वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • खोट्या संदेष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी (१-१६)

        • चुना लावलेली भिंत पडेल (१०-१२)

      • खोटा संदेश देणाऱ्‍या स्त्रियांविरुद्ध भविष्यवाणी (१७-२३)

यहेज्केल १३:२

समासातील संदर्भ

  • +मीख ३:५; सफ ३:४
  • +यिर्म १४:१४; २३:१६

यहेज्केल १३:३

समासातील संदर्भ

  • +यिर्म २३:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९९, पृ. १३-१४

    ५/१/१९९७, पृ. ८

यहेज्केल १३:५

समासातील संदर्भ

  • +यश २:१२; योए १:१५
  • +यहे २२:३०

यहेज्केल १३:६

समासातील संदर्भ

  • +यिर्म २९:३१, ३२

यहेज्केल १३:८

समासातील संदर्भ

  • +यहे २२:२८

यहेज्केल १३:९

समासातील संदर्भ

  • +यिर्म १४:१४; २८:१५, १६; २९:८, ९
  • +यहे ६:१३; ११:१०

यहेज्केल १३:१०

तळटीपा

  • *

    म्हणजे, कच्ची भिंत बांधल्यावर ती मजबूत दिसावी म्हणून ते तिच्यावर चुना लावतात.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:१३, १४
  • +यश ३०:१०; यहे २२:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९९, पृ. १३-१४

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १३:११

समासातील संदर्भ

  • +यश २७:८

यहेज्केल १३:१२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३७:१९

यहेज्केल १३:१५

समासातील संदर्भ

  • +यश ३०:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९७, पृ. ८

यहेज्केल १३:१६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:१३, १४; २८:१-४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९७, पृ. ८

यहेज्केल १३:१८

तळटीपा

  • *

    म्हणजे, हातांच्या कोपरांवर किंवा मनगटावर घालायचे तंत्रमंत्र केलेले गंडेदोरे.

यहेज्केल १३:१९

समासातील संदर्भ

  • +यिर्म २३:१४
  • +मीख ३:११

यहेज्केल १३:२१

समासातील संदर्भ

  • +यहे ६:१३

यहेज्केल १३:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म २७:१४
  • +यिर्म २३:१६, १७
  • +यिर्म २३:१४

यहेज्केल १३:२३

समासातील संदर्भ

  • +अनु १८:१०, १४; यिर्म २७:९; मीख ३:६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. १३:२मीख ३:५; सफ ३:४
यहे. १३:२यिर्म १४:१४; २३:१६
यहे. १३:३यिर्म २३:३२
यहे. १३:५यश २:१२; योए १:१५
यहे. १३:५यहे २२:३०
यहे. १३:६यिर्म २९:३१, ३२
यहे. १३:८यहे २२:२८
यहे. १३:९यिर्म १४:१४; २८:१५, १६; २९:८, ९
यहे. १३:९यहे ६:१३; ११:१०
यहे. १३:१०यिर्म ६:१३, १४
यहे. १३:१०यश ३०:१०; यहे २२:२८
यहे. १३:११यश २७:८
यहे. १३:१२यिर्म ३७:१९
यहे. १३:१५यश ३०:१२, १३
यहे. १३:१६यिर्म ६:१३, १४; २८:१-४
यहे. १३:१९यिर्म २३:१४
यहे. १३:१९मीख ३:११
यहे. १३:२१यहे ६:१३
यहे. १३:२२यिर्म २७:१४
यहे. १३:२२यिर्म २३:१६, १७
यहे. १३:२२यिर्म २३:१४
यहे. १३:२३अनु १८:१०, १४; यिर्म २७:९; मीख ३:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल १३:१-२३

यहेज्केल

१३ मला यहोवाकडून परत असा संदेश मिळाला: २ “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या संदेष्ट्यांविरुद्ध भविष्यवाणी कर.+ जे आपल्या मनाच्याच भविष्यवाण्या सांगतात त्यांना म्हण,+ ‘यहोवाचा संदेश ऐका. ३ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मूर्ख संदेष्ट्यांचा धिक्कार असो! त्यांनी कोणताही दृष्टान्त पाहिला नाही, तरी ते स्वतःच्याच मनाने भविष्यवाणी करतात!+ ४ हे इस्राएल! तुझे संदेष्टे ओसाड ठिकाणी राहणाऱ्‍या कोल्ह्यांसारखे झालेत. ५ यहोवाचा दिवस येईल तेव्हा इस्राएलने युद्धात टिकून राहावं,+ म्हणून इस्राएलच्या घराण्यासाठी पडझड झालेल्या दगडी भिंतींची डागडुजी करायला ते तिथे जाणार नाहीत.”+ ६ “यहोवाने त्यांना पाठवलेलं नाही, तरी ते म्हणतात, ‘यहोवाकडून असा संदेश आहे.’ पण खरंतर त्यांनी खोटे दृष्टान्त बघितले आणि खोट्या भविष्यवाण्या सांगितल्या, आणि त्यांना असं वाटतं की आपल्या भविष्यवाण्या पूर्ण होतील.+ ७ तुम्ही खोटे दृष्टान्त पाहिलेत ना? तुम्ही खोट्या भविष्यवाण्या सांगितल्यात ना? मी तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही तरी तुम्ही असं म्हणालात ना, की ‘यहोवाकडून असा संदेश आहे’?”’

८ ‘म्हणून आता सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “‘तुम्ही खोट्या गोष्टी बोललात, आणि खोटे दृष्टान्त पाहिलेत, म्हणून मी तुमच्या विरोधात आहे,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”+ ९ मी खोटे दृष्टान्त पाहणाऱ्‍या आणि खोट्या भविष्यवाण्या करणाऱ्‍या संदेष्ट्यांवर माझा हात उगारीन.+ माझ्या जवळच्या लोकांमध्ये त्यांना कोणतीही जागा नसेल. त्यांचं नाव इस्राएलच्या घराण्याच्या यादीत नोंदवलं जाणार नाही आणि ते इस्राएल देशात परत कधीच येणार नाहीत. त्या वेळी तुम्हाला कळून येईल, की मी सर्वोच्च प्रभू यहोवा आहे.+ १० हे सगळं यासाठी घडून येईल, कारण शांती नसतानाही “शांती आहे! शांती आहे!” असं म्हणून त्यांनी माझ्या लोकांची दिशाभूल केली.+ एखादा भिंत बांधतो, तेव्हा ते तिला चुन्याने लिंपतात.’*+

११ भिंतीला चुना लिंपणाऱ्‍यांना सांगा, की ती पडणार आहे. मुसळधार पाऊस येईल, गारांचा जोरदार वर्षाव होईल, वादळी वारा सुटेल तेव्हा ती भिंत कोसळून पडेल.+ १२ आणि जेव्हा ती पडेल, तेव्हा लोक तुम्हाला विचारतील, ‘तुम्ही भिंतीला लावलेल्या चुन्याचा काय उपयोग झाला?’+

१३ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘माझ्या क्रोधामुळे मी त्या भिंतीला वादळी वाऱ्‍याचा तडाखा देईन, माझ्या रागामुळे मी तिच्यावर मुसळधार पाऊस पाडीन, आणि माझ्या संतापामुळे मी तिच्यावर नाश करणाऱ्‍या गारांचा वर्षाव करीन. १४ ज्या भिंतीला तुम्ही चुना लिंपलाय तिला पाडून मी जमीनदोस्त करीन, आणि तिचा पाया उघडा पडेल; जेव्हा शहर कोसळून पडेल, तेव्हा त्याच्यासोबत तुमचाही नाश होईल. त्या वेळी तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.’

१५ ‘मी जेव्हा भिंतीवर आणि तिला चुना लिंपणाऱ्‍यांवर माझ्या क्रोधाचा पूर्णपणे वर्षाव करीन, तेव्हा मी तुम्हाला म्हणीन: “आता भिंत राहिली नाही, आणि तिला चुना लिंपणारेही राहिले नाहीत.+ १६ इस्राएलच्या ज्या संदेष्ट्यांनी यरुशलेम नगरीसाठी भविष्यवाण्या केल्या आणि शांती नसतानाही तिच्यासाठी शांतीचे दृष्टान्त पाहिले,+ त्या सगळ्या संदेष्ट्यांचा आता नाश झालाय,”’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.

१७ हे मनुष्याच्या मुला, तुझ्या लोकांपैकी ज्या स्त्रिया स्वतःच्या मनानेच भविष्यवाण्या सांगतात, त्यांच्याकडे तू आता आपलं लक्ष वळव आणि त्यांच्याविरुद्ध भविष्यवाणी कर. १८ त्यांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “ज्या स्त्रिया लोकांना फसवून त्यांचा जीव घ्यायला प्रत्येक हातासाठी ताईत* आणि डोक्यांसाठी वेगवेगळ्या मापाच्या ओढण्या बनवतात, त्यांचा धिक्कार असो! तुम्ही माझ्या लोकांचा जीव घेऊन स्वतःचा जीव वाचवायला बघताय का? १९ तुमच्या खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या माझ्या लोकांशी तुम्ही खोटं बोलता.+ ज्यांनी मरू नये त्यांचा तुम्ही जीव घेता आणि ज्यांनी मरायला हवं त्यांना तुम्ही जिवंत सोडता. असं करून, तुम्ही मूठभर जवासाठी आणि भाकरीच्या काही तुकड्यांसाठी माझ्या लोकांमध्ये माझा अपमान करता.”’+

२० म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘हे स्त्रियांनो! पक्ष्यांची शिकार करतात तशी ताइतांचा वापर करून तुम्ही लोकांची शिकार केलीत, म्हणून मी तुमच्या विरोधात आहे. मी तुमच्या हातांवरून ताईत ओढून काढीन, आणि ज्यांची तुम्ही पक्ष्यांसारखी शिकार करता त्यांना मुक्‍त करीन. २१ डोक्यांवर घ्यायच्या तुमच्या ओढण्या मी फाडून टाकीन आणि माझ्या लोकांना तुमच्या हातून सोडवीन. त्यानंतर परत कधीच ते तुमची शिकार बनणार नाहीत. त्या वेळी तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.+ २२ मी नीतिमान माणसाला कोणतंही दुःख दिलं नाही, तरी तुम्ही तुमच्या खोट्या गोष्टी सांगून त्याला निराश केलं.+ आणि दुष्ट माणसाने आपला वाईट मार्ग सोडू नये आणि आपला जीव वाचवू नये,+ यासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं.+ २३ म्हणून, हे स्त्रियांनो! तुम्ही यापुढे खोटे दृष्टान्त आणि शकुन पाहू शकणार नाहीत.+ मी माझ्या लोकांना तुमच्या तावडीतून सोडवीन. तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा