यशया
१० जे नुकसानकारक कायदे बनवतात,
लोकांचं जगणं कठीण होईल अशी फर्मानं सतत काढतात, त्यांचा धिक्कार असो!+
२ न्याय मागणाऱ्या गरिबाला ते धुडकावून लावतात,
माझ्या लोकांमधल्या दीनदुबळ्यांना ते न्याय देत नाहीत.+
ते विधवांना लुटतात, आणि अनाथ मुलांना* लुबाडतात!+
३ हिशोब घेतला जाईल* त्या दिवशी तुम्ही काय कराल?+
दुरून संकट येईल तेव्हा तुमचं काय होईल?+
त्या वेळी मदतीसाठी कोणाकडे धाव घ्याल?+
आपली धनसंपत्ती* कुठे ठेवाल?
४ कैद्यांमध्ये दाटीवाटीने बसून राहण्याशिवाय,
किंवा मेलेल्यांमध्ये मरून पडण्याशिवाय तुमच्यापुढे दुसरा पर्याय नसेल.
या सगळ्यामुळे देवाचा राग शांत झालेला नाही,
त्यांना शिक्षा द्यायला त्याचा हात अजूनही उगारलेलाच आहे.+
५ “पाहा! अश्शूर+ हा माझा क्रोध व्यक्त करणारी माझी छडी आहे.+
त्याच्या हातात माझा न्यायदंड बजावणारी काठी आहे.
६ ज्या राष्ट्राने माझा त्याग केला त्याच्याविरुद्ध,+
आणि ज्या लोकांनी माझा राग भडकवला त्यांच्याविरुद्ध मी त्याला पाठवीन.
मी त्याला लुबाडण्याचा आणि भरपूर लूटमार करण्याचा हुकूम देईन.
त्यांना रस्त्यावरच्या चिखलाप्रमाणे तुडवण्याची आज्ञा मी त्याला देईन.+
७ पण त्याच्या मनाचा कल दुसरीकडे असेल,
त्याचं मन वेगळ्याच योजना आखेल.
कारण त्याच्या मनात थोड्या राष्ट्रांचा नाही, तर अनेक राष्ट्रांचा नाश करण्याचा,
आणि त्यांचं नामोनिशाण मिटवण्याचा विचार असेल.
८ कारण तो म्हणतो:
‘माझे सगळे अधिकारी राजेच नाहीत का?+
९ कालनो+ हे कर्कमीशसारखंच+ नाही का?
१० माझ्या हातांनी निरर्थक दैवतांची राज्यं काबीज केली.
त्यांच्याकडे तर यरुशलेम आणि शोमरोन यांच्यापेक्षा कितीतरी जास्त कोरीव मूर्ती होत्या.+
११ मी शोमरोनच्या आणि तिच्या निरर्थक दैवतांच्या बाबतीत जसं केलं,
तसंच यरुशलेमच्या आणि तिच्या मूर्तींच्या बाबतीतही करणार नाही का?’+
१२ यहोवा सीयोन डोंगराच्या आणि यरुशलेमच्या बाबतीत आपलं सर्व काम पूर्ण करेल, तेव्हा तो* अश्शूरच्या राजाला त्याच्या अहंकारी मनाबद्दल आणि त्याच्या घमेंडी व गर्विष्ठ नजरेबद्दल शिक्षा देईल.+
१३ कारण अश्शूरचा राजा म्हणतो:
‘मी हे सगळं माझ्या हाताच्या बळाने,
आणि माझ्या बुद्धीच्या जोरावर करीन, कारण मी हुशार आहे.
मी शक्तिशाली योद्ध्याप्रमाणे तिथल्या रहिवाशांना माझ्या अधीन करीन.+
१४ एखादा माणूस जसं पक्ष्याच्या घरट्यात हात घालून,
सोडून दिलेली अंडी गोळा करतो,
तसं मी माझ्या हाताने राष्ट्रांची धनसंपत्ती काढून घेईन,
आणि पृथ्वीवरचं सगळं काही गोळा करीन.
तरी कोणीही आपले पंख फडफडणार नाही, आपली चोच उघडणार नाही किंवा चिवचिवाट करणार नाही.’”
१५ लाकूडतोड्यापुढे कुऱ्हाड घमेंड करेल का?
सुतारापुढे करवत स्वतःला श्रेष्ठ समजेल का?
काठी+ फिरवणाऱ्या माणसाला, ती काठी हलवू शकते का?
किंवा छडी धरणाऱ्या माणसाला, ती छडी वर उचलू शकते का?
१६ म्हणून खरा प्रभू, सैन्यांचा देव यहोवा,
त्याच्या धडधाकट माणसांना* कमजोर करेल,+
आणि त्याचं वैभव आग लावून भस्म करेल.+
ती ज्वाला भडकेल आणि एका दिवसात अश्शूरचं जंगली गवत व काटेरी झुडपं भस्म करेल.
१८ तो त्याच्या जंगलाचं आणि फळबागेचं वैभव पूर्णपणे नष्ट करेल;
रोगी माणूस दुर्बळ होत जातो, तसे ते होत जातील.+
१९ त्याच्या जंगलातल्या उरलेल्या झाडांची संख्या इतकी कमी होईल,
की एखादा लहान मुलगाही ती मोजू शकेल.
२० त्या दिवशी इस्राएलचे उरलेले लोक,
आणि याकोबच्या घराण्यातले बचावलेले लोक,
आपल्याला मारणाऱ्याचा आश्रय घेण्याचं सोडून देतील.+
ते इस्राएलचा पवित्र देव यहोवा याचा आश्रय घेतील आणि त्यालाच विश्वासू राहतील.
२२ हे इस्राएल! तुझे लोक समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूइतके असले,
तरी त्यांच्यापैकी फक्त थोडेच परत येतील.+
कारण तुझ्या लोकांचा नाश ठरलेला आहे.+
न्यायदंड हा पुराच्या पाण्यासारखा त्यांना घेरेल.+
२३ हो! सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा याने ठरवल्याप्रमाणे,
संपूर्ण देशावर नक्कीच विनाश येईल.+
२४ म्हणून सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “सीयोनमध्ये राहणाऱ्या माझ्या लोकांनो, घाबरू नका! जो तुम्हाला छडीने फटके मारायचा+ आणि इजिप्तप्रमाणे तुमच्यावर आपली काठी उगारायचा,+ त्या अश्शूरला घाबरू नका. २५ कारण लवकरच माझा क्रोध शांत होऊन, त्यांचा नाश करण्यासाठी तो भडकेल.+ २६ सैन्यांचा देव यहोवा अश्शूरवर आपला चाबूक उगारेल;+ त्याने ओरेब+ खडकाजवळ मिद्यानला हरवलं त्या वेळी जसं केलं होतं, तसं तो करेल. आणि त्याने इजिप्तवर उगारली होती तशी समुद्रावर तो आपली काठी उगारेल.+
आणि तेलामुळे ते जू मोडून टाकलं जाईल.”+
२८ तो अयाथविरुद्ध+ आला आहे;
त्याने मिग्रोन पार केलं आहे,
आणि मिखमाश+ इथे त्याने आपलं सामानसुमान ठेवलं आहे.
२९ तो उतार पार करून आला आहे,
तो रात्रीचा मुक्काम गेबामध्ये+ करेल.
३० हे गल्लीमच्या मुली, मोठ्याने ओरडून रड!
हे लईशा, लक्ष दे!
आणि अनाथोथ,+ तूसुद्धा आक्रोश कर!
३१ मदमेना पळून गेला आहे.
गेबीमच्या रहिवाशांनी दुसरीकडे आश्रय घेतला आहे.
३२ त्याचा आजचा मुक्काम नोबमध्ये+ आहे.
तो सीयोनच्या मुलीच्या डोंगराला, यरुशलेमच्या टेकडीला मूठ दाखवून धमकावत आहे.
३३ पाहा! खरा प्रभू, सैन्यांचा देव यहोवा,
सपासप फांद्या छाटत आहे.+
मोठमोठी झाडं कापली जात आहेत,
आणि उंच-उंच झाडं नमवली जात आहेत.
३४ तो कुऱ्हाडीने जंगलातली झाडंझुडपं छाटत आहे.
एका शूरवीराच्या हाताने लबानोन पडेल.