वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • दिमिष्कच्या रस्त्यावर शौल (१-९)

      • शौलला मदत करण्यासाठी हनन्याला पाठवलं जातं (१०-१९क)

      • शौल दिमिष्कमध्ये येशूविषयी प्रचार करतो (१९ख-२५)

      • शौल यरुशलेमला जातो (२६-३१)

      • पेत्र ऐनेयासला बरं करतो (३२-३५)

      • उदार वृत्तीच्या दुर्कसचं पुनरुत्थान (३६-४३)

प्रेषितांची कार्यं ९:१

समासातील संदर्भ

  • +प्रेका ८:३; २२:४; २६:१०, ११; गल १:१३; १ती १:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६०-६१

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २७

    १/१/१९९१, पृ. १३-१४

प्रेषितांची कार्यं ९:२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ११:२६; २२:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६०-६१

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २७

    १/१/१९९१, पृ. १३-१४

प्रेषितांची कार्यं ९:३

समासातील संदर्भ

  • +प्रेका २२:६-११; २६:१३-१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २७

प्रेषितांची कार्यं ९:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६०-६१

प्रेषितांची कार्यं ९:५

समासातील संदर्भ

  • +१कर १५:८
  • +मत्त २५:४५

प्रेषितांची कार्यं ९:७

समासातील संदर्भ

  • +प्रेका २२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १३-१४

प्रेषितांची कार्यं ९:९

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०००, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ९:१०

समासातील संदर्भ

  • +प्रेका २२:१२

प्रेषितांची कार्यं ९:११

समासातील संदर्भ

  • +प्रेका २१:३९; २२:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. ३२

    १/१५/२०००, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ९:१२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१७

प्रेषितांची कार्यं ९:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “बांधायचा; तुरुंगात टाकायचा.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१, २

प्रेषितांची कार्यं ९:१५

तळटीपा

  • *

    किंवा “मी या माणसाला निवडलंय.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:२; रोम १:१; १ती १:१२
  • +रोम १:५; गल २:७; १ती २:७
  • +प्रेका २६:१; २७:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१६, पृ. १४-१६

    ६/२०१६, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २९-३१

    २/१/१९९१, पृ. १५

प्रेषितांची कार्यं ९:१६

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:२२, २३; २१:११; २कर ११:२३-२८; कल १:२४; २ती १:१२

प्रेषितांची कार्यं ९:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका २२:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६३

प्रेषितांची कार्यं ९:१९

समासातील संदर्भ

  • +प्रेका २६:१९, २०

प्रेषितांची कार्यं ९:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६३-६४

प्रेषितांची कार्यं ९:२१

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्यांना बांधून नेण्यासाठी.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका ८:३; गल १:१३, २३
  • +प्रेका ९:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६४

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २८

प्रेषितांची कार्यं ९:२२

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६४

प्रेषितांची कार्यं ९:२३

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:२, ३; २३:१२; २कर ११:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६४

प्रेषितांची कार्यं ९:२५

समासातील संदर्भ

  • +२कर ११:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६४

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. २९

    १/१/१९९१, पृ. १४

प्रेषितांची कार्यं ९:२६

समासातील संदर्भ

  • +गल १:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९८, पृ. २०-२१

प्रेषितांची कार्यं ९:२७

समासातील संदर्भ

  • +प्रेका ४:३६, ३७
  • +प्रेका ९:३, ४; १कर ९:१
  • +प्रेका ९:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६५

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९८, पृ. २०-२१

प्रेषितांची कार्यं ९:२८

तळटीपा

  • *

    शब्दशः “ये-जा करू लागला.”

प्रेषितांची कार्यं ९:२९

समासातील संदर्भ

  • +२कर ११:२३, २६

प्रेषितांची कार्यं ९:३०

समासातील संदर्भ

  • +प्रेका ११:२५; गल १:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २६

प्रेषितांची कार्यं ९:३१

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ८:१
  • +योह १४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६५-६६

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००८, पृ. ३१

    ५/१/२००७, पृ. १०

    १/१/१९९१, पृ. ११

प्रेषितांची कार्यं ९:३२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १४

प्रेषितांची कार्यं ९:३४

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:८; प्रेका ४:९, १०
  • +प्रेका ३:६

प्रेषितांची कार्यं ९:३६

तळटीपा

  • *

    ग्रीक भाषेतल्या दुर्कस आणि ॲरामेईक (अरामी) भाषेतल्या तबीथा या दोन्ही नावांचा “हरिणी” असा अर्थ होतो.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६७

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९०, पृ. ११

प्रेषितांची कार्यं ९:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६७

प्रेषितांची कार्यं ९:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६७

प्रेषितांची कार्यं ९:३९

तळटीपा

  • *

    किंवा “बाहेरची वस्त्रं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ६७

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १४

प्रेषितांची कार्यं ९:४०

समासातील संदर्भ

  • +लूक ८:५१
  • +मत्त ९:२४, २५; लूक ७:१४, १५; योह ११:४३, ४४

प्रेषितांची कार्यं ९:४१

समासातील संदर्भ

  • +१रा १७:२३

प्रेषितांची कार्यं ९:४२

समासातील संदर्भ

  • +योह ११:४४, ४५

प्रेषितांची कार्यं ९:४३

समासातील संदर्भ

  • +प्रेका १०:६, ३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००२, पृ. १७

    १/१/१९९१, पृ. १४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं ९:१प्रेका ८:३; २२:४; २६:१०, ११; गल १:१३; १ती १:१२, १३
प्रे. कार्यं ९:२प्रेका ११:२६; २२:४
प्रे. कार्यं ९:३प्रेका २२:६-११; २६:१३-१८
प्रे. कार्यं ९:५१कर १५:८
प्रे. कार्यं ९:५मत्त २५:४५
प्रे. कार्यं ९:७प्रेका २२:९
प्रे. कार्यं ९:९प्रेका १३:११
प्रे. कार्यं ९:१०प्रेका २२:१२
प्रे. कार्यं ९:११प्रेका २१:३९; २२:३
प्रे. कार्यं ९:१२प्रेका ९:१७
प्रे. कार्यं ९:१४प्रेका ९:१, २
प्रे. कार्यं ९:१५प्रेका १३:२; रोम १:१; १ती १:१२
प्रे. कार्यं ९:१५रोम १:५; गल २:७; १ती २:७
प्रे. कार्यं ९:१५प्रेका २६:१; २७:२४
प्रे. कार्यं ९:१६प्रेका २०:२२, २३; २१:११; २कर ११:२३-२८; कल १:२४; २ती १:१२
प्रे. कार्यं ९:१७प्रेका २२:१२, १३
प्रे. कार्यं ९:१९प्रेका २६:१९, २०
प्रे. कार्यं ९:२१प्रेका ८:३; गल १:१३, २३
प्रे. कार्यं ९:२१प्रेका ९:१, २
प्रे. कार्यं ९:२२प्रेका १७:२, ३
प्रे. कार्यं ९:२३प्रेका २०:२, ३; २३:१२; २कर ११:२३
प्रे. कार्यं ९:२५२कर ११:३२, ३३
प्रे. कार्यं ९:२६गल १:१८
प्रे. कार्यं ९:२७प्रेका ४:३६, ३७
प्रे. कार्यं ९:२७प्रेका ९:३, ४; १कर ९:१
प्रे. कार्यं ९:२७प्रेका ९:१९, २०
प्रे. कार्यं ९:२९२कर ११:२३, २६
प्रे. कार्यं ९:३०प्रेका ११:२५; गल १:२१
प्रे. कार्यं ९:३१प्रेका ८:१
प्रे. कार्यं ९:३१योह १४:१६
प्रे. कार्यं ९:३२प्रेका ९:३८
प्रे. कार्यं ९:३४मत्त १०:८; प्रेका ४:९, १०
प्रे. कार्यं ९:३४प्रेका ३:६
प्रे. कार्यं ९:४०लूक ८:५१
प्रे. कार्यं ९:४०मत्त ९:२४, २५; लूक ७:१४, १५; योह ११:४३, ४४
प्रे. कार्यं ९:४११रा १७:२३
प्रे. कार्यं ९:४२योह ११:४४, ४५
प्रे. कार्यं ९:४३प्रेका १०:६, ३२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं ९:१-४३

प्रेषितांची कार्यं

९ पण शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमकावत होता आणि त्यांची हत्या करायच्या ईर्ष्येने पेटला होता.+ म्हणून, तो महायाजकाकडे गेला २ आणि त्याने त्याच्याकडे दिमिष्कातल्या सभास्थानांना लिहिलेली पत्रं मागितली. ‘प्रभूच्या मार्गाने’+ चालणारे कोणीही, स्त्री किंवा पुरुष त्याला सापडले, तर त्यांना बांधून यरुशलेमला आणता यावं म्हणून त्याने ही पत्रं मागितली.

३ मग तो जात असताना दिमिष्कजवळ पोहोचला. अचानक त्याच्याभोवती आकाशातून प्रकाश चमकला.+ ४ तेव्हा शौल जमिनीवर पडला आणि त्याला एक आवाज ऐकू आला. तो त्याला म्हणाला: “शौल, शौल, तू मला का छळत आहेस?” ५ त्याने विचारलं: “प्रभू, तू कोण आहेस?” तो म्हणाला: “मी येशू,+ ज्याला तू छळत आहेस.+ ६ आता ऊठ आणि शहरात जा आणि पुढे काय करायचं ते तुला सांगितलं जाईल.” ७ त्याच्यासोबत प्रवास करणारी माणसं आश्‍चर्याने स्तब्ध होऊन उभी होती. त्यांना काहीतरी आवाज तर ऐकू आला, पण कोणी दिसलं नाही.+ ८ मग शौल जमिनीवरून उठला. त्याचे डोळे उघडे होते, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. म्हणून त्यांनी त्याला हाताने धरून दिमिष्कपर्यंत आणलं. ९ त्यानंतर तीन दिवस त्याला काहीच दिसत नव्हतं+ आणि त्याने काहीच खाल्लं किंवा प्यायलं नाही.

१० दिमिष्कमध्ये हनन्या+ नावाचा एक शिष्य होता. प्रभूने त्याला एका दृष्टान्तात म्हटलं: “हनन्या!” तो म्हणाला: “काय प्रभू?” ११ प्रभू त्याला म्हणाला: “ऊठ, ‘सरळ’ म्हटलेल्या रस्त्यावर जा, आणि तार्स+ इथल्या शौल नावाच्या माणसाला शोध. तो यहूदाच्या घरात आहे आणि तो प्रार्थना करतोय. १२ हनन्या नावाचा एक माणूस आपल्याकडे आलाय आणि आपली दृष्टी परत यावी म्हणून त्याने आपल्यावर हात ठेवले आहेत, असं त्याने एका दृष्टान्तात पाहिलंय.”+ १३ पण हनन्याने उत्तर दिलं: “प्रभू, मी बऱ्‍याच जणांकडून या माणसाबद्दल ऐकलंय, की यरुशलेममध्ये त्याने तुझ्या पवित्र जनांचा छळ केला. १४ आणि मुख्य याजकांनी तर त्याला तुझं नाव घेणाऱ्‍या सगळ्यांना अटक करायचा* अधिकारही दिलाय.”+ १५ पण प्रभू त्याला म्हणाला: “जा! कारण हा माणूस माझ्यासाठी एक निवडलेलं पात्र आहे.*+ तो विदेश्‍यांना,+ तसंच राजांना+ आणि इस्राएलच्या मुलांना माझ्या नावाची घोषणा करेल. १६ माझ्या नावासाठी त्याला कायकाय सोसावं लागेल हे मी त्याला स्पष्टपणे दाखवीन.”+

१७ मग हनन्या निघाला आणि त्या घरात जाऊन शौलवर हात ठेवून म्हणाला: “शौल, माझ्या भावा, तू रस्त्याने येत असताना ज्या प्रभू येशूने तुला दर्शन दिलं, त्यानेच मला तुझ्याकडे पाठवलंय. तुझी दृष्टी तुला परत मिळावी आणि तू पवित्र शक्‍तीने* भरून जावं म्हणून त्याने मला पाठवलंय.”+ १८ तेव्हा अचानक खपल्यांसारखं काहीतरी त्याच्या डोळ्यांवरून पडलं आणि त्याला पुन्हा दिसू लागलं. मग तो उठला आणि त्याने बाप्तिस्मा घेतला. १९ त्यानंतर तो जेवला आणि त्याच्या अंगात ताकद आली.

मग काही दिवस तो दिमिष्कमध्येच शिष्यांसोबत राहिला.+ २० यानंतर लगेच त्याने सभास्थानांत असा प्रचार करायला सुरुवात केली, की येशू हाच देवाचा मुलगा आहे. २१ पण ज्यांनी हे ऐकलं त्यांना फार आश्‍चर्य वाटलं. ते म्हणू लागले: “यरुशलेममध्ये हे नाव घेणाऱ्‍यांचा ज्याने क्रूरपणे छळ केला, तो हाच माणूस आहे ना?+ आणि त्यांना अटक करून मुख्य याजकांकडे घेऊन जाण्यासाठीच* हा इथे आला होता ना?”+ २२ पण शौल दिवसेंदिवस जास्त प्रभावशाली होत गेला. येशू हाच ख्रिस्त आहे हे तर्काच्या आधारावर सिद्ध करण्याद्वारे,+ तो दिमिष्कमध्ये राहणाऱ्‍या यहुद्यांचं तोंड बंद करत होता.

२३ बरेच दिवस असं घडल्यानंतर, यहुद्यांनी मिळून त्याला ठार मारायचा कट रचला.+ २४ पण त्यांनी केलेल्या या कटाबद्दल शौलला कळलं. त्याला ठार मारायच्या हेतूने यहुद्यांनी रात्रंदिवस शहराच्या फाटकांवर पाळत ठेवली होती. २५ म्हणून त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला एका मोठ्या टोपलीत बसवून, शहराच्या भिंतीतल्या एका खिडकीतून खाली उतरवलं.+

२६ यरुशलेमला आल्यावर,+ त्याने शिष्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला. पण त्या सगळ्यांना त्याची भीती वाटत होती आणि तोही एक शिष्य आहे यावर त्यांचा विश्‍वासच बसत नव्हता. २७ तेव्हा बर्णबा+ त्याला मदत करायला पुढे आला. त्याने त्याला प्रेषितांकडे नेलं आणि कशा प्रकारे रस्त्याने जाताना शौलने प्रभूला पाहिलं होतं;+ प्रभू कसा त्याच्याशी बोलला; तसंच, दिमिष्कमध्ये त्याने किती धैर्याने येशूच्या नावाबद्दल घोषणा केली,+ हे सगळं बर्णबाने प्रेषितांना सविस्तरपणे सांगितलं. २८ मग, तो शिष्यांसोबतच राहिला आणि यरुशलेममध्ये उघडपणे वावरू लागला* आणि प्रभूच्या नावाबद्दल अगदी धैर्याने बोलू लागला. २९ तो ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या यहुद्यांशी बोलायचा आणि वादविवाद करायचा. पण ते त्याला ठार मारायचा प्रयत्न करू लागले.+ ३० बांधवांना याची खबर लागताच त्यांनी त्याला कैसरीयाला आणलं आणि तार्सला पाठवून दिलं.+

३१ मग संपूर्ण यहूदीया, गालील आणि शोमरोन+ इथल्या मंडळीत शांतीचा काळ आला आणि मंडळीची उन्‍नती झाली. बांधव यहोवाचं* भय मानत होते. त्यांना पवित्र शक्‍तीद्वारे सांत्वन मिळालं+ आणि त्यांची संख्या वाढत गेली.

३२ पेत्र त्या सगळ्या प्रदेशातून फिरत असताना, लोद+ नावाच्या शहरात राहणाऱ्‍या पवित्र जनांकडेही गेला. ३३ तिथे त्याला ऐनेयास नावाचा एक माणूस भेटला. लकवा मारल्यामुळे तो आठ वर्षांपासून अंथरुणाला खिळला होता. ३४ पेत्र त्याला म्हणाला: “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरं करतोय.+ ऊठ आणि आपलं अंथरूण नीट कर.”+ तेव्हा तो लगेच उठला. ३५ लोद आणि शारोन इथे राहणाऱ्‍यांनी त्याला पाहिलं तेव्हा ते प्रभूकडे वळले.

३६ यापोमध्ये एक शिष्या होती. तिचं नाव तबीथा, म्हणजेच “दुर्कस”* असं होतं. ती इतरांसाठी बरीच चांगली कामं करायची आणि दानसुद्धा द्यायची. ३७ पण त्या दिवसांत, ती आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. म्हणून त्यांनी तिला अंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवलं. ३८ लोद शहर यापोजवळ होतं. त्यामुळे शिष्यांना जेव्हा कळलं की पेत्र लोद इथे आहे, तेव्हा त्यांनी दोन माणसांना त्याच्याकडे असा निरोप घेऊन पाठवलं, की “कृपा करून लवकरात लवकर आमच्याकडे ये.” ३९ तेव्हा पेत्र उठला आणि त्यांच्यासोबत गेला. तो तिथे पोहोचला, तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेलं. तिथे सगळ्या विधवा त्याच्याजवळ रडू लागल्या आणि दुर्कस त्यांच्यात असताना जे पुष्कळ कपडे आणि झगे* तिने त्यांच्यासाठी बनवले होते, ते त्याला दाखवू लागल्या. ४० तेव्हा पेत्रने सगळ्यांना बाहेर पाठवलं+ आणि त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. मग मृतदेहाकडे वळून तो म्हणाला: “तबीथा, ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले आणि पेत्रला पाहिल्यावर ती उठून बसली.+ ४१ त्याने तिचा हात धरून तिला उठवलं आणि मग त्याने पवित्र जनांना आणि विधवांना बोलावलं. तेव्हा तबीथा जिवंत झाल्याचं त्या सगळ्यांनी पाहिलं.+ ४२ या घटनेबद्दलची माहिती पूर्ण यापो शहरात पसरली आणि पुष्कळ जण प्रभूवर विश्‍वास ठेवू लागले.+ ४३ मग पेत्र बरेच दिवस यापोत, चामड्याचं काम करणाऱ्‍या शिमोन नावाच्या एका माणसाकडे राहिला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा