मत्तयने सांगितलेला संदेश
१ अब्राहामचा वंशज+ दावीद, दावीदचा वंशज+ येशू ख्रिस्त* याच्या जीवनाचा अहवाल:*
इसहाकला याकोब;+
याकोबला, यहूदा+ आणि त्याचे भाऊ झाले;
३ यहूदाला तामारपासून पेरेस आणि जेरह झाले;+
पेरेसला हेस्रोन;+
हेस्रोनला राम+ झाला;
४ रामला अम्मीनादाब झाला;
अम्मीनादाबला नहशोन;+
नहशोनला सल्मोन झाला;
५ सल्मोनला राहाबपासून+ बवाज झाला;
बवाजला रूथपासून ओबेद;+
ओबेदला इशाय झाला;+
दावीदला, जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून शलमोन झाला;+
रहबामला अबीया;
अबीयाला आसा झाला;+
यहोशाफाटला यहोराम;+
यहोरामला उज्जीया झाला;
योथामला आहाज;+
आहाजला हिज्कीया झाला;+
मनश्शेला आमोन;+
आमोनला योशीया झाला;+
११ यहुद्यांना बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं, त्या काळात+ योशीयाला+ यखन्या+ आणि त्याचे भाऊ झाले.
१२ बाबेलच्या बंदिवासात गेल्यानंतर यखन्याला शल्तीएल झाला;
शल्तीएलला जरूब्बाबेल झाला;+
१३ जरूब्बाबेलला अबीहूद झाला;
अबीहूदला एल्याकीम;
एल्याकीमला अज्जुर झाला;
१४ अज्जुरला सादोक झाला;
सादोकला याखीम;
याखीमला एलीहूद झाला;
१५ एलीहूदला एलाजार झाला;
एलाजारला मत्तान;
मत्तानला याकोब झाला;
१६ याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरीयाचा पती होता. मरीयाच्या पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.+
१७ अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत १४ पिढ्या झाल्या. दावीदपासून यहुद्यांच्या बाबेलमधल्या बंदिवासापर्यंत १४ पिढ्या झाल्या आणि बाबेलमधल्या बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत १४ पिढ्या झाल्या.
१८ येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरीया हिचं योसेफशी लग्न ठरलं होतं. पण, त्यांचं लग्न होण्याआधीच ती पवित्र शक्तीने* गरोदर राहिली.+ १९ तिचा नवरा योसेफ एक चांगला* माणूस असल्यामुळे त्याला चारचौघांत तिची बदनामी होऊ द्यायची नव्हती. म्हणून त्याने तिला गुपचूप घटस्फोट* द्यायचं ठरवलं.+ २० पण त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर यहोवाच्या* दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिलं. तो त्याला म्हणाला: “योसेफ, दावीदच्या मुला, मरीयाशी लग्न करायला* घाबरू नकोस, कारण तिच्या पोटात असलेला गर्भ पवित्र शक्तीमुळे* आहे.+ २१ तिला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव येशू* ठेव,+ कारण तो आपल्या लोकांची त्यांच्या पापांपासून सुटका करेल.”*+ २२ यहोवाने* आपल्या संदेष्ट्याद्वारे सांगितलेलं वचन पूर्ण व्हावं, म्हणून या सगळ्या गोष्टी खरोखरच घडल्या. त्याने असं सांगितलं होतं: २३ “पाहा! कुमारी गर्भवती होईल आणि ती एका मुलाला जन्म देईल. त्याचं नाव इम्मानुएल+ ठेवलं जाईल.” या नावाचा अर्थ “देव आपल्यासोबत आहे” असा होतो.+
२४ मग योसेफ झोपेतून जागा झाला. त्याने यहोवाच्या* दूताने सांगितल्याप्रमाणे केलं आणि आपल्या बायकोला घरी आणलं. २५ पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत+ त्याने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्याने मुलाचं नाव येशू ठेवलं.+