यशया
१२ त्या दिवशी तू असं म्हणशील:
“हे यहोवा! मी तुझे आभार मानतो,
कारण तू माझ्यावर रागावला होतास,
पण हळूहळू तुझा राग शांत झाला आणि तू माझं सांत्वन केलंस.+
२ पाहा! देव माझं तारण करणारा आहे.+
मी त्याच्यावर भरवसा ठेवीन;
मला कसलीही भीती राहणार नाही.+
३ तुम्ही तारणाच्या झऱ्यांतून आनंदाने पाणी काढाल.+
४ त्या दिवशी तुम्ही म्हणाल:
“यहोवाचे आभार माना, त्याचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करा,
राष्ट्रा-राष्ट्रांतल्या लोकांना त्याच्या कार्यांबद्दल सांगा!+
त्याचं नाव महान झालं आहे अशी घोषणा करा.+
५ यहोवासाठी स्तुतिगीतं गा,*+ कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत.+
आणि संपूर्ण पृथ्वीवर ही गोष्ट जाहीर करा.
६ हे सीयोनमध्ये राहणारी स्त्री!* जल्लोष कर, जयजयकार कर.
कारण तुझ्यामध्ये असलेला इस्राएलचा पवित्र देव महान आहे.”