वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते २०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • बन्यामीन वंशासोबत लढाई (१-४८)

शास्ते २०:१

समासातील संदर्भ

  • +यहो १९:४७, ४८; शास १८:२९
  • +यहो २२:९
  • +१शमु ७:५; १०:१७; २रा २५:२३

शास्ते २०:२

समासातील संदर्भ

  • +शास २०:१७; २शमु २४:९

शास्ते २०:३

समासातील संदर्भ

  • +शास १९:२२

शास्ते २०:४

समासातील संदर्भ

  • +शास १९:१, २
  • +शास १९:१२, १४

शास्ते २०:५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “जमीनदारांनी.”

समासातील संदर्भ

  • +शास १९:२५, २६

शास्ते २०:६

समासातील संदर्भ

  • +शास १९:२९

शास्ते २०:७

समासातील संदर्भ

  • +शास १९:३०

शास्ते २०:९

समासातील संदर्भ

  • +शास २०:१८; नीत १६:३३

शास्ते २०:१३

समासातील संदर्भ

  • +शास १९:२२, २५
  • +अनु १३:५; १७:७; २२:२२; १कर ५:६, १३

शास्ते २०:१७

समासातील संदर्भ

  • +शास २०:२

शास्ते २०:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३०; गण २७:२१; शास २०:२७

शास्ते २०:२३

समासातील संदर्भ

  • +शास २०:२८

शास्ते २०:२५

समासातील संदर्भ

  • +शास २०:२१

शास्ते २०:२६

समासातील संदर्भ

  • +शास २०:२३
  • +२इत २०:३; एज ८:२१
  • +लेवी १:३
  • +लेवी ३:१

शास्ते २०:२७

समासातील संदर्भ

  • +गण २७:२१; शास २०:१८

शास्ते २०:२८

तळटीपा

  • *

    शब्दशः “उभा राहायचा.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:२५; गण २५:७
  • +शास २०:२३

शास्ते २०:२९

समासातील संदर्भ

  • +यहो ८:३, ४

शास्ते २०:३०

समासातील संदर्भ

  • +शास २०:२०, २२

शास्ते २०:३१

समासातील संदर्भ

  • +शास २०:३६
  • +शास २०:३९

शास्ते २०:३२

समासातील संदर्भ

  • +शास २०:२१, २५

शास्ते २०:३५

समासातील संदर्भ

  • +शास २०:२८, ४८
  • +शास २०:१४, १५, ४६

शास्ते २०:३६

समासातील संदर्भ

  • +शास २०:३१
  • +शास २०:२९

शास्ते २०:३९

समासातील संदर्भ

  • +शास २०:३१
  • +शास २०:२१, २५

शास्ते २०:४४

समासातील संदर्भ

  • +शास २०:१५

शास्ते २०:४५

समासातील संदर्भ

  • +शास २१:१३

शास्ते २०:४६

समासातील संदर्भ

  • +शास २०:१५, ३५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते २०:१यहो १९:४७, ४८; शास १८:२९
शास्ते २०:१यहो २२:९
शास्ते २०:११शमु ७:५; १०:१७; २रा २५:२३
शास्ते २०:२शास २०:१७; २शमु २४:९
शास्ते २०:३शास १९:२२
शास्ते २०:४शास १९:१, २
शास्ते २०:४शास १९:१२, १४
शास्ते २०:५शास १९:२५, २६
शास्ते २०:६शास १९:२९
शास्ते २०:७शास १९:३०
शास्ते २०:९शास २०:१८; नीत १६:३३
शास्ते २०:१३शास १९:२२, २५
शास्ते २०:१३अनु १३:५; १७:७; २२:२२; १कर ५:६, १३
शास्ते २०:१७शास २०:२
शास्ते २०:१८निर्ग २८:३०; गण २७:२१; शास २०:२७
शास्ते २०:२३शास २०:२८
शास्ते २०:२५शास २०:२१
शास्ते २०:२६शास २०:२३
शास्ते २०:२६२इत २०:३; एज ८:२१
शास्ते २०:२६लेवी १:३
शास्ते २०:२६लेवी ३:१
शास्ते २०:२७गण २७:२१; शास २०:१८
शास्ते २०:२८निर्ग ६:२५; गण २५:७
शास्ते २०:२८शास २०:२३
शास्ते २०:२९यहो ८:३, ४
शास्ते २०:३०शास २०:२०, २२
शास्ते २०:३१शास २०:३६
शास्ते २०:३१शास २०:३९
शास्ते २०:३२शास २०:२१, २५
शास्ते २०:३५शास २०:२८, ४८
शास्ते २०:३५शास २०:१४, १५, ४६
शास्ते २०:३६शास २०:३१
शास्ते २०:३६शास २०:२९
शास्ते २०:३९शास २०:३१
शास्ते २०:३९शास २०:२१, २५
शास्ते २०:४४शास २०:१५
शास्ते २०:४५शास २१:१३
शास्ते २०:४६शास २०:१५, ३५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते २०:१-४८

शास्ते

२० तेव्हा दानपासून+ बैर-शेबापर्यंतचे आणि गिलादच्या प्रदेशातले+ सर्व इस्राएली पुरुष निघाले, आणि ते सगळे एक होऊन मिस्पा इथे यहोवापुढे जमले.+ २ इस्राएलच्या सर्व लोकांच्या व वंशांच्या प्रमुखांनी देवाच्या लोकांच्या मंडळीत आपापली जागा घेतली; तलवार चालवणाऱ्‍या पायदळ सैनिकांची संख्या ४,००,००० इतकी होती.+

३ इस्राएली लोक मिस्पा इथे एकत्र जमले आहेत हे बन्यामीन वंशाच्या लोकांनी ऐकलं.

इस्राएली लोकांनी विचारलं: “आम्हाला सांग, हे भयंकर कृत्य कसं घडलं?”+ ४ त्यावर त्या लेवीने,+ म्हणजे खून झालेल्या त्या स्त्रीच्या पतीने म्हटलं: “मी माझ्या उपपत्नीसोबत बन्यामीन लोकांच्या गिबा+ शहरात रात्री मुक्काम करण्यासाठी गेलो होतो. ५ पण मी रात्री ज्या घरात राहिलो त्या घराला गिबाच्या लोकांनी* घेरलं. ते खरंतर माझा जीव घ्यायला आले होते. पण त्याऐवजी त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मेली.+ ६ त्यांनी इस्राएलमध्ये केलेलं हे काम अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद होतं. आणि म्हणून मी माझ्या उपपत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि इस्राएलच्या प्रत्येक वंशाच्या प्रदेशात ते पाठवले.+ ७ तर इस्राएलच्या सर्व लोकांनो! तुम्हीच विचार करा आणि सांगा,+ आता काय करायचं?”

८ तेव्हा सर्व लोक एकमताने म्हणाले: “आपल्यापैकी कोणीही आपल्या तंबूकडे किंवा आपल्या घराकडे परत जाणार नाही. ९ आता आपण असं करू: गिबावर हल्ला करायला कोण-कोण जाईल हे चिठ्ठ्या टाकून ठरवू.+ १० सैनिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहण्यासाठी आपण इस्राएलच्या सर्व वंशातून काही माणसं घेऊ. आपण १०० माणसांतून १०; १,००० माणसांतून १००; आणि १०,००० माणसांतून १,००० माणसं घेऊ. म्हणजे इस्राएलमध्ये बन्यामीनच्या गिबा शहरातल्या लोकांनी जे घृणास्पद काम केलंय त्याबद्दल आपलं सैन्य त्यांना चांगलाच धडा शिकवेल.” ११ अशा प्रकारे इस्राएलच्या सर्व माणसांचं एकमत झालं आणि त्या शहरावर हल्ला करण्यासाठी ते एकत्र आले.

१२ मग, इस्राएलच्या वंशांनी बन्यामीन वंशाच्या लोकांकडे माणसं पाठवून विचारलं: “आम्ही हे काय ऐकतोय? तुमच्यामध्ये हे कसलं भयंकर कृत्य घडलंय! १३ आता गिबामधल्या+ त्या नीच माणसांना आमच्या हवाली करा. म्हणजे आम्ही त्यांना मारून टाकू आणि इस्राएलातून ही दुष्टता काढून टाकू.”+ पण बन्यामीन वंशाचे लोक मात्र आपल्या इस्राएली बांधवांचं काहीएक ऐकायला तयार नव्हते.

१४ उलट बन्यामीन वंशाचे लोक इस्राएली माणसांशी लढण्यासाठी आपापल्या शहरांतून बाहेर आले आणि गिबा इथे एकत्र जमले. १५ त्या दिवशी बन्यामिनी लोकांनी आपल्या शहरांतून तलवार चालवणाऱ्‍या २६,००० पुरुषांना बोलावून घेतलं. याशिवाय गिबामधले ७०० खास निवडलेले योद्धेही होते. १६ सैन्यातले हे ७०० निवडलेले योद्धे डावखुरे होते. त्या प्रत्येकाचा गोफणीचा नेम इतका अचूक होता, की तो केसभरही चुकायचा नाही.

१७ बन्यामीन वंश सोडून, इस्राएलच्या बाकीच्या वंशांतून बोलवण्यात आलेल्या सैनिकांची संख्या ४,००,००० इतकी होती. ते सर्व तलवार चालवणारे+ अनुभवी योद्धे होते. १८ देवाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते सगळे बेथेल इथे गेले.+ त्यांनी विचारलं: “बन्यामिनी लोकांवर हल्ला करण्यासाठी आमच्यापैकी कोणी पुढे जावं?” तेव्हा यहोवाने म्हटलं, “यहूदाने पुढे जावं.”

१९ त्यानंतर इस्राएली लोक सकाळीच उठले आणि त्यांनी गिबा शहराजवळ छावणी केली.

२० मग इस्राएली लोक बन्यामिनी लोकांशी लढण्यासाठी निघाले आणि त्यांनी गिबा शहराजवळ जाऊन आपलं सैन्यदल उभं केलं. २१ त्यामुळे गिबा शहरातून बन्यामिनी लोक बाहेर पडले आणि त्या दिवशी त्यांनी २२,००० इस्राएली माणसांना मारून टाकलं. २२ पण इस्राएली सैनिक हिंमत हरले नाहीत. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी त्यांनी आपलं सैन्यदल उभं केलं होतं, त्याच ठिकाणी त्यांनी पुन्हा आपले सैनिक उभे केले. २३ यादरम्यान, इस्राएली लोक बेथेल इथे गेले आणि संध्याकाळपर्यंत यहोवासमोर रडत राहिले. त्यांनी यहोवाला विचारलं: “आम्ही पुन्हा आमच्या बांधवांशी, बन्यामिनी लोकांशी लढायला जावं का?”+ तेव्हा यहोवाने म्हटलं: “हो, जा!”

२४ म्हणून दुसऱ्‍या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनी लोकांशी लढायला गेले. २५ त्यामुळे इस्राएली लोकांचा सामना करण्यासाठी बन्यामिनी लोकसुद्धा दुसऱ्‍या दिवशी गिबा शहरातून बाहेर पडले. त्यांनी तलवार चालवणाऱ्‍या १८,००० इस्राएली सैनिकांना मारून टाकलं.+ २६ तेव्हा सर्व इस्राएली लोक बेथेलला गेले आणि यहोवासमोर बसून रडत राहिले.+ त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपास केला+ आणि यहोवाला होमार्पणं+ आणि शांती-अर्पणं वाहिली.+ २७ त्यानंतर इस्राएली लोकांनी यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं.+ त्या काळात खऱ्‍या देवाच्या कराराची पेटी बेथेलमध्येच होती. २८ अहरोनचा नातू आणि एलाजारचा मुलगा फिनहास+ त्या दिवसांत देवाच्या कराराच्या पेटीपुढे सेवा करायचा.* इस्राएली लोकांनी देवाला विचारलं: “आम्ही परत आमच्या बांधवांशी, बन्यामिनी लोकांशी लढायला जावं का, की त्यांच्याशी लढायचं सोडून द्यावं?”+ तेव्हा यहोवाने म्हटलं: “जा! कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन.” २९ मग इस्राएलने गिबा शहरावर हल्ला करण्यासाठी आपल्या सैनिकांना त्या शहराभोवती लपवून बसवलं.+

३० इस्राएली लोक तिसऱ्‍या दिवशीसुद्धा बन्यामिनी लोकांशी लढायला गेले. आधीसारखंच त्यांनी या वेळीही गिबा शहराजवळ आपलं सैन्यदल उभं केलं.+ ३१ बन्यामिनी लोक इस्राएलचा सामना करण्यासाठी बाहेर आले, तेव्हा इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून बरंच दूर नेलं.+ पण मागच्या वेळेप्रमाणेच बन्यामिनी लोकांनी इस्राएलवर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी काहींना महामार्गांवर मारून टाकलं; यांपैकी एक महामार्ग बेथेलकडे, तर दुसरा गिबाकडे जाणारा होता. त्यांनी जवळजवळ ३० इस्राएली सैनिकांना मोकळ्या मैदानात मारलं.+ ३२ बन्यामिनी लोकांना वाटलं, की आधीसारखंच या वेळीसुद्धा इस्राएली लोकांचा आपल्यासमोर पराभव होत आहे.+ पण इस्राएली लोक म्हणाले: “आपण त्यांच्यापासून पळ काढू आणि त्यांना शहरापासून दूर महामार्गांवर नेऊ.” ३३ मग सर्व इस्राएली माणसं आपापल्या जागेवरून उठली आणि त्यांनी बाल-तामार इथे आपलं सैन्यदल उभं केलं. त्याच वेळी, गिबा शहराजवळ लपून बसलेल्या इस्राएली सैनिकांनीसुद्धा बाहेर येऊन अचानक हल्ला केला. ३४ इस्राएलच्या १०,००० निवडलेल्या योद्ध्यांनी गिबा शहरावर हल्ला केला आणि त्यांच्यात फार मोठी लढाई झाली. पण लवकरच आपल्यावर मोठं संकट कोसळणार हे बन्यामिनी लोकांना माहीत नव्हतं.

३५ यहोवाने इस्राएलपुढे बन्यामिनी लोकांना हरवलं.+ त्या दिवशी इस्राएली लोकांनी तलवार चालवणाऱ्‍या २५,१०० बन्यामिनी सैनिकांना मारून टाकलं.+

३६ इस्राएली लोकांनी बन्यामिनी लोकांपासून पळ काढला तेव्हा बन्यामिनी लोकांना वाटलं, की इस्राएलचा आपल्यासमोर पराभव होईल.+ पण गिबावर हल्ला करण्यासाठी लपून बसलेल्या सैनिकांवर इस्राएली लोकांना भरवसा होता+ आणि म्हणून त्यांनी पळ काढला. ३७ लपून बसलेल्या सैनिकांनी लगेच उठून गिबा शहरावर हल्ला केला. मग शहरात घुसून ते सगळीकडे पसरले आणि तिथल्या सगळ्यांचा त्यांनी तलवारीने नाश केला.

३८ इस्राएली लोकांनी असं ठरवलं होतं, की शहराजवळ लपून बसलेल्या सैनिकांनी शहरात घुसल्यावर आग पेटवून धूर करावा. शहरातून वर जाणारा धुराचा लोट हा हल्ला करण्याचा संकेत असेल.

३९ इस्राएली लोक लढाईतून पळ काढू लागले तेव्हा बन्यामिनी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि जवळजवळ ३० इस्राएली माणसांना मारून टाकलं.+ ते म्हणाले: “मागच्या लढाईत झालं तसंच या वेळीही इस्राएली लोकांचा आपल्यापुढे पराभव होतोय.”+ ४० पण त्याच वेळी शहरातून धुराचा मोठा लोट वर जाऊ लागला. बन्यामिनी लोकांनी मागे वळून पाहिलं, तेव्हा त्यांचं संपूर्ण शहर जळत असल्याचं आणि आगीच्या ज्वाला वर आकाशाकडे जात असल्याच्या त्यांना दिसल्या. ४१ तेव्हा इस्राएली लोकांनी उलटून बन्यामिनी लोकांवर हल्ला केला. आपल्यावर संकट कोसळलं आहे हे पाहून बन्यामिनी लोकांच्या काळजाचा थरकाप उडाला. ४२ ते इस्राएली लोकांना पाठ दाखवून ओसाड रानाकडे पळू लागले. पण इस्राएली सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला; आणि त्यांना मारण्यासाठी जवळपासच्या शहरांतले बाकीचे इस्राएली सैनिकही बाहेर आले. ४३ त्यांनी बन्यामिनी लोकांना सगळ्या बाजूंनी घेरलं आणि ते त्यांचा पाठलाग करत राहिले. गिबा शहराच्या पूर्वेकडे, थेट शहराच्या समोर त्यांनी बन्यामिनी लोकांना पूर्णपणे धुळीस मिळवलं. ४४ बन्यामीन वंशाचे १८,००० पुरुष मारले गेले. ते सगळे शूर योद्धे होते.+

४५ बन्यामिनी लोकांपैकी जे उरले होते ते ओसाड रानातल्या रिम्मोन खडकाकडे+ पळू लागले. पण इस्राएली लोकांनी त्यांच्यातल्या ५,००० माणसांना महामार्गांवर मारलं. त्यांनी गिदोमपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि आणखी २,००० माणसांना ठार मारलं. ४६ त्या दिवशी बन्यामिनी वंशातले २५,००० पुरुष मारले गेले. ते सर्व तलवार चालवणारे+ शूर योद्धे होते. ४७ पण ६०० बन्यामिनी पुरुष निसटून ओसाड रानातल्या रिम्मोन खडकाकडे पळून गेले आणि चार महिने तिथेच राहिले.

४८ इस्राएली लोक परत मागे आले आणि त्यांनी बन्यामिनी लोकांच्या शहरांत जे उरले होते त्या सगळ्या लोकांना आणि गुराढोरांना तलवारीने मारून टाकलं. तसंच, ते ज्या शहरांत आले ती सगळी शहरंही त्यांनी जाळून टाकली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा