वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • याजकांची नियुक्‍ती (१-३७)

      • दररोजचं अर्पण (३८-४६)

निर्गम २९:१

तळटीपा

  • *

    किंवा “तरणा बैल.”

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:२; अनु १७:१

निर्गम २९:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी ६:२०

निर्गम २९:३

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:२६

निर्गम २९:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:३६; ४०:२८; लेवी ८:२, ३
  • +लेवी ८:६; इब्री १०:२२

निर्गम २९:५

तळटीपा

  • *

    किंवा “कमरबंद.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४; लेवी ८:७; १६:४
  • +निर्ग २८:८

निर्गम २९:६

तळटीपा

  • *

    किंवा “पवित्र मुकुट.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३६; ३९:३०; लेवी ८:९

निर्गम २९:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:२३-२५
  • +लेवी ८:१२; स्तो १३३:२; यश ६१:१; प्रेका १०:३८

निर्गम २९:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४०; लेवी ८:१३

निर्गम २९:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “अहरोनचा हात आणि त्याच्या मुलांचा हात भर.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:१-३, ४०, ४३; ४०:१५
  • +निर्ग २८:४१

निर्गम २९:१०

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:१४-१७

निर्गम २९:११

समासातील संदर्भ

  • +लेवी ४:३

निर्गम २९:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २७:२
  • +लेवी ४:७

निर्गम २९:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “जाळून धूर करावा.”

समासातील संदर्भ

  • +लेवी ३:१७
  • +लेवी ४:८-१०

निर्गम २९:१५

समासातील संदर्भ

  • +लेवी १:४; ८:१८-२१

निर्गम २९:१६

समासातील संदर्भ

  • +इब्री ९:२२

निर्गम २९:१७

समासातील संदर्भ

  • +लेवी १:१३

निर्गम २९:१८

तळटीपा

  • *

    किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ८:२१

निर्गम २९:१९

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:२२-२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ९/२०२०, पृ. ४

निर्गम २९:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:२३-२५
  • +लेवी ८:३०

निर्गम २९:२२

तळटीपा

  • *

    शब्दशः “अभिषेकाचा मेंढा.”

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:२२, २५-२८
  • +लेवी ३:९, १०

निर्गम २९:२४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “मागेपुढे हालव.”

निर्गम २९:२५

तळटीपा

  • *

    किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”

निर्गम २९:२६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “मागेपुढे हालव.”

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:२९; स्तो ९९:६

निर्गम २९:२७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २९:२२

निर्गम २९:२८

समासातील संदर्भ

  • +लेवी ७:३४; १०:१४
  • +लेवी ७:११, १४

निर्गम २९:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४
  • +गण २०:२६

निर्गम २९:३०

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:३५

निर्गम २९:३१

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:३१

निर्गम २९:३२

समासातील संदर्भ

  • +१कर ९:१३

निर्गम २९:३३

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्यांचा हात भरण्यासाठी.”

  • *

    शब्दशः “परका.” म्हणजे, अहरोनच्या वंशातला नसलेला माणूस.

समासातील संदर्भ

  • +लेवी २२:१०; गण ३:१०

निर्गम २९:३४

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:३२

निर्गम २९:३५

तळटीपा

  • *

    शब्दशः “हात भरण्याचा.”

समासातील संदर्भ

  • +लेवी ८:४, ३३

निर्गम २९:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:२६, २८; लेवी ८:११; गण ७:१

निर्गम २९:३७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:१०

निर्गम २९:३८

समासातील संदर्भ

  • +२इत २:४; इब्री ७:२७; १०:११

निर्गम २९:३९

तळटीपा

  • *

    किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”

समासातील संदर्भ

  • +गण २८:४-६

निर्गम २९:४०

तळटीपा

  • *

    एक एफा म्हणजे २२ ली. अति. ख१४ पाहा.

  • *

    एक हिन म्हणजे ३.६७ ली. अति. ख१४ पाहा.

निर्गम २९:४१

तळटीपा

  • *

    किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”

  • *

    किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”

निर्गम २९:४२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:२२; लेवी १:१; गण १७:४

निर्गम २९:४३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:३४; गण १२:५; १रा ८:११

निर्गम २९:४४

समासातील संदर्भ

  • +लेवी २२:९

निर्गम २९:४५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:८; लेवी २६:१२; जख २:११; २कर ६:१६

निर्गम २९:४६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. २९:१लेवी ८:२; अनु १७:१
निर्ग. २९:२लेवी ६:२०
निर्ग. २९:३लेवी ८:२६
निर्ग. २९:४निर्ग २६:३६; ४०:२८; लेवी ८:२, ३
निर्ग. २९:४लेवी ८:६; इब्री १०:२२
निर्ग. २९:५निर्ग २८:४; लेवी ८:७; १६:४
निर्ग. २९:५निर्ग २८:८
निर्ग. २९:६निर्ग २८:३६; ३९:३०; लेवी ८:९
निर्ग. २९:७निर्ग ३०:२३-२५
निर्ग. २९:७लेवी ८:१२; स्तो १३३:२; यश ६१:१; प्रेका १०:३८
निर्ग. २९:८निर्ग २८:४०; लेवी ८:१३
निर्ग. २९:९निर्ग २८:१-३, ४०, ४३; ४०:१५
निर्ग. २९:९निर्ग २८:४१
निर्ग. २९:१०लेवी ८:१४-१७
निर्ग. २९:११लेवी ४:३
निर्ग. २९:१२निर्ग २७:२
निर्ग. २९:१२लेवी ४:७
निर्ग. २९:१३लेवी ३:१७
निर्ग. २९:१३लेवी ४:८-१०
निर्ग. २९:१५लेवी १:४; ८:१८-२१
निर्ग. २९:१६इब्री ९:२२
निर्ग. २९:१७लेवी १:१३
निर्ग. २९:१८उत्प ८:२१
निर्ग. २९:१९लेवी ८:२२-२४
निर्ग. २९:२१निर्ग ३०:२३-२५
निर्ग. २९:२१लेवी ८:३०
निर्ग. २९:२२लेवी ८:२२, २५-२८
निर्ग. २९:२२लेवी ३:९, १०
निर्ग. २९:२६लेवी ८:२९; स्तो ९९:६
निर्ग. २९:२७निर्ग २९:२२
निर्ग. २९:२८लेवी ७:३४; १०:१४
निर्ग. २९:२८लेवी ७:११, १४
निर्ग. २९:२९निर्ग २८:४
निर्ग. २९:२९गण २०:२६
निर्ग. २९:३०लेवी ८:३५
निर्ग. २९:३१लेवी ८:३१
निर्ग. २९:३२१कर ९:१३
निर्ग. २९:३३लेवी २२:१०; गण ३:१०
निर्ग. २९:३४लेवी ८:३२
निर्ग. २९:३५लेवी ८:४, ३३
निर्ग. २९:३६निर्ग ३०:२६, २८; लेवी ८:११; गण ७:१
निर्ग. २९:३७निर्ग ४०:१०
निर्ग. २९:३८२इत २:४; इब्री ७:२७; १०:११
निर्ग. २९:३९गण २८:४-६
निर्ग. २९:४२निर्ग २५:२२; लेवी १:१; गण १७:४
निर्ग. २९:४३निर्ग ४०:३४; गण १२:५; १रा ८:११
निर्ग. २९:४४लेवी २२:९
निर्ग. २९:४५निर्ग २५:८; लेवी २६:१२; जख २:११; २कर ६:१६
निर्ग. २९:४६निर्ग २०:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम २९:१-४६

निर्गम

२९ त्यांनी माझी याजक या नात्याने सेवा करावी म्हणून तू पुढील गोष्टी कर: एक गोऱ्‍हा,* आणि कोणताही दोष नसलेले दोन मेंढे घे.+ २ तसंच बेखमीर* भाकरी, तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आणि तेलात मळलेल्या बेखमीर भाकरी घे.+ त्या चांगल्या गव्हाच्या पिठापासून बनव ३ आणि त्या टोपलीत ठेवून, गोऱ्‍हा आणि दोन मेंढ्यांसोबत ती टोपली अर्पण कर.+

४ तू अहरोन आणि त्याच्या मुलांना भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ+ आणून त्यांना अंघोळ घाल.+ ५ मग अहरोनसाठी तयार केलेली वस्त्रं,+ म्हणजेच अंगरखा, एफोदच्या आत घालायचा बिनबाह्‍यांचा झगा, एफोद आणि ऊरपट त्याला घाल. त्यानंतर, एफोदचा विणलेला कमरपट्टा* त्याच्या कंबरेला बांध.+ ६ मग त्याला पगडी घाल आणि समर्पणाचं पवित्र चिन्ह* त्या पगडीवर लाव.+ ७ नंतर, अभिषेकाचं तेल+ घेऊन त्याच्या डोक्यावर ओत आणि त्याचा अभिषेक कर.+

८ मग त्याच्या मुलांना पुढे आणून त्यांना अंगरखे घाल+ ९ आणि अहरोनसोबतच त्यांनाही कमरबंद बांधून त्यांच्या डोक्याला पगडी बांध. यापुढे, कायमचा नियम म्हणून याजकपद त्यांचं होईल.+ अशा रितीने, तू अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्‍त कर.*+

१० यानंतर तू भेटमंडपासमोर गोऱ्‍हा आण आणि अहरोन व त्याची मुलं त्याच्या डोक्यावर हात ठेवतील.+ ११ भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ तो गोऱ्‍हा यहोवासमोर काप.+ १२ त्याचं काही रक्‍त बोटावर घेऊन ते वेदीच्या शिंगांना लाव+ आणि उरलेलं सगळं रक्‍त वेदीच्या पायथ्याशी ओतून टाक.+ १३ मग आतड्यांवरची आणि यकृतावरची सगळी चरबी,+ तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांच्यावरची चरबी घेऊन ती वेदीवर जाळ.*+ १४ पण, गोऱ्ह्याचं मांस, त्याची कातडी आणि शेण छावणीच्या बाहेर नेऊन जाळ. हे पापार्पण आहे.

१५ मग दोन मेंढ्यांपैकी एक घे आणि अहरोन व त्याची मुलं त्याच्या डोक्यावर हात ठेवतील.+ १६ यानंतर मेंढा काप आणि त्याचं रक्‍त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूला शिंपड.+ १७ मेंढा कापून त्याचे तुकडे कर आणि त्याची आतडी व पाय धुऊन,+ त्याचे सगळे तुकडे डोक्यासोबत वेदीवर रचून ठेव. १८ सबंध मेंढा वेदीवर जाळ. हे यहोवासाठी होमार्पण आहे आणि त्याच्या सुवासाने त्याला आनंद होईल.*+ हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.

१९ यानंतर तू दुसरा मेंढा घे आणि अहरोन व त्याची मुलं त्याच्या डोक्यावर हात ठेवतील.+ २० मग मेंढा काप आणि त्याचं काही रक्‍त घेऊन अहरोनच्या उजव्या कानाच्या पाळीवर आणि त्याच्या मुलांच्या उजव्या कानाच्या पाळीवर, तसंच त्यांच्या उजव्या हाताच्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर लाव. वेदीच्या चारही बाजूला मेंढ्याचं काही रक्‍त शिंपड. २१ मग वेदीवरचं काही रक्‍त आणि अभिषेकाचं तेल+ घेऊन ते अहरोन आणि त्याच्या वस्त्रांवर, तसंच त्याच्या मुलांवर आणि त्यांच्या वस्त्रांवर शिंपड, म्हणजे तो आणि त्याची वस्त्रं, तसंच त्याची मुलं आणि त्यांची वस्त्रं पवित्र होतील.+

२२ हा नियुक्‍तीचा मेंढा*+ असल्यामुळे, त्याची चरबी, चरबीदार शेपूट, त्याच्या आतड्यांवरची आणि यकृतावरची चरबी, तसंच दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची चरबी,+ आणि त्याचा उजवा पाय घे. २३ तसंच, यहोवासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीतून, एक भाकर, एक पापडी आणि तेलात मळलेली एक भाकर घे. २४ हे सर्व अहरोन आणि त्याच्या मुलांच्या हातांत ठेव आणि ओवाळण्याचं अर्पण* म्हणून ते यहोवासमोर ओवाळ.* २५ मग तू ते त्यांच्या हातांतून घेऊन वेदीवरच्या होमार्पणावर जाळ म्हणजे त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.

२६ मग अहरोनसाठी अर्पण केलेल्या नियुक्‍तीच्या मेंढ्याच्या छातीचा भाग घे.+ तो ओवाळण्याचं अर्पण* म्हणून यहोवासमोर ओवाळ.* हा तुझा भाग असेल. २७ अहरोन आणि त्याच्या मुलांना याजक म्हणून नियुक्‍त करताना अर्पण केलेल्या मेंढ्यातले+ हे भाग तू पवित्र कर: ओवाळण्याच्या अर्पणातला छातीचा भाग आणि अर्पण केलेल्या पवित्र भागातला पाय. २८ हे भाग अहरोनचे आणि त्याच्या मुलांचे होतील आणि इस्राएली लोकांनी ते देण्याचा नियम, एक कायमचा नियम म्हणून पाळावा; कारण तो पवित्र भाग आहे.+ त्यांनी यहोवाला दिलेल्या शांती-अर्पणांतून+ तो त्यांचा पवित्र भाग आहे.

२९ अहरोनची पवित्र वस्त्रं+ त्याच्यानंतर त्याची मुलं वापरतील.+ याजक म्हणून त्यांचा अभिषेक करून त्यांना नियुक्‍त केलं जाईल, तेव्हा त्यांनी ती वापरावीत. ३० त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी याजक होईल आणि भेटमंडपात येऊन पवित्र ठिकाणी सेवा करेल, तो ती वस्त्रं सात दिवस घालेल.+

३१ तू नियुक्‍तीचा मेंढा घेऊन त्याचं मांस एखाद्या पवित्र ठिकाणी शिजव.+ ३२ अहरोन आणि त्याची मुलं भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ मेंढ्याचं मांस आणि टोपलीतल्या भाकरी खातील.+ ३३ त्यांना याजक म्हणून नियुक्‍त करण्यासाठी* आणि पवित्र करण्यासाठी ज्या गोष्टींनी प्रायश्‍चित्त करण्यात आलं, त्या त्यांनी खाव्यात. पण दुसऱ्‍या कोणालाही* त्या खाण्याचा अधिकार नाही, कारण त्या पवित्र आहेत.+ ३४ नियुक्‍तीच्या बलिदानातलं मांस आणि भाकरी यांपैकी सकाळपर्यंत काही उरलं, तर ते जाळून टाका.+ ते खाऊ नका कारण ते पवित्र आहे.

३५ मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे या सर्व गोष्टी अहरोन आणि त्याच्या मुलांसोबत कर. त्यांना याजक म्हणून नियुक्‍त करण्याचा* हा विधी तू सात दिवसांपर्यंत कर.+ ३६ प्रायश्‍चित्तासाठी दररोज पापार्पणाचा गोऱ्‍हा अर्पण कर आणि वेदीसाठी प्रायश्‍चित्त करून तिला पापापासून शुद्ध कर आणि तिला पवित्र करण्यासाठी तिचा अभिषेक कर.+ ३७ तू सात दिवस वेदीसाठी प्रायश्‍चित्त कर आणि तिला पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र वेदी बनेल.+ जो कोणी वेदीला हात लावेल तो पवित्र असावा.

३८ तू वेदीवर पुढील गोष्टी अर्पण कर: दररोज एकेका वर्षाचे दोन मेंढे नेहमी अर्पण केले जावेत.+ ३९ एक सकाळी आणि दुसरा संध्याकाळी* अर्पण करावा.+ ४० एक एफा* चांगल्या पिठाचा दहावा भाग आणि एक हिन* शुद्ध जैतुनाच्या तेलाचा चौथा भाग एकत्र करून, तसंच पेयार्पणासाठी एक हिन द्राक्षारसाचा चौथा भाग, पहिल्या मेंढ्यासोबत अर्पण केला जावा. ४१ तू संध्याकाळी* दुसरा मेंढा अर्पण करताना सकाळसारखं हेच अन्‍नार्पण आणि पेयार्पण दे. तू हे अर्पण यहोवासाठी अग्नीत जाळ, म्हणजे त्याच्या सुवासाने त्याला आनंद होईल.* ४२ हे यहोवासमोर भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ पिढ्या न्‌ पिढ्या द्यायचं नियमित होमार्पण असेल. तिथे मी लोकांसमोर प्रकट होईन आणि तुझ्याशी बोलेन.+

४३ मी तिथे इस्राएली लोकांसमोर प्रकट होईन आणि माझ्या तेजाने ते ठिकाण पवित्र होईल.+ ४४ मी भेटमंडप आणि वेदी पवित्र करीन. तसंच, मी अहरोन आणि त्याच्या मुलांना पवित्र करीन,+ म्हणजे ते याजक म्हणून माझी सेवा करतील. ४५ मी इस्राएली लोकांमध्ये राहीन आणि मी त्यांचा देव होईन.+ ४६ आणि मी त्यांच्यामध्ये राहावं म्हणून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणणारा मी त्यांचा देव यहोवा आहे,+ या गोष्टीची त्यांना खातरी पटेल. मी त्यांचा देव यहोवा आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा