वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल २७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • सोरच्या बुडत्या जहाजासाठी एक शोकगीत (१-३६)

यहेज्केल २७:२

समासातील संदर्भ

  • +यहे २६:१७

यहेज्केल २७:३

समासातील संदर्भ

  • +यश २३:९; यहे २८:२, १२

यहेज्केल २७:५

समासातील संदर्भ

  • +अनु ३:८, ९; १इत ५:२३

यहेज्केल २७:६

तळटीपा

  • *

    एक प्रकारचा मोठा वृक्ष. इंग्रजीत या वृक्षांना “ओक”  म्हणतात.

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:२, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९०, पृ. २९

यहेज्केल २७:७

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:२, ४

यहेज्केल २७:८

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:१५, १८
  • +१रा ९:२७

यहेज्केल २७:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “वयस्कर माणसं.”

समासातील संदर्भ

  • +यहो १३:२, ५
  • +यहे २७:२७

यहेज्केल २७:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:६; यिर्म ४६:९

यहेज्केल २७:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:२, ४; योन १:३
  • +२इत ९:२१
  • +यिर्म १०:९

यहेज्केल २७:१३

समासातील संदर्भ

  • +यश ६६:१९
  • +उत्प १०:२
  • +योए ३:६

यहेज्केल २७:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:२, ३; यहे ३८:६

यहेज्केल २७:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:७
  • +१रा १०:२२

यहेज्केल २७:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:११
  • +शास ११:१२, ३३
  • +यिर्म ८:२२
  • +१रा ५:९; एज ३:७; प्रेका १२:२०

यहेज्केल २७:१८

तळटीपा

  • *

    किंवा “आणि राखाडी-लालसर रंगाची लोकर.”

समासातील संदर्भ

  • +यश ७:८

यहेज्केल २७:१९

तळटीपा

  • *

    एक प्रकारचं दालचिनीचं झाड किंवा त्यापासून मिळणारी वस्तू.

  • *

    एक सुगंधी वनस्पती.

यहेज्केल २७:२०

तळटीपा

  • *

    किंवा “विणलेल्या कापडाच्या वस्त्रांचा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:३

यहेज्केल २७:२१

समासातील संदर्भ

  • +२इत १७:११; यश ६०:७
  • +उत्प २५:१३

यहेज्केल २७:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प १०:७
  • +१रा १०:१, २; यश ६०:६

यहेज्केल २७:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:३१
  • +२रा १९:१२; आम १:५
  • +उत्प २५:३; ईयो ६:१९
  • +उत्प १०:२२

यहेज्केल २७:२५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “आणि वैभवशाली.”

समासातील संदर्भ

  • +१रा १०:२२; यश २३:१४

यहेज्केल २७:२७

समासातील संदर्भ

  • +यहे २७:८, ९
  • +यहे २७:१०, ११
  • +यहे २६:१४

यहेज्केल २७:३०

समासातील संदर्भ

  • +यश २३:१; यहे २६:१७

यहेज्केल २७:३२

समासातील संदर्भ

  • +यहे २६:५

यहेज्केल २७:३३

समासातील संदर्भ

  • +यहे २७:१४, १६
  • +जख ९:३

यहेज्केल २७:३४

समासातील संदर्भ

  • +यहे २६:१९
  • +यहे २७:२७

यहेज्केल २७:३५

समासातील संदर्भ

  • +यहे २६:१५
  • +यहे २८:१७

यहेज्केल २७:३६

तळटीपा

  • *

    हे कदाचित, चकित होऊन किंवा थट्टेने शिट्टी वाजवण्याला सूचित करतं असं दिसतं.

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:१०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. २७:२यहे २६:१७
यहे. २७:३यश २३:९; यहे २८:२, १२
यहे. २७:५अनु ३:८, ९; १इत ५:२३
यहे. २७:६उत्प १०:२, ४
यहे. २७:७उत्प १०:२, ४
यहे. २७:८उत्प १०:१५, १८
यहे. २७:८१रा ९:२७
यहे. २७:९यहो १३:२, ५
यहे. २७:९यहे २७:२७
यहे. २७:१०उत्प १०:६; यिर्म ४६:९
यहे. २७:१२उत्प १०:२, ४; योन १:३
यहे. २७:१२२इत ९:२१
यहे. २७:१२यिर्म १०:९
यहे. २७:१३यश ६६:१९
यहे. २७:१३उत्प १०:२
यहे. २७:१३योए ३:६
यहे. २७:१४उत्प १०:२, ३; यहे ३८:६
यहे. २७:१५उत्प १०:७
यहे. २७:१५१रा १०:२२
यहे. २७:१७उत्प ४३:११
यहे. २७:१७शास ११:१२, ३३
यहे. २७:१७यिर्म ८:२२
यहे. २७:१७१रा ५:९; एज ३:७; प्रेका १२:२०
यहे. २७:१८यश ७:८
यहे. २७:२०उत्प २५:३
यहे. २७:२१२इत १७:११; यश ६०:७
यहे. २७:२१उत्प २५:१३
यहे. २७:२२उत्प १०:७
यहे. २७:२२१रा १०:१, २; यश ६०:६
यहे. २७:२३उत्प ११:३१
यहे. २७:२३२रा १९:१२; आम १:५
यहे. २७:२३उत्प २५:३; ईयो ६:१९
यहे. २७:२३उत्प १०:२२
यहे. २७:२५१रा १०:२२; यश २३:१४
यहे. २७:२७यहे २७:८, ९
यहे. २७:२७यहे २७:१०, ११
यहे. २७:२७यहे २६:१४
यहे. २७:३०यश २३:१; यहे २६:१७
यहे. २७:३२यहे २६:५
यहे. २७:३३यहे २७:१४, १६
यहे. २७:३३जख ९:३
यहे. २७:३४यहे २६:१९
यहे. २७:३४यहे २७:२७
यहे. २७:३५यहे २६:१५
यहे. २७:३५यहे २८:१७
यहे. २७:३६स्तो ३७:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल २७:१-३६

यहेज्केल

२७ मग परत एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २ “मनुष्याच्या मुला, सोरसाठी एक शोकगीत गा.+ ३ तिला म्हण,

‘तू समुद्राच्या प्रवेशाजवळ वस्ती करतेस,

आणि अनेक बेटांवरच्या लोकांसोबत व्यापार करतेस.

तुझ्याबद्दल सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो:

“हे सोर, तू स्वतःबद्दल म्हणालीस, ‘माझं सौंदर्य परिपूर्ण आहे!’+

 ४ तुझ्या सीमा समुद्राच्या मधोमध आहेत,

आणि बांधणाऱ्‍यांनी तुला सौंदर्याने परिपूर्ण केलंय.

 ५ त्यांनी सनीरमधल्या गंधसरूच्या लाकडांपासून तुझ्या फळ्या बनवल्या,+

लबानोनमधल्या देवदाराच्या लाकडांपासून त्यांनी तुझी शीडकाठी बनवली.

 ६ त्यांनी बाशानमधल्या अल्लोन* वृक्षापासून तुझ्या वल्ही बनवल्या,

तुझा समोरचा भाग त्यांनी सुरूच्या वृक्षापासून बनवला आणि तो कित्तीमच्या+ बेटांवरच्या हस्तिदंतांनी सजवला.

 ७ तुझं शीड इजिप्तमधून आणलेल्या रंगीबेरंगी मलमलीच्या कापडाचं होतं,

आणि तुझ्या छताचं कापड एलीशामधल्या+ निळ्या धाग्यापासून आणि जांभळ्या लोकरीपासून बनवलेलं होतं.

 ८ सीदोन आणि अर्वदचे+ रहिवासी तुझे वल्हेकरी होते,

आणि हे सोर! तुझे कुशल पुरुष तुझे खलाशी होते.+

 ९ पाणी आत शिरू नये, म्हणून गबालचे+ अनुभवी* आणि कुशल पुरुष तुझ्या फळ्यांमधल्या फटी बुजवायचे.+

समुद्रावरची सगळी जहाजं आणि त्यांचे खलाशी मालाची देवाणघेवाण करायला तुझ्याकडे यायचे.

१० पर्शिया, लूदीम आणि पूटचे+ लोक तुझ्या सैन्यात होते; ते तुझे योद्धे होते.

ते आपल्या ढाली आणि डोक्यावरचे टोप तुझ्यात अडकवायचे आणि त्यांनी तुझ्या वैभवात भर घातली.

११ तुझ्या सैन्यातली अर्वदची माणसं तुझ्या चारही बाजूंच्या भिंतींवर तैनात असायची,

आणि शूर पुरुष तुझ्या बुरुजांचं रक्षण करायचे.

ते तुझ्या भिंतींवर सगळीकडे आपल्या गोलाकार ढाली लटकवायचे,

आणि असं करून त्यांनी तुझं सौंदर्य परिपूर्ण केलं.

१२ तुझ्याकडे अफाट धनसंपत्ती असल्यामुळे तार्शीश+ तुझ्यासोबत व्यापार करायचा.+ त्याचे लोक तुला चांदी, लोखंड, कथील आणि शिसं देऊन तुझा माल विकत घ्यायचे.+ १३ यावान, तुबाल+ आणि मेशेख+ तुझ्याशी व्यापार करायचे. ते गुलाम आणि तांब्याच्या वस्तू देऊन तुझा माल विकत घ्यायचे.+ १४ तोगार्माचे+ वंशज तुझ्याकडचा माल घेऊन त्याच्या बदल्यात तुला घोडे, खेचरं आणि युद्धाचे घोडे द्यायचे. १५ ददानचे+ लोक तुझ्यासोबत सौदा करायचे. तू पुष्कळ बेटांवर आपले व्यापारी नेमले होते. ते तुला नजराणा म्हणून हस्तिदंत+ आणि अबनूसच्या झाडाचं लाकूड द्यायचे. १६ तुझ्याकडे विकायला बऱ्‍याच गोष्टी असल्यामुळे, अदोम तुझ्याशी देवाणघेवाण करायचा. त्याचे लोक तुला पिरोजा रत्नं, जांभळी लोकर, भरतकाम केलेले रंगीबेरंगी कपडे, उत्तम प्रतीचं कापड, पोवळे आणि माणिक देऊन तुझ्याकडून माल खरेदी करायचे.

१७ यहूदा आणि इस्राएल देशसुद्धा तुझ्याशी व्यापार करायचे. ते तुला खायच्या चांगल्या-चांगल्या वस्तू, मध,+ तेल, मिनीथचा गहू+ आणि बाल्सम*+ देऊन तुझा माल विकत घ्यायचे.+

१८ तुझ्याकडे भरपूर वस्तू आणि अफाट धनसंपत्ती असल्यामुळे दिमिष्कही+ तुझ्याशी सौदा करायचा. तुझ्याकडून घेतलेल्या मालाच्या बदल्यात तो तुला हेल्बोनचा द्राक्षारस आणि जहारची लोकर* द्यायचा. १९ ऊजाल प्रदेशातले वदान आणि यावान हे तुला लोखंडाच्या वस्तू, तज* आणि अगरू* देऊन तुझा माल विकत घ्यायचे. २० ददान+ तुझ्याशी खोगीराच्या कापडाचा* व्यापार करायचा. २१ कोकरांचा, एडक्यांचा आणि बकऱ्‍यांचा व्यापार करणाऱ्‍या+ अरबी लोकांना आणि केदारच्या+ प्रधानांना तू कामावर ठेवलं होतंस. २२ रामा आणि शबाचे व्यापारी+ तुझ्याशी देवाणघेवाण करायचे. तुझ्या मालाच्या बदल्यात ते तुला सर्व प्रकारचे उत्तम अत्तर, मौल्यवान रत्नं आणि सोनं द्यायचे.+ २३ हारान,+ कन्‍ने, एदेन,+ शबाचे सौदागर,+ अश्‍शूर+ आणि किल्मद हेसुद्धा तुझ्यासोबत व्यापार करायचे. २४ ते तुझ्या बाजारपेठेत सुंदर कपडे, निळ्या धाग्यापासून आणि भरतकाम केलेल्या रंगीबेरंगी कापडापासून तयार केलेले झगे आणि वेगवेगळ्या रंगाचे गालीचे बांधून आणायचे आणि विकायचे.

२५ तार्शीशची जहाजं+ तुझ्या मालाची ने-आण करणाऱ्‍या काफिल्यांसारखी होती,

म्हणून तू समुद्रात नेहमी धनसंपत्तीने भरलेली आणि मालाने लादलेली* असायचीस.

२६ तुझ्या वल्हेकऱ्‍यांनी तुला भरसमुद्रात नेलं;

पूर्वेकडच्या वाऱ्‍याने समुद्राच्या मधोमध तुझे तुकडे-तुकडे करून टाकले.

२७ तुझी धनसंपत्ती, तुझा माल, तुझ्या वस्तू, तुझे खलाशी आणि तुझे नाविक;

तसंच, तुझे सौदागर, तुझ्या फळ्यांमधल्या फटी बुजवणारे लोक+ आणि तुझे सगळे योद्धे,+

तुझा अख्खाचा अख्खा जमाव,

सगळं काही समुद्राच्या तळाशी जाईल.

तुझा नाश होईल त्या दिवशी, ते सगळे समुद्रात बुडून जातील.+

२८ तुझ्या खलाश्‍यांचं किंचाळणं ऐकून,

समुद्राजवळच्या प्रदेशांचा भीतीने थरकाप उडेल.

२९ तुझे वल्हेकरी, खलाशी आणि नाविक,

सगळे आपापली जहाजं सोडून जमिनीवर येऊन उभे राहतील.

३० ते तुझ्यासाठी मोठ्या दुःखाने गळा काढून रडतील,+

आपल्या डोक्यांवर धूळ टाकून ते राखेत लोळतील.

३१ ते आपल्या डोक्याचं मुंडण करतील आणि अंगात गोणपाट घालतील;

ते तुझ्यासाठी आक्रोश करतील, तुझ्यासाठी ढसाढसा रडतील.

३२ ते शोक करत तुझ्यासाठी विलापगीत गातील आणि म्हणतील:

‘सोरसारखं कोण आहे? भरसमुद्रात शांत पडलेल्या सोरसारखं कोण आहे?+

३३ तुझा माल समुद्रमार्गाने यायचा आणि तू अनेक राष्ट्रांना तृप्त करायचीस.+

तुझ्या अफाट धनसंपत्तीमुळे आणि व्यापारी मालामुळे पृथ्वीवरचे राजे श्रीमंत झाले.+

३४ पण आता भरसमुद्रावर, खोल पाण्यावर तू फुटलीस,+

तुझा सगळा माल आणि तुझे सगळे लोक तुझ्यासोबत समुद्रात बुडालेत.+

३५ बेटांवर राहणारे सगळे जण चकित होऊन तुझ्याकडे पाहत राहतील,+

त्यांचे राजे भीतीने थरथर कापतील+ आणि त्यांच्या चेहऱ्‍यावरचा रंग उडेल.

३६ तुझी दशा पाहून राष्ट्रांमधले व्यापारी शिट्टी वाजवतील.*

तुझा अंत अचानक होईल आणि तो फार भयानक असेल,

तुझं नामोनिशाण कायमचं मिटून जाईल.’”’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा