वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ४२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • जेवणाच्या खोल्यांचा विभाग (१-१४)

      • मंदिराच्या चारही बाजूंचं माप घेतलं जातं (१५-२०)

यहेज्केल ४२:१

तळटीपा

  • *

    म्हणजे, पश्‍चिमेकडची इमारत.

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:२
  • +यहे ४२:१३
  • +यहे ४१:१२, १५

यहेज्केल ४२:२

तळटीपा

  • *

    हे “लांब हातांचं” माप आहे. अति. ख१४ पाहा.

यहेज्केल ४२:३

समासातील संदर्भ

  • +यहे ४१:१०

यहेज्केल ४२:४

तळटीपा

  • *

    ग्रीक सेप्टुअजिंट  यानुसार “१०० हात लांब.” हिब्रू लिखाणानुसार: “एक हाताचा रस्ता.” अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे ४२:१०, ११

यहेज्केल ४२:१०

तळटीपा

  • *

    म्हणजे, पश्‍चिमेकडची इमारत.

समासातील संदर्भ

  • +यहे ४१:१२; ४२:१

यहेज्केल ४२:११

समासातील संदर्भ

  • +यहे ४२:४

यहेज्केल ४२:१२

समासातील संदर्भ

  • +यहे ४२:९

यहेज्केल ४२:१३

समासातील संदर्भ

  • +यहे ४२:१
  • +लेवी ६:१४, १६; ७:१, ६; १०:१२, १३; २४:८, ९; गण १८:१०; यहे ४०:४६
  • +लेवी २:३; गण १८:९; नहे १३:५

यहेज्केल ४२:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४०; २९:८, ९; लेवी ८:१३; यहे ४४:१९

यहेज्केल ४२:१५

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:६

यहेज्केल ४२:१६

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

यहेज्केल ४२:२०

समासातील संदर्भ

  • +यहे ४०:५
  • +यहे ४५:१, २
  • +लेवी १०:१०; यहे ४४:२३; २कर ६:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १४९-१५०, १५२, १५६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ४२:१यहे ४०:२
यहे. ४२:१यहे ४२:१३
यहे. ४२:१यहे ४१:१२, १५
यहे. ४२:३यहे ४१:१०
यहे. ४२:४यहे ४२:१०, ११
यहे. ४२:१०यहे ४१:१२; ४२:१
यहे. ४२:११यहे ४२:४
यहे. ४२:१२यहे ४२:९
यहे. ४२:१३यहे ४२:१
यहे. ४२:१३लेवी ६:१४, १६; ७:१, ६; १०:१२, १३; २४:८, ९; गण १८:१०; यहे ४०:४६
यहे. ४२:१३लेवी २:३; गण १८:९; नहे १३:५
यहे. ४२:१४निर्ग २८:४०; २९:८, ९; लेवी ८:१३; यहे ४४:१९
यहे. ४२:१५यहे ४०:६
यहे. ४२:२०यहे ४०:५
यहे. ४२:२०यहे ४५:१, २
यहे. ४२:२०लेवी १०:१०; यहे ४४:२३; २कर ६:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ४२:१-२०

यहेज्केल

४२ मग त्याने मला बाहेरच्या अंगणात उत्तरेकडे आणलं,+ आणि जेवणाच्या खोल्यांच्या इमारती असलेल्या विभागाकडे नेलं. हा विभाग मोकळ्या जागेच्या शेजारी+ आणि त्या जागेला लागून असलेल्या इमारतीच्या* उत्तरेकडे होता.+ २ या विभागाला उत्तरेकडून एक प्रवेश असून, त्या बाजूने विभागाची लांबी १०० हात* होती, आणि त्याची रुंदी ५० हात होती. ३ जेवणाच्या खोल्यांचा हा विभाग, आतल्या अंगणातल्या २० हात रुंद जागेच्या+ आणि फरसबंदी असलेल्या बाहेरच्या अंगणाच्या मधे होता. या विभागात तीन मजल्यांच्या दोन इमारती असून त्यांचे वऱ्‍हांडे समोरासमोर होते. ४ दोन्ही इमारतींच्या मधे एक रस्ता होता;+ तो १० हात रुंद आणि १०० हात लांब* होता, आणि जेवणाच्या खोल्यांचे प्रवेश उत्तरेकडे होते. ५ इमारतींच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोल्या, खालच्या आणि मधल्या मजल्यांवरच्या खोल्यांपेक्षा लहान होत्या. कारण, वरच्या मजल्यावर असलेल्या खोल्यांच्या वऱ्‍हांड्यांनी जास्त जागा व्यापली होती. ६ त्या खोल्या तीन मजल्यांवर होत्या, पण अंगणांत जसे खांब होते तसे त्यांना खांब नव्हते. त्यामुळे, खालच्या आणि मधल्या मजल्यांच्या तुलनेत वरचे मजले कमी जागेत बांधलेले होते.

७ बाहेरच्या अंगणाला लागून असलेल्या जेवणाच्या खोल्यांच्या इमारतीजवळ एक दगडी भिंत होती. ही भिंत, जेवणाच्या खोल्यांच्या दुसऱ्‍या इमारतीसमोर असून तिची लांबी ५० हात होती. ८ कारण, बाहेरच्या अंगणाला लागून असलेल्या इमारतीची लांबी ५० हात होती. पण मंदिराच्या बाजूला असलेल्या इमारतीची लांबी मात्र १०० हात होती. ९ बाहेरच्या अंगणातून या इमारतींकडे येण्यासाठी पूर्वेला एक प्रवेशमार्ग होता.

१० दक्षिणेकडेसुद्धा जेवणाच्या खोल्यांचा एक विभाग होता. त्याच्या पूर्वेला अंगणाची एक दगडी भिंत होती. हा विभाग, मोकळी जागा आणि इमारत* यांच्याजवळ होता.+ ११ उत्तरेकडे असलेल्या जेवणाच्या खोल्यांच्या इमारतींसारखंच, या विभागातल्या इमारतींसमोरही एक रस्ता होता.+ या इमारतींची रचना, त्यांची लांबी, रुंदी आणि त्यांचे बाहेर जाण्याचे मार्ग उत्तरेकडच्या इमारतींसारखेच होते. १२ जेवणाच्या खोल्यांचे प्रवेश दक्षिणेकडच्या जेवणाच्या खोल्यांच्या प्रवेशांसारखेच होते. दोन इमारतींच्या मधे असलेल्या रस्त्याच्या सुरुवातीला आत येण्यासाठी एक प्रवेशमार्ग होता; तो पूर्वेकडच्या दगडी भिंतीजवळ होता.+

१३ मग तो माणूस मला म्हणाला: “मोकळ्या जागांजवळ असलेल्या उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या जेवणाच्या खोल्या पवित्र आहेत.+ तिथे यहोवासमोर येणारे याजक परमपवित्र अर्पणं खातात.+ तिथे ते परमपवित्र अर्पणं, म्हणजे अन्‍नार्पणं, पापार्पणं आणि दोषार्पणं ठेवतात. कारण ती जागा पवित्र आहे.+ १४ पवित्र ठिकाणी सेवा करायला आल्यावर याजक जी वस्त्रं घालतात ती पवित्र असतात. म्हणून ती वस्त्रं घालून त्यांनी बाहेरच्या अंगणात जाऊ नये.+ लोकांसाठी असलेल्या भागांत जाण्याआधी याजकांनी आपली सेवेची वस्त्रं काढून ठेवावीत आणि दुसरी वस्त्रं घालावीत.”

१५ मग, मंदिराच्या आतल्या भागाचं मोजमाप घेतल्यावर त्याने मला पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीतून बाहेर आणलं,+ आणि त्याने त्या संपूर्ण जागेचं मोजमाप घेतलं.

१६ त्याने मोजमापाची काठी* घेऊन त्या जागेच्या पूर्वेकडच्या बाजूचं माप घेतलं. मोजमापाच्या काठीनुसार एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत ते ५०० काठी होतं.

१७ त्याने उत्तरेकडची बाजू मोजली, ती ५०० काठी होती.

१८ त्याने दक्षिणेकडची बाजू मोजली, ती ५०० काठी होती.

१९ मग तो पश्‍चिम बाजूला गेला आणि त्याने ती बाजूही मोजली. तीसुद्धा ५०० काठीच होती.

२० त्याने चारही बाजूंचं माप घेतलं. त्या जागेला सभोवती एक भिंत होती;+ ती सगळ्या बाजूंनी ५०० काठी लांब होती.+ ही भिंत, पवित्र जागा आणि वापरायला असलेली सामान्य जागा यांना वेगळं करायची.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा