वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ३७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • वाळून गेलेल्या हाडांच्या खोऱ्‍याचा दृष्टान्त (१-१४)

      • दोन काठ्या जोडून एक केल्या जातील (१५-२८)

        • एकच राष्ट्र आणि त्यावर एकच राजा (२२)

        • कायम टिकणारा शांतीचा करार (२६)

यहेज्केल ३७:१

तळटीपा

  • *

    किंवा “यहोवाचा हात माझ्यावर होता.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रक २१:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११३, ११८

यहेज्केल ३७:२

समासातील संदर्भ

  • +यहे ३७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११३, ११४-११५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. २९-३०

यहेज्केल ३७:३

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:३९; १शमु २:६

यहेज्केल ३७:५

समासातील संदर्भ

  • +उत्प २:७; यहे ३७:१४

यहेज्केल ३७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११५-११६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. २९-३१

यहेज्केल ३७:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११५-११६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. २९-३१

यहेज्केल ३७:९

तळटीपा

  • *

    किंवा “हे श्‍वासा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११४-११५

यहेज्केल ३७:१०

समासातील संदर्भ

  • +प्रक ११:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११६-११९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. २९-३१

यहेज्केल ३७:११

समासातील संदर्भ

  • +यहे ३६:१०
  • +यश ४९:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११३-११४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. २९-३०

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २४

यहेज्केल ३७:१२

समासातील संदर्भ

  • +यश ६६:१४
  • +यहे ११:१७; आम ९:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २४

यहेज्केल ३७:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो १२६:२

यहेज्केल ३७:१४

समासातील संदर्भ

  • +यश ३२:१४, १५; यहे ३६:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ११७-११९

यहेज्केल ३७:१६

समासातील संदर्भ

  • +२इत १५:९; ३०:११
  • +१रा ११:३१; १२:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२२, पृ. २२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. १४

    शुद्ध उपासना, पृ. १३०-१३१, २४०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१६, पृ. ३१-३२

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २५

यहेज्केल ३७:१७

समासातील संदर्भ

  • +यश ११:१३; यिर्म ३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२२, पृ. २२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. १४

    शुद्ध उपासना, पृ. १३०-१३१, २४०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१६, पृ. ३१-३२

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २५

यहेज्केल ३७:१९

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:४; जख १०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १३४

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २५

यहेज्केल ३७:२१

समासातील संदर्भ

  • +अनु ३०:३; यश ११:१२; यिर्म १६:१४, १५; आम ९:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १३०, १३२

यहेज्केल ३७:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३:१८; होशे १:११
  • +उत्प ४९:१०; स्तो २:६; यश ९:६; यिर्म २३:५; लूक १:३२
  • +यहे ३७:१९; जख १०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८९, १३०

यहेज्केल ३७:२३

तळटीपा

  • *

    इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

समासातील संदर्भ

  • +यश २:१८; यहे ११:१८; होशे १४:८; जख १३:२
  • +यिर्म ३१:३३; यहे ३६:२८

यहेज्केल ३७:२४

समासातील संदर्भ

  • +यिर्म २३:५; ३०:९; होशे ३:५; लूक १:३२
  • +योह १०:१६; १पेत्र ५:४
  • +अनु ३०:८-१०; यिर्म ३२:३९; यहे ३६:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८९, १३३-१३४, २१४-२१५

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. २५

यहेज्केल ३७:२५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३०:३
  • +योए ३:२०
  • +यश ६०:२१; आम ९:१५
  • +यहे ३४:२४; लूक १:३२

यहेज्केल ३७:२६

समासातील संदर्भ

  • +यहे ३४:२५
  • +यिर्म ३०:१९; जख ८:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १३४

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. २७-२८

    १/१/१९९२, पृ. २१-२२

यहेज्केल ३७:२७

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांच्यावर.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१२; यहे ११:१९, २०; ४३:७; होशे २:२३; प्रक २१:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १३४

यहेज्केल ३७:२८

समासातील संदर्भ

  • +यहे ३६:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १३५-१३६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९२, पृ. २१-२२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ३७:१प्रक २१:१०
यहे. ३७:२यहे ३७:११
यहे. ३७:३अनु ३२:३९; १शमु २:६
यहे. ३७:५उत्प २:७; यहे ३७:१४
यहे. ३७:१०प्रक ११:११
यहे. ३७:११यहे ३६:१०
यहे. ३७:११यश ४९:१४
यहे. ३७:१२यश ६६:१४
यहे. ३७:१२यहे ११:१७; आम ९:१४
यहे. ३७:१३स्तो १२६:२
यहे. ३७:१४यश ३२:१४, १५; यहे ३६:२७
यहे. ३७:१६२इत १५:९; ३०:११
यहे. ३७:१६१रा ११:३१; १२:२०
यहे. ३७:१७यश ११:१३; यिर्म ३:१८
यहे. ३७:१९यिर्म ५०:४; जख १०:६
यहे. ३७:२१अनु ३०:३; यश ११:१२; यिर्म १६:१४, १५; आम ९:१४
यहे. ३७:२२यिर्म ३:१८; होशे १:११
यहे. ३७:२२उत्प ४९:१०; स्तो २:६; यश ९:६; यिर्म २३:५; लूक १:३२
यहे. ३७:२२यहे ३७:१९; जख १०:६
यहे. ३७:२३यश २:१८; यहे ११:१८; होशे १४:८; जख १३:२
यहे. ३७:२३यिर्म ३१:३३; यहे ३६:२८
यहे. ३७:२४यिर्म २३:५; ३०:९; होशे ३:५; लूक १:३२
यहे. ३७:२४योह १०:१६; १पेत्र ५:४
यहे. ३७:२४अनु ३०:८-१०; यिर्म ३२:३९; यहे ३६:२७
यहे. ३७:२५यिर्म ३०:३
यहे. ३७:२५योए ३:२०
यहे. ३७:२५यश ६०:२१; आम ९:१५
यहे. ३७:२५यहे ३४:२४; लूक १:३२
यहे. ३७:२६यहे ३४:२५
यहे. ३७:२६यिर्म ३०:१९; जख ८:५
यहे. ३७:२७लेवी २६:१२; यहे ११:१९, २०; ४३:७; होशे २:२३; प्रक २१:३
यहे. ३७:२८यहे ३६:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ३७:१-२८

यहेज्केल

३७ मग यहोवाची शक्‍ती माझ्यावर कार्य करू लागली.* यहोवाने आपल्या पवित्र शक्‍तीने* मला खोऱ्‍याच्या मधोमध आणलं.+ ते खोरं पूर्णपणे हाडांनी भरलेलं होतं. २ मग त्याने मला त्या हाडांमधून सगळीकडे फिरायला लावलं. तेव्हा मी पाहिलं, की खोऱ्‍यात सगळीकडे हाडंच-हाडं पसरली आहेत आणि ती खडखडीत वाळून गेली आहेत.+ ३ त्याने मला विचारलं: “मनुष्याच्या मुला, ही हाडं पुन्हा जिवंत होऊ शकतात का?” त्यावर मी म्हणालो: “सर्वोच्च प्रभू यहोवा, हे तूच सांगू शकतोस.”+ ४ तेव्हा तो मला म्हणाला: “या हाडांबद्दल भविष्यवाणी कर आणि त्यांना असं म्हण, ‘सुकून गेलेल्या हाडांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका:

५ सर्वोच्च प्रभू यहोवा या हाडांना असं म्हणतो: “मी तुमच्यात श्‍वास फुंकीन आणि तुम्ही परत जिवंत व्हाल.+ ६ मी तुमच्यावर स्नायू, मांस आणि त्वचा चढवीन. मी तुमच्यात श्‍वास फुंकीन आणि तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजेल की मी यहोवा आहे.”’”

७ म्हणून, मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. भविष्यवाणी करताच मला हाडांच्या खडखडण्याचा आवाज आला. आणि ती हाडं एकमेकांना जुळू लागली. ८ मी पाहिलं की त्यांच्यावर स्नायू, मांस आणि त्वचा चढत आहे. पण त्यांच्यात अजूनही श्‍वास नव्हता.

९ मग तो मला म्हणाला: “वाऱ्‍याला भविष्यवाणी कर. मनुष्याच्या मुला, भविष्यवाणी करून वाऱ्‍याला सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “हे वाऱ्‍या!* चारही दिशांनी ये, आणि कत्तल झालेल्या या लोकांवर वाहा; म्हणजे ते जिवंत होतील.”’”

१० म्हणून, त्याने मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. तेव्हा त्यांच्यामध्ये श्‍वास आला आणि ते जिवंत होऊन आपल्या पायांवर उभे राहू लागले.+ पाहता-पाहता एक अतिशय मोठं सैन्य तयार झालं.

११ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, ही हाडं म्हणजे इस्राएलचं संपूर्ण घराणं.+ बघ, ते असं म्हणत आहेत, ‘आपली हाडं वाळून गेली आहेत. आपल्याला काहीच आशा नाही.+ आपला पूर्णपणे नाश झालाय.’ १२ म्हणून तू भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो, “मी तुमच्या कबरी उघडीन.+ माझ्या लोकांनो! मी तुम्हाला तुमच्या कबरींतून बाहेर काढीन आणि तुम्हाला इस्राएल देशात परत आणीन.+ १३ माझ्या लोकांनो! मी जेव्हा तुमच्या कबरी उघडून तुम्हाला बाहेर काढीन, तेव्हा तुम्हाला कळेल की मी यहोवा आहे.”’+ १४ ‘मी तुमच्यात माझी पवित्र शक्‍ती घालीन आणि तुम्ही जिवंत व्हाल.+ मी तुम्हाला तुमच्या देशात वसवीन. मग तुम्हाला समजेल, की मी यहोवा स्वतः हे बोललोय आणि मी ते पूर्णही केलंय,’ असं यहोवा म्हणतो.”

१५ मग परत एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १६ “मनुष्याच्या मुला, दोन काठ्या घे. एका काठीवर, ‘यहूदासाठी आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्राएलच्या लोकांसाठी,’ असं लिही.+ आणि दुसऱ्‍या काठीवर, ‘योसेफसाठी आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्राएलच्या घराण्यासाठी एफ्राईमची काठी,’ असं लिही.+ १७ मग त्या दोन्ही काठ्या एकत्र जोडून धर, म्हणजे तुझ्या हातात त्यांची एकच काठी होईल.+ १८ तुझे लोक जेव्हा तुला विचारतील, ‘या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ होतो हे आम्हाला सांगशील का?’ १९ तेव्हा त्यांना म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मी एफ्राईमच्या हातात असलेल्या योसेफच्या काठीला आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्राएलच्या वंशांना घेऊन यहूदाच्या काठीला जोडीन. मी त्यांना एक काठी करीन,+ आणि ते माझ्या हातात एक होतील.”’ २० तू ज्या काठ्यांवर लिहिशील त्या आपल्या हातात धर, म्हणजे लोकांना त्या दिसतील.

२१ मग त्यांना असं सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “ज्या सर्व राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक गेले आहेत, तिथून मी त्यांना काढून आणीन. मी त्यांना चारही दिशांहून गोळा करीन आणि परत त्यांच्या देशात घेऊन येईन.+ २२ मी देशात, इस्राएलच्या डोंगरांवर त्यांचं एक राष्ट्र बनवीन.+ त्या सगळ्यांवर एकच राजा राज्य करेल.+ आणि त्यापुढे ते दोन वेगळी राष्ट्रं किंवा विभाजित झालेली दोन राज्यं म्हणून राहणार नाहीत.+ २३ परत कधीच ते आपल्या घृणास्पद मूर्तींनी,* आपल्या किळसवाण्या रितीरिवाजांनी आणि आपल्या सगळ्या अपराधांनी स्वतःला अशुद्ध करणार नाहीत.+ त्यांनी माझ्याशी अविश्‍वासूपणे वागून जी सगळी पापं केली, ती सोडून द्यायला मी त्यांना मदत करीन आणि त्यांना शुद्ध करीन. ते माझे लोक होतील आणि मी स्वतः त्यांचा देव होईन.+

२४ माझा सेवक दावीद त्यांचा राजा बनेल,+ आणि त्या सगळ्यांचा एकच मेंढपाळ असेल.+ ते माझ्या न्याय-निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझ्या कायद्यांचं काळजीपूर्वक पालन करतील.+ २५ मी माझा सेवक याकोब याला जो देश दिला होता आणि तुमचे पूर्वज जिथे राहिले होते,+ त्या देशात ते कायम राहतील;+ ते, त्यांची मुलं आणि त्यांच्या मुलांची मुलं कायम त्या देशात वस्ती करतील.+ आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा प्रधान असेल.+

२६ मी त्यांच्यासोबत शांतीचा एक करार करीन;+ तो करार कायम टिकणारा असेल. मी त्यांना देशात वसवीन आणि त्यांची संख्या वाढवीन.+ आणि मी त्यांच्यामध्ये सर्वकाळासाठी माझं मंदिर स्थापन करीन. २७ माझा तंबू त्यांच्यामध्ये* असेल. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.+ २८ माझं मंदिर जेव्हा कायम त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सगळ्या राष्ट्रांना कळून येईल की इस्राएलला पवित्र करणारा मी यहोवा आहे.”’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा