वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • सीनाय पर्वताजवळ (१-२५)

        • इस्राएल याजकांनी बनलेलं राज्य होणार (५, ६)

        • देवाला भेटण्यासाठी लोकांना पवित्र केलं जातं (१४, १५)

निर्गम १९:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १७:१
  • +निर्ग ३:१, १२

निर्गम १९:३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:३८

निर्गम १९:४

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:११, १२; यश ६३:९
  • +अनु ४:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९६, पृ. १०-११

निर्गम १९:५

तळटीपा

  • *

    किंवा “मौल्यवान संपत्ती.”

समासातील संदर्भ

  • +१रा ८:५३; स्तो १३५:४
  • +अनु १०:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. २५

    १/१५/२०१२, पृ. २७-२९

    १/१५/२०१०, पृ. ४-५

    ९/१/२०००, पृ. २१

    ३/१५/१९९८, पृ. १२

    २/१/१९९८, पृ. १०-११, १७

    ७/१/१९९५, पृ. १५-१७, १८-१९

निर्गम १९:६

समासातील संदर्भ

  • +लेवी ११:४४; अनु ७:६; १पेत्र २:९; प्रक ५:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. २५

    १/१५/२०१२, पृ. २७-२९

    ९/१/२०००, पृ. २१

    २/१/१९९८, पृ. १०-११, १७

    ७/१/१९९५, पृ. १५-१७, १८-१९

    २/१/१९९०, पृ. १३, १७-१९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

निर्गम १९:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:३

निर्गम १९:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:७; यहो २४:२४

निर्गम १९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

निर्गम १९:१३

तळटीपा

  • *

    कदाचित बाणाने.

  • *

    शब्दशः “मेंढ्याच्या शिंगाचा.”

समासातील संदर्भ

  • +इब्री १२:२०
  • +निर्ग २०:१८

निर्गम १९:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१०

निर्गम १९:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “स्त्रीजवळ जाऊ नका.”

निर्गम १९:१६

समासातील संदर्भ

  • +अनु ४:११; १रा ८:१२; स्तो ९७:२
  • +इब्री १२:१८-२१

निर्गम १९:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:१७; अनु ४:११, १२; २इत ७:१-३
  • +स्तो ६८:८

निर्गम १९:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:१२

निर्गम १९:२२

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुटून पडणं.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १०:१, २; १इत १३:१०

निर्गम १९:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१२

निर्गम १९:२४

समासातील संदर्भ

  • +गण १६:१९, ३५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. १९:२निर्ग १७:१
निर्ग. १९:२निर्ग ३:१, १२
निर्ग. १९:३प्रेका ७:३८
निर्ग. १९:४अनु ३२:११, १२; यश ६३:९
निर्ग. १९:४अनु ४:३४
निर्ग. १९:५१रा ८:५३; स्तो १३५:४
निर्ग. १९:५अनु १०:१४
निर्ग. १९:६लेवी ११:४४; अनु ७:६; १पेत्र २:९; प्रक ५:९, १०
निर्ग. १९:७निर्ग २४:३
निर्ग. १९:८निर्ग २४:७; यहो २४:२४
निर्ग. १९:१३इब्री १२:२०
निर्ग. १९:१३निर्ग २०:१८
निर्ग. १९:१४निर्ग १९:१०
निर्ग. १९:१६अनु ४:११; १रा ८:१२; स्तो ९७:२
निर्ग. १९:१६इब्री १२:१८-२१
निर्ग. १९:१८निर्ग २४:१७; अनु ४:११, १२; २इत ७:१-३
निर्ग. १९:१८स्तो ६८:८
निर्ग. १९:२०निर्ग २४:१२
निर्ग. १९:२२लेवी १०:१, २; १इत १३:१०
निर्ग. १९:२३निर्ग १९:१२
निर्ग. १९:२४गण १६:१९, ३५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम १९:१-२५

निर्गम

१९ इस्राएली लोक ज्या दिवशी इजिप्त देशातून बाहेर निघाले, त्याच्या बरोबर तीन महिन्यांनी ते सीनायच्या ओसाड रानात आले. २ रफीदीमवरून तळ हलवून+ इस्राएली लोक सीनायच्या ओसाड रानात पोहोचले आणि त्यांनी तिथे सीनाय पर्वतासमोर तळ दिला.+

३ मग मोशे पर्वतावर खऱ्‍या देवासमोर गेला आणि यहोवाने त्याला पर्वतावरून हाक मारली.+ तो त्याला म्हणाला: “तू याकोबच्या घराण्याला म्हणजे इस्राएली लोकांना असं सांग, ४ ‘तुम्हाला गरुडांच्या पंखांवर उचलून माझ्याजवळ आणण्यासाठी+ मी इजिप्तच्या लोकांसोबत काय केलं, हे तर तुम्ही पाहिलंच आहे.+ ५ जर आता तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकलं आणि माझ्या कराराचं पालन केलं, तर तुम्ही सर्व राष्ट्रांमधून माझी खास प्रजा* व्हाल,+ कारण सबंध पृथ्वी माझ्या मालकीची आहे.+ ६ तुम्ही माझ्यासाठी याजकांनी बनलेलं राज्य आणि पवित्र राष्ट्र बनाल.’+ हे सर्व तू इस्राएली लोकांना सांग.”

७ मग मोशेने जाऊन लोकांमधल्या वडीलजनांना बोलावून घेतलं आणि यहोवाने त्याला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या.+ ८ तेव्हा सर्व लोकांनी एकमताने उत्तर दिलं: “यहोवाने जे काही सांगितलं आहे, ते सर्व करायला आम्ही तयार आहोत.”+ मोशेने लगेच जाऊन लोकांचं हे उत्तर यहोवाला कळवलं. ९ मग यहोवा मोशेला म्हणाला: “पाहा! मी एका काळ्या ढगात तुझ्याकडे येईन म्हणजे मी तुझ्याशी बोलत असताना लोक ऐकतील आणि ते तुझ्यावरही नेहमी विश्‍वास ठेवतील.” मग मोशेने लोकांचं म्हणणं यहोवाला सांगितलं.

१० यानंतर यहोवा मोशेला म्हणाला: “लोकांकडे जा आणि आज व उद्या त्यांना पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत, ११ आणि तिसऱ्‍या दिवसासाठी तयारी करावी, कारण तिसऱ्‍या दिवशी यहोवा सर्व लोकांदेखत खाली सीनाय पर्वतावर येईल. १२ तू पूर्ण पर्वताभोवती लोकांसाठी सीमा ठरवून दे आणि त्यांना सांग, ‘लक्षात ठेवा, कोणीही पर्वतावर जाऊ नका आणि त्याच्या सीमेवर पाऊलही ठेवू नका. जो कोणी पर्वतावर पाऊल ठेवेल, त्याला नक्की ठार मारलं जाईल. १३ त्या माणसाला कोणीही हात लावू नका, तर त्याला दगडमार करून किंवा आरपार छेदून* ठार मारा. मग ते जनावर असो किंवा माणूस.’+ पण शिंगाचा* आवाज ऐकू आल्यावर,+ ते पर्वतावर येऊ शकतात.”

१४ मग मोशे पर्वतावरून खाली लोकांजवळ आला आणि त्याने त्यांना पवित्र केलं आणि त्यांनी आपले कपडे धुतले.+ १५ तो लोकांना म्हणाला: “तिसऱ्‍या दिवसासाठी तयारी करा. कोणीही शरीरसंबंध ठेवू नका.”*

१६ तिसऱ्‍या दिवशी सकाळी, ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. पर्वतावर एक दाट ढग दिसला+ आणि शिंगाचा खूप मोठा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा छावणीतले सगळे लोक थरथर कापू लागले.+ १७ मग मोशे लोकांना खऱ्‍या देवाला भेटायला छावणीतून बाहेर घेऊन आला आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. १८ संपूर्ण सीनाय पर्वतातून धूर निघत होता, कारण यहोवा आगीतून पर्वतावर उतरला होता.+ भट्टीतून निघावा तसा धूर वर आकाशाकडे जात होता आणि संपूर्ण पर्वताला भयंकर हादरे बसत होते.+ १९ शिंगाचा आवाज वाढत गेला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि खऱ्‍या देवाने त्याला उत्तर दिलं.

२० मग यहोवा सीनाय पर्वताच्या माथ्यावर खाली उतरला. यहोवाने पर्वताच्या माथ्यावरून मोशेला बोलावलं आणि मोशे वर चढून गेला.+ २१ तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “खाली जाऊन लोकांना बजावून सांग, की त्यांनी यहोवाला पाहण्यासाठी सीमा ओलांडून वर यायचा प्रयत्न करू नये, नाहीतर त्यांच्यापैकी बरेच जण मरतील. २२ आणि नेहमी यहोवासमोर येणाऱ्‍या याजकांनी स्वतःला पवित्र करावं म्हणजे यहोवा त्यांना मारून टाकणार नाही.”*+ २३ मग मोशे यहोवाला म्हणाला: “तू आधीच आम्हाला अशी ताकीद दिली आहेस, की ‘पर्वताभोवती सीमा ठरवून दे आणि त्याला पवित्र कर.’ त्यामुळे लोकांना सीनाय पर्वतावर येता येणार नाही.”+ २४ पण यहोवा त्याला म्हणाला: “खाली जा आणि अहरोनला सोबत घेऊन परत वर ये. पण याजकांनी आणि लोकांनी यहोवाकडे येण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर तो त्यांना ठार मारेल.”+ २५ म्हणून मोशे खाली लोकांकडे आला आणि त्याने त्यांना हे सगळं सांगितलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा