वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • मिद्यानी लोक इस्राएलवर जुलूम करतात (१-१०)

      • एक स्वर्गदूत गिदोन न्यायाधीशाला मदत करण्याचं आश्‍वासन देतो (११-२४)

      • गिदोन बआल दैवताची वेदी पाडून टाकतो (२५-३२)

      • देवाची पवित्र शक्‍ती गिदोनवर कार्य करते (३३-३५)

      • लोकरीच्या परीक्षेवरून मिळालेली खातरी (३६-४०)

शास्ते ६:१

समासातील संदर्भ

  • +शास २:१९
  • +अनु २८:१५, ४८; शास २:१४; नहे ९:२८

शास्ते ६:२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “धान्य लपवण्यासाठी भूमिगत जागा.”

समासातील संदर्भ

  • +गण ३३:५५
  • +१शमु १३:५, ६

शास्ते ६:३

समासातील संदर्भ

  • +शास ३:१३
  • +शास ८:१०

शास्ते ६:४

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५, ३३; २८:३१, ४८

शास्ते ६:५

समासातील संदर्भ

  • +शास ८:१०
  • +शास ७:१२

शास्ते ६:६

समासातील संदर्भ

  • +अनु ४:३०

शास्ते ६:७

समासातील संदर्भ

  • +शास २:१८; स्तो १०७:१९

शास्ते ६:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “घरातून.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:२; लेवी २६:१३; शास २:१

शास्ते ६:९

समासातील संदर्भ

  • +यहो १०:४२; नहे ९:२४

शास्ते ६:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “दैवतांचं भय बाळगू नका.”

समासातील संदर्भ

  • +अनु ६:४
  • +यहो २४:१५
  • +अनु २८:१५; शास २:२; यिर्म ३:१३

शास्ते ६:११

समासातील संदर्भ

  • +शास २:१
  • +यहो १७:२; शास ६:२४; ८:३२
  • +उत्प ४९:२२, २४; इब्री ११:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २९

शास्ते ६:१२

समासातील संदर्भ

  • +शास २:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २९

शास्ते ६:१३

समासातील संदर्भ

  • +शास ६:२
  • +निर्ग १३:१४
  • +अनु ४:९; स्तो ४४:१
  • +अनु ३१:१७; २इत १५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२०००, पृ. १६-१७

शास्ते ६:१४

समासातील संदर्भ

  • +शास ८:२२; इब्री ११:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२०००, पृ. १६-१७

शास्ते ६:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२०००, पृ. १६-१७

शास्ते ६:१६

समासातील संदर्भ

  • +अनु २०:३, ४; शास २:१८

शास्ते ६:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:३, ५; शास १३:१५

शास्ते ६:१९

तळटीपा

  • *

    २२ लीटरच्या भांड्यात मावेल इतकं पीठ. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:६, ७; १९:१, ३

शास्ते ६:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी ९:२४; शास १३:१९, २०; १रा १८:३८; १इत २१:२६; २इत ७:१

शास्ते ६:२२

समासातील संदर्भ

  • +शास १३:८, ९; इब्री १३:२
  • +उत्प १६:७, १३; ३२:२४, ३०; शास १३:२१, २२; लूक १:११, १२

शास्ते ६:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुला शांती मिळो.”

समासातील संदर्भ

  • +दान १०:१९

शास्ते ६:२४

तळटीपा

  • *

    म्हणजे, “यहोवा शांती आहे.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:१४; निर्ग १७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. २२-२३

शास्ते ६:२५

तळटीपा

  • *

    शब्दशः “दुसरा बैल.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२४; अनु १२:३

शास्ते ६:२६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दशः “दुसऱ्‍या बैलाचं.”

शास्ते ६:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२०००, पृ. १७

शास्ते ६:२८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दशः “दुसऱ्‍या बैलाचं.”

शास्ते ६:३०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

शास्ते ६:३१

समासातील संदर्भ

  • +शास ६:११
  • +अनु १३:५; १७:२-५
  • +१रा १८:२६, २७; स्तो ११५:५; यिर्म १०:५

शास्ते ६:३२

तळटीपा

  • *

    म्हणजे, “बआलने स्वतःची वकिली करावी (बाजू मांडावी).”

शास्ते ६:३३

समासातील संदर्भ

  • +गण २५:१७, १८; शास ६:२
  • +निर्ग १७:१६; गण २४:२०; अनु २५:१९
  • +शास ६:३; ७:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८७, पृ. २७-२८

शास्ते ६:३४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +शास ३:९, १०; ११:२९; १३:२४, २५; १४:६; १५:१४; जख ४:६
  • +शास ३:२६, २७
  • +यहो १७:२

शास्ते ६:३६

समासातील संदर्भ

  • +शास ६:१४

शास्ते ६:३७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते ६:१शास २:१९
शास्ते ६:१अनु २८:१५, ४८; शास २:१४; नहे ९:२८
शास्ते ६:२गण ३३:५५
शास्ते ६:२१शमु १३:५, ६
शास्ते ६:३शास ३:१३
शास्ते ६:३शास ८:१०
शास्ते ६:४अनु २८:१५, ३३; २८:३१, ४८
शास्ते ६:५शास ८:१०
शास्ते ६:५शास ७:१२
शास्ते ६:६अनु ४:३०
शास्ते ६:७शास २:१८; स्तो १०७:१९
शास्ते ६:८निर्ग २०:२; लेवी २६:१३; शास २:१
शास्ते ६:९यहो १०:४२; नहे ९:२४
शास्ते ६:१०अनु ६:४
शास्ते ६:१०यहो २४:१५
शास्ते ६:१०अनु २८:१५; शास २:२; यिर्म ३:१३
शास्ते ६:११शास २:१
शास्ते ६:११यहो १७:२; शास ६:२४; ८:३२
शास्ते ६:११उत्प ४९:२२, २४; इब्री ११:३२
शास्ते ६:१२शास २:१८
शास्ते ६:१३शास ६:२
शास्ते ६:१३निर्ग १३:१४
शास्ते ६:१३अनु ४:९; स्तो ४४:१
शास्ते ६:१३अनु ३१:१७; २इत १५:२
शास्ते ६:१४शास ८:२२; इब्री ११:३२
शास्ते ६:१६अनु २०:३, ४; शास २:१८
शास्ते ६:१८उत्प १८:३, ५; शास १३:१५
शास्ते ६:१९उत्प १८:६, ७; १९:१, ३
शास्ते ६:२१लेवी ९:२४; शास १३:१९, २०; १रा १८:३८; १इत २१:२६; २इत ७:१
शास्ते ६:२२शास १३:८, ९; इब्री १३:२
शास्ते ६:२२उत्प १६:७, १३; ३२:२४, ३०; शास १३:२१, २२; लूक १:११, १२
शास्ते ६:२३दान १०:१९
शास्ते ६:२४उत्प २२:१४; निर्ग १७:१५
शास्ते ६:२५निर्ग २३:२४; अनु १२:३
शास्ते ६:३१शास ६:११
शास्ते ६:३१अनु १३:५; १७:२-५
शास्ते ६:३११रा १८:२६, २७; स्तो ११५:५; यिर्म १०:५
शास्ते ६:३३गण २५:१७, १८; शास ६:२
शास्ते ६:३३निर्ग १७:१६; गण २४:२०; अनु २५:१९
शास्ते ६:३३शास ६:३; ७:१२
शास्ते ६:३४शास ३:९, १०; ११:२९; १३:२४, २५; १४:६; १५:१४; जख ४:६
शास्ते ६:३४शास ३:२६, २७
शास्ते ६:३४यहो १७:२
शास्ते ६:३६शास ६:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते ६:१-४०

शास्ते

६ पण, इस्राएली लोक पुन्हा एकदा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करू लागले.+ म्हणून, यहोवाने त्यांना सात वर्षांसाठी मिद्यानी लोकांच्या हवाली केलं.+ २ मिद्यानी लोक इस्राएली लोकांवर जुलूम करू लागले.+ त्यांच्या भीतीमुळे इस्राएली लोकांनी डोंगरांमध्ये, गुहांमध्ये आणि शत्रूंना सहज पोहोचता येणार नाही अशा ठिकाणी लपण्याच्या जागा* तयार केल्या.+ ३ इस्राएली लोक शेतात पेरणी करायचे, तेव्हा मिद्यानी, अमालेकी+ आणि पूर्वेकडचे लोक+ येऊन त्यांच्यावर हल्ला करायचे, ४ आणि देशात छावणी करून अगदी गाझापर्यंत शेतांतल्या पिकांची नासधूस करायचे. अन्‍नधान्य, मेंढरं, बैल किंवा गाढव असं काहीही ते इस्राएली लोकांसाठी सोडत नव्हते.+ ५ मिद्यानी लोक जेव्हा आपली गुरंढोरं आणि तंबू घेऊन यायचे, तेव्हा ते टोळांच्या धाडीसारखे वाटायचे.+ त्यांची आणि त्यांच्या उंटांची संख्या, कोणालाही मोजता येणार नाही इतकी असायची.+ ते लोक देशात घुसून देश उद्ध्‌वस्त करायचे. ६ मिद्यानी लोकांमुळे इस्राएली लोकांमध्ये भयंकर गरिबी पसरली, आणि ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले.+

७ मिद्यानी लोकांमुळे इस्राएली लोक जेव्हा यहोवाचा धावा करू लागले,+ ८ तेव्हा यहोवाने त्यांच्याकडे एक संदेष्टा पाठवला. तो त्यांना म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘मी तुम्हाला इजिप्तमधून, गुलामगिरीच्या देशातून* बाहेर आणलं.+ ९ मी तुम्हाला इजिप्तच्या लोकांच्या हातून आणि तुमच्यावर जुलूम करणाऱ्‍या सर्व लोकांच्या हातून सोडवलं. मी त्यांना तुमच्यापुढून घालवून दिलं आणि त्यांचा देश तुम्हाला दिला.+ १० मी तुम्हाला म्हणालो होतो: “मी तुमचा देव यहोवा आहे.+ आणि ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता, त्यांच्या दैवतांची उपासना करू नका.”*+ पण, तुम्ही माझं ऐकलं नाही.’”+

११ मग, यहोवाचा एक स्वर्गदूत+ अफ्रा इथल्या मोठ्या झाडाखाली येऊन बसला. हे झाड योवाश अबियेजरी+ याचं होतं. त्या वेळी योवाशचा मुलगा गिदोन,+ मिद्यानी लोकांपासून गव्हाचं धान्य लपवण्यासाठी द्राक्षकुंडात गव्हाची झोडपणी करत होता. १२ तेव्हा यहोवाचा स्वर्गदूत त्याच्यासमोर आला आणि त्याला म्हणाला: “हे शूर योद्ध्या! यहोवा तुझ्यासोबत आहे.”+ १३ त्यावर गिदोन त्याला म्हणाला: “क्षमा कर माझ्या प्रभू. पण यहोवा जर आमच्यासोबत आहे, तर आमच्याबरोबर हे सगळं का घडतंय?+ आमचे वाडवडील आम्हाला सांगायचे: ‘यहोवानेच आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणलं.’+ आता त्याची ती सगळी अद्‌भुत कार्यं कुठे गेली?+ यहोवाने आम्हाला सोडून दिलंय+ आणि मिद्यानी लोकांच्या हवाली केलंय.” १४ मग यहोवा त्याच्याकडे पाहून म्हणाला: “तू इस्राएलला मिद्यानी लोकांच्या हातून नक्की सोडवशील.+ कारण मी तुला पाठवत आहे. तेव्हा हिंमत धर आणि जा.” १५ त्यावर गिदोन त्याला म्हणाला: “क्षमा कर यहोवा. मी इस्राएलला कसं वाचवणार? मनश्‍शेच्या वंशात माझं घराणं सगळ्यात लहान आहे. आणि माझ्या वडिलांच्या घरात तर मी फार छोटा माणूस आहे.” १६ पण, यहोवा त्याला म्हणाला: “एकट्या माणसाला मारावं, तसं तू सगळ्या मिद्यानी लोकांना मारून टाकशील. कारण मी तुझ्यासोबत असेन.”+

१७ तेव्हा गिदोन त्याला म्हणाला: “तू जर माझ्यावर प्रसन्‍न असशील, तर तूच माझ्याशी बोलतोय हे दाखवण्यासाठी मला एक चिन्ह दे. १८ मी भेट घेऊन येईपर्यंत आणि ती तुला देईपर्यंत कृपा करून इथेच थांब.”+ तेव्हा तो म्हणाला: “ठीक आहे, तू येईपर्यंत मी इथेच थांबून राहीन.” १९ मग गिदोन गेला आणि त्याने बकरीचं एक पिल्लू घेतलं आणि त्याचं मांस शिजवलं. तसंच, त्याने एक एफा* पीठ घेऊन बेखमीर भाकरीही बनवल्या.+ त्याने ते शिजवलेलं मांस एका टोपलीत घेतलं आणि रस्सा पातेल्यात घेतला. मग ते सगळं घेऊन तो मोठ्या झाडाजवळ आला आणि त्याने ते त्याला वाढलं.

२० तेव्हा खऱ्‍या देवाचा स्वर्गदूत त्याला म्हणाला: “हे मांस आणि बेखमीर भाकरी घेऊन, तिथे त्या मोठ्या खडकावर ठेव. आणि त्यावर रस्सा ओत.” गिदोनने तसंच केलं. २१ मग यहोवाच्या स्वर्गदूताने आपल्या हातातली काठी लांब करून त्याचं टोक मांसाला आणि बेखमीर भाकरीला लावलं. तेव्हा, खडकातून अग्नी निघाला आणि मांस व बेखमीर भाकरी भस्म झाल्या.+ मग यहोवाचा स्वर्गदूत त्याच्या नजरेपुढून गायब झाला. २२ तेव्हा गिदोनला समजलं, की तो यहोवाचाच स्वर्गदूत होता.+

तो म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, मी स्वतःच्या डोळ्यांनी तुझ्या स्वर्गदूताला पाहिलंय! हे यहोवा, आता काय होईल?”+ २३ पण, यहोवा त्याला म्हणाला: “शांत हो,* घाबरू नकोस.+ तू मरणार नाहीस.” २४ मग, गिदोनने तिथे यहोवासाठी एक वेदी बांधली आणि तिला यहोवा-शालोम*+ असं नाव दिलं. आजही ती वेदी त्याच नावाने ओळखली जाते, आणि ती अजूनही अबियेजरी लोकांच्या अफ्रा या ठिकाणी आहे.

२५ त्या रात्री यहोवा त्याला म्हणाला: “तुझ्या वडिलांकडे असलेला सात वर्षांचा बैल* घे. मग, तुझ्या वडिलांची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्या शेजारी असलेला पूजेचा खांब* तोडून टाक.+ २६ नंतर तुझा देव यहोवा याच्यासाठी त्या उंच ठिकाणी दगड रचून एक वेदी बांध. मग जो पूजेचा खांब* तू तोडशील त्याच्या लाकडांवर बैलाचं* होमार्पण कर.” २७ तेव्हा, गिदोनने आपल्या दहा सेवकांना सोबत घेऊन यहोवाने सांगितल्याप्रमाणे केलं. पण, आपल्या वडिलांच्या घराण्यातल्या लोकांची आणि शहरातल्या माणसांची त्याला खूप भीती वाटत असल्यामुळे त्याने हे काम दिवसा नाही, तर रात्री केलं.

२८ दुसऱ्‍या दिवशी सकाळी शहरातली माणसं उठली तेव्हा त्यांनी पाहिलं, की बआलची वेदी पाडून टाकण्यात आली आहे. आणि तिच्या शेजारी असलेला पूजेचा खांबसुद्धा* तोडून टाकण्यात आला आहे. तसंच, त्या ठिकाणी एक नवीन वेदी बांधून तिच्यावर बैलाचं* होमार्पण करण्यात आलं आहे हेसुद्धा त्यांनी पाहिलं. २९ तेव्हा ते एकमेकांना म्हणू लागले: “हे कोणाचं काम असेल?” चौकशी केल्यावर ते म्हणाले: “हे योवाशचा मुलगा गिदोन याचं काम आहे.” ३० तेव्हा शहरातली माणसं योवाशला म्हणाली: “तुझ्या मुलाला बाहेर आण. त्याने बआलची वेदी पाडली आहे आणि तिच्या शेजारचा पूजेचा खांबही* तोडून टाकला आहे. आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही.” ३१ यावर योवाश+ आपल्या विरोधात उठलेल्या लोकांना म्हणाला: “तुम्हाला बआलची वकिली करायची काय गरज आहे? तुम्हाला त्याला वाचवायची काय गरज आहे? जर कोणी त्याची वकिली करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आजच सकाळी मारून टाकलं जाईल.+ बआल जर देव असेल, तर त्याची वेदी पाडून टाकणाऱ्‍याविरुद्ध त्याने स्वतःच वकिली करावी.”+ ३२ त्या दिवशी योवाशने गिदोनला यरुब्बाल* असं नाव दिलं. तो म्हणाला: “कोणीतरी बआलची वेदी पाडली आहे. म्हणून बआलनेच स्वतःची वकिली करावी.”

३३ नंतर सर्व मिद्यानी,+ अमालेकी+ आणि पूर्वेकडचे लोक एकत्र आले;+ त्यांनी नदी पार केली आणि इज्रेलच्या खोऱ्‍यात येऊन छावणी केली. ३४ मग यहोवाची पवित्र शक्‍ती* गिदोनवर उतरली.+ तेव्हा त्याने रणशिंग फुंकलं+ आणि अबियेजरी+ लोक त्याच्यामागे गेले. ३५ गिदोनने मनश्‍शेच्या संपूर्ण प्रदेशात दूतांच्या हातून संदेश पाठवला, तेव्हा तेसुद्धा त्याच्या मदतीला आले. त्याने आशेर, जबुलून आणि नफताली यांच्या प्रदेशातही दूतांच्या हातून संदेश पाठवला, आणि तेही त्याला साथ द्यायला आले.

३६ तेव्हा गिदोन खऱ्‍या देवाला म्हणाला: “तू जर वचन दिल्याप्रमाणे+ माझ्या हातून इस्राएलला वाचवणार असशील ३७ तर बघ, मी खळ्यात* कातरलेली लोकर ठेवत आहे. जर फक्‍त लोकरीवर दव पडलं आणि आजूबाजूची जमीन कोरडी राहिली, तर मी समजेन की वचन दिल्याप्रमाणे तू माझ्या हातून इस्राएलला वाचवशील.” ३८ दुसऱ्‍या दिवशी अगदी तसंच घडलं. गिदोन पहाटे उठला, आणि दवाने भिजलेली लोकर त्याने पिळली. तेव्हा एक मोठी वाटी भरेल इतकं पाणी त्यातून निघालं. ३९ पण, गिदोन खऱ्‍या देवाला म्हणाला: “माझ्यावर रागावू नकोस. माझी आणखी एक विनंती आहे. तू खरंच माझ्यासोबत आहेस, याची मला परत एकदा खातरी करू दे. या वेळी लोकर कोरडी राहू दे, पण त्याच्या आजूबाजूच्या जमिनीवर मात्र दव पडू दे.” ४० त्या रात्री देवाने तसंच केलं; लोकर कोरडी राहिली आणि आजूबाजूची जमीन दवाने भिजून गेली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा