वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • यरुशलेमला वेढा पडेल हे चित्र काढून दाखवलं जातं (१-१७)

        • ३९० दिवस आणि ४० दिवस पापांचा दोष वाहणं (४-७)

यहेज्केल ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ६३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १२

यहेज्केल ४:२

समासातील संदर्भ

  • +२रा २४:११; यिर्म ३९:१
  • +२रा २५:१
  • +यिर्म ६:६; ३२:२४
  • +यहे २१:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ६३

यहेज्केल ४:३

समासातील संदर्भ

  • +यहे १२:६; २४:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ६३

यहेज्केल ४:४

समासातील संदर्भ

  • +२रा १७:२१

यहेज्केल ४:५

समासातील संदर्भ

  • +गण १४:३४; १रा १२:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ६६-६७

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १२

यहेज्केल ४:६

समासातील संदर्भ

  • +२रा २३:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    शुद्ध उपासना, पृ. ६६-६७

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १२

यहेज्केल ४:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५२:४

यहेज्केल ४:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे ४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ६३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १२

यहेज्केल ४:१०

तळटीपा

  • *

    सुमारे २३० ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १२

यहेज्केल ४:११

तळटीपा

  • *

    सुमारे ६०० मि.ली. अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १२

यहेज्केल ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १२

यहेज्केल ४:१३

समासातील संदर्भ

  • +होशे ९:३

यहेज्केल ४:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:३१; लेवी ७:२४; ११:४०
  • +अनु १४:३; यश ६५:४; ६६:१७

यहेज्केल ४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९४, पृ. १३

यहेज्केल ४:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “भाकरींची प्रत्येक सळई मोडतोय.” हे कदाचित भाकरी अडकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या सळयांना सूचित करत असावं.

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२६; यश ३:१; यहे ५:१६
  • +२रा २५:३; यिर्म ३७:२१; विल १:११; ४:९; ५:९, १०
  • +यहे १२:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ६३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ४:२२रा २४:११; यिर्म ३९:१
यहे. ४:२२रा २५:१
यहे. ४:२यिर्म ६:६; ३२:२४
यहे. ४:२यहे २१:२२
यहे. ४:३यहे १२:६; २४:२४
यहे. ४:४२रा १७:२१
यहे. ४:५गण १४:३४; १रा १२:१९, २०
यहे. ४:६२रा २३:२७
यहे. ४:७यिर्म ५२:४
यहे. ४:९यहे ४:५
यहे. ४:१३होशे ९:३
यहे. ४:१४निर्ग २२:३१; लेवी ७:२४; ११:४०
यहे. ४:१४अनु १४:३; यश ६५:४; ६६:१७
यहे. ४:१६लेवी २६:२६; यश ३:१; यहे ५:१६
यहे. ४:१६२रा २५:३; यिर्म ३७:२१; विल १:११; ४:९; ५:९, १०
यहे. ४:१६यहे १२:१८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ४:१-१७

यहेज्केल

४ आता हे मनुष्याच्या मुला! तू एक वीट घे आणि ती आपल्या समोर ठेव. मग त्या विटेवर यरुशलेम शहराचं चित्र काढ. २ नंतर तिला वेढा घाल.+ तिच्याभोवती भिंत उभार+ आणि दगडमातीचा ढिगारा रच.+ तिच्या आजूबाजूला युद्धाचे तळ ठोक आणि चारही बाजूंनी तट पाडणारी यंत्रं ठेव.+ ३ मग एक लोखंडी तवा घे आणि तो तुझ्या आणि त्या विटेच्या मधे लोखंडी भिंत म्हणून उभा कर. आणि तिच्याकडे आपलं तोंड कर. असं करून हे दाखवून दे की शहराला कसा वेढा पडेल. इस्राएलच्या घराण्यासाठी हे एक चिन्ह असेल.+

४ मग तू आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलच्या घराण्याच्या अपराधांचा दोष स्वतःवर घे.+ तू जितके दिवस त्या कुशीवर पडून राहशील, तितके दिवस तू त्यांच्या दोषाचा भार वाहशील. ५ इस्राएलच्या घराण्याने जितकी वर्षं माझ्याविरुद्ध पापं केली, तितके दिवस मी तुझ्यासाठी नेमले आहेत. तू ३९० दिवस इस्राएलच्या घराण्याच्या पापांचा दोष वाहशील.+ ६ ते दिवस तू पूर्ण कर.

त्यानंतर आपल्या उजव्या कुशीवर पडून राहा, आणि ४० दिवस यहूदाच्या घराण्याचा दोष वाहा.+ बघ, प्रत्येक वर्षासाठी एक दिवस, या हिशोबाने मी तुला दिवस नेमून दिलेत. ७ मग आपल्या हाताच्या बाह्‍या वर कर आणि यरुशलेमला पडलेल्या वेढ्याकडे बघून+ त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर.

८ पाहा! मी तुला दोरांनी बांधतोय. त्यामुळे वेढा पडल्याचे दिवस संपत नाहीत, तोपर्यंत तुला एका कुशीवरून दुसऱ्‍या कुशीवर होता येणार नाही.

९ तू गहू, जव, पावटा, मसूर, बाजरी आणि खपली गहू* एका भांड्यात घे आणि त्यांपासून स्वतःसाठी भाकरी तयार कर. कारण तू जितके दिवस एका कुशीवर पडून राहशील तितके दिवस, म्हणजे ३९० दिवस तू त्यांपासून बनवलेल्या भाकरी खाशील.+ १० तू दररोज २० शेकेल* भाकरी मोजून घे आणि त्या ठरलेल्या वेळी खा.

११ तू पाणीही मोजून पी; म्हणजे एक हिनचा सहावा भाग* मोजून घे. आणि ठरलेल्या वेळी ते पी.

१२ जवाची भाकर बनवतात तशी तू ती भाकर बनव, आणि लोकांसमोर माणसाच्या सुकलेल्या विष्ठेवर ती भाजून खा.” १३ यहोवा पुढे म्हणाला: “मी इस्राएली लोकांची ज्या राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन, तिथे ते अशाच प्रकारे अशुद्ध भाकरी खातील.”+

१४ तेव्हा मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! मी हे कसं करू शकतो! मी तर तरुणपणापासून आजपर्यंत कधीच अशुद्ध झालो नाही. मी मरून पडलेल्या प्राण्याचं, किंवा जंगली जनावराने फाडलेल्या प्राण्याचं मांस कधी खाल्लं नाही;+ माझ्या तोंडाने तर अशुद्ध मांसाला स्पर्शही केलेला नाही.”+

१५ त्यावर तो मला म्हणाला: “ठीक आहे. मी तुला माणसाच्या विष्ठेऐवजी शेण वापरायची परवानगी देतो. त्यावर तू आपली भाकर भाजून खा.” १६ पुढे तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, मी यरुशलेममधला अन्‍नपुरवठा बंद करतोय.*+ तिथले लोक चिंतेने ग्रासून जातील आणि आपली भाकर मोजून खातील.+ ते भयभीत होतील आणि पाणीसुद्धा मापून पितील.+ १७ त्यांना अन्‍न-पाण्याचा तुटवडा पडावा, त्यांनी घाबरून एकमेकांकडे बघावं आणि आपल्या अपराधांमुळे कमजोर होऊन मरून जावं म्हणून हे सगळं घडेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा