५ जर आता तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकलं आणि माझ्या कराराचं पालन केलं, तर तुम्ही सर्व राष्ट्रांमधून माझी खास प्रजा* व्हाल,+ कारण सबंध पृथ्वी माझ्या मालकीची आहे.+ ६ तुम्ही माझ्यासाठी याजकांनी बनलेलं राज्य आणि पवित्र राष्ट्र बनाल.’+ हे सर्व तू इस्राएली लोकांना सांग.”
७ मग मोशेने जाऊन लोकांमधल्या वडीलजनांना बोलावून घेतलं आणि यहोवाने त्याला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या.+ ८ तेव्हा सर्व लोकांनी एकमताने उत्तर दिलं: “यहोवाने जे काही सांगितलं आहे, ते सर्व करायला आम्ही तयार आहोत.”+ मोशेने लगेच जाऊन लोकांचं हे उत्तर यहोवाला कळवलं. ९ मग यहोवा मोशेला म्हणाला: “पाहा! मी एका काळ्या ढगात तुझ्याकडे येईन म्हणजे मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि ते तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवतील.” मग मोशेने लोकांचं म्हणणं यहोवाला सांगितलं.
१० यानंतर यहोवा मोशेला म्हणाला: “लोकांकडे जा आणि आज व उद्या त्यांना पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत, ११ आणि तिसऱ्या दिवसासाठी तयारी करावी, कारण तिसऱ्या दिवशी यहोवा सर्व लोकांदेखत खाली सीनाय पर्वतावर येईल. १२ तू पूर्ण पर्वताभोवती लोकांसाठी सीमा ठरवून दे आणि त्यांना सांग, ‘लक्षात ठेवा, कोणीही पर्वतावर जाऊ नका आणि त्याच्या सीमेवर पाऊलही ठेवू नका. जो कोणी पर्वतावर पाऊल ठेवेल, त्याला नक्की ठार मारलं जाईल. १३ त्या माणसाला कोणीही हात लावू नका, तर त्याला दगडमार करून किंवा आरपार छेदून* ठार मारा. मग ते जनावर असो किंवा माणूस.’+ पण शिंगाचा* आवाज ऐकू आल्यावर,+ ते पर्वतावर येऊ शकतात.”
१४ मग मोशे पर्वतावरून खाली लोकांजवळ आला आणि त्याने त्यांना पवित्र केलं आणि त्यांनी आपले कपडे धुतले.+ १५ तो लोकांना म्हणाला: “तिसऱ्या दिवसासाठी तयारी करा. कोणीही शरीरसंबंध ठेवू नका.”*
१६ तिसऱ्या दिवशी सकाळी, ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. पर्वतावर एक दाट ढग दिसला+ आणि शिंगाचा खूप मोठा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा छावणीतले सगळे लोक थरथर कापू लागले.+ १७ मग मोशे लोकांना खऱ्या देवाला भेटायला छावणीतून बाहेर घेऊन आला आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. १८ संपूर्ण सीनाय पर्वतातून धूर निघत होता, कारण यहोवा आगीतून पर्वतावर उतरला होता.+ भट्टीतून निघावा तसा धूर वर आकाशाकडे जात होता आणि संपूर्ण पर्वताला भयंकर हादरे बसत होते.+ १९ शिंगाचा आवाज वाढत गेला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि खऱ्या देवाने त्याला उत्तर दिलं.
२० मग यहोवा सीनाय पर्वताच्या माथ्यावर खाली उतरला. यहोवाने पर्वताच्या माथ्यावरून मोशेला बोलावलं आणि मोशे वर चढून गेला.+ २१ तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “खाली जाऊन लोकांना बजावून सांग, की त्यांनी यहोवाला पाहण्यासाठी सीमा ओलांडून वर यायचा प्रयत्न करू नये, नाहीतर त्यांच्यापैकी बरेच जण मरतील. २२ आणि नेहमी यहोवासमोर येणाऱ्या याजकांनी स्वतःला पवित्र करावं म्हणजे यहोवा त्यांना मारून टाकणार नाही.”*+ २३ मग मोशे यहोवाला म्हणाला: “तू आधीच आम्हाला अशी ताकीद दिली आहेस, की ‘पर्वताभोवती सीमा ठरवून दे आणि त्याला पवित्र कर.’ त्यामुळे लोकांना सीनाय पर्वतावर येता येणार नाही.”+ २४ पण यहोवा त्याला म्हणाला: “खाली जा आणि अहरोनला सोबत घेऊन परत वर ये. पण याजकांनी आणि लोकांनी यहोवाकडे येण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर तो त्यांना ठार मारेल.”+ २५ म्हणून मोशे खाली लोकांकडे आला आणि त्याने त्यांना हे सगळं सांगितलं.
२० मग देवाने या सर्व आज्ञा सांगितल्या:+
२ “मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला इजिप्त देशातून, तुमच्या गुलामगिरीच्या घरातून बाहेर आणलं.+ ३ माझ्याशिवाय* तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.+
४ तुम्ही आपल्यासाठी कोरलेली मूर्ती बनवू नका. वर आकाशातल्या, खाली पृथ्वीवरच्या किंवा पृथ्वीच्या खाली असलेल्या जलाशयांमधल्या कशाचीही प्रतिमा* आपल्यासाठी बनवू नका.+ ५ त्यांच्यासमोर वाकू नका किंवा त्यांची उपासना करू नका,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे आणि तुम्ही फक्त माझीच उपासना करावी अशी मी अपेक्षा करतो.+ जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना, मी तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या वडिलांच्या अपराधाची शिक्षा देतो. ६ पण जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात,+ त्यांच्या हजाराव्या पिढीलाही मी एकनिष्ठ प्रेम दाखवतो.
७ तुम्ही आपला देव यहोवा याच्या नावाचा दुरुपयोग करू नका,+ कारण जो कोणी त्याच्या नावाचा दुरुपयोग करेल त्याला यहोवा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+
८ शब्बाथाचा दिवस पाळायला विसरू नका आणि तो पवित्र माना.+ ९ सहा दिवस कष्ट करून तुमची सगळी कामं करा,+ १० पण सातवा दिवस हा तुमचा देव यहोवा याच्यासाठी शब्बाथाचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्ही किंवा तुमच्या मुलाने, मुलीने, दासाने, दासीने, तुमच्या गुराढोरांनी, तसंच तुमच्या वस्त्यांमध्ये* राहणाऱ्या विदेश्यानेसुद्धा कोणतंही काम करू नये.+ ११ कारण यहोवाने सहा दिवसांत आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातलं सर्वकाही निर्माण केलं आणि सातव्या दिवशी तो विश्रांती घेऊ लागला.+ म्हणूनच यहोवाने शब्बाथाच्या दिवसाला आशीर्वाद देऊन त्याला पवित्र ठरवलं आहे.
१२ आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश यहोवा तुमचा देव तुम्हाला देईल त्यात तुम्ही बराच काळ जगाल.+
१३ खून करू नका.+
१५ चोरी करू नका.+
१६ शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.+
१७ आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नका. शेजाऱ्याची बायको, त्याचा दास किंवा दासी, त्याचा बैल किंवा गाढव, किंवा त्याच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका.”+
१८ त्या वेळी ढगांचा गडगडाट होत होता, विजा चमकत होत्या, शिंगाचा आवाज येत होता आणि पर्वतातून धूर वर जात होता. लोक हे दृश्य पाहत होते आणि हे सर्व पाहून ते थरथर कापू लागले आणि दूर जाऊन उभे राहिले.+ १९ ते मोशेला म्हणाले: “तू आमच्याशी बोल म्हणजे आम्ही तुझं ऐकू. पण, देवाने आमच्याशी बोलू नये, नाहीतर आम्ही मरून जाऊ.”+ २० तेव्हा मोशे लोकांना म्हणाला: “घाबरू नका, कारण तुम्ही नेहमी देवाला भिऊन वागावं आणि पाप करू नये,+ म्हणून खरा देव तुमची परीक्षा घेण्यासाठी आला आहे.”+ २१ त्यानंतर लोक दूरच उभे राहिले; पण मोशे मात्र खरा देव जिथे होता, त्या काळ्या ढगाजवळ गेला.+
२२ मग यहोवा मोशेला म्हणाला: “इस्राएली लोकांना तू असं सांग, ‘मी तुमच्याशी स्वर्गातून बोललो हे तुम्ही स्वतः पाहिलं.+ २३ तुम्ही चांदीचे आणि सोन्याचे देव बनवू नका कारण माझ्याशिवाय तुम्हाला इतर देव नसावेत.+ २४ तुम्ही माझ्यासाठी मातीची वेदी बनवा आणि त्या वेदीवर तुम्ही तुमची होमार्पणं, शांती-अर्पणं, तुमची मेंढरं आणि गुरंढोरं बलिदान म्हणून अर्पण करा. माझ्या नावाची आठवण केली जाण्यासाठी मी जी ठिकाणं निवडीन,+ त्या प्रत्येक ठिकाणी मी येऊन तुम्हाला आशीर्वाद देईन. २५ तुम्ही माझ्यासाठी दगडाची वेदी बनवली, तर ती हत्यारांनी फोडलेले दगड वापरून बनवू नका.+ कारण हत्याराचा वापर केला तर तुम्ही तिचा अनादर कराल. २६ तुमची गुप्तांगे* माझ्या वेदीवर दिसू नयेत, म्हणून पायऱ्यांनी चढून माझ्या वेदीवर जाऊ नका.’
२१ तू त्यांना हे कायदे सांग:+
२ तू एखाद्या इब्री दासाला विकत घेतलंस,+ तर तो सहा वर्षं दास म्हणून सेवा करेल, पण सातव्या वर्षी कोणताही मोबदला न घेता त्याला मुक्त केलं जावं.+ ३ तो एकटाच आला असेल, तर त्याने एकट्याने परत जावं. पण त्याला बायको असेल, तर त्याच्या बायकोनेही त्याच्यासोबत जावं. ४ त्याच्या मालकाने त्याचं लग्न करून दिलं असेल आणि त्याला मुलंबाळं झाली असतील, तर त्याची बायको आणि मुलं तिच्या मालकाची होतील. तो दास एकटाच जाईल.+ ५ पण जर तो दास सारखं असं म्हणू लागला, ‘माझ्या मालकावर आणि माझ्या बायकोमुलांवर माझं प्रेम आहे. मला मुक्त होण्याची इच्छा नाही,’+ ६ तर त्याच्या मालकाने खऱ्या देवाच्या साक्षीने त्याला दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभं करावं आणि अरीने* त्याचा कान टोचावा. मग तो आयुष्यभर त्याचा दास होईल.
७ एखाद्या माणसाने आपल्या मुलीला दासी म्हणून विकलं, तर दासाला ज्या रितीने मुक्त केलं जातं, त्या रितीने तिला मुक्त केलं जाणार नाही. ८ जर तिच्या मालकाला ती आवडली नाही आणि त्याने तिला उपपत्नी म्हणून स्वीकारण्याऐवजी दुसऱ्या कोणाला विकून टाकायचं ठरवलं,* तर कोणत्याही विदेशी लोकांना तिला विकण्याचा त्याला हक्क असणार नाही, कारण त्याने तिला धोका दिला आहे. ९ जर त्याने तिला आपल्या मुलासाठी निवडलं, तर त्याने तिला मुलीचे हक्क द्यावेत. १० जर त्याच्या मुलाने* दुसरी बायको केली, तर त्याने पहिल्या बायकोला पुढेही अन्न व वस्त्रं पुरवावीत आणि तिचा वैवाहिक हक्क*+ तिला द्यावा. ११ या तीन गोष्टी त्याने तिला दिल्या नाहीत, तर ती कोणताही मोबदला न देता मुक्त होऊन जाऊ शकते.
१२ कोणी एखाद्याला मारलं आणि तो मेला तर त्या माणसालाही ठार मारलं जावं.+ १३ पण जर त्याच्या हातून चुकून खून झाला आणि खऱ्या देवाने असं घडू दिलं, तर त्याला पळून जाण्यासाठी मी एक ठिकाण ठरवून देईन.+ १४ जर एखाद्या माणसाला आपल्या शेजाऱ्याचा खूप राग आला आणि त्याने जाणूनबुजून त्याला ठार मारलं,+ तर त्या माणसालाही ठार मारलं जावं. मग जरी त्याला माझ्या वेदीपासून घेऊन जावं लागलं, तरी त्याला ठार मारावं.+ १५ जर कोणी आपल्या आईवर किंवा वडिलांवर हात उचलला, तर त्याला मारून टाकलं जावं.+
१६ जर कोणी एखाद्याचं अपहरण करून+ त्याला विकलं किंवा तो त्याच्या ताब्यात सापडला,+ तर अपहरण करणाऱ्याला ठार मारावं.+
१७ जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो त्याला ठार मारलं जावं.+
१८ माणसं आपसात भांडत असताना जर एखाद्याने दुसऱ्याला दगडाने किंवा हाताने* मारलं, आणि तो माणूस मेला नाही, पण अंथरुणाला खिळला; १९ आणि जर तो उठून काठीच्या आधाराने घराबाहेर चालू-फिरू शकत असला, तर मारणाऱ्याला शिक्षा होणार नाही. त्याने फक्त तो माणूस पूर्ण बरा होईपर्यंत, कामावर न गेल्यामुळे झालेल्या त्याच्या नुकसानाची भरपाई करावी.
२० एखाद्याने आपल्या दासाला किंवा दासीला काठीने मारलं आणि त्यामुळे त्याचा किंवा तिचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूचा बदला घेतला जावा.+ २१ पण जर तो एकदोन दिवस जगला, तर त्याचा बदला घेतला जाऊ नये, कारण त्याला मालकाच्या पैशाने विकत घेण्यात आलं आहे.
२२ माणसं एकमेकांशी मारामारी करत असताना, एखाद्या गरोदर स्त्रीला मार लागून तिचे दिवस भरण्याआधीच बाळाचा जन्म झाला,*+ पण कोणतीही जीवहानी* झाली नाही, तर अपराध्याला त्या स्त्रीच्या पतीने सांगितलेली भरपाई द्यावी लागेल; त्याने ती न्यायाधीशांच्या हातून द्यावी.+ २३ पण जर जीवहानी झाली, तर जिवाबद्दल जीव दिला जावा;+ २४ डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय,+ २५ चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम आणि फटक्याबद्दल फटका असा बदला घ्यावा.
२६ जर एखाद्याने आपल्या दासाच्या किंवा दासीच्या डोळ्यावर मारलं आणि त्यामुळे तो फुटला, तर त्याने डोळ्याच्या बदल्यात आपल्या दासाला किंवा दासीला मुक्त करून जाऊ द्यावं.+ २७ आणि जर कोणी आपल्या दासाला किंवा दासीला मारून त्याचा किंवा तिचा दात पाडला, तर त्याने त्या दासाला किंवा दासीला दाताच्या बदल्यात मुक्त करून जाऊ द्यावं.
२८ जर एका बैलाने एखाद्या माणसाला किंवा बाईला शिंग मारल्यामुळे तो किंवा ती मेली, तर त्या बैलाला दगडमार करून मारून टाकावं+ आणि त्याचं मांस खाऊ नये; बैलाच्या मालकाला मात्र कोणतीही शिक्षा होणार नाही. २९ पण, जर तो बैल आधीपासूनच मारकुटा असेल आणि त्याच्या मालकाला ताकीद देऊनही त्याने त्याच्यावर लक्ष ठेवलं नसेल, आणि जर त्या बैलाने एखाद्या माणसाचा किंवा बाईचा जीव घेतला, तर बैलाला दगडमार केला जावा आणि मालकालाही ठार मारलं जावं. ३० जर त्याच्याकडून खंडणी* मागण्यात आली, तर त्याने आपला जीव वाचवण्यासाठी, जी काही किंमत मागितली जाईल ती द्यावी. ३१ बैलाने मुलाला शिंग मारलं असो किंवा मुलीला, त्या बैलाच्या मालकाचा न्याय याच कायद्याप्रमाणे केला जावा. ३२ बैलाने एखाद्या दासाला किंवा दासीला शिंग मारलं असेल, तर बैलाच्या मालकाने त्याच्या किंवा तिच्या मालकाला ३० शेकेल* द्यावेत आणि बैलाला दगडमार केला जावा.
३३ जर कोणी एखादा खड्डा उघडाच राहू दिला, किंवा खड्डा खोदल्यावर तो झाकला नाही आणि एखादा बैल किंवा एखादं गाढव त्या खड्ड्यात पडलं, ३४ तर त्या माणसाला* भरपाई द्यावी लागेल.+ त्याने बैलाच्या किंवा गाढवाच्या मालकाला त्याची किंमत भरून द्यावी आणि मेलेलं जनावर त्याचं होईल. ३५ एखाद्याच्या बैलाने दुसऱ्याच्या बैलाला दुखापत करून मारून टाकलं, तर त्यांनी जिवंत बैलाला विकून त्याच्याबद्दल मिळालेली किंमत आपसात वाटून घ्यावी आणि मेलेला बैलही आपसात वाटून घ्यावा. ३६ पण बैल मारकुटा असल्याचं मालकाला आधीपासूनच माहीत असेल, आणि त्याने त्याच्यावर लक्ष ठेवलं नसेल, तर मग बैलाबद्दल बैल अशी भरपाई त्याने करावी आणि मेलेला बैल त्याचा होईल.
२२ एखाद्या माणसाने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापलं किंवा विकलं, तर त्याने बैलाच्या बदल्यात पाच बैल आणि मेंढराच्या बदल्यात चार मेंढरं, अशी भरपाई करावी.+
२ (जर एखादा चोर+ घरात घुसताना सापडला आणि जर त्याला मारल्यामुळे तो मेला, तर त्याच्याबद्दल रक्तदोष लागणार नाही. ३ पण जर हे सूर्योदयानंतर घडलं तर मात्र रक्तदोष लागेल.)
त्याने भरपाई केलीच पाहिजे. जर त्याच्याजवळ काहीही नसेल, तर त्याला विकून चोरलेल्या वस्तूंची भरपाई केली जावी. ४ त्याने चोरलेलं जनावर त्याच्याजवळ जिवंत सापडलं, तर त्याला दुप्पट भरपाई करावी लागेल; मग ते जनावर बैल असो, गाढव असो किंवा मेंढरू असो.
५ जर कोणी आपल्या जनावरांना चरायला नेलं आणि त्यांना दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरायला जाऊ दिलं, तर त्याला आपल्या शेतातलं किंवा द्राक्षमळ्यातलं सर्वात चांगलं पीक देऊन भरपाई करावी लागेल.
६ जर आग लागून ती झाडांझुडपांत पसरली आणि कापून ठेवलेल्या धान्याच्या पेंढ्या, शेतातलं धान्य किंवा संपूर्ण शेत जळून गेलं, तर ज्याने आग पेटवली होती त्याने जळलेल्या गोष्टींची भरपाई करावी.
७ जर एखाद्याने शेजाऱ्याकडे पैसे किंवा काही वस्तू ठेवायला दिल्या आणि जर या गोष्टी त्याच्या घरातून चोरीला गेल्या, तर तो चोर सापडल्यावर त्या चोराला दुप्पट भरपाई द्यावी लागेल.+ ८ पण चोर सापडला नाही, तर घरमालकाने आपल्या शेजाऱ्याच्या गोष्टी घेतल्या आहेत किंवा नाही, हे ठरवण्यासाठी त्याला खऱ्या देवासमोर आणावं.+ ९ कोणीही दुसऱ्या माणसावर त्याच्या मालकीच्या नसलेल्या वस्तू आपल्याजवळ ठेवण्याचा आरोप लावला, तर खरा मालक कोण आहे हे ठरवण्यासाठी त्यांनी देवासमोर जावं;+ मग बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र किंवा दुसरी कोणतीही वस्तू हरवलेली असो. त्यांच्यापैकी दोषी कोण, हे देव सांगेल आणि त्याने आपल्या शेजाऱ्याला दुप्पट भरपाई द्यावी.+
१० जर एखाद्याने आपल्या शेजाऱ्याकडे गाढव, बैल, मेंढरू किंवा इतर कोणतंही जनावर ठेवायला दिलं आणि ते मेलं किंवा त्याला काही इजा झाली किंवा कोणी बघत नसताना त्याला एखाद्याने नेलं, ११ तर ज्याच्याकडे जनावर ठेवलं होतं त्याने यहोवासमोर शपथ घ्यावी, की त्याने आपल्या शेजाऱ्याची वस्तू घेतली नाही आणि जनावराच्या मालकाने ही गोष्ट मान्य करावी. मग त्या माणसाला भरपाई द्यावी लागणार नाही.+ १२ पण जर ते जनावर त्याच्याकडून चोरीला गेलं असेल, तर त्याला त्याच्या मालकाला भरपाई द्यावी लागेल. १३ जर त्या जनावराला एखाद्या जंगली प्राण्याने फाडून खाल्लं असेल, तर त्याने ते पुरावा म्हणून आणावं. जंगली प्राण्याने फाडलेल्या जनावरासाठी त्याला भरपाई द्यावी लागणार नाही.
१४ जर एखाद्याने आपल्या शेजाऱ्याकडून काही काळासाठी जनावर मागून घेतलं असेल आणि त्याचा मालक त्याच्यासोबत नसताना ते जनावर मेलं किंवा त्याला काही इजा झाली, तर ज्या माणसाने ते मागून घेतलं होतं त्याने त्याची भरपाई द्यावी. १५ जर जनावराचा मालक त्याच्यासोबत असेल, तर त्याला त्याची भरपाई द्यावी लागणार नाही. जर ते भाड्याने घेतलं असेल, तर त्याच्यासाठी दिलेलं भाडं हेच त्याची भरपाई असेल.
१६ जर एखाद्या माणसाने लग्न न ठरलेल्या कुमारीला फसवून तिच्याशी संबंध ठेवले, तर त्याने वधुमूल्य देऊन तिला आपली बायको म्हणून स्वीकारावं.+ १७ तिच्या वडिलांनी लग्नाला साफ नकार दिला, तरी त्याला वधुमूल्याइतकी रक्कम द्यावी लागेल.
१८ जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला जिवंत ठेवू नका.+
१९ प्राण्यासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+
२० यहोवाला सोडून इतर कोणत्याही देवांना बलिदानं अर्पण करणाऱ्याला ठार मारलं जावं.+
२१ तुम्ही कोणत्याही विदेशी रहिवाशासोबत वाईट वागू नका किंवा त्याच्यावर अत्याचार करू नका,+ कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी म्हणून राहत होता.+
२२ तुम्ही कोणत्याही विधवेला किंवा अनाथ* मुलाला त्रास देऊ नका.+ २३ जर तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे त्रास दिला आणि त्याने माझ्याकडे मदतीची याचना केली, तर मी त्याची याचना ऐकल्याशिवाय राहणार नाही;+ २४ माझा राग तुमच्याविरुद्ध भडकेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन. तुमच्या बायका विधवा होतील आणि तुमची मुलं अनाथ होतील.
२५ माझ्या लोकांपैकी तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणत्याही गरीब* माणसाला तुम्ही पैसे उसने दिले, तर त्याच्यासोबत सावकारासारखं* वागू नका. त्याच्याकडून व्याज घेऊ नका.+
२६ आपल्या शेजाऱ्याला कर्ज देताना तुम्ही त्याचं वस्त्र गहाण* ठेवून घेतलं असेल,+ तर सूर्य मावळायच्या आत त्याला ते परत करा. २७ कारण अंग झाकण्यासाठी त्याच्याजवळ ते एकच वस्त्र आहे. त्यामुळे झोपताना तो अंगावर काय घेईल?+ त्याने माझ्याकडे मदतीची याचना केली, तर मी त्याचं नक्की ऐकेन कारण मी करुणामय* आहे.+
२८ तुम्ही देवाला किंवा तुमच्यातल्या कोणत्याही प्रधानाला* शाप देऊ नका.*+
२९ तुम्हाला मिळणाऱ्या भरपूर पिकांतून आणि तुमच्याकडे भरून वाहणाऱ्या तेलातून आणि द्राक्षारसातून मला अर्पण करायला मागेपुढे पाहू नका.+ तुमच्या मुलांपैकी प्रथमपुत्र मला द्या.+ ३० तुमच्या प्रथम जन्मलेल्या वासरांसोबत आणि मेंढरांसोबत असं करा:+ सात दिवस ते आपल्या आईसोबत राहील. पण आठव्या दिवशी तुम्ही ते मला द्या.+
३१ तुम्ही माझे पवित्र लोक असायला पाहिजे.+ रानात जंगली प्राण्याने फाडलेल्या कोणत्याही जनावराचं मांस खाऊ नका.+ ते कुत्र्यांना टाकून द्या.
२३ तुम्ही अफवा पसरवू* नका.+ एखाद्याचं वाईट करण्याच्या हेतूने साक्ष देऊन दुष्टाची साथ देऊ नका.+ २ पुष्कळ लोक करत आहेत, म्हणून एखादी वाईट गोष्ट करू नका. पुष्कळ लोकांना साथ देण्यासाठी न्यायाच्या विरोधात असलेली साक्ष देऊ नका. ३ गरीब माणसाचा वाद सोडवताना, पक्षपात करू नका.+
४ तुमच्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा त्याचं गाढव तुम्हाला सापडलं, तर ते त्याला परत करा.+ ५ तुमचा द्वेष करणाऱ्या एखाद्याचं गाढव ओझ्याखाली दबून खाली पडलेलं दिसलं, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका. गाढवाला सोडवण्यासाठी त्या माणसाला मदत करा.+
६ तुमच्यामध्ये राहणाऱ्या गरिबाच्या खटल्यात चुकीचा न्याय करू नका.+
७ खोट्या आरोपांपासून* दूर राहा आणि निर्दोष व नीतिमान यांचा जीव घेऊ नका. कारण असं दुष्ट काम करणाऱ्याला मी निर्दोष* ठरवणार नाही.+
८ लाच घेऊ नका, कारण लाच डोळस माणसांना आंधळं बनवते आणि प्रामाणिक माणसाला आपले निर्णय बदलायला लावू शकते.+
९ विदेशी माणसावर अत्याचार करू नका. विदेश्याची परिस्थिती काय असते* हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी म्हणून राहत होता.+
१० सहा वर्षं तुमच्या जमिनीत पेरणी करून पीक गोळा करा.+ ११ पण सातव्या वर्षी तिची लागवड करू नका, ती पडीक राहू द्या. म्हणजे तुमच्यातले गरीब लोक त्यात जे उगवेल ते खातील आणि जे उरेल ते रानातली जनावरं खातील. तुमचे द्राक्षमळे आणि जैतुनाच्या बागा यांच्या बाबतीतही असंच करा.
१२ सहा दिवस तुम्ही आपलं काम करा, पण सातव्या दिवशी कोणतंही काम करू नका. म्हणजे तुमच्या बैलाला व गाढवाला आराम मिळेल आणि तुमच्या दासीच्या मुलाला व तुमच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्याला ताजंतवानं होता येईल.+
१३ मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक पाळा;+ दुसऱ्या देवांच्या नावांचा उल्लेख करू नका; त्यांचं नाव तुमच्या ओठांवरही* येऊ देऊ नका.+
१४ वर्षातून तीन वेळा माझ्यासाठी सण साजरा करा.+ १५ तुम्ही बेखमीर* भाकरींचा सण साजरा करा.+ मी तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, अबीब* महिन्याच्या ठरलेल्या वेळी तुम्ही सात दिवस बेखमीर भाकरी खा.+ कारण याच वेळी तुम्ही इजिप्तमधून बाहेर आला होता. कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाती येऊ नये.+ १६ तसंच, तुम्ही शेतात कष्टाने पेरलेल्या धान्याचं पहिलं पीक तयार होईल, तेव्हा कापणीचा सण* साजरा करा;+ आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही आपल्या कष्टाचं फळ शेतातून गोळा कराल, तेव्हा पीक गोळा करण्याचा सण* साजरा करा.+ १७ वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी खरा प्रभू यहोवा याच्यासमोर हजर व्हावं.+
१८ मला बलिदान केलेल्या प्राण्याच्या रक्तासोबत तुम्ही खमीर* असलेलं काहीही अर्पण करू नका. माझ्या सणांमध्ये अर्पण केलेली चरबी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राहू देऊ नका.
१९ तुमच्या जमिनीच्या पहिल्या पिकातला सर्वात चांगला भाग तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या घरात घेऊन या.+
तुम्ही बकरीच्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात उकळू नका.+
२० मार्गात तुमचं रक्षण करण्यासाठी आणि मी तुमच्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी तुम्हाला आणण्यासाठी, मी तुमच्यापुढे एका स्वर्गदूताला पाठवत आहे.+ २१ त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याचं ऐका. त्याच्याविरुद्ध बंड करू नका. तो तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही,+ कारण माझं नाव त्याच्यात आहे. २२ तुम्ही जर त्याचं मनापासून ऐकलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं सर्वकाही केलं, तर मी तुमच्या शत्रूंचा शत्रू आणि तुमच्या विरोधकांचा विरोधक होईन. २३ माझा स्वर्गदूत तुमच्यापुढे जाऊन तुम्हाला अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी आणि यबूसी लोकांकडे आणेल आणि मी त्यांचा सर्वनाश करीन.+ २४ तुम्ही त्यांच्या देवांपुढे वाकू नका किंवा त्यांची सेवा करायला तयार होऊ नका. त्यांच्या चालीरीतींचं अनुकरण करू नका.+ उलट, तुम्ही त्यांचा नाश करा आणि त्यांच्या पूजेच्या स्तंभांचा चुराडा करा.+ २५ तुम्ही तुमचा देव यहोवा याची उपासना करा+ म्हणजे तो तुम्हाला अन्नपाणी देऊन आशीर्वाद देईल.+ मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.+ २६ तुमच्या देशातल्या स्त्रियांचे गर्भपात होणार नाहीत किंवा त्या वांझ असणार नाहीत.+ मी तुम्हाला भरपूर आयुष्य देईन.
२७ ज्या देशांत तुम्ही जाल तिथल्या लोकांना आधीच माझी दहशत बसेल,+ आणि ज्या लोकांशी तुमचा सामना होईल त्यांना मी गोंधळात टाकीन. मी तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजयी करीन आणि ते तुमच्यापासून पळ काढतील.*+ २८ तुम्ही हिव्वी, कनानी, आणि हित्ती लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच ते निराश होतील*+ आणि तुमच्यापुढून निघून जातील.+ २९ मी त्यांना एका वर्षातच तुमच्यापुढून घालवणार नाही, कारण असं झालं तर देश ओसाड पडेल आणि रानातले जंगली पशू वाढून तुम्हाला त्रास देतील.+ ३० म्हणून, तुमची संख्या वाढून तुम्ही संपूर्ण प्रदेशाचा ताबा घेईपर्यंत मी त्यांना हळूहळू तुमच्यापुढून घालवून देईन.+
३१ मी तुमच्या देशाची सीमा तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि ओसाड रानापासून नदीपर्यंत* ठरवून देईन.+ मी देशाच्या रहिवाशांना तुमच्या ताब्यात देईन आणि तुम्ही त्यांना तुमच्यापुढून घालवून द्याल.+ ३२ तुम्ही त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी करार करू नका.+ ३३ त्यांना तुमच्या देशात वस्ती करू देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला माझ्या विरोधात पाप करायला लावतील. तुम्ही जर त्यांच्या देवांची उपासना केली, तर ते तुमच्यासाठी पाश ठरतील.”+
२४ मग तो मोशेला म्हणाला: “तू, अहरोन, नादाब आणि अबीहू,+ तसंच इस्राएलचे ७० वडीलजन पर्वतावर यहोवाकडे जा आणि दुरूनच त्याला वाकून नमन करा. २ मोशेने एकट्यानेच यहोवासमोर जावं; पण इतरांनी जाऊ नये, आणि लोकांनी मोशेसोबत पर्वतावर जाऊ नये.”+
३ मग मोशेने येऊन यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी आणि सर्व कायदे लोकांना सांगितले.+ तेव्हा सगळे लोक एकमताने म्हणाले: “यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी करायला आम्ही तयार आहोत.”+ ४ त्यानंतर यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने लिहून काढल्या.+ मग त्याने पहाटे उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्राएलच्या १२ वंशांप्रमाणे १२ खांब उभारले. ५ मग त्याने काही इस्राएली तरुणांना पाठवलं आणि त्यांनी यहोवासाठी होमार्पणं दिली आणि शांती-अर्पणं+ म्हणून बैलांची बलिदानं दिली. ६ नंतर, मोशेने त्या अर्पणांच्या रक्तातलं अर्धं घेऊन ते भांड्यांमध्ये काढलं आणि अर्धं वेदीवर शिंपडलं. ७ मग त्याने कराराचं पुस्तक घेऊन ते लोकांसमोर मोठ्याने वाचलं.+ तेव्हा लोक म्हणाले: “यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्याच्या आज्ञा पाळू.”+ ८ म्हणून मोशेने रक्त घेऊन ते लोकांवर शिंपडलं+ आणि तो म्हणाला: “या सर्व गोष्टींविषयी यहोवाने तुमच्याशी केलेल्या कराराचं हे रक्त आहे.”+
९ मग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलचे ७० वडीलजन पर्वतावर गेले, १० आणि त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिलं.+ त्याच्या पायाखाली नीलमण्याच्या फरशीसारखं काहीतरी होतं आणि ते आकाशासारखं अगदी स्वच्छ होतं.+ ११ इस्राएलच्या त्या आदरणीय लोकांना त्याने इजा केली नाही.+ त्यांनी खऱ्या देवाचा दृष्टान्त पाहिला आणि खाणंपिणं केलं.
१२ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू माझ्याकडे पर्वतावर ये आणि इथे राहा. लोकांना शिकवण्यासाठी मी तुला दगडी पाट्यांवर नियम आणि आज्ञा लिहून देईन.”+ १३ तेव्हा मोशे आणि त्याचा सेवक यहोशवा+ उठले आणि मोशे खऱ्या देवाच्या पर्वतावर गेला.+ १४ पण त्याने वडीलजनांना असं सांगितलं होतं: “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत इथेच आमची वाट पाहा.+ अहरोन आणि हूर+ तुमच्यासोबत आहेत. कोणाचाही काही वाद सोडवायचा असेल, तर त्यांनी त्यांच्याकडे जावं.”+ १५ मग ढगाने पर्वताला झाकलेलं असताना, मोशे पर्वतावर गेला.+
१६ यहोवाचं तेज+ सीनाय पर्वतावर राहिलं+ आणि ढगाने सहा दिवस पर्वताला झाकलं होतं. सातव्या दिवशी त्याने ढगातून मोशेला हाक मारली. १७ इस्राएली लोक ते दृश्य पाहत होते आणि त्यांना यहोवाचं तेज पर्वताच्या माथ्यावर भस्म करणाऱ्या आगीसारखं दिसलं. १८ मग मोशे त्या ढगातून पर्वतावर गेला.+ मोशे ४० दिवस आणि ४० रात्री पर्वतावर राहिला.+
२५ मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “इस्राएली लोकांना माझ्यासाठी दान गोळा करायला सांग; ज्या कोणाला मनापासून इच्छा होईल, त्या प्रत्येक व्यक्तीकडून माझ्यासाठी दान गोळा करा.+ ३ दान म्हणून तुम्ही या गोष्टी त्यांच्याकडून स्वीकारा: सोनं,+ चांदी,+ तांबं,+ ४ निळं सूत, जांभळी लोकर,* गडद लाल रंगाचं सूत,* चांगल्या प्रतीचं मलमलीचं कापड, बकरीचे केस, ५ लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची* कातडी, बाभळीचं लाकूड,+ ६ दिव्यांसाठी तेल,+ अभिषेकाच्या तेलासाठी+ आणि सुगंधित धूपासाठी+ बाल्सम,* ७ तसंच एफोद*+ आणि ऊरपटावर*+ लावण्यासाठी गोमेद आणि इतर रत्नं. ८ मी तुमच्यामध्ये राहावं,* म्हणून माझ्यासाठी एक उपासनेचं स्थान बनवा.+ ९ मी तुला जो नमुना* दाखवत आहे, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही उपासना मंडप आणि त्यातलं सर्व साहित्य बनवा.+
१० तुम्ही बाभळीच्या लाकडापासून एक पेटी* बनवा. ती अडीच हात* लांब, दीड हात रुंद आणि दीड हात उंच असावी.+ ११ मग तिला शुद्ध सोन्याने मढवा.+ तिला आतून व बाहेरून सोन्याने मढवून तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनवा.+ १२ तिच्यासाठी साच्यांमध्ये ओतून सोन्याच्या चार कड्या बनवा आणि पेटीच्या चार पायांच्या वरती त्या बसवा. एका बाजूला दोन कड्या आणि दुसऱ्या बाजूला दोन कड्या बसवा. १३ तुम्ही बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवा आणि ते सोन्याने मढवा.+ १४ साक्षपेटी उचलण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कड्यांमध्ये ते दांडे घाला. १५ दांडे साक्षपेटीच्या कड्यांमध्येच राहतील; ते त्यांतून काढू नका.+ १६ साक्षलेखाच्या ज्या पाट्या मी तुला देईन, त्या तू साक्षपेटीत ठेव.+
१७ शुद्ध सोन्याचं एक झाकण बनव. ते अडीच हात लांब आणि दीड हात रुंद असावं.+ १८ झाकणाच्या दोन टोकांवर हातोडीने ठोकून सोन्याचे दोन करूब* घडव.+ १९ दोन टोकांवर, म्हणजे झाकणाच्या प्रत्येक टोकावर एक करूब बनवा. २० त्या करुबांचे दोन पंख वरच्या बाजूला पसरलेले असावेत. त्यांनी आपल्या पंखांनी झाकणाला झाकलेलं असावं+ आणि ते एकमेकांच्या समोरासमोर असावेत. त्यांचे चेहरे खाली झाकणाकडे वळलेले असावेत. २१ तू ते झाकण+ साक्षपेटीवर ठेव आणि ज्या साक्षलेखाच्या पाट्या मी तुला देईन, त्या तू साक्षपेटीत ठेव. २२ मी तिथे तुझ्यासमोर प्रकट होईन आणि झाकणावरून तुझ्याशी बोलीन.+ इस्राएली लोकांना द्यायच्या सर्व आज्ञा, मी तुला साक्षपेटीवर असलेल्या दोन करुबांच्या मधून सांगीन.
२३ तू बाभळीच्या लाकडाचं एक मेजही बनव.+ त्याची लांबी दोन हात, रुंदी एक हात आणि उंची दीड हात असावी.+ २४ त्याला शुद्ध सोन्याने मढव आणि त्याच्यासभोवती सोन्याची किनार* बनव. २५ तू मेजाला चार बोटं* रुंदीची एक चौकट बनव आणि त्या चौकटीला सोन्याची किनार* बनव. २६ तू मेजासाठी सोन्याच्या चार कड्या बनव आणि चारही कोपऱ्यांवर, जिथे मेजाचे चार पाय जोडलेले आहेत तिथे त्या कड्या लाव. २७ कड्या चौकटीला लागून असाव्यात, म्हणजे त्यांतून मेज उचलण्यासाठी दांडे घालता येतील. २८ तू ते दांडे बाभळीच्या लाकडापासून बनव आणि त्यांना सोन्याने मढव. ते दांडे मेज उचलण्यासाठी वापरले जावेत.
२९ तसंच तू ताटं व प्याले आणि पेयार्पणं ओतण्यासाठी सुरया आणि वाट्या बनव. तू त्या शुद्ध सोन्याच्या बनव.+ ३० माझ्यासमोर मेजावर कायम अर्पणाच्या भाकरी* ठेव.+
३१ तू शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष* बनव.+ तो हातोडीने ठोकून घडव. त्याचा तळ, बुंधा, फांद्या, फुलं, कळ्या आणि पाकळ्या एकाच अखंड तुकड्याच्या असाव्यात.+ ३२ दीपवृक्षाच्या बाजूंनी सहा फांद्या असाव्यात. एका बाजूला तीन फांद्या आणि दुसऱ्या बाजूला तीन फांद्या असाव्यात. ३३ एका बाजूच्या प्रत्येक फांदीवर बदामाच्या फुलाच्या आकाराची तीन फुलं असावीत आणि आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या असाव्यात. दुसऱ्या बाजूच्या प्रत्येक फांदीचीही अशीच रचना असावी. दीपवृक्षाच्या सर्व सहा फांद्यांची रचना अशीच कर. ३४ दीपवृक्षाच्या बुंध्याला बदामाच्या फुलासारखी चार फुलं असावीत आणि त्याला आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या असाव्यात. ३५ बुंध्यातून निघणाऱ्या सहा फांद्यांपैकी पहिल्या दोन फांद्यांखाली एक कळी, त्यानंतरच्या दोन फांद्यांखाली एक कळी आणि त्यानंतरच्या दोन फांद्यांखाली एक कळी असावी. ३६ कळ्या, फांद्या आणि संपूर्ण दीपवृक्ष हा शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून, हातोडीने ठोकून घडवलेला असावा.+ ३७ दीपवृक्षासाठी तू सात दिवे बनव. दिवे पेटवल्यावर दीपवृक्षाच्या समोरच्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल.+ ३८ त्याचे चिमटे आणि धूप जाळण्याची पात्रं* शुद्ध सोन्याची असावीत.+ ३९ ही सर्व भांडी आणि दीपवृक्ष एक तालान्त* वजनाच्या शुद्ध सोन्यापासून बनवावा. ४० तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच* या सर्व गोष्टी काळजीपूर्वक बनव.+
२६ उपासनेचा मंडप दहा कापडांपासून बनव.+ ती कापडं चांगल्या प्रतीची मलमल, निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून बनवलेली असावीत. त्यांवर भरतकामाने करूब* बनव.+ २ प्रत्येक कापडाची लांबी २८ हात* आणि रुंदी चार हात असावी. सगळी कापडं एकाच मापाची असावीत.+ ३ पाच कापडं एकापाठोपाठ एक जोडून एक अखंड कापड तयार कर. उरलेली पाच कापडंही तशीच एकापाठोपाठ एक जोडून आणखी एक अखंड कापड तयार कर. ४ एका कापडाच्या कडेवर निळ्या सुताचे फास* बनव. ते दुसऱ्या कापडाला जोडण्यासाठी, दुसऱ्या कापडाच्या कडेलाही तसेच फास बनव. ५ एका कापडाच्या कडेला ५० फास आणि दुसऱ्या कापडाच्या कडेलाही ५० फास बनव. ते जोडले जातील तेव्हा समोरासमोर असतील. ६ सोन्याचे ५० आकडे बनव आणि त्यांनी दोन्ही कापडांना एकत्र जोड, म्हणजे एकच अखंड उपासनेचा मंडप तयार होईल.+
७ अशाच प्रकारे, तू बकरीच्या केसांपासूनही उपासना मंडपावर टाकण्यासाठी कापडं बनव.+ एकूण ११ कापडं बनव.+ ८ प्रत्येक कापडाची लांबी ३० हात आणि रुंदी चार हात असावी. सर्व ११ कापडं एकाच मापाची असावीत. ९ तू त्यांपैकी पाच कापडं जोडून एक अखंड कापड तयार कर आणि उरलेली सहा कापडं जोडून आणखी एक अखंड कापड तयार कर. त्यातलं सहावं कापड मंडपाच्या समोरच्या बाजूला वर दुमडून ठेव. १० एका कापडाच्या कडेला, म्हणजे जोडलेल्या कापडांपैकी शेवटच्या कापडाच्या कडेला ५० फास बनव. ते दुसऱ्या कापडाला जोडण्यासाठी, दुसऱ्या कापडाच्या कडेलाही ५० फास बनव. ११ तू तांब्याचे ५० आकडे बनव आणि ते आकडे फासांमध्ये अडकवून दोन्ही कापडं एकत्र जोड, म्हणजे उपासनेच्या मंडपाला झाकण्यासाठी त्यांचं एक अखंड कापड तयार होईल. १२ कापडांचा उरलेला भाग लोंबता सोडावा. कापडाचा जो अर्धा भाग उरेल, तो मंडपाच्या मागच्या बाजूला लोंबता राहील. १३ कापडांच्या लांबीतला उरलेला भाग, उपासना मंडपाला झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना एक हातभर लोंबता राहील.
१४ अशाच प्रकारे, तू उपासना मंडपाला झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातडीचं आणि त्याच्यावर टाकण्यासाठी तहशाच्या* कातडीचं आच्छादन* बनव.+
१५ तू उपासना मंडपासाठी बाभळीच्या लाकडापासून उभ्या चौकटी बनव.+ १६ प्रत्येक चौकट दहा हात उंच आणि दीड हात रुंद असावी. १७ प्रत्येक चौकटीला दोन समांतर कुसू* असतील. अशाच प्रकारे तू उपासना मंडपाच्या सगळ्या चौकटी बनव. १८ उपासना मंडपाच्या दक्षिणेकडच्या भागासाठी तू २० चौकटी तयार कर.
१९ तू त्या २० चौकटींच्या खाली खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका*+ बनव; एका चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका बनव.+ २० उपासना मंडपाच्या दुसऱ्या भागासाठी, म्हणजे उत्तरेकडच्या भागासाठी २० चौकटी बनव, २१ आणि त्यांच्यासाठी खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका बनव. एका चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका बनव. २२ उपासना मंडपाच्या मागच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूसाठी सहा चौकटी बनव.+ २३ उपासना मंडपाच्या मागच्या दोन कोपऱ्यांसाठी दोन चौकटी बनव. २४ यांपैकी प्रत्येक चौकटीचे खालून वरपर्यंत दोन भाग असावेत आणि ते पहिल्या कडीजवळ जोडलेले असावेत. दोन्ही चौकटी अशाच प्रकारे बनवल्या जाव्यात. त्या चौकटी मंडपाच्या दोन्ही कोपऱ्यांना असतील. २५ अशा रितीने, आठ चौकटी आणि खाच असलेल्या त्यांच्या चांदीच्या १६ बैठका असतील. एका चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका असतील.
२६ उपासना मंडपाच्या एका बाजूच्या चौकटींसाठी तू बाभळीच्या लाकडापासून पाच दांडे बनव.+ २७ उपासना मंडपाच्या दुसऱ्या बाजूच्या चौकटींसाठी पाच दांडे बनव आणि उपासना मंडपाच्या मागच्या बाजूच्या, म्हणजे पश्चिमेकडच्या चौकटींसाठी पाच दांडे बनव. २८ चौकटींच्या मध्यभागी लावला जाणारा दांडा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल इतका लांब असावा.
२९ तू चौकटींना सोन्याने मढव+ आणि दांडे अडकवण्याच्या त्यांच्या कड्या सोन्याच्या बनव. दांड्यांनाही तू सोन्याने मढव. ३० पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे तू उपासना मंडप उभा कर.+
३१ तू निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एक पडदा बनव.+ त्याच्यावर भरतकामाने करूब बनव. ३२ हा पडदा तू सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या खांबांवर लटकव. त्यांचे आकडे सोन्याचे असावेत. हे खांब, खाच असलेल्या चांदीच्या चार बैठकांवर बसवलेले असावेत. ३३ हा पडदा तू आकड्यांखाली लटकव आणि साक्षपेटी+ पडद्यामागे आणून ठेव. हा पडदा पवित्र स्थान+ आणि परमपवित्र स्थान+ यांना वेगळं करेल. ३४ मग तू परमपवित्र स्थानात साक्षपेटीवर झाकण ठेव.
३५ पडद्याच्या बाहेरच्या बाजूला मेज ठेव आणि मेजासमोर म्हणजे उपासना मंडपात दक्षिणेकडे दीपवृक्ष+ ठेव. मेज उत्तरेकडच्या बाजूला असेल. ३६ मंडपात प्रवेश करण्याच्या ठिकाणी तू निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून विणलेला एक पडदा बनव.+ ३७ पडदा लावण्यासाठी बाभळीचे पाच खांब बनव आणि त्यांना सोन्याने मढव. त्यांचे आकडे सोन्याचे असावेत आणि तू त्यांच्यासाठी खाच असलेल्या तांब्याच्या पाच बैठका साच्यांमध्ये ओतून बनव.
२७ तू बाभळीच्या लाकडापासून एक वेदी बनव;+ ती चौकोनी असावी आणि तिची लांबी पाच हात,* रुंदी पाच हात आणि उंची तीन हात असावी.+ २ तिच्या चारही कोपऱ्यांवर शिंगं बनव;+ शिंगं वेदीचाच भाग असतील आणि वेदी तांब्याने मढव.+ ३ तिची राख* काढण्यासाठी बादल्या, तसंच फावडी, वाट्या, काटे आणि धूप जाळण्याची पात्रं बनव. या सर्व वस्तू तांब्याच्या बनव.+ ४ तू वेदीसाठी तांब्याची एक जाळी बनव आणि त्या जाळीच्या चार टोकांना तांब्याच्या चार कड्या बनव. ५ ती जाळी किनारीच्या खाली, वेदीच्या आत मधोमध बसव. ६ वेदीसाठी तू बाभळीच्या लाकडापासून दांडे बनव आणि त्यांना तांब्याने मढव. ७ हे दांडे कड्यांमध्ये घातले जातील, म्हणजे वेदी उचलून नेताना ते वेदीच्या दोन बाजूंना असतील.+ ८ वेदी फळ्यांपासून बनवलेल्या पोकळ पेटीसारखी असावी. तुला पर्वतावर दाखवण्यात आलेल्या नमुन्यासारखीच ती बनव.+
९ उपासना मंडपाला अंगण बनव.+ दक्षिणेकडे अंगणाला चांगल्या प्रतीच्या मलमलीचे पडदे लाव. या बाजूला त्यांची लांबी १०० हात असावी.+ १० त्यांच्यासाठी २० खांब आणि खाच असलेल्या २० तांब्याच्या बैठका* बनव. खांबांचे आकडे आणि कड्या* चांदीच्या असाव्यात. ११ उत्तरेकडेही १०० हात लांबीचे पडदे, त्यांचे २० खांब आणि खाच असलेल्या २० तांब्याच्या बैठका, तसंच खांबांसाठी चांदीचे आकडे आणि कड्या* असाव्यात. १२ अंगणाच्या रुंदीच्या भागासाठी, म्हणजेच पश्चिमेकडे ५० हात लांबीचे पडदे असावेत. त्यांच्यासाठी दहा खांब आणि खाच असलेल्या दहा बैठका असाव्यात. १३ सूर्य उगवण्याच्या दिशेला, म्हणजेच पूर्वेकडे अंगणाची रुंदी ५० हात असावी. १४ प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला १५ हात लांबीचे पडदे, त्यांचे तीन खांब आणि खाच असलेल्या तीन बैठका असाव्यात.+ १५ तसंच, प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाही १५ हात लांबीचे पडदे, त्यांचे तीन खांब आणि खाच असलेल्या तीन बैठका असाव्यात.
१६ अंगणाच्या प्रवेशद्वाराला २० हात लांबीचा पडदा असावा. तो निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं कापड आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवलेला असावा.+ पडद्यासाठी चार खांब आणि खाच असलेल्या चार बैठका असाव्यात.+ १७ अंगणाच्या चारही बाजूला असलेल्या सर्व खांबांना चांदीचे सांधे आणि आकडे असावेत, पण त्यांच्या बैठका तांब्याच्या असाव्यात.+ १८ अंगणाची लांबी १०० हात,+ रुंदी ५० हात आणि उंची ५ हात असावी. अंगणाचे पडदे चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून बनवलेले असावेत आणि त्याला खाच असलेल्या तांब्याच्या बैठका असाव्यात. १९ उपासना मंडपात सेवेसाठी वापरली जाणारी सगळी भांडी आणि इतर वस्तू, तसंच मंडपाच्या खुंट्या आणि अंगणाच्या सगळ्या खुंट्या तांब्याच्या असाव्यात.+
२० उपासना मंडपातले दिवे सतत जळत ठेवण्यासाठी तू इस्राएली लोकांना शुद्ध जैतुनाचं तेल आणण्याची आज्ञा दे.+ २१ अहरोन आणि त्याच्या मुलांनी भेटमंडपात,* साक्षपेटीजवळ असलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूला,+ संध्याकाळपासून सकाळपर्यंत यहोवासमोर दिवे जळत ठेवण्याची व्यवस्था करावी.+ हा कायमचा नियम इस्राएली लोकांनी पिढ्या न् पिढ्या पाळावा.+
२८ तू इस्राएली लोकांमधून याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन+ आणि त्याची मुलं+ म्हणजे नादाब, अबीहू,+ एलाजार आणि इथामार+ यांना माझ्यासमोर आण.+ २ तू गौरवासाठी आणि शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्याकरता पवित्र वस्त्रं तयार कर.+ ३ ज्यांच्याकडे कौशल्य आहे* आणि ज्यांना मी बुद्धी दिली आहे+ अशा सर्वांशी तू बोल, म्हणजे अहरोनला पवित्र करण्यासाठी ते वस्त्रं बनवतील आणि तो याजक म्हणून माझी सेवा करेल.
४ त्यांनी ही वस्त्रं बनवावी: ऊरपट,*+ एफोद,*+ बिनबाह्यांचा झगा,+ चौकटींचा अंगरखा, पगडी+ आणि कमरबंद.+ तुझा भाऊ अहरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलांसाठी ही वस्त्रं त्यांना बनवायला सांग. ५ कारागिरांनी सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल वापरावी.
६ त्यांनी सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एफोद बनवावं आणि त्यावर भरतकाम करावं.+ ७ त्याला दोन खांदपट्टे असावेत आणि ते वरच्या टोकांना जोडलेले असावेत. ८ एफोदला बांधून ठेवण्यासाठी जो विणलेला पट्टा*+ त्याला जोडला जाईल, तोसुद्धा त्याच गोष्टींपासून बनवला जावा, म्हणजे सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल.
९ तू दोन गोमेद रत्नं+ घेऊन त्यांवर इस्राएलच्या मुलांची नावं कोर.+ १० त्यांच्या जन्माच्या क्रमाप्रमाणे, एका रत्नावर सहा नावं आणि दुसऱ्या रत्नावर सहा नावं असावीत. ११ कोरीव काम करणाऱ्या कारागिराने, मुद्रेवर कोरतात त्याप्रमाणे त्या दोन रत्नांवर इस्राएलच्या मुलांची नावं कोरावीत.+ मग ती रत्नं सोन्याच्या कोंदणांत* बसवावीत. १२ ती दोन रत्नं इस्राएलच्या मुलांची आठवण म्हणून एफोदच्या खांदपट्ट्यांवर ठेवावीत.+ यहोवासमोर जाताना अहरोनने त्यांची नावं दोन खांदपट्ट्यांवर आठवण म्हणून न्यावीत. १३ तू सोन्याची कोंदणं बनव, १४ आणि शुद्ध सोन्याचे दोन गोफ बनवून ते कोंदणांना जोड.+
१५ तू भरतकाम करणाऱ्या कारागिराकडून न्यायाचा ऊरपट बनवून घे.+ तोसुद्धा एफोदसारखाच सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवावा.+ १६ तो दुमडल्यावर चौकोनी असावा. त्याची लांबी एक वीत* आणि रुंदी एक वीत असावी. १७ त्यावर रत्नांच्या चार ओळी असाव्यात. ती रत्नं कोंदणांत बसवलेली असावीत. पहिल्या ओळीत माणीक, पुष्कराज, आणि पाचू असावेत. १८ दुसऱ्या ओळीत पिरोजा, नीलमणी, आणि यास्फे ही रत्नं असावीत. १९ तिसऱ्या ओळीत लेशेम,* लसण्या, आणि जमुनिया, २० तर चौथ्या ओळीत चंद्रकांत, गोमेद आणि मर्गझ ही रत्नं असावीत. ती सोन्याच्या कोंदणांत बसवलेली असावीत. २१ ही रत्नं इस्राएलच्या १२ मुलांच्या नावांप्रमाणे असावीत. एकेका रत्नावर इस्राएलच्या १२ वंशांपैकी प्रत्येकाचं नाव, मुद्रेवर कोरतात तसं कोरलं जावं.
२२ तू ऊरपटावर शुद्ध सोन्याच्या गोफांसारख्या पिळदार साखळ्या बनव.+ २३ ऊरपटासाठी सोन्याच्या दोन कड्या बनव आणि त्या ऊरपटाच्या दोन टोकांना* जोड. २४ सोन्याचे ते दोन गोफ ऊरपटाच्या टोकांना असलेल्या दोन कड्यांमधून घाल. २५ तू त्या दोन गोफांची दोन टोकं, दोन कोंदणांमधून घाल आणि त्यांना एफोदच्या खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला जोड. २६ सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या एफोदच्या समोर, ऊरपटाच्या आतल्या बाजूला खालच्या दोन टोकांना लाव.+ २७ तू एफोदच्या समोरच्या बाजूला, खांदपट्ट्यांच्या खाली लावण्यासाठी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनव. एफोदच्या विणलेल्या पट्ट्याच्या* वर, जिथे त्याला जोडलं आहे तिथे त्या दोन कड्या लाव.+ २८ ऊरपटाच्या कड्यांना एफोदच्या कड्यांशी निळ्या दोरीने बांधून ठेव, म्हणजे विणलेल्या पट्ट्याच्या* वरती असलेला ऊरपट एफोदवरून सरकणार नाही.
२९ यहोवासमोर कायम आठवण राहावी म्हणून अहरोनने पवित्र स्थानात जाताना इस्राएलच्या मुलांची नावं असलेला न्यायाचा ऊरपट आपल्या छातीवर* घालावा. ३० तू उरीम आणि थुम्मीम*+ न्यायाच्या ऊरपटात ठेव आणि अहरोन यहोवासमोर जाईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावेत. इस्राएली लोकांचा न्याय करण्याच्या या वस्तू अहरोनने कायम यहोवासमोर आपल्या हृदयावर बाळगाव्यात.
३१ तू एफोदच्या आत घालायचा बिनबाह्यांचा झगा पूर्णपणे निळ्या सुताने बनव.+ ३२ डोकं घालण्यासाठी झग्याला मधोमध गळा असावा. चिलखताच्या गळ्याला असते तशी त्याच्याभोवती हातमागाच्या* कारागिराने केलेली किनार असावी, म्हणजे तो फाटणार नाही. ३३ त्याच्या खालच्या सबंध किनारीला निळं सूत, जांभळी लोकर, आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून डाळिंबं बनवावीत आणि त्यांच्यामध्ये सोन्याच्या घंट्या लावाव्यात. ३४ बिनबाह्यांच्या झग्याच्या खालच्या सबंध किनारीला, तू सोन्याची एक घंटी आणि एक डाळिंब आलटूनपालटून लाव. ३५ सेवा करताना अहरोनने तो झगा घालावा. तो यहोवासमोर उपासना मंडपात जाईल आणि बाहेर येईल, तेव्हा घंट्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे, म्हणजे तो मरणार नाही.+
३६ तू शुद्ध सोन्याची एक चकाकणारी पट्टी बनव आणि मुद्रेवर कोरतात तसं तिच्यावर हे शब्द कोर: ‘पावित्र्य यहोवाचं आहे.’+ ३७ ती तू पगडीवर+ निळ्या दोरीने बांध; ती नेहमी पगडीच्या पुढच्या बाजूला राहील. ३८ ती अहरोनच्या कपाळावर असेल आणि इस्राएली लोकांनी पवित्र अर्पणं म्हणून पवित्र केलेल्या वस्तूंच्या विरोधात जर एखाद्याने अपराध केला, तर त्याची जबाबदारी अहरोनवर राहील.+ ही पट्टी नेहमी अहरोनच्या कपाळावर असावी, म्हणजे यहोवा लोकांचा स्वीकार करेल.
३९ तू चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून एक चौकटींचा अंगरखा वीण, तसंच, एक पगडी आणि एक विणलेला कमरबंद बनव.+
४० शिवाय, तू गौरवासाठी आणि शोभेसाठी+ अहरोनच्या मुलांकरता झगे, कमरबंद, आणि पगड्या बनव.+ ४१ तू तुझा भाऊ अहरोन आणि त्याच्या मुलांना ही वस्त्रं घाल आणि त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांचा अभिषेक कर,+ त्यांना नियुक्त कर*+ आणि त्यांना पवित्र कर. ४२ त्यांची नग्नता झाकण्यासाठी तू त्यांच्यासाठी मलमलीची अंतर्वस्त्रंही* बनव.+ ही कमरेपासून मांडयांपर्यंत असावीत. ४३ अहरोन आणि त्याची मुलं भेटमंडपात येतील किंवा पवित्र ठिकाणी वेदीजवळ सेवा करायला जातील, तेव्हा त्यांनी ही अंतर्वस्त्रं घातलेली असावीत, म्हणजे त्यांच्यावर दोष येऊन ते मरणार नाहीत. हा अहरोनसाठी आणि त्याच्या संततीसाठी* कायमचा नियम आहे.
२९ त्यांनी माझी याजक या नात्याने सेवा करावी म्हणून तू पुढील गोष्टी कर: एक गोऱ्हा,* आणि कोणताही दोष नसलेले दोन मेंढे घे.+ २ तसंच बेखमीर* भाकरी, तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आणि तेलात मळलेल्या बेखमीर भाकरी घे.+ त्या चांगल्या गव्हाच्या पिठापासून बनव ३ आणि त्या टोपलीत ठेवून, गोऱ्हा आणि दोन मेंढ्यांसोबत ती टोपली अर्पण कर.+
४ तू अहरोन आणि त्याच्या मुलांना भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ+ आणून त्यांना अंघोळ घाल.+ ५ मग अहरोनसाठी तयार केलेली वस्त्रं,+ म्हणजेच अंगरखा, एफोदच्या आत घालायचा बिनबाह्यांचा झगा, एफोद आणि ऊरपट त्याला घाल. त्यानंतर, एफोदचा विणलेला कमरपट्टा* त्याच्या कंबरेला बांध.+ ६ मग त्याला पगडी घाल आणि समर्पणाचं पवित्र चिन्ह* त्या पगडीवर लाव.+ ७ नंतर, अभिषेकाचं तेल+ घेऊन त्याच्या डोक्यावर ओत आणि त्याचा अभिषेक कर.+
८ मग त्याच्या मुलांना पुढे आणून त्यांना अंगरखे घाल+ ९ आणि अहरोनसोबतच त्यांनाही कमरबंद बांधून त्यांच्या डोक्याला पगडी बांध. यापुढे, कायमचा नियम म्हणून याजकपद त्यांचं होईल.+ अशा रितीने, तू अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्त कर.*+
१० यानंतर तू भेटमंडपासमोर गोऱ्हा आण आणि अहरोन व त्याची मुलं त्याच्या डोक्यावर हात ठेवतील.+ ११ भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ तो गोऱ्हा यहोवासमोर काप.+ १२ त्याचं काही रक्त बोटावर घेऊन ते वेदीच्या शिंगांना लाव+ आणि उरलेलं सगळं रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून टाक.+ १३ मग आतड्यांवरची आणि यकृतावरची सगळी चरबी,+ तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांच्यावरची चरबी घेऊन ती वेदीवर जाळ.*+ १४ पण, गोऱ्ह्याचं मांस, त्याची कातडी आणि शेण छावणीच्या बाहेर नेऊन जाळ. हे पापार्पण आहे.
१५ मग दोन मेंढ्यांपैकी एक घे आणि अहरोन व त्याची मुलं त्याच्या डोक्यावर हात ठेवतील.+ १६ यानंतर मेंढा काप आणि त्याचं रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूला शिंपड.+ १७ मेंढा कापून त्याचे तुकडे कर आणि त्याची आतडी व पाय धुऊन,+ त्याचे सगळे तुकडे डोक्यासोबत वेदीवर रचून ठेव. १८ सबंध मेंढा वेदीवर जाळ. हे यहोवासाठी होमार्पण आहे आणि त्याच्या सुवासाने त्याला आनंद होईल.*+ हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.
१९ यानंतर तू दुसरा मेंढा घे आणि अहरोन व त्याची मुलं त्याच्या डोक्यावर हात ठेवतील.+ २० मग मेंढा काप आणि त्याचं काही रक्त घेऊन अहरोनच्या उजव्या कानाच्या पाळीवर आणि त्याच्या मुलांच्या उजव्या कानाच्या पाळीवर, तसंच त्यांच्या उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर लाव. वेदीच्या चारही बाजूला मेंढ्याचं काही रक्त शिंपड. २१ मग वेदीवरचं काही रक्त आणि अभिषेकाचं तेल+ घेऊन ते अहरोन आणि त्याच्या वस्त्रांवर, तसंच त्याच्या मुलांवर आणि त्यांच्या वस्त्रांवर शिंपड, म्हणजे तो आणि त्याची वस्त्रं, तसंच त्याची मुलं आणि त्यांची वस्त्रं पवित्र होतील.+
२२ हा नियुक्तीचा मेंढा*+ असल्यामुळे, त्याची चरबी, चरबीदार शेपूट, त्याच्या आतड्यांवरची आणि यकृतावरची चरबी, तसंच दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची चरबी,+ आणि त्याचा उजवा पाय घे. २३ तसंच, यहोवासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीतून, एक भाकर, एक पापडी आणि तेलात मळलेली एक भाकर घे. २४ हे सर्व अहरोन आणि त्याच्या मुलांच्या हातांत ठेव आणि ओवाळण्याचं अर्पण* म्हणून ते यहोवासमोर ओवाळ.* २५ मग तू ते त्यांच्या हातांतून घेऊन वेदीवरच्या होमार्पणावर जाळ म्हणजे त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.
२६ मग अहरोनसाठी अर्पण केलेल्या नियुक्तीच्या मेंढ्याच्या छातीचा भाग घे.+ तो ओवाळण्याचं अर्पण* म्हणून यहोवासमोर ओवाळ.* हा तुझा भाग असेल. २७ अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक म्हणून नियुक्त करताना अर्पण केलेल्या मेंढ्यातले+ हे भाग तू पवित्र कर: ओवाळण्याच्या अर्पणातला छातीचा भाग आणि अर्पण केलेल्या पवित्र भागातला पाय. २८ हे भाग अहरोनचे आणि त्याच्या मुलांचे होतील आणि इस्राएली लोकांनी ते देण्याचा नियम, एक कायमचा नियम म्हणून पाळावा; कारण तो पवित्र भाग आहे.+ त्यांनी यहोवाला दिलेल्या शांती-अर्पणांतून+ तो त्यांचा पवित्र भाग आहे.
२९ अहरोनची पवित्र वस्त्रं+ त्याच्यानंतर त्याची मुलं वापरतील.+ याजक म्हणून त्यांचा अभिषेक करून त्यांना नियुक्त केलं जाईल, तेव्हा त्यांनी ती वापरावीत. ३० त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी याजक होईल आणि भेटमंडपात येऊन पवित्र ठिकाणी सेवा करेल, तो ती वस्त्रं सात दिवस घालेल.+
३१ तू नियुक्तीचा मेंढा घेऊन त्याचं मांस एखाद्या पवित्र ठिकाणी शिजव.+ ३२ अहरोन आणि त्याची मुलं भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ मेंढ्याचं मांस आणि टोपलीतल्या भाकरी खातील.+ ३३ त्यांना याजक म्हणून नियुक्त करण्यासाठी* आणि पवित्र करण्यासाठी ज्या गोष्टींनी प्रायश्चित्त करण्यात आलं, त्या त्यांनी खाव्यात. पण दुसऱ्या कोणालाही* त्या खाण्याचा अधिकार नाही, कारण त्या पवित्र आहेत.+ ३४ नियुक्तीच्या बलिदानातलं मांस आणि भाकरी यांपैकी सकाळपर्यंत काही उरलं, तर ते जाळून टाका.+ ते खाऊ नका कारण ते पवित्र आहे.
३५ मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे या सर्व गोष्टी अहरोन आणि त्याच्या मुलांसोबत कर. त्यांना याजक म्हणून नियुक्त करण्याचा* हा विधी तू सात दिवसांपर्यंत कर.+ ३६ प्रायश्चित्तासाठी दररोज पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण कर आणि वेदीसाठी प्रायश्चित्त करून तिला पापापासून शुद्ध कर आणि तिला पवित्र करण्यासाठी तिचा अभिषेक कर.+ ३७ तू सात दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त कर आणि तिला पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र वेदी बनेल.+ जो कोणी वेदीला हात लावेल तो पवित्र असावा.
३८ तू वेदीवर पुढील गोष्टी अर्पण कर: दररोज एकेका वर्षाचे दोन मेंढे नेहमी अर्पण केले जावेत.+ ३९ एक सकाळी आणि दुसरा संध्याकाळी* अर्पण करावा.+ ४० एक एफा* चांगल्या पिठाचा दहावा भाग आणि एक हिन* शुद्ध जैतुनाच्या तेलाचा चौथा भाग एकत्र करून, तसंच पेयार्पणासाठी एक हिन द्राक्षारसाचा चौथा भाग, पहिल्या मेंढ्यासोबत अर्पण केला जावा. ४१ तू संध्याकाळी* दुसरा मेंढा अर्पण करताना सकाळसारखं हेच अन्नार्पण आणि पेयार्पण दे. तू हे अर्पण यहोवासाठी अग्नीत जाळ, म्हणजे त्याच्या सुवासाने त्याला आनंद होईल.* ४२ हे यहोवासमोर भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ पिढ्या न् पिढ्या द्यायचं नियमित होमार्पण असेल. तिथे मी लोकांसमोर प्रकट होईन आणि तुझ्याशी बोलेन.+
४३ मी तिथे इस्राएली लोकांसमोर प्रकट होईन आणि माझ्या तेजाने ते ठिकाण पवित्र होईल.+ ४४ मी भेटमंडप आणि वेदी पवित्र करीन. तसंच, मी अहरोन आणि त्याच्या मुलांना पवित्र करीन,+ म्हणजे ते याजक म्हणून माझी सेवा करतील. ४५ मी इस्राएली लोकांमध्ये राहीन आणि मी त्यांचा देव होईन.+ ४६ आणि मी त्यांच्यामध्ये राहावं म्हणून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणणारा मी त्यांचा देव यहोवा आहे,+ या गोष्टीची त्यांना खातरी पटेल. मी त्यांचा देव यहोवा आहे.
३० धूप जाळण्यासाठी एक वेदी बनव;+ ती बाभळीच्या लाकडाची असावी.+ २ ती चौकोनी असावी. तिची लांबी एक हात,* रुंदी एक हात आणि उंची दोन हात असावी. वेदी आणि शिंगं लाकडाच्या एकाच तुकड्यापासून बनवलेली असावीत.+ ३ वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू आणि तिची शिंगं, अशी संपूर्ण वेदी शुद्ध सोन्याने मढव. तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनव. ४ वेदीच्या दोन बाजूंना, किनारीच्या* खाली सोन्याच्या दोन कड्या बनव; वेदी उचलून नेताना या कड्यांमधून दांडे घालता येतील. ५ दांडे बाभळीच्या लाकडापासून बनव आणि त्यांना सोन्याने मढव. ६ जिथे मी तुला प्रकट होईन,+ त्या साक्षपेटीच्या जवळ असलेल्या पडद्यासमोर तू ती वेदी ठेव.+ ती साक्षपेटीसमोर आणि तिच्या झाकणासमोर असावी.
७ दररोज सकाळी जेव्हा अहरोन+ दिव्यांची+ तेलवात करेल, तेव्हा त्याने वेदीवर सुगंधी धूप+ जाळावा.+ ८ तसंच, संध्याकाळी* जेव्हा तो दिवे पेटवेल तेव्हाही त्याने धूप जाळावा. तुम्ही पिढ्या न् पिढ्या यहोवासमोर नियमितपणे हे धूपार्पण द्या. ९ नियमानुसार नसलेला धूप,+ होमार्पण किंवा अन्नार्पण वेदीवर देऊ नका; तसंच, तिच्यावर पेयार्पणही ओतू नका. १० वर्षातून एकदा अहरोनने वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित्त करावं.+ पिढ्या न् पिढ्या, तो वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी केलेल्या पापार्पणातलं काही रक्त घेऊन वेदीसाठी प्रायश्चित्त करेल.+ ही वेदी यहोवासाठी परमपवित्र आहे.”
११ मग यहोवा मोशेला म्हणाला: १२ “जेव्हाही तू जनगणनेच्या वेळी इस्राएलच्या मुलांची मोजणी करशील,+ तेव्हा प्रत्येकाने यहोवाला आपल्या जिवासाठी खंडणी द्यावी, म्हणजे नावनोंदणी करताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही. १३ ज्यांची नावनोंदणी होईल त्यांच्यापैकी प्रत्येकाने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे*+ अर्धा शेकेल* द्यावा. (एक शेकेल म्हणजे २० गेरे* आहेत.) अर्धा शेकेल हे यहोवासाठी दान आहे.+ १४ नावनोंदणी झालेल्या २० आणि त्यापेक्षा जास्त वर्षं वयाच्या प्रत्येकाने यहोवासाठी दान द्यावं.+ १५ आपल्या जिवांकरता प्रायश्चित्त करण्यासाठी यहोवाला दान देताना श्रीमंताने अर्ध्या शेकेलपेक्षा* जास्त, तर गरिबाने त्यापेक्षा कमी देऊ नये. १६ प्रायश्चित्त करण्यासाठी इस्राएली लोकांकडून घेतलेले चांदीचे पैसे तू भेटमंडपाच्या सेवेसाठी दे. यहोवासमोर इस्राएली लोकांची आठवण राहावी म्हणून ते द्यावेत, म्हणजे तुमच्या जिवांचं प्रायश्चित्त होईल.”
१७ मग यहोवा मोशेला म्हणाला: १८ “तांब्याचं एक मोठं भांडं* आणि त्याची बैठक बनव;+ ते भेटमंडपाच्या आणि वेदीच्या मधोमध ठेवून त्यात पाणी भर.+ १९ अहरोन आणि त्याची मुलं तिथे हातपाय धुतील.+ २० भेटमंडपात जाताना, तसंच सेवा करण्यासाठी किंवा अग्नीत जाळून केलेलं अर्पण यहोवाला देण्यासाठी वेदीजवळ जाताना, त्यांनी स्वतःला पाण्याने धुऊन शुद्ध करावं म्हणजे ते मरणार नाहीत. २१ त्यांनी आपले हातपाय धुवावेत म्हणजे ते मरणार नाहीत. हा एक कायमचा नियम आहे आणि अहरोनने व त्याच्या वंशजांनी तो पिढ्या न् पिढ्या पाळावा.”+
२२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २३ “यानंतर सगळ्यात चांगल्या प्रकारचे सुगंधी पदार्थ घे: ५०० शेकेल गंधरसाचा डिंक, त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे २५० शेकेल दालचिनी, २५० शेकेल वेखंड,* २४ पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे*+ ५०० शेकेल तज,* तसंच एक हिन* जैतुनाचं तेल घे. २५ मग त्यांपासून अभिषेकाचं पवित्र तेल बनव; त्यांचं कुशलपणे मिश्रण तयार कर.+ हे अभिषेकाचं पवित्र तेल असेल.
२६ तू त्या तेलाने भेटमंडपाचा आणि साक्षपेटीचा अभिषेक कर.+ २७ तसंच, मेजाचा व त्याच्या सगळ्या भांड्यांचा, दीपवृक्षाचा व त्याच्या भांड्यांचा, धूपवेदीचा, २८ होमार्पणाच्या वेदीचा व तिच्या भांड्यांचा आणि तांब्याच्या मोठ्या भांड्याचा व त्याच्या बैठकीचा अभिषेक कर. २९ या सर्व गोष्टींना पवित्र कर, म्हणजे त्या परमपवित्र होतील.+ त्यांना हात लावणाऱ्यानेही पवित्र असावं.+ ३० तू अहरोनचा आणि त्याच्या मुलांचा अभिषेक कर+ आणि याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी त्यांना पवित्र कर.+
३१ तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘तुमच्या पिढ्या न् पिढ्या हे माझ्यासाठी अभिषेकाचं पवित्र तेल असेल.+ ३२ हे तेल कोणाही व्यक्तीच्या अंगाला लावलं जाऊ नये. यासारखं दुसरं कोणतंही मिश्रण बनवू नका. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला नेहमी पवित्र समजावं. ३३ जो कोणी त्यासारखं मिश्रण तयार करेल आणि त्यातलं काही दुसऱ्या कोणाला* लावेल, त्याला ठार मारलं जावं.’”+
३४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “हे सुगंधी पदार्थ+ सारख्या प्रमाणात घे: सुगंधी डिंक, शेखेलेथ,* गंधबिरुजा* आणि शुद्ध ऊद.* ३५ त्यांपासून धूप बनव;+ हे मिश्रण कुशलपणे एकत्र केलेलं, मीठ घातलेलं,+ शुद्ध आणि पवित्र मिश्रण असावं. ३६ यापैकी थोडं कुटून त्याची बारीक पूड तयार कर. मी तुला जिथे प्रकट होईन, त्या भेटमंडपातल्या साक्षपेटीसमोर* त्यातली थोडी पूड ठेव. हा धूप तुमच्यासाठी परमपवित्र असावा. ३७ या पद्धतीने तयार केलेला धूप तू स्वतःच्या वापरासाठी बनवू नकोस.+ तो तू यहोवासाठी पवित्र समजावा. ३८ जो कोणी त्या सुवासाचा आनंद घेण्यासाठी त्यासारखं काही तयार करेल, त्याला ठार मारलं जावं.”
३१ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “मी यहूदा वंशातल्या उरीचा मुलगा, म्हणजे हूरचा नातू बसालेल+ याला निवडलं आहे.*+ ३ मी त्याला भरपूर प्रमाणात माझी पवित्र शक्ती* देईन आणि सर्व प्रकारची कौशल्याची कामं करण्यासाठी त्याला बुद्धी, समजशक्ती आणि ज्ञान देईन. ४ त्यामुळे, त्याला कलाकौशल्याची कामं करता येतील; सोनं, चांदी आणि तांबं यांच्या वस्तू बनवता येतील; ५ तसंच, रत्नांना आकार देऊन ती कोंदणात बसवता येतील+ आणि लाकडाच्या सर्व प्रकारच्या वस्तू बनवता येतील.+ ६ शिवाय त्याला मदत करण्यासाठी मी दानच्या वंशातल्या अहिसामाकचा मुलगा अहलियाब+ याला नियुक्त केलं आहे. तसंच सर्व कारागिरांचं* हृदय मी बुद्धीने भरलं आहे, त्यामुळे मी आज्ञा दिलेल्या या सर्व गोष्टी त्यांना बनवता येतील:+ ७ भेटमंडप,+ साक्षपेटी+ आणि त्यावरचं झाकण,+ मंडपातलं सर्व सामान, ८ मेज+ व त्याची भांडी, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची सर्व भांडी,+ धूपवेदी,+ ९ होमार्पणाची वेदी+ व तिची सर्व भांडी, तांब्याचं मोठं भांडं* व त्याची बैठक,+ १० कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं, याजकासाठी म्हणजे अहरोनसाठी पवित्र वस्त्रं, याजक म्हणून सेवा करणाऱ्या त्याच्या मुलांची वस्त्रं,+ ११ अभिषेकाचं तेल आणि उपासनेच्या ठिकाणासाठी सुगंधित धूप.+ मी तुला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी ते बनवतील.”
१२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १३ “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ* न चुकता पाळले पाहिजेत,+ कारण हे पिढ्या न् पिढ्या तुमच्यात आणि माझ्यात असलेलं चिन्ह आहे. यामुळे तुम्हाला कळेल, की तुम्हाला पवित्र करणारा मी यहोवा आहे. १४ तुम्ही शब्बाथ पाळला पाहिजे कारण तो तुमच्यासाठी पवित्र आहे.+ जो कोणी त्याचा अनादर करेल त्याला ठार मारलं जावं. शब्बाथाच्या दिवशी जर कोणीही काही काम केलं, तर त्याला ठार मारलं जाईल.+ १५ सहा दिवस तुम्ही काम करू शकता, पण सातवा दिवस पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ आहे.+ तो यहोवासाठी पवित्र आहे. शब्बाथाच्या दिवशी जर कोणीही काम केलं, तर त्याला ठार मारलं जावं. १६ इस्राएली लोकांनी शब्बाथ पाळलाच पाहिजे; त्यांनी पिढ्या न् पिढ्या तो पाळला पाहिजे. हा एक कायमचा करार आहे. १७ हे माझ्यामध्ये आणि इस्राएली लोकांमध्ये सर्वकाळाचं चिन्ह आहे;+ कारण यहोवाने सहा दिवसांत आकाश आणि पृथ्वी बनवली आणि सातव्या दिवशी त्याने काम थांबवून विश्रांती घेतली.’”+
१८ सीनाय पर्वतावर मोशेशी बोलून झाल्यावर, देवाने त्याला साक्षलेखाच्या दोन पाट्या दिल्या.+ या दगडी पाट्या देवाने आपल्या बोटाने लिहिल्या होत्या.+
३२ इकडे, लोकांनी पाहिलं की मोशेला पर्वतावरून खाली यायला बराच वेळ लागत आहे.+ म्हणून ते अहरोनच्या भोवती जमले आणि त्याला म्हणाले: “आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणाऱ्या त्या माणसाचं, मोशेचं काय झालं काय माहीत? म्हणून आता ऊठ आणि आमच्यासाठी एक देव बनव, म्हणजे तो आमच्यापुढे चालेल.”+ २ यावर अहरोन त्यांना म्हणाला: “तुमच्या बायकांचे आणि मुलामुलींचे सोन्याचे कानातले+ काढा आणि माझ्याकडे घेऊन या.” ३ म्हणून सर्व लोक आपले सोन्याचे कानातले काढून अहरोनकडे आणू लागले. ४ तेव्हा, त्याने ते सोनं घेतलं आणि एक कोरण्याचं हत्यार वापरून त्यापासून वासराची मूर्ती* बनवली.+ मग लोक म्हणू लागले: “हे इस्राएल, तुला इजिप्त देशातून बाहेर आणणारा हाच तुझा देव आहे.”+
५ हे पाहून अहरोनने त्या मूर्तीसमोर एक वेदी बांधली. मग त्याने अशी घोषणा केली: “उद्या यहोवासाठी उत्सव आहे.” ६ म्हणून ते दुसऱ्या दिवशी पहाटे उठून होमार्पणं आणि शांती-अर्पणं देऊ लागले. मग, लोक खायला-प्यायला बसले आणि त्यानंतर उठून मौजमजा करू लागले.+
७ तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “खाली जा, कारण ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर आणलंस, ते तुझे लोक दुष्टपणे वागले आहेत.+ ८ मी त्यांना ज्या मार्गाने चालायला सांगितलं होतं, त्यापासून ते लगेच भरकटले आहेत.+ त्यांनी स्वतःसाठी वासराची मूर्ती* बनवली आहे आणि ते तिच्यापुढे वाकून तिला बलिदानं अर्पण करत आहेत. ते म्हणत आहेत: ‘हे इस्राएल, तुला इजिप्त देशातून बाहेर आणणारा हाच तुझा देव आहे.’” ९ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: “मी पाहिलंय, की हे लोक हट्टी* आहेत.+ १० म्हणून आता मला अडवू नकोस; माझ्या क्रोधाच्या आगीने मी त्यांचा सर्वनाश करतो आणि तुझ्यापासूनच एक मोठं राष्ट्र बनवतो.”+
११ पण मोशे आपला देव यहोवा याला याचना करून म्हणाला:+ “हे यहोवा, तू तुझ्या शक्तिशाली हाताने आणि मोठ्या पराक्रमाने तुझ्या या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणलंस. मग आता तू त्यांच्यावर आपला क्रोध का भडकू देतोस?+ १२ कारण तू असं केलंस, तर इजिप्तचे लोक म्हणतील, ‘त्यांना इथून बाहेर काढताना त्याचा दुष्ट हेतू होता. त्याला त्यांना डोंगरांमध्ये नेऊन मारून टाकायचं होतं आणि पृथ्वीवरून त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकायचं होतं.’+ म्हणून आता आपल्या क्रोधाची आग आवर आणि तुझ्या लोकांवर संकट आणण्याच्या तुझ्या निर्णयावर पुन्हा विचार कर.* १३ अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या तुझ्या सेवकांची आठवण कर; तू त्यांना स्वतःची शपथ घेऊन म्हणाला होतास: ‘मी तुमची संतती* आकाशातल्या ताऱ्यांसारखी वाढवीन,+ आणि तुमच्या संततीसाठी* राखून ठेवलेल्या देशाचा तिने कायमचा ताबा घ्यावा, म्हणून हा संपूर्ण देश तिला देईन.’”+
१४ तेव्हा, आपल्या लोकांवर संकट आणण्याबद्दल यहोवा जे बोलला होता, त्यावर तो पुन्हा विचार करू लागला.*+
१५ मग मोशे पर्वतावरून खाली जायला निघाला. साक्षलेखाच्या दोन पाट्या+ त्याच्या हातात होत्या.+ त्या पाट्यांच्या मागेपुढे दोन्ही बाजूंवर लिहिलेलं होतं. १६ त्या पाट्या स्वतः देवाने बनवल्या होत्या आणि त्यांवरचं लिखाणही देवाने कोरलं होतं.+ १७ जेव्हा यहोशवाला लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा तो मोशेला म्हणाला: “छावणीतून लढाईचा आवाज ऐकू येतोय.” १८ पण मोशे म्हणाला:
“हा आवाज विजयाच्या* गीताचा नाही,
किंवा पराजयाच्या शोकगीताचाही नाही;
मला तर वेगळ्याच प्रकारच्या गाण्याचा आवाज ऐकू येतोय.”
१९ छावणीजवळ येताच मोशेने वासराची मूर्ती+ आणि लोकांचं नाचगाणं पाहिलं, तेव्हा तो खूप संतापला. त्याने आपल्या हातातल्या पाट्या खाली फेकून दिल्या आणि पर्वताच्या पायथ्याशी त्या फोडून टाकल्या.+ २० लोकांनी बनवलेलं ते वासरू घेऊन त्याने आगीत जाळून टाकलं आणि त्याचा चुरा केला;+ मग त्याने तो चुरा पाण्यावर टाकला आणि इस्राएली लोकांना ते पाणी प्यायला लावलं.+ २१ त्यानंतर, मोशे अहरोनला म्हणाला: “या लोकांनी तुला असं काय केलं, की तू त्यांना इतकं मोठं पाप करायला लावलंस?” २२ अहरोनने उत्तर दिलं: “माझ्या प्रभू, रागावू नकोस. या लोकांची वृत्ती वाईट आहे हे तुला चांगलं माहीत आहे.+ २३ ते मला म्हणाले, ‘आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणाऱ्या त्या माणसाचं, मोशेचं काय झालं काय माहीत? म्हणून आता आमच्यासाठी एक देव बनव, म्हणजे तो आमच्यापुढे चालेल.’+ २४ म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘ज्या कोणाकडे सोनं असेल त्यांनी ते काढून मला द्या.’ मग मी ते आगीत टाकलं आणि हे वासरू बाहेर आलं.”
२५ मोशेने पाहिलं की अहरोनने लोकांना बेलगाम वागू दिलं आहे आणि यामुळे त्यांच्या शत्रूंसमोर त्यांची लाजिरवाणी स्थिती झाली आहे. २६ मग मोशे छावणीच्या फाटकाजवळ उभा राहिला आणि म्हणाला: “यहोवाच्या बाजूने कोण आहे? त्यांनी माझ्याकडे या!”+ तेव्हा, सर्व लेवी त्याच्याभोवती गोळा झाले. २७ मग तो त्यांना म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा याने असं म्हटलं आहे, ‘तुम्ही प्रत्येक जण आपापली तलवार कंबरेला बांधा आणि छावणीच्या या फाटकापासून त्या फाटकापर्यंत जाऊन आपले भाऊ, शेजारी आणि जवळचे मित्र यांना मारून टाका.’”+ २८ मोशेने सांगितल्याप्रमाणे लेव्यांनी केलं. त्या दिवशी जवळजवळ ३,००० पुरुष मारले गेले. २९ तेव्हा मोशे म्हणाला: “आज यहोवासाठी स्वतःला वेगळं करा,* कारण तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्याच मुलाच्या आणि भावाच्या विरोधात गेला आहे;+ म्हणून आज देव तुम्हाला आशीर्वाद देईल.”+
३० दुसऱ्याच दिवशी, मोशे लोकांना म्हणाला: “तुम्ही फार मोठं पाप केलंय, म्हणून आता मी यहोवाकडे पर्वतावर जातो आणि तुमच्या पापाचं प्रायश्चित्त करता येईल का, हे पाहतो.”+ ३१ तेव्हा मोशे यहोवाकडे परत गेला आणि म्हणाला: “हे लोक किती मोठं पाप करून बसलेत! त्यांनी आपल्यासाठी सोन्याचा देव बनवला!+ ३२ तरी, तुझी इच्छा असेल तर त्यांना क्षमा कर.+ नाहीतर, कृपा करून तुझ्या पुस्तकातून माझं नाव पुसून टाक.”+ ३३ पण यहोवा मोशेला म्हणाला: “ज्याने माझ्याविरुद्ध पाप केलं असेल, त्याचं नाव मी माझ्या पुस्तकातून पुसून टाकीन. ३४ आता जा, आणि ज्या देशाबद्दल मी तुला सांगितलं तिथे या लोकांना ने. बघ, माझा स्वर्गदूत तुझ्यापुढे चालेल+ आणि ज्या दिवशी मी हिशोब घेईन, त्या दिवशी त्यांच्या पापाची शिक्षा मी त्यांना देईन.” ३५ त्यानंतर, यहोवाने लोकांवर पीडा आणली, कारण त्यांच्याच सांगण्यावरून अहरोनने ते वासरू बनवलं होतं.
३३ मग यहोवा मोशेला म्हणाला: “ज्या लोकांना तू इजिप्त देशातून बाहेर आणलंस, त्यांना घेऊन आता पुढे जा. मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना ज्या देशाबद्दल असं म्हणालो होतो, की ‘तुमच्या संततीला* मी तो देईन,’ त्या देशाकडे जा.+ २ मी तुझ्यापुढे एका स्वर्गदूताला पाठवीन+ आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांना हाकलून लावीन.+ ३ तुम्ही दूध आणि मध वाहत असलेल्या देशाकडे जा.+ पण मी तुमच्यासोबत येणार नाही, कारण तुम्ही हट्टी* लोक आहात+ आणि कदाचित मी वाटेतच तुमचा सर्वनाश करीन.”+
४ ही वाईट बातमी ऐकून लोक शोक करू लागले आणि त्यांच्यापैकी एकानेही आपले दागिने घातले नाहीत. ५ यहोवा मोशेला म्हणाला: “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही हट्टी* लोक आहात.+ मी एका क्षणात तुमच्या छावणीतून जाऊन तुमचा सर्वनाश करू शकतो.+ म्हणून आता तुमच्यासोबत काय करावं हे मी ठरवेपर्यंत तुमचे दागिने घालू नका.’” ६ यामुळे होरेब पर्वतापासून पुढे जाताना इस्राएली लोकांनी दागिने घातले नाहीत.*
७ यानंतर मोशेने आपला तंबू छावणीबाहेर काही अंतरावर नेऊन उभा केला. त्याने त्याला भेटमंडप म्हटलं. कोणालाही यहोवाला काही विचारायचं असेल,+ तर तो छावणीबाहेर असलेल्या त्या भेटमंडपाजवळ जायचा. ८ जेव्हा जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जायचा, तेव्हा तेव्हा लोक उठून आपापल्या तंबूच्या दाराजवळ उभे राहायचे आणि मोशे मंडपात जाईपर्यंत ते त्याच्याकडे पाहत राहायचे. ९ मोशे मंडपाच्या आत जाताच ढगाचा खांब+ खाली उतरायचा आणि देव मोशेसोबत बोलत असताना, तो खांब मंडपाच्या प्रवेशाजवळ असायचा.+ १० जेव्हा सर्व लोक मंडपाच्या प्रवेशाजवळ तो ढगाचा खांब पाहायचे, तेव्हा प्रत्येक जण आपापल्या तंबूच्या दाराजवळ वाकून नमन करायचा. ११ दोन माणसं जशी एकमेकांशी बोलतात, तसंच यहोवा मोशेसोबत समोरासमोर बोलायचा.+ मोशे छावणीत परत आल्यावर त्याचा सेवक आणि सहायक+ असलेला, नूनचा मुलगा यहोशवा+ मंडपातच थांबायचा.
१२ मग मोशे यहोवाला म्हणाला: “बघ, तू मला म्हणतोस, की ‘या लोकांना ने;’ पण माझ्यासोबत तू कोणाला पाठवणार हे तू मला अजून सांगितलेलं नाहीस. शिवाय, तू म्हणतोस, ‘मी तुला नावाने ओळखतो* आणि तुझ्यावर माझी कृपा आहे.’ १३ जर माझ्यावर तुझी खरंच कृपा असेल, तर मला तुझे मार्ग दाखव.+ म्हणजे मला तुझी ओळख होईल आणि पुढेही तुझी कृपा माझ्यावर राहील. बघ, हे राष्ट्र शेवटी तुझेच लोक आहेत.”+ १४ तेव्हा देव म्हणाला: “मी स्वतः तुझ्यासोबत येईन+ आणि तुला विश्रांती देईन.”+ १५ मग मोशे देवाला म्हणाला: “जर तू आमच्यासोबत येणार नसशील, तर आम्हाला इथून पाठवू नकोस. १६ माझ्यावर आणि माझ्यासोबतच तुझ्या लोकांवरही तुझी कृपा आहे, हे सर्वांना कसं कळेल? मी आणि तुझे लोक पृथ्वीवरच्या इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे आहोत, हे तू आमच्यासोबत आल्यामुळेच दिसून येणार नाही का?”+
१७ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तुझी ही विनंतीही मी मान्य करीन, कारण तुझ्यावर माझी कृपा आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.” १८ तेव्हा मोशे म्हणाला: “कृपा करून मला तुझं तेज पाहू दे.” १९ पण देव म्हणाला: “मी तुझ्या समोरून जाईन आणि माझा चांगुलपणा तुला पाहायला मिळेल. आणि मी तुझ्यापुढे यहोवाच्या नावाची घोषणा करीन;+ माझी इच्छा असेल, त्याच्यावर मी कृपा करीन आणि माझी इच्छा असेल, त्याच्यावर मी दया करीन.”+ २० पण तो पुढे म्हणाला: “तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण कोणीही माणूस मला पाहून जिवंत राहू शकत नाही.”
२१ मग यहोवा म्हणाला: “ही जागा माझ्या जवळ आहे. तू त्या खडकावर उभा राहा. २२ माझं तेज जवळून जात असताना, मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन आणि मी निघून जाईपर्यंत तुला माझ्या हाताने झाकून ठेवीन. २३ त्यानंतर मी माझा हात काढून घेईन आणि तुला माझी पाठ दिसेल. पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.”+
३४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू दगड कोरून आधीसारख्या दोन पाट्या बनव,+ म्हणजे तू फोडून टाकलेल्या+ आधीच्या पाट्यांवर जे शब्द होते, ते मी या पाट्यांवर लिहीन.+ २ उद्या सकाळसाठी तयार हो, कारण सकाळी तू सीनाय पर्वतावर जाशील आणि पर्वताच्या माथ्यावर माझ्यासमोर उभा राहशील.+ ३ पण तुझ्यासोबत आणखी कोणीही असू नये आणि पर्वतावर दुसरं कोणीही दिसायला नको. त्या पर्वतासमोर गुराढोरांनी किंवा मेंढरांनीही चरू नये.”+
४ म्हणून मोशेने दगड कोरून आधीसारख्याच दोन पाट्या तयार केल्या; आणि यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे तो पहाटेच, त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन सीनाय पर्वतावर गेला. ५ मग यहोवा ढगात खाली आला+ आणि तिथे मोशेसोबत उभा राहिला व त्याने यहोवाचं नाव घोषित केलं.+ ६ यहोवाने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली: “यहोवा, यहोवा, दयाळू,+ करुणामय*+ आणि सहनशील*+ देव; एकनिष्ठ प्रेम*+ आणि सत्याने* भरलेला,+ ७ हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करणारा;+ चुका, अपराध आणि पाप क्षमा करणारा.+ पण तो दोषींना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+ तो वडिलांच्या अपराधांसाठी मुलांना आणि नातवांना, तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत शिक्षा देतो.”+
८ मोशेने लगेच जमिनीपर्यंत वाकून नमन केलं. ९ मग तो म्हणाला: “हे यहोवा, जर आता माझ्यावर तुझी कृपा झाली असेल, तर हे यहोवा तू आमच्यासोबत ये.+ आम्ही हट्टी* लोक असलो,+ तरी आमचा अपराध आणि पाप क्षमा कर+ आणि तुझे स्वतःचे लोक म्हणून आमचा स्वीकार कर.” १० यावर देव म्हणाला: “मी एक करार करतो: मी तुम्हा लोकांसमोर अशा अद्भुत गोष्टी करीन, ज्या पृथ्वीवर किंवा सर्व राष्ट्रांमध्ये कधीच झाल्या नाहीत;*+ आणि ज्या लोकांमध्ये तुम्ही राहता, ते सर्व यहोवाचं कार्य पाहतील, कारण मी तुमच्यासोबत एक आश्चर्यकारक गोष्ट करत आहे.+
११ मी आज तुम्हाला जी आज्ञा देत आहे तिच्याकडे लक्ष द्या.+ मी तुमच्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांना हाकलून लावत आहे.+ १२ सांभाळून राहा, ज्या देशात तुम्ही जात आहात तिथे राहणाऱ्या लोकांसोबत करार करू नका,+ नाहीतर तुम्ही पाशात अडकाल.+ १३ त्याऐवजी, तुम्ही त्यांच्या वेदी व पूजेचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांचे पूजेचे खांब* कापून टाका.+ १४ तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवापुढे वाकू नका,+ कारण फक्त आपलीच उपासना केली जावी, अशी अपेक्षा करणारा* देव म्हणून यहोवाला ओळखलं जातं.* खरोखर, फक्त आपलीच उपासना केली जावी अशी अपेक्षा करणारा तो देव आहे.+ १५ सांभाळून राहा, त्या देशातल्या रहिवाशांसोबत करार करू नका; कारण जेव्हा ते आपल्या देवांची उपासना करतील* आणि बलिदानं देतील,+ तेव्हा कदाचित एखादा तुम्हालाही बोलवेल आणि तुम्ही त्याच्या बलिदानातलं काही खाल.+ १६ मग तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांची लग्नं त्यांच्या मुलींशी करून द्याल;+ आणि जेव्हा त्यांच्या मुली आपल्या देवांची उपासना करून पाप करतील, तेव्हा त्या तुमच्या मुलांनाही त्या देवांची उपासना करून पाप करायला लावतील.+
१७ साच्यात धातू ओतून देव बनवू नका.+
१८ बेखमीर* भाकरींचा सण साजरा करा.+ मी तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, अबीब* महिन्याच्या ठरलेल्या वेळी तुम्ही सात दिवस बेखमीर भाकरी खा.+ कारण अबीब महिन्यातच तुम्ही इजिप्तमधून बाहेर आला होता.
१९ पहिला जन्मलेला प्रत्येक नर* माझा आहे.+ तुमच्या गुराढोरांतलाही पहिला जन्मलेला माझा आहे, मग तो बैल असो किंवा मेंढा.+ २० पहिल्या जन्मलेल्या प्रत्येक गाढवाला सोडवण्यासाठी तुम्ही एक मेंढरू द्यावं. जर तुम्ही त्याला सोडवलं नाही, तर त्याच्या मानेवर वार करून त्याला ठार मारा. आणि तुमच्या मुलांमधून प्रत्येक प्रथमपुत्राला सोडवून घ्या.+ कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाती येऊ नका.
२१ तुम्ही सहा दिवस काम करा, पण सातव्या दिवशी विश्रांती घ्या.*+ नांगरणीच्या आणि कापणीच्या काळातही तुम्ही सातव्या दिवशी विश्रांती घेतली पाहिजे.
२२ गव्हाच्या कापणीचं पहिलं पीक अर्पण करून सप्ताहांचा सण साजरा करा आणि वर्षाच्या शेवटी पीक गोळा करण्याचा सण* साजरा करा.+
२३ वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी इस्राएलचा देव, म्हणजे खरा प्रभू यहोवा याच्यासमोर हजर व्हावं.+ २४ कारण मी इतर राष्ट्रांना तुमच्यासमोरून हाकलून लावीन+ आणि तुमच्या देशाच्या सीमा वाढवीन; तुम्ही वर्षातून तीन वेळा तुमचा देव यहोवा याच्यासमोर हजर व्हायला जाल, तेव्हा कोणीही तुमची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणार नाही.
२५ मला बलिदान केलेल्या प्राण्याच्या रक्तासोबत तुम्ही खमीर* असलेलं काहीही अर्पण करू नका.+ वल्हांडणाच्या सणाचं बलिदान तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राहू देऊ नका.+
२६ तुमच्या जमिनीच्या पहिल्या पिकातला सर्वात चांगला भाग तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या घरात घेऊन या.+
तुम्ही बकरीच्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात उकळू नका.”+
२७ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू हे शब्द लिहून ठेव,+ कारण या शब्दांनुसार मी तुझ्यासोबत आणि इस्राएलसोबत एक करार करत आहे.”+ २८ मोशे ४० दिवस आणि ४० रात्री तिथेच यहोवासोबत राहिला. त्याने काहीच खाल्लं नाही किंवा तो पाणीही प्यायला नाही.+ आणि देवाने* त्या दगडी पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा* लिहिल्या.+
२९ त्यानंतर मोशे सीनाय पर्वतावरून खाली आला आणि त्याच्या हातात साक्षलेखाच्या दोन पाट्या होत्या.+ तो पर्वतावरून खाली आला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून किरणं निघत होती, कारण तो देवाशी बोलला होता. पण आपल्या चेहऱ्यातून किरणं निघत आहेत, हे त्याला माहीत नव्हतं. ३० अहरोनने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोशेला पाहिलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून किरणं निघत आहेत असं त्यांना दिसलं आणि त्याच्या जवळ जायची त्यांना भीती वाटली.+
३१ पण मोशेने त्यांना बोलावून घेतलं; म्हणून अहरोन आणि इस्राएली लोकांचे सर्व प्रधान त्याच्याजवळ आले आणि मोशे त्यांच्याशी बोलला. ३२ त्यानंतर सर्व इस्राएली लोक मोशेजवळ आले आणि त्याने सीनाय पर्वतावर यहोवाने त्याला दिलेल्या सर्व आज्ञा त्यांना सांगितल्या.+ ३३ त्यांच्याशी बोलून झाल्यावर, मोशे आपला चेहरा पडद्याने झाकून घ्यायचा.+ ३४ पण जेव्हा मोशे यहोवाशी बोलायला त्याच्यासमोर जायचा, तेव्हा बाहेर येईपर्यंत तो आपल्या चेहऱ्यावरचा पडदा काढून टाकायचा.+ मग बाहेर आल्यावर तो त्याला मिळालेल्या आज्ञा इस्राएली लोकांना सांगायचा.+ ३५ इस्राएली लोकांना मोशेच्या चेहऱ्यातून किरणं निघताना दिसायची, आणि मोशे पुन्हा देवाशी* बोलायला जाईपर्यंत आपला चेहरा परत पडद्याने झाकून घ्यायचा.+
३५ नंतर मोशेने सर्व इस्राएली लोकांना एकत्र बोलावून त्यांना असं म्हटलं: “यहोवाने या सर्व गोष्टी करण्याची आज्ञा दिली आहे:+ २ सहा दिवस तुम्ही काम करू शकता, पण सातवा दिवस तुमच्यासाठी पवित्र असेल; तो यहोवाला समर्पित केलेला पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ असेल.+ त्या दिवशी जर कोणीही काम केलं, तर त्याला ठार मारलं जाईल.+ ३ शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या वस्त्यांमध्ये कुठेही आग पेटवू नका.”
४ मग मोशे सर्व इस्राएली लोकांना म्हणाला: “यहोवाने आज्ञा दिली आहे की, ५ ‘यहोवासाठी दान गोळा करा.+ ज्या कोणाला मनापासून इच्छा असेल,+ त्याने यहोवासाठी दान म्हणून या गोष्टी आणाव्यात: सोनं, चांदी, तांबं, ६ निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत, चांगल्या प्रतीची मलमल, बकरीचे केस,+ ७ लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची* कातडी, बाभळीचं लाकूड, ८ दिव्यांसाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधित धूपासाठी बाल्सम,*+ ९ गोमेद रत्नं, तसंच, एफोद* व ऊरपटात*+ बसवण्यासाठी इतर रत्नं.+
१० तुमच्यापैकी ज्यांच्याजवळ कौशल्य आहे,*+ अशा सर्वांनी येऊन यहोवाने आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी बनवाव्यात. ११ म्हणजेच, उपासना मंडप आणि तो झाकण्यासाठी असलेली कापडं, त्याचे आकडे, चौकटी, दांडे, खांब आणि खाच असलेल्या बैठका; १२ साक्षपेटी+ आणि तिचे दांडे,+ तिचं झाकण+ आणि पडदा;+ १३ मेज+ आणि त्याचे दांडे, त्याची सगळी भांडी आणि अर्पणाच्या भाकरी;+ १४ उजेड देण्यासाठी दीपवृक्ष+ आणि त्याची भांडी, त्याचे दिवे आणि दिव्यांसाठी तेल;+ १५ धूपवेदी+ आणि तिचे दांडे; अभिषेकाचं तेल आणि सुगंधित धूप;+ उपासना मंडपाच्या प्रवेशासाठी पडदा; १६ होमार्पणाची वेदी+ आणि तिची तांब्याची जाळी, तिचे दांडे आणि तिची सगळी भांडी; तांब्याचं मोठं भांडं* आणि त्याची बैठक;+ १७ अंगणाभोवती लावायचे पडदे,+ त्यांचे खांब आणि खाच असलेल्या बैठका; अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा; १८ उपासना मंडपाच्या खुंट्या, तसंच अंगणाच्या खुंट्या आणि त्यांचे दोर;+ १९ उपासनेच्या ठिकाणी सेवा करणाऱ्यांसाठी कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं,+ अहरोन याजकाची पवित्र वस्त्रं,+ तसंच याजक म्हणून सेवा करणाऱ्या त्याच्या मुलांची वस्त्रं.’”
२० तेव्हा सर्व इस्राएली लोक मोशेसमोरून निघून गेले. २१ मग, ज्या कोणाच्या हृदयाने त्याला प्रेरणा दिली+ आणि ज्या कोणाला अंतःकरणापासून वाटलं तो आला, आणि त्याने भेटमंडपासाठी, तिथल्या उपासनेच्या सगळ्या कामांसाठी, तसंच पवित्र वस्त्रं तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू यहोवासाठी दान म्हणून आणल्या. २२ ज्यांना मनापासून इच्छा झाली असे सगळे स्त्रीपुरुष येतच राहिले; आणि त्यांनी सोन्याचे कानातले, आकडे,* अंगठ्या आणि इतर दागिने, तसंच सोन्याच्या सर्व प्रकारच्या वस्तू आणल्या. त्या सर्वांनी आणलेल्या सोन्याच्या या वस्तू* त्यांनी यहोवाला अर्पण केल्या.+ २३ ज्यांच्या ज्यांच्याजवळ निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत, चांगल्या प्रतीची मलमल, बकरीचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तसंच तहशाची कातडी होती, त्यांनी त्यांनी ती आणली. २४ चांदी आणि तांबं अर्पण करणाऱ्या सर्वांनी यहोवासाठी ते दान म्हणून आणलं, आणि ज्यांच्याजवळ बाभळीचं लाकूड होतं, त्यांनी ते वेगवेगळ्या कामांसाठी आणलं.
२५ सगळ्या कारागीर स्त्रियांनी+ हाताने सूत कातलं आणि त्यांनी ते कातलेलं सूत, म्हणजेच निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल आणली. २६ ज्या कारागीर स्त्रियांच्या हृदयाने त्यांना प्रेरित केलं, त्या सर्व स्त्रियांनी बकरीचे केस कातून सूत तयार केलं.
२७ मग प्रधानांनी एफोद आणि ऊरपटावर+ बसवण्यासाठी गोमेद व इतर रत्नं, २८ तसंच दिव्यांसाठी, अभिषेकाच्या तेलासाठी+ आणि सुगंधित धूपासाठी+ बाल्सम* व तेल आणलं. २९ ज्या स्त्रीपुरुषांच्या हृदयाने त्यांना प्रेरित केलं, त्या सर्वांनी मोशेद्वारे यहोवाने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी तयार करण्यासाठी काही ना काही आणलं; इस्राएली लोकांनी त्या वस्तू यहोवाला स्वेच्छेने अर्पण केल्या.+
३० मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला: “पाहा, यहोवाने यहूदा वंशातल्या हूरचा नातू, म्हणजे उरीचा मुलगा बसालेल याला निवडलं आहे.+ ३१ त्याने त्याला भरपूर प्रमाणात पवित्र शक्ती* दिली आहे, तसंच सर्व प्रकारची कौशल्याची कामं करण्यासाठी बुद्धी, समजशक्ती आणि ज्ञान दिलं आहे, ३२ म्हणजे त्याला कलाकौशल्याची कामं करता येतील; सोनं, चांदी आणि तांबं यांच्या वस्तू बनवता येतील; ३३ तसंच, रत्नांना आकार देऊन ती कोंदणात बसवता येतील आणि लाकडापासून सर्व प्रकारच्या कलात्मक वस्तू बनवता येतील. ३४ आणि देवाने बसालेल आणि दान वंशातल्या अहिसामाकचा मुलगा अहलियाब+ या दोघांना शिकवण्याची क्षमता दिली आहे. ३५ त्याने त्यांना कारागिराचं, भरतकाम करणाऱ्याचं, तसंच, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल विणणाऱ्याचं आणि हातमागाच्या* कारागिराचं कौशल्य* दिलं आहे.+ ती दोघं सर्व प्रकारची कामं करतील आणि नमुने तयार करतील.
३६ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्र सेवेची सगळी कामं कशी करावीत, हे समजून घेण्यासाठी यहोवाने ज्यांना बुद्धी आणि समजशक्ती दिली आहे, अशा प्रत्येक कारागिरासोबत* आणि अहलियाबसोबत बसालेल काम करेल.”+
२ मग मोशेने बसालेल आणि अहलियाब यांना बोलावलं. तसंच, यहोवाने ज्यांचं हृदय बुद्धीने भरलं होतं,+ म्हणजे ज्या कोणाच्या हृदयाने त्याला काम करण्यासाठी स्वेच्छेने पुढे यायला प्रेरित केलं होतं,+ अशा सर्व कारागिरांनाही त्याने बोलावलं. ३ तेव्हा त्यांनी पवित्र सेवेच्या कामासाठी इस्राएली लोकांनी दान म्हणून आणलेल्या सर्व वस्तू मोशेकडून घेतल्या.+ पण तरीही इस्राएली लोक दररोज सकाळी स्वेच्छेने अर्पणं आणतच राहिले.
४ मग त्यांनी पवित्र काम सुरू केल्यावर, सर्व कारागीर एकापाठोपाठ एक येऊ लागले. ५ तेव्हा ते मोशेला म्हणू लागले: “यहोवाने आज्ञा दिलेल्या कामासाठी लागतील त्यापेक्षाही खूप जास्त गोष्टी लोक आणत आहेत.” ६ मग मोशेने सबंध छावणीत अशी घोषणा करण्याची आज्ञा दिली: “आता कोणीही पवित्र दान म्हणून आणखी काहीही आणू नका.” अशा रितीने लोकांना आणखी दान आणण्यापासून थांबवण्यात आलं. ७ सर्व काम पूर्ण करण्यासाठी या गोष्टी पुरेशा होत्या, खरंतर त्यापेक्षाही जास्त होत्या.
८ तेव्हा सर्व कारागिरांनी+ चांगल्या प्रतीची मलमल, निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून उपासना मंडपाची+ दहा कापडं बनवली. त्याने* त्या कापडांवर भरतकामाने करूब* बनवले.+ ९ प्रत्येक कापडाची लांबी २८ हात* आणि रुंदी चार हात होती. सगळी कापडं एकाच मापाची होती. १० मग त्याने पाच कापडं एकापाठोपाठ एक जोडली आणि उरलेली पाच कापडंही तशीच एकापाठोपाठ एक जोडली. ११ यानंतर या कापडांना एकमेकांशी जोडण्यासाठी त्याने एका कापडाच्या कडेवर निळ्या सुताचे फास* बनवले. मग दुसऱ्या कापडाला जिथे जोडलं जाणार होतं, तिथेही त्याने कापडाच्या कडेला तसेच फास बनवले. १२ त्याने एका कापडाच्या कडेला ५० फास आणि दुसऱ्या कापडाच्या कडेलाही ५० फास बनवले. त्याने ते फास अशा रितीने बनवले, की कापडांना जोडल्यावर ते फास समोरासमोर असतील. १३ शेवटी, त्याने सोन्याचे ५० आकडे बनवले आणि त्या आकड्यांनी दोन्ही कापडांना एकत्र जोडलं. अशा रितीने एकच अखंड उपासनेचा मंडप तयार झाला.
१४ यानंतर त्याने बकरीच्या केसांपासूनही उपासना मंडपावर टाकण्यासाठी कापडं बनवली. त्याने एकूण ११ कापडं बनवली.+ १५ प्रत्येक कापडाची लांबी ३० हात आणि रुंदी चार हात होती. सर्व ११ कापडं एकाच मापाची होती. १६ मग त्याने पाच कापडं एकत्र जोडली आणि उरलेली सहा कापडंही तशीच एकत्र जोडली. १७ यानंतर या कापडांना एकमेकांशी जोडण्यासाठी त्याने एका कापडाच्या कडेवर ५० फास बनवले. मग दुसऱ्या कापडाला जोडण्यासाठी त्याने त्या कापडाच्या कडेलाही ५० फास बनवले. १८ तसंच त्याने तांब्याचे ५० आकडे बनवले आणि मंडपाचं कापड जोडून एक अखंड कापड तयार केलं.
१९ त्याने उपासना मंडपाला झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातडीचं; आणि त्याच्यावर टाकण्यासाठी तहशाच्या* कातडीचं आच्छादन बनवलं.+
२० मग त्याने उपासना मंडपासाठी बाभळीच्या लाकडापासून+ उभ्या चौकटी बनवल्या.+ २१ प्रत्येक चौकट दहा हात उंच आणि दीड हात रुंद होती. २२ प्रत्येक चौकटीला दोन समांतर कुसू* होते. अशाच रितीने त्याने उपासना मंडपाच्या सगळ्या चौकटी बनवल्या. २३ मग त्याने उपासना मंडपाच्या दक्षिणेकडच्या भागासाठी २० चौकटी तयार केल्या. २४ त्यानंतर त्याने २० चौकटींच्या खाली ठेवण्यासाठी खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका* बनवल्या; एका चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका बनवल्या.+ २५ उपासना मंडपाच्या दुसऱ्या भागासाठी, म्हणजे उत्तरेकडच्या भागासाठी त्याने २० चौकटी बनवल्या, २६ आणि त्यांच्यासाठी खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका बनवल्या. त्याने एका चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका बनवल्या.
२७ उपासना मंडपाच्या मागच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूसाठी त्याने सहा चौकटी बनवल्या.+ २८ उपासना मंडपाच्या मागच्या दोन कोपऱ्यांसाठी त्याने दोन चौकटी बनवल्या. २९ त्याने यांपैकी प्रत्येक चौकटीसाठी खालून वरपर्यंत दोन भाग बनवले आणि ते पहिल्या कडीजवळ जोडले. कोपऱ्यांवरच्या दोन्ही चौकटी त्याने अशाच प्रकारे बनवल्या. ३० अशा रितीने, आठ चौकटी आणि खाच असलेल्या चांदीच्या १६ बैठका झाल्या. प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका होत्या.
३१ मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवले. उपासना मंडपाच्या एका बाजूच्या चौकटींसाठी पाच दांडे,+ ३२ आणि त्याच्या दुसऱ्या बाजूच्या चौकटींसाठी त्याने पाच दांडे बनवले. तसंच, उपासना मंडपाच्या मागच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिमेकडच्या चौकटींसाठीही त्याने पाच दांडे बनवले. ३३ चौकटींच्या मध्यभागी लावण्यासाठी त्याने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल इतका लांब दांडा बनवला. ३४ त्याने चौकटींना सोन्याने मढवलं आणि दांडे अडकवण्याच्या त्यांच्या कड्या सोन्याच्या बनवल्या. तसंच, त्याने दांड्यांनाही सोन्याने मढवलं.+
३५ मग त्याने निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एक पडदा बनवला.+ त्याने त्याच्यावर भरतकामाने करूब बनवले.+ ३६ या पडद्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवले आणि त्यांना सोन्याने मढवलं. तसंच, त्याने सोन्याचे आकडे बनवले आणि खांबांसाठी खाच असलेल्या चांदीच्या चार बैठका बनवल्या. ३७ मग त्याने मंडपाच्या प्रवेशासाठी निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून विणलेला एक पडदा बनवला.+ ३८ तसंच, त्यासाठी पाच खांब आणि त्यांचे आकडे त्याने बनवले. खांबांच्या वरच्या टोकांना आणि कड्यांना* त्याने सोन्याने मढवलं, पण त्यांच्या खाच असलेल्या पाच बैठका तांब्याच्या होत्या.
३७ त्यानंतर, बसालेलने+ बाभळीच्या लाकडापासून साक्षपेटी+ बनवली. ती अडीच हात लांब, दीड हात* रुंद आणि दीड हात उंच होती.+ २ त्याने ती आतून व बाहेरून शुद्ध सोन्याने मढवली आणि तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनवली.+ ३ मग त्याने पेटीच्या चार पायांच्या वरती बसवण्यासाठी, साच्यांमध्ये ओतून सोन्याच्या चार कड्या बनवल्या. त्याने एका बाजूला दोन कड्या आणि दुसऱ्या बाजूला दोन कड्या बसवल्या. ४ यानंतर, त्याने बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवले आणि ते सोन्याने मढवले.+ ५ मग त्याने साक्षपेटी उचलण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कड्यांमध्ये ते दांडे घातले.+
६ त्याने शुद्ध सोन्याचं झाकण बनवलं.+ ते अडीच हात लांब आणि दीड हात रुंद होतं.+ ७ मग, झाकणाच्या दोन टोकांवर+ त्याने हातोडीने ठोकून सोन्याचे दोन करूब*+ घडवले. ८ एका टोकावर एक करूब, तर दुसऱ्या टोकावर दुसरा करूब होता. त्याने झाकणाच्या दोन्ही टोकांवर करूब बनवले. ९ त्या करुबांचे दोन पंख वरच्या बाजूला पसरलेले होते. त्यांनी आपल्या पंखांनी झाकणाला झाकलं होतं+ आणि ते एकमेकांच्या समोरासमोर होते. त्यांचे चेहरे खाली झाकणाकडे वळलेले होते.+
१० त्यानंतर त्याने बाभळीच्या लाकडाचं एक मेजही बनवलं.+ त्याची लांबी दोन हात, रुंदी एक हात आणि उंची दीड हात होती.+ ११ त्याने त्याला शुद्ध सोन्याने मढवलं आणि त्याच्यासभोवती सोन्याची किनार* बनवली. १२ मग त्याने मेजाला चार बोटं रुंदीची* एक चौकट बनवली आणि त्या चौकटीला सोन्याची किनार* बनवली. १३ नंतर, त्याने त्याच्यासाठी साच्यांमध्ये ओतून सोन्याच्या चार कड्या बनवल्या आणि त्याच्या चार कोपऱ्यांवर त्याच्या पायांच्या वरती त्या बसवल्या. १४ त्या कड्या चौकटीजवळ होत्या; मेज उचलून नेताना त्या कड्यांमधून दांडे घातले जायचे. १५ मग त्याने मेज उचलून नेण्यासाठी, बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवले आणि ते सोन्याने मढवले. १६ यानंतर त्याने मेजावर ठेवण्याची भांडी, म्हणजेच ताटं व प्याले आणि पेयार्पणं ओतण्यासाठी सुरया आणि वाट्या शुद्ध सोन्यापासून बनवल्या.+
१७ मग त्याने शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष+ बनवला. त्याने तो हातोडीने ठोकून घडवला. त्याचा तळ, बुंधा, फुलं, कळ्या आणि पाकळ्या एकाच अखंड तुकड्याचे होते.+ १८ दीपवृक्षाच्या बुंध्याला सहा फांद्या होत्या. एका बाजूला तीन फांद्या आणि दुसऱ्या बाजूला तीन फांद्या होत्या. १९ एका बाजूच्या प्रत्येक फांदीवर बदामाच्या फुलाच्या आकाराची तीन फुलं होती आणि आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या होत्या. दुसऱ्या बाजूच्या प्रत्येक फांदीचीही अशीच रचना होती. दीपवृक्षाच्या सर्व सहा फांद्यांची रचना अशीच होती. २० दीपवृक्षाच्या बुंध्याला बदामाच्या फुलासारखी चार फुलं होती आणि त्याला आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या होत्या. २१ दीपवृक्षाच्या बुंध्यातून निघणाऱ्या सहा फांद्यांपैकी पहिल्या दोन फांद्यांखाली एक कळी, त्यानंतरच्या दोन फांद्यांखाली एक कळी आणि त्यानंतरच्या दोन फांद्यांखालीही एक कळी होती. २२ कळ्या, फांद्या आणि संपूर्ण दीपवृक्ष हा शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून हातोडीने ठोकून घडवलेला होता. २३ मग त्याने त्याचे सात दिवे+ आणि त्यांचे चिमटे, त्याची धूप जाळण्याची पात्रं* शुद्ध सोन्यापासून बनवली. २४ त्याने ही सर्व भांडी आणि दीपवृक्ष एक तालान्त* वजनाच्या शुद्ध सोन्यापासून बनवला.
२५ मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी+ बनवली. ती चौकोनी होती; तिची लांबी एक हात, रुंदी एक हात आणि उंची दोन हात होती. वेदी आणि तिची शिंगं एकाच तुकड्यापासून बनवलेली होती.+ २६ त्याने तिला शुद्ध सोन्याने मढवलं. वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू आणि तिची शिंगं त्याने शुद्ध सोन्याने मढवली. त्याने तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनवली. २७ वेदीच्या दोन बाजूंना, किनारीच्या* खाली त्याने सोन्याच्या दोन कड्या बनवल्या; वेदी उचलून नेताना या कड्यांमधून दांडे घातले जायचे. २८ मग त्याने बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवले आणि ते सोन्याने मढवले. २९ तसंच त्याने अभिषेकाचं पवित्र तेल बनवलं,+ आणि कुशलपणे मिश्रण तयार करून शुद्ध सुगंधित धूप बनवला.+
३८ मग बसालेलने बाभळीच्या लाकडापासून होमार्पणाची वेदी बनवली; ती चौकोनी होती आणि तिची लांबी पाच हात,* रुंदी पाच हात आणि उंची तीन हात होती.+ २ त्यानंतर, त्याने तिच्या चारही कोपऱ्यांवर शिंगं बनवली; शिंगं वेदीचाच भाग होती. मग त्याने वेदी तांब्याने मढवली.+ ३ नंतर त्याने वेदीची सगळी भांडी, म्हणजे बादल्या, फावडी, वाट्या, काटे आणि धूप जाळण्याची पात्रं* बनवली. ही सगळी भांडी त्याने तांब्याची बनवली. ४ तसंच, त्याने वेदीसाठी तांब्याची जाळी बनवली आणि ती किनारीच्या खाली, वेदीच्या आत मधोमध बसवली. ५ त्याने त्या तांब्याच्या जाळीजवळ वेदीच्या चार टोकांवर, दांडे घालण्यासाठी साच्यात ओतून चार कड्या बनवल्या. ६ यानंतर, त्याने बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवले आणि त्यांना तांब्याने मढवलं. ७ वेदी उचलून नेण्यासाठी त्याने ते दांडे वेदीच्या बाजूला असलेल्या कड्यांमध्ये घातले. त्याने वेदी फळ्यांपासून बनवलेल्या पोकळ पेटीसारखी बनवली.
८ मग त्याने तांब्याचं मोठं भांडं*+ आणि त्याची तांब्याची बैठक बनवली; यासाठी त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ व्यवस्थेप्रमाणे सेवा करणाऱ्या स्त्रियांचे आरसे* वापरले.
९ मग त्याने अंगण बनवलं.+ दक्षिणेकडे, त्याने अंगणाला चांगल्या प्रतीच्या मलमलीचे पडदे लावले. त्यांची लांबी १०० हात होती.+ १० पडद्यांसाठी २० खांब आणि खाच असलेल्या २० तांब्याच्या बैठका* होत्या. खांबांचे आकडे आणि कड्या* चांदीच्या होत्या. ११ उत्तरेकडेही १०० हात लांबीचे पडदे होते. त्यांचे २० खांब आणि खाच असलेल्या २० बैठका तांब्याच्या होत्या. त्यांचे आकडे आणि कड्या* चांदीच्या होत्या. १२ पण पश्चिमेकडचे पडदे ५० हात लांबीचे होते. त्यांच्यासाठी दहा खांब आणि खाच असलेल्या दहा बैठका होत्या आणि त्यांचे आकडे आणि कड्या* चांदीच्या होत्या. १३ सूर्य उगवण्याच्या दिशेला, म्हणजेच पूर्वेकडे अंगणाची रुंदी ५० हात होती. १४ प्रवेशद्वाराच्या एका बाजूला १५ हात लांबीचे पडदे, त्यांचे तीन खांब आणि त्यांच्या खाच असलेल्या तीन बैठका होत्या. १५ तसंच, अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूलाही १५ हात लांबीचे पडदे, त्यांचे तीन खांब आणि त्यांच्या खाच असलेल्या तीन बैठका होत्या. १६ अंगणाभोवती लावलेले सगळे पडदे चांगल्या प्रतीच्या मलमलीचे होते. १७ खांबांच्या खाच असलेल्या बैठका तांब्याच्या होत्या. त्यांचे आकडे आणि कड्या* चांदीच्या असून खांबांची टोकं चांदीने मढवलेली होती. शिवाय, अंगणाच्या सर्व खांबांना चांदीचे सांधे होते.+
१८ अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं कापड आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवलेला होता. अंगणाच्या इतर पडद्यांप्रमाणेच हा पडदाही २० हात लांब आणि पाच हात उंच होता.+ १९ त्याचे चार खांब आणि खाच असलेल्या चार बैठका तांब्याच्या होत्या. त्यांचे आकडे आणि कड्या* चांदीच्या होत्या आणि त्यांची टोकं चांदीने मढवलेली होती. २० उपासना मंडपाच्या, तसंच अंगणाभोवती लावलेल्या सर्व खुंट्या तांब्याच्या होत्या.+
२१ उपासना मंडपाच्या, म्हणजेच साक्षपेटीच्या मंडपाच्या+ बांधकामासाठी वापरलेल्या सर्व वस्तूंची यादी पुढे दिली आहे. मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन याजकाचा मुलगा इथामार+ याच्या मार्गदर्शनाखाली, लेव्यांनी+ ही यादी बनवण्याची जबाबदारी पार पाडली. २२ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, यहूदा वंशातल्या हूरचा नातू, म्हणजे उरीचा मुलगा बसालेल+ याने सगळ्या गोष्टी बनवल्या. २३ दान वंशातल्या अहिसामाकचा मुलगा अहलियाब+ हासुद्धा त्याच्यासोबत होता. तो एक उत्तम कारागीर, भरतकाम करणारा, तसंच निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल विणणारा होता.
२४ पवित्र ठिकाणाच्या कामासाठी वापरलेलं सगळं सोनं, ओवाळण्याच्या अर्पणात देण्यात आलेल्या सोन्याइतकं,+ म्हणजे २९ तालान्त* आणि पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे* ७३० शेकेल* इतकं होतं. २५ इस्राएलमधल्या नावनोंदणी झालेल्या पुरुषांनी दिलेली चांदी १०० तालान्त आणि पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे* १,७७५ शेकेल इतकी होती. २६ नावनोंदणी झालेल्या, २० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या एकूण ६,०३,५५० पुरुषांनी+ अर्धा शेकेल दिला. प्रत्येकाने द्यायचा अर्धा शेकेल हा पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे* अर्धा शेकेल होता.+
२७ पवित्र ठिकाणासाठी आणि पडद्यांसाठी साच्यात ओतून ज्या खाच असलेल्या बैठका बनवण्यात आल्या, त्यांसाठी १०० तालान्त चांदी लागली; एका बैठकीसाठी एक तालान्त, याप्रमाणे १०० बैठकांसाठी १०० तालान्त चांदी वापरण्यात आली.+ २८ त्याने १,७७५ शेकेल चांदीतून खांबांचे आकडे बनवले, तसंच त्यांची टोकं चांदीने मढवून ते एकत्र जोडले.
२९ अर्पण केलेलं* तांबं ७० तालान्त आणि २,४०० शेकेल इतकं होतं. ३० या तांब्यापासून त्याने भेटमंडपाच्या प्रवेशाच्या खाच असलेल्या बैठका, तांब्याची वेदी व तिची तांब्याची जाळी, वेदीची सगळी भांडी, ३१ अंगणासाठी खाच असलेल्या बैठका, अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खाच असलेल्या बैठका, तसंच, उपासना मंडपाच्या आणि अंगणाच्या सगळ्या खुंट्या बनवल्या.+
३९ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी अहरोनसाठी पवित्र वस्त्रं बनवली.+ पवित्र ठिकाणात सेवा करण्यासाठी त्यांनी निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत+ यांपासून कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं बनवली.
२ बसालेलने सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एफोद* बनवलं.+ ३ त्यांनी हातोडीने सोनं ठोकून त्याचे पातळ पत्रे बनवले आणि मग त्याने ते कापून त्यांच्या तारा बनवल्या. मग त्याने या तारांनी निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवलेल्या एफोदवर भरतकाम केलं. ४ त्यांनी एफोदसाठी जोडलेले खांदपट्टे बनवले आणि ते त्याच्या वरच्या दोन टोकांना जोडले. ५ एफोदला बांधून ठेवण्यासाठी जो विणलेला पट्टा* त्याला जोडला होता,+ तोसुद्धा यहोवाने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे, सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल याच गोष्टींपासून बनवला होता.
६ मग त्यांनी गोमेद रत्नं घेऊन ती सोन्याच्या कोंदणांत बसवली आणि मुद्रेवर कोरतात त्याप्रमाणे त्यांवर इस्राएलच्या मुलांची नावं कोरली.+ ७ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, बसालेलने ती रत्नं इस्राएलच्या मुलांची आठवण म्हणून एफोदच्या खांदपट्ट्यांवर ठेवली.+ ८ मग त्याने ऊरपट* बनवला.+ त्यावर एफोदप्रमाणेच भरतकाम करण्यात आलं होतं. तो सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवला होता.+ ९ ऊरपट दुमडल्यावर तो चौकोनी झाला आणि त्याची लांबी व रुंदी एक वीत* होती. १० त्यांनी त्यावर रत्नांच्या चार ओळी बसवल्या. पहिल्या ओळीत माणीक, पुष्कराज, आणि पाचू होते. ११ दुसऱ्या ओळीत पिरोजा, नीलमणी, आणि यास्फे ही रत्नं होती. १२ तिसऱ्या ओळीत लेशेम,* लसण्या, आणि जमुनिया, १३ तर चौथ्या ओळीत चंद्रकांत, गोमेद आणि मर्गझ ही रत्नं होती. ती सोन्याच्या कोंदणांत बसवलेली होती. १४ ही रत्नं इस्राएलच्या १२ मुलांच्या नावांप्रमाणे होती. इस्राएलच्या १२ वंशांपैकी प्रत्येकाचं नाव, मुद्रेवर कोरतात तसं त्यांवर कोरलेलं होतं.
१५ मग त्यांनी ऊरपटावर शुद्ध सोन्याच्या गोफांसारख्या पिळदार साखळ्या बनवल्या.+ १६ त्यानंतर त्यांनी सोन्याची दोन कोंदणं व दोन कड्या बनवल्या आणि त्यांनी त्या दोन कड्या ऊरपटाच्या दोन टोकांना जोडल्या. १७ मग त्यांनी सोन्याचे ते दोन गोफ ऊरपटाच्या टोकांना असलेल्या दोन कड्यांमधून घातले. १८ त्यानंतर त्यांनी दोन गोफांची दोन टोकं, दोन कोंदणांमधून घातली आणि त्यांना एफोदच्या खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला जोडलं. १९ मग त्यांनी सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या एफोदच्या समोर, ऊरपटाच्या आतल्या बाजूला खालच्या दोन टोकांना लावल्या.+ २० नंतर त्यांनी आणखी दोन सोन्याच्या कड्या बनवल्या. त्यांनी त्या कड्या एफोदच्या समोरच्या बाजूला, जिथे ते जोडलेलं होतं त्याच्या जवळ, खांदपट्ट्यांच्या खाली आणि एफोदच्या विणलेल्या पट्ट्याच्या* वरती लावल्या. २१ शेवटी त्यांनी ऊरपटाच्या कड्यांना एफोदच्या कड्यांशी निळ्या दोरीने अशा रितीने बांधलं, की विणलेल्या पट्ट्याच्या* वरती असलेला ऊरपट एफोदवरून सरकणार नाही. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी हे केलं.
२२ मग बसालेलने एफोदच्या आत घालायचा बिनबाह्यांचा झगा हातमागाच्या* कारागिराकडून पूर्णपणे निळ्या सुताने विणून घेतला.+ २३ डोकं घालण्यासाठी चिलखताला असतो, तसा त्या झग्याला मधोमध गळा होता. तो फाटू नये म्हणून त्याच्या गळ्याभोवती किनार होती. २४ नंतर त्यांनी त्याच्या खालच्या किनारीला निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून डाळिंबं बनवली. २५ मग त्यांनी शुद्ध सोन्यापासून घंट्या बनवल्या आणि बिनबाह्यांच्या झग्याच्या खालच्या किनारीला डाळिंबांच्या मध्ये त्या लावल्या. २६ सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या बिनबाह्यांच्या झग्याच्या सबंध खालच्या किनारीला, त्यांनी सोन्याची एक घंटी आणि एक डाळिंब आलटूनपालटून लावलं. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी हे केलं.
२७ मग हातमागाच्या कारागिराने विणलेल्या चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून त्यांनी अहरोन आणि त्याच्या मुलांसाठी अंगरखे बनवले.+ २८ तसंच, त्यांनी चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून पगडी,+ अहरोनच्या मुलांसाठी सुंदर पगड्या+ आणि अंतर्वस्त्रंही*+ बनवली. २९ त्याचप्रमाणे, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून त्यांनी कमरबंद बनवला. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी हे केलं.
३० शेवटी त्यांनी समर्पणाचं पवित्र चिन्ह* म्हणून शुद्ध सोन्याची एक चकाकणारी पट्टी बनवली आणि मुद्रेवर कोरतात तसे तिच्यावर हे शब्द कोरले: “पावित्र्य यहोवाचं आहे.”+ ३१ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी ती पट्टी पगडीवर बांधण्यासाठी तिला एक निळी दोरी बांधली.
३२ अशा रितीने उपासना मंडपाचं, म्हणजे भेटमंडपाचं सर्व काम पूर्ण झालं. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सगळ्या गोष्टी केल्या.+ त्यांनी अगदी तसंच केलं.
३३ मग त्यांनी उपासना मंडप,+ म्हणजे मंडप+ आणि त्याचं हे सगळं सामान मोशेकडे आणलं: आकडे,+ चौकटी,+ दांडे,+ खांब आणि खाच असलेल्या बैठका;*+ ३४ लाल रंगवलेल्या मेंढ्याच्या कातडीचं आच्छादन,+ तहशाच्या* कातडीचं आच्छादन, पडदा;+ ३५ साक्षपेटी आणि तिचे दांडे+ व झाकण;+ ३६ मेज, त्याची सर्व भांडी+ आणि अर्पणाच्या भाकरी; ३७ शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्याचे दिवे,+ म्हणजे ओळीने लावायचे दिवे, त्याची सर्व भांडी+ आणि दिव्यांसाठी तेल;+ ३८ सोन्याची वेदी,+ अभिषेकाचं तेल,+ सुगंधित धूप,+ मंडपाच्या प्रवेशाचा पडदा;+ ३९ तांब्याची वेदी+ व तिची तांब्याची जाळी, तिचे दांडे,+ तिची सर्व भांडी,+ तसंच तांब्याचं मोठं भांडं* व त्याची बैठक;+ ४० अंगणाचे पडदे, त्यांचे खांब आणि खाच असलेल्या बैठका,+ अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,+ त्याचे दोर आणि खुंट्या,+ तसंच उपासना मंडपाच्या, म्हणजे भेटमंडपाच्या सेवेसाठी लागणारी सर्व भांडी; ४१ पवित्र ठिकाणात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रं+ आणि याजक म्हणून सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रं.
४२ यहोवाने मोशेला जे काही सांगितलं, त्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी सगळी कामं केली.+ ४३ त्यांनी बनवलेल्या सगळ्या गोष्टी जेव्हा मोशेने पाहिल्या, तेव्हा यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी त्या बनवल्या आहेत, असं त्याला दिसलं; आणि मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
४० मग यहोवा मोशेला म्हणाला: २ “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तू उपासना मंडप, म्हणजे भेटमंडप उभा कर.+ ३ त्यात साक्षपेटी ठेव+ आणि ती दिसू नये म्हणून तिच्यासमोर पडदा लाव.+ ४ मग तू मेज+ मंडपात आणून त्याच्यावरच्या वस्तू नीट रचून ठेव. त्यानंतर तू दीपवृक्ष+ आण आणि त्याचे दिवे पेटव.+ ५ मग सोन्याने मढवलेली धूपवेदी+ साक्षपेटीसमोर ठेव आणि उपासना मंडपाच्या प्रवेशाचा पडदा लाव.+
६ होमार्पणाची वेदी+ उपासना मंडपाच्या, म्हणजेच भेटमंडपाच्या प्रवेशासमोर ठेव. ७ मग तू तांब्याचं मोठं भांडं* भेटमंडपाच्या आणि वेदीच्या मधोमध ठेव आणि त्यात पाणी भर.+ ८ नंतर उपासना मंडपाच्या सभोवती अंगण+ तयार कर आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा+ लाव. ९ मग तू अभिषेकाचं तेल+ घेऊन उपासना मंडप आणि त्यातल्या सर्व वस्तूंचा अभिषेक कर;+ तसंच उपासना मंडप आणि त्यातली सर्व भांडी तू पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. १० तू होमार्पणाच्या वेदीचा आणि तिच्या सर्व भांड्यांचा अभिषेक कर आणि वेदी पवित्र कर, म्हणजे ती परमपवित्र वेदी होईल.+ ११ मग तांब्याच्या मोठ्या भांड्याचा आणि त्याच्या बैठकीचा अभिषेक कर आणि ते पवित्र कर.
१२ यानंतर, अहरोन आणि त्याच्या मुलांना भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ आणून त्यांना अंघोळ घाल.+ १३ मग तू अहरोनला पवित्र वस्त्रं घाल+ आणि त्याचा अभिषेक करून+ त्याला पवित्र कर, म्हणजे तो याजक म्हणून माझी सेवा करू शकेल. १४ नंतर त्याच्या मुलांना पुढे आणून त्यांना अंगरखे घाल.+ १५ मग त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांचाही अभिषेक कर,+ म्हणजे ते याजक म्हणून माझी सेवा करू शकतील. त्यांच्या अभिषेकामुळे याजकपद पिढ्या न् पिढ्या, कायमचं त्यांचं राहील.”+
१६ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही केलं.+ त्याने अगदी तसंच केलं.
१७ दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, उपासना मंडप उभा करण्यात आला.+ १८ मोशेने उपासना मंडप उभा करण्यासाठी त्याच्या खाच असलेल्या बैठका*+ मांडल्या, त्यांवर चौकटी+ बसवल्या, त्याचे दांडे+ घातले आणि त्याचे खांब उभे केले. १९ यानंतर त्याने उपासना मंडपाची कापडं+ त्यावर टाकली आणि त्यांवर आच्छादनं+ घातली. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
२० मग मोशेने साक्षलेखाच्या पाट्या+ साक्षपेटीमध्ये+ ठेवल्या आणि साक्षपेटीच्या कड्यांमध्ये दांडे+ घालून तिच्यावर झाकण+ ठेवलं. २१ त्याने साक्षपेटी उपासना मंडपात आणून, ती दिसू नये म्हणून तिच्यासमोर पडदा+ लावला.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
२२ मग त्याने भेटमंडपात पडद्याबाहेर, म्हणजेच उपासना मंडपाच्या उत्तरेकडे मेज+ ठेवलं. २३ त्याने त्या मेजावर यहोवासमोर भाकरी रचून ठेवल्या.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
२४ यानंतर त्याने भेटमंडपात मेजासमोर, म्हणजेच उपासना मंडपाच्या दक्षिणेकडे दीपवृक्ष+ ठेवला. २५ मग त्याने यहोवासमोर दिवे पेटवले.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
२६ नंतर त्याने सोन्याने मढवलेली वेदी+ भेटमंडपात पडद्यासमोर ठेवली. २७ ती वेदी सुगंधित धूप+ जाळण्यासाठी होती.+ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
२८ मग त्याने उपासना मंडपाच्या प्रवेशाचा पडदा+ लावला.
२९ होमार्पणं+ आणि अन्नार्पणं देता यावीत म्हणून त्याने उपासना मंडपाच्या, म्हणजेच भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ होमार्पणाची वेदी+ ठेवली. यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केलं.
३० मग त्याने तांब्याचं मोठं भांडं भेटमंडपाच्या आणि वेदीच्या मधोमध ठेवलं आणि त्यात पाणी भरलं.+ ३१ मोशे, अहरोन आणि त्याच्या मुलांनी त्या भांड्याजवळ हातपाय धुतले. ३२ जेव्हा जेव्हा ते भेटमंडपात किंवा वेदीजवळ जायचे, तेव्हा तेव्हा, यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे ते हातपाय धुवायचे.+
३३ शेवटी त्याने उपासना मंडप आणि वेदीभोवती अंगणाचे पडदे लावले+ आणि अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा लावला.+
अशा रितीने मोशेने सर्व काम पूर्ण केलं. ३४ तेव्हा ढग भेटमंडपाला झाकू लागला आणि यहोवाच्या तेजाने उपासना मंडप भरून गेला.+ ३५ तो ढग तिथेच राहिला आणि यहोवाच्या तेजाने उपासना मंडप भरून गेला,+ त्यामुळे मोशे भेटमंडपात जाऊ शकला नाही.
३६ इस्राएली लोकांच्या संपूर्ण प्रवासात जेव्हा जेव्हा उपासना मंडपावरून तो ढग वर जायचा, तेव्हा तेव्हा ते लोक तळ हलवायचे.+ ३७ पण ढग वर जाईपर्यंत ते तळ हलवत नव्हते.+ ३८ उपासना मंडपावर दिवसा यहोवाचा ढग असायचा आणि रात्री आग असायची. इस्राएलच्या घराण्याच्या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना हे दृश्य दिसत राहिलं.+
इस्राएल हे देवाने याकोबला दिलेलं नाव आहे.
किंवा “मिसरला.”
शब्दशः “याकोब.”
शब्दशः “याकोबच्या मांडीतून बाहेर आलेल्या.”
किंवा “जिवांची.”
शब्दशः “इस्राएलची मुलं.”
किंवा “मुकादम.”
शब्दशः “पपायरस गवत.”
किंवा “संदूक.”
हिब्रूमध्ये डांबरासारख्याच असलेल्या “शिलाजित” या पदार्थाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
म्हणजे, “बाहेर काढलेला,” अर्थात पाण्यातून वाचवलेला.
किंवा “मोशे ताकदवान होऊ लागल्यावर.”
किंवा “रक्षण केलं.”
म्हणजे, इथ्रो.
म्हणजे, “तिथे एक विदेशी.”
शब्दशः “बऱ्याच दिवसांनी.”
किंवा “ओसाड रानाच्या.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सेवा.”
किंवा “मी जे व्हायचं निवडीन.”
किंवा “मी जे सिद्ध होईन, ते सिद्ध होईन.” अति. क४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “तुझ्या तोंडासोबत.”
किंवा “प्रतिनिधी.”
किंवा “त्याच्यासाठी देवाचा प्रतिनिधी होशील.”
किंवा “गारगोटीचा सुरा.”
किंवा “मजुरीकामाला.”
किंवा “जुलूम करणाऱ्यांना; लोकांकडून बळजबरीने काम करून घेणाऱ्यांना.”
यांना इस्राएली लोकांमधून निवडलं जायचं.
शब्दशः “गवताऐवजी पेंढा.”
किंवा “उगारलेल्या हाताने.”
शब्दशः “मी आपला हात वर केला.”
शब्दशः “त्यांच्या सैन्यांप्रमाणे.”
शब्दशः “देव केलं आहे.”
शब्दशः “माझ्या सैन्यांना.”
किंवा “जादूच्या विद्येने.”
शब्दशः “काठीने.”
म्हणजे, नाईलचे नाले.
किंवा “भांड्यांमध्ये.”
म्हणजे, एक चावणारा, डासांसारखा कीटक.
शब्दशः “बोट.”
एक प्रकारची चावणारी माशी.
म्हणजे, इजिप्तचे लोक.
किंवा “गळवं.”
शब्दशः “यहोवाच्या शब्दाचं भय मानलं.”
कदाचित हे मोठी वीज चमकण्याला सूचित करत असावं.
किंवा “जवसाच्या.”
हिब्रू भाषेत इथे दोन प्रकारच्या गव्हांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांपैकी एक हलक्या प्रतीचा होता. या गव्हाची जुन्या काळातल्या इजिप्तमध्ये शेती केली जायची.
किंवा “हंगाम उशिरा.”
शब्दशः “सापळा असेल.”
बहुतेक मोशे.
किंवा “घ्यायची परवानगी द्याल.”
शब्दशः “एक खूर.”
म्हणजे, दरवर्षी या महिन्याच्या दहाव्या दिवशी.
किंवा “जिवांना.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
शब्दार्थसूची पाहा.
यामध्ये आतड्या, हृदय, यकृत, गुरदे आणि शरीरातल्या इतर भागांचा समावेश होता.
शब्दशः “कंबर कसून.”
या शब्दाचा अर्थ “ओलांडणं” असा होतो. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “स्मारक.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जीव.”
किंवा “ठार मारलं जावं.”
किंवा “प्रत्येक जिवाला.”
शब्दशः “सैन्यं.”
किंवा “त्या जिवाचा.”
किंवा “ठार मारलं जावं.”
म्हणजे, मेंढीची किंवा बकरीची पिल्लं.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “नाश.”
शब्दशः “कुंडाचं घर.”
किंवा “भांड्यांसोबत.”
म्हणजे, मुळात इस्राएली नसलेल्या विदेश्यांचा समूह, ज्यात इजिप्तचे लोकही होते.
शब्दशः “सैन्यं.”
शब्दशः “सैन्यं.”
शब्दशः “प्रत्येक गर्भाशय उघडणारं प्रत्येक पहिलं मूल.”
किंवा “पवित्र कर.”
शब्दार्थसूची पाहा.
अति. ख१५ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “सीमा.”
शब्दशः “तुमच्या डोळ्यांच्या मधे.”
किंवा “स्मारक.”
शब्दशः “तुमच्या तोंडात.”
शब्दशः “गर्भाशय उघडणारा प्रत्येक जण.”
शब्दशः “गर्भाशय उघडणारं सर्वकाही.”
शब्दशः “तुमच्या डोळ्यांच्या मधे.”
किंवा “हाडंही.”
किंवा “माझी हाडं.”
शब्दशः “उंच केलेल्या हाताने.”
किंवा “तारण करतो.”
म्हणजे, पहाटे सुमारे २:०० ते ६:०० च्या दरम्यान.
शब्दशः “हात.”
“याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
किंवा “शिशासारखे.”
शब्दशः “प्रसूतीच्या वेदना.”
शेख हा लोकांचा सरदार किंवा अधिपती असायचा.
किंवा “हुकूमशहा.”
शब्दशः “वारशाच्या डोंगरावर.”
म्हणजे, “कडूपणा.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
एक लहानसा १८ सें.मी. (७ इंच) लांबीचा गुबगुबीत पक्षी, ज्याचं मांस खूप चविष्ट असतं.
किंवा “भाकर.”
किंवा “जीव.”
सुमारे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
सुमारे २.२ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “शब्बाथ पाळला जाईल.”
किंवा “विश्रांती घेतली.”
कदाचित, “काय आहे हे?” या अर्थाच्या हिब्रू वाक्यांशावरून.
शब्दशः “साक्ष.” कदाचित ही पेटी महत्त्वाची कागदपत्रं जपून ठेवण्यासाठी वापरली जायची.
एक एफा म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.
म्हणजे, “परीक्षा घेणं; परीक्षा.”
म्हणजे, “भांडणं.”
किंवा “स्मारक.”
म्हणजे, “यहोवा माझा झेंडा आहे.”
म्हणजे, “तिथे एक विदेशी.”
म्हणजे, “देव माझा सहायक आहे.”
शब्दशः “इजिप्तच्या हातून.”
शब्दशः “प्रत्येक वेळी.”
किंवा “मौल्यवान संपत्ती.”
कदाचित बाणाने.
शब्दशः “मेंढ्याच्या शिंगाचा.”
शब्दशः “स्त्रीजवळ जाऊ नका.”
शब्दशः “तुटून पडणं.”
किंवा “माझ्या विरोधात.” शब्दशः “माझ्या चेहऱ्यासमोर.”
किंवा “प्रतीक.”
शब्दशः “फाटकांच्या आत.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “तुमची नग्नता.”
छोटी छिद्रं पाडण्यासाठी वापरलं जाणारं हत्यार.
शब्दशः “सोडवू दिलं.”
किंवा कदाचित, “मालकाने.” शब्दशः “त्याने.”
हे शरीरसंबंधांना सूचित करतं.
किंवा कदाचित, “हत्याराने.”
शब्दशः “आणि तिची मुलं बाहेर आली.”
किंवा “गंभीर दुखापत.”
किंवा “नुकसान भरपाई.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “खड्ड्याच्या मालकाला.”
किंवा “वडील नसलेल्या.”
किंवा “त्रासात असलेल्या.”
किंवा “व्याजखोरासारखं.”
किंवा “तारण म्हणून.”
किंवा “कृपाळू.”
किंवा “शासकाला.”
किंवा “निंदा करू नका.”
शब्दशः “उचलणं.”
शब्दशः “शब्द.”
किंवा “नीतिमान.”
किंवा “जीवन कसं असतं.”
शब्दशः “तोंडात.”
शब्दार्थसूची पाहा.
अति. ख१५ पाहा.
याला सप्ताहांचा सण किंवा पेन्टेकॉस्ट असंही म्हणतात.
याला मंडपांचा सण असंही म्हणतात.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तुमचे सर्व शत्रू मागे फिरतील.”
किंवा कदाचित, “कावरेबावरे होतील; दहशत बसेल.”
म्हणजे, फरात नदी.
किंवा “लालसर जांभळ्या रंगात रंगवलेली लोकर.”
या सुतासाठी लागणारा रंग कॉकस नावाच्या किड्यापासून तयार केला जातो.
हिब्रू भाषेत तहश हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील म्हणतात. हा डॉल्फीन माशाच्या आकाराचा असतो.
काही झुडपांपासून आणि वृक्षांपासून बनवलं जाणारं सुगंधी तेल. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
ऊरपट म्हणजे भरतकाम केलेला खिसा. महायाजक हा आपल्या छातीवर घालायचा.
किंवा “निवास करावा.”
किंवा “रचना.”
किंवा “संदूक.”
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
सुमारे ७.४ सें.मी. (२.९ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
शब्दार्थसूची पाहा.
एक प्रकारची समई.
शब्दार्थसूची पाहा.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “रचनेप्रमाणेच.”
शब्दार्थसूची पाहा.
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
आकडे अडकवण्यासाठी सुतापासून बनवलेले वळसे.
हिब्रू भाषेत तहश हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील म्हणतात. हा डॉल्फीन माशाच्या आकाराचा असतो.
किंवा “झाकण्याचं कापड.”
म्हणजे, लाकडाला एखाद्या वस्तूशी जोडण्यासाठी त्याच्या शेवटी कापून बनवलेलं टोक.
म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “चरबीयुक्त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.
म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “बुद्धिमान हृदयाचे.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कमरपट्टा.”
रत्नं बसवण्यासाठी असलेल्या खाचा.
म्हणजे, एका हाताची वीत, सुमारे २२.२ सें.मी (८.७५ इंच). अति. ख१४ पाहा.
एक अज्ञात मौल्यवान रत्न, जे कदाचित कापूरमणी, राहुरत्न, पुलक, किंवा तुरमलमणी यांना सूचित करत असावं.
म्हणजे, वरच्या टोकांना.
किंवा “कमरपट्ट्याच्या.”
किंवा “कमरपट्ट्याच्या.”
शब्दशः “हृदय.”
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, हाताने कापड विणण्याचं साधन.
शब्दशः “त्यांचे हात भर.”
किंवा “आत घालायचे कपडे.”
शब्दशः “बीज.”
किंवा “तरणा बैल.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कमरबंद.”
किंवा “पवित्र मुकुट.”
शब्दशः “अहरोनचा हात आणि त्याच्या मुलांचा हात भर.”
शब्दशः “जाळून धूर करावा.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दशः “अभिषेकाचा मेंढा.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मागेपुढे हालव.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मागेपुढे हालव.”
शब्दशः “त्यांचा हात भरण्यासाठी.”
शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.
शब्दशः “हात भरण्याचा.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
एक एफा म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.
एक हिन म्हणजे ३.६७ ली. अति. ख१४ पाहा.
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
सुमारे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
किंवा “नक्षीदार पट्टीच्या.”
किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
एक गेरा म्हणजे ०.५७ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “गंगाळ.”
एक सुगंधी वनस्पती.
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
एक प्रकारचं दालचिनीचं झाड किंवा त्यापासून मिळणारी वस्तू.
एक हिन म्हणजे ३.६७ ली. अति. ख१४ पाहा.
शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.
हा पदार्थ नेमका काय होता हे सांगता येत नाही. कदाचित हा एखाद्या सुगंधी झाडापासून किंवा एक प्रकारच्या शिंपल्यापासून बनवला जात असावा.
एका झाडातून निघणारा डिंक, जो इतर सुगंधी पदार्थांमध्ये मिसळल्यावर त्यांचा सुगंध वाढवतो आणि तो सुगंध जास्त काळ टिकून राहायला मदत करतो.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “साक्ष.”
शब्दशः “नावाने हाक मारली.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “बुद्धिमान हृदयाचे.”
किंवा “गंगाळ.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “ओतीव मूर्ती.”
किंवा “ओतीव मूर्ती.”
शब्दशः “कठोर मानेचे.”
किंवा “पस्तावा कर.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”
किंवा “त्याला पस्तावा झाला.”
किंवा “पराक्रमाच्या.”
शब्दशः “आपला हात भरा.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “कठोर मानेचे.”
शब्दशः “कठोर मानेचे.”
शब्दशः “उतरवून टाकले.”
किंवा “मी तुला निवडलं आहे.”
किंवा “कृपाळू.”
किंवा “लगेच न रागावणारा.”
किंवा “प्रेमदया.”
किंवा “विश्वासूपणाने.”
शब्दशः “कठोर मानेचे.”
किंवा “निर्माण करण्यात आल्या नाहीत.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “प्रतिस्पर्ध्यांना खपवून न घेणारा.”
शब्दशः “यहोवा, त्याचं नाव आहे.”
किंवा “देवांशी व्यभिचार करतील.”
शब्दार्थसूची पाहा.
अति. ख१५ पाहा.
शब्दशः “गर्भाशय उघडणारं सर्वकाही.”
किंवा “शब्बाथ पाळा.”
याला मंडपांचा सण असंही म्हणतात.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “त्याने.”
शब्दशः “दहा शब्द.”
शब्दशः “त्याच्याशी.”
हिब्रू भाषेत तहश हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील म्हणतात. हा डॉल्फीन माशाच्या आकाराचा असतो.
काही झुडपांपासून आणि वृक्षांपासून बनवलं जाणारं सुगंधी तेल. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “बुद्धिमान हृदयाचे.”
किंवा “गंगाळ.”
कदाचित, या कपड्यांना लावण्याच्या शोभेच्या पिना असाव्यात.
किंवा “ओवाळण्याची अर्पणं.”
काही झुडपांपासून आणि वृक्षांपासून बनवलं जाणारं सुगंधी तेल. शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, हाताने कापड विणण्याचं साधन.
शब्दशः “हृदयाची बुद्धी.”
शब्दशः “बुद्धिमान हृदयाचा प्रत्येक माणूस.”
कदाचित हे बसालेल याला सूचित करत असावं.
शब्दार्थसूची पाहा.
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
आकडे अडकवण्यासाठी सुतापासून बनवलेले वळसे.
हिब्रू भाषेत तहश हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील म्हणतात. हा डॉल्फीन माशाच्या आकाराचा असतो.
म्हणजे, लाकडाला एखाद्या वस्तूशी जोडण्यासाठी त्याच्या शेवटी कापून बनवलेलं टोक.
म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
सुमारे ७.४ सें.मी. (२.९ इंच). अति. ख१४ पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
शब्दार्थसूची पाहा.
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “नक्षीदार पट्टी.”
किंवा “नक्षीदार पट्टीच्या.”
एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “गंगाळ.”
म्हणजे, खूप चमकवलेले धातूचे आरसे.
म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”
एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
किंवा “ओवाळण्याच्या अर्पणात दिलेलं.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कमरपट्टा.”
शब्दार्थसूची पाहा.
सुमारे २२.२ सें.मी. (८.७५ इंच). अति. ख१४ पाहा.
एक अज्ञात मौल्यवान रत्न, जे कदाचित कापूरमणी, राहुरत्न, पुलक, किंवा तुरमलमणी यांना सूचित करत असावं.
किंवा “कमरपट्ट्याच्या.”
किंवा “कमरपट्ट्याच्या.”
म्हणजे, हाताने कापड विणण्याचं साधन.
किंवा “आत घालायचे कपडेही.”
किंवा “पवित्र मुकुट.”
म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.
हिब्रू भाषेत तहश हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील म्हणतात. हा डॉल्फीन माशाच्या आकाराचा असतो.
किंवा “गंगाळ.”
किंवा “गंगाळ.”
म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.