स्तोत्र
कोरहच्या मुलांचं गीत.+ स्तुतिगीत.
८७ देवाच्या नगरीचा पाया पवित्र डोंगरांवर आहे.+
२ याकोबच्या सर्व तंबूंपेक्षा
सीयोनची फाटकं, यहोवाला जास्त प्रिय वाटतात.+
३ हे खऱ्या देवाच्या नगरी,+ तुझ्याबद्दल अद्भुत गोष्टी बोलल्या जात आहेत. (सेला )
४ मला ओळखणाऱ्यांमध्ये मी राहाब*+ आणि बाबेल यांचा उल्लेख करीन;
पाहा, पलेशेथ आणि सोर, तसंच कूशसुद्धा आहे.
त्या प्रत्येकाबद्दल मी म्हणीन: “याचा जन्म सीयोनमध्ये झाला.”
५ शिवाय, सीयोनबद्दल लोक असं म्हणतील:
“तिच्यात प्रत्येकाचा जन्म झाला.”
सर्वोच्च देव या नगरीला मजबूत करेल.
६ लोकांची नोंदणी करताना यहोवा म्हणेल:
“याचा जन्म तिथे झाला.” (सेला )