आमोस
५ “हे इस्राएलच्या घराण्या, मी या शोकगीतातून तुझ्याविरुद्ध सांगत असलेला संदेश ऐक:
२ ‘इस्राएल कुमारी पडली आहे;
तिला पुन्हा उठता येणार नाही.
तिला तिच्याच देशात टाकून देण्यात आलंय;
तिला उठवणारं कोणीच नाही.’
३ कारण सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो:
‘इस्राएलच्या घराण्यासोबत असं होईल, की ज्या शहरातून हजार लढाईला निघायचे, त्यात फक्त शंभर उरतील;
आणि ज्या शहरातून शंभर निघायचे, त्यात फक्त दहा उरतील.’+
४ इस्राएलच्या घराण्याला यहोवा असं म्हणतो:
‘माझा शोध घ्या आणि जिवंत राहा.+
गिलगालला जाऊ नका+ किंवा बैर-शेबाला जाऊ नका,+
कारण गिलगाल नक्कीच बंदिवासात जाईल,+
आणि बेथेल उरणार नाही.*
६ यहोवाचा शोध घ्या आणि जिवंत राहा;+
नाहीतर, योसेफच्या घराण्यावर तो आगीसारखा भडकेल,
आणि बेथेलला भस्म करेल; आणि ती आग विझवणारं कोणी नसेल.
८ ज्याने कृत्तिका* आणि मृगशीर्ष नक्षत्रं बनवली,+
जो गडद अंधाराची सकाळ करतो,
जो दिवसाची काळोखी रात्र करतो,+
जो समुद्राच्या पाण्याला बोलावतो
आणि पृथ्वीवर त्याचा वर्षाव करतो,+
—त्याचं नाव यहोवा आहे.
९ तो बलवानावर अचानक विनाश आणेल,
आणि तटबंदी असलेल्या ठिकाणांचा नाश करेल.
१० शहराच्या फाटकांच्या आत ताडन देणाऱ्यांचा ते द्वेष करतात,
आणि खरं बोलणाऱ्यांची त्यांना घृणा वाटते.+
११ तुम्ही गोरगरिबांकडून शेताचं भाडं* घेता
आणि खंडणी म्हणून त्यांचं पीक मागता,+
त्यामुळे तुम्ही कोरीव दगडांनी बांधलेल्या तुमच्या घरात राहणार नाही,+
आणि तुम्ही लावलेल्या चांगल्या द्राक्षमळ्यांमधला द्राक्षारस तुम्ही पिणार नाही.+
१२ कारण तुम्ही किती अपराध* केलेत,
आणि किती मोठी पापं केलीत हे मला माहीत आहे.
१३ म्हणून, ज्यांना समज आहे, ते त्या वेळी शांत राहतील,
कारण ती संकटाची वेळ असेल.+
मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे,
सैन्यांचा देव यहोवा तुमच्यासोबत असेल.+
तेव्हा कदाचित सैन्यांचा देव यहोवा,
योसेफच्या उरलेल्यांवर कृपा करेल.’+
१६ म्हणून यहोवा, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:
‘सर्व चौकांमध्ये आक्रोश होईल,
सगळ्या रस्त्यांवर ते “हाय! हाय!” करतील,
ते शोक करण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावतील
आणि पैसे देऊन रडणाऱ्यांना बोलावतील.’
१७ ‘प्रत्येक द्राक्षमळ्यात आक्रोश केला जाईल;+
कारण मी तुमच्यामधून फिरेन आणि शिक्षा देईन,’ असं यहोवा म्हणतो.
१८ ‘जे यहोवाचा दिवस येण्याची वाट बघतात त्यांची दुर्दशा होईल!+
तुमच्यासाठी यहोवाचा दिवस कसा असेल?+
तो उजेडाचा नाही, तर अंधाराचा दिवस असेल.+
१९ जसा एखादा माणूस सिंहापासून पळतो आणि अस्वलाच्या तावडीत सापडतो,
आणि जेव्हा तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो, तेव्हा त्याला साप चावतो, तसं त्या दिवशी होईल.
२० यहोवाचा दिवस उजेडाचा नाही, तर अंधाराचा असेल;
त्यात प्रकाश नसेल, तर गडद काळोख असेल.
२१ तुमच्या सणांची मला घृणा वाटते, मला त्यांचा राग येतो,+
तुमच्या पवित्र सभांमधल्या सुवासामुळे मला आनंद होत नाही.
२२ तुम्ही जरी मला होमार्पणं आणि भेट म्हणून अर्पणं दिलीत,
तरी मला आनंद होणार नाही;+
आणि तुम्ही शांती-अर्पणं म्हणून आणलेल्या धष्टपुष्ट प्राण्यांचा मी स्वीकार करणार नाही.+
२३ तुमच्या गाण्यांचा गोंगाट मला ऐकायला लावू नका;
तुमच्या तंतुवाद्यांचे सूर मी ऐकणार नाही.+
२४ न्यायाला पाण्यासारखं,+
आणि नीतीला सतत वाहणाऱ्या ओढ्यासारखं वाहू द्या.
२५ हे इस्राएलच्या घराण्या, तू ४० वर्षं ओसाड रानात होतास,
तेव्हा तू माझ्यासाठी बलिदानं आणि भेट म्हणून अर्पणं आणली होतीस का?+
२६ आता तुम्हाला तुमचा राजा सक्कुथ आणि कैवान,* यांना घेऊन जावं लागेल.
तुम्ही स्वतःसाठी बनवलेल्या मूर्तींना, तुमच्या देवाच्या ताऱ्याला, तुम्हाला घेऊन जावं लागेल.
२७ आणि मी तुम्हाला दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवीन,’+ असं तो म्हणतो; सैन्यांचा देव यहोवा हे त्याचं नाव आहे.”+