यशया
२ आमोजचा मुलगा यशया याने यहूदा आणि यरुशलेम यांबद्दल जो दृष्टान्त पाहिला तो हा:+
तो सर्व टेकड्यांहून उंच केला जाईल,
आणि सर्व राष्ट्रांतले लोक प्रवाहासारखे त्याकडे येतील.+
३ बऱ्याच राष्ट्रांतले लोक येतील आणि म्हणतील:
“चला, आपण यहोवाच्या पर्वतावर
आणि याकोबच्या देवाच्या मंदिराकडे जाऊ.+
तो आपल्याला त्याचे मार्ग शिकवेल,
आणि त्याने दाखवलेल्या वाटेने आपण चालू.”+
ते आपल्या तलवारी ठोकून त्यांपासून नांगरांचे फाळ बनवतील,
आणि आपल्या भाल्यांपासून कोयते बनवतील.+
यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही,
आणि ते युद्ध करायलाही शिकणार नाहीत.+
५ हे याकोबच्या घराण्या ये,
आपण यहोवाच्या प्रकाशात चालू.+
६ हे देवा, तू तुझ्या लोकांना, याकोबच्या घराण्याला सोडून दिलंस.+
कारण त्यांनी पूर्वेकडच्या अनेक चालीरिती स्वीकारल्या आहेत;
पलिष्ट्यांसारखं ते जादूटोणा करतात,+
आणि त्यांच्यात विदेश्यांच्या मुलांची संख्या भरमसाट वाढली आहे.
७ त्यांचा देश सोन्या-चांदीने भरून गेलाय,
त्यांचा खजिना अमाप झालाय.
त्यांच्या देशात अगणित घोडे आहेत,
आणि त्यांच्या रथांची संख्या मोजण्यापलीकडे आहे.+
८ त्यांचा देश निरर्थक दैवतांनी भरून गेलाय.+
ते आपल्या हातांनी बनवलेल्या,
आपल्या बोटांनी घडवलेल्या मूर्तींपुढे नमन करतात.
९ अशा प्रकारे माणूस खालच्या पातळीला गेलाय आणि त्याने स्वतःला लज्जित केलंय.
तू त्यांना क्षमा करू शकणार नाहीस.
१० लोकांनो! यहोवाच्या भयंकर क्रोधामुळे,
त्याच्या वैभवशाली सामर्थ्यामुळे,
खडकांत जा आणि स्वतःला धुळीत लपवा.+
११ गर्वाने भरलेली नजर नमवली जाईल,
आणि माणसांचा मगरूरपणा उतरवला जाईल.
त्या दिवशी फक्त यहोवाचाच गौरव होईल.
१२ कारण तो दिवस सैन्यांचा देव यहोवा याचा दिवस असेल.+
तो दिवस गर्विष्ठ आणि घमेंडी,
प्रतिष्ठित आणि सामान्य अशा सगळ्या लोकांवर येईल.+
१३ तो दिवस लबानोनच्या मोठ्या व उंच देवदार वृक्षांवर,
आणि बाशानच्या सगळ्या अल्लोन* वृक्षांवर,
१४ सर्व उंच डोंगरांवर
आणि सर्व मोठ्या टेकड्यांवर येईल.
आणि सगळ्या डौलदार होड्यांवर येईल.
१७ त्या दिवशी गर्विष्ठ माणसाला नमवलं जाईल,
माणसांचा मगरूरपणा उतरवला जाईल,
आणि फक्त यहोवाचाच गौरव होईल.
१८ निरर्थक दैवतं पूर्णपणे नाहीशी होतील.+
१९ यहोवा जेव्हा पृथ्वीचा थरकाप उडवण्यासाठी उठेल,
तेव्हा त्याच्या भयंकर क्रोधामुळे,
त्याच्या वैभवशाली सामर्थ्यामुळे,+
लोक खडकांतल्या गुहांमध्ये,
आणि जमिनीतल्या खड्ड्यांमध्ये जाऊन लपतील.+
२० त्या दिवशी माणसं आपल्या सोन्या-चांदीच्या मूर्ती घेतील;
पूजा करण्यासाठी आपण बनवलेल्या मूर्ती घेतील,
आणि चिचुंद्र्यांपुढे व वटवाघळांपुढे त्या फेकून देतील.+
२१ आणि पृथ्वीचा थरकाप उडवण्यासाठी जेव्हा यहोवा उठेल,
तेव्हा त्याच्या भयंकर क्रोधापासून,
त्याच्या वैभवशाली सामर्थ्यापासून लपण्यासाठी,
लोक खडकांतल्या गुहांमध्ये,
आणि कडेकपारींमध्ये घुसतील.
२२ माणसावर भरवसा ठेवायचं सोडून द्या, यातच तुमचं भलं आहे.
तो फक्त नाकपुड्यांतल्या श्वासासारखा आहे.
त्याच्यापासून काय फायदा?