आमोस
३ “हे इस्राएली लोकांनो, यहोवाने तुमच्याविषयी, म्हणजे त्याने इजिप्त देशातून बाहेर आणलेल्या सबंध घराण्याविषयी सांगितलेला हा संदेश ऐका:
२ ‘पृथ्वीवरच्या सर्व घराण्यांपैकी मी फक्त तुमच्याच घराण्याला ओळखतो.+
म्हणूनच तुमच्या सर्व अपराधांबद्दल मी तुमच्याकडून हिशोब घेईन.+
३ जर दोन जणांनी भेटायचंच ठरवलं नसेल, तर ते सोबत चालू शकतील का?
४ जंगलात शिकार नसेल, तर सिंह गर्जना करेल का?
तरुण सिंहाने* काही पकडलं नसेल, तर तो गुहेतून गुरगुरेल का?
५ जर जमिनीवर सापळाच लावला नसेल,* तर पक्षी त्यात अडकेल का?
सापळ्यात काही अडकलं नाही, तर तो सापळा जमिनीवरून वर उडेल का?
६ शहरात शिंग फुंकलं गेलं, तर लोक थरथर कापत नाहीत का?
शहरावर विपत्ती आली, तर ती यहोवानेच आणलेली नाही का?
७ कारण सर्वोच्च प्रभू यहोवा आपल्या मनातली गोष्ट*
आपल्या सेवकांना, म्हणजे संदेष्ट्यांना सांगितल्याशिवाय, काहीही करणार नाही.+
८ सिंह गरजला आहे!+ मग कोण घाबरणार नाही?
सर्वोच्च प्रभू यहोवा बोलला आहे! मग कोण भविष्यवाणी करणार नाही?’+
९ ‘अश्दोदच्या बुरुजांवरून घोषणा करा
आणि इजिप्तच्या बुरुजांवरून जाहीर करा.
१० कारण योग्य ते कसं करायचं हे त्यांना माहीत नाही,” असं यहोवा म्हणतो,
“ते आपल्या बुरुजांमध्ये हिंसाचार आणि विनाश साठवत आहेत.”’
११ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो,
‘देशाला एक शत्रू घेरेल,+
तो तुमची शक्ती हिरावून घेईल
आणि तुमचे बुरूज लुटले जातील.’+
१२ यहोवा म्हणतो,
‘मेंढपाळ जसा सिंहाच्या जबड्यातून फक्त दोन पाय आणि कानाचा तुकडा खेचून घेतो,
तसंच, जे आज शोमरोनमध्ये आपल्या सुंदर पलंगांवर आणि दिवाणांवर* बसले आहेत,+
त्या इस्राएली लोकांपैकी फक्त काही जणांना वाचवलं जाईल.’
१३ सैन्यांचा देव, सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘ऐका आणि याकोबच्या घराण्याला ताकीद द्या.’*
१४ ‘कारण इस्राएलने केलेल्या सर्व बंडांसाठी* ज्या दिवशी मी त्याच्याकडून हिशोब मागीन,+
त्या दिवशी मी बेथेलच्या वेदींचाही नाश करीन;+
मी प्रत्येक वेदीची शिंगं कापून टाकीन आणि ती जमिनीवर पडतील.+
१५ उन्हाळ्याच्या घरासोबत मी हिवाळ्याचं घरही पाडून टाकीन.’