वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • अम्मोनविरुद्ध भविष्यवाणी (१-७)

      • मवाबविरुद्ध भविष्यवाणी (८-११)

      • अदोमविरुद्ध भविष्यवाणी (१२-१४)

      • पलिष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी (१५-१७)

यहेज्केल २५:२

समासातील संदर्भ

  • +उत्प १९:३६, ३८
  • +यिर्म ४९:१; आम १:१३; सफ २:९

यहेज्केल २५:४

तळटीपा

  • *

    किंवा “भिंती असलेल्या छावण्या घालतील.”

यहेज्केल २५:५

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:२६; यहे २१:२०

यहेज्केल २५:६

समासातील संदर्भ

  • +विल २:१५
  • +सफ २:८

यहेज्केल २५:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४९:२; आम १:१४

यहेज्केल २५:८

समासातील संदर्भ

  • +यश १५:१; यिर्म ४८:१; आम २:१
  • +अनु २:४

यहेज्केल २५:९

समासातील संदर्भ

  • +गण ३२:३७, ३८; यहो १३:१५, १९

यहेज्केल २५:१०

समासातील संदर्भ

  • +यहे २५:४
  • +यहे २१:२८, ३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ७४

यहेज्केल २५:११

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ७४

यहेज्केल २५:१२

समासातील संदर्भ

  • +२इत २८:१७; स्तो १३७:७; विल ४:२२; आम १:११; ओब १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ७४

यहेज्केल २५:१३

समासातील संदर्भ

  • +मला १:४
  • +यिर्म ४९:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०१७, पृ. २

यहेज्केल २५:१४

समासातील संदर्भ

  • +यश ११:१४; ६३:१
  • +नहू १:२

यहेज्केल २५:१५

समासातील संदर्भ

  • +२इत २८:१८; यश ९:११, १२; १४:२९; यिर्म ४७:१; योए ३:४-६; आम १:६

यहेज्केल २५:१६

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:१७, २०; सफ २:४
  • +सफ २:५
  • +यिर्म ४७:४

यहेज्केल २५:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. २५:२उत्प १९:३६, ३८
यहे. २५:२यिर्म ४९:१; आम १:१३; सफ २:९
यहे. २५:५२शमु १२:२६; यहे २१:२०
यहे. २५:६विल २:१५
यहे. २५:६सफ २:८
यहे. २५:७यिर्म ४९:२; आम १:१४
यहे. २५:८यश १५:१; यिर्म ४८:१; आम २:१
यहे. २५:८अनु २:४
यहे. २५:९गण ३२:३७, ३८; यहो १३:१५, १९
यहे. २५:१०यहे २५:४
यहे. २५:१०यहे २१:२८, ३२
यहे. २५:११यिर्म ४८:१
यहे. २५:१२२इत २८:१७; स्तो १३७:७; विल ४:२२; आम १:११; ओब १०
यहे. २५:१३मला १:४
यहे. २५:१३यिर्म ४९:७, ८
यहे. २५:१४यश ११:१४; ६३:१
यहे. २५:१४नहू १:२
यहे. २५:१५२इत २८:१८; यश ९:११, १२; १४:२९; यिर्म ४७:१; योए ३:४-६; आम १:६
यहे. २५:१६यिर्म २५:१७, २०; सफ २:४
यहे. २५:१६सफ २:५
यहे. २५:१६यिर्म ४७:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल २५:१-१७

यहेज्केल

२५ मग पुन्हा एकदा यहोवाकडून मला संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला! अम्मोनी लोकांकडे+ आपलं तोंड कर आणि त्यांच्याविरुद्ध भविष्यवाणी कर.+ ३ त्यांना म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा काय म्हणतो ते ऐका. सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “माझं मंदिर जेव्हा अपवित्र करण्यात आलं, इस्राएल देश जेव्हा ओसाड करण्यात आला आणि यहूदाचं घराणं जेव्हा बंदिवासात गेलं, तेव्हा तुम्ही म्हणाला: ‘बरं झालं!’ ४ म्हणून आता मी तुम्हाला पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन. ते येऊन तुमच्यामध्ये छावणी करतील* आणि तुमच्यामध्ये आपले तंबू ठोकतील. ते तुमच्या देशातलं उत्पन्‍न खातील आणि तुमच्या प्राण्यांचं दूध पितील. ५ मी राब्बा+ शहराला उंटांचं चरण्याचं ठिकाण बनवीन आणि अम्मोनी लोकांच्या देशाला गुराढोरांचं विसाव्याचं स्थान करून टाकीन. तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.”’”

६ “सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘इस्राएल देशाची दशा पाहून तुम्ही त्याची थट्टा केली आणि खूश झालात. तुम्ही टाळ्या वाजवल्या+ आणि आनंदाने उड्या मारल्या.+ ७ म्हणून आता मी तुमच्यावर आपला हात उगारीन आणि राष्ट्रांनी तुम्हाला लुटावं, म्हणून मी तुम्हाला त्यांच्या हाती देईन. मी सगळ्या राष्ट्रांमधून आणि देशांमधून तुमचं नामोनिशाण मिटवून टाकीन.+ मी तुमचा समूळ नाश करीन, तेव्हा तुम्हाला कळून येईल की मी यहोवा आहे.’

८ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मवाब+ आणि सेईर+ असं म्हणाले: “बघा! यहूदाचं घराणं तर इतर राष्ट्रांसारखंच आहे.” ९ म्हणून पाहा! मी शत्रूला मवाबच्या उतारांवर हल्ला करायला लावीन. त्याच्या सीमेजवळ असलेल्या आणि त्या देशाची शान असलेल्या शहरांवर, म्हणजे बेथ-यशिमोथ, बाल-मोन आणि किर्याथाईम+ यांच्यावर मी शत्रूला हल्ला करायला लावीन. १० मी मवाबी आणि अम्मोनी लोकांना पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन.+ आणि कोणत्याही राष्ट्राला अम्मोनी लोकांची आठवण राहणार नाही.+ ११ मी मवाबी लोकांवर न्यायदंड बजावीन,+ तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे.’

१२ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘अदोम हा यहूदाच्या घराण्याशी सूड घेण्याच्या हेतूने वागलाय आणि त्यांचा बदला घेऊन त्याने स्वतःवर मोठा दोष ओढवून घेतलाय.+ १३ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “मीसुद्धा अदोमवर आपला हात उगारीन आणि त्याच्यामधून माणसांचा आणि गुराढोरांचा नाश करीन. मी त्याला ओसाड करून टाकीन.+ तेमानपासून थेट ददानपर्यंत सगळे लोक तलवारीने मारले जातील.+ १४ ‘मी माझ्या इस्राएली लोकांच्या हातून अदोमवर सूड उगवीन.+ त्यांच्याद्वारे मी अदोमवर माझ्या रागाचा आणि क्रोधाचा वर्षाव करीन. मग त्यांना कळून येईल की मी कसा सूड उगवतो,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”’

१५ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘पलिष्ट्यांनी कायम इस्राएली लोकांबद्दल मनात शत्रुत्व बाळगलं. त्यांनी नेहमीच द्वेषभावनेने त्यांचा बदला घ्यायचा आणि नाश करायचा प्रयत्न केला.+ १६ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “पाहा! मी पलिष्ट्यांवर आपला हात उगारीन.+ मी करेथी+ लोकांचा आणि समुद्रकिनाऱ्‍यावरच्या उरलेल्या रहिवाशांचा नाश करून टाकीन.+ १७ मी त्यांना कडक शिक्षा करून त्यांच्यावर माझा भयंकर सूड उगवीन. आणि मी जेव्हा सूड उगवीन तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.”’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा