गणना
३४ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “इस्राएली लोकांना या सूचना दे: ‘जेव्हा तुम्ही कनान देशात जाल,+ तेव्हा जी जमीन तुम्हाला वारसा म्हणून मिळेल, तिच्या सीमा अशा असतील:+
३ तुमची दक्षिणेकडची सीमा अदोमच्या कडेने झिनच्या ओसाड रानापासून असेल आणि पूर्वेकडे ती मृत समुद्राच्या* टोकापासून सुरू होईल.+ ४ तिथून तुमची सीमा दिशा बदलून अक्रब्बीमच्या चढावाच्या+ दक्षिणेकडून झिनपर्यंत जाईल आणि कादेश-बर्ण्याच्या+ दक्षिणेला ती संपेल. पुढे ती हसर-अद्दारपर्यंत+ आणि त्यापुढे असमोनकडे जाईल. ५ असमोनपासून ती सीमा, इजिप्तच्या खोऱ्याकडे वळून समुद्रापर्यंत* जाऊन संपेल.+
६ तुमची पश्चिमेकडची सीमा महासागर* आणि त्याचा समुद्रकिनारा असेल. हीच पश्चिम सीमा असेल.+
७ तुमची उत्तरेकडची सीमा अशी असेल: महासागरापासून तुम्ही होर पर्वतापर्यंत सीमा आखा. ८ होर पर्वतापासून लेबो-हमाथपर्यंत*+ सीमा आखा. ती सदादपर्यंत+ असेल. ९ तिथून ती सीमा जिप्रोनकडे जाईल आणि हसर-एनान+ इथे येऊन संपेल. ही तुमची उत्तरेकडची सीमा असेल.
१० मग तुम्ही पूर्वेकडे हसर-एनानपासून शफामपर्यंत तुमची सीमा आखा. ११ ही सीमा शफामपासून अईनच्या पूर्वेकडे, रिब्लापर्यंत असेल आणि ती खाली किन्नेरेथ+ समुद्राच्या* पूर्वेकडच्या उतारापलीकडे जाईल. १२ ती पुढे यार्देनपर्यंत जाईल आणि मृत समुद्राजवळ जाऊन संपेल.+ हा तुमचा संपूर्ण देश+ आणि त्याच्या चारही बाजूंच्या सीमा असतील.’”
१३ तेव्हा मोशेने इस्राएली लोकांना या सूचना दिल्या: “ही सर्व जमीन यहोवाने साडेनऊ वंशांना वारसा म्हणून देण्याची आज्ञा दिली आहे. ती तुम्ही चिठ्ठ्या टाकून आपसात वाटून घ्या.+ १४ रऊबेनच्या आणि गादच्या वंशांनी, तसंच मनश्शेच्या अर्ध्या वंशाने आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे आधीच आपली वारशाची जमीन घेतली आहे.+ १५ या अडीच वंशांनी यरीहोजवळ यार्देन प्रदेशाच्या पूर्वेकडे, म्हणजे सूर्योदयाच्या दिशेला आपली वारशाची जमीन आधीच घेतली आहे.”+
१६ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: १७ “तुम्ही ज्या जमिनीचा ताबा घेणार आहात, ती तुम्हाला वाटून देणाऱ्या पुरुषांची ही नावं आहेत: एलाजार+ याजक आणि नूनचा मुलगा यहोशवा.+ १८ यासोबतच तुमची वारशाची जमीन तुमच्यामध्ये वाटून देण्यासाठी तुम्ही प्रत्येक वंशातून एकेक प्रधान निवडा.+ १९ ही त्या प्रधानांची नावं आहेत: यहूदा वंशातला+ यफुन्नेचा मुलगा कालेब;+ २० शिमोनच्या+ वंशातला अम्मीहूदचा मुलगा शमुवेल; २१ बन्यामीन वंशातला,+ किसलोनचा मुलगा अलीदाद; २२ दानच्या वंशातला+ प्रधान, योग्लीचा मुलगा बुक्की; २३ योसेफच्या मुलांपैकी,+ मनश्शेच्या वंशातला+ प्रधान, एफोदचा मुलगा हन्नीएल; २४ एफ्राईमच्या वंशातला+ प्रधान, शिफटानचा मुलगा कमुवेल; २५ जबुलूनच्या वंशातला+ प्रधान, पनीकचा मुलगा अलीसाफान; २६ इस्साखारच्या वंशातला+ प्रधान, अज्जानचा मुलगा पलतीयेल; २७ आशेरच्या वंशातला+ प्रधान, शलोमीचा मुलगा अहीहूद; २८ नफतालीच्या वंशातला+ प्रधान, अम्मीहूदचा मुलगा पदाहेल.” २९ या पुरुषांना यहोवाने कनान देशातली जमीन, इस्राएली लोकांना वाटून देण्याची आज्ञा दिली होती.+