वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • पुन्हा दोन पाट्या बनवल्या (१-११)

      • यहोवा काय अपेक्षा करतो (१२-२२)

        • यहोवाचं भय माना आणि त्याच्यावर प्रेम करा (१२)

अनुवाद १०:१

तळटीपा

  • *

    किंवा “संदूकही.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:१

अनुवाद १०:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:४

अनुवाद १०:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “दहा शब्द.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:१; ३४:२८; अनु ४:१३
  • +निर्ग ३२:१५
  • +निर्ग १९:१७; अनु ५:२२
  • +अनु ४:३६; ५:४

अनुवाद १०:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:२९

अनुवाद १०:६

समासातील संदर्भ

  • +गण २०:२३, २४; ३३:३१, ३८
  • +गण २०:२८

अनुवाद १०:७

समासातील संदर्भ

  • +गण ३३:३३

अनुवाद १०:८

समासातील संदर्भ

  • +गण १:५०; ३:६; ८:१४
  • +गण ३:३०, ३१
  • +गण ६:२३-२७; अनु २१:५; २इत ३०:२७

अनुवाद १०:९

समासातील संदर्भ

  • +गण १८:२०, २४; अनु १८:१

अनुवाद १०:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:१८; ३४:२८
  • +निर्ग ३२:१४

अनुवाद १०:११

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१८

अनुवाद १०:१२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मीख ६:८
  • +अनु ५:२९
  • +अनु ५:३३; यहो २२:५
  • +अनु ६:५; लूक १०:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २५

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१०, पृ. १६

अनुवाद १०:१३

समासातील संदर्भ

  • +अनु ६:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१०, पृ. १६

अनुवाद १०:१४

तळटीपा

  • *

    किंवा “सर्वात उंच आकाश.”

समासातील संदर्भ

  • +१इत २९:११; स्तो २४:१; ११५:१६

अनुवाद १०:१५

समासातील संदर्भ

  • +अनु ४:३७

अनुवाद १०:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “आणि यापुढे तुमची मान कठोर करू नका.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३०:६
  • +निर्ग ३४:९; अनु ९:६; ३१:२७

अनुवाद १०:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:११; २इत २:५; स्तो ९७:९
  • +प्रेका १०:३४; रोम २:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८७, पृ. ३०

अनुवाद १०:१८

तळटीपा

  • *

    किंवा “वडील नसलेल्या मुलाला.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६८:५; याक १:२७
  • +लेवी १९:१०; अनु २४:१४; स्तो १४६:९

अनुवाद १०:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२१; लेवी १९:३४

अनुवाद १०:२०

समासातील संदर्भ

  • +लूक ४:८

अनुवाद १०:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:२; प्रक १९:६
  • +२शमु ७:२३

अनुवाद १०:२२

तळटीपा

  • *

    किंवा “जिवांसोबत.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:२७; निर्ग १:५; प्रेका ७:१४
  • +उत्प १५:१, ५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. १०:१निर्ग ३४:१
अनु. १०:३निर्ग ३४:४
अनु. १०:४निर्ग २०:१; ३४:२८; अनु ४:१३
अनु. १०:४निर्ग ३२:१५
अनु. १०:४निर्ग १९:१७; अनु ५:२२
अनु. १०:४अनु ४:३६; ५:४
अनु. १०:५निर्ग ३४:२९
अनु. १०:६गण २०:२३, २४; ३३:३१, ३८
अनु. १०:६गण २०:२८
अनु. १०:७गण ३३:३३
अनु. १०:८गण १:५०; ३:६; ८:१४
अनु. १०:८गण ३:३०, ३१
अनु. १०:८गण ६:२३-२७; अनु २१:५; २इत ३०:२७
अनु. १०:९गण १८:२०, २४; अनु १८:१
अनु. १०:१०निर्ग २४:१८; ३४:२८
अनु. १०:१०निर्ग ३२:१४
अनु. १०:११उत्प १५:१८
अनु. १०:१२मीख ६:८
अनु. १०:१२अनु ५:२९
अनु. १०:१२अनु ५:३३; यहो २२:५
अनु. १०:१२अनु ६:५; लूक १०:२७
अनु. १०:१३अनु ६:२४
अनु. १०:१४१इत २९:११; स्तो २४:१; ११५:१६
अनु. १०:१५अनु ४:३७
अनु. १०:१६अनु ३०:६
अनु. १०:१६निर्ग ३४:९; अनु ९:६; ३१:२७
अनु. १०:१७निर्ग १८:११; २इत २:५; स्तो ९७:९
अनु. १०:१७प्रेका १०:३४; रोम २:११
अनु. १०:१८स्तो ६८:५; याक १:२७
अनु. १०:१८लेवी १९:१०; अनु २४:१४; स्तो १४६:९
अनु. १०:१९निर्ग २२:२१; लेवी १९:३४
अनु. १०:२०लूक ४:८
अनु. १०:२१निर्ग १५:२; प्रक १९:६
अनु. १०:२१२शमु ७:२३
अनु. १०:२२उत्प ४६:२७; निर्ग १:५; प्रेका ७:१४
अनु. १०:२२उत्प १५:१, ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद १०:१-२२

अनुवाद

१० तेव्हा यहोवा मला म्हणाला, ‘तू दगड कोरून आधीसारख्या दोन पाट्या बनव+ आणि पर्वतावर माझ्याकडे ये. तसंच, तू लाकडाची एक पेटीही* बनव, २ म्हणजे तू फोडून टाकलेल्या आधीच्या पाट्यांवर जे शब्द होते, ते मी या पाट्यांवर लिहीन आणि मग तू त्या पेटीत ठेव.’ ३ म्हणून मी बाभळीच्या लाकडाची एक पेटी बनवली आणि दगड कोरून आधीसारख्याच दोन पाट्या बनवल्या. मग मी त्या दोन पाट्या हातात घेऊन पर्वतावर गेलो.+ ४ तेव्हा त्याने आधी लिहिलेले शब्द, म्हणजेच दहा आज्ञा*+ त्या पाट्यांवर पुन्हा लिहिल्या.+ इस्राएली लोकांच्या मंडळीला एकत्र जमवण्यात आलं, त्या दिवशी+ यहोवाने पर्वतावर आगीतून या आज्ञा तुम्हाला सांगितल्या होत्या.+ मग यहोवाने त्या पाट्या मला दिल्या. ५ त्यानंतर मी पर्वतावरून खाली आलो+ आणि यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे, मी तयार केलेल्या पेटीत त्या पाट्या ठेवल्या आणि आजही त्या तिथे आहेत.

६ मग इस्राएली लोक बएरोथ बनेयाकान इथून मोसेरा इथे जायला निघाले. तिथे अहरोनचा मृत्यू झाला आणि त्याला पुरण्यात आलं.+ यानंतर त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी याजक म्हणून सेवा करू लागला.+ ७ मग ते तिथून गुदगोदा इथे जायला निघाले आणि तिथून ते याटबाथा+ इथे गेले. या प्रदेशात पाण्याचे ओढे वाहतात.

८ त्या वेळी यहोवाने लेवीच्या वंशाला निवडलं.+ त्याने त्यांच्यावर यहोवाच्या कराराची पेटी उचलून नेण्याचं,+ यहोवासमोर उभं राहून त्याची सेवा करण्याचं, तसंच, त्याच्या नावाने आशीर्वाद देण्याचं काम सोपवलं+ आणि आजही ते हे करत आहेत. ९ म्हणूनच लेवीच्या वंशजांना त्यांच्या भावांसोबत जमिनीत वाटा किंवा वारसा देण्यात आलेला नाही. तुमचा देव यहोवा याने त्यांना सांगितल्याप्रमाणे, यहोवाच त्यांचा वारसा आहे.+ १० मी आधीसारखाच ४० दिवस आणि ४० रात्री पर्वतावर राहिलो+ आणि त्या वेळीही यहोवाने माझं ऐकलं+ आणि यहोवाने तुमचा नाश न करण्याचं ठरवलं. ११ मग यहोवा मला म्हणाला, ‘लोकांच्या पुढे जा आणि निघण्याची तयारी कर, म्हणजे जो देश त्यांना देण्याचं वचन मी त्यांच्या वाडवडिलांना दिलं आहे,+ त्यात जाऊन ते त्याचा ताबा घेतील.’

१२ तर आता इस्राएली लोकांनो, तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?+ फक्‍त इतकंच, की तुम्ही तुमचा देव यहोवा याचं भय मानावं,+ त्याच्या सर्व मार्गांवर चालावं,+ त्याच्यावर प्रेम करावं आणि तुमचा देव यहोवा याची पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने* सेवा करावी,+ १३ तसंच, आज मी यहोवाचे जे कायदे आणि आज्ञा तुमच्या भल्यासाठी+ तुम्हाला सांगत आहे, त्या तुम्ही पाळाव्यात. १४ पाहा, आकाश आणि आकाशापलीकडचं आकाश* हे तुमचा देव यहोवा याचं आहे. तसंच, पृथ्वी आणि तिच्यातलं सर्वकाही त्याचंच आहे.+ १५ पण तरी, यहोवाने फक्‍त तुमच्याच वाडवडिलांना जवळ केलं आणि त्यांच्यावर प्रेम केलं; आणि त्याने त्यांच्या संततीला,+ म्हणजे तुम्हाला आपले निवडलेले लोक म्हणून इतर सर्व राष्ट्रांतून वेगळं केलं, जसं की आज तुम्ही आहात. १६ आता तुम्ही आपली मनं शुद्ध करा+ आणि इतकी अडेल वृत्ती दाखवू नका.*+ १७ कारण तुमचा देव यहोवा हा देवांचा देव+ आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो महान, शक्‍तिशाली आणि विस्मयकारक देव आहे. तो कधीही पक्षपात करत नाही+ आणि लाच घेत नाही. १८ तो अनाथ मुलाला* आणि विधवेला न्याय मिळवून देतो+ आणि त्याच्या लोकांमध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यावर प्रेम करतो+ आणि त्याला अन्‍न आणि कपडे पुरवतो. १९ तुम्हीही तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेश्‍यांवर प्रेम करा, कारण इजिप्त देशात तुम्हीही विदेशी म्हणून राहत होता.+

२० तुम्ही आपला देव यहोवा याची भीती बाळगा, फक्‍त त्याचीच उपासना करा,+ त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ घ्या. २१ तुम्ही त्याचीच स्तुती करा,+ कारण तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या या सर्व महान आणि विस्मयकारक गोष्टी करणारा तोच तुमचा देव आहे.+ २२ तुमचे वाडवडील ७० लोकांसोबत* इजिप्तला आले होते,+ पण आज तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आकाशातल्या ताऱ्‍यांसारखं अगणित केलं आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा