आमोस
८ सर्वोच्च प्रभू यहोवाने मला हा दृष्टान्त दाखवला: पाहा! उन्हाळी फळांची एक टोपली होती. २ मग तो म्हणाला, “आमोस, तुला काय दिसतंय?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग यहोवा मला म्हणाला: “माझ्या लोकांचा, म्हणजे इस्राएली लोकांचा अंत जवळ आलाय. यापुढे मी त्यांना दया दाखवणार नाही.+ ३ ‘त्या दिवशी मंदिरात गीतं गाण्याऐवजी शोक केला जाईल,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ‘सगळीकडे प्रेतंच प्रेतं पडलेली असतील+ आणि त्यामुळे शांतता पसरेल.’
४ गोरगरिबांना तुडवणाऱ्यांनो,
आणि देशातल्या दीनदुबळ्यांचा नाश करणाऱ्यांनो ऐका,+
५ तुम्ही म्हणता, ‘नवचंद्राचा* सण केव्हा संपेल,+ आणि आम्हाला आमचं धान्य कधी विकता येईल?
शब्बाथ+ कधी संपेल आणि आम्ही आमचं धान्य कधी विकायला काढू?
आम्ही एफाचं* माप छोटं करू,
आणि शेकेलचं* वजन वाढवू,
म्हणजे आम्हाला खोट्या तराजूने लोकांना फसवता येईल;+
६ मग आम्ही चांदीने दीनदुबळ्यांना,
आणि चपलांच्या एका जोडाच्या बदल्यात गोरगरिबांना विकत घेऊ,+
आणि खराब धान्य विकू.’
सगळा देश, भरून वाहणाऱ्या नाईल नदीसारखा होईल,
आणि इजिप्तच्या नाईलसारखा वर उसळून पुन्हा ओसरेल.’+
९ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी,
मी भर दुपारी सूर्य मावळायला लावीन,
लख्ख प्रकाशाच्या दिवशी काळोख पसरवीन.+
१० मी तुमच्या सणांना शोकात बदलीन,+
आणि तुमची गाणी शोकगीतांमध्ये बदलीन.
मी प्रत्येकाच्या कमरेवर गोणपाट घालीन
आणि प्रत्येकाच्या डोक्याचं मुंडण करीन;
एकुलत्या एका मुलासाठी शोक केला जातो, तसा शोक मी करायला लावीन,
त्या दिवसाचा शेवट कडू असेल.’
११ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत,
जेव्हा मी देशात दुष्काळ पाठवीन,
पण तो अन्नाचा किंवा पाण्याचा दुष्काळ नसेल,
तर यहोवाच्या शब्दांचा दुष्काळ असेल.+
१२ ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत,
आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत* लटपटत जातील.
ते यहोवाचे शब्द शोधण्यासाठी वणवण फिरतील, पण त्यांना ते सापडणार नाहीत.
१३ त्या दिवशी सुंदर तरुणी,*
आणि तरुण तहानेमुळे चक्कर येऊन पडतील;
१४ जे शोमरोनच्या दोषाची+ शपथ घेऊन म्हणतात,
“हे दान, तुझ्या देवाच्या जिवाची शपथ!”+
आणि “बैर-शेबाला जाणाऱ्या मार्गाची+ शपथ!”
ते पडतील आणि पुन्हा उठू शकणार नाहीत.’”+