वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ३९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • याजकांची वस्त्रं बनवणं (१)

      • एफोद (२-७)

      • ऊरपट (८-२१)

      • बिनबाह्‍यांचा झगा (२२-२६)

      • याजकांची इतर वस्त्रं (२७-२९)

      • सोन्याची पट्टी (३०, ३१)

      • मोशे उपासना मंडपाची पाहणी करतो (३२-४३)

निर्गम ३९:१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४, ५; २९:५; ३५:१०, १९
  • +निर्ग ३५:२३

निर्गम ३९:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:६-८; लेवी ८:७

निर्गम ३९:५

तळटीपा

  • *

    किंवा “कमरपट्टा.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २९:५

निर्गम ३९:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:९, १०

निर्गम ३९:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:१२

निर्गम ३९:८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:८
  • +निर्ग २८:१५-२१

निर्गम ३९:९

तळटीपा

  • *

    सुमारे २२.२ सें.मी. (८.७५ इंच). अति. ख१४ पाहा.

निर्गम ३९:१२

तळटीपा

  • *

    एक अज्ञात मौल्यवान रत्न, जे कदाचित कापूरमणी, राहुरत्न, पुलक, किंवा तुरमलमणी यांना सूचित करत असावं.

निर्गम ३९:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:२२-२५

निर्गम ३९:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:२६-२८

निर्गम ३९:२०

तळटीपा

  • *

    किंवा “कमरपट्ट्याच्या.”

निर्गम ३९:२१

तळटीपा

  • *

    किंवा “कमरपट्ट्याच्या.”

निर्गम ३९:२२

तळटीपा

  • *

    म्हणजे, हाताने कापड विणण्याचं साधन.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३१-३५

निर्गम ३९:२७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३९, ४०

निर्गम ३९:२८

तळटीपा

  • *

    किंवा “आत घालायचे कपडेही.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४
  • +निर्ग २९:८, ९
  • +निर्ग २८:४२

निर्गम ३९:३०

तळटीपा

  • *

    किंवा “पवित्र मुकुट.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३६, ३७; लेवी ८:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५४४

निर्गम ३९:३२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:४०; इब्री ८:५

निर्गम ३९:३३

तळटीपा

  • *

    म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३६:८
  • +निर्ग ३६:१४
  • +निर्ग ३६:१८
  • +निर्ग ३६:२०
  • +निर्ग ३६:३१
  • +निर्ग ३६:२४

निर्गम ३९:३४

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत तहश  हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील  म्हणतात. हा डॉल्फीन  माशाच्या आकाराचा असतो.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३६:१९
  • +निर्ग ३६:३५

निर्गम ३९:३५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३७:१, ४
  • +निर्ग ३७:६

निर्गम ३९:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३७:१०, १६

निर्गम ३९:३७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३७:१७, २३
  • +निर्ग २५:३८
  • +निर्ग ३५:२७, २८

निर्गम ३९:३८

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३७:२५
  • +निर्ग ३७:२९
  • +निर्ग ३०:३४, ३५
  • +निर्ग ३६:३७

निर्गम ३९:३९

तळटीपा

  • *

    किंवा “गंगाळ.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३८:१, ४
  • +निर्ग ३८:६
  • +निर्ग ३८:३०
  • +निर्ग ३०:१८; ३८:८

निर्गम ३९:४०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३८:९-११
  • +निर्ग ३८:१८
  • +निर्ग ३८:२०

निर्गम ३९:४१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३

निर्गम ३९:४२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३५:१०; ३६:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ३९:१निर्ग २८:४, ५; २९:५; ३५:१०, १९
निर्ग. ३९:१निर्ग ३५:२३
निर्ग. ३९:२निर्ग २८:६-८; लेवी ८:७
निर्ग. ३९:५निर्ग २९:५
निर्ग. ३९:६निर्ग २८:९, १०
निर्ग. ३९:७निर्ग २८:१२
निर्ग. ३९:८लेवी ८:८
निर्ग. ३९:८निर्ग २८:१५-२१
निर्ग. ३९:१५निर्ग २८:२२-२५
निर्ग. ३९:१९निर्ग २८:२६-२८
निर्ग. ३९:२२निर्ग २८:३१-३५
निर्ग. ३९:२७निर्ग २८:३९, ४०
निर्ग. ३९:२८निर्ग २८:४
निर्ग. ३९:२८निर्ग २९:८, ९
निर्ग. ३९:२८निर्ग २८:४२
निर्ग. ३९:३०निर्ग २८:३६, ३७; लेवी ८:९
निर्ग. ३९:३२निर्ग २५:४०; इब्री ८:५
निर्ग. ३९:३३निर्ग ३६:८
निर्ग. ३९:३३निर्ग ३६:१४
निर्ग. ३९:३३निर्ग ३६:१८
निर्ग. ३९:३३निर्ग ३६:२०
निर्ग. ३९:३३निर्ग ३६:३१
निर्ग. ३९:३३निर्ग ३६:२४
निर्ग. ३९:३४निर्ग ३६:१९
निर्ग. ३९:३४निर्ग ३६:३५
निर्ग. ३९:३५निर्ग ३७:१, ४
निर्ग. ३९:३५निर्ग ३७:६
निर्ग. ३९:३६निर्ग ३७:१०, १६
निर्ग. ३९:३७निर्ग ३७:१७, २३
निर्ग. ३९:३७निर्ग २५:३८
निर्ग. ३९:३७निर्ग ३५:२७, २८
निर्ग. ३९:३८निर्ग ३७:२५
निर्ग. ३९:३८निर्ग ३७:२९
निर्ग. ३९:३८निर्ग ३०:३४, ३५
निर्ग. ३९:३८निर्ग ३६:३७
निर्ग. ३९:३९निर्ग ३८:१, ४
निर्ग. ३९:३९निर्ग ३८:६
निर्ग. ३९:३९निर्ग ३८:३०
निर्ग. ३९:३९निर्ग ३०:१८; ३८:८
निर्ग. ३९:४०निर्ग ३८:९-११
निर्ग. ३९:४०निर्ग ३८:१८
निर्ग. ३९:४०निर्ग ३८:२०
निर्ग. ३९:४१निर्ग २८:३
निर्ग. ३९:४२निर्ग ३५:१०; ३६:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ३९:१-४३

निर्गम

३९ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी अहरोनसाठी पवित्र वस्त्रं बनवली.+ पवित्र ठिकाणात सेवा करण्यासाठी त्यांनी निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत+ यांपासून कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं बनवली.

२ बसालेलने सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एफोद* बनवलं.+ ३ त्यांनी हातोडीने सोनं ठोकून त्याचे पातळ पत्रे बनवले आणि मग त्याने ते कापून त्यांच्या तारा बनवल्या. मग त्याने या तारांनी निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवलेल्या एफोदवर भरतकाम केलं. ४ त्यांनी एफोदसाठी जोडलेले खांदपट्टे बनवले आणि ते त्याच्या वरच्या दोन टोकांना जोडले. ५ एफोदला बांधून ठेवण्यासाठी जो विणलेला पट्टा* त्याला जोडला होता,+ तोसुद्धा यहोवाने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे, सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल याच गोष्टींपासून बनवला होता.

६ मग त्यांनी गोमेद रत्नं घेऊन ती सोन्याच्या कोंदणांत बसवली आणि मुद्रेवर कोरतात त्याप्रमाणे त्यांवर इस्राएलच्या मुलांची नावं कोरली.+ ७ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, बसालेलने ती रत्नं इस्राएलच्या मुलांची आठवण म्हणून एफोदच्या खांदपट्ट्यांवर ठेवली.+ ८ मग त्याने ऊरपट* बनवला.+ त्यावर एफोदप्रमाणेच भरतकाम करण्यात आलं होतं. तो सोनं, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून बनवला होता.+ ९ ऊरपट दुमडल्यावर तो चौकोनी झाला आणि त्याची लांबी व रुंदी एक वीत* होती. १० त्यांनी त्यावर रत्नांच्या चार ओळी बसवल्या. पहिल्या ओळीत माणीक, पुष्कराज, आणि पाचू होते. ११ दुसऱ्‍या ओळीत पिरोजा, नीलमणी, आणि यास्फे ही रत्नं होती. १२ तिसऱ्‍या ओळीत लेशेम,* लसण्या, आणि जमुनिया, १३ तर चौथ्या ओळीत चंद्रकांत, गोमेद आणि मर्गझ ही रत्नं होती. ती सोन्याच्या कोंदणांत बसवलेली होती. १४ ही रत्नं इस्राएलच्या १२ मुलांच्या नावांप्रमाणे होती. इस्राएलच्या १२ वंशांपैकी प्रत्येकाचं नाव, मुद्रेवर कोरतात तसं त्यांवर कोरलेलं होतं.

१५ मग त्यांनी ऊरपटावर शुद्ध सोन्याच्या गोफांसारख्या पिळदार साखळ्या बनवल्या.+ १६ त्यानंतर त्यांनी सोन्याची दोन कोंदणं व दोन कड्या बनवल्या आणि त्यांनी त्या दोन कड्या ऊरपटाच्या दोन टोकांना जोडल्या. १७ मग त्यांनी सोन्याचे ते दोन गोफ ऊरपटाच्या टोकांना असलेल्या दोन कड्यांमधून घातले. १८ त्यानंतर त्यांनी दोन गोफांची दोन टोकं, दोन कोंदणांमधून घातली आणि त्यांना एफोदच्या खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला जोडलं. १९ मग त्यांनी सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या एफोदच्या समोर, ऊरपटाच्या आतल्या बाजूला खालच्या दोन टोकांना लावल्या.+ २० नंतर त्यांनी आणखी दोन सोन्याच्या कड्या बनवल्या. त्यांनी त्या कड्या एफोदच्या समोरच्या बाजूला, जिथे ते जोडलेलं होतं त्याच्या जवळ, खांदपट्ट्यांच्या खाली आणि एफोदच्या विणलेल्या पट्ट्याच्या* वरती लावल्या. २१ शेवटी त्यांनी ऊरपटाच्या कड्यांना एफोदच्या कड्यांशी निळ्या दोरीने अशा रितीने बांधलं, की विणलेल्या पट्ट्याच्या* वरती असलेला ऊरपट एफोदवरून सरकणार नाही. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी हे केलं.

२२ मग बसालेलने एफोदच्या आत घालायचा बिनबाह्‍यांचा झगा हातमागाच्या* कारागिराकडून पूर्णपणे निळ्या सुताने विणून घेतला.+ २३ डोकं घालण्यासाठी चिलखताला असतो, तसा त्या झग्याला मधोमध गळा होता. तो फाटू नये म्हणून त्याच्या गळ्याभोवती किनार होती. २४ नंतर त्यांनी त्याच्या खालच्या किनारीला निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून डाळिंबं बनवली. २५ मग त्यांनी शुद्ध सोन्यापासून घंट्या बनवल्या आणि बिनबाह्‍यांच्या झग्याच्या खालच्या किनारीला डाळिंबांच्या मध्ये त्या लावल्या. २६ सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्‍या बिनबाह्‍यांच्या झग्याच्या सबंध खालच्या किनारीला, त्यांनी सोन्याची एक घंटी आणि एक डाळिंब आलटूनपालटून लावलं. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी हे केलं.

२७ मग हातमागाच्या कारागिराने विणलेल्या चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून त्यांनी अहरोन आणि त्याच्या मुलांसाठी अंगरखे बनवले.+ २८ तसंच, त्यांनी चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून पगडी,+ अहरोनच्या मुलांसाठी सुंदर पगड्या+ आणि अंतर्वस्त्रंही*+ बनवली. २९ त्याचप्रमाणे, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीच्या मलमलीपासून त्यांनी कमरबंद बनवला. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी हे केलं.

३० शेवटी त्यांनी समर्पणाचं पवित्र चिन्ह* म्हणून शुद्ध सोन्याची एक चकाकणारी पट्टी बनवली आणि मुद्रेवर कोरतात तसे तिच्यावर हे शब्द कोरले: “पावित्र्य यहोवाचं आहे.”+ ३१ यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे, त्यांनी ती पट्टी पगडीवर बांधण्यासाठी तिला एक निळी दोरी बांधली.

३२ अशा रितीने उपासना मंडपाचं, म्हणजे भेटमंडपाचं सर्व काम पूर्ण झालं. यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सगळ्या गोष्टी केल्या.+ त्यांनी अगदी तसंच केलं.

३३ मग त्यांनी उपासना मंडप,+ म्हणजे मंडप+ आणि त्याचं हे सगळं सामान मोशेकडे आणलं: आकडे,+ चौकटी,+ दांडे,+ खांब आणि खाच असलेल्या बैठका;*+ ३४ लाल रंगवलेल्या मेंढ्याच्या कातडीचं आच्छादन,+ तहशाच्या* कातडीचं आच्छादन, पडदा;+ ३५ साक्षपेटी आणि तिचे दांडे+ व झाकण;+ ३६ मेज, त्याची सर्व भांडी+ आणि अर्पणाच्या भाकरी; ३७ शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्याचे दिवे,+ म्हणजे ओळीने लावायचे दिवे, त्याची सर्व भांडी+ आणि दिव्यांसाठी तेल;+ ३८ सोन्याची वेदी,+ अभिषेकाचं तेल,+ सुगंधित धूप,+ मंडपाच्या प्रवेशाचा पडदा;+ ३९ तांब्याची वेदी+ व तिची तांब्याची जाळी, तिचे दांडे,+ तिची सर्व भांडी,+ तसंच तांब्याचं मोठं भांडं* व त्याची बैठक;+ ४० अंगणाचे पडदे, त्यांचे खांब आणि खाच असलेल्या बैठका,+ अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,+ त्याचे दोर आणि खुंट्या,+ तसंच उपासना मंडपाच्या, म्हणजे भेटमंडपाच्या सेवेसाठी लागणारी सर्व भांडी; ४१ पवित्र ठिकाणात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रं+ आणि याजक म्हणून सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रं.

४२ यहोवाने मोशेला जे काही सांगितलं, त्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी सगळी कामं केली.+ ४३ त्यांनी बनवलेल्या सगळ्या गोष्टी जेव्हा मोशेने पाहिल्या, तेव्हा यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी त्या बनवल्या आहेत, असं त्याला दिसलं; आणि मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा