यशया
१६ देशाच्या शासकासाठी एक एडका पाठवा;
तो सेलामधून ओसाड रानाच्या मार्गाने,
सीयोनच्या मुलीच्या डोंगरावर पाठवा.
३ “सल्ला द्या, ठरवल्याप्रमाणे करा.
भरदुपारी आपली छाया रात्रीसारखी गडद करा.
पांगलेल्यांना लपवा आणि पळून जाणाऱ्यांना दगा देऊ नका.
४ हे मवाब, माझे विखुरलेले लोक तुझ्यामध्ये राहोत.
नाश करणाऱ्यापासून वाचायला+ तू त्यांच्या लपण्याची जागा हो.
जुलूम करणाऱ्याचा अंत होईल,
विनाशाचा शेवट होईल,
आणि जे इतरांना पायांखाली तुडवतात, ते पृथ्वीवरून नाहीसे होतील.
५ एकनिष्ठ प्रेमावर एक राजासन स्थापन केलं जाईल.
दावीदच्या तंबूत त्या राजासनावर जो बसेल, तो विश्वासू असेल;+
तो खरेपणाने न्याय करेल आणि नीतीची कामं करण्यात तत्पर असेल.”+
६ मवाब अतिशय अहंकारी आहे. तो किती घमेंडी आहे ते आम्ही ऐकलंय;+
त्याचा गर्विष्ठपणा, त्याचा मगरूरपणा आणि त्याचा क्रोध यांविषयी आम्ही ऐकलंय.+
पण त्याच्या बढाई मारण्याचा काहीही उपयोग होणार नाही.
७ मवाब स्वतःसाठी शोक करेल;
त्याचे सर्व लोक आक्रोश करतील.+
फटके मारण्यात आलेले लोक कीर-हरेसेथमधल्या+ मनुकांच्या ढेपांची आठवण काढून रडतील.
८ हेशबोनचे+ मळे सुकून गेले आहेत,
सिब्माची+ द्राक्षवेल जळून गेली आहे,
राष्ट्रांच्या शासकांनी तिच्या लाल भडक फांद्या* पायांखाली तुडवल्या आहेत;
त्या फांद्या याजेरपर्यंत+ वाढल्या होत्या;
ओसाड रानापर्यंत त्या पोहोचल्या होत्या.
तिच्या डहाळ्या सगळीकडे पसरल्या होत्या आणि पार समुद्रापर्यंत पोहोचल्या होत्या.
९ म्हणून मी जसं याजेरसाठी रडतो, तसं सिब्माच्या द्राक्षवेलीसाठी रडेन.
हे हेशबोन आणि एलाले! मी माझ्या अश्रूंनी तुम्हाला ओलंचिंब करून टाकीन,+
कारण तुमच्या इथे उन्हाळी फळांच्या वेळी आणि कापणीच्या हंगामाच्या वेळी होणारा आवाज बंद झाला आहे.*
१० तुमच्या फळबागांतून जल्लोष आणि आनंदोत्सव नाहीसा करण्यात आला आहे,
तुमच्या द्राक्षमळ्यांत गाण्यांचा किंवा हर्ष करण्याचा आवाज ऐकू येत नाही.+
द्राक्षकुंडात कोणीही आता द्राक्षं तुडवून द्राक्षारस काढत नाही.
कारण मी सगळा आनंदोत्सव बंद केला आहे.+
११ म्हणून मवाबसाठी माझं हृदय दुःखाने हळहळत आहे,+
वीणेच्या* तारेप्रमाणे कीर-हरेसेथसाठी+ माझं मन थरथर कापत आहे.
१२ मवाब उच्च स्थानांकडे* जाऊन-जाऊन थकेल आणि आपल्या देवळात पूजाअर्चा करून-करून दमेल; तरी काहीच उपयोग होणार नाही.+
१३ यहोवा मवाबविषयी या सगळ्या गोष्टी आधीच बोलला होता. १४ आणि आता यहोवा म्हणतो: “मजुराच्या वर्षांप्रमाणे* तीन वर्षांच्या आत मवाबचं वैभव धुळीस मिळेल. सगळीकडे गोंधळ माजेल. आणि जे उरतील त्यांची संख्या फार कमी असेल; म्हणजे असून नसल्यासारखी असेल.”+