वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • होरेब इथे पाणी नसल्याची तक्रार (१-४)

      • खडकातून पाणी (५-७)

      • अमालेकी लोकांचा हल्ला आणि पराभव (८-१६)

निर्गम १७:१

समासातील संदर्भ

  • +गण ३३:२, १२
  • +गण ३३:१४

निर्गम १७:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ५:१९, २१; गण १४:२, ३; २०:३
  • +गण १४:२२; स्तो ७८:१८, २२; १०६:१४

निर्गम १७:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:२, ३

निर्गम १७:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:२०

निर्गम १७:६

समासातील संदर्भ

  • +गण २०:८; अनु ८:१४, १५; नहे ९:१५; स्तो ७८:१५; १०५:४१; १कर १०:१, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१८, पृ. १३-१४

निर्गम १७:७

तळटीपा

  • *

    म्हणजे, “परीक्षा घेणं; परीक्षा.”

  • *

    म्हणजे, “भांडणं.”

समासातील संदर्भ

  • +अनु ९:२२
  • +स्तो ८१:७
  • +अनु ६:१६; स्तो ९५:८, ९; इब्री ३:८, ९

निर्गम १७:८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:१२
  • +अनु २५:१७; १शमु १५:२

निर्गम १७:९

समासातील संदर्भ

  • +गण ११:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००२, पृ. ९-१०

निर्गम १७:१०

समासातील संदर्भ

  • +यहो ११:१५
  • +निर्ग २४:१३, १४

निर्गम १७:१३

समासातील संदर्भ

  • +यहो ११:१२

निर्गम १७:१४

तळटीपा

  • *

    किंवा “स्मारक.”

समासातील संदर्भ

  • +गण २४:२०; अनु २५:१९; १इत ४:४२, ४३

निर्गम १७:१५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “यहोवा माझा झेंडा आहे.”

निर्गम १७:१६

समासातील संदर्भ

  • +प्रक १९:१
  • +१शमु १५:२०; एस्ते ९:२४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. १७:१गण ३३:२, १२
निर्ग. १७:१गण ३३:१४
निर्ग. १७:२निर्ग ५:१९, २१; गण १४:२, ३; २०:३
निर्ग. १७:२गण १४:२२; स्तो ७८:१८, २२; १०६:१४
निर्ग. १७:३निर्ग १६:२, ३
निर्ग. १७:५निर्ग ७:२०
निर्ग. १७:६गण २०:८; अनु ८:१४, १५; नहे ९:१५; स्तो ७८:१५; १०५:४१; १कर १०:१, ४
निर्ग. १७:७अनु ९:२२
निर्ग. १७:७स्तो ८१:७
निर्ग. १७:७अनु ६:१६; स्तो ९५:८, ९; इब्री ३:८, ९
निर्ग. १७:८उत्प ३६:१२
निर्ग. १७:८अनु २५:१७; १शमु १५:२
निर्ग. १७:९गण ११:२८
निर्ग. १७:१०यहो ११:१५
निर्ग. १७:१०निर्ग २४:१३, १४
निर्ग. १७:१३यहो ११:१२
निर्ग. १७:१४गण २४:२०; अनु २५:१९; १इत ४:४२, ४३
निर्ग. १७:१६प्रक १९:१
निर्ग. १७:१६१शमु १५:२०; एस्ते ९:२४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम १७:१-१६

निर्गम

१७ इस्राएलचे सर्व लोक यहोवाच्या आज्ञेप्रमाणे सीनच्या ओसाड रानातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडले+ आणि रफीदीम इथे येऊन त्यांनी तळ दिला.+ पण तिथे लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं.

२ त्यामुळे लोक मोशेबरोबर भांडू लागले+ आणि म्हणाले: “आम्हाला प्यायला पाणी दे!” पण मोशे त्यांना म्हणाला: “माझ्याशी का भांडताय? तुम्ही सारखी यहोवाची परीक्षा का पाहता?”+ ३ पण लोकांना खूप तहान लागली होती. म्हणून ते मोशेविरुद्ध कुरकुर करत म्हणाले:+ “तू आम्हाला, आमच्या मुलाबाळांना आणि आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकण्यासाठी इजिप्तमधून बाहेर का आणलंस?” ४ शेवटी, मोशेने यहोवाकडे याचना केली: “मी या लोकांचं काय करू? आणखी काही वेळाने तर ते मला दगडमार करतील!”

५ मग यहोवा मोशेला म्हणाला: “लोकांच्या पुढे जा आणि इस्राएलच्या काही वडीलजनांनाही आपल्यासोबत ने. जी काठी तू नाईल नदीवर मारली होतीस,+ तीही सोबत घेऊन जा. ती काठी हातात घे आणि पुढे चाल. ६ पाहा! मी होरेब इथे एका खडकावर तुझ्यासमोर उभा असेन. तू त्या खडकाला मार, म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पाणी पितील.+ मोशेने इस्राएलच्या वडीलजनांसमोर तसंच केलं.” ७ म्हणून त्याने त्या जागेचं नाव मस्सा*+ आणि मरीबा*+ असं ठेवलं, कारण तिथे इस्राएली लोकांनी भांडण केलं आणि “यहोवा खरोखरच आपल्यामध्ये आहे का?” असं म्हणून त्यांनी यहोवाची परीक्षा घेतली.+

८ नंतर, अमालेकी+ लोकांनी येऊन रफीदीम इथे इस्राएली लोकांशी लढाई केली.+ ९ तेव्हा मोशे यहोशवाला+ म्हणाला: “आपल्यातली काही माणसं निवड आणि अमालेकी लोकांशी जाऊन लढ. उद्या मी खऱ्‍या देवाची काठी हातात घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.” १० मग मोशेने सांगितल्याप्रमाणे यहोशवाने केलं+ आणि तो अमालेकी लोकांशी लढला. मोशे, अहरोन आणि हूर+ हे टेकडीच्या माथ्यावर गेले.

११ जोपर्यंत मोशे आपले हात वर ठेवायचा तोपर्यंत इस्राएली लोक लढाईत शक्‍तिशाली ठरायचे, पण त्याने हात खाली करताच अमालेकी लोक शक्‍तिशाली ठरायचे. १२ मोशेचे हात दुखायला लागले तेव्हा त्यांनी एक दगड घेऊन मोशेला त्यावर बसवलं. मग अहरोन आणि हूर यांनी त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहून त्याच्या हातांना आधार दिला. त्यामुळे, त्याचे हात सूर्य मावळेपर्यंत स्थिर राहिले. १३ अशा रितीने, यहोशवाने अमालेक आणि त्याच्या लोकांना तलवारीने हरवलं.+

१४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “‘मी या पृथ्वीवरून अमालेकी लोकांचं नामोनिशाण मिटवून टाकीन आणि कोणालाही त्यांचं स्मरण राहणार नाही.’+ ही गोष्ट आठवणीत राहावी* म्हणून ती एका पुस्तकात लिहून ठेव आणि ती यहोशवालाही सांग.” १५ तेव्हा मोशेने एक वेदी बांधून तिचं नाव यहोवा-निस्सी* असं ठेवलं. १६ कारण तो म्हणाला: “त्याने याहच्या+ राजासनाविरुद्ध हात उगारला, म्हणून यहोवा पिढ्या न्‌ पिढ्या अमालेकशी युद्ध करेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा