योएल
३ “पाहा! त्या दिवसांत आणि त्या काळात,
जेव्हा मी यहूदाच्या आणि यरुशलेमच्या बंदिवानांना परत आणीन,+
२ तेव्हा मी सर्व राष्ट्रांनाही एकत्र करीन
माझे लोक आणि माझा वारसा असलेलं इस्राएल यांच्यासोबत त्यांनी जे केलं,
त्याबद्दल मी तिथे त्यांचा न्याय करीन;+
कारण त्यांनी माझ्या लोकांची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग केली,
आणि माझा देश आपसात वाटून घेतला.+
३ त्यांनी माझ्या लोकांसाठी चिठ्ठ्या टाकल्या;+
वेश्येला पैसे देण्यासाठी ते मुलगा विकायचे
आणि द्राक्षारस पिण्यासाठी मुलगी विकायचे.
४ हे सोर, सीदोन आणि पलेशेथच्या सर्व प्रदेशांनो,
तुमचा माझा काय संबंध?
तुमचं काही वाईट केल्याबद्दल, तुम्ही माझा सूड घेत आहात का?
तुम्ही माझा सूड घेत असाल,
तर मी लगेच तुमच्या कृत्यांप्रमाणे तुमची परतफेड करीन.+
५ कारण तुम्ही माझं सोनं आणि चांदी घेतली आहे,+
आणि माझा सगळ्यात मौल्यवान खजिना तुम्ही तुमच्या मंदिरांत नेला;
६ यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेण्यासाठी,
तुम्ही त्यांना ग्रीसच्या लोकांना विकून टाकलं;+
७ म्हणून तुम्ही त्यांना जिथे विकलं होतं, तिथून त्यांना परत आणून,+
मी तुमच्या कृत्यांप्रमाणे तुमची परतफेड करीन.
८ मी तुमच्या मुलामुलींना यहूदाच्या लोकांच्या हाती विकून टाकीन,+
आणि ते त्यांना एका दूरच्या राष्ट्राला, म्हणजे शबाच्या लोकांना विकतील;
कारण यहोवा स्वतः असं बोललाय.
९ राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा:+
‘युद्धासाठी तयार व्हा!* शूरवीरांना सज्ज करा!
सर्व सैनिकांना हल्ला करण्यासाठी पुढे सरसावू द्या!+
१० तुमच्या नांगरांचे फाळ ठोकून तलवारी बनवा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा.
दुबळ्यानेही म्हणावं, “मी ताकदवान आहे.”
११ आजूबाजूच्या राष्ट्रांनो, एकत्र व्हा आणि येऊन मदत करा!’”+
हे यहोवा, तुझ्या वीरांना* खाली त्या ठिकाणी घेऊन ये.
१२ “राष्ट्रांनो उठा, आणि यहोशाफाटच्या खोऱ्यात* या;
कारण तिथे मी आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी बसणार आहे.+
१३ विळा चालवा, कारण पीक तयार आहे.
द्राक्षकुंड भरलं आहे, म्हणून खाली या आणि द्राक्षं तुडवा.+
द्राक्षारसाची भांडी ओसंडून वाहत आहेत, कारण राष्ट्रांचा दुष्टपणा फार झाला आहे.
१५ सूर्य आणि चंद्र काळवंडतील,
आणि ताऱ्यांचं तेज नाहीसं होईल.
१६ तेव्हा यहोवा सीयोनमधून गरजेल,
तो यरुशलेममधून घोषणा करेल.
आकाश आणि पृथ्वी थरथरू लागतील;
पण यहोवा आपल्या लोकांसाठी आश्रय असेल,+
इस्राएलच्या लोकांसाठी तो एक गड असेल.
१७ तेव्हा तुम्हाला कळेल, की सीयोनवर, माझ्या पवित्र पर्वतावर राहणारा मी तुमचा देव यहोवा आहे.+
यहूदाचे सगळे ओढे पाण्याने भरून वाहतील.
यहोवाच्या मंदिरातून एक झरा वाहील,+
तो बाभळीच्या झाडांच्या खोऱ्याला पाणी पुरवेल.
आणि अदोम उजाड रान होईल,+
कारण ते यहूदाच्या लोकांशी क्रूरपणे वागले,+
आणि त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त सांडलं.+
२० पण यहूदामध्ये कायम लोकांची वस्ती राहील,
आणि यरुशलेम पिढ्या न् पिढ्या राहील.+