वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • यहूदा आणि शिमोन यांनी मिळवलेला विजय (१-२०)

      • यबूसी लोक यरुशलेममध्येच राहतात (२१)

      • योसेफ बेथेलवर कब्जा करतो (२२-२६)

      • कनानी लोकांना पूर्णपणे हाकलून दिलं जात नाही (२७-३६)

शास्ते १:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहो २४:२९
  • +गण २७:१८, २१; शास २०:१८

शास्ते १:२

तळटीपा

  • *

    किंवा “दिला आहे.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:८; अनु ३३:७; १इत ५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २४

शास्ते १:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझ्या हिश्‍शाच्या.”

समासातील संदर्भ

  • +यहो १५:१; १९:१, ९

शास्ते १:४

समासातील संदर्भ

  • +अनु ९:३

शास्ते १:५

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:६; अनु २०:१७
  • +उत्प १५:१८-२१; निर्ग ३:८; शास ३:५; १रा ९:२०, २१

शास्ते १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २४

शास्ते १:७

समासातील संदर्भ

  • +यहो १५:८, १२

शास्ते १:८

समासातील संदर्भ

  • +यहो १५:६३; शास १:२१

शास्ते १:९

समासातील संदर्भ

  • +यहो ११:१६; १५:२०, ३३

शास्ते १:१०

समासातील संदर्भ

  • +यहो ११:२१; १५:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ९/२०२१, पृ. १०

शास्ते १:११

समासातील संदर्भ

  • +यहो १०:३८
  • +यहो १५:१५

शास्ते १:१२

समासातील संदर्भ

  • +गण १३:३, ६; १४:२४; अनु १:३५, ३६; यहो १४:१३
  • +यहो १५:१६-१९

शास्ते १:१३

समासातील संदर्भ

  • +शास ३:९
  • +१इत ४:१३

शास्ते १:१४

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “लक्ष वेधून घेण्यासाठी गाढवावर बसलेली असताना तिने टाळी वाजवली.”

शास्ते १:१५

तळटीपा

  • *

    किंवा “नेगेबकडे.”

  • *

    म्हणजे, “पाण्याचे झरे.”

शास्ते १:१६

तळटीपा

  • *

    म्हणजे, यरीहो शहरातून.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:१; ४:१८; १८:१; गण १०:२९
  • +गण २४:२१; शास ४:११
  • +अनु ३४:३; शास ३:१३
  • +गण २१:१
  • +गण १०:२९-३२

शास्ते १:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “नाशाच्या लायक ठरवणं.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २७:२९; अनु २०:१६
  • +यहो १९:१, ४

शास्ते १:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:१९; यहो ११:२२
  • +शास १४:१९
  • +यहो १३:१-३; १५:२०, ४५

शास्ते १:१९

समासातील संदर्भ

  • +अनु २०:१; यहो १७:१६

शास्ते १:२०

समासातील संदर्भ

  • +गण १४:२४; यहो १४:९
  • +गण १३:२२

शास्ते १:२१

समासातील संदर्भ

  • +यहो १५:६३; २शमु ५:६

शास्ते १:२२

समासातील संदर्भ

  • +यहो १४:४
  • +उत्प ४९:२२, २४; यहो १६:१; स्तो ४४:३

शास्ते १:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:६

शास्ते १:२४

तळटीपा

  • *

    शब्दशः “एकनिष्ठ प्रेम दाखवू.”

शास्ते १:२५

समासातील संदर्भ

  • +यहो ६:२५; १शमु १५:६

शास्ते १:२७

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, २५; शास ५:१९
  • +यहो १७:११, १२

शास्ते १:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प ९:२५; १रा ९:२०, २१
  • +गण ३३:५५; अनु ७:२; २०:१६; यहो १७:१३

शास्ते १:२९

समासातील संदर्भ

  • +यहो १६:१०; १रा ९:१६

शास्ते १:३०

समासातील संदर्भ

  • +यहो १९:१५, १६
  • +अनु २०:१७; शास २:२

शास्ते १:३१

समासातील संदर्भ

  • +यहो ११:८; १९:२८, ३१
  • +यहो १९:२९, ३१
  • +यहो १९:३०, ३१
  • +यहो २१:८, ३१

शास्ते १:३३

समासातील संदर्भ

  • +यहो १९:३८, ३९
  • +अनु ७:२

शास्ते १:३४

समासातील संदर्भ

  • +यहो १९:४७; शास १८:१

शास्ते १:३५

समासातील संदर्भ

  • +यहो १०:१२
  • +यहो १९:४२, ४८

शास्ते १:३६

समासातील संदर्भ

  • +गण ३४:२, ४; यहो १५:३, १२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते १:१यहो २४:२९
शास्ते १:१गण २७:१८, २१; शास २०:१८
शास्ते १:२उत्प ४९:८; अनु ३३:७; १इत ५:२
शास्ते १:३यहो १५:१; १९:१, ९
शास्ते १:४अनु ९:३
शास्ते १:५उत्प १०:६; अनु २०:१७
शास्ते १:५उत्प १५:१८-२१; निर्ग ३:८; शास ३:५; १रा ९:२०, २१
शास्ते १:७यहो १५:८, १२
शास्ते १:८यहो १५:६३; शास १:२१
शास्ते १:९यहो ११:१६; १५:२०, ३३
शास्ते १:१०यहो ११:२१; १५:१३, १४
शास्ते १:११यहो १०:३८
शास्ते १:११यहो १५:१५
शास्ते १:१२गण १३:३, ६; १४:२४; अनु १:३५, ३६; यहो १४:१३
शास्ते १:१२यहो १५:१६-१९
शास्ते १:१३शास ३:९
शास्ते १:१३१इत ४:१३
शास्ते १:१६निर्ग ३:१; ४:१८; १८:१; गण १०:२९
शास्ते १:१६गण २४:२१; शास ४:११
शास्ते १:१६अनु ३४:३; शास ३:१३
शास्ते १:१६गण २१:१
शास्ते १:१६गण १०:२९-३२
शास्ते १:१७लेवी २७:२९; अनु २०:१६
शास्ते १:१७यहो १९:१, ४
शास्ते १:१८उत्प १०:१९; यहो ११:२२
शास्ते १:१८शास १४:१९
शास्ते १:१८यहो १३:१-३; १५:२०, ४५
शास्ते १:१९अनु २०:१; यहो १७:१६
शास्ते १:२०गण १४:२४; यहो १४:९
शास्ते १:२०गण १३:२२
शास्ते १:२१यहो १५:६३; २शमु ५:६
शास्ते १:२२यहो १४:४
शास्ते १:२२उत्प ४९:२२, २४; यहो १६:१; स्तो ४४:३
शास्ते १:२३उत्प ३५:६
शास्ते १:२५यहो ६:२५; १शमु १५:६
शास्ते १:२७यहो २१:८, २५; शास ५:१९
शास्ते १:२७यहो १७:११, १२
शास्ते १:२८उत्प ९:२५; १रा ९:२०, २१
शास्ते १:२८गण ३३:५५; अनु ७:२; २०:१६; यहो १७:१३
शास्ते १:२९यहो १६:१०; १रा ९:१६
शास्ते १:३०यहो १९:१५, १६
शास्ते १:३०अनु २०:१७; शास २:२
शास्ते १:३१यहो ११:८; १९:२८, ३१
शास्ते १:३१यहो १९:२९, ३१
शास्ते १:३१यहो १९:३०, ३१
शास्ते १:३१यहो २१:८, ३१
शास्ते १:३३यहो १९:३८, ३९
शास्ते १:३३अनु ७:२
शास्ते १:३४यहो १९:४७; शास १८:१
शास्ते १:३५यहो १०:१२
शास्ते १:३५यहो १९:४२, ४८
शास्ते १:३६गण ३४:२, ४; यहो १५:३, १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते १:१-३६

शास्ते

१ यहोशवाच्या मृत्यूनंतर+ इस्राएली लोकांनी यहोवाला* विचारलं:+ “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी सगळ्यात आधी कोणी जावं?” २ त्यावर यहोवा म्हणाला: “यहूदाचे वंशज जातील.+ मी हा देश त्यांच्या हाती देत आहे.”* ३ तेव्हा यहूदाचे वंशज आपल्या भावांना, म्हणजे शिमोनच्या वंशजांना म्हणाले: “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यासोबत आम्हाला दिलेल्या* प्रदेशात चला.+ नंतर आम्हीसुद्धा तुमच्यासोबत तुमच्या प्रदेशात येऊ.” त्यामुळे, शिमोनचे वंशज त्यांच्यासोबत गेले.

४ यहूदाचे वंशज लढायला गेले, तेव्हा यहोवाने कनानी आणि परिज्जी लोकांना त्यांच्या हाती दिलं;+ त्यांनी बेजेक इथे १०,००० माणसांना हरवलं. ५ कनानी+ आणि परिज्जी+ लोकांना हरवताना त्यांना बेजेकमध्ये अदोनी-बेजेक सापडला, आणि ते त्याच्याशी लढले. ६ पण, त्याने त्यांच्यापासून पळ काढला. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं, आणि त्याच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले. ७ तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला: “मी ७० राजांच्या हातापायांचे अंगठे कापून टाकले होते, आणि ते माझ्या मेजावरून पडलेलं अन्‍न उचलून खायचे. मी त्यांच्यासोबत जे केलं, तेच देवाने माझ्यासोबत केलंय.” त्यानंतर, त्यांनी त्याला यरुशलेममध्ये+ आणलं, आणि तिथे त्याचा मृत्यू झाला.

८ मग, यहूदाच्या वंशजांनी यरुशलेमवरही+ हल्ला केला आणि त्यावर कब्जा मिळवला; त्यांनी तिथल्या लोकांना तलवारीने मारून टाकलं आणि शहराला आग लावली. ९ त्यानंतर, यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या, तसंच नेगेब आणि शेफीला+ इथे राहणाऱ्‍या कनानी लोकांशी लढायला गेले. १० यहूदाचे वंशज हेब्रोन इथल्या कनानी लोकांशी लढायला गेले (हेब्रोनचं पूर्वीचं नाव किर्याथ-अर्बा असं होतं); तिथे त्यांनी शेशय, अहीमान आणि तलमय यांना मारून टाकलं.+

११ तिथून ते दबीरमध्ये राहणाऱ्‍या लोकांशी लढायला गेले.+ (दबीरचं पूर्वीचं नाव किर्याथ-सेफर असं होतं.)+ १२ मग कालेब+ म्हणाला: “जो कोणी किर्याथ-सेफरवर हल्ला करून त्यावर कब्जा मिळवेल त्याचं लग्न मी माझ्या मुलीसोबत, अखसासोबत लावून देईन.”+ १३ तेव्हा, अथनिएलने+ किर्याथ-सेफरवर कब्जा मिळवला; तो कालेबचा लहान भाऊ कनाज याचा मुलगा होता.+ मग, कालेबने आपली मुलगी अखसा हिचं अथनिएलसोबत लग्न लावून दिलं. १४ आपल्या नवऱ्‍याच्या घरी जात असताना तिने नवऱ्‍याकडे असा आग्रह धरला, की त्याने तिच्या वडिलांकडून जमीन मागून घ्यावी. ती गाढवावरून उतरली,* तेव्हा कालेबने तिला विचारलं: “तुला काय हवंय?” १५ ती त्याला म्हणाली: “मला एक आशीर्वाद द्या. तुम्ही मला दक्षिणेकडे* जमिनीचा एक तुकडा दिलाय; आता मला गुल्लोथ-माईमसुद्धा* द्या.” म्हणून मग कालेबने तिला वरचं गुल्लोथ आणि खालचं गुल्लोथ दिलं.

१६ मोशेचा सासरा+ एक केनी माणूस होता.+ त्याचे वंशज यहूदाच्या लोकांसोबत खजुराच्या झाडांच्या शहरातून*+ आले होते; ते अरादच्या+ दक्षिणेकडे असलेल्या यहूदाच्या ओसाड रानात गेले आणि तिथल्या लोकांमध्ये राहू लागले.+ १७ मग, यहूदाचे वंशज आपल्या भावांसोबत, म्हणजे शिमोनच्या वंशजांसोबत सफातमध्ये गेले. तिथल्या कनानी लोकांवर हल्ला करून त्यांनी त्या शहराचा पूर्णपणे नाश केला;+ त्यामुळे त्यांनी त्या शहराचं नाव हर्मा* असं ठेवलं.+ १८ नंतर यहूदाच्या वंशजांनी गाझा,+ अष्कलोन+ व एक्रोन+ या शहरांवर आणि त्यांच्या प्रदेशांवर कब्जा केला. १९ यहोवा यहूदाच्या वंशजांसोबत होता; आणि त्यांनी डोंगराळ प्रदेश ताब्यात घेतला. पण, सपाट प्रदेशात राहणाऱ्‍या लोकांना मात्र ते हाकलून देऊ शकले नाहीत. कारण, त्यांच्याकडे युद्धाचे लोखंडी रथ असून त्यांच्या चाकांना लांब सुऱ्‍या होत्या.+ २० मोशेने दिलेल्या वचनाप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आलं;+ त्याने तिथून अनाकच्या तीन मुलांना हाकलून लावलं.+

२१ पण, बन्यामीनच्या वंशजांनी यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या यबूसी लोकांना घालवून दिलं नाही. त्यामुळे, आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेममध्ये बन्यामीनच्या वंशजांसोबत राहत आहेत.+

२२ यादरम्यान, योसेफचे वंशज+ बेथेल शहरावर हल्ला करायला गेले; आणि यहोवा त्यांच्यासोबत होता.+ २३ त्यांनी काही गुप्तहेरांना बेथेल शहर हेरण्यासाठी पाठवलं. (त्या शहराचं पूर्वीचं नाव लूज होतं.)+ २४ त्या गुप्तहेरांना शहरातून एक माणूस बाहेर येताना दिसला, तेव्हा ते त्याला म्हणाले: “कृपा करून आम्हाला शहरात घुसण्याचा मार्ग दाखव, आणि आम्ही तुझ्यावर दया करू.”* २५ तेव्हा त्याने त्यांना शहरात घुसण्याचा मार्ग दाखवला, आणि त्यांनी शहरातल्या लोकांना तलवारीने मारून टाकलं. पण, त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला मात्र त्यांनी सोडून दिलं.+ २६ तो माणूस हित्ती लोकांच्या प्रदेशात गेला. तिथे त्याने एक शहर बांधलं आणि त्याला लूज हे नाव दिलं; आजही ते शहर त्याच नावाने ओळखलं जातं.

२७ मनश्‍शेच्या वंशजांनी बेथ-शान, तानख,+ दोर, इब्लाम आणि मगिद्दो ही शहरं आणि त्यांच्या आसपासची नगरं+ ताब्यात घेतली नाहीत; कारण, कनानी लोक तिथून निघून जायला तयार नव्हते. २८ इस्राएली लोक शक्‍तिशाली झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपले गुलाम बनवलं;+ पण, त्यांनी त्यांना पूर्णपणे घालवून दिलं नाही.+

२९ तसंच, एफ्राईमच्या वंशजांनीसुद्धा गेजेरमध्ये राहणाऱ्‍या कनानी लोकांना घालवून दिलं नाही; म्हणून कनानी लोक गेजेरमध्ये एफ्राईमच्या वंशजांमध्ये राहिले.+

३० जबुलूनच्या वंशजांनी कित्रोन आणि नहलोल+ इथे राहणाऱ्‍या कनानी लोकांना घालवून दिलं नाही. ते लोक त्यांच्यातच राहिले आणि जबुलूनच्या वंशजांनी त्यांना आपले गुलाम बनवलं.+

३१ आशेरच्या वंशजांनी अक्को, सीदोन,+ अहलाब, अकजीब,+ हेल्बा, अफीक+ आणि रहोब+ इथे राहणाऱ्‍या लोकांना घालवून दिलं नाही. ३२ म्हणून, आशेरचे वंशज त्या देशातल्या कनानी लोकांमध्येच राहिले, कारण त्यांनी कनानी लोकांना घालवून दिलं नाही.

३३ नफतालीच्या वंशजांनी बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ+ इथे राहणाऱ्‍या कनानी लोकांना घालवून दिलं नाही; ते त्या देशातल्या कनानी लोकांमध्येच राहिले.+ आणि त्यांनी बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथमधल्या लोकांना आपले गुलाम बनवलं.

३४ अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना खाली सपाट प्रदेशात येऊ दिलं नाही; त्यामुळे त्यांना डोंगराळ प्रदेशातच राहावं लागलं.+ ३५ अमोरी लोक हेरेस डोंगर, अयालोन+ आणि शालबीमचा+ प्रदेश सोडायला तयार नव्हते. पण योसेफचे वंशज शक्‍तिशाली झाले, तेव्हा त्यांनी अमोरी लोकांना आपले गुलाम बनवलं. ३६ अमोरी लोकांच्या प्रदेशाची सीमा अक्राब्बीमच्या+ चढापासून आणि सेलापासून वर जात होती.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा