वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ३०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी (१-१९)

        • नबुखद्‌नेस्सर हल्ला करेल याविषयी भविष्यवाणी (१०)

      • फारोची ताकद मोडली जाते (२०-२६)

यहेज्केल ३०:३

समासातील संदर्भ

  • +ओब १५
  • +यहे ३२:७
  • +स्तो ११०:६

यहेज्केल ३०:४

समासातील संदर्भ

  • +यहे ३२:११, १२

यहेज्केल ३०:५

तळटीपा

  • *

    हे कदाचित, इजिप्तसोबत हातमिळवणी केलेल्या इस्राएली लोकांना सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +सफ २:१२
  • +नहू ३:८, ९

यहेज्केल ३०:६

समासातील संदर्भ

  • +यहे ३०:१८
  • +यिर्म ४४:१
  • +यहे २९:१०

यहेज्केल ३०:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४६:१९; यहे २९:१२; ३२:१८

यहेज्केल ३०:१०

समासातील संदर्भ

  • +यहे २९:१९; ३२:११

यहेज्केल ३०:११

समासातील संदर्भ

  • +हब १:६
  • +यहे २९:५

यहेज्केल ३०:१२

समासातील संदर्भ

  • +यहे २९:३
  • +यहे ३१:१२

यहेज्केल ३०:१३

तळटीपा

  • *

    किंवा “मेम्फिस.”

  • *

    इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४३:१२; ४६:१४
  • +यिर्म ४६:५

यहेज्केल ३०:१४

तळटीपा

  • *

    म्हणजे, थीब्ज.

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:१३, १४; यिर्म ४४:१
  • +यिर्म ४६:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००३, पृ. ३२

यहेज्केल ३०:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००३, पृ. ३२

यहेज्केल ३०:१६

तळटीपा

  • *

    किंवा “मेम्फिस.”

यहेज्केल ३०:१७

तळटीपा

  • *

    म्हणजे, हिलियोपोलीस.

यहेज्केल ३०:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यहे ३०:८
  • +यिर्म ४६:२०; यहे ३१:१८
  • +यिर्म ४६:१९

यहेज्केल ३०:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४६:२५; यहे २९:३
  • +२रा २४:७; यिर्म ४६:२
  • +यिर्म ४६:२१

यहेज्केल ३०:२३

समासातील संदर्भ

  • +यहे २९:१२

यहेज्केल ३०:२४

तळटीपा

  • *

    म्हणजे, बाबेलच्या राजासमोर.

समासातील संदर्भ

  • +यिर्म २७:६
  • +यहे ३२:११, १२

यहेज्केल ३०:२५

समासातील संदर्भ

  • +यहे २९:१९, २०

यहेज्केल ३०:२६

समासातील संदर्भ

  • +यहे २९:१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ३०:३ओब १५
यहे. ३०:३यहे ३२:७
यहे. ३०:३स्तो ११०:६
यहे. ३०:४यहे ३२:११, १२
यहे. ३०:५सफ २:१२
यहे. ३०:५नहू ३:८, ९
यहे. ३०:६यहे ३०:१८
यहे. ३०:६यिर्म ४४:१
यहे. ३०:६यहे २९:१०
यहे. ३०:७यिर्म ४६:१९; यहे २९:१२; ३२:१८
यहे. ३०:१०यहे २९:१९; ३२:११
यहे. ३०:११हब १:६
यहे. ३०:११यहे २९:५
यहे. ३०:१२यहे २९:३
यहे. ३०:१२यहे ३१:१२
यहे. ३०:१३यिर्म ४३:१२; ४६:१४
यहे. ३०:१३यिर्म ४६:५
यहे. ३०:१४उत्प १०:१३, १४; यिर्म ४४:१
यहे. ३०:१४यिर्म ४६:२५
यहे. ३०:१८यहे ३०:८
यहे. ३०:१८यिर्म ४६:२०; यहे ३१:१८
यहे. ३०:१८यिर्म ४६:१९
यहे. ३०:२२यिर्म ४६:२५; यहे २९:३
यहे. ३०:२२२रा २४:७; यिर्म ४६:२
यहे. ३०:२२यिर्म ४६:२१
यहे. ३०:२३यहे २९:१२
यहे. ३०:२४यिर्म २७:६
यहे. ३०:२४यहे ३२:११, १२
यहे. ३०:२५यहे २९:१९, २०
यहे. ३०:२६यहे २९:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ३०:१-२६

यहेज्केल

३० मग यहोवाकडून मला पुन्हा संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो:

“आक्रोश करा आणि म्हणा, ‘हायहाय! तो दिवस जवळ आलाय!’

 ३ कारण यहोवाचा दिवस जवळ आलाय. हो! तो दिवस जवळ आलाय.+

तो काळ्याकुट्ट ढगांचा दिवस,+ राष्ट्रांचा न्याय करायचा दिवस असेल.+

 ४ इजिप्तच्या विरोधात एक तलवार येईल,

तिथे माणसांची प्रेतं पडतील तेव्हा इथियोपियाचा थरकाप उडेल.

त्याची धनदौलत लुटली गेली आहे आणि त्याचा पाया मोडून टाकण्यात आलाय.+

 ५ इथियोपिया,+ पूट+ आणि लूद इथले लोक, तसंच वेगवेगळ्या राष्ट्रांतले लोक तलवारीला बळी पडतील.

याशिवाय, कूबचे लोक आणि ज्यांच्यासोबत करार करण्यात आलाय त्या देशाचे लोक,*

हे सगळे तलवारीला बळी पडतील.”’

 ६ यहोवा म्हणतो:

‘इजिप्तला मदत करणारे लोकसुद्धा मारले जातील.

आणि इजिप्तच्या ताकदीची घमेंड उतरवली जाईल.’+

सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘देशात मिग्दोलपासून+ सवेनपर्यंत+ सगळे लोक तलवारीने मरून पडतील. ७ ओसाड पडलेल्या इतर देशांपेक्षा इजिप्त सगळ्यात जास्त ओसाड पडेल. आणि उद्ध्‌वस्त झालेल्या शहरांच्या तुलनेत, त्याची शहरं सर्वात जास्त उद्ध्‌वस्त होतील.+ ८ मी इजिप्तला आग लावीन आणि त्याला मदत करणारे सगळे भस्म होतील, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे. ९ त्या दिवशी, स्वतःवर भरवसा असणाऱ्‍या इथियोपियाकडे मी जहाजांतून आपले दूत पाठवीन, तेव्हा त्याचा थरकाप उडेल. इजिप्तवर येणाऱ्‍या दिवसामुळे तिथले लोक भयंकर घाबरतील, कारण तो दिवस नक्की येईल.’

१० सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हातून मी इजिप्तमधल्या लोकांच्या जमावाचा नाश करून टाकीन.+ ११ तो आणि त्याचे सैनिक राष्ट्रांमध्ये सगळ्यात क्रूर आहेत.+ देशाचा नाश करायला त्यांना आणलं जाईल. ते इजिप्तवर आपली तलवार चालवतील आणि देशात सगळीकडे लोकांची प्रेतं पडतील.+ १२ मी नाईलचे+ सगळे कालवे कोरडे खडखडीत करीन आणि देश दुष्ट लोकांना विकून टाकीन. मी विदेश्‍यांच्या हातून तो देश आणि त्यातलं सगळं काही उद्ध्‌वस्त करून टाकीन.+ मी यहोवा, स्वतः हे बोललोय.’

१३ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी नोफ* शहरातल्या घृणास्पद मूर्तींचा* नाश करून टाकीन आणि तिथल्या निरर्थक दैवतांचाही अंत करीन.+ त्यानंतर इजिप्तमधला एकही माणूस अधिकारी होणार नाही. मी संपूर्ण इजिप्त देशात दहशत पसरवीन.+ १४ मी पथ्रोसला+ ओसाड करीन, सोअनला आग लावीन आणि नो*+ शहरालाही शिक्षा करीन. १५ मी इजिप्तच्या मजबूत गडावर, सीनवर आपल्या क्रोधाचा प्याला ओतीन आणि नो इथल्या लोकांचा नाश करून टाकीन. १६ मी इजिप्तला आग लावीन; आणि सीनचा भीतीने थरकाप उडेल. नो काबीज केलं जाईल आणि नोफ* शहरावर भरदिवसा हल्ला होईल. १७ ओन* आणि पीबेसेथ इथली तरुण माणसं तलवारीला बळी पडतील आणि तिथल्या लोकांना बंदिवासात नेलं जाईल. १८ मी इजिप्तचं जू* मोडीन, तेव्हा तहपन्हेस शहरात भरदिवसा अंधार पडेल.+ तिच्या शक्‍तीची घमेंड कायमची उतरेल,+ काळे ढग तिला झाकून टाकतील आणि तिच्या नगरातले लोक बंदिवासात जातील.+ १९ मी इजिप्तला शिक्षा करीन, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.’”

२० मग ११ व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, मला यहोवाकडून एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २१ “मनुष्याच्या मुला, मी इजिप्तचा राजा फारो याचा हात मोडलाय. तो हात बरा व्हावा म्हणून बांधला जाणार नाही किंवा तलवार धरण्याइतकी ताकद यावी, म्हणून त्याची मलमपट्टीही केली जाणार नाही.”

२२ “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘पाहा! मी इजिप्तचा राजा फारो याच्या विरोधात उठलोय.+ मी त्याचा चांगला आणि मोडलेला, असे दोन्ही हात तोडून टाकीन.+ तेव्हा त्याच्या हातातली तलवार गळून पडेल.+ २३ मग मी इजिप्तच्या सगळ्या लोकांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन आणि वेगवेगळ्या देशांत त्यांना विखरून टाकीन.+ २४ मी बाबेलच्या राजाचे हात मजबूत करीन+ आणि माझी तलवार त्याच्या हाती देईन.+ मी फारोचे हात तोडून टाकीन, तेव्हा तो एखाद्या मरत असलेल्या माणसासारखं त्याच्यासमोर* मोठमोठ्याने कण्हत राहील. २५ मी बाबेलच्या राजाचे हात मजबूत करीन, पण फारोचे हात मात्र गळून जातील. मी माझी तलवार जेव्हा बाबेलच्या राजाच्या हाती देईन आणि तो ती इजिप्तवर चालवेल, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.+ २६ मी इजिप्तच्या लोकांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन आणि वेगवेगळ्या देशांत त्यांना विखरून टाकीन.+ तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा