वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद २८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • आज्ञाधारक राहिल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (१-१४)

      • आज्ञा मोडल्यामुळे येणारे शाप (१५-६८)

अनुवाद २८:१

समासातील संदर्भ

  • +अनु २६:१८, १९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९५, पृ. २६-२७

अनुवाद २८:२

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३, ४; नीत १०:२२; यश १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१०, पृ. १९-२०

    ९/१५/२०१०, पृ. ७-८

    ९/१५/२००१, पृ. १०

अनुवाद २८:३

समासातील संदर्भ

  • +अनु ११:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९६, पृ. १५

अनुवाद २८:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुमच्या गर्भाशयाचं फळ.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:९; स्तो १२७:३; १२८:३
  • +अनु ७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९६, पृ. १५-१६

अनुवाद २८:५

समासातील संदर्भ

  • +अनु २६:२
  • +निर्ग २३:२५

अनुवाद २८:७

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:३०; यहो १०:११
  • +अनु ७:२३; २इत १४:१३

अनुवाद २८:८

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१०; नीत ३:९, १०; मला ३:१०

अनुवाद २८:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:६
  • +अनु ७:६

अनुवाद २८:१०

समासातील संदर्भ

  • +यश ४३:१०; दान ९:१९; प्रेका १५:१७
  • +गण २२:३; अनु ११:२५; यहो ५:१

अनुवाद २८:११

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१८
  • +अनु ३०:९; स्तो ६५:९

अनुवाद २८:१२

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:४; अनु ११:१४
  • +अनु १५:६

अनुवाद २८:१३

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२१

अनुवाद २८:१४

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:४
  • +अनु ५:३२; यहो १:७; यश ३०:२१

अनुवाद २८:१५

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१६, १७; दान ९:११

अनुवाद २८:१६

समासातील संदर्भ

  • +१रा १७:१

अनुवाद २८:१७

समासातील संदर्भ

  • +अनु २६:२
  • +लेवी २६:२६

अनुवाद २८:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुमच्या गर्भाशयाचं फळ.”

समासातील संदर्भ

  • +विल २:११, १९; ४:१०
  • +लेवी २६:२०, २२

अनुवाद २८:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “मला.”

समासातील संदर्भ

  • +यहो २३:१६

अनुवाद २८:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२५; यिर्म २४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. ७-८

अनुवाद २८:२२

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१६
  • +लेवी २६:३३
  • +आम ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १/२०२१, पृ. ७-८

अनुवाद २८:२३

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१९; अनु ११:१७; १रा १७:१

अनुवाद २८:२५

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१४, १७; १शमु ४:१०
  • +यिर्म २९:१८; लूक २१:२४

अनुवाद २८:२६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ७:३३

अनुवाद २८:२७

तळटीपा

  • *

    किंवा “गळवांनी.”

अनुवाद २८:२८

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४:११

अनुवाद २८:२९

समासातील संदर्भ

  • +यश ५९:१०
  • +शास ३:१४; ६:१-५; नहे ९:२७

अनुवाद २८:३०

समासातील संदर्भ

  • +यश ५:९; विल ५:२
  • +आम ५:११; मीख ६:१५

अनुवाद २८:३२

समासातील संदर्भ

  • +२इत २९:९

अनुवाद २८:३३

समासातील संदर्भ

  • +नहे ९:३७; यश १:७

अनुवाद २८:३६

समासातील संदर्भ

  • +२रा १७:६; २५:७; २इत ३३:११; ३६:५, ६
  • +यिर्म १६:१३

अनुवाद २८:३७

समासातील संदर्भ

  • +१रा ९:८; २इत ७:२०; यिर्म २४:९; २५:९

अनुवाद २८:३८

समासातील संदर्भ

  • +यश ५:१०; हाग १:६

अनुवाद २८:३९

समासातील संदर्भ

  • +सफ १:१३

अनुवाद २८:४१

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१४; यिर्म ५२:१५, ३०

अनुवाद २८:४२

तळटीपा

  • *

    किंवा “घोंघावणाऱ्‍या किड्यांचे.”

अनुवाद २८:४४

समासातील संदर्भ

  • +नीत २२:७
  • +एज ९:७

अनुवाद २८:४५

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५; २९:२७
  • +२रा १७:२०; यिर्म २४:१०
  • +अनु ११:२६-२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९५, पृ. १५-१६

अनुवाद २८:४६

समासातील संदर्भ

  • +१कर १०:११

अनुवाद २८:४७

समासातील संदर्भ

  • +अनु १२:७; नहे ९:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९५, पृ. १५-१६

अनुवाद २८:४८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४४:२७
  • +२इत १२:८, ९; यिर्म ५:१९

अनुवाद २८:४९

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:२२; हब १:६
  • +यिर्म ५:१५
  • +यिर्म ४:१३; होशे ८:१

अनुवाद २८:५०

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१७; यश ४७:६; लूक १९:४४

अनुवाद २८:५१

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२६; यिर्म १५:१३

अनुवाद २८:५२

तळटीपा

  • *

    शब्दशः “फाटकांच्या आत.”

समासातील संदर्भ

  • +२रा १७:५; २५:१; लूक १९:४३

अनुवाद २८:५३

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुमच्या गर्भाशयाचं फळ.”

समासातील संदर्भ

  • +२रा ६:२८; विल ४:१०; यहे ५:१०

अनुवाद २८:५५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५२:६

अनुवाद २८:५६

समासातील संदर्भ

  • +विल ४:५

अनुवाद २८:५८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:७; अनु ३१:२६
  • +निर्ग ३:१५; ६:३; २०:२; स्तो ८३:१८; ११३:३; यश ४२:८
  • +अनु १०:१७; स्तो ९९:३

अनुवाद २८:५९

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२१; दान ९:१२

अनुवाद २८:६२

समासातील संदर्भ

  • +अनु १०:२२
  • +अनु ४:२७

अनुवाद २८:६४

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३३; नहे १:८; लूक २१:२४
  • +अनु ४:२७, २८

अनुवाद २८:६५

समासातील संदर्भ

  • +आम ९:४
  • +यहे १२:१९
  • +लेवी २६:१६, ३६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. २८:१अनु २६:१८, १९
अनु. २८:२लेवी २६:३, ४; नीत १०:२२; यश १:१९
अनु. २८:३अनु ११:१४
अनु. २८:४लेवी २६:९; स्तो १२७:३; १२८:३
अनु. २८:४अनु ७:१३
अनु. २८:५अनु २६:२
अनु. २८:५निर्ग २३:२५
अनु. २८:७अनु ३२:३०; यहो १०:११
अनु. २८:७अनु ७:२३; २इत १४:१३
अनु. २८:८लेवी २६:१०; नीत ३:९, १०; मला ३:१०
अनु. २८:९निर्ग १९:६
अनु. २८:९अनु ७:६
अनु. २८:१०यश ४३:१०; दान ९:१९; प्रेका १५:१७
अनु. २८:१०गण २२:३; अनु ११:२५; यहो ५:१
अनु. २८:११उत्प १५:१८
अनु. २८:११अनु ३०:९; स्तो ६५:९
अनु. २८:१२लेवी २६:४; अनु ११:१४
अनु. २८:१२अनु १५:६
अनु. २८:१३१रा ४:२१
अनु. २८:१४लेवी १९:४
अनु. २८:१४अनु ५:३२; यहो १:७; यश ३०:२१
अनु. २८:१५लेवी २६:१६, १७; दान ९:११
अनु. २८:१६१रा १७:१
अनु. २८:१७अनु २६:२
अनु. २८:१७लेवी २६:२६
अनु. २८:१८विल २:११, १९; ४:१०
अनु. २८:१८लेवी २६:२०, २२
अनु. २८:२०यहो २३:१६
अनु. २८:२१लेवी २६:२५; यिर्म २४:१०
अनु. २८:२२लेवी २६:१६
अनु. २८:२२लेवी २६:३३
अनु. २८:२२आम ४:९
अनु. २८:२३लेवी २६:१९; अनु ११:१७; १रा १७:१
अनु. २८:२५लेवी २६:१४, १७; १शमु ४:१०
अनु. २८:२५यिर्म २९:१८; लूक २१:२४
अनु. २८:२६यिर्म ७:३३
अनु. २८:२८निर्ग ४:११
अनु. २८:२९यश ५९:१०
अनु. २८:२९शास ३:१४; ६:१-५; नहे ९:२७
अनु. २८:३०यश ५:९; विल ५:२
अनु. २८:३०आम ५:११; मीख ६:१५
अनु. २८:३२२इत २९:९
अनु. २८:३३नहे ९:३७; यश १:७
अनु. २८:३६२रा १७:६; २५:७; २इत ३३:११; ३६:५, ६
अनु. २८:३६यिर्म १६:१३
अनु. २८:३७१रा ९:८; २इत ७:२०; यिर्म २४:९; २५:९
अनु. २८:३८यश ५:१०; हाग १:६
अनु. २८:३९सफ १:१३
अनु. २८:४१२रा २४:१४; यिर्म ५२:१५, ३०
अनु. २८:४४नीत २२:७
अनु. २८:४४एज ९:७
अनु. २८:४५अनु २८:१५; २९:२७
अनु. २८:४५२रा १७:२०; यिर्म २४:१०
अनु. २८:४५अनु ११:२६-२८
अनु. २८:४६१कर १०:११
अनु. २८:४७अनु १२:७; नहे ९:३५
अनु. २८:४८यिर्म ४४:२७
अनु. २८:४८२इत १२:८, ९; यिर्म ५:१९
अनु. २८:४९यिर्म ६:२२; हब १:६
अनु. २८:४९यिर्म ५:१५
अनु. २८:४९यिर्म ४:१३; होशे ८:१
अनु. २८:५०२इत ३६:१७; यश ४७:६; लूक १९:४४
अनु. २८:५१लेवी २६:२६; यिर्म १५:१३
अनु. २८:५२२रा १७:५; २५:१; लूक १९:४३
अनु. २८:५३२रा ६:२८; विल ४:१०; यहे ५:१०
अनु. २८:५५यिर्म ५२:६
अनु. २८:५६विल ४:५
अनु. २८:५८निर्ग २४:७; अनु ३१:२६
अनु. २८:५८निर्ग ३:१५; ६:३; २०:२; स्तो ८३:१८; ११३:३; यश ४२:८
अनु. २८:५८अनु १०:१७; स्तो ९९:३
अनु. २८:५९लेवी २६:२१; दान ९:१२
अनु. २८:६२अनु १०:२२
अनु. २८:६२अनु ४:२७
अनु. २८:६४लेवी २६:३३; नहे १:८; लूक २१:२४
अनु. २८:६४अनु ४:२७, २८
अनु. २८:६५आम ९:४
अनु. २८:६५यहे १२:१९
अनु. २८:६५लेवी २६:१६, ३६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
  • ६१
  • ६२
  • ६३
  • ६४
  • ६५
  • ६६
  • ६७
  • ६८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद २८:१-६८

अनुवाद

२८ जर तुम्ही तुमचा देव यहोवा याचं ऐकलं, आणि आज मी तुम्हाला सांगत असलेल्या त्याच्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या, तर तुमचा देव यहोवा तुम्हाला पृथ्वीवरच्या इतर सर्व राष्ट्रांपेक्षा मोठं करेल.+ २ तुम्ही तुमचा देव यहोवा याचं ऐकत राहिलात, तर हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील:+

३ तुम्ही शहरात असा किंवा शेतात, तुमच्यावर देवाचा आशीर्वाद असेल.+

४ तुमची मुलंबाळं,*+ तुमच्या जमिनीचं पीक, तुमच्या गुराढोरांची पिल्लं, तुमची वासरं व कोकरं+ यांच्यावर देवाचा आशीर्वाद असेल.

५ तुमची टोपली+ आणि परात+ यांवर देवाचा आशीर्वाद असेल.

६ तुम्ही जिथेही जाल आणि जे काही कराल त्यात तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल.

७ तुमच्यावर हल्ला करणाऱ्‍या शत्रूंचा यहोवा पराभव करेल.+ ते तुमच्यावर हल्ला करण्यासाठी एका दिशेने येतील, पण तुमच्यासमोरून सात दिशांना पळून जातील.+ ८ यहोवा तुमच्या कोठारांवर+ आणि तुमच्या प्रत्येक कामावर आशीर्वाद असावा अशी आज्ञा देईल, आणि जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देत आहे, त्यात नक्कीच तुमच्यावर त्याचा आशीर्वाद असेल. ९ तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या आज्ञा पाळत राहिलात आणि त्याच्या मार्गांनी चालत राहिलात, तर यहोवाने तुम्हाला शपथ घेऊन सांगितल्याप्रमाणे,+ तो तुम्हाला आपल्यासाठी एक पवित्र राष्ट्र म्हणून ठरवेल.+ १० तुम्हाला यहोवाच्या नावाने ओळखलं जातं, हे पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना दिसून येईल+ आणि त्यांना तुमची भीती वाटेल.+

११ जो देश तुम्हाला देण्याचं वचन यहोवाने तुमच्या वाडवडिलांना दिलं,+ त्या देशात यहोवा तुम्हाला भरपूर मुलंबाळं, बरीच गुरंढोरं आणि सुपीक जमीन देईल.+ १२ यहोवा तुमच्या देशात योग्य वेळी पाऊस पाडण्यासाठी+ आणि तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्याचं उत्तम कोठार, म्हणजे आकाश उघडं करेल. तुम्ही बऱ्‍याच राष्ट्रांना कर्ज द्याल, पण तुम्हाला मात्र कोणाकडूनही कर्ज घ्यावं लागणार नाही.+ १३ मी आज तुम्हाला सांगत असलेल्या, तुमचा देव यहोवा याच्या आज्ञा जर तुम्ही काळजीपूर्वक पाळल्या, तर यहोवा तुम्हाला इतर राष्ट्रांपेक्षा मोठं करेल.+ तो त्यांना तुमच्यावर अधिकार गाजवू देणार नाही; तुमची नेहमी भरभराट होईल आणि तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. १४ आज मी तुम्हाला देत असलेल्या सर्व आज्ञा पाळण्यापासून कधीही भरकटू नका. इतर देवांच्या मागे जाऊन त्यांची उपासना करण्यासाठी+ तुम्ही उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.+

१५ पण जर आज मी तुम्हाला सांगत असलेल्या देवाच्या सर्व आज्ञा आणि कायदे तुम्ही काळजीपूर्वक पाळले नाहीत आणि तुमचा देव यहोवा याचं ऐकलं नाही, तर हे सर्व शाप तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील:+

१६ तुम्ही शहरात असा किंवा शेतात, तुम्ही शापित व्हाल.+

१७ तुमची टोपली+ आणि परात+ शापित होईल.

१८ तुमची मुलंबाळं,*+ तुमच्या जमिनीचं पीक आणि तुमची वासरं व कोकरं+ शापित होतील.

१९ तुम्ही जिथेही जाल आणि जे काही कराल त्यात तुम्ही शापित व्हाल.

२० जोपर्यंत तुमचा पूर्णपणे नाश होत नाही आणि बघताबघता तुम्ही नाहीसे होत नाही, तोपर्यंत यहोवा तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला शापित करेल, गोंधळात पाडेल आणि तुम्हाला शिक्षा देईल; कारण, तुम्ही वाईट गोष्टी करत राहिला आणि त्याला* सोडून दिलं.+ २१ यहोवा तुम्हाला रोगाने पीडित करेल आणि तुम्ही ज्या देशाचा ताबा घेणार आहात, त्यातून तुमचा पूर्णपणे नाश होईपर्यंत रोग तुमचा पाठलाग करत राहतील.+ २२ यहोवा तुम्हाला क्षयरोग, ताप,+ सूज आणि जळजळ यांनी पीडित करेल; तसंच, तुमच्या शत्रूंना तुमच्यावर हल्ला करायला लावेल.+ तुमची पिकं होरपळून जातील आणि त्यांना कीड+ लागेल. जोपर्यंत तुमचा नाश होत नाही तोपर्यंत या गोष्टी तुमचा पिच्छा सोडणार नाहीत. २३ तुमच्या डोक्यावरचं आकाश तांब्यासारखं आणि तुमच्या पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल.+ २४ जोपर्यंत तुमचा नाश होत नाही, तोपर्यंत यहोवा तुमच्या देशात तुमच्यावर आकाशातून मातीचा आणि धुळीचा पाऊस पाडेल. २५ यहोवा तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हाती देईल.+ तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने हल्ला कराल आणि सात दिशांना त्यांच्यापासून पळ काढाल. आणि तुमची वाईट दशा पाहून पृथ्वीवरची सगळी राज्यं थरथर कापतील.+ २६ तुमची प्रेतं आकाशातल्या प्रत्येक पक्ष्यासाठी आणि जमिनीवरच्या प्राण्यांसाठी अन्‍न बनतील. त्यांना हुसकावून लावणारा कोणीही नसेल.+

२७ यहोवा तुम्हाला इजिप्त देशातल्या फोडांनी,* तसंच, मूळव्याध, इसब आणि खरूज यांनी पीडित करेल आणि हे रोग बरे होणार नाहीत. २८ यहोवा तुम्हाला वेडं व आंधळं करेल+ आणि तुम्हाला गोंधळात टाकेल. २९ आंधळा माणूस जसा काळोखात चाचपडतो, तसं तुम्ही भर दुपारी चाचपडाल.+ तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामात यश मिळणार नाही. तुम्हाला सतत लुबाडलं व फसवलं जाईल आणि तुम्हाला वाचवणारा कोणी नसेल.+ ३० ज्या स्त्रीशी तुमचं लग्न ठरेल, तिची अब्रू लुटली जाईल. तुम्ही घर तर बांधाल पण त्यात राहणार नाही,+ द्राक्षमळे तर लावाल पण त्याचं फळ खाणार नाही.+ ३१ तुमचा बैल तुमच्या डोळ्यांदेखत कापला जाईल, पण तुम्हाला त्याच्या मांसातलं काहीच खायला मिळणार नाही. तुमचं गाढव तुमच्यासमोर चोरलं जाईल, पण तुम्हाला ते परत मिळणार नाही. तुमचे शत्रू तुमचा मेंढा उचलून नेतील, पण तुम्हाला मदत करणारा कोणी नसेल. ३२ तुमच्या मुलामुलींना दुसरे लोक उचलून नेतील+ आणि तुम्ही फक्‍त पाहत राहाल. तुम्हाला त्यांची सतत आठवण येईल, पण तुम्ही काहीच करू शकणार नाही. ३३ तुमच्या जमिनीचं पीक आणि तुमचा सगळा उपज, तुम्ही ओळखत नाही अशा राष्ट्राचे लोक खातील.+ तुम्हाला नेहमी लुबाडलं आणि तुडवलं जाईल. ३४ तुमच्या डोळ्यांना जे दिसेल ते पाहून तुम्ही वेडे व्हाल.

३५ यहोवा तुमच्या गुडघ्यांना आणि पायांना, दुखणाऱ्‍या आणि कधीही बऱ्‍या न होणाऱ्‍या फोडांनी पीडित करेल. तुम्ही अगदी पायांपासून डोक्यापर्यंत फोडांनी भरून जाल. ३६ यहोवा तुम्हाला आणि तुम्ही आपल्यासाठी निवडलेल्या राजाला, एका अशा राष्ट्रात हाकलून लावेल, जे तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नव्हतं.+ तिथे तुम्ही इतर देवांची, म्हणजे लाकडाच्या आणि दगडाच्या देवांची उपासना कराल.+ ३७ यहोवा तुम्हाला ज्या राष्ट्रांमध्ये हाकलून लावेल, तिथले लोक तुमचे हाल पाहून आश्‍चर्यचकित होतील आणि तुमच्यावर हसतील.+

३८ तुम्ही शेतात बरंच बी पेराल, पण फार कमी पीक गोळा कराल,+ कारण टोळ ते फस्त करतील. ३९ तुम्ही द्राक्षमळे लावून त्यांची मशागत कराल, पण तुम्ही द्राक्षारस पिऊ शकणार नाही किंवा द्राक्षं गोळा करू शकणार नाही,+ कारण त्यांना कीड लागेल. ४० तुमच्या सबंध प्रदेशात जैतुनाची झाडं असतील, पण तुम्ही अंगाला जैतुनाचं तेल लावू शकणार नाही, कारण त्या झाडांची फळं गळून पडतील. ४१ तुम्हाला मुलं व मुली होतील पण ते तुमच्याजवळ राहणार नाहीत, कारण त्यांना बंदी बनवून नेलं जाईल.+ ४२ किड्यांचे* घोळकेच्या घोळके येऊन तुमच्या सगळ्या झाडांचा आणि जमिनीच्या सर्व पिकांचा नाश करतील. ४३ तुमच्यात राहणारा विदेशी तुमच्यापेक्षा शक्‍तिशाली होत जाईल, पण तुम्ही मात्र दुर्बळ होत जाल. ४४ तो तुम्हाला उसनं देईल, पण तुम्ही त्याला उसनं देऊ शकणार नाही.+ तो तुमचा प्रमुख होईल आणि तुम्ही त्याच्या अधिकाराखाली राहाल.+

४५ तुमचा सर्वनाश होत नाही, तोपर्यंत हे सर्व शाप+ तुमच्यावर नक्की येतील, तुमचा पाठलाग करतील आणि तुम्हाला गाठतील.+ कारण तुमचा देव यहोवा याने तुम्हाला दिलेले नियम व आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत आणि त्याचं ऐकलं नाही.+ ४६ हे शाप सतत तुमच्यावर आणि तुमच्या संततीवर येत राहतील आणि ते सर्वांसाठी चिन्ह आणि इशारा ठरतील.+ ४७ कारण तुमच्याकडे सर्व गोष्टींची भरभराट असूनही, तुम्ही तुमचा देव यहोवा याची उपासना आनंदाने आणि प्रसन्‍न मनाने केली नाही.+ ४८ यहोवा तुमच्या शत्रूंना तुमच्याविरुद्ध पाठवेल आणि तुम्ही उपाशी,+ तहानलेले, उघडे आणि गरिबीत राहून त्यांची सेवा कराल.+ तुमचा सर्वनाश करेपर्यंत, ते तुमच्या मानेवर लोखंडाचं जू* ठेवतील.

४९ यहोवा तुमच्याविरुद्ध एका अशा राष्ट्राला पाठवेल,+ जे पृथ्वीच्या दुसऱ्‍या टोकाला असेल आणि त्याची भाषा तुम्हाला समजणार नाही.+ ते तुमच्यावर गरुडासारखी झेप घेईल.+ ५० ते राष्ट्र क्रूर असेल. ते म्हाताऱ्‍यांचा आदर करणार नाही आणि तरुणांना दया दाखवणार नाही.+ ५१ तुमचा सर्वनाश होईपर्यंत, त्या राष्ट्राचे लोक तुमच्या गुराढोरांची पिल्लं आणि तुमच्या जमिनीचं पीक खातील. जोपर्यंत ते तुमचा नाश करत नाही, तोपर्यंत ते तुमच्यासाठी काहीही धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, वासरं किंवा कोकरं राहू देणार नाही.+ ५२ तुम्हाला ज्यांवर विश्‍वास आहे त्या उंच आणि मजबूत भिंती जोपर्यंत पडत नाहीत, तोपर्यंत ते तुमच्या सर्व शहरांना वेढा घालून, तुम्हाला त्यांत* कोंडून ठेवतील. तुमचा देव यहोवा याने जो देश तुम्हाला दिला आहे, त्यातल्या सर्व शहरांभोवती ते तुम्हाला नक्की वेढा घालतील.+ ५३ तेव्हा तुम्हाला तुमचा देव यहोवा याने दिलेल्या तुमच्या पोटच्या मुलामुलींचं* मांस खावं लागेल.+ कारण तुमच्या शत्रूंनी तुमच्या शहरांना घातलेला वेढा खूप कडक असेल आणि ते तुमच्यावर अत्याचार करतील.

५४ तुमच्यातला सर्वात प्रेमळ आणि हळव्या मनाचा माणूसही आपल्या भावाला, आपल्या प्रिय बायकोला किंवा आपल्या उरलेल्या मुलांना दया दाखवणार नाही. ५५ तो खात असलेलं आपल्या मुलांचं मांस त्यांना देणार नाही, कारण शत्रूंनी शहरांना घातलेला वेढा खूप कडक असल्यामुळे आणि त्यांच्या अत्याचारामुळे, त्याच्याकडे खाण्यासाठी दुसरं काही उरणार नाही.+ ५६ आणि नाजूक असल्यामुळे जमिनीवर पायही न ठेवणारी, तुमच्यातली सर्वात कोमल आणि हळव्या मनाची स्त्रीसुद्धा+ आपल्या प्रिय नवऱ्‍याला, मुलाला किंवा मुलीला दया दाखवणार नाही. ५७ आपल्या पोटातून निघणाऱ्‍या मुलांवर, तसंच प्रसूतीनंतर तिच्या गर्भातून जे काही बाहेर पडतं त्यावरही ती दया दाखवणार नाही. कारण शत्रूंनी शहरांना घातलेला वेढा खूप कडक असल्यामुळे आणि त्यांच्या अत्याचारामुळे, ती ते सर्व लपूनछपून खाईल.

५८ या पुस्तकात लिहिलेले नियमशास्त्राचे सर्व शब्द जर तुम्ही काळजीपूर्वक पाळले नाहीत+ आणि तुमचा देव यहोवा+ याच्या वैभवशाली आणि विस्मयकारक नावाचं+ तुम्ही भय मानलं नाही, ५९ तर यहोवा तुमच्यावर आणि तुमच्या संततीवर भयंकर पीडा पाठवेल. या पीडा मोठ्या आणि खूप दिवस राहणाऱ्‍या असतील.+ तसंच, तो तुमच्यावर भयानक आणि खूप दिवस राहणारे आजार पाठवेल. ६० इजिप्तमधल्या ज्या आजारांना तुम्ही घाबरायचा, त्यांना तो तुमच्यावर पाठवेल आणि ते आजार तुमचा पाठलाग करत राहतील. ६१ इतकंच नाही, तर तुमचा सर्वनाश होईपर्यंत, यहोवा तुमच्यावर असे सर्व आजार आणि पीडा पाठवेल, जे या नियमशास्त्राच्या पुस्तकातही लिहिलेले नाहीत. ६२ तुमची संख्या आकाशातल्या ताऱ्‍यांसारखी अगणित झाली असली,+ तरी तुमच्यातले फार थोडे उरतील.+ कारण तुम्ही तुमचा देव यहोवा याचं ऐकलं नाही.

६३ आणि एकेकाळी तुमची भरभराट करायला आणि तुम्हाला फलदायी करायला यहोवाला जसा आनंद वाटला होता, तसाच आनंद तुमचा सर्वनाश करताना यहोवाला होईल. ज्या देशाचा ताबा तुम्ही घेणार आहात, त्यातून तुम्हाला काढून टाकलं जाईल.

६४ पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये यहोवा तुमची पांगापांग करेल+ आणि तुम्हाला व तुमच्या वाडवडिलांना माहीत नव्हते, अशा लाकडाच्या आणि दगडाच्या देवांची तिथे तुम्हाला उपासना करावी लागेल.+ ६५ त्या राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती नसेल+ आणि तुमच्या पायांना आराम करायला जागा मिळणार नाही. याउलट, यहोवा तिथे तुमचं मन चिंतांनी भरून टाकेल,+ तुमच्या डोळ्यांना दुर्बळ करेल आणि तुम्हाला हताश करून टाकेल.+ ६६ तुमचं जीवन मोठ्या संकटात असेल आणि रात्रंदिवस तुम्हाला भीती वाटेल. तुम्हाला तुमच्या जिवाचा काही भरवसा राहणार नाही. ६७ तुमच्या मनात भीती असल्यामुळे आणि तुमच्या डोळ्यांना जे दिसेल त्यामुळे, सकाळी तुम्ही म्हणाल, ‘संध्याकाळ झाली तर बरं होईल!’ आणि संध्याकाळी तुम्ही म्हणाल, ‘सकाळ झाली तर बरं होईल!’ ६८ आणि ज्या मार्गाबद्दल मी तुम्हाला म्हणालो होतो, की ‘तुम्ही तो पुन्हा कधी पाहणार नाही,’ त्याच मार्गाने यहोवा जहाजातून तुम्हाला इजिप्तमध्ये पुन्हा घेऊन जाईल. आणि तिथे तुम्हाला दासदासी म्हणून, स्वतःला तुमच्या शत्रूंच्या हाती विकावं लागेल, पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा