वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • दोष नसलेली अर्पणं (१)

      • यहोवाला सोडून इतर देवांच्या मागे जाणाऱ्‍यांसाठी शिक्षा (२-७)

      • कठीण वाद सोडवणं (८-१३)

      • भावी राजासाठी सूचना (१४-२०)

        • राजाला नियमशास्त्राची प्रत बनवण्याची आज्ञा (१८)

अनुवाद १७:१

समासातील संदर्भ

  • +लेवी २२:२०; अनु १५:२१; मला १:८

अनुवाद १७:२

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२३; १३:६-९

अनुवाद १७:३

समासातील संदर्भ

  • +अनु ४:१९
  • +अनु १३:१२-१५

अनुवाद १७:४

समासातील संदर्भ

  • +योह ७:५१

अनुवाद १७:५

समासातील संदर्भ

  • +अनु १३:६, १०

अनुवाद १७:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “तोंड.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १८:१६; योह ८:१७; १ती ५:१९; इब्री १०:२८
  • +गण ३५:३०; अनु १९:१५

अनुवाद १७:७

समासातील संदर्भ

  • +अनु १३:५; १कर ५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. ४

अनुवाद १७:८

समासातील संदर्भ

  • +गण ३५:११
  • +अनु १२:५; १रा ३:१६, २८; स्तो १२२:२, ५

अनुवाद १७:९

समासातील संदर्भ

  • +१शमु ७:१५, १६
  • +अनु १९:१७; २१:५

अनुवाद १७:११

समासातील संदर्भ

  • +मला २:७
  • +अनु ५:३२; १२:३२

अनुवाद १७:१२

तळटीपा

  • *

    किंवा “मर्यादा सोडून.”

समासातील संदर्भ

  • +नीत ११:२; इब्री १०:२८
  • +अनु १३:५; १कर ५:१३

अनुवाद १७:१३

तळटीपा

  • *

    किंवा “मर्यादा सोडून.”

समासातील संदर्भ

  • +अनु १३:११; १९:२०

अनुवाद १७:१४

समासातील संदर्भ

  • +१शमु ८:५, २०; १०:१९

अनुवाद १७:१५

समासातील संदर्भ

  • +१शमु ९:१७; १०:२४; १६:१२, १३

अनुवाद १७:१६

समासातील संदर्भ

  • +अनु २०:१; २शमु ८:४; स्तो २०:७; नीत २१:३१
  • +यश ३१:१

अनुवाद १७:१७

समासातील संदर्भ

  • +१रा ११:१-३; नहे १३:२६
  • +ईयो ३१:२४, २८; १ती ६:९

अनुवाद १७:१८

तळटीपा

  • *

    किंवा “गुंडाळीत.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३१:९, २६; २रा २२:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९५, पृ. १२-१३

अनुवाद १७:१९

समासातील संदर्भ

  • +२इत ३४:१८
  • +स्तो १:२; ११९:९७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००२, पृ. १२-१७

    १०/१/२०००, पृ. ८-९

    ५/१/१९९५, पृ. १२-१३

अनुवाद १७:२०

तळटीपा

  • *

    किंवा “त्याचं मन.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९५, पृ. १२-१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. १७:१लेवी २२:२०; अनु १५:२१; मला १:८
अनु. १७:२अनु ४:२३; १३:६-९
अनु. १७:३अनु ४:१९
अनु. १७:३अनु १३:१२-१५
अनु. १७:४योह ७:५१
अनु. १७:५अनु १३:६, १०
अनु. १७:६मत्त १८:१६; योह ८:१७; १ती ५:१९; इब्री १०:२८
अनु. १७:६गण ३५:३०; अनु १९:१५
अनु. १७:७अनु १३:५; १कर ५:१३
अनु. १७:८गण ३५:११
अनु. १७:८अनु १२:५; १रा ३:१६, २८; स्तो १२२:२, ५
अनु. १७:९१शमु ७:१५, १६
अनु. १७:९अनु १९:१७; २१:५
अनु. १७:११मला २:७
अनु. १७:११अनु ५:३२; १२:३२
अनु. १७:१२नीत ११:२; इब्री १०:२८
अनु. १७:१२अनु १३:५; १कर ५:१३
अनु. १७:१३अनु १३:११; १९:२०
अनु. १७:१४१शमु ८:५, २०; १०:१९
अनु. १७:१५१शमु ९:१७; १०:२४; १६:१२, १३
अनु. १७:१६अनु २०:१; २शमु ८:४; स्तो २०:७; नीत २१:३१
अनु. १७:१६यश ३१:१
अनु. १७:१७१रा ११:१-३; नहे १३:२६
अनु. १७:१७ईयो ३१:२४, २८; १ती ६:९
अनु. १७:१८अनु ३१:९, २६; २रा २२:८
अनु. १७:१९२इत ३४:१८
अनु. १७:१९स्तो १:२; ११९:९७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद १७:१-२०

अनुवाद

१७ तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासाठी कोणताही दोष किंवा व्यंग असलेला बैल किंवा कोकरू अर्पण करू नका. कारण, तुमचा देव यहोवा याला याची घृणा वाटते.+

२ तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात, जर एखादा पुरुष किंवा स्त्री तुमचा देव यहोवा याच्या नजरेत वाईट काम करत असल्याचं किंवा त्याचा करार मोडत असल्याचं दिसून आलं;+ ३ आणि जर तो बहकून इतर देवांची उपासना करत असेल आणि त्यांना, किंवा सूर्य, चंद्र व आकाशातली सैन्यं यांना नमन करत असेल,+ म्हणजे मी आज्ञा न दिलेल्या गोष्टी करत असेल;+ ४ तर जेव्हा ही गोष्ट तुम्हाला सांगितली जाईल किंवा ती तुमच्या कानावर येईल, तेव्हा तुम्ही याबद्दल कसून चौकशी करा. आणि जर ही घृणास्पद गोष्ट इस्राएलमध्ये घडल्याची बातमी खरी निघाली,+ ५ तर हे दुष्ट काम करणाऱ्‍या पुरुषाला किंवा स्त्रीला शहराच्या फाटकांकडे आणावं आणि त्या पुरुषाला किंवा स्त्रीला दगडमार करून ठार मारावं.+ ६ त्याला दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवरूनच*+ ठार मारलं जावं. फक्‍त एका साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला ठार मारलं जाऊ नये.+ ७ ज्यांनी त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती, त्यांनीच त्याला ठार मारण्यासाठी सर्वात आधी हात उचलावा आणि त्यानंतर इतर लोकांनी. अशा प्रकारे, तुम्ही आपल्यामधून वाईट गोष्टी काढून टाका.+

८ तुमच्या एखाद्या शहरात रक्‍तपात,+ मारहाण, एखाद्याविरुद्ध केलेला दावा, किंवा इतर कोणतेही मतभेद यांवरून वाद निर्माण झाला; आणि जर तो वाद सोडवणं तुम्हाला कठीण जात असेल, तर तुम्ही तुमचा देव यहोवा याने निवडलेल्या ठिकाणी जा.+ ९ तुम्ही लेवीय वंशाच्या याजकांकडे आणि त्या दिवसांत सेवा करत असलेल्या न्यायाधीशाकडे जा+ आणि आपल्या समस्येबद्दल त्यांना विचारा, म्हणजे ते तुम्हाला त्या वादाचा निर्णय सांगतील.+ १० मग तुमचा देव यहोवा याने निवडलेल्या ठिकाणी जो निर्णय ते तुम्हाला देतील, त्याप्रमाणे करा. ते तुम्हाला जे काही सांगतील त्याचं काटेकोरपणे पालन करा. ११ ते तुम्हाला जो नियम दाखवतील आणि जो काही निर्णय देतील, त्याप्रमाणे करा.+ त्यांनी दिलेल्या निर्णयापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.+ १२ जो कोणी गर्विष्ठपणे,* तुमचा देव यहोवा याची सेवा करणाऱ्‍या याजकाचं, किंवा न्यायाधीशाचं ऐकणार नाही, त्याला ठार मारलं जावं.+ तुम्ही इस्राएलमधून अशा वाईट गोष्टी काढून टाका;+ १३ म्हणजे सर्व लोक याबद्दल ऐकतील आणि त्यांना भीती वाटेल आणि ते यापुढे कधीही अशा प्रकारे गर्विष्ठपणे* वागणार नाहीत.+

१४ तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतल्यावर आणि त्यात राहू लागल्यावर जर तुम्ही म्हणालात, की ‘आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांप्रमाणेच आपणही आपल्यावर राजा नेमू,’+ १५ तर तुमचा देव यहोवा ज्याला निवडेल, फक्‍त त्यालाच तुम्ही आपल्यावर राजा म्हणून नेमा.+ तो तुमच्या भावांपैकी एक असला पाहिजे. पण तुमच्या भावांपैकी नसलेल्या विदेश्‍याला तुम्ही आपल्यावर नेमू नका. १६ राजाने स्वतःसाठी पुष्कळ घोडे जमा करू नयेत+ किंवा आणखी घोडे आणण्यासाठी लोकांना इजिप्तला पाठवू नये.+ कारण, ‘पुन्हा कधीही त्या मार्गाने परत जाऊ नका,’ असं यहोवाने तुम्हाला सांगितलं आहे. १७ तसंच, त्याने पुष्कळ बायका करू नयेत, नाहीतर त्याचं मन भरकटेल;+ त्याच प्रकारे त्याने स्वतःसाठी खूप सोनंचांदीही साठवू नये.+ १८ आपल्या राजासनावर बसल्यानंतर त्याने लेवीय याजकांकडे असलेलं नियमशास्त्र+ घ्यावं आणि ते एका पुस्तकात* लिहून स्वतःसाठी त्याची प्रत तयार करावी.

१९ ती प्रत त्याच्याजवळ राहील आणि त्याने आयुष्यभर तिच्यातून वाचावं,+ म्हणजे तो आपला देव यहोवा याचं भय मानायला शिकेल आणि या नियमशास्त्रातल्या सर्व आज्ञा आणि हे नियम काळजीपूर्वक पाळेल.+ २० यामुळे तो* स्वतःला आपल्या भावांपेक्षा मोठा समजणार नाही आणि देवाच्या आज्ञेपासून उजवीकडे किंवा डावीकडे भरकटणार नाही आणि तो व त्याची मुलं इस्राएलमध्ये बराच काळ राज्य करतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा