होशेय
३ मीच एफ्राईमला चालायला शिकवलं,+ आणि त्यांना उचलून घेतलं;+
पण मी त्यांना बरं केलं, हे त्यांनी ओळखलं नाही.
४ मी त्यांना दयेने आणि प्रेमाने आपल्याजवळ ओढून घेतलं;*+
मी त्यांच्या मानेवरून* जू* काढलं,
आणि प्रेमाने प्रत्येकाला अन्न आणून दिलं.
५ ते इजिप्तला परत जाणार नाहीत, पण अश्शूर त्यांचा राजा होईल,+
कारण ते माझ्याकडे परत यायला तयार झाले नाहीत.+
६ एफ्राईमच्या शहरांविरुद्ध तलवार फिरेल,+
आणि ती त्याचे अडसर तोडून त्यांचा नाश करेल, कारण त्यांनी दुष्ट योजना केल्या आहेत.+
७ माझ्या लोकांनी माझ्याशी अविश्वासूपणे वागण्याचा निश्चय केला आहे.+
त्यांनी त्यांना वर बोलावलं,* पण कोणी उठून आलं नाही.
८ हे एफ्राईम, मी तुला कसं सोडून देईन?+
हे इस्राएल, मी तुला शत्रूंच्या हाती कसा देईन?
मी तुझ्याशी अदमासारखा कसा वागीन?
मी तुला सबोईमसारखं कसं करीन?+
माझं मन बदललं आहे;
आणि त्याच वेळी माझ्या हृदयात कालवाकालव झाली आहे.+
९ मी माझ्या क्रोधाचा अग्नी भडकू देणार नाही.
मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही,+
कारण मी माणूस नाही, तर देव आहे,
मी तुमच्यासोबत असणारा पवित्र देव आहे;
आणि मी संतापाच्या भरात तुमच्याकडे येणार नाही.
१० ते यहोवामागे चालतील आणि तो सिंहासारखा गरजेल;+
तो गर्जना करेल, तेव्हा त्याची मुलं पश्चिमेकडून थरथर कापत येतील.+
११ ते इजिप्तमधून पक्ष्यांसारखे,
आणि अश्शूरमधून कबुतरासारखे थरथर कापत येतील;+
आणि मी त्यांना त्यांच्या घरी परत आणीन,” असं यहोवा म्हणतो.+
१२ “एफ्राईमने मला खोटेपणाने
आणि इस्राएलच्या घराण्याने मला फसवणुकीने घेरलं आहे.+