यशया
३४ राष्ट्रांनो! ऐकण्यासाठी जवळ या,
राष्ट्रांतल्या लोकांनो! लक्षपूर्वक ऐका.
पृथ्वी आणि पृथ्वीवरचं सर्वकाही,
जमीन आणि जमिनीवर उगवलेलं सर्वकाही ऐको.
तो त्यांचा नाश करेल; तो त्यांची कत्तल करेल.+
३ त्यांच्या मेलेल्या लोकांना फेकून दिलं जाईल,
आणि त्यांच्या प्रेतांना घाणेरडा वास सुटेल;+
४ आकाशातलं सगळं सैन्य सडून जाईल,
आणि आकाश गुंडाळीसारखं गुंडाळलं जाईल.
द्राक्षवेलीवरून जसं सुकलेलं पान,
आणि अंजिराच्या झाडावरून जसं वाळलेलं अंजीर गळून पडतं,
तसं त्यांचं सगळं सैन्य सुकून जाईल आणि गळून पडेल.
५ “कारण आकाशात माझी तलवार रक्ताने भिजेल.+
ती अदोमवर न्यायदंड बजावण्यासाठी येईल;+
मी ज्यांचा नाश करायचं ठरवलंय, त्यांच्यावर ती येईल.
६ यहोवाकडे तलवार आहे; ती रक्ताने माखेल.
ती चरबीने भरून जाईल,+
एडक्यांच्या आणि बकऱ्यांच्या रक्ताने ती माखेल,
आणि एडक्यांच्या गुरद्यांच्या चरबीने ती भरून जाईल.
कारण यहोवा बस्रामध्ये बलिदान देणार आहे,
अदोम देशात तो मोठी कत्तल करणार आहे.+
७ त्यांच्यासोबत रानरेडेही नाश होण्यासाठी येतील,
धष्टपुष्ट बैलांसोबत तरणे बैलही येतील.
त्यांचा देश रक्ताने भिजून जाईल,
आणि त्यांची जमीन चरबीने भरून जाईल.”
८ कारण यहोवाने शत्रूंवर सूड उगवण्यासाठी एक दिवस नेमला आहे,+
सीयोनला न्याय मिळावा म्हणून बदला घेण्यासाठी त्याने एक वर्ष ठरवलं आहे.+
१० ती रात्रंदिवस जळत राहील;
तिच्यातून सतत धूर निघत राहील.
ती पिढ्या न् पिढ्या उद्ध्वस्त स्थितीत पडून राहील;
तिच्यातून कधीही कोणी प्रवास करणार नाही.+
११ पाणकोळी आणि साळिंदर तिचा ताबा घेतील,
लांब कानांची घुबडं आणि डोमकावळे तिच्यात राहतील.
देव तिला मोजमाप करायच्या दोरीने आणि ओळंब्याने मापेल,
ती रिकामी आणि ओसाड पडून राहील हे दाखवायला तो असं करेल.
१२ तिच्या प्रतिष्ठित लोकांपैकी कोणालाही राज्यपदासाठी बोलावलं जाणार नाही,
कारण तिचे सगळे अधिकारी नाहीसे होतील.
१३ तिच्या मजबूत बुरुजांमध्ये काटेरी झुडपं वाढतील,
तिच्या किल्ल्यांमध्ये खाजकुइली आणि काटेकुटे उगवतील.
ती कोल्ह्यांची राहण्याची जागा+
आणि शहामृगांचं वस्तिस्थान होईल.
१४ तिथे वाळवंटातले प्राणी ओरडणाऱ्या प्राण्यांमध्ये* मिसळतील,
आणि रानबकरा* आपल्या जोडीदाराला हाक मारेल.
निशाचर पक्षी* तिथे राहील आणि त्याला विसाव्याची जागा मिळेल.
१५ तिथे साप घर करून अंडी घालेल,
आणि अंडी उबवून तो आपल्या पिल्लांचं रक्षण करेल.
गिधाडंही तिथे आपल्या जोडीदारासह जमा होतील.
१६ यहोवाच्या पुस्तकात शोधा आणि ते मोठ्याने वाचा:
यांच्यापैकी एकही कमी असणार नाही;
यांच्यापैकी एकही जोडीदाराशिवाय असणार नाही,
कारण यहोवाच्या मुखातून निघालेली ही आज्ञा आहे,
आणि त्याच्या पवित्र शक्तीनेच* त्यांना एकत्र केलं आहे.
१७ त्यानेच त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या आहेत,
आणि त्यानेच आपल्या हाताने जागा मोजून त्यांना नेमून दिली आहे.
ते सर्वकाळासाठी तिचा ताबा घेतील;
आणि पिढ्या न् पिढ्या तिथे राहतील.