वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर रूपरेषा

      • पत्राच्या शेवटी दिलेले इशारे आणि प्रोत्साहन (१-१४)

        • “तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा” (५)

        • सुधारणा करत राहा; एकमताने विचार करत जा (११)

२ करिंथकर १३:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “तोंडून.”

समासातील संदर्भ

  • +अनु १९:१५; मत्त १८:१६

२ करिंथकर १३:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +रोम ६:४; १पेत्र ३:१८
  • +१कर ६:१४
  • +२ती २:११, १२

२ करिंथकर १३:५

समासातील संदर्भ

  • +१कर ११:२८; गल ६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. १३

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. ११

    ३/१५/२०१४, पृ. १३

    ७/१५/२००८, पृ. २८

    ८/१/२००५, पृ. १३-१७

    २/१५/२००५, पृ. १३

    ९/१५/२००२, पृ. १८

    ४/१५/१९९९, पृ. १९-२०

    १/१५/१९९८, पृ. १४

२ करिंथकर १३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९१, पृ. १६-१७

२ करिंथकर १३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९७, पृ. ८-९

२ करिंथकर १३:१०

समासातील संदर्भ

  • +१कर ४:२१

२ करिंथकर १३:११

समासातील संदर्भ

  • +२कर १:३, ४
  • +फिलि २:२
  • +१थेस ५:१३; याक ३:१७; १पेत्र ३:११; २पेत्र ३:१४
  • +१कर १४:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२०, पृ. १८-२३

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९६, पृ. २५

    १/१/१९९२, पृ. २४-२५

२ करिंथकर १३:१४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    त्रैक्य, पृ. २३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ करिंथ. १३:१अनु १९:१५; मत्त १८:१६
२ करिंथ. १३:४रोम ६:४; १पेत्र ३:१८
२ करिंथ. १३:४१कर ६:१४
२ करिंथ. १३:४२ती २:११, १२
२ करिंथ. १३:५१कर ११:२८; गल ६:४
२ करिंथ. १३:१०१कर ४:२१
२ करिंथ. १३:११२कर १:३, ४
२ करिंथ. १३:११फिलि २:२
२ करिंथ. १३:१११थेस ५:१३; याक ३:१७; १पेत्र ३:११; २पेत्र ३:१४
२ करिंथ. १३:१११कर १४:३३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर १३:१-१४

करिंथकर यांना दुसरं पत्र

१३ मी आता तिसऱ्‍यांदा तुमच्याकडे येत आहे. “दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने* प्रत्येक गोष्ट सिद्ध झाली पाहिजे.”+ २ मी आता तुमच्यापासून दूर असलो, तरी मी जणू दुसऱ्‍यांदा तुमच्यामध्ये आहे असं समजा. ज्यांनी पूर्वी पाप केलं होतं त्यांना आणि इतर जणांनाही मी अगोदरच ताकीद देतो, की मी पुन्हा कधी तुमच्याकडे आलो, तर त्यांना ताडन दिल्याशिवाय राहणार नाही. ३ कारण ख्रिस्त, जो तुमच्या बाबतीत कमजोर नाही, तर तुमच्यामध्ये सामर्थ्यवान आहे तो खरंच माझ्याद्वारे बोलत आहे, याचा पुरावा तुम्ही मागत आहात. ४ खरोखर, ख्रिस्त दुर्बल स्थितीत असताना त्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला असला, तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे.+ त्याच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा दुर्बल स्थितीत असलो, तरी तुमच्यावर कार्य करणाऱ्‍या देवाच्या सामर्थ्याने+ आम्ही त्याच्यासोबत जिवंत असू.+

५ तुम्ही विश्‍वासात आहात की नाही याची पारख करत राहा. तुम्ही कशा प्रकारची व्यक्‍ती आहात हे सतत तपासून पाहा.+ ख्रिस्त तुमच्यासोबत ऐक्यात आहे याची तुम्हाला जाणीव नाही का? जर नसेल, तर तुम्हाला नाकारण्यात आलं आहे, असा त्याचा अर्थ होईल. ६ पण आम्हाला नाकारण्यात आलेलं नाही, हे तुम्ही ओळखाल अशी मी मनापासून आशा करतो.

७ आता देवाला आमची हीच प्रार्थना आहे, की तुम्ही कोणतंही वाईट काम करू नये. लोकांनी आम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही असं म्हणत नाही. तर आम्हाला जरी नाकारण्यात आलं, तरी तुम्ही चांगलं काम करावं म्हणून आम्ही अशी प्रार्थना करतो. ८ कारण सत्याच्या विरोधात आम्ही काहीही करू शकत नाही; फक्‍त सत्याच्या बाजूनेच करू शकतो. ९ आम्ही दुर्बल असतो आणि तुम्ही ताकदवान असता तेव्हा आम्हाला आनंदच होतो. आणि तुम्ही सुधारणा करत राहावी हीच प्रार्थना आम्ही करतो. १० म्हणूनच तुमच्यापासून दूर असतानाच मी या गोष्टी तुम्हाला लिहीत आहे. म्हणजे, तुमच्याकडे आल्यावर, प्रभूने मला दिलेल्या अधिकाराचा मला कठोरपणे वापर करावा लागू नये.+ कारण प्रभूने मला हा अधिकार तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तर तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला आहे.

११ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो, की नेहमी आनंदी राहा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा, सांत्वन स्वीकारत राहा,+ एकमताने विचार करत जा+ आणि शांतीने राहा.+ म्हणजे, प्रेमाचा आणि शांतीचा देव+ तुमच्यासोबत राहील. १२ एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या. १३ सगळे पवित्र जन तुम्हाला नमस्कार सांगतात.

१४ प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा आणि देवाचं प्रेम तुमच्यासोबत असो. तसंच तुम्हा सगळ्यांना पवित्र शक्‍तीमुळे* आशीर्वाद मिळत राहोत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा