हबक्कूक
१ हबक्कूक* संदेष्ट्याला एका दृष्टान्तात हा संदेश मिळाला. तो म्हणाला:
२ “हे यहोवा,* मी मदतीसाठी तुला कुठपर्यंत हाक मारू? तू कधी माझं ऐकशील?+
या हिंसाचारापासून सुटका करण्याची मी कुठपर्यंत विनंती करू? तू माझी सुटका का करत नाहीस?*+
३ तू मला वाईट कामं होताना का पाहायला लावतोस?
तू अत्याचार का खपवून घेतोस?
ही लुबाडणूक आणि हिंसाचार मला का पाहावा लागत आहे?
हे भांडणतंटे आणि झगडे का वाढत आहेत?
४ कायदा कमजोर पडला आहे,
न्यायाचा कधीच विजय होत नाही.
५ ‘राष्ट्रांकडे पाहा आणि लक्ष द्या!
आश्चर्याने एकटक पाहा आणि थक्क व्हा;
कारण तुमच्या दिवसांत असं काहीतरी घडणार आहे,
की त्याबद्दल तुम्हाला सांगितलं, तरी तुमचा विश्वास बसणार नाही.+
६ कारण आता मी खास्दी लोकांना उभं करत आहे.+
ते एक निर्दयी आणि अविचारी राष्ट्र आहे.
जी घरं त्यांची नाहीत, ती काबीज करण्यासाठी
ते पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जातात.+
७ ते भयानक आणि भीतिदायक आहेत.
ते स्वतःच कायदा ठरवतात आणि दुसऱ्यांवर अधिकार* गाजवतात.+
त्यांचे लढाईचे घोडे वेगाने धावतात;
त्यांचे घोडे दुरून येतात.
शिकारीवर झडप घालणाऱ्या गरुडांसारखे ते आहेत.+
९ ते सगळे हिंसाचार करण्याच्या इराद्याने येतात.+
पूर्वेच्या वाऱ्यासारखे+ ते पुढे पाहत वाटचाल करतात,
आणि वाळूच्या कणांसारखे असंख्य बंदिवानांना गोळा करतात.
ते प्रत्येक किल्ल्याची+ थट्टा करतात;
ते मातीचा ढीग रचून किल्ला काबीज करतात.
१२ हे यहोवा, तू तर सर्वकाळापासून आहेस.+
हे माझ्या देवा, माझ्या पवित्र देवा, तुला मरण नाही.*+
हे यहोवा, तू न्यायदंड आणण्यासाठी त्यांना नेमलं आहेस.
हे माझ्या खडका,+ तू शिक्षा देण्यासाठी* त्यांना निवडलं आहेस.+
मग तू विश्वासघातकी लोकांना का खपवून घेतोस?+
आणि जेव्हा दुष्ट आपल्यापेक्षा चांगल्या* माणसाला गिळून टाकतो, तेव्हा तू गप्प का राहतोस?+
१४ तू माणसाला समुद्रातल्या माशांसारखा,
आणि कोणताही शासक नसलेल्या किड्यामुंग्यांसारखा का करतोस?
१५ त्या सर्वांना तो* गळाने उचलतो.
तो जाळं टाकून त्यांना पकडतो;
तो आपल्या जाळ्यात त्यांना गोळा करतो.
आणि यामुळे तो खूप खूश होतो.+
१६ म्हणूनच तो आपल्या जाळ्याला बलिदानं अर्पण करतो
आणि मासे पकडण्याच्या आपल्या जाळ्यासमोर हवन करतो;
कारण यांमुळेच त्याला चांगलं* अन्न
आणि उत्तम पदार्थ मिळतात.
१७ मग तो असंच आपलं जाळं रिकामं करत राहील का?*
तो असाच निर्दयीपणे राष्ट्रांची कत्तल करत राहील का?+