होशेय
हे इस्राएलच्या घराण्या, लक्ष दे,
हे राजाच्या घराण्या, ऐक,
तुम्ही मिस्पासाठी पाश असल्यामुळे,
आणि ताबोरवर+ पसरलेल्या जाळ्यासारखे असल्यामुळे
हा न्यायदंड तुमच्यावर येणार आहे.
२ बंडखोर* कत्तल करण्यात बुडून गेले आहेत;*
त्या सर्वांना मी ताकीद देत आहे.*
३ मी एफ्राईमला ओळखतो,
आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही.
हे एफ्राईम, तू व्यभिचार केला आहेस;*
इस्राएलने स्वतःला दूषित केलं आहे.+
४ त्यांची कृत्यं त्यांना देवाकडे परत येऊ देत नाहीत,
कारण त्यांच्यामध्ये व्यभिचारी* वृत्ती आहे;+
ते यहोवाला ओळखत नाहीत.
५ इस्राएलच्या गर्वाने त्याच्याविरुद्ध* साक्ष दिली आहे;+
इस्राएल आणि एफ्राईम दोघंही आपल्या अपराधांमुळे अडखळून पडले आहेत,
आणि यहूदाही त्यांच्यासोबत अडखळून पडला आहे.+
६ ते आपले कळप घेऊन यहोवाला शोधायला गेले,
पण तो त्यांना सापडला नाही.
तो त्यांच्यापासून दूर गेला होता.+
७ त्यांनी यहोवाशी विश्वासघात केला आहे,+
कारण त्यांनी परक्या मुलांना जन्म दिला आहे.
आता एका महिन्यात त्यांचा आणि त्यांच्या शेतांचा* नाश होईल.
८ गिबामध्ये शिंग फुंका+ आणि रामामध्ये+ कर्णा वाजवा!
बेथ-आवेनमध्ये+ युद्ध घोषित करा; हे बन्यामीन, तू सैन्याच्या पुढे चाल!
९ हे एफ्राईम, न्यायदंडाच्या दिवशी तुझी वाईट दशा होईल.+
जे नक्की घडणार आहे, ते मी इस्राएलच्या वंशांना सांगितलं आहे.
१० यहूदाचे अधिकारी सीमेच्या खुणा हलवणाऱ्यांसारखे आहेत.+
पाणी ओतावं, तसा मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतीन.
११ एफ्राईमने आपल्या शत्रूच्या मागे जाण्याचा निश्चय केला,+
म्हणून तो पीडित झाला आहे, न्यायदंडाने चिरडला गेला आहे.
१२ त्यामुळे मी एफ्राईमसाठी कसरीसारखा,*
आणि यहूदाच्या घराण्यासाठी किडीसारखा झालो.
१३ एफ्राईमने आपला रोग पाहिला आणि यहूदाने आपली जखम पाहिली,
तेव्हा एफ्राईम अश्शूरकडे गेला+ आणि एका महान राजाकडे त्याने दूत पाठवले.
पण तो तुझा रोग दूर करू शकला नाही,
तो तुझी जखम बरी करू शकला नाही.
१४ कारण मी एफ्राईमसाठी एका तरुण सिंहासारखा,
आणि यहूदाच्या घराण्यासाठी ताकदवान सिंहासारखा* होईन.
मी त्यांना फाडून त्यांचे तुकडे करीन आणि निघून जाईन;+
मी त्यांना उचलून नेईन, तेव्हा कोणीही त्यांना सोडवणार नाही.+
१५ मी माझ्या ठिकाणी परत निघून जाईन आणि त्यांना त्यांच्या पापांचे परिणाम भोगावे लागतील;
संकटात सापडल्यावर, ते माझा शोध घेतील.”+