वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया ४६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यिर्मया रूपरेषा

      • इजिप्तच्या विरोधात भविष्यवाणी (१-२६)

        • नबुखद्‌नेस्सर इजिप्तवर विजय मिळवेल (१३, २६)

      • इस्राएलला दिलेली अभिवचनं (२७, २८)

यिर्मया ४६:१

समासातील संदर्भ

  • +यिर्म १:१०

यिर्मया ४६:२

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:१५, १९; यहे २९:२; ३२:२
  • +२रा २३:३६; यिर्म २५:१; ३६:१
  • +२इत ३५:२०

यिर्मया ४६:३

तळटीपा

  • *

    सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.

यिर्मया ४६:६

समासातील संदर्भ

  • +२रा २४:७

यिर्मया ४६:८

समासातील संदर्भ

  • +यहे २९:३; ३२:२

यिर्मया ४६:९

समासातील संदर्भ

  • +यहे २७:२, १०
  • +यश ६६:१९
  • +उत्प १०:६, १३; यहे ३०:४, ५

यिर्मया ४६:१०

समासातील संदर्भ

  • +२रा २४:७

यिर्मया ४६:११

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:२५; यिर्म ८:२२
  • +यहे ३०:२१

यिर्मया ४६:१२

समासातील संदर्भ

  • +यहे ३२:९

यिर्मया ४६:१३

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४३:१०; यहे २९:१९; ३०:१०

यिर्मया ४६:१४

तळटीपा

  • *

    किंवा “मेम्फिस.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४४:१; यहे २९:१०; ३०:६
  • +यिर्म ४३:४, ७; यहे ३०:१८

यिर्मया ४६:१७

समासातील संदर्भ

  • +यहे २९:३

यिर्मया ४६:१८

तळटीपा

  • *

    म्हणजे, इजिप्तवर विजय मिळवणारा.

समासातील संदर्भ

  • +यहो १९:१७, २२; शास ४:६; स्तो ८९:१२
  • +१रा १८:४२

यिर्मया ४६:१९

तळटीपा

  • *

    किंवा “मेम्फिसची.”

  • *

    किंवा कदाचित, “तो ओसाड होईल.”

समासातील संदर्भ

  • +यहे ३२:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००३, पृ. ३२

यिर्मया ४६:२०

तळटीपा

  • *

    किंवा “कालवडीसारखी.”

यिर्मया ४६:२१

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४६:५, १५

यिर्मया ४६:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००७, पृ. ११

यिर्मया ४६:२४

समासातील संदर्भ

  • +यहे ३०:१०

यिर्मया ४६:२५

तळटीपा

  • *

    म्हणजे, थीब्ज.

समासातील संदर्भ

  • +यहे ३०:१४
  • +नहू ३:८
  • +निर्ग १२:१२; यश १९:१; यिर्म ४३:१२, १३
  • +यिर्म १७:५; ४२:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००३, पृ. ३२

यिर्मया ४६:२६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४३:१०, ११; यहे ३२:११
  • +यहे २९:१३, १४

यिर्मया ४६:२७

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +यश ४१:१३; ४३:१, २; ४४:२
  • +यश ११:११; यिर्म ५०:१९; यहे ३९:२७; आम ९:१४; सफ ३:२०
  • +यिर्म २३:३, ६; ३०:१०, ११

यिर्मया ४६:२८

तळटीपा

  • *

    किंवा “सुधारीन.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:९
  • +यिर्म ५:१०; आम ९:८
  • +यिर्म १०:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ज्ञान, पृ. १४८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यिर्म. ४६:१यिर्म १:१०
यिर्म. ४६:२यिर्म २५:१५, १९; यहे २९:२; ३२:२
यिर्म. ४६:२२रा २३:३६; यिर्म २५:१; ३६:१
यिर्म. ४६:२२इत ३५:२०
यिर्म. ४६:६२रा २४:७
यिर्म. ४६:८यहे २९:३; ३२:२
यिर्म. ४६:९यहे २७:२, १०
यिर्म. ४६:९यश ६६:१९
यिर्म. ४६:९उत्प १०:६, १३; यहे ३०:४, ५
यिर्म. ४६:१०२रा २४:७
यिर्म. ४६:११उत्प ३७:२५; यिर्म ८:२२
यिर्म. ४६:११यहे ३०:२१
यिर्म. ४६:१२यहे ३२:९
यिर्म. ४६:१३यिर्म ४३:१०; यहे २९:१९; ३०:१०
यिर्म. ४६:१४यिर्म ४४:१; यहे २९:१०; ३०:६
यिर्म. ४६:१४यिर्म ४३:४, ७; यहे ३०:१८
यिर्म. ४६:१७यहे २९:३
यिर्म. ४६:१८यहो १९:१७, २२; शास ४:६; स्तो ८९:१२
यिर्म. ४६:१८१रा १८:४२
यिर्म. ४६:१९यहे ३२:१५
यिर्म. ४६:२१यिर्म ४६:५, १५
यिर्म. ४६:२४यहे ३०:१०
यिर्म. ४६:२५यहे ३०:१४
यिर्म. ४६:२५नहू ३:८
यिर्म. ४६:२५निर्ग १२:१२; यश १९:१; यिर्म ४३:१२, १३
यिर्म. ४६:२५यिर्म १७:५; ४२:१४
यिर्म. ४६:२६यिर्म ४३:१०, ११; यहे ३२:११
यिर्म. ४६:२६यहे २९:१३, १४
यिर्म. ४६:२७यश ४१:१३; ४३:१, २; ४४:२
यिर्म. ४६:२७यश ११:११; यिर्म ५०:१९; यहे ३९:२७; आम ९:१४; सफ ३:२०
यिर्म. ४६:२७यिर्म २३:३, ६; ३०:१०, ११
यिर्म. ४६:२८यिर्म २५:९
यिर्म. ४६:२८यिर्म ५:१०; आम ९:८
यिर्म. ४६:२८यिर्म १०:२४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यिर्मया ४६:१-२८

यिर्मया

४६ यहोवाने यिर्मया संदेष्ट्याला वेगवेगळ्या राष्ट्रांविषयी संदेश दिला.+ २ इजिप्तबद्दल हा संदेश देण्यात आला;+ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी,+ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीश इथे इजिप्तच्या राजाच्या सैन्याला, म्हणजे फारो नखोच्या+ सैन्याला हरवलं होतं; त्या सैन्याविषयी असा संदेश देण्यात आला:

 ३ “तुमच्या छोट्या ढाली* आणि मोठ्या ढाली तयार करा,

आणि युद्ध करायला निघा.

 ४ घोडेस्वारांनो, घोडे तयार करून त्यांच्यावर स्वार व्हा.

डोक्यावर टोप घालून आपल्या जागी तैनात व्हा.

भाले घासून चकचकीत करा आणि आपल्या अंगावर चिलखत चढवा.

 ५ यहोवा म्हणतो, ‘ते इतके घाबरलेले का दिसत आहेत?

ते माघार घेत आहेत, त्यांचे योद्धे हरलेत.

ते घाबरल्यामुळे पळून गेलेत.

त्यांच्या शूरवीरांनी मागे वळूनही पाहिलं नाही.

सगळीकडे दहशत पसरली आहे.

 ६ चपळ असलेल्यांना पळून जाता येणार नाही, आणि योद्ध्यांना निसटून जाता येणार नाही.

उत्तरेकडे, फरात नदीच्या किनाऱ्‍यावर,

ते अडखळून पडले आहेत.’+

 ७ नाईल नदीसारखा हा कोण येतोय?

नदीच्या उसळणाऱ्‍या प्रवाहासारखा हा कोण येतोय?

 ८ नाईल नदीसारखा, नदीच्या उसळणाऱ्‍या प्रवाहासारखा येणारा हा इजिप्त आहे.+

तो म्हणतोय: ‘मी चढाई करून जाईन आणि संपूर्ण पृथ्वी झाकून टाकीन.

मी शहराचा आणि त्यात राहणाऱ्‍या लोकांचा नाश करून टाकीन.’

 ९ घोड्यांनो! पळत सुटा!

रथांनो, बेफाम धावा!

योद्ध्यांनो, पुढे जा;

ढाली हाताळणारे कूश आणि पूट पुढे जा,+

धनुर्धारी आणि धनुष्य वाकवणारा+ लूदीम,+ तूसुद्धा पुढे जा.

१० तो दिवस सर्वोच्च प्रभूचा, सैन्यांचा देव यहोवा याचा आहे; त्याच्या शत्रूंचा बदला घेण्याचा, त्यांच्यावर आपला सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार त्यांना खाऊन तृप्त होईल आणि त्यांचं रक्‍त पिऊन ती आपली तहान भागवेल. कारण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा याने उत्तरेच्या देशात, फरात नदीजवळ बलिदान तयार केलंय.+

११ हे इजिप्तची कुमारी,

तू बाल्सम* घ्यायला गिलादला जा.+

खरंतर, तुझ्यासाठी कोणताही इलाज नाही,+

तू उगीचच इतके औषधोपचार करतेस.

१२ तुझ्या झालेल्या अपमानाबद्दल सगळ्या राष्ट्रांनी ऐकलंय,+

तुझा आक्रोश देशभर ऐकू येतोय.

कारण योद्धे एकमेकांमुळे अडखळत आहेत,

आणि ते खाली पडत आहेत.”

१३ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर, इजिप्तवर हल्ला करायला येणार होता, त्याच्याविषयी यिर्मया संदेष्ट्याला यहोवाकडून असा संदेश मिळाला:+

१४ “इजिप्तमध्ये हे जाहीर करा, मिग्दोलमध्ये+ याची घोषणा करा,

नोफ* आणि तहपन्हेस+ यांनाही कळवा.

असं म्हणा, ‘आपापल्या जागी तैनात व्हा आणि सज्ज व्हा,

कारण तुमच्या आसपासच्या सगळ्या लोकांना तलवार खाऊन टाकणार आहे.

१५ तुझे शक्‍तिशाली पुरुष नाहीसे का झालेत?

ते आपल्या जागी टिकू शकले नाहीत,

कारण यहोवाने त्यांना ढकलून खाली पाडलंय.

१६ त्यांच्यातल्या अडखळून पडणाऱ्‍यांची संख्या फार मोठी आहे.

ते एकमेकांना म्हणत आहेत:

“चला! या क्रूर तलवारीपासून आपण पळ काढू,

आणि आपल्या देशात, आपल्या लोकांकडे परत जाऊ.”’

१७ तिथे ते असं म्हणत आहेत,

‘इजिप्तचा राजा फारो, नुसता बाता मारणारा आहे,

त्याने हाताशी आलेली संधी गमावली आहे.’+

१८ ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे तो राजा म्हणतो, ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, की

तो* डोंगरांमधल्या ताबोरसारखा,+

आणि समुद्राजवळच्या कर्मेलसारखा+ येईल.

१९ हे इजिप्तमध्ये राहणारी कुमारी!

बंदिवासात जाण्यासाठी आपलं सामान बांध.

कारण, नोफची* अवस्था अशी होईल की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल;

ते जाळून टाकलं जाईल,* आणि तिथे कोणीही उरणार नाही.+

२० इजिप्त ही एका सुंदर तरण्या गाईसारखी* असली,

तरी उत्तरेकडून डंख मारणाऱ्‍या माश्‍या तिच्याविरुद्ध येतील.

२१ तिचे भाडोत्री सैनिक धष्टपुष्ट वासरांसारखे आहेत,

पण तेसुद्धा पाठ दाखवून पळून गेले आहेत.

ते आपल्या जागी टिकू शकले नाहीत,+

कारण त्यांच्या संकटाचा दिवस त्यांच्यावर कोसळलाय,

त्यांच्याकडून हिशोब घ्यायची वेळ आली आहे.’

२२ ‘तिचा आवाज सरसरत, पळून चाललेल्या सापासारखा आहे.

कारण ते कुऱ्‍हाडी घेऊन तिच्या मागे येत आहेत;

झाडं कापून टाकणाऱ्‍या माणसांसारखे ते पूर्ण ताकदीने तिच्या मागे येत आहेत.’

२३ यहोवा म्हणतो, ‘तिच्या दाट जंगलात कोणी घुसू शकत नसलं,

तरी ते येऊन तिचं जंगल तोडून टाकतील.

कारण त्यांची संख्या टोळांपेक्षा जास्त आहे;

कोणीही ती मोजू शकत नाही.

२४ इजिप्तच्या कुमारीला लज्जित केलं जाईल.

तिला उत्तरेच्या लोकांच्या हवाली केलं जाईल.’+

२५ इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘आता मी माझं लक्ष नोवरून*+ आमोनकडे+ वळवतोय. मी माझं लक्ष फारोकडे, इजिप्तकडे, तिच्या देवांकडे+ आणि तिच्या राजांकडे वळवतोय; हो, मी माझं लक्ष फारोकडे आणि त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या सगळ्यांकडे वळवतोय.’+

२६ ‘आणि मी त्यांना त्यांच्या जिवावर टपलेल्यांच्या हवाली करीन; मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या आणि त्याच्या सेवकांच्या हवाली करीन.+ पण नंतर मात्र इजिप्तमध्ये पूर्वीसारखीच लोकवस्ती होईल,’ असं यहोवा म्हणतो.+

२७ ‘हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस.

आणि हे इस्राएल! तू भिऊ नकोस.+

कारण तू जरी दूर असलास, तरी मी तुला वाचवीन,

मी तुझ्या वंशजांना* बंदिवासातल्या देशातून सोडवीन.+

याकोब परत येईल. त्याला घाबरवणारा कोणीही नसेल; तो सुखशांतीत राहील.+

२८ म्हणून हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे,’ असं यहोवा म्हणतो.

‘ज्या सर्व राष्ट्रांमध्ये मी तुझी पांगापांग केली, त्यांचा मी समूळ नाश करीन;+

पण तुझा मात्र मी समूळ नाश करणार नाही.+

मी तुला योग्य प्रमाणात शिस्त लावीन.*+

पण, मी तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा