नहूम
१ हे एल्कोश इथल्या नहूम* याला झालेल्या दृष्टान्ताचं पुस्तक आहे. निनवेविरुद्ध न्यायदंडाची घोषणा:+
तो त्यांची वाईट कृत्यं विसरत नाही आणि त्यांच्यावर आपला क्रोध ओततो.+
यहोवा आपल्या वैऱ्यांवर सूड उगवतो.
३ यहोवा लगेच रागवत नाही.+ त्याच्याकडे अफाट शक्ती आहे,+
पण यहोवा अपराध्यांना योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+
तो विनाश करणाऱ्या वाऱ्यात आणि वादळात चालतो.
आणि ढग त्याच्या पायाची धूळ आहेत.+
बाशान आणि कर्मेल सुकून जातात.+
आणि लबानोनची फुलं कोमेजतात.
त्याच्या चेहऱ्यामुळे पृथ्वीचा थरकाप होईल,
जग आणि त्यात राहणाऱ्या सर्वांचा थरकाप उडेल.+
६ त्याच्या संतापासमोर कोण उभा राहू शकतो?+
आणि त्याच्या भयानक क्रोधापुढे कोण टिकू शकतो?+
त्याचा राग आगीसारखा ओतला जाईल,
आणि त्याच्यामुळे खडकांचे तुकडे होतील.
७ यहोवा चांगला आहे,+ संकटाच्या दिवशी तो आश्रयाचं ठिकाण होतो.+
त्याच्यात शरण घेणाऱ्यांची तो काळजी घेतो.*+
८ वाहून नेणाऱ्या पुराने तो तिच्या* ठिकाणाचा सर्वनाश करेल,
आणि काळोख त्याच्या शत्रूंचा पाठलाग करेल.
९ यहोवाविरुद्ध तू काय कट रचणार?
तो तुझा असा सर्वनाश करेल,
की त्याला दुसऱ्यांदा संकट आणावं लागणार नाही.+
१० ते काट्यांसारखे गुंतलेले आहेत;
ते मद्याच्या नशेत असलेल्यांसारखे आहेत.
पण ते सुक्या गवतासारखे भस्म होतील.
११ यहोवाविरुद्ध दुष्ट योजना करणारा,
आणि बिनकामाचा सल्ला देणारा तुझ्यातून येईल.
१२ यहोवा म्हणतो:
“ते खूप ताकदवान आणि असंख्य असले,
तरी त्यांना कापून टाकलं जाईल आणि ते नाहीसे होतील. *
मी तुला* शिक्षा केली आहे, पण यापुढे मी तुला शिक्षा करणार नाही.
तुझ्या देवांच्या मंदिरातल्या* कोरीव आणि धातूच्या मूर्तींचा* मी नाश करीन.
तू घृणास्पद आहेस, म्हणून मी तुझ्यासाठी एक कबर बनवीन.’
१५ पाहा, आनंदाचा संदेश सांगणारा,
शांतीची घोषणा करणारा+ डोंगरांवरून येत आहे,
हे यहूदा, आपले सण साजरे कर,+ आपले नवस फेड,
कारण दुष्ट लोक पुन्हा तुझ्यावर हल्ला करणार नाहीत.
त्यांचा पूर्णपणे नाश केला जाईल.”