वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

दानीएल रूपरेषा

      • बाबेलचं सैन्य यरुशलेमला वेढा घालतं (१, २)

      • शाही घराण्यातल्या तरुण बंदिवानांना प्रशिक्षण (३-५)

      • चार इब्री तरुणांच्या विश्‍वासाची परीक्षा (६-२१)

दानीएल १:१

तळटीपा

  • *

    किंवा “बॅबिलॉनचा.”

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:४; यिर्म २२:१८, १९; ३६:३०
  • +अनु २८:४९, ५०; २रा २४:१; २इत ३६:५, ६

दानीएल १:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    म्हणजे, बॅबिलोनिया.

समासातील संदर्भ

  • +यश ४२:२४
  • +उत्प १०:९, १०
  • +२इत ३६:७; एज १:७

दानीएल १:३

समासातील संदर्भ

  • +२रा २०:१६, १८

दानीएल १:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलं.”

समासातील संदर्भ

  • +दान १:१७, २०; ५:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९७, पृ. १५

    २/१/१९९३, पृ. ६-७

दानीएल १:५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “त्यांचं तीन वर्षं पोषण करायचं होतं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००५, पृ. १९

    २/१/१९९३, पृ. ६-७

    २/१/१९८९, पृ. २१

दानीएल १:६

तळटीपा

  • *

    म्हणजे, “देव माझा न्यायाधीश आहे.”

  • *

    म्हणजे, “यहोवाने कृपा केली आहे.”

  • *

    कदाचित याचा अर्थ, “देवासारखा कोण आहे?” असा होतो.

  • *

    म्हणजे, “यहोवाने मदत केली आहे.”

समासातील संदर्भ

  • +दान २:४८; ५:१३, २९
  • +दान २:१७, १८

दानीएल १:७

तळटीपा

  • *

    म्हणजे, बॅबिलोनी नावं.

समासातील संदर्भ

  • +दान ४:८; ५:१२
  • +दान २:४९; ३:१२, २८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. २१

दानीएल १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. २१-२२

दानीएल १:९

समासातील संदर्भ

  • +१रा ८:४९, ५०; स्तो १०६:४४, ४६

दानीएल १:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलांपेक्षा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. २०

दानीएल १:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. २०

दानीएल १:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. १८-१९

    ८/१/२००५, पृ. १९-२०

    २/१/१९८९, पृ. २१-२२

दानीएल १:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. २१-२२

दानीएल १:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलांपेक्षा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. १८-१९

दानीएल १:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “मुलं.”

समासातील संदर्भ

  • +दान १:२०; ४:९; ५:११, १२

दानीएल १:१८

समासातील संदर्भ

  • +दान १:५

दानीएल १:१९

समासातील संदर्भ

  • +दान १:३, ६

दानीएल १:२०

समासातील संदर्भ

  • +दान २:२; ४:७; ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. १६

दानीएल १:२१

समासातील संदर्भ

  • +दान ६:२८; १०:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९७, पृ. १५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

दानी. १:१२इत ३६:४; यिर्म २२:१८, १९; ३६:३०
दानी. १:१अनु २८:४९, ५०; २रा २४:१; २इत ३६:५, ६
दानी. १:२यश ४२:२४
दानी. १:२उत्प १०:९, १०
दानी. १:२२इत ३६:७; एज १:७
दानी. १:३२रा २०:१६, १८
दानी. १:४दान १:१७, २०; ५:११, १२
दानी. १:६दान २:४८; ५:१३, २९
दानी. १:६दान २:१७, १८
दानी. १:७दान २:४९; ३:१२, २८
दानी. १:७दान ४:८; ५:१२
दानी. १:९१रा ८:४९, ५०; स्तो १०६:४४, ४६
दानी. १:१७दान १:२०; ४:९; ५:११, १२
दानी. १:१८दान १:५
दानी. १:१९दान १:३, ६
दानी. १:२०दान २:२; ४:७; ५:८
दानी. १:२१दान ६:२८; १०:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
दानीएल १:१-२१

दानीएल

१ यहूदाचा राजा यहोयाकीम+ याच्या शासनकाळाच्या तिसऱ्‍या वर्षी, बाबेलचा* राजा नबुखद्‌नेस्सर याने यरुशलेममध्ये येऊन त्या शहराला वेढा घातला.+ २ काही काळानंतर, यहोवाने* यहूदाचा राजा यहोयाकीम याला त्याच्या हाती दिलं.+ याशिवाय, खऱ्‍या देवाच्या मंदिरातली काही भांडीही देवाने त्याला नेऊ दिली. तो ती भांडी शिनार*+ देशात त्याच्या देवाच्या मंदिरात घेऊन गेला. आणि त्याने ती भांडी त्याच्या देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.+

३ मग राजाने आपला मुख्य राजदरबारी अश्‍पनज याला काही इस्राएली लोकांना, खासकरून त्यांच्यातल्या शाही आणि उच्च घराण्यांतल्या लोकांना घेऊन येण्याची आज्ञा दिली.+ ४ राजाने त्याला असे तरुण* शोधून आणायला सांगितले जे दिसायला देखणे आहेत आणि ज्यांच्यात कोणताही दोष नाही. ते हुशार, ज्ञानी व समजबुद्धी+ असलेले असावेत, आणि ते राजाच्या महालात काम करण्यासाठी योग्य असावेत अशी राजाची अपेक्षा होती. तसंच, अश्‍पनजने त्यांना खास्दी लोकांची भाषा आणि लिपी शिकवावी असंही राजाने त्याला सांगितलं. ५ याशिवाय, राजाला जी पक्वान्‍नं दिली जातात तीच पक्वान्‍नं, आणि राजाला जो द्राक्षारस दिला जातो तोच द्राक्षारस दररोज त्या तरुणांनाही दिला जावा अशी आज्ञा राजाने दिली. त्या तरुणांना तीन वर्षं प्रशिक्षण द्यायचं होतं,* आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेसाठी राजदरबारात आणायचं होतं.

६ त्या तरुणांमध्ये यहूदा वंशातलेही काही तरुण होते. त्यांची नावं अशी: दानीएल,*+ हनन्या,* मीशाएल* आणि अजऱ्‍या.*+ ७ पण मुख्य राजदरबाऱ्‍याने त्यांना वेगळी नावं* दिली. त्याने दानीएलला बेल्टशस्सर,+ हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख आणि अजऱ्‍याला अबेद्‌नगो+ असं नाव दिलं.

८ पण दानीएलने आपल्या मनात पक्का निश्‍चय केला होता, की तो राजाची पक्वान्‍नं खाऊन किंवा राजा पीत असलेला द्राक्षारस पिऊन स्वतःला दूषित करणार नाही. त्यामुळे दूषित करणाऱ्‍या या गोष्टींतून आपल्याला सूट मिळावी, अशी विनंती त्याने मुख्य राजदरबाऱ्‍याला केली. ९ तेव्हा खऱ्‍या देवाने मुख्य राजदरबाऱ्‍याच्या मनात दानीएलविषयी कृपा आणि दया उत्पन्‍न केली.+ १० पण मुख्य राजदरबारी दानीएलला म्हणाला: “मला माझ्या प्रभूची, राजाची भीती वाटते! तुमच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था त्यानेच लावून दिली आहे. जर तुम्ही तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा* अशक्‍त दिसलात तर काय? राजा तुमच्यामुळे माझंच डोकं उडवून टाकेल!” ११ त्यावर ज्या कारभाऱ्‍याला मुख्य राजदरबाऱ्‍याने दानीएल, हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या यांची देखभाल करायला नेमलं होतं, त्या कारभाऱ्‍याला दानीएल म्हणाला: १२ “कृपा करून तुमच्या या सेवकांना फक्‍त शाकाहारी अन्‍न आणि पाणी द्या. अशी दहा दिवस आमची परीक्षा घेऊन बघा. १३ त्यानंतर जे तरुण* राजाच्या पक्वान्‍नांतून खातात त्यांच्याशी आमची तुलना करा, आणि कोण चांगलं दिसतं ते बघा. मग जे काही दिसून येईल त्यावरून आमच्या बाबतीत काय करायचं ते तुम्हीच ठरवा.”

१४ तेव्हा कारभाऱ्‍याने त्यांची विनंती मान्य केली आणि दहा दिवस त्यांची पारख केली. १५ दहा दिवसांनी असं दिसून आलं, की राजाच्या पक्वान्‍नांतून खाणाऱ्‍या तरुणांपेक्षा* हे तरुण सुदृढ असून त्यांचे चेहरे जास्त टवटवीत आहेत. १६ म्हणून मग कारभारी त्यांना पक्वान्‍नं आणि द्राक्षारस देण्याऐवजी शाकाहारी अन्‍न देऊ लागला. १७ आणि खऱ्‍या देवाने या चार तरुणांना* सर्व प्रकारच्या लिखाणांमध्ये बुद्धी, ज्ञान आणि सखोल समज दिली. तसंच, त्याने दानीएलला सर्व प्रकारच्या दृष्टान्तांची आणि स्वप्नांची समज दिली.+

१८ नबुखद्‌नेस्सर राजाने ठरवून दिलेल्या काळाची मुदत संपल्यावर, मुख्य राजदरबारी त्यांना राजासमोर घेऊन आला.+ १९ राजा त्यांच्यासोबत बोलला तेव्हा त्या सगळ्यांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या+ यांच्यासारखा दुसरा कोणीही नसल्याचं त्याला दिसून आलं. मग ते राजासमोर राहून त्याची सेवा करू लागले. २० राजा त्यांना बुद्धीची आणि समजशक्‍तीची गरज असलेल्या कोणत्याही विषयावर प्रश्‍न विचारायचा, तेव्हा त्याला दिसून यायचं की त्याच्या साम्राज्यातल्या सगळ्या जादूगारांपेक्षा+ आणि मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांपेक्षा ते दहा पटीने जास्त हुशार आहेत. २१ दानीएल हा कोरेश+ राजाच्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षापर्यंत तिथेच राहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा