यशया
४२ पाहा! हा माझा सेवक आहे.+ मी त्याला आधार देतो!
मी त्याला निवडलं आहे,+ त्याच्यामुळे मला आनंद होतो!+
तो विश्वासूपणे न्याय करेल.+
४ पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेपर्यंत तो निरुत्साही होणार नाही किंवा थकणार नाही;+
आणि बेटांवर राहणारे त्याच्याकडून मिळणाऱ्या शिक्षणाची* वाट पाहतील.
५ आकाश निर्माण करणारा आणि ते पसरवणारा,+
पृथ्वी घडवणारा आणि तिच्यावरचं सगळं काही बनवणारा,+
तिच्यावर राहणाऱ्यांना श्वास,+ आणि तिच्यावर चालणाऱ्यांना जीवन देणारा,+
महान आणि खरा देव यहोवा म्हणतो:
६ “मी, यहोवाने माझ्या नीतिमत्त्वामुळे तुला बोलावलंय;
मी तुझा हात घट्ट धरलाय. मी तुझं रक्षण करीन.
७ म्हणजे तू आंधळ्यांचे डोळे उघडशील,+
कैद्यांना तुरुंगातून बाहेर काढशील,
आणि अंधाऱ्या कोठडीत बसलेल्यांची सुटका करशील.+
८ मी यहोवा आहे. हे माझं नाव आहे;
दुसऱ्या कोणालाही मी माझा गौरव मिळू देणार नाही,*
माझी प्रशंसा मी मूर्तींना मिळू देणार नाही.+
९ बघा! पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत;
आता मी तुम्हाला नवीन गोष्टी सांगतो.
त्यांची सुरुवात होण्याआधीच त्या मी तुम्हाला कळवतो.”+
१० समुद्रावर जाणाऱ्यांनो आणि त्यातल्या सर्वांनो,
बेटांनो आणि त्यांवर राहणाऱ्या लोकांनो,+
यहोवासाठी नवीन गीत गा!+
पृथ्वीच्या शेवटांपर्यंत त्याची स्तुती करा!+
खडकांत राहणाऱ्या लोकांनो, आनंदाने जयजयकार करा;
डोंगरमाथ्यांवरून मोठ्याने जयजयकार करा.
१२ ते यहोवाचा गौरव करोत,
आणि बेटांवर त्याची स्तुती करोत.+
१३ यहोवा शूरवीरासारखा बाहेर निघेल.+
तो योद्ध्यासारखा आवेशाने भरून जाईल.+
तो मोठ्याने ओरडेल; हो, तो मोठ्याने युद्धाची घोषणा करेल.
तो आपल्या सर्व शत्रूंपेक्षा ताकदवान असल्याचं दाखवून देईल.+
१४ “मी बराच वेळ गप्प राहिलो.
मी शांत बसलो आणि स्वतःला आवरलं.
पण आता बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीसारखं कण्हून मी धापा आणि उसासे टाकीन.
१५ मी डोंगरांना आणि टेकड्यांना उद्ध्वस्त करीन,
त्यांवरची सगळी हिरवळ सुकवून टाकीन.
मी त्यांच्यासाठी हे सगळं करीन आणि त्यांना कधीही सोडून देणार नाही.”
१७ जे कोरीव मूर्तींवर भरवसा ठेवतात,
जे धातूच्या ओतीव मूर्तींना म्हणतात: “तुम्ही आमचे देव आहात,”
ते सगळे लज्जित होतील आणि माघार घेतील.+
१८ बहिऱ्यांनो, ऐका!
आंधळ्यांनो, डोळे उघडा आणि बघा!+
१९ माझ्या सेवकाला सोडून दुसरा कोण आंधळा आहे?
मी पाठवलेल्या दूताइतका कोण बहिरा आहे?
ज्याला प्रतिफळ मिळालं आहे त्याच्याइतका आंधळा कोण आहे?
यहोवाच्या सेवकाइतका आंधळा कोण आहे?+
२० तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहता, पण तुम्ही लक्ष देत नाही.
तुमचे कान उघडे आहेत, पण तुम्ही ऐकत नाही.+
२१ यहोवा नीतिमान आहे, म्हणून त्याला आपला नियम* महान आणि गौरवी करायला आनंद झालाय.
२२ पण हे लोक लुबाडले आणि लुटले गेले आहेत;+
ते सगळे खड्ड्यांत अडकले आहेत आणि तुरुंगांत लपून बसले आहेत.+
ते लुबाडले गेले आहेत आणि त्यांना वाचवणारा कोणीही नाही,+
ते लुटीच्या मालासारखे झाले आहेत आणि “त्यांना परत करा!” असं म्हणणारं कोणीही नाही.
२३ तुमच्यापैकी कोण हे ऐकेल?
कोण लक्ष देईल आणि त्यातून भविष्यासाठी धडा शिकेल?
२४ याकोबची लूटमार कोणी होऊ दिली?
इस्राएलला लुबाडणाऱ्यांच्या हाती कोणी दिलं?
ज्या देवाविरुद्ध आपण पाप केलं, त्या यहोवानेच हे केलं नाही का?
ते त्याच्या मार्गांवर चालले नाहीत,
आणि त्याचे नियम त्यांनी पाळले नाहीत.+
२५ म्हणून देवाचा राग आणि क्रोध इस्राएलवर भडकत राहिला,
आणि त्यांना युद्धाचा रोष सहन करावा लागला.+
इस्राएलच्या आजूबाजूचं सगळं भस्म झालं, पण तरी त्यांनी लक्ष दिलं नाही.+
त्यांच्याविरुद्ध युद्धाच्या ज्वाला भडकल्या, पण तरी ते त्यातून काही शिकले नाहीत.+