यशया
२४ पाहा! यहोवा देशाला* रिकामं आणि ओसाड करत आहे.+
तो त्याची उलथापालथ करून+ तिथे राहणाऱ्यांची पांगापांग करेल.+
२ सगळ्यांची एकसारखीच दशा होईल;
लोकांची तशी याजकाची,
दासाची तशी त्याच्या मालकाची,
दासीची तशी तिच्या मालकिणीची,
खरेदी करणाऱ्याची तशी विकणाऱ्याची,
उसनं देणाऱ्याची तशी उसनं घेणाऱ्याची,
कर्ज देणाऱ्याची तशी कर्ज घेणाऱ्याची.+
४ देश शोक करत आहे;*+ तो हळूहळू नष्ट होत चालला आहे.
सुपीक जमीन कोरडी पडत चालली आहे; ती नष्ट होत चालली आहे.
देशातले प्रतिष्ठित लोक दुबळे होत चालले आहेत.
६ म्हणून देश शापामुळे उद्ध्वस्त झाला आहे,+
तिथे राहणाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे,
देशातल्या लोकांची संख्या कमी झाली आहे,
आणि त्यात थोडेच लोक उरले आहेत.+
७ नवीन द्राक्षारस शोक करत आहे,* द्राक्षवेल वाळून गेली आहे,+
मनसोक्त आनंद करणारे आता उसासे टाकत आहेत.+
८ डफ आणि वीणा यांचं मधुर संगीत बंद झालं आहे,
मौजमजा करणाऱ्यांचा आवाजही शांत झाला आहे.+
९ लोक द्राक्षारस पितात, तेव्हा गीत गायलं जात नाही,
मद्याची चवही त्यांना कडू लागते.
१० ओसाड पडलेल्या शहराची मोडतोड झाली आहे;+
कोणी आत शिरू नये, म्हणून प्रत्येक घर बंद आहे.
११ लोक रस्त्यांवर येऊन द्राक्षारसासाठी ओरड करत आहेत.
सगळा जल्लोष नाहीसा झाला आहे;
देशातला आनंद मावळला आहे.+
१२ शहर उद्ध्वस्त झालं आहे;
शहराच्या दरवाजाचा चुराडा होऊन त्याचा ढिगारा झाला आहे.+
१३ जैतुनाचं झाड हलवल्यावर झाडावर जशी फक्त काहीच फळं शिल्लक राहतात,+
आणि द्राक्षांचा हंगाम संपल्यावर वेचण्यासाठी जशी फक्त थोडीच द्राक्षं उरतात,
तशी राष्ट्रांमध्ये या देशाची अवस्था होईल.+
१४ लोक मोठ्या आवाजात ओरडतील,
आनंदाने ते जयजयकार करतील.
ते पश्चिमेपासून* यहोवाच्या महानतेचा जयघोष करतील.+
१५ पूर्वेकडे*+ ते यहोवाचा गौरव करतील;
समुद्राच्या बेटांवर ते इस्राएलच्या देवाच्या नावाचा, यहोवाचा गौरव करतील.+
१६ पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांतून आम्हाला ही गाणी ऐकू येतात:
“नीतिमान देवाचा गौरव असो!”+
पण मी म्हणतो: “मी दुबळा होत चाललोय, मी कमजोर होतोय!
अरेरे! विश्वासघात करणाऱ्यांनी विश्वासघात केलाय;
विश्वासघात करणाऱ्यांनी दगा देऊन विश्वासघात केलाय.”+
१७ हे देशातल्या रहिवाशा! दहशत, खड्डे आणि सापळे* तुझी वाट पाहत आहेत.+
१८ जो दहशतीच्या भयानक आवाजापासून पळेल तो खड्ड्यात पडेल,
आणि जो त्या खड्ड्यातून वर येईल, तो सापळ्यात अडकेल.+
कारण आकाशातली पाण्याची दारं उघडतील,
आणि देशाचा पाया हादरून जाईल.
२० एखाद्या दारुड्यासारखा देश झोकांड्या खात आहे,
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झोपडी जशी हेलकावे खाते, तसा तो हेलकावे खात आहे.
आपल्या अपराधाच्या भाराखाली तो दबून जात आहे,+
तो खाली पडेल आणि पुन्हा कधी उभा राहू शकणार नाही.
२१ त्या दिवशी, यहोवा वर आकाशातल्या सैन्याकडे,
आणि खाली पृथ्वीवर असलेल्या राजांकडे आपलं लक्ष वळवेल;
२२ कैद्यांना जसं गोळा करून खड्ड्यात टाकलं जातं,
तसं तो त्यांना गोळा करून अंधार-कोठडीत टाकेल.
मग, बऱ्याच दिवसांनंतर तो त्यांच्याकडून हिशोब घेईल.
२३ पौर्णिमेचा चंद्र लज्जित होईल,
आणि तेजस्वी सूर्य शरमेने मान खाली घालेल.+