वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • मानोहा आणि त्याच्या बायकोला एक स्वर्गदूत भेटतो (१-२३)

      • शमशोनचा जन्म (२४, २५)

शास्ते १३:१

समासातील संदर्भ

  • +शास २:११, १९; १०:६
  • +यहो १३:१-३; शास १०:७

शास्ते १३:२

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ३३; १९:४१, ४८
  • +उत्प ४९:१६
  • +शास १६:३१
  • +उत्प ३०:२२, २३

शास्ते १३:३

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:१०; १शमु १:२०; लूक १:११, १३

शास्ते १३:४

समासातील संदर्भ

  • +गण ६:२, ३; लूक १:१५
  • +लेवी ११:२६, २७

शास्ते १३:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “गर्भापासून.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +गण ६:२, ५
  • +शास २:१६; १३:१; नहे ९:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२५

शास्ते १३:६

समासातील संदर्भ

  • +शास १३:१७, १८

शास्ते १३:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “गर्भापासून.”

शास्ते १३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१५, पृ. ३

    ८/१५/२०१३, पृ. १६

शास्ते १३:१०

समासातील संदर्भ

  • +शास १३:३

शास्ते १३:१२

समासातील संदर्भ

  • +शास १३:८

शास्ते १३:१३

समासातील संदर्भ

  • +शास १३:४

शास्ते १३:१४

समासातील संदर्भ

  • +गण ६:२, ३
  • +लेवी ११:२६, २७

शास्ते १३:१५

तळटीपा

  • *

    किंवा “बकरीचं पिल्लू.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:५, ७; शास ६:१८, १९; इब्री १३:२

शास्ते १३:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प ३२:२९; शास १३:६

शास्ते १३:२१

समासातील संदर्भ

  • +शास ६:२२, २३

शास्ते १३:२२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३३:२०; योह १:१८

शास्ते १३:२३

समासातील संदर्भ

  • +शास १३:१६

शास्ते १३:२४

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:३२

शास्ते १३:२५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ३३
  • +शास १८:११, १२
  • +शास ३:९, १०; ६:३४; ११:२९; १शमु ११:६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते १३:१शास २:११, १९; १०:६
शास्ते १३:१यहो १३:१-३; शास १०:७
शास्ते १३:२यहो १५:२०, ३३; १९:४१, ४८
शास्ते १३:२उत्प ४९:१६
शास्ते १३:२शास १६:३१
शास्ते १३:२उत्प ३०:२२, २३
शास्ते १३:३उत्प १८:१०; १शमु १:२०; लूक १:११, १३
शास्ते १३:४गण ६:२, ३; लूक १:१५
शास्ते १३:४लेवी ११:२६, २७
शास्ते १३:५गण ६:२, ५
शास्ते १३:५शास २:१६; १३:१; नहे ९:२७
शास्ते १३:६शास १३:१७, १८
शास्ते १३:१०शास १३:३
शास्ते १३:१२शास १३:८
शास्ते १३:१३शास १३:४
शास्ते १३:१४गण ६:२, ३
शास्ते १३:१४लेवी ११:२६, २७
शास्ते १३:१५उत्प १८:५, ७; शास ६:१८, १९; इब्री १३:२
शास्ते १३:१७उत्प ३२:२९; शास १३:६
शास्ते १३:२१शास ६:२२, २३
शास्ते १३:२२निर्ग ३३:२०; योह १:१८
शास्ते १३:२३शास १३:१६
शास्ते १३:२४इब्री ११:३२
शास्ते १३:२५यहो १५:२०, ३३
शास्ते १३:२५शास १८:११, १२
शास्ते १३:२५शास ३:९, १०; ६:३४; ११:२९; १शमु ११:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते १३:१-२५

शास्ते

१३ इस्राएली लोक पुन्हा एकदा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करू लागले.+ म्हणून यहोवाने त्यांना ४० वर्षांसाठी पलिष्टी लोकांच्या हवाली केलं.+

२ त्या काळात, सरा+ या शहरात दान+ वंशातला एक माणूस राहत होता. त्याचं नाव मानोहा+ होतं. त्याची बायको वांझ असून तिला एकही मूलबाळ नव्हतं.+ ३ एक दिवस, यहोवाचा स्वर्गदूत त्या स्त्रीसमोर प्रकट झाला आणि तिला म्हणाला: “तू जरी वांझ असलीस आणि तुला मूलबाळ नसलं, तरी आता तू गरोदर राहशील आणि एका मुलाला जन्म देशील.+ ४ म्हणून आता काळजी घे. द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नकोस.+ आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस.+ ५ बघ! तू नक्की गरोदर राहशील आणि एका मुलाला जन्म देशील. त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नकोस,+ कारण तो मुलगा जन्मापासून* देवाचा नाझीर* असेल. आणि तोच इस्राएलला पलिष्टी लोकांच्या हातून वाचवेल.”+

६ मग त्या स्त्रीने आपल्या नवऱ्‍याकडे जाऊन त्याला सर्वकाही सांगितलं. ती म्हणाली: “खऱ्‍या देवाचा एक माणूस माझ्याकडे आला होता. त्याचं स्वरूप अतिशय तेजस्वी, खऱ्‍या देवाच्या स्वर्गदूतासारखं होतं! तो कुठून आला होता हे मी त्याला विचारलं नाही. आणि त्यानेही मला त्याचं नाव सांगितलं नाही.+ ७ पण तो मला म्हणाला: ‘तू गरोदर राहशील आणि एका मुलाला जन्म देशील. म्हणून आता काळजी घे. द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नकोस. आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस. कारण तो मुलगा जन्मापासून* मरेपर्यंत देवाचा नाझीर होईल.’”

८ हे ऐकून मानोहाने यहोवाला प्रार्थनेत अशी विनवणी केली: “हे यहोवा, तू ज्या माणसाला पाठवलं होतंस, त्या खऱ्‍या देवाच्या माणसाला कृपा करून परत एकदा आमच्याकडे पाठव. म्हणजे जे मूल जन्माला येणार आहे त्याचं पालनपोषण आम्ही कसं करायचं हे तो आम्हाला सांगेल.” ९ खऱ्‍या देवाने मानोहाची ही विनंती ऐकली. मानोहाची बायको बाहेर शेतात बसली होती, तेव्हा खऱ्‍या देवाचा माणूस पुन्हा एकदा तिच्याकडे आला. पण तिचा नवरा त्या वेळी तिच्यासोबत नव्हता. १० म्हणून ती लगेच धावत जाऊन आपल्या नवऱ्‍याला म्हणाली: “अहो! त्या दिवशी जो माणूस माझ्यासमोर प्रकट झाला होता, तो परत आलाय.”+

११ तेव्हा मानोहा आपल्या बायकोसोबत त्या माणसाकडे गेला आणि त्याला म्हणाला: “त्या दिवशी माझ्या बायकोशी बोललात ते तुम्हीच का?” त्यावर तो म्हणाला: “हो, मीच तो.” १२ मग मानोहा म्हणाला: “तुम्ही जसं म्हणालात तसंच घडो! पण मला सांगा, त्या मुलाचं जीवन कसं असेल आणि तो काय करेल?”+ १३ त्यावर यहोवाचा स्वर्गदूत मानोहाला म्हणाला: “मी तुझ्या बायकोला ज्या-ज्या गोष्टींपासून दूर राहायला सांगितलं, त्यांपासून तिने दूर राहावं.+ १४ तिने द्राक्षं किंवा द्राक्षांपासून बनलेला कोणताही पदार्थ खाऊ नये. आणि द्राक्षारस किंवा कोणत्याही प्रकारचं मद्य पिऊ नये.+ शिवाय, तिने कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये.+ मी जे काही तिला सांगितलंय, ते सगळं तिने काळजीपूर्वक पाळावं.”

१५ मग मानोहा यहोवाच्या स्वर्गदूताला म्हणाला: “आम्ही तुमच्यासाठी एक करडू* कापतो आणि त्याचं मांस शिजवून आणतो.+ तोपर्यंत थोडा वेळ थांबा.” १६ पण यहोवाचा स्वर्गदूत मानोहाला म्हणाला: “मी थांबलो तरी जेवणार नाही. पण तुझी इच्छा असेल, तर तू यहोवासाठी होमार्पण देऊ शकतोस.” तो यहोवाचा स्वर्गदूत होता हे मानोहाला माहीत नव्हतं. १७ मग मानोहा यहोवाच्या स्वर्गदूताला म्हणाला: “तुमचं नाव काय ते आम्हाला सांगा.+ म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं घडल्यावर आम्ही तुमचा आदर-सन्मान करू.” १८ पण यहोवाचा स्वर्गदूत त्याला म्हणाला: “माझं नाव विचारू नकोस, कारण ते अगदी विलक्षण आहे.”

१९ मग मानोहाने एका खडकावर यहोवाला अन्‍नार्पण आणि एक करडू अर्पण केलं. तेव्हा देवाने मानोहा आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यांदेखत एक अद्‌भुत गोष्ट केली. २० वेदीवरून आगीचे लोट वर आकाशाकडे जाऊ लागले, तेव्हा आगीच्या त्या लोटांसोबत यहोवाचा स्वर्गदूतही वर जाऊ लागला. ते पाहून मानोहा आणि त्याची बायको यांनी लगेच जमिनीवर पडून दंडवत घातला. २१ त्या वेळी मानोहाला समजलं की तो यहोवाचा स्वर्गदूत होता.+ त्यानंतर यहोवाचा स्वर्गदूत पुन्हा कधीही मानोहासमोर आणि त्याच्या बायकोसमोर प्रकट झाला नाही. २२ मानोहा आपल्या बायकोला म्हणाला: “आता आपण नक्कीच मरणार, कारण आपण देवाला पाहिलंय!”+ २३ पण त्याची बायको त्याला म्हणाली: “यहोवाला जर आपल्याला मारून टाकायचं असतं, तर त्याने आपल्या हातून होमार्पण आणि अन्‍नार्पण स्वीकारलंच नसतं.+ त्याने या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवल्या नसत्या आणि यांपैकी कुठल्याही गोष्टी आपल्याला सांगितल्या नसत्या.”

२४ काही काळाने, त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव शमशोन ठेवलं.+ तो मुलगा वाढत गेला आणि यहोवा त्याला आशीर्वादित करत राहिला. २५ पुढे शमशोन जेव्हा सरा आणि अष्टावोल+ यांच्या मधे असलेल्या महने-दान+ या ठिकाणी होता, तेव्हा यहोवाची पवित्र शक्‍ती* त्याच्यावर जोरदारपणे कार्य करू लागली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा