शास्ते
३ इस्राएलमध्ये असे काही लोक होते ज्यांनी कनानसोबत झालेली कोणतीही युद्धं अनुभवली नव्हती. त्या सर्वांची परीक्षा पाहण्यासाठी यहोवाने काही राष्ट्रांना त्यांच्यामध्ये राहू दिलं.+ २ (हे यासाठी की, इस्राएलच्या ज्या नवीन पिढ्यांनी कधीच युद्ध अनुभवलं नव्हतं, त्यांना त्याचा अनुभव मिळावा.) ३ देवाने ज्या लोकांना राहू दिलं होतं ते हे: पलिष्टी+ लोकांचे पाच राजे, सगळे कनानी व सीदोनी+ लोक, आणि बआल-हर्मोन पर्वतापासून लेबो-हमाथपर्यंत*+ लबानोन+ डोंगरावर राहणारे हिव्वी+ लोक. ४ यहोवाने मोशेद्वारे इस्राएलच्या वाडवडिलांना दिलेल्या आज्ञा इस्राएली लोक पाळतात की नाही, याची परीक्षा पाहण्यासाठी त्याने या राष्ट्रांचा उपयोग केला.+ ५ अशा प्रकारे इस्राएली लोक कनानी,+ हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांसोबत राहू लागले. ६ इस्राएली लोकांनी त्यांच्या मुलींशी लग्न केलं व आपल्या मुलींचं लग्न त्यांच्या मुलांशी लावून दिलं; आणि ते त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.+
७ इस्राएली लोकांनी यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते केलं. ते आपला देव यहोवा याला विसरले आणि बआल दैवतांची+ व पूजेच्या खांबांची* उपासना करू लागले.+ ८ म्हणून यहोवाचा क्रोध इस्राएलवर भडकला. त्याने त्यांना मेसोपटेम्याचा* राजा कुशन-रिशाथाईम याच्या हाती दिलं.* आणि इस्राएली लोकांनी आठ वर्षं या राजाची गुलामी केली. ९ मग इस्राएली लोक मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले.+ त्यांची सुटका करण्यासाठी+ यहोवाने अथनिएलला+ नेमलं. अथनिएल हा कालेबचा लहान भाऊ कनाज याचा मुलगा होता. १० अथनिएलवर यहोवाची पवित्र शक्ती* आली,+ आणि तो इस्राएलचा न्यायाधीश बनला. तो लढाईला गेला तेव्हा यहोवाने मेसोपटेम्याचा* राजा कुशन-रिशाथाईम याला त्याच्या हाती दिलं, आणि अथनिएलने त्याला हरवलं. ११ त्यानंतर ४० वर्षं देशामध्ये शांती टिकून राहिली. मग कनाजचा मुलगा अथनिएल याचा मृत्यू झाला.
१२ मग, इस्राएली लोक पुन्हा एकदा यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते करू लागले.+ यहोवाच्या दृष्टीने वाईट कामं केल्यामुळे, यहोवाने मवाबचा+ राजा एग्लोन याला इस्राएलवर विजयी होऊ दिलं. १३ एग्लोनने अम्मोनी+ व अमालेकी+ लोकांना आपल्यासोबत घेऊन इस्राएलवर हल्ला केला. आणि त्यांनी खजुराच्या झाडांच्या शहरावर* कब्जा मिळवला.+ १४ इस्राएली लोकांनी, मवाबचा राजा एग्लोन याची १८ वर्षं गुलामी केली.+ १५ मग ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले.+ तेव्हा, त्यांची सुटका करण्यासाठी+ यहोवाने गेराचा मुलगा एहूद+ याला नेमलं. एहूद हा बन्यामीन+ वंशातला असून डावखुरा होता.+ इस्राएली लोकांनी त्याच्या हातून मवाबचा राजा एग्लोन याला नजराणा* पाठवला. १६ एहूदने हातभर* लांब असलेली एक दुधारी तलवार बनवली होती. ती त्याने आपल्या कपड्याखाली उजव्या मांडीला बांधली. १७ मग त्याने मवाबचा राजा एग्लोन याला नजराणा दिला. एग्लोन हा एक जाडजूड माणूस होता.
१८ राजाला नजराणा दिल्यानंतर, नजराणा घेऊन आलेल्या लोकांसोबत एहूद निघून गेला. १९ पण, गिलगालमधल्या+ कोरीव मूर्तींजवळ* पोहोचल्यावर तो पुन्हा राजाकडे मागे आला, आणि राजाला म्हणाला: “महाराज, मला एक गुप्त संदेश सांगायचाय.” तेव्हा राजाने आपल्या सर्व सेवकांना बाहेर पाठवून दिलं. २० त्या वेळी राजा छतावर आपल्या हवेशीर खोलीत बसला होता. मग एहूद त्याला म्हणाला: “देवाने तुमच्यासाठी एक संदेश पाठवलाय.” हे ऐकताच राजा आपल्या आसनावरून उठला. २१ त्या वेळी, एहूदने आपल्या उजव्या मांडीवर बांधलेली तलवार डाव्या हाताने काढून राजाच्या पोटात खुपसली. २२ एहूदने त्याच्या पोटातून तलवार बाहेर काढली नाही. तलवारीच्या पात्यासोबत तिची मूठही आत जाऊन चरबीत रुतून बसली. आणि त्याच्या पोटातला मल बाहेर आला. २३ मग खोलीचे दरवाजे बंद करून एहूद खिडकीतून* पळून गेला. २४ तो निघून गेल्यावर, राजाचे सेवक आले आणि त्यांनी पाहिलं, की छतावरच्या खोलीचे दरवाजे बंद आहेत. तेव्हा ते म्हणाले, की “राजा कदाचित त्याच्या आतल्या हवेशीर खोलीत शौचाला गेला असेल.” २५ पण, बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही राजाने खोलीचे दरवाजे उघडले नाहीत, तेव्हा मात्र त्यांना चिंता वाटू लागली. म्हणून त्यांनी चावी घेऊन दरवाजे उघडले. तेव्हा, आपला मालक जमिनीवर मरून पडलेला त्यांना दिसला.
२६ हे सगळं होत असताना, एहूद तिथून निसटला आणि कोरीव मूर्तींच्या*+ पलीकडे सईरा इथे सुरक्षित पोहोचला. २७ तिथे एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात+ पोहोचल्यावर त्याने रणशिंग फुंकलं.+ तेव्हा इस्राएली लोक डोंगराळ प्रदेशातून त्याच्यासोबत खाली उतरले. एहूद त्यांच्या पुढे चालत होता. २८ तो त्यांना म्हणाला: “माझ्यामागे या. कारण, यहोवाने मवाबी लोकांना, तुमच्या शत्रूंना तुमच्या हाती दिलंय.” म्हणून ते त्याच्यामागे गेले. मवाबी लोकांना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांनी यार्देन नदीच्या उतारांचा ताबा घेतला. २९ त्या वेळी, त्यांनी मवाबच्या जवळजवळ १०,००० बलवान व शूर सैनिकांना ठार मारलं;+ त्यातला एकही त्यांच्या हातातून निसटला नाही.+ ३० त्या दिवशी इस्राएली लोकांनी मवाबला हरवलं. त्यानंतर देशात ८० वर्षं शांती टिकून राहिली.+
३१ एहूदनंतर अनाथचा मुलगा शमगार+ यानेसुद्धा इस्राएली लोकांना वाचवलं. त्याने गुरांची पराणी*+ घेऊन ६०० पलिष्टी माणसांना ठार मारलं.+